Ramesh Runwal - Economics @ramesh_runwal Channel on Telegram

Ramesh Runwal - Economics

@ramesh_runwal


Yashashrii Academy - UPSC आणि MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या जय्यत तयारीसाठी.

App- https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy


Youtube- https://youtube.com/@MPSC_with_Ramesh_Sir

Contact - 9028273501

Ramesh Runwal - Economics (English)

Are you preparing for competitive exams such as UPSC and MPSC? Look no further! Join the Telegram channel 'Ramesh Runwal - Economics' to get all the help and resources you need for a successful preparation.

Ramesh Runwal, a renowned educator, provides valuable insights and guidance on economics, a crucial subject for these competitive exams. With his expertise and experience, you can enhance your understanding of economic concepts and excel in your exam preparation.

Stay updated with the latest study materials, tips, and strategies to tackle the economics section of UPSC and MPSC exams effectively. Ramesh Runwal's channel is a one-stop destination for all your economics-related queries and study resources.

Don't miss out on this opportunity to boost your preparation and increase your chances of success in these competitive exams. Join the 'Ramesh Runwal - Economics' Telegram channel today and take the first step towards achieving your goals!

For more information and to connect with Ramesh Runwal, download the Yashashrii Academy app and subscribe to the YouTube channel. You can also reach out to him directly at 9028273501 for any further assistance.

Ramesh Runwal - Economics

11 Jan, 10:10


🔥पूर्व परीक्षा जवळ आलेली असताना सराव अत्यंत महत्त्वाचा...
या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्था व भूगोल या दोन विषयांच्या Comprehensive Tests सोडवू.

🎯 टेस्ट का द्यावी❓️❓️❓️

👉एका दिवसात विषयाची पूर्ण उजळणी होण्यास मदत.
👉परीक्षेला जाण्यापूर्वी आत्मविश्वास बळकट होईल.

तारीख - 22 जानेवारी 2025 (ऑनलाइन).

🟣 स्वरूप - प्रश्नपत्रिका व उत्तर तालिका PDF स्वरूपात दिल्या जातील, सोबत विश्लेषणाचा व्हिडिओ दिला जाईल.

मर्यादित कालावधीसाठी फीस मध्ये 40% सूट.

🔴 Use Code - SAMARPAN

Test Link -
https://yashashriiacademy.page.link/7GBwykXsVLq5e13YA

Ramesh Runwal - Economics

07 Jan, 04:03


🔴 अर्थव्यवस्थेतील तीन क्षेत्रांमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याबद्दल मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे.
🎯 हा गोंधळ सोडवण्यासाठी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मध्ये दिलेले हे स्पष्टीकरण उपयुक्त ठरेल.

1⃣ प्राथमिक क्षेत्र - पिके, पशुसंवर्धन, वने, मत्स्यव्यवसाय व खाणकाम.

2⃣ द्वितीयक क्षेत्र - वस्तूनिर्माण.
- वीज, वायू पाणीपुरवठा व इतर उपयोगिता सेवा, बांधकाम.

3⃣ तृतीयक क्षेत्र - व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स व उपाहारगृहे.
- रेल्वे व परिवहन.
- साठवण, दळणवळण व प्रसारणासंबंधीत सेवा.
- वित्तीय सेवा.
- सार्वजनिक प्रशासन व संरक्षण.
- स्थावर मालमत्ता, राहत्या घरांची मालकी व इतर व्यावसायिक सेवा.
- इतर सेवा

Join @ramesh_runwal

Ramesh Runwal - Economics

27 Dec, 03:34


🔥 आज पासून आपल्या Telegram चॅनलवर Prediction Series सुरू करत आहे.

🔴 यामध्ये तुमच्या परीक्षेच्या दिवसापर्यंत अर्थव्यवस्था व भूगोल या विषयांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न Poll स्वरूपात देण्यात येणार आहेत.

🎯 काळजीपूर्वक लक्ष ठेवा.

खूप शुभेच्छा.

Ramesh Runwal - Economics

26 Dec, 05:25


🔴 काही विद्यार्थ्यांकडे मूळ नोट्स असतील त्या नोट्स मध्ये दोन ठिकाणी सुधारणा करणे आवश्यक आहे.

1. पान नंबर 5 - राष्ट्रीय सांख्यिकी आयोग या बॉक्समध्ये पहिले अध्यक्ष - सुरेश तेंडुलकर असे करा

2. पान नंबर 7 - शेवटच्या ओळीमध्ये 1956 च्या पुढे "प्रमाणनिधी पद्धती ऐवजी किमान निधी पद्धत" असे करा

Ramesh Runwal - Economics

25 Dec, 14:41


🔴 संयुक्त पूर्वपरीक्षे साठी अत्यंत उपयुक्त ठरतील अशा अर्थव्यवस्था विषयाच्या मी स्वतः तयार केलेल्या मायक्रो नोट्स तुमच्या सर्वांसाठी देत आहे.

🔥 अपेक्षा करतो की या नोट्स 15 पैकी किमान 12 प्रश्न कव्हर करतील.

🎯 चांगली तयारी करा...

Join @ramesh_runwal

Ramesh Runwal - Economics

23 Dec, 08:27


#Combined गट ब नवीन परीक्षा तारीख : 2 फेब्रुवारी 2025

#Combined गट क नवीन परीक्षा तारीख : 4 मे 2025

🔴 वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा कालावधी - 26 डिसेंबर ते 6 जानेवारी.

Ramesh Runwal - Economics

17 Dec, 12:59


🔥 राज्यसेवा परीक्षा 2025

🌏 भूगोल वैकल्पिक विषय (Geography Optional Subject)

🔥 मार्गदर्शक - डॉ रमेश रुणवाल सर.
(UPSC चार मुख्य परीक्षा व मुलाखतीचा अनुभव)

🔴 भूगोल वैकल्पिक विषयाची (ऑफलाइन+ऑनलाईन) हायब्रीड बॅच लवकरच सुरू होत आहे...

(मर्यादित प्रवेश असल्यामुळे नावनोंदणी आवश्यक)

Download App -
https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

संपर्क-
https://wa.me/+919028273501/?text

Ramesh Runwal - Economics

17 Dec, 12:57


🔥 राज्यसेवा परीक्षा 2025

🌏 भूगोल वैकल्पिक विषय (Geography Optional Subject)

🔴 फायदे-
1. सामान्य अध्ययन पेपर-1 मध्ये जवळपास 130 मार्क्स.
2. निबंध लेखन पेपर मध्ये भूगोलाशी संबंधित निबंध बऱ्याच वेळा येतात.
3. मुलाखतीमध्ये देखील भूगोलाचा फायदा होतो.
4. अर्थव्यवस्था या घटकात भूगोलाचा संबंध.
5. मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय 500 मार्क्स साठी.

🎯 म्हणून हा विषय अत्यंत लोकप्रिय वैकल्पिक विषय बनला आहे.

(नवीन एखादा वैकल्पिक विषय घेऊन प्रयोग करत बसण्यापेक्षा पारंपारिक वैकल्पिक विषय जास्त चांगला रिझल्ट देतात)

Ramesh Runwal - Economics

09 Dec, 15:38


🔴 सध्याचे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची RBI चे 26 वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🟣 12 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा कार्यकाळ सुरू होईल. ते 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत.
त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आलेली आहे.

🔥 RBI कायदा 1934 च्या कलम 8-1(अ) नुसार केंद्र शासनाद्वारे गव्हर्नरची नियुक्ती केली जाते.
गव्हर्नर हा रिझर्व बँकेचा मुख्य कार्यकारी संचालक असतो तसेच मौद्रिक धोरण समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

Join @ramesh_runwal

Ramesh Runwal - Economics

05 Dec, 10:50


नमस्कार...

🔴 आपल्या नवीन कार्यालयासाठी एका पूर्णवेळ सहाय्यकाची आवश्यकता आहे.

कोणालाही अभ्यास करत करत काम करण्याची इच्छा असेल तर नक्की कळवा.

🔥 पात्रता -

1. इंग्लिश व मराठी टायपिंग चे ज्ञान.
2. MS EXCEL व PPT बनवणे यांचे साधारण ज्ञान.
3. माझ्यासमोर रोज सहा ते सात तास एका जागी बसून अभ्यास करण्याची तयारी😅.


☎️ संपर्क -

https://wa.me/+919028273501/?text

Ramesh Runwal - Economics

05 Dec, 09:38


नमस्कार मित्रांनो.

🔴 संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था आणि भूगोल या दोन विषयांच्या One Day Revision बॅचेस येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये नक्की होणार आहेत.

🔥 निश्चित तारीख व वेळ लवकरच कळवतो.


काळजी करू नका, अभ्यास करत रहा...

Ramesh Runwal - Economics

04 Dec, 15:47


#Class update...

आज अर्थव्यवस्था व भूगोल या दोन्ही विषयांच्या टेस्ट अपलोड केलेल्या आहेत.
Test no 5.

Ramesh Runwal - Economics

01 Dec, 09:41


🔴आपण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक बॅचमध्ये वचन देतो त्याप्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या या पेपर मध्ये देखील अर्थव्यवस्था विषयावरील एकूण 15 प्रश्नांपैकी 12 प्रश्न पूर्णपणे तंतोतंत आपल्या क्लासनोट्स व लेक्चर्स मधून सुटतात.

पुन्हा एकदा हा पेपर मनाला आनंद देऊन गेला.

खूप शुभेच्छा...😊

Ramesh Runwal - Economics

28 Nov, 10:50


🔴 राज्यसेवा 2025 साठी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली पाहिजे.
या तयारीमध्ये अनुभवी उत्कृष्ट मार्गदर्शकांची टीम तुमच्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल

🔴 ऑनलाइन+ऑफलाइन इंटिग्रेटेड बॅच लवकरच सुरू होत आहे

🔥 वर्णनात्मक पद्धतीच्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या मार्गदर्शकांकडून शिकूनच यशाचा राजपथ निश्चित करता येऊ शकेल...

🎯 मुख्य मार्गदर्शक - डाॅ.रमेश रुणवाल सर
- UPSC चार मुख्य परीक्षा व मुलाखतीचा अनुभव.
- कक्षाधिकारी - मंत्रालय 2015

संपर्क -
https://wa.me/+919028273501/?text

Ramesh Runwal - Economics

28 Nov, 07:53


🔴 Score Booster Test Series अंतर्गत अर्थव्यवस्था व भूगोल या दोन्ही विषयांच्या पहिल्या टेस्ट विश्लेषणाच्या व्हिडिओसह काल अपलोड करण्यात आलेल्या आहेत.
आज रात्री साडेसात वाजता दुसऱ्या क्रमांकाच्या टेस्ट विश्लेषणाच्या व्हिडिओसह अपलोड केल्या जातील.

पुढच्या चार दिवसांमध्ये पुढील क्रमाने टेस्ट होतील.

🔥 अर्थव्यवस्था
28 नोव्हेंबर - राष्ट्रीय उत्पन्न
29 नोव्हेंबर - मानव विकासाचे निर्देशांक
30 नोव्हेंबर - पैसा व चलनवाढ
1 डिसेंबर - चलनवाढ (भाग दोन)

🔥 भूगोल
28 नोव्हेंबर - जगाचा प्राकृतिक भूगोल (हवामान शास्त्र)
29 नोव्हेंबर - जगाचा प्राकृतिक भूगोल (भूरूपशास्त्र)
30 नोव्हेंबर - जगाचा प्राकृतिक भूगोल (नकाशा वाचन)
1 डिसेंबर - भारताचा प्राकृतिक भूगोल (भाग 1)

Ramesh Runwal - Economics

24 Nov, 03:54


🔴 भारतातील कृषी विमा ची उत्क्रांती


👉1979 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पिक विमा योजना सुरू करण्यात आली.

👉1985-86 - सर्वंकष पिक विमा योजना सुरू करण्यात आली.

👉1999-2000 - राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करण्यात आली.

👉2010-11 - सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात आली.

👉2016 - 13 जानेवारी 2016 पासून वरील सर्व योजनांच्या ऐवजी प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही सर्वसमावेशक योजना राबवली जाते.

Ramesh Runwal - Economics

23 Nov, 02:21


🔥 2024 च्या पूर्वपरीक्षा

🎯 राज्यसेवा पूर्वपरीक्षा- 1 डिसेंबर 2024
🎯 संयुक्त गट-ब पूर्वपरीक्षा- 5 जानेवारी 2025.
🎯 संयुक्त गट-क पूर्वपरीक्षा- 2 फेब्रुवारी 2025.

🔥 2025 च्या पूर्वपरीक्षा

🎯 राज्यसेवा पूर्वपरीक्षा- 28 सप्टेंबर 2025
🎯 संयुक्त गट-ब पूर्वपरीक्षा- 9 नोव्हेंबर 2025
🎯 संयुक्त गट-क पूर्वपरीक्षा- 30 नोव्हेंबर 2025

Join @ramesh_runwal

Ramesh Runwal - Economics

22 Nov, 14:03


🔴 MPSC परीक्षा वेळापत्रक वर्ष 2025.

🎯 आपल्या शरीरातील सर्व ऊर्जा एकवटून आता जोरदार तयारीला लागा.
2025 ची परीक्षा आपल्यासाठी शेवटची स्पर्धा परीक्षा ठरली पाहिजे.
या परीक्षेत आपली ड्रीम पोस्ट मिळवायचीच आहे...

Ramesh Runwal - Economics

20 Nov, 20:59


🔴 संयुक्त गट ब व क पूर्वपरीक्षा स्पेशल

🟣 Score Booster - Test Series

🔥 या पूर्वपरीक्षांमध्ये अर्थव्यवस्था व भूगोल या दोन विषयांत उत्कृष्ट मार्क मिळवण्यासाठी ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा.

🔥 Fees - 149 (प्रति विषय)

पहिले दोन दिवस या टेस्ट सिरीजची फीस रु. 99 (प्रति विषय).

Code - YASHSTAR


🎯 अर्थव्यवस्था - Score Booster Test Series

https://yashashriiacademy.page.link/BAAJmmCTwE2DT4HK8


🎯 भूगोल - Score Booster Test Series

https://yashashriiacademy.page.link/SosBXqr6f9A45sY98


Contact- 9028273501.

Ramesh Runwal - Economics

20 Nov, 10:33


🔥 लवकरच आपल्या अकॅडमीचे पूर्णवेळ कार्यालय व क्लासरूम सदाशिव पेठेमध्ये नवीन जागेत सुरू होत आहे...

🔴 ज्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाला आमच्या मार्गदर्शनाची साथ कायम मिळत राहील आणि यशाचा राजमार्ग निश्चित होऊ शकेल...

Ramesh Runwal - Economics

20 Nov, 02:59


🔴 आज लोकशाहीचा सर्वात मोठा सण.

एक कळकळीची विनंती - सर्वांनी मतदान करा.

🔥 पाच वर्षातून एक दिवस राज्याला आपली गरज असते. बाकीचे सर्व दिवस आपण आपलं आयुष्य जगू शकतो, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतो. पण या एक दिवशी आपण आपले कर्तव्य बजावून एक कार्यक्षम शासनास सत्ता सोपवली तर पुढील पाच वर्षे राज्याचा अखंड व वेगवान विकास होऊ शकेल.

एक दिवस चूक करून पाच वर्षे पश्चाताप करत राहणे यामध्ये शहाणपण नाही.

Ramesh Runwal - Economics

10 Nov, 03:50


🔴 संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा स्पेशल

🏆 Score Booster

टेस्ट सिरीज...

🎯 अर्थव्यवस्था आणि भूगोल या दोन विषयांच्या सराव टेस्ट घेण्याचे नियोजन केले आहे.

🔴 दोन्ही विषयांच्या प्रत्येकी 25 टेस्ट असतील. प्रत्येक टेस्टमध्ये साधारणपणे 20 प्रश्न असतील.

🟣 शुल्क - फक्त 99 रुपये (प्रति विषय).

लवकरच या टेस्ट ॲप वर उपलब्ध होतील.

🎯 स्वरूप - PDF स्वरूपात प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणारा व्हिडिओ.

खूप शुभेच्छा...😊

Ramesh Runwal - Economics

03 Nov, 14:15


🔴 आपल्या ॲपवरील 15 दिवसीय Intensive Revision Programme हा कोर्स येणाऱ्या पूर्वपरीक्षांसाठी नक्की करा.

🔥 त्यामुळे कमीत कमी वेळेत अर्थव्यवस्था व भूगोल या दोन विषयांची उत्कृष्ट तयारी होईल आणि भरपूर मार्क्स मिळवण्याचा मार्ग निश्चित होईल...💥



🎯 अर्थव्यवस्था Intensive Revision Programme-

https://yashashriiacademy.page.link/vkAaz1VyqJPkxG8E9


🎯 भूगोल Intensive Revision Programme-

https://yashashriiacademy.page.link/Lrk6FZqsswdVPAQr5

Ramesh Runwal - Economics

03 Nov, 06:04


🔴 महारत्न कंपन्या

🎯 सध्या देशामध्ये 14 महारत्न कंपन्या आहेत.

1. BPCL- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
2. BHEL- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
3. GAIL- गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
4. SAIL- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
5. ONGC- ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
6. NTPC- नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड
7. IOC- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
8. CIL- कोल इंडिया लिमिटेड
9. HPCL- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
10. OIL- ऑइल इंडिया लिमिटेड
11. PGCIL- पाॅवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
12. PFC- पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन
13. REC- रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन
14. HAL- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड.

🔥 यांच्या व्यतिरिक्त सध्या देशामध्ये 24 नवरत्न, 51 मिनीरत्न-I व 11 मिनीरत्न-II कंपन्या अस्तित्वात आहेत.

🎯 IMP - महारत्न कंपन्यांची यादी पाठ करणे आवश्यक आहे.

Join @ramesh_runwal

Ramesh Runwal - Economics

31 Oct, 18:57


तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🍫💐
❤️ दीपावलीचा हा सण तुमच्या आयुष्यात यशाचा अखंड प्रकाश घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...


शुभ दिपावली...🎉🔥

Ramesh Runwal - Economics

29 Oct, 03:39


🎉स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी यश, सामाजिक सन्मान आणि समाजसेवा करण्याचे समाधान हेच सर्वात मोठे धन आहे.
तुमच्या सर्वांच्या आयुष्यात या धनाची आणि समृद्धीची भरभराट होवो हीच ईश्वराकडे प्रार्थना 🙏

तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबीयांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा...😊💐🍫

धनवान व्हा... यशस्वी व्हा...😊🏆

Ramesh Runwal - Economics

28 Oct, 17:53


कालच्या Intensive Revision Programme मधील लेक्चर मध्ये आपण "मॉन्सून चे आगमन आणि मॉन्सूनचा परतीचा प्रवास" या दोन टॉपिक्सवर चर्चा केली. त्याच्याशी संबंधित या दोन आकृत्या उपयुक्त ठरतील.

वेगवेगळ्या ट्रिक्सच्या साह्याने विशिष्ट तारखांची स्थिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

Ramesh Runwal - Economics

28 Oct, 06:41


मान्सूनचे आगमन...

Ramesh Runwal - Economics

28 Oct, 06:41


मान्सूनचा परतीचा प्रवास...

Ramesh Runwal - Economics

26 Oct, 09:27


🎉 तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा...🎉

🔴 दीपावलीनिमित्त ॲप वरील सर्व कोर्सेस वर आकर्षक सवलत "Mega Offer"...

💥वेगवेगळ्या कोर्सेस वर वेगवेगळा डिस्काउंट देण्यात आला आहे.

🔥 या मेगा ऑफर चा निश्चित फायदा करून घ्या...

🎯 Use Code - YASHDEEP

Ramesh Runwal - Economics

16 Oct, 05:18


## कृषी अर्थव्यवस्था ##

🔴 जमीन धारणेनुसार शेतकऱ्यांचे वर्गीकरण


सीमांत शेतकरी - 1 हेक्टर पेक्षा कमी
लघु शेतकरी - 1 ते 2 हेक्टर
अर्धमध्यम शेतकरी - 2 ते 4 हेक्टर
मध्यम शेतकरी - 4 ते 10 हेक्टर
मोठे शेतकरी - 10 हेक्टर पेक्षा जास्त

Join @ramesh_runwal

Ramesh Runwal - Economics

14 Oct, 15:34


🔴 संपूर्ण भूगोल विषयाच्या नोट्स आज अंतिमतः उपलब्ध झाल्या आहेत हे सांगताना पण मला खूप आनंद होतोय.

🎯 आपल्या ॲपवरील कोणत्याही भूगोल कोर्समध्ये जाऊन संपूर्ण भूगोल (Complete Geography) नावाची फाईल डाऊनलोड करता येईल.
या नोट्स सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

🔥 ॲपवरून डाऊनलोड करून या नोट्स प्रिंट काढून घेता येतील.

चांगली तयारी करा.
खूप शुभेच्छा...😊

App Link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

Ramesh Runwal - Economics

13 Oct, 11:01


🔴 यशश्री अकॅडमी, पुणे

राज्यसेवा व संयुक्त पूर्वपरीक्षा स्पेशल बॅच...!

🔴 अर्थव्यवस्था व भूगोल

🔥 15 दिवसीय Intensive Revision Programme (Online+Offline)

सुरुवात: 14 ऑक्टोबर पासून

🎯 मार्गदर्शक - डॉ. रमेश रुणवाल
(STI, कक्षाधिकारी)

🟣 मर्यादित प्रवेश, नावनोंदणी आवश्यक

App Link- https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

Offline class- यशश्री अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, बेसमेंट पार्किंग, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे.

संपर्क- https://wa.me/+919028273501/?text

Ramesh Runwal - Economics

12 Oct, 08:16


🔴 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीला नुकताच महारत्न दर्जा दिला गेला आहे.

🎯 म्हणून महारत्न कंपन्यांची संख्या वाढून आता 14 इतकी झालेली आहे...

Ramesh Runwal - Economics

12 Oct, 04:33


🔴 तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना विजयादशमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.😊

🔥तुमच्या आयुष्यात देखील असाच विजयाचा दिवस लवकरात लवकर येवो अशीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. 😊🙏

🎯 आजच्या या सोनेरी मुहूर्तावर आपल्या ॲपवरील सर्व बॅचेस वर 30% सूट देण्यात आली आहे.

Use Code - VIJAYADASHAMI

Ramesh Runwal - Economics

10 Oct, 18:49


🔴 1 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी शिल्लक राहिलेल्या 45 दिवसांचे उत्कृष्ट नियोजन कोणत्या प्रकारे करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत.

🎯 वेळ - सकाळी 8:45 वाजता



https://youtube.com/live/lhkIQ3H_434?feature=share

Ramesh Runwal - Economics

10 Oct, 17:42


संयुक्त गट 'ब' व गट 'क' परीक्षा 2024 तसेच 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी आवर्जून पहावे.

हे 1 तास 26 मिनिट तुमच्या अभ्यासाची दिशा आणि गती दोघांमध्ये निश्चितपणे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतील.


https://youtube.com/live/FYHi4J2Mmq8?feature=share

Ramesh Runwal - Economics

09 Oct, 14:12


🔴 अराजपत्रित गट क संवर्गासाठी संयुक्त परीक्षा

एकूण - 1333 पदे

🎯 पूर्वपरीक्षा दिनांक - 2 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याचा कालावधी - 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2024

Ramesh Runwal - Economics

09 Oct, 14:06


अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' संयुक्त परीक्षा

'सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम' या घटकावर उद्या सकाळी Youtube वर लाईव्ह लेक्चर घेणार आहे.

लिंक लवकरच शेअर करतो.

विचार करण्यात जास्त वेळ घालवू नका उद्या सकाळी लेक्चर मध्ये सविस्तर चर्चा करूया.
आता लढाईसाठी सज्ज व्हायचं आहे...

Ramesh Runwal - Economics

09 Oct, 13:58


🔴 अराजपत्रित गट ब संवर्गासाठी संयुक्त परीक्षा

एकूण - 480 पदे

ASO - 55
STI - 209
PSI - 216

🎯 पूर्वपरीक्षा दिनांक - 5 जानेवारी 2025

अर्ज करण्याचा कालावधी - 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2024

Ramesh Runwal - Economics

09 Oct, 12:39


अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' संवर्गातील पदांसाठी आता दोन वेगवेगळ्या स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातील.

त्यानुसार दोन्ही परीक्षांसाठी वेगवेगळ्या जाहिराती लवकरच आयोगाद्वारे प्रकाशित केल्या जाणे अपेक्षित आहे...

दोन्ही परीक्षांसाठी अभ्यासक्रम मात्र समानच असेल.

Ramesh Runwal - Economics

09 Oct, 09:11


🔴 अर्थव्यवस्था 15 दिवसीय Intensive Revision Programme

https://yashashriiacademy.page.link/K38LZkevomWWwooi7

🔴 भूगोल 15 दिवसीय Intensive Revision Programme

https://yashashriiacademy.page.link/BpDuqE8mnMt4AxsQ7

⭐️ 12 ऑक्टोबर पर्यंत या कोर्सेसना प्रवेश घेतल्यास फीस मध्ये 20% सूट मिळू शकेल.

🟣 Code - PARAKRAM

Ramesh Runwal - Economics

05 Oct, 14:53


🎯 जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे -


🔴 जगातील सर्वाधिक आनंदी देश
1.फिनलँड
2.डेन्मार्क
3.आईसलँड
4.स्वीडन
5.इजराइल

🔴जगातील सर्वात कमी आनंदी देश 143.अफगाणिस्तान
142.लेबनन
141.लिसोथो
140.सीएरा लिऑन

📌 143 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक - 126

🎯 सातत्याने सातव्यांदा फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

Join @ramesh_runwal

Ramesh Runwal - Economics

05 Oct, 11:31


अहमदनगर नाही आता अहिल्यानगर...!!

Ramesh Runwal - Economics

05 Oct, 06:42


स्पर्धा परीक्षेची तयारी करताना PYQ विश्लेषणास अतिशय जास्त महत्त्व आहे.

PYQ विश्लेषण करणे म्हणजे नेमके काय करणे याबद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते. त्यांना थोडीशी कल्पना मिळावी यासाठी मी केलेले विश्लेषणाचे काही प्रश्न पाठवत आहे.

अपेक्षा करतो की या विश्लेषणातून तुम्हाला कल्पना येईल आणि विषयांचा अभ्यास करताना तुमच्या आत्मविश्वासात भरघोस वाढ होईल...

Join @ramesh_runwal

22,256

subscribers

150

photos

4

videos