✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) @vicharmanatle Channel on Telegram

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

@vicharmanatle


विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇
ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद @ashucpthoughts
Admin
वैष्णवी खलसे @VKhalse_6850
ओम शेळके @Ommshelke

विचार मनातले (उमगती विचारधारा) (Marathi)

विचार मनातले चॅनेल हे एक साहित्यिक समुदायातील सभासदांसाठी एक स्थान आहे ज्यात तुम्हाला तुमच्या कविता, लेख, विचार, कला इत्यादीच्या अद्वितीय पोस्ट्स सामायिक करायला संधी आहे. या चॅनेलवर आपल्याला आपल्या कलाकृतींचा आणि शास्त्रकृतींचा समर्थन मिळेल आणि समुदायातील इतर सदस्यांशी मिळवायला स्थानिक आहे.nnया चॅनेलचे मालक आशु छाया प्रमोद (@ashucpthoughts) आहेत आणि चॅनेलचे एडमिन वैष्णवी खलसे (@VKhalse_6850) आणि ओम शेळके (@Ommshelke) आहेत. त्यांनी या समुदायातील सदस्यांना समृद्ध करण्यासाठी या चॅनेलवर विचारातील खासदार साझाकृती सादर करण्यात काम केलं आहे.nnआपण ज्वालामुखीसारखे उम्गते विचार मनातले चॅनेलवर सामील होऊन आपल्या साहित्यिक सवाल-जवाबात सामील होऊ शकता. त्यामुळे, आपल्याला इतर सदस्यांशी संवाद साध्या करायला मदत होईल आणि साहित्यिक समुदायात आपली सामर्थ्य वाढवायला मदत होईल. आजच नक्की जॉइन करा आणि आपले विचार सामायिक करा! 👇

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

22 Nov, 11:10


स्वतःशी प्रामाणिक असलेली व्यक्ती दुसऱ्याला दुःखं देण्याचा विचार पण करू शकत नाही कारण त्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं की आपल्या माणसांकडून कडून मिळालेलं दुःखांची मनाला झालेली जखम एवढी कोरून जाते ती कधीच भरल्या जात नाही म्हणून प्रत्येकाशी आपुलकीणे वागा शेवटी आपण सोबत काही नेणार नाही आहो क्षुल्लक कारणावरून आयुष्यभरापासून जपलेली नाती सोडू नका माणसाचं जीवन पण एक पाण्याचा बुडबुडा आहे कधी पुठणार सांगता पण येणार नाही ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

22 Nov, 01:52


Insta I'd:- @ravan_ashucp

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

21 Nov, 10:52


काही लोक म्हणतात खरं प्रेम वगैरे काहीच नसतं तर ते स्वार्थापोटी झालेलं एक आकर्षण असतं पण मला वाटतं प्रेम ही निःस्वार्थ भावना आहे ती तितक्याच शुद्धतेने जपल्या गेली पाहिजे कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार की नाही हे परिस्थितीवर अलंबून असलं तरी मात्र एकतर्फी प्रेम आपल्यासाठी नेहमीच अमर असते ना राव❤️!,,✍🏻

कमन#लेखक
 
@Ommshelke

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

21 Nov, 02:46


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

माणसाला एखादी गोष्ट
करायची असेल तर मार्ग सापडतो !

मात्र...

न करण्याऱ्याला कारणे सापडतात !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

21 Nov, 02:46


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

मन समाधानी असलं की...

  छोट्या छोट्या गोष्टींतही
    भरपूर आनंद घेता येतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

20 Nov, 06:46


मतदान.. 🇮🇳
✒️"मतदान या शब्दामध्येच दान हा शब्द येतो.. मतदान हे सुद्धा लोकशाहीच्या मजबुतीसाठी मतदारानी करायच दानच आहे.. आणि हे दान मुक्तपणे कोणाचा रुपया न घेता केल तरच तो लोकशाहीचा खरा विजय आहे.. मी मतदान केल तुम्ही सुद्धा करा...!"
✒️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
# मतदान 🇮🇳

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

19 Nov, 18:28


लोक सच बोला करते हैं
दुनिया में कोई झूठी कसमा
खा मर नहीं जाता प्यारे

और तू हस हस कर जहर खा के
मरने की बातें किया करते हो

प्यारे कभी बिना बातें किये
जहर खा कर हमे मर के
दिखाओ रे प्यारे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

19 Nov, 11:34


"त्याचं अस्तित्व कुणाला कसं कळलंच नाही?"
( एकदा पूर्ण वाचून पहा,तुमच्याही मनाला कुठेतरी खरं वाटेल🙏)

आपण सर्वांनी "श्यामची आई" ह्या पुस्तकाचे नाव तर एकलेच असेल मग त्या पुस्तकासारखं एखादं बाबा,भाऊ,मुलगा ह्यांच्यावर लिहलेले पुस्तक कधी तुम्ही पाहिलंय का?कसं भेटेल कारण पुरुषांवर कधी कोणी काही बोलल,लिहिलेच जात नाही😳इतरांच काय तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांवर बाबा,मुलगा,काका,भाऊ,मित्र ह्यंच्यबदल लिहून पहा जास्त दोन चार ओळी पलीकडे लीहताच येणार नाही कारण त्यांच्या भावनांना,दुःखांना समजुन घ्यायला आपण कधी त्यांचं जबाबदारीच पांघरून उघडुन पाहतो का😔?छ.शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊमातेंचे नाव आपल्या मुखावर येते तसे स्वराज्यसंकल्पक शहाजीराजांचे नाव लवकर लक्षात का येत नाही?श्रीकृष्णांना जन्म दिलेल्या देवकी मातेचे वर्णन केले जाते परंतु भर पावसात डोकंभर यमुना नदीच्या पाण्यातून सुखरूप आपल्या मुलाला पोहचविणारे वसुदेव आपल्या लक्षात येत नाही😔
एक पुरुष,मुलगा म्हणून त्यांचाकड फक्त वंशाचा दिवा म्हणून पाहिलं जात आणि तो जीवनभर जबाबदारीच्या ओझ्याखाली चालत असतो आपण कधी त्याच्या भावना,दुःख समजून घेतो का?सहज आपण त्यांची कधी विचारपूस करतो का😞ज्याप्रमाणे महिला दिवस 8 मार्चला असतो तसा पुरुष दिन कधी असतो बघा बर 90 टक्के लोकांना माहीतच नाही?स्त्रिंयासाठी रक्षाबंधन,भाहुबिज अशा सणांना भावाकडून भेटवस्तू घेतो पण पुरुषांचा वाढदिवस वगळता त्याला कधी आपण भेटवस्तू देतो का?😔भेटवस्तूच बाजूला सोडा त्याची कधी साधी मित्र,भाऊ म्हणून विचारपूस करतो का,त्याला समजून घेतो का😒?आपण मनमोकळेपणे पुरुष दिनाच्या शुभेच्छा तरी त्यांना देतो का😔?मग आपण पुरुषप्रधान संस्कृती म्हणतो ती फक्त नावापुरतीच का?शंभरात दोन तीन पुरुष महिलांशी चुकीचे वागले,वाईट कृत्य केले म्हणून सगळे पुरुष तसे नसतात🙅‍♂कारण स्त्रियांचा आदर करणारे शिवाजी महाराज हेही पुरुष होते आणि तसे आजही अनेक पुरुष आहेत मग अश्या पुरुषांचे दुःख,वेदना आपण कधी समजून घेणार आहोत?😢तोही एक जीव आहे त्यालाही रडणं येते,त्यालाही दुःख असतं परंतु तो जबाबदारीमुळे सर्वंसमोर रडत नाही, एकाट्यात रडतो😞मान्य आहे स्त्रीचं जिवन अवघड आहे परंतु एका पुरुषाचं जीवन हे एका पुरुषालाच समजू शकत कारण खूप सार दुःख सहन करून एका स्मितहास्यामाघे तो सगळं लपवनारा पुरुष असतो😢कधी वेळ आली तर एका पुरुषाला मित्र,भाऊ,मुलगा समजून त्यांचं दुःख,वेदना अस्तित्व मान्य करून त्याला  आधार द्या,तो प्रत्येकासाठी आहेच की मग कधीतरी त्याच्यासाठी जगून पहा,नक्की त्याला बर वाटेल..☺️नकळत कुणाच्या भावना दुःखवल्या असतील तर माफी असावी🙏
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

19 Nov, 08:15


*आयुष्यात आलेले वाईट प्रसंग व वाईट वेळ फक्त अनुभव म्हणून जरी मान्य करता आली तर तुम्ही जीवनाच्या प्रगतीकडे एक पाऊल पुढे टाकले आहे समजा❤‍🔥कारण आहे ती परस्थिती स्विकारायलाही खूप मोठं धाडस लागत* 💯🔥💪🏻
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

18 Nov, 13:42


अंत अस्थी: प्रारंभ...!
जेव्हा जेव्हा वाटेल आपण हरतोय जेव्हा जेव्हा वाटेल सगळं संपलयं आता काहीच शिल्लक उरलं नाही इथंच थांबवू ह्या प्रवासाला आणी इथंच श्वासही थांबवावा असं वाटेल, जिवही संपवावा बस आता नाही होत आहे सहन...🥺😖 नको आता बस झाल खूप झेललं 😐माझ्या मनगटात आता ताकतच नाहीये अक्षरशः संपवूनच टाकू स्वतःला इथपर्यंत येऊन आपण थांबतो...😱 तेव्हा एकदा आठवा आपण सुरवात कुठून केली होती? कशासाठी केली होती? इथपर्यंत येईपर्यंत आपण काय काय झेललं, कोणकोणत्या गोष्टीला सामोरे गेलो, कितीदा पडलो, कितीदा अडखळलो तरी इथपर्यंत आलोच ना 🤞मग आता का थांबतोय? अरे अजून थोडं चालशील तर वाट सापडेलच ना मान्य आहे अजून अडथळे येतील, अडचणी येतील पण तुला जे हवंय ते तू मिळवशीलच स्वतःवर विश्वास ठेव 😇👍🏻अंत अस्ती: प्रारंभ हे फक्त म्हणायचंच वाक्य नाहीये तरी ते जीवनातही उपयोगी पडत... 💯 कोणी सोडून गेलं म्हणून रडत बसू नका ज्याला जायचं त्याला कारण लागत आणी ज्याला थांबायचं असत तो कितीही काहीही झालं तरी थांबतोच त्यामुळे कोणी गेलं म्हणून आपलं आयुष्य थांबत नाही आणी ते थांबवावं ही नाही...😌 एखाद्या परीक्षेत अपयश आलं म्हणून कोलमडून पडू नका आयुष्यात खूप परीक्षा असतात शिवाय एका परीक्षेत अपयश आलं म्हणून बाकीच्या परीक्षेत पण येईलच असं काही नाही म्हणून हार न मानता प्रयत्न करत राहायचे अगदी जिंकेपर्यंत...😇 माणसाचं अस्तित्व कधीच संपत नाही तर नव्याने एक नवीन अध्याय सुरु होतो जीवनाचा... आणी प्रत्येक त्या अध्ययात माणसाने पूर्ण प्राण पणाला लावून द्यायला हवा...👍🏻 त्यामुळे उठ नव्याने सुरु कर कारण तुझा होणारा विजय तुझी वाट पाहत आहे...🤩🥳
प्रियंका भोसले...

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

18 Nov, 06:55


वीरक्ती
हरवले जरी काही
खेद त्याचा नसावा
सापडले नवे दुसरे
खेद त्याने पुसावा 1
हरवली वस्तू
जरी महागडी
होईल का? मग जगबुडी
गेली मग जाऊ द्या की
का? जळता व्यर्थ कुडी 2
हरवणे अन गवसणे
नित्य चाले निरंतर
नित्य जाती अन येती
जशी रजनी अन वासर 3
गेली वस्तू आपल्या हातून
वीरक्तीचा भाव यावा
आउट हात देहामध्ये
आसक्तीचा ठाव नसावा.4
शब्दांकन शेवाळे दीप्ती गोपाळ

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

18 Nov, 06:35


I'm on Instagram as @krishnasays412k. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/krishnasays412k?igsh=MXJrbXdodnVvOXZ0aA==&utm_source=ig_contact_invite

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

18 Nov, 05:23


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

माणसांच्या नात्यातील ओलावा...

हा वाईट प्रसंगाच्या वेळी
खरा गारवा देतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

18 Nov, 05:23


इतरांसारखा तूपण नकोस बनू युवानेता🙅‍♂
मिळेल काय तुला जरी आली कुणाचीही सत्ता?
एका मतासाठी दिल्या जातात येथे हजारोच्या नोटा🤷
सत्तेसाठी हा चालत राहतो नेहमी खेळ खोटा.

कुठपर्यंत युवनेता म्हणून उचलणार तू संतरज्या?
तू मोठा झालास तेव्हाच असेल खरी मज्जा❤‍🔥
तूच आहेस एकमेव तुझ्या घरासाठी राजा🥰
का करायाचा इतरांच्या सत्तेसाठी गाजावाजा?

कलम १९ नुसार गहाण नको ठेवू मतदान  स्वातंत्र्यचा अधिकार🙋
मतदानाचा हक्क गाजवून निवडायला हवं योग्य सरका
🙏🏻
स्वतःवर ठेव विश्वास,मानू नकोस आता तू हार
शिक्षणाची संधी सोडून आयुष्याचा नको करू अंधार

........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

17 Nov, 19:40


Insta Id:- @ravan_ashucp

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

17 Nov, 17:15


#Ishq_Kiyaan 💔
@Writer_ami

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

17 Nov, 17:15


#Ishq_Kiyaan 💔
@Writer_ami

1,620

subscribers

2,157

photos

222

videos