BMC CLERK 2024 @mpsc20192020 Channel on Telegram

BMC CLERK 2024

@mpsc20192020


✍️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल √

◆ MPSC (राज्यसेवा) √
◆ PSI-STI-ASO √

√ Official

Visit Our Official Website
www.estudykatta.com

BMC CLERK 2024 (Marathi)

आमच्या 'BMC CLERK 2024' चॅनेलवर आपले स्वागत आहे! या चॅनेलवर, 'mpsc20192020' वापरकर्त्यांसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती, स्टडी मटेरिअल, व्याख्याने, टिप्स आणि ट्रिक्स आणि इतर उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. जरा लक्षात ठेवा, या चॅनेलवर MPSC (राज्यसेवा) परीक्षेची तयारी, PSI-STI-ASO परीक्षा, विविध सर्व परीक्षांसाठी मदतची मिळेल. आपल्याला एक्स्पर्ट्स द्वारे दिलेली माहितीचा वापर करून, आपल्याला परीक्षेत सफळतेची किंवा वर्गोद्घाटनाची पातळी उचलायला मदत मिळेल. जर आपल्याला सर्व परीक्षांच्या तयारीत साफ-सुथरी व्हायला आवडतं, तर आपल्याला हा चॅनेल नक्कीच नक्की आवडेल. आमच्या ऑफिशिअल वेबसाइट www.estudykatta.com वर भेट द्या आणि आमच्या चॅनेलवर जुडण्याची नोंद करा! नक्कीच आपल्या परीक्षेची तयारी सोपी होईल आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला साथ देणारं आमचं 'BMC CLERK 2024' चॅनेल!

BMC CLERK 2024

22 Aug, 15:22


येत्या काळात मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरण्याचे ठरवले आहे. लिपिक वर्गातून अंतर्गत भरतीद्वारे ही पदे भरली जातील. फेरीवाल्यांच्या विषयावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारल्यानंतर जून महिन्यात प्रशासनाने मुंबईत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी पालिकेने वीस महत्त्वाची ठिकाणे निश्चित केली होती. त्यात चर्चगेट, सीएसएमटी परिसर, कुलाबा, दादर स्थानक परिसर, अंधेरी, बोरीवली अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कारवाईवर भर देण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंडावली असून फेरीवाले पुन्हा दिसू लागले आहेत. मनुष्यबळाअभावी या कारवाईत सातत्य ठेवणे अवघड बनले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षक (परवाना निरीक्षक) पदे भरण्याचे ठरवले आहे. सध्या पालिकेकडे २०७ परवाना निरीक्षक असून त्यात आणखी ११८ परवाना निरीक्षकांची पदे भरली जाणार आहेत. लिपिकांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून त्यातून ही पदे भरण्यात येणार आहेत.

BMC CLERK 2024

22 Aug, 15:21


Channel name was changed to «BMC CLERK 2024»

BMC CLERK 2024

20 Aug, 07:23


BMC कार्यकारी सहायक पात्रता

दहावी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावं

दहावीला मराठी आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असायला हवं.

मराठी 30 आणि इंग्रजी 30 दोन्ही टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र अनिवार्य

MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र (नसेल तर 2 वर्ष सूट, 2 वर्षांनंतर दिलं नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल.)

BMC CLERK 2024

20 Aug, 06:59


पहिल्या प्रयत्नात पदवीधर उत्तीर्ण हवा तसेच त्याला 45% गुण हवेत.इथे एमपीएससी यूपीएससी पदवीधर घेत आहेत आणि ह्यांच्या अपेक्षा जास्त आहेत.

BMC CLERK 2024

20 Aug, 06:40


कार्यकारी सहाय्यक पदाकरिता जाहिरात

BMC CLERK 2024

20 Aug, 06:35


कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेले कंत्राटी IAS भरले जात असतील तर भविष्यात कंत्राटी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार भरले तर नवल वाटून घेऊ नका.

सावध ऐका पुढल्या हाका..!

# IAS # IPS # MPSC # UPSC

BMC CLERK 2024

12 Aug, 10:46


*पॅरिस Olympics 2024 : पदकांच्या क्रम*

1】अमेरिका : 126 पदके
2】चीन :  91 पदके
3】जपान : 45 पदके
4】ऑस्ट्रेलिया : 53 पदके
5】फ्रान्स : 64 बदके
6】नेदरलँड्स : 34 पदके
7】युनायटेड किंगडम :65 पदके
8】दक्षिण कोरिया : 32 पदके

62】पाकिस्तान : 1 पदक
71】भारत : 6 पदके

फक्त 1 सुवर्णपदका 🥇 मूळे  पाकिस्तान 62 व्या क्रमांकावर आहे आणि भारत 71 व्या

BMC CLERK 2024

04 Aug, 17:29


जोकोविचने कारकिर्दीतील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

त्याने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.

२४ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोविचने इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करून आपल्या पहिल्या ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला होता.

नोव्हाक जोकोविच करिअर गोल्डन स्लॅम जिंकणारा, म्हणजे चार ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक एकेरी सुवर्णपदक जिंकणारा केवळ पाचवा एकेरी खेळाडू ठरला आहे.

तो स्टेफी ग्राफ, आंद्रे अगासी, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांच्यासोबत एलिट यादीत सामील होतो.

BMC CLERK 2024

30 Jul, 10:00


✔️ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024

↪️ यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार खासदार सुधा मूर्ती यांना जाहीर करण्यात आला आहे.

↪️या पुरस्काराचे हे 42 वे वर्ष आहे.

↪️लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली आहे.

↪️सध्या राज्यसभेचे अधिवेशन कामकाज सुरू आहे, त्यामुळे राज्यसभा खासदार सुधा मूर्ती पुण्यात येऊ शकणार नाहीत.

↪️त्यांच्या विनंतीला मान देऊन यंदा प्रथमच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात होणार आहे.

↪️1 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम महाराष्ट्र सदनात होणार आहेत.

2023 चा पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

BMC CLERK 2024

30 Jul, 10:00


मनु भाकर आणि सरबजोत सिंग जोडीनं नेमबाजीत १० मीटर एअर पिस्टल मिश्र गटात पटकावलं कांस्य पदक.

♦️एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू.

BMC CLERK 2024

27 Jul, 11:08


नवी मुंबई महनगरपालिकेच्या लिपिक साठी दोन्ही सर्टिफिकेट लागतील

मराठी 30
इंग्रजी 40

MPSC सारखं कोणततरी एक नाही चालणार

BMC CLERK 2024

15 Jul, 13:07


♦️ #Combine जाहिरात गट ब, गट क सुधारित आरक्षणसह आजच्या तारीख पर्यंत आयोगाला..

👉 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता एकूण 1037 पदाचे मागणीपत्र आयोगाच्या कार्यालयास प्राप्त झाले आहेत.

BMC CLERK 2024

18 Jun, 12:31


🛑 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर पोलीस भरती करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन.

https://youtu.be/YfcNXX9gIWY?si=iSm7re7JT1oPulL_

BMC CLERK 2024

04 Jun, 17:00


🔸महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

-
----------------------------------------------------





BMC CLERK 2024

24 Feb, 06:30


पालघर येथे एमपीएससी राज्यसेवा व गट ब गट क च्या ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज हवी असल्यास संपर्क करा @mpscguru12 @Hello19892