सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकारक्षेत्र
भारतीय संविधानाने कॅनडियन संविधानातून कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला पुढील बाबतीत सल्लादायी अधिकारक्षेत्र प्रदान केले आहे.
1) कलम-143 (1)_सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाचा कायदा किंवा त्याविषयीची तथ्ये याबाबत प्रश्न निर्माण झाल्यास,
या बाबतीत सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपतींनी मागणी केल्यास असा सल्ला देऊ शकते किंवा पुरेसे कारण देऊन सल्ला देण्यास नकार देऊ शकते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो.
2) कलम-143 (2)_घटनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी अस्तिवात आलेले करार, तह तसेच सनद याविषयीचे वाद.
या बाबतीत राष्ट्रपतींनी मागणी केल्यास सर्वोच्च न्यायालयावर असा सल्ला देणे बंधनकारक ठरते, मात्र राष्ट्रपतींवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला बंधनकारक नसतो. राष्ट्रपतींनी कलम 143 (2) अंतर्गत आजपर्यंत एकदाही सर्वोच्च न्यायालयाकडून असा सल्ला मागितला नाही.