𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆 @mpsc0207 Channel on Telegram

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

@mpsc0207


MPSC 0207 🎯🏆 (English)

Are you preparing for the Maharashtra Public Service Commission (MPSC) exam? Look no further! Join our Telegram channel MPSC 0207 🎯🏆 for all the latest updates, study materials, previous year question papers, and expert guidance to help you ace the exam with flying colors. Our channel is dedicated to providing valuable resources and tips to aspiring candidates who are determined to succeed in this competitive exam. Stay ahead of the game with MPSC 0207 🎯🏆 and boost your chances of cracking the MPSC exam. Join us today and embark on your journey towards a successful career in the government sector!

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

23 Jan, 13:12


Combined गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीचे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...

https://mpsconline.gov.in/candidate/login

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

23 Jan, 03:49


☘️ नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती विशेष 🙏🙏
#Informative short

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

21 Jan, 14:52


https://www.youtube.com/live/gpLfjiCeksw?feature=shared

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

21 Jan, 14:22


महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

21 Jan, 14:22


2b745123-6f5d-4b2a-b2c1-923985c1ac19.pdf

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

21 Jan, 06:50


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे

सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन आयुक्तांवर असेल.

यू.पी.एस. मदान यांची मुदत गेल्या सप्टेंबरमध्ये संपल्यापासून निवडणूक आयुक्तपद रिक्त होते.

दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस सरकारकडून राज्यपालांना करण्यात आली होती. राज्यपाल राधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करीत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

वाघमारे हे मूळचे नागपूरचे असून, त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळाल्याची कुजबूज मंत्रालयीन वर्तुळात होती. वाघमारे यांनी नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त, ऊर्जा, सामाजिक न्याय विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

20 Jan, 13:10


https://youtube.com/live/kqdfnvGuOdA?feature=share

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

20 Jan, 07:29


खान अब्दुल गफार खान पुण्यतिथी..... Informative Short 👆👆

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

20 Jan, 05:21


🔥Test Series Batch - 3 🔥
( Offline Paper & Online Discussion )

🔔...ADMISSION OPEN...🔔

🟢 परीक्षेचे ठिकाण - ज्ञानेश्वर पाटील सरांची गुरुकुल प्रबोधिनी, शिवाजी मंदिर संस्था,पहिला मजला पेरूगेट पोलीस चौकी शेजारी,सदाशिव पेठ पुणे.
https://maps.app.goo.gl/a6NPtnfBGRmnQM8e8
📍ऑफीस पत्ता : पहिला मजला, साई नारायण प्लाझा , गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, पुणे-३० https://maps.app.goo.gl/aaZVmeBmfbUKAtVA6?g_st=ac

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

20 Jan, 03:56


भारताने पुरुष व महिला दोन्ही खो-खो वर्ल्डकप जिंकला

भारताने खो-खो वर्ल्डकप जिंकला आहे. भारताच्या पुरुष संघाने खो खो वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात नेपाळचा धुव्वा उडवला.

खो-खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. भारतीय महिला संघाने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय पुरुष संघानेही ऐतिहासिक कामगिरी करत खो-खो वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले.


प्रियांका इंगळेच्या नेत्रत्वाखाली भारतीय महिला संघानं इतिहास घडवला घडवून भारताच्या महिला संघानं खो-खो वर्ल्डकप जिंकला.
स्पर्धेतील पहिला सामनाही या दोन संघांमध्येच झाला होता. त्यावेळीही टीम इंडिया जिंकली होती. अंतिम फेरीतही असेच घडले, भारतीय संघाने नेपाळला हरवून ट्रॉफी जिंकली.
या सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 54-36 अशा फरकाने पराभव केला. अंतिम सामन्यात नेपाळ संघाने नाणेफेक जिंकून बचाव करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. टर्न वनमध्ये आक्रमण करत भारतीय संघाने एकूण 26 गुण मिळवले.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

18 Jan, 11:59


https://youtube.com/live/PsNF_gkXLhg?feature=share


सोने हो..... या live आता 6 वाजता Part - 2
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

18 Jan, 06:22


इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो हे प्रजासत्ताकदिनी अतिथी

प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

सुबियांतो 25 आणि 26 जानेवारीला भारत दौऱ्यावर असतील. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ते प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. 'भारत आणि इंडोनेशियाचे संबंध पूर्वापार सौहार्दाचे संबंध आहेत.

गेल्या वर्षी 2024 मध्ये अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इंडोनेशिया देशाविषयी -

राजधानी - नुसंतारा

सर्वात मोठे शहर - जकार्ता

स्थान -
हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण 17508 बेटांवर वसला आहे.

प्रमुख बेटे -
बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी

लोकसंख्या -
सुमारे 27 कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे.

राष्ट्रीय चलन - इंडोनेशियन रुपिया (IDR)

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

17 Jan, 13:24


या रे सोनेहो आता 7 वाजता live 👆👆

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

17 Jan, 13:09


https://youtube.com/live/l57h4YStZZE?feature=share

या रे सोने हो आता 7 वाजता live....
Basic Science ची prediction Series सुरु केलीये.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

17 Jan, 05:59


☘️ श्रीहरीकोटा येथे इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच पॅड स्थापित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ☘️

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच(प्रक्षेपण) पॅड स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली.

श्रीहरीकोटा येथे, तिसऱ्या लाँच पॅड प्रकल्पात दुसऱ्या लाँच पॅडसाठी स्टँडबाय लाँच पॅड म्हणून साहाय्य प्रदान करणे तसेच इस्रोच्या पुढच्या अद्ययावत प्रक्षेपकांसाठी आवश्यक प्रक्षेपण पायाभूत सुविधा स्थापित करणे, अभिप्रेत आहे. यामुळे भविष्यातील भारतीय मानवी अंतराळ मोहिमांसाठी प्रक्षेपण क्षमतादेखील वृद्धिंगत होईल.

हा प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे:

शक्य तितकी सार्वत्रिक आणि वापरयोग्य धाटणी (कॉन्फिगरेशन ), जी केवळ एनजीएलव्हीच नव्हे तर सेमीक्रायोजेनिक स्टेजसह एलव्हीएम-3 वाहनांना तसेच एनजीएलव्हीच्या स्केल अप कॉन्फिगरेशनला देखील साहाय्यभूत होऊ शकेल, अशा प्रकारे या तिसऱ्या लाँच पॅड योजनेचे आरेखन करण्यात आले आहे. अधिकाधिक उद्योग सहभागाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जाईल. इस्रोचा पूर्वीचे लाँच पॅड स्थापित करण्यात असलेला अनुभव आणि आणि विद्यमान प्रक्षेपण संकुल सुविधा यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जाईल.

48 महिने किंवा 4 वर्षे या कालावधीत तिसरे लाँच पॅड स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

खर्च :

यासाठी एकूण 3984.86कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून यात लाँच पॅडची स्थापना आणि संलग्न सुविधांचा समावेश आहे.

लाभ :

यामुळे देशाला अधिकाधिक प्रक्षेपणे शक्य होऊन मानवी अंतराळ उड्डाणे आणि अंतराळ शोध मोहीम हाती घेण्याची राष्ट्रीय क्षमता वृद्धिंगत करणे शक्य होईल. अशा प्रकारे हा प्रकल्प भारतीय अंतराळ परिसंस्थेला चालना देईल.

पार्श्वभूमी :

भारतीय अवकाश वाहतूक प्रणाली आत्तापर्यंत पूर्णपणे फर्स्ट लॉन्च पॅड (एफएलपी) आणि सेकंड लॉन्च पॅड (एसएलपी) या दोन प्रक्षेपण पॅडवर अवलंबून होती. पीएसएलव्हीसाठी 30 वर्षांपूर्वी एफएलपी बांधण्यात आले होते. पीएसएलव्ही आणि एसएसएलव्ही प्रक्षेपणासाठी याच पॅडचा वापर अजूनही केला जात आहे. एसएलपीचा वापर प्रामुख्याने जीएसएलव्ही आणि एलव्हीएम 3 साठी केला जातो. हे पॅड पीएसएलव्हीसाठी गरज भासली तर वापरता येते. एसएलपी जवळजवळ 20 वर्षांपासून कार्यरत आहे. चांद्रयान-3 मिशनसारख्या राष्ट्रीय मोहिमांसह पीएसएलव्ही/ एलव्हीएम3 अशा काही व्यावसायिक मोहिमांमध्ये अधिक चांगल्या रितीने उड्डाणासाठीची प्रक्षेपण क्षमता या पॅडमुळे वाढली आहे. एसएलपी देखील गगनयान मोहिमेसाठी मानवी मानांकित एलव्हीएम3 प्रक्षेपणासाठी सज्ज होत आहे.

2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्थानक (बीएएस) आणि 2040 पर्यंत भारतीय क्रूड लूनर लँडिंगसह अमृत काळादरम्यान भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या विस्तारासाठी नवीन प्रोपल्शन सिस्टमसह जड प्रक्षेपण वाहनांच्या नव्या आवृत्तीची आवश्यकता आहे, सध्याच्या प्रक्षेपणाद्वारे ही गरज पूर्ण केली जाऊ शकत नाही. पॅड नेक्स्ट जनरेशन लॉन्च हेव्ही व्हेईकल्ससाठी आणि एसएलपीसाठी गरजेप्रमाणे तिसरा लाँच पॅड तातडीने उभारण्याची गरज आहे. त्यामुळे आणखी 25-30 वर्षांपर्यंत अंतराळ वाहतुकीच्या गरजा पूर्ण करता येतील.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

17 Jan, 05:57


☘️ न्या. मिश्रा यांची बीसीसीआयचे लोकपाल पदी नियुक्ती ☘️

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मिश्रा हे बीसीसीआयचे नीतिमत्ता अधिकारी म्हणूनही काम पाहतील.

त्यांनी ७ जुलै २०१४ ते २ सप्टेंबर २०२० पर्यंत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले.

त्यानंतर २ जून २०२१ रोजी त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. ते १ जून २०२४ पर्यंत या पदावर होते.

३ सप्टेंबर १९५५ रोजी ग्वाल्हेर येथे जन्मलेले मिश्रा यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुमारे ९७,००० खटल्यांमध्ये निकाल दिले आहेत.

२५ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २६ नोव्हेंबर २०१० रोजी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

१४ डिसेंबर २०१२ रोजी त्यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

16 Jan, 07:05


ISRO च्या SpaDeX ने डॉकिंग प्रक्रिया केली पूर्ण, असे करणारा भारत चौथा देश बनला


इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनला ऐतिहासिक डॉकिंग यश मिळाले. यासह ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरला आहे.

स्पॅडेक्स मिशनचे प्रमुख - एन. सुरेंद्रन

अवकाशात दोन उपग्रहांची यशस्वी डॉकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकतो. हे डॉकिंग, जो एक महत्त्वाचा अंतराळ तंत्रज्ञान प्रयोग होता, त्याने भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात नवा टप्पा गाठला आहे.

स्पॅडेक्स मिशनचा मुख्य उद्देश :-

दोन लहान अंतराळयानांची (एसडीएक्स01, जे चेसर आहे आणि एसडीएक्स02, लक्ष्य) कक्षेत भेट घडवून आणणे, त्यांची डॉकिंग आणि अनडॉकिंग प्रक्रियांचा अभ्यास करणे आणि आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे. या यशस्वी प्रयोगाने भारताच्या भविष्यकालीन अवकाश मोहिमांसाठी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारली आहे. इस्रोने 15 मीटर आणि नंतर 3 मीटरच्या अंतरावर असलेल्या या दोन्ही उपग्रहांची अचूक डॉकिंग केली.
यामुळे विशेषतः भारतीय अंतरिक्ष स्टेशन (ISS), चांद्रयान-4 आणि गगनयानच्या सुरळीत संचालनासाठी ही मोहीम यशस्वी होणे महत्वाचे आहे.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

14 Jan, 15:42


पहिला खो - खो वर्ल्ड कप ला सुरुवात


स्टेडियम - इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली

उदघाटन : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते

स्पर्धेत 20 पुरुष संघ आणि 19 महिला संघ सहभागी.

कालावधी - 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर - सलमान खान

सहभागी देश - अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, दक्षिण आफ्रिका, घाना, केनिया, युगांडा, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, इराण, भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

12 Jan, 11:05


स्वामी विवेकानंद जयंती विशेष 👆👆

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

01 Jan, 19:15


सय्यद किरमानी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या " स्टम्प्ड" या आत्मचरित्राचे प्रकाशन

▪️1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी त्यांचे 'स्टम्प्ड' पुस्तक लाँच केले.

▪️पेंग्विनच्या लंडन पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले.

▪️किरमाणी यांच्यासोबत देबाशिष सेनगुप्ता आणि दक्षेश पाठक हे ही पुस्तकाचे लेखक आहेत.

कारकीर्द :-

किरमाणीच्या नावावर 3000 धावा यष्टिरक्षक किरमाणीने भारतासाठी 88 कसोटी आणि 49 एकदिवसीय सामने खेळले. त्याने कसोटीत 2759 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 373 धावा केल्या. 48 धावा ही त्यांची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या होती. त्यानी कसोटीत 2 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली. 102 धावा ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती.

1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा किरमाणीदेखील एक भाग होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम सामन्यात ते दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आले व त्यासानी 43 चेंडू खेळून 14 धावा केल्या. त्यांनी बलविंदर संधूसोबत 10व्या विकेटसाठी 22 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाने 183 धावांपर्यंत मजल मारून भारताने 43 धावांनी अंतिम सामना जिंकला.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

01 Jan, 16:15


मित्रांनो,
2025 या नवीन वर्षातील तुमच्या प्रत्येक दिवसात सूर्याचा प्रकाश आणि रात्रांत ताऱ्यांचं सौंदर्य असो,

नवीन वर्षाच्या प्रत्येक दिवशी नवीन ध्येय आणि नवा उत्साह मिळो,

तुमच्या जीवनात प्रेम, विश्वास आणि आनंदाचा उजळ डोळा असो,

नववर्षाच्या आगमनाने तुमचं जीवन नवीन सस्वप्ने साकार करणारे असो,

तुमच्या जीवनात या नव वर्षी नवचैतन्य आणि समृद्धीचा संचार होवो,

नवीन वर्ष तुम्हास जादा अभ्यास करण्यासाठी आत्मप्रेरणा देणारे बनो,

नववर्षात तुमच्या माथी यशाचा गुलाल लागून तुम्ही यशवंत बनो,

नववर्षात तुमच्या जीवनाला आणखी एक नव्या सुरुवातीचे रंग मिळो, तुमच्या कष्ट आणि प्रेरणेला यश मिळो.......याच मंगलमय सदिच्छा 🥰

❤️ 𝗪𝗶𝘀𝗵 𝗬𝗼𝘂 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗡𝗲𝘄 𝗬𝗲𝗮𝗿 ❤️

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

01 Jan, 16:02


Channel name was changed to «𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆»

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

01 Jan, 15:58


Channel photo updated

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

01 Jan, 15:53


निलगिरी, सुरत आणि वागशीर 15 जानेवारी रोजी भारतीय नौदलात सामील होणार

15 जानेवारी 25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्याचे निश्चित केले आहे. ताफ्यात सामील होणारी पुढील प्रमाणे आहेत - निलगिरी, हे प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट अर्थात विनाशिका श्रेणीतील प्रमुख जहाज; सुरत, प्रोजेक्ट 15B स्टेल्थ डिस्ट्रॉयर श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज; तर वाघशीर, हे स्कॉर्पिन-श्रेणी प्रकल्पाची सहावी आणि अंतिम पाणबुडी.

या तीनही लढाऊ युद्धनौका यांचे आरेखन आणि बांधणी संपूर्णपणे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात आली आहे.

निलगिरी हे प्रोजेक्ट 17A चे प्रमुख जहाज, शिवालिक-श्रेणीतील युद्धनौकांच्या तुलनेत एक मोठी प्रगती असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महत्त्वपूर्ण स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि कमी रडार सिग्नेचर (रडारद्वारे लक्ष्य किती सहजपणे शोधले जाऊ शकते याचे एक माप) समाविष्ट आहेत. सुरत हे प्रोजेक्ट 15B विनाशक जहाज, कोलकाता-क्लास (प्रोजेक्ट 15A) विनाशकांच्या फॉलो-ऑन क्लासचा चरम बिंदू आहे. या जहाजांच्या आरेखन आणि क्षमतांमध्ये भरीव सुधारणा केलेल्या आहेत. दोन्ही जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या युद्धनौका आरेखन ब्युरोने केली असून त्या प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र साठ्याने सुसज्ज आहेत.

आधुनिक विमान वाहतूक सुविधांसह सुसज्ज, निलगिरी आणि सूरतमध्ये चेतक, एएलएच, सी किंग आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या MH-60R यासह अनेक हेलिकॉप्टरचा समावेश असून हे हेलिकॉप्टर दिवसा आणि रात्री दोन्हीवेळा चालणाऱ्या मोहीमांमध्ये सहभागी होऊ शकतात. रेल-लेस हेलिकॉप्टर ट्रॅव्हर्सिंग सिस्टीम तसेच व्हिज्युअल एड आणि लँडिंग सिस्टीम यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये सर्व परिस्थितींमध्ये मोहीम अखंड चालू राहील हे सुनिश्चित करतात.

वागशीर, ही कलवरी-श्रेणी प्रकल्प 75 अंतर्गत सहावी स्कॉर्पीन-श्रेणीची पाणबुडी असून ती जगातील सर्वात शांत आणि डिझेल-इलेक्ट्रिक दोन्ही इंधनांनवर चालणाऱ्या बहुमुखी पाणबुड्यांपैकी एक आहे. पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष मोहीम यासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी या पाणबुडीची रचना करण्यात आली आहे. ही पाणबुडी वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो अर्थात पाणतीर , जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीमसह सज्ज असून पाणबुडीमध्ये मॉड्यूलर बांधकाम देखील आहे. यामुळे यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञान यासारख्या भविष्यातील सुधारणांचे एकत्रीकरण करता येईल.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

01 Jan, 15:45


एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय वायुसेनेच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुख पदाची स्वीकारली जबाबदारी

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज - 01 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई मुख्‍यालयाच्‍या प्रमुखपदाची जबाबदारी स्‍वीकारली.

एअर मार्शल मिश्रा भारतीय हवाई दलामध्‍ये 06 डिसेंबर 1986 रोजी लढाऊ वैमानिक म्हणून रूजू झाले होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे, बंगलोरच्‍या एअर फोर्स टेस्ट पायलट स्कूलचे, तसेच अमेरिकेच्‍या एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजचे आणि यूकेच्‍या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे माजी विद्यार्थी आहेत. लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक म्हणून , एअर मार्शल मिश्रा यांना 3000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.

या नवीन नियुक्तीपूर्वी ते एकात्मिक संरक्षण कर्मचारी (ऑपरेशन्स)चे उपप्रमुख होते.
हवाई अधिकारी जितेंद्र मिश्रा यांनी आपल्‍या सेवा कार्यकाळामध्‍ये ‘अति विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘विशिष्ट सेवा पदक’ प्राप्त केले आहे.

एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे दि. 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले, त्‍यांनी भारतीय हवाई दलामध्‍ये मध्ये 39 वर्षांहून अधिक उल्लेखनीय सेवा केली. एअर मार्शल पंकज मोहन सिन्‍हा यांच्‍याकडून आता एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी कार्यभार स्‍वीकारला आहे.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

01 Jan, 09:18


सर्वाच्या हृदयात प्रेम, आदर असू दे,
नव वर्षाचा प्रत्येक दिवस आनंदी असू दे,
हीच आशा घेऊन नव वर्षाचे करू जल्लोषात स्वागत.......

२०२४ मध्ये उरलेली स्वप्न २०२५ मध्ये नव्या नजरेने पाहूया आणी ती स्वप्ने पूर्णकरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करूया.......

तुम्हाला आणि कुटुंबातील सर्वांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा...!

🥰 🎉 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗡𝗲𝘄 𝗬𝗲𝗮𝗿 𝟮𝟬𝟮𝟱 🥰🎉

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

31 Dec, 02:33


इस्रो ची गौरवास्पद कामगिरी, महत्त्वकांक्षी 'स्पेडेक्स मिशन'चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही क्षेपणास्त्राच्या सहाय्याने स्पेडेक्स मिशनचे (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) यशस्वीपणे प्रक्षेपण केले. ३० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पीएसएलव्ही सी ६० हे क्षेपणास्त्र अवकाश झेपावले. स्पेडेक्स मिशन भारताच्या अंतराळ संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
स्पेडेक्स मोहीम भारताचे अंतराळ स्टेशन आणि चांद्रयान -४ मिशन यश निश्चित करेल. त्यामुळेच स्पेडेक्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जात होते.

काय आहे इस्रोचे स्पेडेक्स मिशन?

दोन वेगवेगळ्या उपग्रहाना एकत्र जोडणारे हे अवघड प्रकारचे मिशन आहे.
स्पेडेक्स मिशनमध्ये दोन सॅटेलाईट आहेत. पहिले आहे चेसर आणि दुसरे टार्गेट. चेसर सॅटेलाईट टार्गेटला पकडेल. त्यांच्यासोबत जोडणी (डॉकिंग) करेल. त्याशिवाय यात एक महत्त्वाची चाचणी होऊ शकते. सॅटेलाईटमधून एक रोबोटिक शस्त्र निघेल आणि ते आकड्या सहाय्याने टार्गेटला आपल्याकडे खेचतील.
या प्रयोगामुळे भविष्यात इस्रोला कक्षा सोडून दुसऱ्या दिशेने जात असलेल्या सॅटेलाईटला परत कक्षेत आणण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर कक्षेमध्ये सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होईल. स्पेडेक्स मिशनमध्ये दोन वेगवेगळे स्पेसक्राफ्ट अंतराळात जोडून दाखवले जाणार आहेत.

भारत बनेल चौथा देश :-

इस्रोने सांगितले की, ही तंत्रज्ञान अशा वेळी खूप गरजेचे आहे, जेव्हा एकाच मोहिमेसाठी अनेक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्याची गरज पडते. ही मोहीम यशस्वी झाल्यास हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश बनेल. आतापर्यंत अमेरिका, चीन, रशियाकडे हे तंत्रज्ञान आहे.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

31 Dec, 01:45


ग्रँडमास्टर कोनेरू हंपी दुसऱ्यांदा वुमन्स रॅपीड चेस चॅम्पियनशिपमध्ये विजयी

वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2024
▪️आयोजक : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE)
▪️स्थळ : न्यूयॉर्क
▪️विजेता : कोनेरू हम्पी (भारत)
▪️उपविजेता : इरेन सुकंदर (इंडोनेशिया)
-----------------------------------------
कोनेरू हंपी :

▪️जन्म : 31 मार्च 1987, आंध्र प्रदेश - विजयवाडा
▪️2019 : वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियन
▪️2002 : ग्रँडमास्टर (वय 15)
▪️2003 : अर्जुन पुरस्कार
▪️2007 : पद्मश्री पुरस्कार
▪️2001 : एशियन गर्ल्स चैंपियन
-----------------------------------
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE)

▪️स्थापना : 20 जुलै 1924, पॅरिस
▪️मुख्यालय : लॉसने (स्वित्झर्लंड)
▪️अध्यक्ष : अर्काडी डडोरकोविच
▪️नुकताच डी. गुकेश हा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन ठरला.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

30 Dec, 14:40


IPS वितुल कुमार सीआरपीएफचे नवे महासंचालक

▪️वितुल हे 1993 च्या बॅचचे यूपी कॅडरचे अधिकारी आहेत.

▪️सध्याचे डीजी अनिश दयाल सिंग यांची ते जागा घेतील.

▪️IPS अनिश 31 डिसेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत.
----------------------------------------
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) :

▪️स्थापना : 27 जुलै 1939
▪️मुख्यालय : नवी दिल्ली.
▪️ब्रीदवाक्य : सेवा आणि निष्ठा.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

30 Dec, 14:37


DPSI MAINS 2024 . Without tick.pdf

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

30 Dec, 08:15


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क यासाठी सर्व विद्यार्थी मित्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होते...

तुमच्या परीक्षेच्या अंतिम टप्प्याच्या तयारीसाठी...
स्टेप अप अकॅडमीच्या तज्ञ प्राध्यापकांच्या हातोटीने तयार झालेले 21 अपेक्षित प्रश्नसंच आजपासून मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे...!

शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच या अपेक्षित प्रश्नसंचाचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा होणार आहे...!

ऑफलाईन पुस्तक पुण्यामध्ये सर्व बुक स्टोर वरती उपलब्ध आहे..!

ऑनलाइन पुस्तक मागवण्यासाठी लिंक -
https://youth27.com/products/product_details/915

सर्वांना अभ्यासासाठी खूप सार्‍या शुभेच्छा🎯💐💐💐💐

आपलेच,
प्रेमराज चव्हाण
प्रवीण दांगटे
तानाजी इंगोले

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

29 Dec, 06:32


*राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर- 4*
भारतीय अर्थव्यवस्था, कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान.
वर्गीकृत स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच (2012 ते 2023)
*वैशिष्ट्ये* :
✍️प्रश्नांच्या स्पष्टीकरणासोबतच Prediction ची मांडणी.
✍️Authentic Soures चा वापर करून तयार करण्यात
आलेले परिपूर्ण स्पष्टीकरण.
✍️2012 ,2013 च्या प्रश्नपत्रिकांचा आवाका का लक्षात घेऊनच पुस्तकाची रचना.
✍️150 पैकी 100 हून अधिक गुण मिळवण्यासाठी One Stop Solution.
✍️Concept Building Approach ते Applied Approach वर मुख्य फोकस.
✍️अर्थशास्त्रातील संकल्पना आकडेवारी इत्यादी मूळ संदर्भ पुस्तकातून समाविष्ट केले आहेत.
✍️मराठी आणि इंग्रजी असे सेमी इंग्रजी स्पष्टीकरण.

संपादक:
दिलीप शिला लक्ष्मण खाटेकर
(मा. सहायक आयुक्त महानगरपालिका)

✍️लेखन व संकलन :
परमेश्वर लता रमेश साबळे (STI)
विशाल हिराबाई पांडुरंग पिचड (STI)

FOR ORDER:
https://youth27.com/products/product_details/914
Mo- 9226893303

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

29 Dec, 05:27


' IIT बॉम्बे' ने बनवले प्रभावी नीडललेस इंजेक्शन

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह- आधारित सुईविरहित सिरिंज विकसित केली. या सुईमुळे शरीरात वेदनाविरहित आणि सुरक्षितपणे औषध वितरण होऊन त्वचेला होणारी इजा आणि संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा आयआयटीच्या संशोधकांनी केला आहे.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातील प्रा. वीरेन मेनेझेस यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या गटाने सुई न टोचता शरीरात औषध वितरित करण्याचे तंत्र 'शॉक सिरिंज' वापरून विकसित केले आहे.

शॉक सिरिंज नेहमीच्या बॉलपॉईंट पेनापेक्षा किंचित लांब असून, २०२१ मध्ये प्रा. मेनेझेस यांच्या प्रयोगश- ाळेत हे विकसित केले आहे. जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हायसेसमध्ये त्यांचा अभ्यास प्रकाशित झाला. या अभ्यासात त्यांनी प्रयोगशाळेतील उंदरांवर शॉक सिरिंजने दिलेले औषध आणि नेहमीच्या इंजेक्शनने दिलेले औषध यांची तुलना केल्याचे पीएचडीच्या विद्यार्थिनी आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका प्रियांका हंकारे यांनी सांगितले.

• शॉक सिरिंजमध्ये एक सूक्ष्म आघात नलिका असून त्याचे तीन भाग आहेत. ड्राइवर, ड्राईव्ह करायचा भाग आणि औषध धारक भाग.

हे तिन्ही एकत्रितपणे काम करून आघात तरंगाच्या माध्यमातून अतिसूक्ष्म फवारा तयार करतात वं फवारा शरीरात औषध वितरित करतो. या फवाऱ्याचा वेग विमानाच्या उड्डाणावेळी असलेल्या वेगाच्या दुप्पट असतो.

हा द्रवरूपी औषधाचा फवारा सिरीजच्या तोंडातून बाहेर पडून त्वचेला भेदून शरीरात जातो. ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळायच्या आत अत्यंत वेगाने आणि तरी सौम्यपणे होते.

• केवळ वेदनाविरहित इंजेक्शनपेक्षा शॉक सिरिंजचे इतरही फायदे आहेत. लहान मुले आणि मोठ्यांच्या लसीकरण मोहिमा लवकर आणि जास्त परिणामकारक होऊ शकतील.

• सुईची हाताळणी चुकीची झाल्याने किंवा अयोग्य विल्हेवाट लावल्यामुळे होऊ शकणारे रक्तजन्य रोग देखील टाळता येऊ शकतील, असे प्रियांका हंकारे यांनी सांगितले.

इंजेक्शनची सर्वांना भीती वाटते. काही तर उपचार घेण्यास नकार देतात. मधुमेही रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन वारंवार घ्यावे लागत असल्याने त्यांना हा ताण अधिक असतो. त्यामुळे वेदनाविरहित इंजेक्शनसाठी संशोधकांनी तीन चाचण्यांमधून तीन औषधे उंदरांमध्ये टोचली. हाय-परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी पद्धत वापरून औषधाचे शरीरात वितरण आणि शोषण मोजण्याकरता रक्तातील आणि ऊतींमधील औषधांची पातळी मोजली. भुलीचे औषध उंदरांच्या त्वचेत टोचले, तेव्हा शॉक सिरिंजने तोच परिणाम साधला जो सुई टोचण्याने झाला.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

29 Dec, 05:20


सई परांजपे यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुश कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली.

यंदाचा दहावा अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मांदियाळीत होणार आहे. महोत्सवात समितीच्या अध्यक्षपदी लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रुपये असे आहे. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात होणार आहे. महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे. हा फिल्म फेस्टिव्हल केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय- भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग-महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत आहे.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

27 Dec, 10:55


डॉ अरुणिश चावला यांनी वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला

डॉ. अरुणिश चावला यांनी आज वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने बुधवारी डॉ. चावला यांची महसूल विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली.
1992 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) बिहार केडरचे अधिकारी, डॉ. चावला, यांनी यापूर्वी 1 नोव्हेंबर 2023 पासून रसायने आणि खते मंत्रालयातील फार्मास्युटिकल्स (औषधनिर्माण) विभागात सचिव म्हणून काम केले होते.

फार्मास्युटिकल्स विभागात सचिव म्हणून काम करण्यापूर्वी, डॉ. चावला यांनी पटणा येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून, आर्थिक व्यवहार विभागामार्फत परदेशी नियुक्ती अंतर्गत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून, आणि वॉशिंग्टन डीसी येथे भारतीय दूतावासात मंत्री (आर्थिक) म्हणून, तसेच वित्त मंत्रालयाच्या विनियोग विभागामध्ये सहसचिव म्हणूनही सेवा केली आहे.
डॉ. चावला यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली असून, डॉक्टरेटही केले आहे.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

27 Dec, 07:42


अलेक्झांडर यांनी सिंग यांना एक अत्यंत तातडीचं काम असून मी काही मिनिटांत भेटायला येतोय असं सांगितलं. थोड्या वेळातच अलेक्झांडर त्यांच्या घरी पोहोचले होते तोपर्यंत जेट लॅगमुळे त्रस्त झालेले डॉ. सिंग पुन्हा झोपी गेलेले होते. त्यांना पुन्हा उठवण्यात आलं आणि अखेर अलेक्झांडर यांनी अर्थमंत्री म्हणून तुमच्या नावाला नरसिंह रावांनी पसंती दिल्याचं सांगितलं.
त्यावर डॉ. सिंग यांनी यावर तुमचं मत काय आहे असा प्रश्न अलेक्झांडर यांना विचारला. त्यावर माझं जर यापेक्षा वेगळं मत असतं तर अशा अवेळी मी तुमच्याकडे आलो नसतो असं उत्तर अलेक्झांडर यांनी दिलं. मोजक्या वाक्यांच्या चर्चेनंतर डॉ. सिंग यांनी ही जबाबदारी स्विकारण्यासाठी होकार दिला.
तुमच्यामागे पंतप्रधान उभे राहातील असा विश्वास अलेक्झांडर यांनी व्यक्त केला आणि सिंग यांनी पंतप्रधानांना धन्यवादाचा संदेश माझ्यातर्फे द्या अशी विनंती त्यांना केली.

पदावर नियुक्ती आणि पुढील कामकाज :-

नरसिंह राव यांचे सरकार सत्तेत येताच एरव्हीच्या स्थितीत नव्या सरकारांना मिळतो तसा मधुचंद्राचा काळ या सरकारला मिळणार नव्हता. पहिल्या दिवसापासून अर्थव्यवस्थेचं रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायचे होते. तसे या जोडगोळीने केलेही.

कटू निर्णय आणि स्पष्टपणामुळे टीका :-

डॉ. सिंग हे राजकारणाबाहेरचे असल्यामुळे त्यांनी पदावरती आल्यापासूनच कामाचा धडाका लावत देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र न लपवता सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी 'टू द ब्रिंक अँड बॅक' या पुस्तकात या घडामोडीचे वर्णन केलं आहे.
निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने वर्तमानपत्र छपाईचा कागद, केरोसिन, मीठ, डिझेल, सायकल-दुचाकी, बल्ब, सुती साड्या-धोतरे, स्टोव्ह, पोस्टकार्ड, खाद्यतेलं अशा दहा वस्तुंच्या किंमती पहिल्या 100 दिवसांत स्थिर करून 10 जुलै 1990 च्या दरांपर्यंत मागे नेऊ असं आश्वासन दिलं होतं.
मात्र 25 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी आपल्याकडे कोणतीही जादूची छडी नसल्याचं सांगितलं. तसेच हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कोणतीही तयार यंत्रणा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
वक्तव्यावरुन काँग्रेस पक्षातच मोठा गोंधळ उडाला. आधीच नाजूक स्थिती असलेल्या सरकारमधील काही खासदारांनी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली. पण हे प्रकरण लवकरच शांत झालं.

रुपयाचे अवमुल्यन आणि सोनं गहाण ठेवलं :-

यानंतर डॉ. सिंग, पंतप्रधान नरसिंह राव, रिझर्व्ह बँक यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1 जुलै रोजी डॉलर, येन, पौंड, येन, मार्क, फ्रँक यांच्या तुलनेत रुपयाची किंमत 7 टक्क्यांनी कमी करण्यात आली. त्यानंतर 3 जुलै रोजी 11 टक्क्यांनी कमी करण्यात आली.
आयात करत असलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सरकारला परकीय चलनाची मोठी गरज होती. त्याआधीच्या चंद्रशेखर सरकारने 16 मे रोजी 20 मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे सोपवलं होतं. नरसिंह राव यांच्या सरकारने 4,7,11,18 जुलै अशा चार दिवसांमध्ये 46.91 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय यामुळे 16 मे रोजी 20 कोटी डॉलर्स आणि पुढच्या चार खेपांमध्ये 40 कोटी डॉलर्स उपलब्ध झाले.
अर्थातच संसदेत या निर्णयावर जबरदस्त टीका करण्यात आली. संसदेतील सर्वांच्या प्रश्नांना मनमोहन सिंग यांनी शांतपणे उत्तरे दिली. सुरक्षेच्या कारणास्तव या निर्णयाचा गाजावाजा न करता तो अंमलात आणण्याची गरज होती आणि यापुढे सोनं परदेशात ठेवण्याची गरज नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यानंतर उद्योग धोरणातही अनेक बदल करण्यात आले.

पहिलं बजेट :-

मनमोहन सिंग यांनी आपला पहिला अर्थसंकल्प 24 जुलै रोजी मांडला. या अर्थसंकल्पात युरिया आणि इंधनाची दरवाढ सुचवली होती. त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्याच खासदारांनी बजेटवर टीका करायला सुरुवात केली. अनेक खासदारांनी 'कट मोशन'चा पर्याय आपल्या खुला असल्याचेही सूचित केलं.
महत्प्रयासानंतर काँग्रेस संसदीय मंडळ आणि सरकार यांच्यामध्ये चर्चेद्वारे तोडगा काढून पुढे वाटचाल सुरू करण्यात आली. अशाप्रकारे डॉ. सिंग यांची संसदीय कारकीर्द सुरू झाली.
1991-96 या कालावधीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची आणि देशाची दिशा बदलली असं म्हटलं जातं. यामध्ये राव-सिंग जोडीचा मोठा वाटा आहे. आज देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा अशाच नाजूक स्थितीत येऊन पोहोचली आहे. यातून मान वर काढण्यासाठी राव-सिंग फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरावा लागेल असाच विचार बहुतांश लोकांच्या मनात आहे.

स्वतंत्र भारतात अनेक वेगवेगळ्या पदांवर काम करणारे ते एकमेव नेते असावेत.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

27 Dec, 07:42


अर्थशास्त्राचे व्याख्याते, भारत सरकारचे मुख्य अर्थ सल्लागार, राज्यसभा खासदार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, संयुक्त राष्ट्राच्या साऊथ कमिशनचे सरचिटणीस, युजीसीचे अध्यक्ष, अर्थमंत्री, अर्थ खात्याचे सचिव, राज्यसभेत विरोधी पक्षनेते, पंतप्रधान अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

27 Dec, 07:42


मनमोहन सिंग यांनी 1991 साली अर्थव्यवस्था कशी सुधारली होती?

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुमारे 33 वर्षांपूर्वी भारत एका मोठ्या अर्थक्रांतीच्या आणि धोरण क्रांतीच्या उंबरठ्यावर होता. ही धोरणबदलांची क्रांती घडवण्यात तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता.

डॉ. मनमोहन सिंग या राजकारणाबाहेरच्या व्यक्तिमत्वाला अर्थमंत्रिपदी नेमणं नंतर भारतानं वेगानं आर्थिक धोरणबदलांची वेगानं पावलं टाकणं याचा इतिहास मोठा रोचक आहे.

1991च्या वर्षभरात एखाद्या पॉलिटिकल थ्रिलर सिनेमात घटना घडाव्यात तशा घटना घडत गेल्या. डॉ. सिंग या घटनांचे साक्षीदार होते.

राजीव गांधींची हत्या आणि नवे पंतप्रधान :-

चंद्रशेखर यांचं सरकार कोसळल्यानंतर देशात निवडणुकांच्या प्रचाराचा झंझावात सुरु होता. त्यामध्येच 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची तामिळनाडूत हत्या करण्यात आली. त्यामुळे केवळ काँग्रेस पक्षच नाही तर एकूणच मध्यवर्ती राजकीय केंद्रामध्ये गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं.
नवा नेता निवडीच्या प्रक्रियेत थोडा काळ गेल्यानंतर 20 जून रोजी काँग्रेस पक्षाच्या संसद सदस्य मंडळाने पी. व्ही. नरसिंह राव यांची नेता म्हणून निवड केली.

नरसिंह रावांना धक्का का बसला?:-

भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे हे तोपर्यंत सर्व देशाला समजलं होतं. इराकनं कुवेतवर केलेल्या चढाईमुळे आखाती युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तेलाचे दरही गगनाला भिडले होते.
एनआरआय मंडळींनी भारतातील गुंतवणुकीचा हात आखडता घेतला आणि त्यामुळे भारतातील डॉलर्सची गंगाजळी लक्षणीयरित्या आटली.
या लोकांनी भारतीय बँकांमधले ऑक्टोबर 1990 पासून डॉलर्स काढून घ्यायला सुरुवात केली. केवळ तीन महिन्यात त्यांनी 20 कोटी डॉलर्स माघारी नेले.
1991च्या एप्रिल ते जून या महिन्यात 95 कोटी डॉलर्स काढून घेण्यात आले. भारताने अल्पमुदतीची कर्जं भरपूर घेतल्यामुळेही अर्थव्यवस्थेवर ताण आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नरसिंह राव पंतप्रधान झाले होते.

20 जून रोजी त्यांच्याकडे कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रा आठ पानांची एक नोट घेऊन आले. येणाऱ्या पंतप्रधानांनी आणि काही मंत्रालयांनी विशेषतः अर्थ मंत्रालयाने कोणती पावलं तातडीनं उचलायला हवीत याची कल्पना देणारी ती नोट होती.
ही नोट वाचताच नरसिंह राव यांनी नरेश यांना विचारलं, "खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?"
त्यावर चंद्रा यांनी, "नाही… याहूनही वाईट आहे", असं उत्तर दिलं. त्यानंतर चंद्रा यांनी चंद्रशेखर सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि कोणत्याही स्थितीत देशावर दिवाळखोरीची स्थिती येणार नाही यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज असल्याचं नरसिंह राव यांना सांगितलं.

नव्या अर्थमंत्र्यांची निवड :-

आता देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ज्ञाची नेमणूक करण्याची गरज असल्याचं नरसिंह राव यांच्या लक्षात आलं होतं.
त्यांनी तातडीनं अर्थमंत्रीपदासाठी उमेदवार व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. आता राजकारणाबाहेरच्या व्यक्तीलाच या पदावर नेमलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी जाणलं होतं.
त्यांच्यासमोर दोन नावं आली… त्यात एक होतं डॉ. आय. जी पटेल आणि दुसरं होतं मनमोहन सिंग यांचं. नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि डॉ. सिंग यांच्यापर्यंत ही माहिती पोहचवून त्यांना राजी करण्याचं काम पी. सी. अलेक्झांडर यांच्यावर सोपवलं.
अलेक्झांडर हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते. ही घटना अलेक्झांडर यांनी आपल्या 'थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर' या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. (नंतरच्या काळात अलेक्झांडर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी दीर्घकाळ होते हे सर्वांना माहितीच आहे.

पहाटेच दिली बातमी :-

अलेक्झांडर यांनी 20 तारखेलाच मनमोहन सिंग यांच्या घरी फोन केला. पण डॉ. सिंग युरोप दौऱ्यावरून रात्री उशिरा पोहोचतील असं त्यांच्या कुकनं अलेक्झांडर यांना सांगितलं.
त्यानंतर 21 तारखेला पहाटे 5 वाजताच त्यांनी सिंग यांच्या घरी फोन केला. तेव्हा डॉ. सिंग झोपल्याचं आणि त्यांना डिस्टर्ब करू नये असं सांगण्यात आल्याचं खानसाम्यानं सांगितलं. तेव्हा अलेक्झांडर यांनी आपलं नाव वारंवार सांगून काही प्रभाव पडतोय का याची चाचपणी केली. मात्र समोरच्या कर्तव्यपरायण व्यक्तीवर काहीच प्रभाव पडला नाही. शेवटी त्यांनी फारच आग्रह केल्यावर डॉ. सिंग यांना उठवण्यात आलं.

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

27 Dec, 05:08


अपघाती पंतप्रधान, निश्चयी प्रधानसेवक 👆👆

MPSC 0207 🎯🏆

26 Dec, 17:06


देशाने सरदार गमावला..... भावपुर्ण श्रद्धांजली सरदारजी..... देश तुमचे उपकार कधीही विसरणार नाही 🙏🙏

MPSC 0207 🎯🏆

26 Dec, 17:02


अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन


भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दिल्लीमध्ये निधन झालं आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.

सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.


डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द :-

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.

सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.

मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 ला भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. तर 22 मे 2009 ला ते पुन्हा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक बदल केले. तसेच त्याआधी 1991 ते 1996 या काळात पी. वी. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मनमोहन सिंह अर्थमंत्री होते. मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये उदारीकरणाच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाची मोठी आर्थिक वृद्धी झाली. या निर्णयाने भारतात परतीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली. मनमोहन सिंह यांच्या कारकीर्दीने देशाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

MPSC 0207 🎯🏆

26 Dec, 12:57


अमरावतीची करीना थापा आणि मुंबईच्या केया हटकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींचा शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर व महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.

या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा १४ राज्यांमधील १० मुली व ७ मुले असे एकूण १७ मुले या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार २०२२ पासून २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन व शौर्याचे स्मरण करण्यासाठी पाळला जातो. शिख धर्मातील दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय ९) आणि बाबा फतेहसिंग (वय ५) यांच्या अव्दितीय शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाएवजी वीर बाल दिवस म्हणजेच २६ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतात.

MPSC 0207 🎯🏆

26 Dec, 12:42


देशातील पहिले डिजिटल संग्रहालय

▪️भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

▪️त्याचे नाव "अभय प्रभावना" आहे.

▪️हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई-पुणे महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या काठावर आहे.

▪️हे फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी कल्चरल अँड हिस्ट्री यांनी तयार केले आहे.

▪️हे जैसलमेरच्या खास पिवळ्या दगडापासून बनवलेले आहे.

▪️जैन विचार, श्रद्धा आणि इतिहास यांची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

MPSC 0207 🎯🏆

26 Dec, 12:39


DRDO ने विकसित केले बर्फात लपलेल्या शत्रूला नष्ट करणारे अस्त्र "अटेक्स"

बर्फात लपलेल्या शत्रूवर बर्फाचाच अस्त्र म्हणून वापर करता येणारे हे अस्त्र आहे. या अस्त्राद्वारे कृत्रिम हिमस्खलन करता येणे शक्य आहे.

'अटेक्स' असे या अस्त्राचे नाव आहे.

भारताची संरक्षण संशोधन संस्था 'डीआरडीओ'च्या मदतीने ते आयुध निर्माणीने तयार केले आहे.

लडाखमध्ये त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली.

कसे काम करते? :-

• हिमस्खलन ही एक नैसर्गिक घटना आहे. अटेक्सचा वापर करून कृत्रिम हिमस्खलन करता येणार आहे. अटेक्सच्या लाँचरमधून ते डागल्यास बर्फाळ डोंगरावरील काही मिनिटांमध्ये त्या भागात हादरे बसू लागतील.

त्यासोबत तापमानही वाढेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बर्फ घसरून • खाली पडेल. ही प्रक्रिया एवढ्या वेंगाने होईल, की शत्रुला बचावाची संधीच मिळणार नाही.

शत्रूच्या तळांना करेल नष्ट :-

• बर्फाळ डोगरांवर युद्ध करणे अतिशय कठीण असते. बर्फाच्या आड शत्रू लपतात. अशा शत्रूला हे शस्त्र नष्ट करेल.

बर्फाच्छादित डोंगरावरील संपूर्ण बर्फ खाली पाडण्यात हे अस्त्र सक्षम आहे.

बर्फात लपलेल्या शत्रूला शोधून काढण्याची गरजच यामुळे राहणार नाही. कृत्रिम हिमस्खलनात शत्रूचा काही क्षणांमध्येच नायनाट होईल.

MPSC 0207 🎯🏆

26 Dec, 12:33


बैजू पाटील यांच्या जम्बो फ्रेम ला इंडोनेशियाचा 'क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024' पुरस्कार जाहीर
👆👆👆👆👆👆

MPSC 0207 🎯🏆

26 Dec, 12:27


गरुड बनला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी

अमेरिकेत गेल्या 240 वर्षापेक्षा अधिक काळापासून गरुड पक्ष्याला सामर्थ्य आणि ताकदीचे प्रतिक मानले जाते. या पक्ष्याला मिळणारा हा मान आता अधिकृत झाला आहे. गरुड पक्षाला आता अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. टकल्या गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यासाठीचे हे विधेयक काँग्रेसने अध्यक्षांकडे पाठवले होते आणि या विधेयकावर अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वाक्षरी केली आहे. पांढरे डोके, पिवळी चोच आणि तपकिरी शरीर असलेल्या गरुडाचे चित्र 1782 पासून अमेरिकेच्या अधिकृत शिक्क्यावर आढळते. हा गरुड पक्षी अमेरिकेतल्या बहुतेकांना माहीती आहे. जेंव्हा शिक्क्याची रचना केली गेली, तेंव्हाच गरुड पक्षाला राष्ट्रीय पक्षी निश्चित केले गेले होते. हा गरुड तेंव्हापासून सरकारी कागदपत्रांसह अध्यक्षांच्या ध्वजापासून लष्करी तिन्ह आणि अमेरिकेच्या चलनावरही आहे. मात्र तसे असले, तरी या गरुडाला राष्ट्रीय पक्षी म्हणून कधीच दर्जा दिला गेला नव्हता. गरुड हा राष्ट्रीय पक्षी असल्याचे केवळ मानले जात होते. त्यामुळेच या गरुडाला आता अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

MPSC 0207 🎯🏆

24 Dec, 05:09


#राज्यसेवा 2024 जागावाढ

भव्य ट्विटर वार

मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा.

यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

💥💥💥🔥🔥🔥

MPSC 0207 🎯🏆

24 Dec, 01:48


भारतीय पंतप्रधानांना कुवैतचा सर्वोच्च सन्मान

कुवेत दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी कुवेत या देशाचा 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल- कबीर' हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला.
दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला.

20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान :-

पंतप्रधानांना प्रदान केलेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. यापूर्वी बिल क्लिटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांना हा सन्मान बहाल केला आहे.
43 वर्षात भारतीय पंतप्रधानांनी कुवेतचा केलेला हा पहिलाच दौरा आहे. 1981 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुवेतचा दौरा केला होता.

MPSC 0207 🎯🏆

24 Dec, 01:43


राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम

सर्वोच्य न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही.रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) नवे अध्यक्ष म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांचा 1 जून रोजी कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्षपद रिक्त होते.

व्ही. रामसुब्रमण्यम हे जून 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाले होते.

MPSC 0207 🎯🏆

23 Dec, 08:20


गट ब पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी तर गट क पूर्व परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार 👆👆

MPSC 0207 🎯🏆

22 Dec, 09:37


विजेता असंच कोणी बनत नाही

हा फोटो 1986 चा आहे 👆👆
जेव्हा टायसन रोज 5-8 किमी धावत असे या वर्षी माईक टायसनने हेवीवेट चॅम्पियनचा किताब जिंकला होता

एकदा कोणीतरी माईक टायसनला पहाटे चार वाजता सराव करताना पाहिले आणि त्याला एवढ्या पहाटे सराव करण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले.

"मी पहाटे 4 वाजता धावतो कारण मला माहित आहे की माझा विरोधक अजूनही झोपलेला आहे. माझ्या या सरावामुळे मला त्याच्यावर विजय मिळेल."

"जर मला कळले की माझा विरोधक पहाटे 4 वाजता धावत आहे, तर मी 2 वाजता धावणे सुरू करेन आणि जर त्याने 2 वाजता सराव केला तर मी 1 वाजता धावणे सुरू करेन."
मी झोपणे पूर्णपणे बंद करेन आणि रात्रभर सराव करेन."
कठोर शिस्तीशिवाय तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकत नाही, तुम्ही कितीही प्रतिभावान असाल, हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते.

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

MPSC 0207 🎯🏆

21 Dec, 17:19


महाराष्ट्रचे नवीन मंत्रिमंडळ

कॅबिनेट मंत्री :-

1】मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते 

2】उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग

3】उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

4】 चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
5】राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास
6】हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण
7】चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
8】गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
9】गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
10】गणेश नाईक -  वन
11】दादाजी भुसे - शालेय शिक्षण
12】संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
13】धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
14】मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
15】उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
16】जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
17】पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
18】अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
19】अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
20】शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21】आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 
22】दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23】अदिती तटकरे - महिला व बालविकास 
24】शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम
25】माणिकराव कोकाटे - कृषी 
26】जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
27】नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
28】संजय सावकारे - कापड
29】संजय शिरसाट - सामाजिक न्याय 
30】प्रताप सरनाईक - वाहतूक 
31】भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन
32】मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
33】नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 
34】आकाश फुंडकर - कामगार 
35】बाबासाहेब पाटील - सहकार 
36】प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री  (State Ministers )

37】माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 
38】आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 
39】मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 
40】इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 
41】योगेश कदम  - गृहराज्य शहर
42】 पंकज भोयर - गृहनिर्माण, 

MPSC 0207 🎯🏆

20 Dec, 12:25


अभिमानास्पद 🥰🥰
आमच्या गायत्री ताई चव्हाण 🎉🎉
आज नाशिक येथे झालेल्या PSI पासिंग आऊट परेड मध्ये नेतृत्व...... 🔥🔥🎉🎉🥰🥰

MPSC 0207 🎯🏆

20 Dec, 12:13


📕संयुक्त पूर्व परीक्षा पास होण्यासाठीचा एकमेव राजमार्ग अवघड वाटणाऱ्या विषयाची अगदी सोप्या पद्धतीने तयारी...

🟣 "MATHS AND REASONING" REVISION BATCH 🟣

🩸शेवटचे 20 दिवस Quick REVISION 🩸

🔥20 दिवस..20 प्रश्न..20 मार्क = Result 🔥

🔹PYQ ANALYSIS करून अतिमहत्त्वाचे 32 टॉपिक cover केले आहेत.

🔹 परिक्षेच्या अंतिम टप्प्यातील शेवटचे Revision.

🔴 ऑनलाईन बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा🔗
https://bfwyu.on-app.in/app/oc/597526/bfwyu

📱DILIP SIR WHATSAPP CHANNEL -https://whatsapp.com/channel/0029VaAQhn1CMY0E2YKW650i

MPSC 0207 🎯🏆

20 Dec, 08:44


जगभरात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत, संसर्ग होताच नाचू लागतात रुग्ण ☘️

आफ्रिकेत युगांडामध्ये एक नवीन विषाणू पसरत आहे. या विषाणूचे नाव डिंगा डिंगा आहे. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे शरीर थरथरू लागते.

आतापर्यंत 300 प्रकरणाची नोंद :-

युगांडातील बुंदीबुग्योमध्ये डिंगा- डिंगाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 300 जण बाधित झाले आहेत. 2023 च्या सुरुवातीला सर्वात प्रथम या आजाराशी संबंधित रुग्ण आढळून आला. या आजाराचे कारण शोधण्यासाठी आरोग्य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. पुढील विश्लेषणासाठी नमुने युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत.

लक्षणे :-

शरीराची खूप हालचाल होत राहते.

लागण झालेल्या व्यक्तींना खूप ताप, अशक्तपणा आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायू देखील होतो.

बाधित लोकांना चालण्यास त्रास होऊ लागतो. अंगात थरकाप जाणवतो आणि शरीर नियंत्रणात नसल्याप्रमाणे वाटतं.

सध्या आफ्रिकेत डिंगा-डिंगा व्हायरस पसरण्याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.



डिंगा डिंगा विषाणूबद्दलची माहिती:-

बुंदीबुग्यो जिल्ह्यांतील महिला आणि मुलींना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

आफ्रिकेतील युगांडामध्ये हा विषाणू पसरत आहे.

हा विषाणू पहिल्यांदा 2023 मध्ये आढळला होता.

या विषाणूमुळे शरीरात नाचल्यासारखा थरकाप येतो.

या विषाणूमुळे कोणत्याही मृत्यूची अजून नोंद करण्यात आलेली नाही.

युगांडाच्या आरोग्य विभागाने लोकांना वेळेवर औषधे घेण्याचा सल्ला दिला आहे.

या व्हायरसवर कसे उपचार करण्यात येतात?:-

डिंगा डिंगा या व्हयरसच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यावर कोणताही योग्य ते उपचार नाहीत.

सध्या त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवून रुग्णाला औषधे दिली जात आहेत. ज्यामध्ये अँटिबायोटिक्सची मदत घेतली जातेय.

या लक्षणांसोबतच अशक्तपणा आणि अर्धांगवायूचा त्रासही रूग्णांना होतो.

MPSC 0207 🎯🏆

20 Dec, 08:34


पहिल्या खो-खो वर्ल्ड कपचा सलमान खान ब्रँड अॅम्बेसेडर

:खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (केकेएफआय) ने पहिलावहिला वर्ल्ड कप 13 ते 19 जानेवारी या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित केला आहे. या वर्ल्ड कपसाठी सुपरस्टार सलमान खानला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही घोषणा जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली. यावेळी खो-खो महासंघाचे अध्यक्ष श्री सुधांशू मित्तल, महासचिव एम. एस. त्यागी तसेच भारतीय पुरुष आणि महिला संघांचे खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) अधिकृतपणे खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या या खो-खो वर्ल्ड कपला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

या खो-खो वर्ल्ड कपमध्ये 24 देशांचे संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. विविध देशांचे प्रतिनिधी येथे आले असून त्यांच्यासाठी प्रात्यक्षिक सामने आयोजित करण्यात आले होते.

MPSC 0207 🎯🏆

20 Dec, 08:29


कर्करोगावर लस बनविण्यात रशियाला यश, शतकातील मोठे संशोधन

कर्करोगावरील लस बनवण्यात रशियाला यश आले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक आंद्रेई कॅप्रिन यांनी आकाशवाणीवरून ही सुखद बातमी जगाला दिली. तास या रशियन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पुढील वर्षापासून ही लस रशियन नागरिकांना मोफत दिली जाईल.

लस एमआरएनए तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आली. चाचणीअंती ती कमालीच प्रभावशाली ठरल्याचे स्पष्ट झाले आहे, असे आंद्रेई कॅप्रिन यांनी सांगितले. ही लस शरीरात ट्युमरला वाढू देत नाही.

जानेवारी 2025 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाने लवकरच कर्करोगावरील लस शोधून काढलेली असेल, असे जगाला सांगितले होते.

mRNA लस म्हणजे काय?

• एमआरएनए किंवा मेसेंजर आरएनए हा मानवी आनुवंशिक गुणसूत्रांमधील एक लहानसा घटक आहे.

• हा घटक आपल्या पेशींमध्ये प्रथिने तयार करतो. एखादा विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरावर हल्ला करतो तेव्हा एमआरएनए हा घटक आपल्या पेशींत त्या विषाणू किंवा जीवाणूशी लढण्यासाठी आवश्यक ती रोग प्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी म्हणून प्रथिने तयार करण्याचा संदेश पाठवतो.

• रोगप्रतिकारक शक्तीला आवश्यक ती प्रथिने या संदेशामुळे मिळतात. शरीरात प्रतिजैविके तयार होतात.

MPSC 0207 🎯🏆

19 Dec, 18:00


😍💥💥 ऑफरचा आजचा शेवटचा तास 💥💥😍

😍 संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आणि 5000+ विद्यार्थ्यांनी केलेली 😍

🟢 कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र बॅच 🟢

🤩🤩...Now Online Available...🤩🤩

🔷 ऑनलाईन बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

MPSC 0207 🎯🏆

19 Dec, 12:34


पहिले राज्यस्तरीय ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन’

▪️कालावधी : २० ते २२ डिसेंबर

▪️ठिकाण : पुणे

▪️संमेलनाध्यक्ष:- शेखर गायकवाड

▪️स्वागताध्यक्ष :- राजेंद्र भोसले

▪️आयोजन : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या वतीने

▪️स्वरूप : या संमेलनात आजी-माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन

MPSC 0207 🎯🏆

01 Dec, 11:53


या रे सोने हो, लवकर संभाव्य उत्तरे बघूया

MPSC 0207 🎯🏆

01 Dec, 11:53


https://youtube.com/live/aU-obC0-NSU?feature=share

MPSC 0207 🎯🏆

01 Dec, 07:51


आत्मिक समाधान देणारी प्रतिक्रिया 🥰🥰

MPSC 0207 🎯🏆

01 Dec, 07:37


मित्रांनो Science आणि History चे बहुतांश प्रश्न आपल्या Notes मधील आणि माझ्या Lecture मध्ये शिकवल्यापैकीच आले आहेत.👆👆
🔥🔥 🥰🥰

MPSC 0207 🎯🏆

01 Dec, 07:34


राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_पेपर_1.pdf

MPSC 0207 🎯🏆

30 Nov, 20:12


तुम्ही सर्वांनी परीक्षा हॉलमध्ये लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक पाऊल व्यवस्थित उचलले आहे.
कधीही कोणताच गोंधळ होऊ देऊ नका कारण कठोर परिश्रम नेहमीच फळाला येतात.
तुम्ही स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने घडविण्यासाठी जात आहात हेच लक्षात ठेवा.
परीक्षेअगोदर केलेल्या तुमच्या सर्व मेहनतीला योग्य असा गुणरूपी पुरस्कार मिळणार आहे.
स्वतःच्या पंखावर विश्वास ठेवा आणि आजच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.

सर्वाना राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा........ यशस्वी भव.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

MPSC 0207 🎯🏆

30 Nov, 17:34


Check list

1. Hall ticket
2. Two xerox of I'd proof + original
3. Analog watch
4.Transparent water bottle
5. hankey
6. Extra cloth to clean desk if required
7. 2 black ball pen


Wishing You The Best...😊

🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

MPSC 0207 🎯🏆

30 Nov, 07:59


Photo from Pravin Dangate

MPSC 0207 🎯🏆

27 Nov, 15:02


https://www.youtube.com/live/Sv-FjEh94HY?feature=shared

MPSC 0207 🎯🏆

26 Nov, 13:04


https://youtube.com/live/t1Hg11cFX3c?feature=share

▶️Join at 6.30pm ▶️

🔥Youtube live 🔥

MPSC 0207 🎯🏆

25 Nov, 15:17


राज्यसेवा pre व गट ब आणि क च्या विद्यार्थीमित्रानी HISTORY च्या NOTES वाचून घ्या..... 👆👆

MPSC 0207 🎯🏆

25 Nov, 15:15


History notes - Pravin Sir - 25.11.24.pdf

MPSC 0207 🎯🏆

25 Nov, 14:58


भारतीय राज्यघटना स्वीकारल्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाची उद्यापासून सुरुवात

* संस्कृत आणि मैथिली भाषेत संविधानाचे प्रकाशन होणार.

* नागरिकांना संवादात्मक उपक्रमातून संविधानाच्या वारशाशी जोडले जाण्यासाठी ‘constitution75.com’ समर्पित वेबसाइट तयार केली आहे.

* 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात उद्देशिकेचे सामूहिक वाचन होणार.

* ब्रीदवाक्य - हमारा संविधान, हमारा स्वाभिमान

* मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया: ए ग्लिंप्स " आणि "मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स ग्लोरियस जर्नी" या पुस्तकांचे प्रकाशन होणार.

* 26 नोव्हेंबर 1949 रोजी, भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली, जी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासातील एका नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण या दिवशी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना स्वीकारण्यात आली जी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. स्थापनेपासून गेल्या 75 वर्षांत , राज्यघटना देशाच्या प्रगतीला आकार देणारी मार्गदर्शक चौकट म्हणून काम करत आहे.

MPSC 0207 🎯🏆

24 Nov, 05:06


BARTI साठी उद्या व्हेरिफिकेशन सुरू आहे. तरी सकाळी 10 AM ते 5 PM मध्ये खालील पत्त्यावर व्हेरिफिकेशन साठी विद्यार्थ्यांनी यावे.
📍Address:-
तळ मजला, यशदा अभ्यासिके खाली, सूर्या प्लाझा, मांगीर बाबा चौक,
दत्तवाडी रोड, दांडेकर पूल, पुणे -३०

https://maps.app.goo.gl/T8f4Za41Y4i5YHpdA?g_st=ac

संपर्क:- 9172217440
(🛑येताना दिलेल्या DOCUMENTS लिस्ट नुसार २ प्रति सेट + ८ फोटो घेऊन येणे )

MPSC 0207 🎯🏆

22 Nov, 12:23


☘️ आयोगाने प्रसिद्ध केलेले 2024 च्या मुख्य आणि 2025 चे पूर्व परीक्षेचे वेळापत्रक 👆👆

लावा ताकत सोने हो 🔥🔥

MPSC 0207 🎯🏆

22 Nov, 12:18


2025 मधील परीक्षा Time Table आयोगाकडून जाहीर

🔥 राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025

🔥 गट ब पूर्व - 9 Nov 2025

🔥 गट क पूर्व  - 30 Nov 2025


☘️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक ☘️

🔥 राज्यसेवा मुख्य परीक्षा- 26,27,28 एप्रिल 2025

🔥 गट ब मुख्य -  1 जून 2025

🔥 गट क मुख्य - 29 जून 2025

MPSC 0207 🎯🏆

22 Nov, 01:42


Chemistry Notes_Final Updated (1).pdf

MPSC 0207 🎯🏆

22 Nov, 01:40


Physics notes for Approch Building Batch 👆👆

MPSC 0207 🎯🏆

22 Nov, 01:39


Physcis Notes_7.6.24.pdf

MPSC 0207 🎯🏆

19 Nov, 02:32


टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचे दुहेरी विजेतेपद

मॅग्नस कार्लसनने विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू म्हणून आपला लौकिक पुन्हा सिद्ध करताना प्रतिष्ठेच्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत जलदपाठोपाठ अतिजलद प्रकारातही जेतेपद पटकावले. कार्लसनने या स्पर्धेत दुसऱ्यांदा दुहेरी मुकुट मिळवला. त्याने 2019 मध्येही अशी कामगिरी केली होती.

अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो याने अडखळत्या सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करताना ११.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. त्याने अखेरच्या आठ फेऱ्यांत सात विजयांची नोंद केली. भारताच्या एरिगेसी (१०.५ गुण), प्रज्ञानंद (९.५) आणि विदित (९) यांनी अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान मिळवले.

महिलांत, अतिजलद प्रकारातील तीन वेळच्या विश्वविजेत्या कॅटेरिना लायनोने बाजी मारली. लायनोने ११.५ गुणांसह अग्रस्थान पटकावले, तर व्हॅलेंटिना गुनिना हिला ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताची वंतिका अग्रवाल आणि अलेक्सांड्रा गोर्याचकिना यांनी ९.५ गुणांसह संयुक्त तिसरे स्थान मिळवले.

MPSC 0207 🎯🏆

19 Nov, 02:28


नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान मोदी सन्मानित, राणी एलिझाबेथ नंतर दुसरे परकीय बनले

आफ्रिकन देश नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' (GCON) या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता. म्हणजेच, हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते आहेत. हा पंतप्रधान मोदींचा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारत-नायजेरिया संबंधांना समर्पित केला आहे.

MPSC 0207 🎯🏆

18 Nov, 01:53


नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान मोदी सन्मानित, राणी एलिझाबेथ नंतर दुसरे परकीय बनले

आफ्रिकन देश नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' (GCON) या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता. म्हणजेच, हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते आहेत. हा पंतप्रधान मोदींचा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारत-नायजेरिया संबंधांना समर्पित केला आहे.

नायजेरियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना 1969 मध्ये हा सन्मान देण्यात आला होता. आतापर्यंत 15 देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. त्याचवेळी त्यांना मिळणारा हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल.

यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी कॅरेबियन देश डॉमिनिकाने मोदींना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार - 'डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर' देण्याची घोषणा केली होती. कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला मदत केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल. 21-22 नोव्हेंबर रोजी गयाना दौऱ्यात मोदींचा गौरव करण्यात येणार आहे.

MPSC 0207 🎯🏆

17 Nov, 18:16


इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची यंदाच्या भारतीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात या महोत्सवाचे आयोजन होणार आहे.

MPSC 0207 🎯🏆

17 Nov, 18:13


डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'साहित्य जीवनगौरव' पुरस्कार

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ संशोधक-विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.

कटक येथील ओडिशा रॅशनलिस्ट सोसायटीचे राज्य सचिव देबेंद्र सुतार यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक येथील 'धरणसूक्त' कादंबरीचे लेखक विलास शेळके यांना (ललित लेखन), 'माणूस 'असं का वागतो' ?' या पुस्तकाच्या पुण्यातील लेखिका अंजली चिपलकट्टी (वैचारिक लेखन) आणि कणकवली येथील 'रंगवाचा' त्रैमासिकाचे संपादक वामन पंडित यांना रा. शं. दातार नाट्य पुरस्कार असे ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर, 'बेबाक कलेक्टिव्ह' या आंतछेंदीय स्त्रीवादी दृष्टिकोनातून मूलतत्त्ववादी आणि दडपशाही शक्तींविरोधात संघर्ष करणाऱ्या संस्थेच्या मुंबईतील कार्यकर्त्या हसीना खान आणि सिंधुदुर्ग येथील मनोविकारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांना समाजकार्य कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.

एस. एम. जोशी फाउंडेशन येथे 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी मीरा चढ्ढा- बोरवणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत

MPSC 0207 🎯🏆

16 Nov, 17:02


चालू घडामोडीच्या अभ्यासालासाठी अत्यंत उपयुक्त 👆👆

MPSC 0207 🎯🏆

16 Nov, 17:01


Document from Pravin Dangate

MPSC 0207 🎯🏆

16 Nov, 02:31


☘️ दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या कालच्या T20 मॅचमधील भारताचे रेकॉर्डस् 🇮🇳

* एका इनिंग मध्ये भारताने लगावलेले सर्वाधिक सिक्स - 23

* एका इनिंग मध्ये भारतातर्फे पहिल्यांदाच दोन शतके ( संजू सॅमसंग आणि टिळक वर्मा )

* t-20 मध्ये पहिल्यांदाच भारतातर्फे सर्वाधिक 210 धावांची पार्टनरशिप

* विदेशात भारताची सर्वाधिक धावसंख्या 283/1

MPSC 0207 🎯🏆

16 Nov, 01:40


ब्रिटीश लेखिका समांथा हार्वे यांच्या 'ऑर्बिटल' कादंबरीला २०२४चा बुकर पुरस्कार मिळाला

ऑर्बिटल' ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी आहे. यंदा पुरस्कारासाठी विचार झालेल्या लेखकांमध्ये महिलांचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरस्काराची रक्कम 50 हजार पौंड इतकी आहे. या कादंबरीच्या कथानकाचा संपूर्ण कालावधी 24 तास आहे आणि तिच्या पृष्ठांची संख्या केवळ 236 इतकी आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सहा अंतराळवीर आणि त्यांचा एक दिवसाचा प्रवास या कथेवर आधारित असलेली ही कादंबरी यंदा ब्रिटनमधील सर्वोच्च खपाचे पुस्तक ठरले आहे. हे अंतराळवी पृथ्वीवरील 16 सूर्योदय आणि सूर्यास्ताचे निरीक्षण करतात. या कालावधीत ते विविध खंडांवर मार्गक्रमण करतात आणि विविध
ऋतू त्यांना पाहायला मिळतात. लंडन शहरातील ओल्ड बिलिंग्जगेट येथे हार्वे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

ऑर्बिटल' हे बुकर पारितोषिक जिंकणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे छोटे पुस्तक आहे. परीक्षकांमध्ये ब्रिटिश भारतीय संगीतकार नितीन साहनी, कादंबरीकार सारा कॉलिन्स, 'द गार्डियन'चे फिक्शन संपादक जस्टिन जॉर्डन आणि चिनी अमेरिकी लेखक-प्राध्यापक यियुन ली यांचा समावेश होता.

MPSC 0207 🎯🏆

14 Nov, 01:31


पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बिशेष 👆👆

MPSC 0207 🎯🏆

12 Nov, 13:21


पंडित मदनमोहन मालवीय पुण्यतिथी निमित्य माहिती 👆👆

MPSC 0207 🎯🏆

12 Nov, 13:17


कार्तिकी एकादशीला हजारो भाविक, अस्पृश्य पंढरपुरात जमले. त्याचंही वर्णन ‘मंदिर प्रवेशाचे महाभारत’ या पुस्तकात करण्यात आलं आहे. त्यात नमूद केल्यानुसार, "मुंबई सरकारचे उद्योगमंत्री नामदार गणपतराव तपासे यांनी कार्तिक शुद्ध एकादशीच्या पवित्र दिवशी चंद्रभागेचे स्नान करून श्री विठ्ठल रूक्मिणी, भक्तराज पुंडलीक व श्री गोपालकृष्णाचें भक्तिपूर्वक दर्शन घेतले.
ता. 23 रोजी हरिजन मंदिर प्रवेशाचा कायदा सर्व मुंबई प्रांताला लागू झाल्यामुळे, श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन कार्तिकी यात्रा पुरी करण्याकरिता नामदार तपासे आपल्या कुटुंबीयांसह मुद्दाम पंढरपूर आले होते. सोमवारी सकाळी 10 वाजता पंढरपूरला त्यांचे आगमन झाले.

12 वाजता नामदार तपासे यांनी पवित्र चंद्रभागा तीर्थांत स्नान केले. नी काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत ते चंद्रभागेच्या वाळवंटातील श्री पुंडलिकरायाच्या दर्शनास गेले. पुंडलिकाचे दर्शन घेऊन, महाद्वार घाटाने नामदार तपासे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेले.
बरोबर बराच जनसमुदाय असल्यामुळे, वाळवंटापासून नामदेव पायरीपर्यंत एक मिरवणूकच निघाली. राष्ट्रनेत्यांच्या नी 'पुंडलीक वर दे' च्या जयजयकारांत मिरवणूक नामदेव पायरीपाशी येताच, 5-7 सनातन्यांनी आरोळ्या ठोकून, आपला विरोध नामदारांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला.
येवढ्या अफाट अनुकूल समाजात, आपला आवाज बुडून जाऊ नये म्हणून, पाश्चात्य लाऊडस्पीकरच्या मदतीने तो मुद्दाम मोठा करण्याचीही खास व्यवस्था सनातन्यांनी केली होती. परंतु लाख दोन लाख वारकरी पंढरपूरला जमले असता, सनातन्यांना हाताच्या बोटावार मोजण्याइतकेही विरोधक मिळू शकले नाहीत.
यातच त्यांच्या विरोधाची परस्पर किंमत नी शोभा झाल्याने, या किरकोळ विरोधाकडे एक कारूण्यपूर्ण दृष्टिक्षेप टाकून नामदार तपासे यांनी मंदिरांत प्रवेश केला.
प्रवेशद्वारांपाशी बडवे कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नामदारांनी भाविक बुद्धीने मंदिराचे निरीक्षण केले. हजारो वर्षे दूर लोटलेल्या हरिजन समाजाचे प्रतिनिधी म्हणून श्री पांडुरंगाच्या चरणाला कडकडून मिठी मारली.
श्री पांडुरंगाच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या नी डोळे भरून पांडुरंगाला पाहून घेतले. चिरविरहानंतरच्या या भेटीचे दृश्य खरोखरीच अंतःकरण पिळवटून टाकणारे होते. बडव्यांनी श्रीपांडुरंगाच्या गळ्यांतील हार नामदाराच्या गळ्यांत घातला नी प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला.
दर्शनानंतर बडवे कमिटीच्या वतीने नामदारांचा सत्कार करण्यात आला. श्री व्यंकोबा, लक्ष्मी, राही, सत्यभामा, यांचे दर्शन घेऊन नामदार मंत्री रुक्मिणीमातेच्या मंदिरात आले. नामदारांनी रुक्मिणीचे दर्शन घेतल्यावर, त्यांना तीर्थप्रसाद देऊन नंतर उत्पात कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यांत आला.
रात्री वारकऱ्यांच्या प्रचंड जाहीर सभेत नामदारांचे हृदयस्पर्शी भाषण झाले. सभेत रामभाऊ भोगे यांनी साने गुरूजीवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही नामदारांच्या हस्ते झाले."
पुढं मुंबई विधीमंडळात अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देणारा कायदा झाला आणि देहू, आळंदी येथील मंदिरांसह राज्यातील इतर मंदिरं सर्वांसाठी खुली झाली.

MPSC 0207 🎯🏆

12 Nov, 13:17


पंढरपूरचा विठोबा 'घागरीत' बंद केला तरी साने गुरुजींनी अस्पृश्यांसाठी मंदिर खुलं करुन दाखवलं

पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी वर्षानुवर्षे बंद होतं. त्यासाठी साने गुरुजींनी उपोषण करत आपले प्राण पणाला लावले. त्यामुळं मंदिर सर्वांसाठी खुलं झालं.

आज कार्तिकी एकादशीला या घटनेला 77 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं गुरुजींनी उभारलेल्या लोकलढ्याची ही कहाणी.

म्हणून 1946च्या नोव्हेंबरमध्ये प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांनी केली.
4 नोव्हेंबरला प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात साने गुरुजी म्हणाले होते, “आज कार्तिकी एकादशी. प्लेग असला तरी पंढरपूरची यात्रा जमेल. विठ्ठलाच्या चरणांचे संतांनी ‘समचरण’ म्हणून वर्णन केले. ते चरण भेदभाव करीत नाहीत. ते सर्वांभूती सम आहेत. परंतु हरिजनांना त्या चरणांवर का बरं डोकं ठेवता येऊ नये?
"पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करीत राहीन. ”

'विठूराया मुक्ती' साठी दिग्गजांची चळवळ :-

वर्तमानपत्रांत ही बातमी वाचून सेनापती बापट, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी आदी मंडळी तातडीनं साने गुरुजींना भेटायला गेली. त्यांनी गुरुजींना पाठिंबा दिला. त्याचबरोबर उपोषण करण्यापूर्वी महाराष्ट्रभर दौरा करावा.
जनतेला आपलं म्हणणं समजावून सांगावं. जनमतही आपल्या बाजूला उभं करावं, असं सुचवलं. त्यानुसार मंदिर प्रवेशाला अनुकूल असणाऱ्या लोकांचं एक 'हरिजन मंदिर प्रवेश मंडळ' स्थापन करण्यात आलं.
'हरिजन सेवक संघा'नं त्यासाठी पुढाकार घेतला आणि 7 जानेवारी 1947 पासून गुरुजींच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात मुंबई, पुणे येथील विराट सभांपासून झाली.
महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यातून गुरुजींचा दौरा झाला. रोज ठिकठिकाणी पाच ते सहा जाहीर सभा होत. या सभांना प्रचंड गर्दी होई. हजारो स्त्री-पुरुष गुरुजींचे विचार ऐकत आणि त्यांना पाठिंबा देत.
त्यांचा हा महाराष्ट्र दौरा चार महिने चालला. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात गुरुजींनी तब्बल 400 सभा घेतल्या. त्यातून मंदिर प्रवेशाबद्दलची जोरदार जनजागृती झाली.

या महाराष्ट्रव्यापी दौऱ्यामध्ये साने गुरुजींच्या सोबत सेनापती बापट, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी केवलानंद सहजानंद भारती, काकासाहेब बर्वे, आचार्य अत्रे या लोकनेत्यांच्या सहभागामुळं विठूराया मुक्तीची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचली.
संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, कुशाबा महाराज तनपुरे, दादा महाराज सातारकर आदी समाजधुरिणांसह सत्यशोधक सुधारक प्रबोधनाच्या चळवळीनं गुरुजींच्या आंदोलनाला पाठबळ दिलं.
महाराष्ट्रातील भाविक, वारकरी, फडकरी आणि दिंडी समाजानं या आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘गोफण’ या वृत्तपत्राच्या मालक-संपादक जोडगोळीनं साने गुरुजींच्या उपोषणाच्या मागची भूमिका लोकांसमोर निर्भिडपणे मांडली.
त्यामुळंच सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी साने गुरुजींच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या प्रबोधनाच्या आणि जनमानस घडविण्याच्या लढ्यात राष्ट्र सेवा दल सैनिक आणि महाराष्ट्र शाहिरी कलापथक अग्रभागी होतं.

साने गुरुजींच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून काही विहिरीदेखील खुल्या करण्यात आल्या. पंढरपूरमधील मंदिर खुलं व्हावं यासाठी हरिजन सेवक संघानं घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर 10 लाख लोकांनी सह्या केल्या,” असं ‘साप्ताहिक साधना’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
अखेर मंदिर मुक्ती आंदोलनासाठी साने गुरुजी पंढरपुरात दाखल झाले. 1 मे 1947 रोजी सकाळी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात मोठी जाहीर सभा झाली. त्या आधीपासून पंढरीत सनातनी मंडळींनी मंदिर प्रवेश आंदोलनाच्या विरोधात सभा घेतल्याच होत्या.
'जाव साने भीमापार, नही खुलेगा विठ्ठल द्वार' अशा घोषणा जात होत्या. चंद्रभागेच्या सभेतही विरोध केला गेला.

श्रीपाद जेरेशास्त्री हे शंकराचार्य अस्पृश्यांना मंदिर प्रवेश देण्याच्या विरोधात ठाम उभे होते. पंढरपूर आणि इतरही अनेक ठिकाणच्या धर्मपंडितांचा मंदिर प्रवेशाला विरोध होता.
सनातनी धर्मधुरीण, पुरोहितशाही आणि सनातन्यांच्या प्रभावातले वारकरी अशा तिघांच्या अभद्र युतीतून गुरुजींच्या सत्याग्रहाविरोधात आघाडी उभारली गेली. त्यामुळं अखेर 1 मे 1947 रोजी साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली.’’
संत गाडगेबाबांच्या प्रेरणेनं कुशाबा तनपुरे महाराजांनी पंढरपुरात आपल्या मठातील जागा साने गुरुजींना उपोषणासाठी उपलब्ध करून दिली.
या आंदोलनामुळं पंढरपूरला आणि विशेषतः तनपुरे मठाला छावणीचं स्वरुप आलं. धर्मक्षेत्र असलेलं पंढरपूर कुरुक्षेत्र बनलं. पत्रकार आचार्य अत्र्यांनी आपल्या भाषणानं पंढरपूर दणाणून टाकलं.

असेंब्लीतल्या कायद्यापेक्षा, हृदयाचा कायदा श्रेष्ठ वाटतो’ :-

MPSC 0207 🎯🏆

12 Nov, 13:17


महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा गुरुजींच्या या उपोषणाला विरोध होता. कायदा होणारच आहे तर विरोध कशाला हा त्यांचा तर्क होता.
“गांधींनी तार पाठवली, विनोबांनी पत्र पाठवलं, तरीही साने गुरुजींनी उपोषणाचा निर्णय बदलला नाही. गांधींच्या पत्राला उत्तर देताना साने गुरुजींनी लिहिलं, ‘‘मंदिराबाबतचा कायदा केव्हा होईल तेव्हा होवो. माझे डोळे त्याकडं कधीच नव्हते. मी बडवे मंडळींसमोर उभा आहे. या उपवास काळात एखाद्या वटहुकुमानं मंदिर उघडलं, तर तांत्रिकदृष्ट्या प्रतिज्ञापूर्ती होईल; परंतु मला आनंद नाही. आत्मक्लेशानं ब्रिटिशांचीही हृदयं आम्ही वळवू पाहतो. मग बडवे मंडळींची मी का पाहू नये?’’

“साने गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी दौरा सुरू केला आणि नंतर उपोषण करणार म्हणून त्या वेळच्या काँग्रेस मंत्रिमंडळानं एप्रिलच्या अखेरीस घाईघाईनं मंदिर प्रवेशाचं बील सादर केलं होतं.
'त्यावरून कायदा होणारच आहे, मग उपोषण कशाला?' असाही प्रचार विरोधक करीत होते. गुरुजींना त्या वेळचे काँग्रेस श्रेष्ठीही तसा सल्ला देत होते. पण गुरुजींनी त्यांना नम्रपणे सांगितलं होतं, ‘असेंब्लीतल्या कायद्यापेक्षा मला हृदयाचा कायदा श्रेष्ठ वाटतो.’

उपोषणाचा एकेक दिवस उलटू लागला तशी गुरुजींची प्रकृती क्षीण होत चालली. सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं. अशा परिस्थितीतच त्या वेळच्या मध्यवर्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष दादासाहेब मावळंकर हे 5 मे रोजी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणून आले होते.
पंढरपुरातलं स्फोटक वातावरण पाहून त्यांनी लगेच हालचालींना सुरुवात केली. बडवे मंडळींशी वाटाघाटी केल्या. उपलब्ध 1938चा 'टेंपल अॅक्ट' पाहिला आणि त्यांनी त्यानुसार बडवे मंडळींना समजावून सांगितलं.
या चर्चेचा परिणाम तरुण बडवे मंडळींवर झाला. त्यांनी बदलत्या काळाची चाहूल ओळखली. वृद्धांना बाजूला सारून तडजोडीची भूमिका घेतली. त्यांनी तसं निवेदन न्यायालयात सादर केलं.
हरिजनांना मंदिर प्रवेश देण्यासाठी बडव्यांची हरकत राहिली नाही. दादासाहेबांनी गुरुजींची भेट घेऊन त्यांनाही सर्व कायदेशीर बाजू समजावून दिली. कारण अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार मंदिराचे ट्रस्टी बडवे हे गुरुजी म्हणतात तसे मंदिराचे दरवाजे हरिजनांना खुले करू शकत नव्हते, ही वस्तुस्थिती होती.
दादासाहेबांनी तीच गुरुजींना सांगितली. उपोषण मागं घेण्याची विनंती केली. गुरूजींनी सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन मोठ्या नाखुषीनं ही विनंती मान्य केली. 10 मे 1947 रोजी गुरुजींनी आपलं 10 दिवसांचं उपोषण सोडलं!’’

घागर विठोबा’ची कहाणी :-

सानेगुरुजींच्या या ऐतिहासिक उपोषणानंतर काय घडामोडी घडल्या, याचं सविस्तर वर्णन ‘होय होय वारकरी’ या ज्ञानेश्वर बंडगर लिखित पुस्तकात आलं आहे.
ते लिहितात, “पाच जणांच्या बडवे कमिटीनं मंदिर खुलं करण्याचं निवेदन कोर्टात दिलं. त्याला विरोध करणारे पाच अर्ज कोर्टात दाखल झाले. त्यात 88 बडव्यांचा एक अर्ज कोर्टात होता. 100 पैकी 88 बडवे म्हणजे, 88 टक्के बडव्यांचा साने गुरुजींचा सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतरही विरोध कायम होता.
त्यांच्यासोबतच सनातनी महाराजांचे आणि धर्मपंडितांचेही अर्ज होते. पण त्याचा उपयोग होणार नाही हे सनातनी जाणून होते. कोणत्याही क्षणी कोर्टाचा निकाल येऊन अस्पृश्यांना मंदिर खुलं होऊ शकतं याची त्यांना भीती होती. त्यावर त्यांनी एक हास्यास्पद उपाय शोधून काढला.

ते महापूजेचं निमित्त करुन मंदिरात गेले. तिथं देवाचं तेज एका घागरीत काढण्यासाठी काही मंत्र म्हटले. आता खरा विठोबा मंदिरात नाहीच. तो आमच्या 'घागरी'त आहे, असा अजब दावा त्यांनी केला. 'घागर विठोबा' म्हणून हा विठोबा पंढरपुरात प्रसिद्ध झाला.
1947 सालची आश्विन वद्य तृतीया म्हणजेच 17 ऑक्टोबर 1947 रोजी या 'घागर विठोबा'चा 'अवतार' झाला. पुढं 30 ऑक्टोबरला कोर्टानं 88 टक्के बडव्यांसह पाचही अर्ज फेटाळत मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्याच दिवशी पंढरपुरात जल्लोष साजरा करण्यात आला.
काही अस्पृश्य मानलेल्या भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पुढं हळूहळू सर्वच वारकरी महाराज लोक मंदिरावरचा बहिष्कार उठवू लागले. 1997 मध्ये म्हणजे या घटनेनंतर 50 वर्षांनी अनेकांनी हा बहिष्कार उठवला.”

कसा झाला मंदिर प्रवेश? :-

प्रांतिक हरिजन सेवक संघानं केलेल्या आवाहनानुसार येत्या कार्तिकी एकादशीला म्हणजेच सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर 1947 हा दिवस महाराष्ट्रभर ‘हरिजन मंदिर प्रवेश दिन’ म्हणून पाळावा.
साने गुरूजींनी विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे यासाठी, महाराष्ट्रभर जोराचा प्रचार केला व शेवटी श्री पांडुरंगाच्या पायापाशी उपवासही सुरू केला. या सर्व गोष्टींचा योग्य तो परिणाम होऊन, बडवे पंच कमेटीने निवेदन केले. ते कोर्टाने ग्राह्य मानून, 1 नोव्हेंबरपासून हरिजन श्रीपांडुरंगाचे दर्शन अव्याहतपणे घेत आहेत.”

MPSC 0207 🎯🏆

12 Nov, 12:57


न्यायमूर्ती भूषण गवई 'नालसा'च्या अध्यक्षपदी

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात 'नालसा'चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचे कार्य ही संस्था करते. न्याय विभागाने या संदर्भात माहिती दिली.

देशाचे सरन्यायाधीश नालसाचे मुख्य संरक्षक असतात. त्यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष केले जाते. सध्या सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे नालसाचे मुख्य संरक्षक असून, न्या. संजीव खन्ना कार्यकारी अध्यक्ष आहेत. न्या. चंद्रचूड रविवारी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यामुळे सोमवारी न्या. खन्ना सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

MPSC 0207 🎯🏆

11 Nov, 10:33


🔹Combine Pre Approach Building Batch🔹

😍😍 Open Session 😍😍

📱...Join Todays At 4 Pm...📱

▶️Click Here 🔗
https://youtube.com/live/4gGXOQeQGlE?feature=share

MPSC 0207 🎯🏆

09 Nov, 19:28


सुरेंद्रनाथ बॅनर्जी जयंती विशेष माहिती 👆👆

MPSC 0207 🎯🏆

08 Nov, 10:54


पैलवान सिकंदर शेख ने जिंकला रुस्तुम-ए-हिंद किताब, हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू बनला

महाराष्ट्रचा कुस्ती खेळाडू असलेल्या ’महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा शेख हा महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला आहे.
गतवर्षी म्हणजे 2023 ला सिकंदर शेख याने ’महाराष्ट्र केसरी’ कुस्ती जिंकून 66 वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला होता

पंजाब मधील जांडला जि. जालंधर येथे 2024 च्या रुस्तुम-ए-हिंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांना धुळ चारत सिकंदर शेख याने रुस्तुम-ए-हिंद हा किताब पटकविला.

या रुस्तुम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यात केवळ पै. हरीशचंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद या महाराष्ट्र च्या पैलवानानीच हा किताब जिंकला होता.
त्यांच्यानंतर आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे.

MPSC 0207 🎯🏆

08 Nov, 10:48


हेन्ले पासपोर्ट निर्देशांकात पुन्हा सिंगापूर अव्वल तर भारत 83 व्या क्रमांकावर

हेन्ले पासपोर्ट इंडेक्सची माहिती 2024 मध्ये जाहीर झाली असून त्यानुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगाच्या पाठीवर सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे दिसून येते. दुसऱ्या स्थानावर फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन यांचा क्रमांक लागतो. या देशाचा पासपोर्ट असेल तर त्या नागरिकांना पृथ्वीच्या पाठीवरील 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. या यादीमध्ये अमेरिका आठव्या स्थानी असून अमेरिकेचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना 186 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवेश मिळतो.

या यादीत तिसऱ्या स्थानावर आठ देशांचा समावेश होतो. त्यामध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फिनलँड, आयर्लंड, नेदरलँड, दक्षिण कोरिया, स्वीडन यांचा समावेश होतो. या देशाचा पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पृथ्वीच्या पाठीवरील 191 देशात व्हिसा शिवाय प्रवेश मिळतो. बेल्जियम, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडम यापैकी कोणत्याही देशाचा पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना 190 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवेश मिळतो.

भारत 83 व्या स्थानावर :-

हेन्ले पासपोर्ट इंडेक्समधील मानांकन निश्चित करण्यासाठी एक सर्वसमावेशक पद्धत वापरली जाते. त्यामध्ये अनेक मुद्द्यांचा विचार केलेला असतो. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या देशातील नागरिकांना किती देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवेश दिला जातो. तसेच त्या देशाचे इतर देशांशी असलेले राजनैतिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय करार अशा बाबींचा विचार केला जातो. भारत या यादीमध्ये 83 व्या स्थानावर असून भारतीय पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीच्या पाठीवरील 58 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवेश मिळतो.

MPSC 0207 🎯🏆

07 Nov, 16:19


जपानने अवकाशात सोडला पहिला लाकडी उपग्रह

जपानने 'लिग्नोसॅट' हा जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात सोडला आहे. होनोकी लाकडापासून बनवलेला हा उपग्रह सहा महिने पृथ्वीभोवती फिरणार आहे. भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये लाकडाचा वापर व्यवहार्य ठरू शकतो का, याची चाचणी यातून होणार आहे.

लाकडाचा वापर केलेला हा उपग्रह क्योटो विद्यापीठाने विकसित केला आहे. याचे वजन 900 ग्रॅम आहे. 'स्पेसएक्स'च्या मोहिमेतून 'लिंगोसॅट' आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे नुकताच पाठविण्यात आला.

पोहोचल्यानंतर 'लिंगोसॅट' हा पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल. अंतराळातील कठीण परिस्थितीत लाकडाच्या टिकाऊपणाची चाचणी तेथे सहा महिने होणार आहे.

या उपग्रहाच्या लाकडी चौकट ही मंगोलियन लाकडापासून तयार केली आहे. जपानच्या पारंपरिक पद्धतीनुसार ही चौकट तयार केली असून त्यात स्क्रू आणि गोंद वापरण्यात येत नाही.


कोणत्या लाकडाचा वापर?:-

अंतराळातील दबाव, प्रवास सगळ्या गोष्टींना सहन करण्याची क्षमता उपग्रहांमध्ये असते. यासाठी मुख्यत्वे ते मेटलचा वापर करून तयार केले जातात. यामुळे लाकडापासून उपग्रह बनवताना सगळ्यात मोठे चॅलेंज हे मजबूत लाकूड शोधणे होते. यामुळे मग मॅग्नोलिया लाकडाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

प्रदूषणाला बसणार आळा :-

पृथ्वीच्या वातावरणात जे उपग्रह पुन्हा प्रवेश करतात, ते खाली कोसळत असताना हवेशी घर्षण होऊन जळून जातात. यावेळी त्यातून लहान-लहान ऍलुमिना कण हवेत पसरतात. हे कण पृथ्वीच्या वातावरणात कित्येक वर्षं टिकून राहतात, ज्यामुळे प्रदूषणाचा धोका आहे. लाकडी उपग्रहामुळे हा धोकाही कमी होणार आहे. लाकडाचा उपग्रह असल्यामुळे पृथ्वीवर कोसळत असताना तो पूर्णपणे जळून जाणार आहे. लाकूड हे बायोडिग्रेडेबल असल्यामुळे याचा पर्यावरणाला धोका नसल्याचं क्योटो विद्यापीठाच्या संशोधकांनी स्पष्ट केले.

MPSC 0207 🎯🏆

06 Nov, 16:59


महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. तसेच मुख्य सचिवांनी सेवाज्येष्ठता व योग्यतेनुसार तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी नावे मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवावीत, यापैकी एका अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली जाईल, असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगाने संजय वर्मांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता राज्याच्या पोलीसदलाची सुत्रे संजय वर्मा यांच्याकडे असणार आहे.

1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी

IPS संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते एप्रिल 2028 मध्ये सेवानिवृत्त पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या डीजीपी पदासाठी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती, त्यात त्यांचे नाव आघाडीवर होते.

MPSC 0207 🎯🏆

06 Nov, 16:52


डोनाल्ड ट्रम्प 270 आकडा पार करून USA चे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले

डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी 2024 ची यूएस अध्यक्षीय निवडणूक जिंकली, कमला हॅरिस यांचा पराभव करून ते 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले. ट्रम्प यांनी 277 इलेक्टोरल मते मिळवली, तर हॅरिस यांना 224 मते मिळाली.

ट्रम्प यांनी 132 वर्षांनी इतिहास रचला

निवडणुकीतील पराभवानंतर व्हाईट हाऊस पुन्हा ताब्यात घेणारे 132 वर्षांतील पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहास रचला आहे.
या निवडणुकीच्या निकालामुळे ट्रम्प हे ग्रोव्हर क्लीव्हलँडनंतर सलग नॉन टर्म सर्व्ह करणारे पहिले यूएस अध्यक्ष बनले आहेत. क्लीव्हलँड यांनी 22वे आणि 24वे अध्यक्ष म्हणून पद भूषवले, त्यांनी 1885 ते 1889 आणि पुन्हा 1893 ते 1897 पर्यंत सेवा दिली. ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमध्ये परतणे 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून उद्घाटन झाल्यानंतर चिन्हांकित केले जाईल.

ट्रम्प यांच्या विजयात योगदान देणारी राज्ये

विस्कॉन्सिन - येथील निर्णायक विजयाने त्याला बुधवारी पहाटे 270 च्या उंबरठ्यावर ढकलले आणि 10 इलेक्टोरल मते दिली.

ओहायो - ओहायोच्या 17 इलेक्टोरल मते मिळवून, कामगार-वर्गाच्या मतांवर ट्रम्प यांची पकड मजबूत राहिली.

फ्लोरिडा - ऐतिहासिकदृष्ट्या रिपब्लिकन प्रवृत्ती असलेले एक राज्य, ट्रम्प यांनी 30 इलेक्टोरल मते मिळवून मजबूत लॅटिनो आणि पुराणमतवादी पायासह ते राज्य केले.

जॉर्जिया - एक रणांगण जिथे त्याने हॅरिसला 16 इलेक्टोरल मते मिळवून थोडक्यात पराभूत केले.

नॉर्थ कॅरोलिना - नॉर्थ कॅरोलिनाच्या 16 मते जिंकण्यासाठी ट्रम्पचे आर्थिक संदेश महत्त्वाचे होते.

आयोवा - 2016 पासून ट्रम्प यांचा बालेकिल्ला असलेल्या आयोवाने त्यांना 6 इलेक्टोरल मते दिली.

टेक्सास - रिपब्लिकन पक्षाची मजबूत पकड कायम ठेवत टेक्सासने ट्रम्प यांना 40 इलेक्टोरल मते दिली.

ॲरिझोना - चुरशीची लढत असलेले राज्य, ॲरिझोनाची 11 मते प्रचंड प्रचारानंतर ट्रम्प यांच्याकडे गेली.

नेवाडा - त्याने 6 इलेक्टोरल मते मिळवून नेवाडालाही पलटवले.

पेनसिल्व्हेनिया - आणखी एक महत्त्वाचे रणांगण ज्याने त्यांना 19 मते मिळवून दिली.

अमेरिकेचा अध्यक्ष कसा ठरवला जातो?

अमेरिकेच्या अध्यक्षाची निवडणूक ही एक अप्रत्यक्ष प्रक्रिया असते, ज्यामध्ये सर्व राज्यांतील नागरिक इलेक्टोरल कॉलेजच्या ठराविक सदस्यांना मतदान करतात. या सदस्यांना इलेक्टर्स म्हणतात. हे इलेक्टर्स नंतर प्रत्यक्ष मते देतात ज्याला इलेक्टोरल मते म्हटलं जातं. त्यांची मते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतात. इलेक्टोरल मतांमध्ये बहुमत मिळविणारे उमेदवार अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडले जातात.

MPSC 0207 🎯🏆

04 Nov, 04:55


वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पाडण्यासाठीएकच दिवा काम करतो.....कष्ट 🔥

MPSC 0207 🎯🏆

03 Nov, 17:40


वायुसेना उपप्रमुख एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांनी भारतीय वायुसेनेच्या देखभाल विभागाचा कार्यभार स्वीकारला

एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांनी आज भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयात (वायु भवन) वायुसेना उपप्रमुख (देखभाल) या पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर, एअर मार्शल अरोरा यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांना आदरांजली वाहिली.

एअर मार्शल अरोरा यांना ऑगस्ट 1986 मध्ये वायुसेनेच्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत नियुक्ती देण्यात आली होती. त्यांनी एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज (अमेरिका) आणि कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट (सिकंदराबाद) मधून शिक्षण पूर्ण केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले अरोरा हे आयआयटी खडगपूरचे माजी विद्यार्थी असून पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन विषयात डॉक्टरेट पदवीधारक आहेत.

38 वर्षांच्या आपल्या लक्षणीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या कमांड आणि कर्मचारी पदांचा कार्यभार सांभाळला आहे. एअर ऑफिसर-इन-चार्ज (देखभाल) पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते महासंचालक (विमान) पदावर कार्यरत होते.

सैनिक सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2018 मध्ये विशिष्ट सेवा पदक आणि 2024 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

MPSC 0207 🎯🏆

03 Nov, 16:34


"विशेष म्हणजे शेतकऱ्यांना धान्य दिल्यानंतर त्याच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावू नये, असंही धोरण होतं. शेतकऱ्याला जमेल तसं त्याने परत करावं, असं हे शेतकऱ्यांना तगवून धरणारं धोरण होतं. तगईचं धोरणं म्हणजे आजच्या भाषेत अनुदानाचं (सबसिडी) धोरण. यावरून अनुदानाच्या धोरणाची बीजं बळीराजाच्या राज्यात दिसतात," असंही त्या नमूद करतात.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बळीराजाविषयी संशोधन करत 'बळीवंश' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी सविस्तरपणे बळीराजावर मांडणी केली आहे. याशिवाय 'शिवधर्म गाथा' या पुस्तकातही त्यांनी दिवाळी सण आणि बळीराजाचा संबंध यावर भाष्य केलं आहे.
डॉ. साळुंखे बळीराजाला 'समविभागी' म्हणजे 'समसमान वाटा करणारा' असं म्हणतात.
बळीराजा आणि दिवाळीचा संबंध
बळीराजा आणि दिवाळीचा संबंध यावर भाष्य करताना डॉ. आ. ह. साळुंखे 'शिवधर्म गाथा'मध्ये सांगतात, "महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. हा शेतांमधील सुगीचा काळ असल्याने या काळात भारतीयांचा प्रेरणापुरुष असलेल्या बळीराजाच्या आठवणी निघणं स्वाभाविक आहे. खरे तर दिवाळीचा हा सगळा सण अतिशय कृतज्ञतापूर्वक बळीमहोत्सव साजरा करण्याचा आहे. त्याचे मूळ स्वरूप बळीराजाला आणि कृषीला केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आले आहे."
"सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीत कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याच्या दिवशी बहीण भावाला ओवाळताना 'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी सदिच्छा अंतःकरणपूर्वक व्यक्त करते. याचा अर्थ केरळमध्ये ज्याप्रमाणे सुगीचा सण असलेला 'ओणम्' साजरा केला जातो, तसेच दिवाळीचेही स्वरूप आहे," असं डॉ. साळुंखे सांगतात.

'बळीराजा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही'

बळीराजाचा महिमा केवळ महाराष्ट्रात मराठी संस्कृतीत होताना दिसत नाही.
महात्मा फुलेंनी भारत, हिंदूस्थान असे शब्द न वापरता बळीस्थान असा शब्द वापरला. ते या भूभागाला बळीस्थान म्हणायचे.
फुलेंनी त्यांच्या समग्र साहित्यात बळीराजाचं राज्य महाराष्ट्राबाहेर अगदी अयोध्येपर्यंत असल्याचाही उल्लेख आढळतो.
बळीराजाचा महाराष्ट्राबाहेर असलेल्या प्रभावावर बोलताना प्रतिमा परदेशी म्हणाल्या, "मल्याळी स्त्रिया लोकगीतं गातात. त्यात 'आटा माटा गायीगोमटा, दही दुधाने भरले डेरे' असा उल्लेख आढळतो. म्हणजे बळीचं राज्य संपन्न होतं आणि तेथे डेरे दही दुधाने भरलेले असायचे, अशी बळीराजाच्या राज्याची वर्णनं मल्याळी भाषेतही सापडतात."
"केरळमध्ये ओणमचा सण महाबली उत्सव म्हणूनच साजरा केला जातो. केरळमध्ये बळीराजाचा हा उत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव असतो. गावागावात लहान मुलं बळीराजाचा वेश धारण करतात. आपला बळीराजा आपल्याला भेटायला येणार आहे असंच या उत्सवात सांगितलं जातं. स्त्रिया घरासमोर अंगणात शेणाचा एक उंचवटा तयार करतात. त्याच्याभोवती रांगोळी काढतात.

बळीविषयी संत तुकाराम काय म्हणतात?

संत तुकाराम महाराजांच्या अंभगातही बळीचा उल्लेख आढळतो. याबाबत संत तुकाराम आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. विजय भगत यांनी बोलताना सांगितलं, "तुकोबांनी त्यांच्या अभंगात बळी सर्वस्वी उदार राजा होता, प्रजावत्सल राजा होता, असं म्हटलं आहे. बळी राजाने ‘कर’ उभारून तिजोरीत धन जमा केले होते. समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, दुष्काळ-पूर यासारख्या आपत्तीच्या काळात रयतेला मदत करणे, यासाठी तिजोरीत जमा झालेल्या धनाचा बळी राजाने उपयोग केला होता."

"तुकोबा सांगतात, त्या बळीचा मी ‘वंशज’ आहे, बळी विचाराचा वंशज आहे. मी बळी आहे, बळीपासूनच माझा जन्म झाला आहे, मी बळीच्या विचाराचा आहे, मला बळीच्या मार्गावर चालायचं आहे," असं सांगत प्रा. विजय भगत तुकोबाने स्वतःला 'बळी' असे संबोधल्याचं अधोरेखित करतात.

“बळी सर्वस्वे उदार | जेणे उभारिला कर |

करुनी काहार | तो पाताळी घातला ||”

-संत तुकाराम

विजय भगत पुढे सांगतात, "बळीराजा शोषणपूर्व समाजातील बहुजनांच्या हिताचे रक्षण करणारा महानायक होता. तो सिंधुजनांच्या प्रगतीचा पोशिंदा होता. महात्मा फुल्यांच्या संबोधाप्रमाणे आपण ज्यांना ग्रामदैवत संबोधतो ते खंडोबा, बहिरोबा, जोतिबा, म्हसोबा हे बळीराजाचे ‘सुभेदार’ होते. बळीराजाने या सुबेदारांच्या मदतीने सामाजिक ‘न्याय’ स्थापित करणारी ‘शासन’ व्यवस्था निर्माण केली होती. म्हणून तुकोबा म्हणतात ‘बळी दिला जिवाभावा | धरीला एक भाव | तो विश्वास फळला |’"

बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥१॥

लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मीचा मारा ॥ध्रु.॥

जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥

तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥

- संत तुकाराम

MPSC 0207 🎯🏆

03 Nov, 16:34


"बळी उदार होता. त्याने सामाजिक न्यायासाठी आपले हात पुढे केले. श्रमाला प्रतिष्ठा देऊन शेतीच्या विकासासाठी सिंचन, जलसंधारण यासारख्या व्यवस्था निर्माण केल्या. साधन संपदांचे समन्यायी वाटप केले. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी प्रजाजनांना सरकारी भांडारातून ‘तगई’ देऊन आधार दिला होता. म्हणून महात्मा फुल्यांना बळी सद्गुणी राजा वाटतो," असंही भगत नमूद करतात.

MPSC 0207 🎯🏆

03 Nov, 16:34


भाऊबीज : 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो' असं का म्हणतात आणि 'बळीराजा' नेमका कोण होता?

दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी महिला ओवाळताना 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो' अशी मनोकामना करताना आपण प्रत्येकानेच अनुभवलं असेल. इतकंच काय, शेतकऱ्याला पर्यायी शब्द म्हणून 'बळीराजा' या शब्दाचाही वापर होतो.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्येही बळीचा उल्लेख येतो. समाजसुधारक महात्मा फुले यांनीही त्यांच्या समग्र साहित्यात याच बळीराजाविषयी विस्ताराने लिहिलं आहे. तसंच, एका अखंडाच्या माध्यमातून बळीराजाचं महत्त्व विशद केलं आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळीच्या काळात बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा गौरव मिरवणुकाही निघतात.

बळी कोण होता?

महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या समग्र साहित्यात बळी कोण होता यावर भाष्य केलं आहे.
त्यांच्यानुसार, 'बळी हा प्रल्हादाचा पुत्र विरोजन याचा मुलगा आहे. बळीराजा हा खूप पराक्रमी होता. बळीराजाने आधी त्याच्यासोबत असलेल्या तत्कालीन अनेक लहान लहान क्षेत्रपतींना दुष्ट दंगेखोरांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं. त्यामुळे बळीराजाचं राज्य उत्तरोत्तर वाढत गेलं.'

बळीराजाचं राज्य किती मोठं होतं?

बळीराजाचं राज्य किती मोठं होतं, हे सांगताना महात्मा फुले म्हणतात, "बळीराजाच्या ताब्यात अनेक राज्यं होती. सिव्हलद्वीपाच्या आजूबाजूची अनेक बेटेही त्याच्या ताब्यात होती. तेथे बळी नावाचे एक बेटही आहे. दक्षिणेत कोल्हापूरच्या पश्चिमेला कोकण आणि मावळातील काही क्षेत्रेही बळीराजाच्या ताब्यात होती. तेथे जोतीबा नावाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तो कोल्हापुरच्या उत्तरेस रत्नागिरी नावाच्या पर्वतावर राहायचा."
"दक्षिणेत बळीराजाच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या राज्याला महाराष्ट्र असे म्हटले जायचे. या राज्यात राहणाऱ्यांना महाराष्ट्री म्हणत असतं. पुढे त्याचा अपभ्रंश मराठे असा झाला. हे महाराष्ट्र राज्य खूप मोठे असल्याने बळीराजाने त्याचे 9 खंड (भाग) केले होते. या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्यास खंडोबा नाव पडले. याशिवाय बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि 9 खंडांचा न्यायी असे दोन अधिकारी वसुली आणि न्याय करण्यासाठी नेमले होते. त्या महासुभ्याचा अपभ्रंश म्हसोबा असा झाला. तो सर्व पिकांची तपासणी करून त्याप्रमाणे सुट तुट द्यायचा आणि सर्वांना आनंदात ठेवायचा," असं महात्मा फुले सांगतात.
बळीराजाच्या राज्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर होता. त्याबाबतही महात्मा फुले माहिती देतात. ते पुढे सांगतात, "अयोध्येजवळ काशीक्षेत्राच्या आजूबाजूलाचा काही भागही बळीराजाच्या ताब्यात होता. त्याला दहावा खंड म्हटलं जायचं. तेथील अधिकाऱ्यांचे नाव काळभैरी होते. एकूण क्षेत्रपतींपैकी सात क्षेत्रपतींनी तर त्यांच्या भागाचा कारभार बळीराजाकडेच दिला होता. त्यामुळे त्यांना सात आश्रयीत असंही म्हटलं जायचं."
"बळीचे राज्य फार मोठे होते आणि तो खूप बलवान होता. म्हणूनच 'बळी तो कान पिळी' अशी म्हणही वापरात असल्याचं दिसतं. बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा, जोतीबा व 9 खंडोबा रयतेच्या सुखासाठी झटण्याची शर्थ करत असे. त्यामुळेच सर्व मऱ्हाठ्यांनी प्रत्येक शुभकार्य सुरू करण्याआधी भैरोबा (बहिरोबा), जोतीबा व खंडोबाला देव मानून तळी उचलण्याची परंपरा सुरू केली," असंही महात्मा फुले नमूद करतात.
बळीराजा आणि बलिप्रतिपदेच्या संबंधावर बोलताना सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी सांगतात, "बळीराजाची आठवण म्हणून दिवाळीत बलिप्रतिपदा साजरी केली जाते. पुराणांमध्ये बळी राजा उदार होता, दानशूर होता असं म्हणत बळीराजाचा महिमा गायलेला दिसतो."
भाऊबीजेच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या म्हणीतील बळीच्या उल्लेखावर बोलताना प्रतिमा परदेशी सांगतात, "हजारो वर्षे बहुजन समाजातील स्त्रिया इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो अशी मंगलकामना करतात. ही मंगलकामना ज्या दिवशी करतात तो दिवस महत्त्वाचा आहे आणि तो भाऊबीज आहे."
"भाऊबीजेला महिला भावाला ओवाळून इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो अशी मंगलकामना करतात. म्हणजे या महिला आपल्या भावात बळीराजाचं प्रतिरुप पाहतात. भावानं बळीराजासारखं वर्तन करावं, त्याच्यासारखे नीती नियम, धोरणं घ्यावीत आणि तसा एक समाज अस्तित्वात यावा अशी मंगलकामना हजारो वर्षे या स्त्रिया करतात,

बळीराजा इतका लोकप्रिय का?

इतक्या वर्षांनंतरही बळीच्या राज्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर म्हणीच्या रुपाने दिसतो. बळीराजाची ही लोकप्रियता का आहे, असं बळीराजाने कोणतं काम केलं यावरही प्रतिमा परदेशींनी भाष्य केलं.
त्या सांगतात, "बळीच्या राज्यात धान्य पिकवणाऱ्या, सृजनाचं काम करणाऱ्या शेतकऱ्याकडे बघण्याचा उदार दृष्टिकोन होता. बळीच्या राज्यात तगईचं धोरण होतं. तगई म्हणजे तगून धरणं. ज्या शेतकऱ्यांना पेरायला धान्य नाही त्यांना बळीराज्याने त्याच्या धान्य कोषातून धान्य दिलं."

MPSC 0207 🎯🏆

02 Nov, 14:54


राज्यात 9,70,25,119 मतदार

सर्वात जास्त पुरुष  : पुणे (4579216)
सर्वात जास्त महिला  : पुणे ( 4269569 )
सर्वात जास्त तृतीयपंथी : ठाणे (1415)
एकूण सर्वात जास्त मतदार : पुणे (8849590)

MPSC 0207 🎯🏆

02 Nov, 14:53


भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या टॉप 5 मध्ये रवींद्र जडेजा.

▪️जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
जडेजाने आतापर्यंत 314 गडी बाद केले आहेत.

MPSC 0207 🎯🏆

01 Nov, 12:50


☘️ शुभ दीपावली

MPSC 0207 🎯🏆

31 Oct, 14:56


स्मृती मंधाना ठरली सर्वाधिक शतकं झळकावणारी भारतीय महिला क्रिकेटपटू

न्यूझीलँड विरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाने झळकावलेलं शतक हे तिचे आठवं शतक असून, यासोबतच ती आता भारतीय महिलांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू बनली आहे.

भारताची माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडून स्मृतीने हा बहुमान मिळवला आहे.

स्मृतीला याआधी ICCच्या वुमन क्रिकेटर ऑफ द इअर आणि सर्वोत्कृष्ट वनडे प्लेयर ऑफ द इअर हे पुरस्कार मिळाले आहेत.

MPSC 0207 🎯🏆

31 Oct, 14:41


जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024

▪️जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकाची ही पहिली आवृत्ती आहे.

▪️या निर्देशांकात लक्झेंबर्ग पहिल्या क्रमांकावर आहे.

▪️यामध्ये किरिबाती सर्वात खालच्या स्थानावर आहे.

▪️या निर्देशांकात 180 देशांमध्ये भारत 176 व्या क्रमांकावर आहे.

▪️भारताचा स्कोअर 100 पैकी 45.5 आहे.

▪️गोल्डमन सोनेनफेल्ड स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी अँड क्लायमेट चेंज, बेन-गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ नेगेव्ह, इस्रायल आणि ना-नफा वेबसाइट BioDB.com यांनी संयुक्तपणे पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक तयार केला आहे आणि प्रसिद्ध केला आहे.

MPSC 0207 🎯🏆

31 Oct, 14:38


शासन आपल्या दारी'ला 'स्कॉच' पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाला प्रतिष्ठित 'स्कॉच' पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील विविध श्रेणींमधील २८० प्रकल्पांमध्ये 'शासन आपल्या दारी'वर परीक्षकांनी शिक्कामोर्तब केले. यामुळे नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रारूपाची देशात प्रशंसा झाली आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत नेऊन त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने वर्षभर यशस्वीरीत्या चालवला. त्याद्वारे नागरिकांना पाच कोटींहून अधिक लाभ देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १५ मे रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या या उपक्रमाने 'स्कॉच' पुरस्काराच्या नागरिक केंद्रित प्रशासन या श्रेणीत ८० हून अधिक उपक्रमांना मागे टाकत अंतिम फेरी गाठत पुरस्कार पटकाविला.

MPSC 0207 🎯🏆

30 Oct, 09:40


भारताचा सर्वांत मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आर्मेनिया देश

आर्मेनिया आता शस्त्रास्त्र निर्यातीसाठी भारताचे सर्वोच्च गंतव्य स्थान ठरले आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांमध्ये वाढ झाली असून, भारताने संरक्षण निर्यातीत सर्वकालीन उच्चांक नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने आर्मेनियाला २१,०८३ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केली आहे. युरेशियामधील वाढत्या सुरक्षेच्या चिंतेमुळे आर्मेनियाची भारताबरोबरची भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. भारताबरोबरचे संबंध मजबूत झाल्याने आर्मेनियाचे रशियन शस्त्रांवरील ऐतिहासिक अवलंबित्व कमी झाले आहे. भारतीय अर्थ मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की, आर्मेनियाने पिनाका मल्टिपल-लाँच रॉकेट सिस्टीम आणि आकाश अँटी-एअरक्राफ्ट सिस्टीम्सच्या खरेदीबाबतचा करार केल्यानंतर हा देश भारताकडून शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा आयातदार ठरला आहे.” अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे, “चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या सुरुवातीपर्यंत भारताकडून आर्मेनियाने केलेल्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीचे एकूण प्रमाण ६०० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचले आहे.”

आर्मेनियाने शास्त्रास्त्र खरेदीसाठी रशियाऐवजी भारताची निवड का केली?

संरक्षण उपकरणांसाठी आर्मेनिया रशियावर अवलंबून होता, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. रशियाने २०११ ते २०२० दरम्यान आर्मेनियाला अंदाजे ९४ टक्के शस्त्रे पुरवली; ज्यात इस्कंदर क्षेपणास्त्र प्रणाली, Su-30SM लढाऊ विमाने, हवाई संरक्षण प्रणाली व एकाधिक रॉकेट लाँचर यांसारख्या प्रगत प्रणालींचा समावेश आहे. रशिया हा अनेक दशकांपासून आर्मेनियाच्या लष्करी क्षमतेला मजबूत करीत आला आहे. परंतु, २०२० च्या अझरबैजानबरोबरच्या नागोर्नो-काराबाख युद्धानंतर रशियाच्या भागीदाराच्या भूमिकेबाबतचा आर्मेनियाचा विश्वास कमी होऊ लागला. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी रशियाचे नाव न घेता, जाहीरपणे असंतोष व्यक्त केला आणि असे म्हटले, “गेल्या दोन वर्षांत त्यांच्याशी करार करूनही ते आर्मेनियाला शस्त्रे पुरविण्यात अयशस्वी ठरले आहेत.” या बदलानंतर आर्मेनियाने आपल्या संरक्षण गरजांसाठी पर्यायी भागीदार शोधण्यास सुरुवात केली आणि भारताची निवड केली. २०२० मध्ये दोन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारांसह आर्मेनिया भारतीय शस्त्रास्त्रांसाठी सर्वोच्च गंतव्य स्थान म्हणून उदयास आले.

MPSC 0207 🎯🏆

30 Oct, 09:38


भारत-चीन सीमावाद : देप्सांग आणि देम्चोक भागातून सैन्य मागे प्रक्रिया पूर्ण; भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार

भारत आणि चीन यांच्यात २०२० पासून सुरु असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांनी वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याचे तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याचे मान्य केलं आहे. त्यानुसार सैन्य मान्य मागे घेण्याची तसेच चौकी हटवण्याची प्रक्रिया आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देप्सांग पठार आणि देम्चोक या दोन ठिकाणी आता भारतीय सैनिकांना मे २०२० पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे.

दोन्ही देशांनी या भागातील सैन्यही मागे बोलवलं आहे. तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आली आहे. आता दोन्ही देशांच्या अधिकारी या भागांची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान ड्रोन्सची मदतही घेतली जात आहे.

ही पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. मात्र, भारतीय सैनिकांना याची पूर्व कल्पना चीनच्या सैनिकांना देणे बंधकारक आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाचप्रकारची व्यवस्था आता अरुणाचल प्रदेश सीमेवरील वादग्रस्त भागांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे लष्काराच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

खरं तर मे २०२० पासून भारत आणि चीन सैन्यामध्ये सीमेवर तणाव आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यामुळे २० जवान शहीद झाले होते. तर अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. गेल्या काही दशकांतील हा सर्वांत भीषण संघर्ष होता. जोपर्यंत चीनबरोबरचे संबंध सामान्य होत नाही तोपर्यंत सीमेवर शांतता प्रस्थापित होणे अशक्य असल्याचे मत भारताने मांडलं होतं. त्यासाठी भारताने देपसांग आणि डेमचोक भागातून चीनी सैन्याला हटविण्यासाठी दबाव वाढविला होता. चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी या भागातून सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती.

MPSC 0207 🎯🏆

30 Oct, 09:32


सर्वाधिक इंटरनेट यूजर्स असलेले देश 👆👆

MPSC 0207 🎯🏆

30 Oct, 09:27


रॉड्रीने जिंकला फुटबॉलचा सर्वात मोठा बॅलन डी'ओर पुरस्कार

स्पेन आणि मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ याने फुटबॉलमधील सर्वात मोठा पुरस्कार पटकावला आहे. रॉड्रिगो हर्नांडेझ हा त्याच्या चाहत्यांमध्ये रॉड्री या नावाने परिचीत आहे. रॉड्रीने बॅलन डी'ओर २०२४ पुरस्कार जिंकला आहे.विशेष बाब म्हणजे त्याने रियल माद्रिदच्या व्हिनिशियस ज्युनियर आणि ज्युड बेलिंगहॅम या जोडीला मागे टाकून हा मोठा पुरस्कार जिंकला आहे.

विशेष म्हणजे, या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी यंदा लिओनेल मेस्सी किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो या दोघांनाही नामांकन मिळाले नाही. गेल्या २१ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे.

रॉड्रिची कामगिरी :-

रॉड्रिने गेल्या काही काळापासून दमदार कामगिरी केली आहे. २०२३-२४ हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष आहे. त्यानंतर त्याने सलग चौथे प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले आणि स्पेनसाठी युरो २०२४ ट्रॉफी जिंकली.
युरो कप २०२४ मध्ये तो स्पेनसाठी सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आला. फायनलध्ये तो जवळपास अर्धा वेळ बाहेर होता. पण तरीही त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला, यावरून त्याची क्षमता दिसून येते. गेल्या वर्षी त्याने देश आणि क्लबसाठी एकूण ७४ सामने खेळले.

बॅलन डी'ओर जिंकणारा स्पेनचा तिसरा फुटबॉलपटू बनला

२८ वर्षीय रॉड्री हा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणारा स्पेनचा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी अल्फ्रेडो डी स्टेफानो (१९५७ आणि १९५९) आणि लुईस सुआरेझ (१९६०) यांनी स्पेनसाठी हा मोठा पुरस्कार जिंकला होता.


पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी (२०२४)

बॅलन डी'ओर पुरुष: रॉड्रि (स्पेन, मँचेस्टर सिटी)

बॅलन डी'ओर महिला: एटाना बोनामती (स्पेन, बार्सिलोना)

कोपा ट्रॉफी: लॅमिने यामल (स्पेन, बार्सिलोना)

एचीन ट्रॉफी: एमिलियानो मार्टिनेझ (अर्जेंटिना, ॲस्टन व्हिला)

गार्ड मुलर ट्रॉफी: हॅरी केन (इंग्लंड, बायर्न म्युनिक) आणि किलियन एमबाप्पे (फ्रान्स, पॅरिस सेंट-जर्मेन/रिअल माद्रिद)

मेन्स क्लब ऑफ द इयर - रिअल माद्रिद

महिला क्लब ऑफ द इयर- बार्सिलोना

जोहान क्रुफ ट्रॉफी

पुरुष: कार्लो अँसेलोटी (इटली, रिअल माद्रिद)

महिला: एम्मा हेस (इंग्लंड, चेल्सी/यूएसए राष्ट्रीय संघ)

MPSC 0207 🎯🏆

30 Oct, 09:21


ग्लोबल फायनान्स द्वारे एसबीआयची सर्वोत्तम भारतीय बँक म्हणून निवड

ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ला २०२४ साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून घोषित केले आहे. वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ३१ व्या वार्षिक सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार समारंभात ग्लोबल फायनान्सने एसबीआयला २०२४ चा सर्वोत्कृष्ट बँक ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित केले.

एसबीआयचे अध्यक्ष सी.एस. सेट्टी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बँकेला हा पुरस्कार त्यांच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करून अपवादात्मक सेवा प्रदान करण्याच्या आणि देशभरात आर्थिक समावेशनाला चालना देण्याच्या वचनबद्धतेसाठी मिळाला आहे.शकते जिथे केंद्रीय बँकांचे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण गमावले जाईल. असे झाले तर केंद्रीय बँका आर्थिक व्यवस्थेत उपलब्ध रोकड कशी तपासतील? त्यामुळे क्रिप्टोकरन्सी हा आर्थिक स्थिरतेसाठी मोठा धोका आहे, अशी चिंता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वॉशिंग्टनमध्ये व्यक्त केली.

MPSC 0207 🎯🏆

30 Oct, 09:20


RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सर्वोच्च बँकर पुरस्कार प्रदान; सलग दुसऱ्या वर्षी गौरव

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ‘ग्लोबल फायनान्स’ या अमेरिकन मासिकाने सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून निवड करीत गौरव केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून त्यांची निवड झाली आहे.

गव्हर्नर दास यांना सलग दुसऱ्या वर्षी सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये ‘A+’ रेटिंग प्रदान करण्यात आले आहे, असे आरबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे ‘ग्लोबल फायनान्स’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शक्तिकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला.

‘ए+’ रेटिंग मिळालेल्या तीन सेंट्रल बँक गव्हर्नरच्या यादीत दास पहिल्या स्थानावर आहेत. ‘ग्लोबल फायनान्स’ मासिकाने एका निवेदनात म्हटले आहे की, महागाई नियंत्रित करणे, आर्थिक विकासाचे लक्ष्य साध्य करणे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनात यश मिळवण्यासाठी ‘ए’ ते ‘एफ’ स्केलवर रेटिंग देण्यात आले. येथे ‘ए’ चमकदार कामगिरी दर्शवतो तर एफ’ संपूर्ण अपयश दर्शवतो. शक्तिकांत दास यांच्याव्यतिरिक्त, डेन्मार्कचे ख्रिश्चन केटल थॉमसन आणि स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन यांनाही सेंट्रल बँकर्सच्या ‘ए+’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.

MPSC 0207 🎯🏆

26 Oct, 11:18


निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

MPSC 0207 🎯🏆

26 Oct, 08:46


🔰TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या मोफत प्रशिक्षण प्रक्रियेत आपण अर्ज केलाय का? असल्यास आपण CET Scholarship परीक्षा पास झालात का?

🔰CET परीक्षा उत्तीर्ण झाले असाल अणि संस्था निवडीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास संकल्प एज्युकेशन चा पर्याय क्रमांक 1 द्यावा.

🔰अधिक माहिती साठी संपर्क 👇
📲 9172217440

MPSC 0207 🎯🏆

26 Oct, 05:22


गणेश शंकर विद्यार्थी जयंती विशेष...... 👆👆

MPSC 0207 🎯🏆

26 Oct, 01:45


एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी (जीआरएसई) प्रकल्पातील ‘अभय’ या सातव्या जहाजाचे जलावतरण

भारतीय नौदलासाठी मेसर्स जीआरएसई कडून बांधण्यात येणाऱ्या पाणबुडीविरोधी वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील सातव्या ‘अभय’ जहाजाचे 25 ऑक्टोबर 24 रोजी मेसर्स एल अँड टी, कट्टुपल्ली येथे जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी व्हीएडीएम राजेश पेंढारकर, एफओसी-इन-सी (पूर्व) होते. सागरी परंपरेनुसार, पूर्वीय क्षेत्राच्या अध्यक्ष संध्या पेंढारकर यांनी जहाजाचे लोकार्पण केले.

आठ एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजे बांधण्याच्या करारावर संरक्षण मंत्रालय आणि कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (जीआरएसई) यांच्यात एप्रिल 19 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली. अर्नाळा श्रेणीची जहाजे भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या अभय श्रेणीच्या एएसडब्ल्यू कॉर्वेट्सची जागा घेतील आणि ती किनारपट्टी लगतच्या भागात पाणबुडीविरोधी अभियान, कमी तीव्रतेच्या सागरी मोहीम (एलआयएमओ) आणि माईन लेईन्ग कार्य करण्यासाठी याची संरचना करण्यात आली आहे. एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजे सुमारे 77 मीटर लांब आहेत, आणि ती 1800 टन भारासह 25 नॉटिकल माईल चा कमाल वेग मिळवू शकतात.

MPSC 0207 🎯🏆

26 Oct, 01:43


इस्रायल आशियाई विकास बँकेचा(ADB) नवीन सदस्य बनला

▪️इस्रायल आशियाई विकास बँकेचा नवा सदस्य झाला आहे.
▪️आता आशियाई विकास बँकेच्या सदस्यांची संख्या 69 झाली आहे.
▪️आशियाई विकास बँक ही आशिया-पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे.
▪️हे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सदस्य देशांना कर्ज प्रदान करते.

▪️आशियाई विकास बँक :-
▪️स्थापना : वर्ष 1966
▪️मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)


MPSC 0207 🎯🏆

25 Oct, 12:28


या रे सोनेहो live 🔥🔥

MPSC 0207 🎯🏆

25 Oct, 11:20


मी Live येतोय 6 वाजता...... तुम्हीही नक्की या..... Science चे तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा....... 🔥🔥🔥🔥

MPSC 0207 🎯🏆

25 Oct, 11:19


https://www.youtube.com/live/MtZWeMe3muw?feature=shared

MPSC 0207 🎯🏆

25 Oct, 01:41


👉 एका शिक्षकाने भावी शिक्षकांसाठी
केलेला एक छोटासा प्रयत्न.

👉 ही लिंक सर्व शिक्षक बंधू भगिनींना
शेयर करा.

🔻Open to All🔻

🔻 प्रा. दिलीप स. मुसळे ( एम ए इंग्रजी, सेट पात्र, १४ वर्ष अध्यापनाचा अनुभव)

https://youtube.com/playlist?list=PLR9sfSov2Ht62USHVG1x89VvbCT6z2IZt&si=9He4qU7m4MYzsUe1

MPSC 0207 🎯🏆

24 Oct, 18:14


न्यायमूर्ती संजीव खन्ना 51वे सरन्यायाधीश! 11 नोव्हेंबरला घेणार शपथ, केंद्र सरकारने मान्यता दिली

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची गुरुवारी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 11 नोव्हेंबरला शपथ घेतील. याच्या एक दिवस आधी, विद्यमान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी 8 नोव्हेंबर 2022 रोजी CJI म्हणून पदभार स्वीकारला होता.

न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. ते 11 नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती दिली. विद्यमान सरन्याधीश डी. वाय. चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनीच न्यायमूर्ती खन्ना यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. परंपरा अशी आहे की विद्यमान सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस तेव्हाच करतात जेव्हा त्यांना कायदा मंत्रालयाने तशी विनंती केली जाते.

सरन्याधीश चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव ज्येष्ठता यादीत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती खन्ना यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. 64 वर्षीय न्यायमूर्ती खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी 65 निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे 275 खंडपीठांचा भाग राहिले आहेत.

MPSC 0207 🎯🏆

24 Oct, 18:11


भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालकडून निवृत्तीची घोषणा

भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालने गुरुवारी (24 ऑक्टोबर) निवृत्तीची घोषणा केली.

हरियाणातील एका छोट्या शहरातून आलेल्या राणी रामपालचं करियर 16 वर्षांचं राहिलं. तिचे वडील हातगाडी ओढण्याचं काम करायचे.

29 वर्षीय राणी रामपाल भारताच्या सर्वोत्तम हॉकी खेळाडूंपैकी एक आहे. तिने ऑलिंपिक 2021 मध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं. यावेळी ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला.

आतापर्यंत 254 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या राणी रामपालने निवृत्ती जाहीर करताना यापुढील काळात उद्योन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचंही नमूद केलं.

ती 2013 मध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचाही भाग होती.

खेळताना दुखापत झाल्यामुळे तिला ज्युनियर राष्ट्रीय शिबिरातून बाहेर जावं लागलं होतं पण पुढे ती भारतीय महिला हॉकीची 'पोस्टर गर्ल' बनली आणि देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, खेलरत्न मिळवणारी पहिली महिला हॉकीपटू ठरली.

राणी रामपालच्या कारकिर्दीचे ठळक मुद्दे काही कमी नाहीत. तिने 2018 आशियाई खेळांमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले आणि ओडिशामधील ऑलिंपिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध शेवटच्या क्षणी महत्त्वपूर्ण गोल केला. यामुळे 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे स्थान निश्चित केले. ही भारताची प्रतिष्ठित स्पर्धेसाठी सलग दुसरी पात्रता होती.

MPSC 0207 🎯🏆

24 Oct, 02:42


ब्रिक्स म्हणजे काय? यंदाची शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची का आहे?

२२-२३ ऑक्टोबर रोजी रशियातील वोल्गा नदीकाठी तातारस्तानची राजधानी काझान येथे होणाऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी झाले.

ब्रिक्स म्हणजे काय?
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचे एक संघटन तयार करण्यात आले. २००१ मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओ’नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. या शब्दाचा स्वीकार करून पहिली ब्रिक शिखर परिषद १६ जून २००९ रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सामना करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले.

या वर्षाच्या सुरुवातीला संघटनेत पाच नवीन देशांना सामील करण्यात आले; ज्यात इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) चा समावेश होता. विस्तारित गटाची एकत्रित लोकसंख्या सुमारे ३.५ अब्ज किंवा जगाच्या लोकसंख्येच्या ४५ टक्के आहे. सदस्य देशांच्या एकत्रित अर्थव्यवस्थांची किंमत २८.५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे, जी जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुमारे २८ टक्के आहे. इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश या संघटनेचे सदस्य झाल्यामुळे ब्रिक्स देश जागतिक कच्च्या तेलाचे ४४ टक्के उत्पादन करतात. खुली, पारदर्शक, सर्वसमावेशक, भेदभावरहित आणि नियमांवर आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणाली स्थापन करणे हे ब्रिक्सचे उद्दिष्ट आहे. ते आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरला बाहेर काढून सदस्य देश त्यांच्यातील व्यापारासाठी राष्ट्रीय चलनांचा वापर करण्यावर जोर देत आहेत. मात्र, अद्याप तरी त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

भारतासाठी ब्रिक्सचे महत्त्व
ब्रिक्ससारख्या जागतिक मंचांसाठी भारत वचनबद्ध आहे. ब्रिक्समध्ये महत्त्वपूर्ण जागतिक शक्तींचा समावेश आहे. २०२३ च्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “ब्रिक्स परिषदेने जग बहुध्रुवीय झाले आहे.” ‘ओआरएफ’च्या लेखात असे म्हटले आहे की, भारत जागतिक मंचावर आपले स्थान वाढवण्यासाठी बहुपक्षीय मंचांचा वापर करत आहे. अनेक व्यासपीठांद्वारे भारत जागतिक स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. इन्स्टिट्यूट फॉर सिक्युरिटी अँड डेव्हलपमेंट पॉलिसी येथील स्टॉकहोम सेंटर फॉर साऊथ एशियन अँड इंडो-पॅसिफिक अफेयर्सचे प्रमुख जगन्नाथ पांडा यांनी युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस (यूएसआयपी) साठी एका लेखात म्हटले आहे, “भारत ब्रिक्स आणि त्याचा विस्तार बहुध्रुवीय म्हणून पाहतो. मध्य पूर्व (पश्चिम आशिया) आणि त्यापलीकडे देशाचा आर्थिक प्रसार वाढवणे, हा भारताचा उद्देश आहे.”

5 वर्षांनी मोदी-जिनपिंग द्विपक्षीय चर्चा

रशियाच्या कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती.
मोदी-जिनपिंग चर्चेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, दोन्ही नेत्यांनी 5 वर्षांनी एकमेकांशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्ती कराराचे स्वागत केले आहे.

परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. NSA अजित डोवाल भारताकडून तर परराष्ट्र मंत्री वांग यी हे चीनकडून असतील. या दोघांची लवकरच औपचारिक बैठक होणार आहे.

MPSC 0207 🎯🏆

23 Oct, 13:53


हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर

दोन वर्षांनंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा पार पाडण्यासाठी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल 2026 ग्लासगो संयोजन समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे.

या स्पर्धा रद्द होण्याच्या वाटेवर असतानाच ग्लासगो शहराने अगदी ऐनवेळेस या स्पर्धा घेण्याची तयारी दर्शवली. कमी खर्चात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संयोजन समितीने स्पर्धेतील नेहमीच्या 19 क्रीडा प्रकारांऐवजी स्पर्धा 10 क्रीडा प्रकारात घेण्याचा निर्णय घेतला.

संयोजन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत वगळण्यात आलेल्या खेळांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या खेळांसह टेवल टेनिस, स्क्वॉश आणि ट्रायथलॉन या खेळांवरही संयोजन समितीने फुली मारली आहे. त्याचबरोबर स्पर्धा केवळ चार केंद्रांवर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धा सुरळीत आणि यशस्वी तसेच आर्थिकदृष्ट्या यशस्वी पार पाडण्यासाठी आम्ही 10 क्रीडा प्रकारातच स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या खेळांचा समावेश असेल :-

अॅथलेटिक्स, पॅरा अॅथलेटिक्स (ट्रॅक अँड फिल्ड), जलतरण, पॅरा जलतरण, कलात्मक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरा वेटलिफ्टिंग, बॉक्सिग, ज्युडो, बाऊल्स, पॅरा बाऊल्स, 3 बाय 3 बास्केटबॉल, 3 बाय 3 व्हीलचेअर बास्केटबॉल.

MPSC 0207 🎯🏆

22 Oct, 12:12


इंडोनेशियाच्या अध्यक्षपदी प्रबोवो सुबियांतो

इंडोनेशियाच्या अध्यक्षपदी आज प्रबोवो सुवियांतो यांचा शपथविधी झाला., वियांतो हे माजी लष्करी जनरल असून त्यांच्यावर लष्करी शासनाच्या काळात अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला होता. त्यांची १९९८ मध्ये लष्करातून हकालपट्टी झाली, तोपर्यंत ते इंडोनेशियाच्या स्पेशल फोर्सेसचे कमांडर होते. सुबियांतो हे इंडोनेशियाचे माजी संरक्षण मंत्री देखील आहेत.

इंडोनेशियाचे लोकप्रिय अध्यक्ष जोको विदोदो यांचे प्रतिस्पर्धी म्हणून सुबियांतो यांची ओळख आहे. विदोदो यांच्या विरोधात सुबियांतो यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये दोनवेळा अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. स दोन्ही वेळी त्यांचा पराभव झाला होता आणि त्यांनी निवडणुकीचा हा निकाल स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र तरिही विदोदो यांनी सुबियांतो यांना संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत सुबियांतो यांनी मोठा विजय मिळवला होता. नवीन राजधानी स्थापन करणे आणि देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कच्च्या मालाच्या निर्यातीच्या विदोदो यांच्या धोरणांना पुढे सुरू ठेवण्याचे सुबियांतो यांनी ठरवले आहे.

MPSC 0207 🎯🏆

22 Oct, 12:10


राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा, विजया रहाटकर यांची नियुक्ती

विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा असेल.‌
संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. 1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.   

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाची कामगिरी

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती. त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले. "सक्षमा" उपक्रमामधून अॅसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.
महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचवल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. विजया रहाटकर यांनी डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे "साद" नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले. एका अर्थाने त्यांनी आयोगालाच पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले होते. 

राजकीय प्रवास

महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा विजया रहाटकर यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळवलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. 
छत्रपती संभाजी नगरच्या महापौर त्याआधी 2007 ते 2010 या कालावधीत तत्कालीन औरंगाबाद आणि विद्यमान छत्रपती संभाजी नगरच्या महापौर असताना विजया रहाटकर यांनी शहर केंद्रीत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. यात आरोग्य सेवेपासून ते पायाभूत सुविधा निर्मितीपर्यंत अनेक घटकांचा समावेश होता. महापौर पदाच्या काळात विजया रहाटकर महाराष्ट्र मेयर कौन्सिलच्या अध्यक्षा आणि ऑल इंडिया मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षादेखील होत्या. त्या सध्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेच्या सल्लागार संचालिकादेखील आहेत. 

भौतिकशास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजया रहाटकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये 'विधिलिखित' या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन , 'अग्निशिखा धडाडू द्या', 'औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स', 'मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम' यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या महत्वपूर्ण जबाबदारीचे पालन मी निष्ठेने आणि समर्पण भावनेने करेन. शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या क्षमतांना आणि संधींना अधिक गती देण्याचा प्रयत्न करेन. केवळ महिला सक्षमीकरण एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, महिलांच्या नेतृत्वाखाली विकासयात्रेला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील", असं विजया रहाटकर यांनी म्हटलं. 

MPSC 0207 🎯🏆

22 Oct, 08:05


Step Up...
कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सदैव विद्यार्थ्यांसोबत🙏
🙏

MPSC 0207 🎯🏆

21 Oct, 09:57


कार्यक्रम बघण्यासाठी लिंक 👆👆

MPSC 0207 🎯🏆

21 Oct, 09:56


https://www.youtube.com/live/jbLM0UOs5kw?feature=shared

MPSC 0207 🎯🏆

21 Oct, 05:23


यायलाच लागतयं बरं का.....💐🤘

दुपारी ठीक 1 वाजता👍

11,223

subscribers

1,537

photos

37

videos