Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar @ncp_speaks Channel on Telegram

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

@ncp_speaks

Official Telegram Handle of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (English)

Are you passionate about politics and looking for a platform to stay updated on important political developments in India? Look no further than the Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Telegram channel! This channel, with the username @ncp_speaks, is the official handle of the Nationalist Congress Party led by the respected leader, Sharadchandra Pawar.

The Nationalist Congress Party, also known as the NCP, is a prominent political party in India with a strong presence in Maharashtra. Founded in 1999, the party stands for principles of social justice, democracy, and secularism. Under the leadership of Sharadchandra Pawar, the NCP has played a significant role in national politics and has been a vocal advocate for the rights of farmers, the marginalized, and other vulnerable sections of society.

On the NCP - Sharadchandra Pawar Telegram channel, you can expect to find regular updates on the party's activities, press releases, policy announcements, and insights into key political issues facing the country. With a dedicated team of administrators curating content, you can trust that you will receive accurate and reliable information straight from the source.

Joining the NCP - Sharadchandra Pawar Telegram channel is a great way to connect with like-minded individuals who share your passion for politics and social change. Engage in discussions, share your views, and stay informed about the latest developments in Indian politics through this dynamic and interactive platform.

Whether you are a supporter of the Nationalist Congress Party or simply interested in staying informed about political developments in India, the NCP - Sharadchandra Pawar Telegram channel is the go-to destination for all your political news and updates. Join today and be a part of the conversation!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

20 Nov, 13:52

धन्यवाद महाराष्ट्र..!

#लढा_स्वाभिमानाचा

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

20 Nov, 12:11

मतांसाठी लाडक्या बहिणीचे गोडवे गायचे तर कधी त्याच राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांशी विशेषत: महिला अधिकाऱ्यांशी शेलक्या भाषेत बोलणं करायचं ही वागणूक अक्षम्यच. राज्यतील महिला पोलिस या सत्ताधाऱ्यांची लाडकी बहिण नाही का हे त्यांनी स्पष्ट केलच पाहीजे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

20 Nov, 08:55

अंबाजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघात संविधान विरोधी घटकांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड केली आणि निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

20 Nov, 08:47

लोकसभा निवडणुकीत केलेला गदारोळ इंदापूरकर विसरलेले नाहीत. पुन्हा विधानसभेतही तशीच अरेरावीची भाषा आणि दमदाटी ही इथल्या आमदाराकडून होतेय हे खेदजनक आहे. हे दबावतंत्र लोकशाही स्वीकारणार नाही.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

20 Nov, 08:39

लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणारे धनंजय मुंडे गटाचे गुंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण करतात हे निंदनीय आहेच पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे. अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

20 Nov, 07:56

परळीत लोकशाहीला धक्का आणि हुकुमशाहीने शिक्का?

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

20 Nov, 07:17

राज्यातील कायदा सुव्यवस्था ऐवढी थंड झालीये की थेट विधानसभेचे उमेदवार आणि एक लोकप्रतिनिधी उघडपणे जीवे मारण्याची धमकी देतात. एवढा उन्माद कोणाच्या जीवावर होतोय याचा खुलासा होणे आणि अशा बेजबाबदार उमेदवारावर कठोर पोलिस कारवाई होणे ही सुजाण मतदारांची माफक अपेक्षा आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 16:06

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 12:17

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार पक्का केलेल्या योद्ध्याचा मागील पाच वर्षातला मागोवा.

ठरवा आता, कारभारी कोण आणि कारभार कोणाचा उठवायचा?

#Flashback #2023TO2024 #अथक_संघर्षाचा #अविरत_प्रवासाचा #२०१९_२०२४

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 11:31

पुन्हा पवार साहेब, पुन्हा परिवर्तन...! #लढा_स्वाभिमानाचा #शरद_पवार_पुन्हा

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 09:25

कोरोना काळात डॉक्टर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्याही आधी देवेंद्र फडणवीसांचा पुतण्या 'तन्मय फडणवीस' ने लसीचा लाभ मिळवला.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 09:21

महिलांविरोधात अतीशय खालच्या पातळीवर टिका करणाऱ्यांची पाठराखण

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 09:18

२२ अब्जाधिशांचं १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करून कर्जबुडव्यांची पाठराखण !

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 09:09

८ शेतकऱ्यांचं हत्याकांड घडवून केला हुकूमशाही कारभार, तोच आमचा उमेदवार

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 09:06

महिलांचे शोषण आणि महिला अत्याचार, महिलांवर करतो अन्याय तोच आमचा उमेदवार !

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

18 Nov, 09:04

भ्रष्टाचार करून भाजपमध्ये सामील व्हायचे गुजरातच्या वॉशिंग मशीनने घोटाळे धुऊन घ्यायचे!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

17 Nov, 16:17

📍महायुतीची पोलखोल मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पण मराठी शांळांचे काय

संपूर्ण पथनाट्य पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: https://youtu.be/D-8c9w-jqGU

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

17 Nov, 14:30

उज्ज्वल भविष्यासाठी महिन्याला ₹४,००० म्हणजेच वर्षाला ₹४८,००० हा पवार साहेबांचा शब्द..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

17 Nov, 14:16

मोफत एस. टी. चा प्रवास म्हणजेच महिन्याला ७०० ते १००० रुपयांची बचत हा पवार साहेबांचा शब्द..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

17 Nov, 14:00

₹३,००० महिन्याला म्हणजे वर्षाला ₹३६,००० मिळणार हा पवार साहेबांचा शब्द..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 11:38

महाराष्ट्रातील जनता विरोधात मतदान करून महायुतीचा आवाज कायमचा बंद करणार !

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 11:25

१८% जीएसटीच्या नावाने सर्वसामान्यांची लुबाडणूक करणाऱ्या महायुतीला आता घरचा रस्ता दाखवू

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 10:58

८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा कांगावा करण्याची ढोंगी वृत्ती महाराष्ट्रातील जनता हाणून पाडणार.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 10:24

महायुतीनेेच रचला महाराष्ट्राला मागे टाकण्याचा कट

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 10:17

७० वर्षात जे झाले नाही ते झाला, रुपयाच्या तुलनेत डॉलरची विक्रमी वाढ

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 09:56

जन्माला येणाऱ्या लहान मुलांवरही यांनी कर्ज करून ठेवले आहे

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 09:37

महायुतीने प्लेटफॉर्मवर उभं राहणंही महाग करून ठेवले आहे

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 08:53

१० वर्षात पेट्रोल डिझेलच्या दरात इतकी वाढ केली की जनतेला काहीच परवडत नाही

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 08:38

ओवाळणीनंतर लाडक्या बहिणीने मायेने दिलेला पेढा फेकणं हीच का भाजपाची संस्कृती ?

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 08:25

स्वतःसाठी ८५० रुपयांचे पाणी, जनता फिरते अनवाणी

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 07:44

५० रुपये न दिल्याच्या रागातून दुकानदारावर हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाते याला जबाबदार फडणवीसांचा गृहविभागच आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 07:09

शिवछत्रपतींच्या रूपाने दिल्लीच्या मग्रूर तख्ताला आव्हान देणारा, देशाच्या संरक्षणासाठी पानिपतच्या रणभूमीमध्ये रक्त सांडलेला, संकटकात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री म्हणून धावून गेलेला, फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राची महायुती सरकारने काय अवस्था केली.. शिवशिल्पाचा आणि महापुरुषांचा अपमान, वाढते महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगार, महागाई, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराचे आगार...आपल्याला असाच महाराष्ट्र हवा आहे का..?
नाही ना..तर मग चला महाराष्ट्राचं गत वैभव पुन्हा प्राप्त करूया आणि हाताच्या बळकट पंजात महाराष्ट्र धर्माची मशाल पेटवून स्वाभिमानाची तुतारी वाजवूया..!!
# शरदाची हाक_तुमची साथ _महाराष्ट्राचा विकास..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16 Nov, 06:18

नाटकवेड्या मराठी माणसासमोर मांडत आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाची पोलखोल... तेही अस्सल मराठमोळ्या नाट्यशैलीत !

https://youtu.be/D-8c9w-jqGU

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

15 Nov, 17:45

नागपूरकर व पुणेकर हक्क मागणार महायुतीला जाब विचारणार !

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

15 Nov, 17:39

विद्येचं माहेरघर झालं, गँगस्टरांचं शहर गृहमंत्री फडणवीसांनी जनतेचा जीव धोक्यात घातला.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

15 Nov, 17:35

सर्वसामान्य पुणेकरांवर भितीदायक वातावरणात जगण्याची वेळ महायुती सरकारने आणली.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

15 Nov, 17:19

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जनता असुरक्षित ठाणेकर जनताच आता महायुतीला सत्तेपासून असुरक्षित करणार.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

15 Nov, 17:15

गृहमंत्री फडणवीसांच्या काळात ड्रग्ज तस्करीत वाढ 'उडता महाराष्ट्र' होऊ द्यायचा नसेल तर महायुतीला सत्तेतून बाहेर काढायला हवं.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 10:37

सरकारने १५०० रुपये दिले पण महागाई बेसुमार वाढवली ही गरीब माता-भगिनीची व्यथा न समजू शकणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर.. निषेध.. निषेध..निषेध..!!
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 10:30

लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले पण महागाईच्या रूपाने दुप्पट वसूलही केले. येत्या २० नोव्हेंबरला महायुतीच्या या दुटप्पीपणाला राज्यातील माता-भगिनी गाडून टाकतील हे नक्की.
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 10:19

खते,अवजारांवरील 'जीएसटी' मुळे बळीराजाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.महागाईमुळे माता-बहिणी चिंतेत आहेत. असे जनविरोधी महायुती सरकार काय कामाचे.?
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 09:54

गुजरातची चाकरी करणाऱ्या महायुती सरकारने
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवले आणि राज्यातील युवकांच्या हक्काची भाकरी पळवली. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील युवक हे लक्षात ठेवतील.
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 09:31

पक्ष फोडले, चिन्हं पळवली,आणि सत्ता स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा महाराष्ट्रद्वेषी दिल्लीपतीशी सौदा केला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्रद्रोही महायुतीला कधीही माफ करणार नाही.
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 08:48

मातीत राबणाऱ्या लोकांनी आता ठरवलंय महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणाऱ्या आदरणीय पवारसाहेबांच्या लढ्यात सोबत करायची... प्रत्येक घरोघरी आता फक्त तुतारी !

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 08:33

सोयाबीनला ६००० रुपये भाव मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन छेडणारे आज ३५००-४००० रुपये भाव देतायत. शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो..!
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 08:21

आम्ही कांदा पिकवला पण नतद्रष्ट महायुतीने कांद्याला योग्य भाव मिळवून दिलाच नाही. येत्या २० नोव्हेंबरला सुजाण मतदारराजा महायुतीकडून आपल्या बळीराजाच्या अश्रुंची किंमत चुकती करणार म्हणजे करणारच.
#हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 08:05

शेती मालाला भाव नाही पण रासायनिक खतांच्या किमती मात्र वाढतायत.बळीराजाच्या आयुष्याशी खेळणाऱ्या निगरगट्ट महायुती सरकारला राज्यातील जनता माफ करणार नाही.
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 07:46

सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकलणाऱ्या भ्रष्ट महायुतीला २० नोव्हेंबरला जनतेच्या दरबारात प्रायश्चित्त घ्यावेच लागेल.
# हक्क मागतोय महाराष्ट्र.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 06:04

कट, हत्या, निष्ठुर चौकश्या, निष्पाप गर्भपात, तुरुंगवास... एखाद्यचं राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी कल्पनेपलीकडची कटकारस्थानं...एका निर्दयी षडयंत्राचं वास्तव !

#लघुपट #MaharashtraPolitics #AnilDeshmukh

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

05 Nov, 05:47

हफ्ते घ्या, हफ्ता मिळाला का? आणि यासंबंधी अनेक वल्गना वारंवार बिंबवून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय-भगिनीचा स्वाभिमान या महायुती सरकारने ठेचला. महिलांच्या घरखर्चात महागाई करून यांनी एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने लुबाडलाचं आहे. चला शिकवूया यांना धडा या २० नोव्हेंबरला.

आपल्या हिताचं सरकार आणूया!!
महाविकास आघाडीला बळ देऊया!!!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

04 Nov, 16:18

महाराष्ट्रातील युवकांच्या हक्काचे उद्योग प्रकल्प हे इतर राज्यात वळते करून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम महायुती सरकारने केलं. आता राज्यातील बेरोजगार युवा येत्या २० नोव्हेंबर रोजी महायुतीला मतदानातून धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

04 Nov, 13:14

कागलवासियांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम हसन मुश्रीफ यांनी केलं. सत्तेसाठी जनतेच्या भावनांशी खेळणा-या महायुती सरकारला जनता २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत नाकारणारच.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

04 Nov, 13:02

पाठीत खंजीर खुपसणा-यांना कागलची स्वाभिमानी जनता जागा दाखवून देणार. कागल विधानसभा मतदारसंघातील जनता कागलमध्ये परिवर्तन घडणार...

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

04 Nov, 12:29

एकीकडे लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणाचे फक्त गोडवे गायचे आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या प्रचारसभांना गर्दी जमवून मतं मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना नाचायला लावायचं काम महायुती सरकार करत आहे. महिलांबाबत महायुतीची खोटी सहानुभूति येत्या २० नोव्हेंबरला जनता हाणून पाडणार.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

04 Nov, 12:15

महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी देऊन दिल्लीची चाकरी करण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांचा ढोंगीपणा उघड झाला असून जनता या खोटेपणाला उत्तर येत्या २० नोव्हेंबरला महायुतीला मतदानातून नाकारून देणार हे मात्र नक्की!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

04 Nov, 06:42

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभही धुडकावण्याची वृत्ती स्विकारणारे महायुतीचे हे घटक आहेत. दडपशाही मार्गाने आपल्या सत्तेची मस्ती दाखवणाऱ्यांचा पापाचा घडा भरतोय. त्याचा हिशोब २० नोव्हेंबरला जनता मतपेटीतून करणार.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

04 Nov, 05:32

दादाचा उरला नाही वादा,
लाडक्या बहिणींसाठी आणली यांनी बाधा...
भोंगळ कारभाराने त्रस्त झालेली बहीण मदमस्त महायुती सरकारला धडा शिकवणार, येत्या २० नोव्हेंबर रोजी महायुतीला कायमचं घरी पाठवणार!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 10:11

महायुतीचं विमान हे कायम गुजरातमार्गे दिल्लीला जातं... गुजरात आणि दिल्लीची चाकरी करण्यातच महायुती सरकार पुरतं रममाण झालं आहे. या सत्तालोभी महायुतीने महाराष्ट्राला भोपळा दिला आहे आणि हाच भोपळा आपल्याला येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानातून फोडायचा आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 09:53

लाडक्या बहिणींना रोज जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे. महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करणा-या महायुती सरकारला थारेवर आणायलाच हवं. येत्या २० नोव्हेंबरला जनता महायुतीला मतदानातून नाकारणार हे पक्कं आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 09:19

महायुतीच्या शेतकरीविरोधी आणि गलथान कारभारामुळे सर्वसामान्य कापूस उत्पादक शेतक-याच्या मनात आत्महत्येचा विचार येणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आता हाच शेतकरीराजा महायुतीला येत्या २० नोव्हेंबर रोजी नाकारून धडा शिकवणार. महायुतीविरोधात बळीराजाचा आवाज बुलंद करण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि 'हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 08:31

महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी देण्याचा महायुती सरकारचा पवित्रा कायम आहे. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षात महाराष्ट्राला पाठीमागे टाकून गुजरात राज्याला मात्र आर्थिक विकासात पुढे नेण्याचं पाप भाजपने केलेलं आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 07:44

महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे पुरते मोडले गेले असून. गोरगरीब नागरिक अक्षरशः भुईसपाट झाला आहे. परंतु २० नोव्हेंबरला ही परिस्थिती बदलण्याची वेळ आहे. महागाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जनता महायुतीला नाकारणारच.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 07:25

मेट्रोची कामे ठप्प ठेवून वाहतूक कोंडीला बळ देण्याचं काम महायुती सरकार करत आहे. महायुती सरकारचा कारभार हा अत्यंत गलथान असून या गलथान कारभाराविरोधात स्वाभिमानी महाराष्ट्र आवाज उठवणारच.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 07:02

महिला अत्याचाराच्या प्रश्नांची गंभीर दखल घेण्याऐवजी सुरक्षेची मागणी करणाऱ्या लाडक्या बहिणींना कारवाईची नोटीस देणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो..! धिक्कार असो..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 06:17

युतीच्या गैरधोरणांमुळे अनर्थ घडला. राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्राने नेहमीच आर्थिक क्षेत्रात आघाडी घेतली, पण गेल्या दशकभरापासून राष्ट्रीय पातळीवर सकल राज्य उत्पादनाच्या वाट्यात महाराष्ट्राची 15% वरून 13% अशी घट झाली. हा निष्कर्ष युतीच्या कोणत्याही विरोधकांचा नव्हे तर खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा आहे. बाकी, समझने वालों को इशारा काफी है!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

02 Nov, 04:37

सत्तेसाठी झाले लाचार, दिल्लीपुढे झुकलंय सरकार
स्वाभिमानी महाराष्ट्र हाणून पाडणार महायुतीचा कारभार!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

01 Nov, 11:30

महायुती सरकारचं रॉकेट फुसकं निघालं असून, महाराष्ट्राला मात्र भोपळा मिळाला आहे. गुजरातची चाकरी करून महाराष्ट्राला महायुतीने दिलेला हा भोपळा आपल्याला येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानातून फोडायचा आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

01 Nov, 04:50

दिल्लीपुढे महाराष्ट्राची प्रतिमा ढासळवून टाकणा-या महाराष्ट्रद्रोह्यांचा भोपळा फोडूयात,
एकजुटीने आता निवडणुकीतून नाकारून महायुतीचा टप्प्यात कार्यक्रम करूयात!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

01 Nov, 04:05

लक्ष्मीपूजन दिवशी 'समृद्धी आणि ऐश्वर्य' यांचं प्रतीक असलेल्या लक्ष्मीचं पूजन केलं जातं पण सत्ताधारी महायुतीने आपल्या धनसंपन्न महाराष्ट्राचं दिवाळं काढलं, कर्जबाजारी केलं... ही परिस्थिती बदलायला हवी. महाराष्ट्राला पुन्हा समृद्ध करायचंय, महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा मिळवायचं आहे ! #महाराष्ट्रधर्म #राष्ट्रवादी_पुन्हा #शरद_पवार_पुन्हा

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 15:11

लाडक्या बहिणींना योजना नाही तर सुरक्षा हवी होती. परंतु महायुती सरकार माताभगिनींची सुरक्षा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं. लाडक्या बहिणींचा जीव धोक्यात घालण्याचं काम महायुती सरकारने केलं. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि 'हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 14:57

महायुती सरकारने दिल्लीची लाचारी करता करता महाराष्ट्रातील युवकांच्या हक्काचे रोजगार गुजरातसारख्या भाजपशासित राज्यात पाठवले. महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांचे पंख छाटण्याचं काम महायुती सरकारने केलं. युवकांसाठी हक्काचा रोजगार निर्माण करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि 'हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 11:58

हे बघा... महायुतीचं ढासळलेलं आर्थिक नियोजन.. आपल्या सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी ३ लाख कामगारांची दिवाळी अंधारमय करणाऱ्या महायुती सरकारचा..निषेध.. निषेध.. निषेध..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 11:47

ज्या विभागाचे आपल्याकडे अधिकार नाहीत अशा गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कृती कायद्याची पायमल्ली करणारी आहे आणि तसंही संविधानविरोधी भाजपाच्या दावणीला बांधलेल्या एकनाथ शिंदेंकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची..?

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 11:05

भाजपच्या गुंडशाही कारभाराचा शंखनाद करणाऱ्या यांच्या सहकाऱ्यांची गुर्मी एवढी वाढली आहे, की यांना ना कायद्याचा धाक, ना जबाबदारीची जाणीव उरलीये.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 10:57

कापसाला योग्य हमीभाव देण्यात महायुती सरकार पुरतं अपयशी ठरलं आहे. कापूस उत्पादक शेतक-याच्या कष्टावर नांगर फिरवून त्याला उध्वस्त करणा-या महायुती सरकारला जनता येत्या विधानसभा निवडणुकीत नाकारून धडा शिकवणार.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 10:44

महायुतीकडून राबवण्यात येणा-या योजना या निव्वळ भ्रमाचा भोपळा असून सर्वसामान्यांना आर्थिक संकटातून तारण्यासाठी कुठलीच पावलं महायुती सरकारकडून उचलण्यात येत नाहीत. सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि 'हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

31 Oct, 10:34

महागाईमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. गोरगरीब कुटुंब ही अनेक आव्हानांशी सामना करत आहेत, आणि याला सर्वस्वी जबाबदार महायुती सरकार आहे. महागाईच्या जाचातून सर्वसामान्यांची मुक्ती करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि 'हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 17:19

मुंबईत येऊन केवळ प्रसिध्दीगिरी करायची आणि सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला टाकायचा हेच काम केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव करत आहेत. सत्ताधा-यांच्या या स्वार्थी वृत्तीला महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर देणार.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 15:42

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु मुंबईत येऊन फक्त भाजपसाठी मतं गोळा करण्यापलीकडे वैष्णव यांनी काहीच केलं नाही. रेल्वे प्रवाशांच्या माथी केवळ जीवघेण्या समस्या लादण्याचंच काम वैष्णव केलं.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 13:09

योग्य हमीभावापासून शेतकऱ्याला दूर ठेवण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. बळीराजाच्या कष्टाची थट्टा करणाऱ्या महायुती सरकारला थांबवायलाच हवं... बळीराजाचा सन्मान करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 12:26

कृपया प्रसिद्धीसाठी...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 11:47

ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाई करून सर्वसामान्यांचे दिवाळे काढण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. संसाराचा रहाटगाडा चालवणा-या माताभगिनींना आर्थिक संकटात टाकणा-या महायुती सरकारला थांबवायलाच हवं... महागाई कमी करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 11:02

सर्वसामान्यांना वा-यावर टाकून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम महायुती सरकार करत आहे. योजनांच्या नावाखाली फसवणूक करणा-या महायुती सरकारला थांबवायलाच हवं... मायमाऊलींचा सन्मान करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 09:57

महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत झालेला भ्रष्टाचार महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. महाराजांच्या पुतळ्याचेही निकृष्ट बांधकाम करणा-या महायुती सरकारला सत्तेत येण्यापासून रोखायलाच हवं. शिवछत्रपतींच्या विचारांचा अभिमानाने जागर करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 09:41

आरोग्य, महिला सुरक्षा, हमीभाव, रोजगार या मूलभूत गरजांना डावलून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या महायुती सरकारचा जनहिताचा खोटा बुरखा जनताच २० नोव्हेंबरला फाडेल..!!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 08:22

सर्वांगीण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, कष्टक-यांच्या उन्नतीसाठी, स्वाभिमानी महाराष्ट्राच्या हक्कासाठी!
राष्ट्रवादी पुन्हा, शरद पवार पुन्हा...!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 07:41

जनतेचा जीव कवडीमोल समजून राज्यकारभारात व्यस्त राहणं ही सत्ताधा-यांची वृत्ती राहिलेली आहे. आता याच स्वार्थी वृत्तीविरोधात निर्णय घ्यायचा आहे. यासाठी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकजुटीने जनता सत्तालोभी महायुती सरकारला घरी पाठवणार हे ठरलेलं आहे!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

27 Oct, 04:31

जे काकांचे नाही झाले,
ते लोकांचे काय होणार?

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 17:32

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ॲड. ज्ञायक पाटणी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.

सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे व प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे देखील उपस्थित होते.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 11:40

कृपया प्रसिद्धीसाठी...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 11:27

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे नाशिक महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्ञानेश्वर गामणे, माजी नगरसेवक विजय सानप, बाळासाहेब घात्रक, प्रमोद पालवे, पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते, शरद बोडके, प्रतिक पगार व विकास दरगोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला.

सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माननीय आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, संसदरत्न खासदार माननीय डॉ. अमोल कोल्हे व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडीत कांबळे हे देखील उपस्थित होते.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 08:38

नोकऱ्या न्हायती म्हून लग्न हुत न्हाईत, पोरांना चारचौघात जायला लाज वाटती... महायुती सरकारच त्याला जबाबदार !

#संतापलेला_महाराष्ट्र #घरोघरी_तुतारी

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 08:27

तुमच्या अनुदानाची भीक नको होती; दुधाला चांगला बाजारभाव हवा होता !

#संतापलेला_महाराष्ट्र #घरोघरी_तुतारी

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 08:02

पालिकेचे आधीच एक वाहनतळ असतानाही पालिका प्रशासनाने लोअर परळ परिसरात दुसरे वाहनतळ उभारण्यासाठी अंदाजीत खर्चाचा आकडा फुगवून तब्बल ५२० कोटींची निविदा मागवली आहे. जर आधीच एक वाहनतळ आहे, तर मग दुसरे कोणासाठी? महायुतीच्या लाडक्या कंत्राटदारासाठी तर नव्हे..?

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 07:57

आश्वासनांच्या नावाखाली फसवणूक करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापलीकडे महायुती सरकारने काहीही केलेले नाही. सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांशी खेळणा-या महायुतीला रोखायलाच हवं. आश्वासनांची पूर्तता करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि हक्क मागतोय महाराष्ट्र’ या मोहीमेत सहभागी व्हा!

#हक्क_मागतोय_महाराष्ट्र #विधानसभा२०२४

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

26 Oct, 06:47

फक्त सत्ता स्वार्थासाठी एका मंत्रिमंडळ बैठकीत शेकडो निर्णय घेणाऱ्या अन् भ्रष्ट कारभाराचे शिखर गाठणाऱ्या निगरगट्ट महायुती सरकारला गोरगरीब जनतेच्या आरोग्याची पर्वा नाही हेच यातून सिद्ध होते.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

25 Oct, 15:26

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश आडसकर, केज कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ऋषिकेश आडसकर, आडसचे सरपंच शशी आडसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष किशोर पिंगळे, केजचे माजी सभापती अंकुश इंगळे, माजी कृषि उपाध्यक्ष सुनील शिंगारे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी मयेकर, ओढणी तालुकाध्यक्ष पोपट शेंडगे, दादासाहेब गोळवे, नीलकंठ भोसले, दिपक जाधव, दामुदर धुमाळ, विठ्ठल घोरे, माणिक दळवे, पप्पू म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र झाल्टे, माजी नगरसेवक महादेव जमाले, माजी सरपंच बाळासाहेब राऊत, मुकुंद सुरवसे व सोशल मीडिया प्रमुख मधुर दिंडे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माननीय आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख श्री. राज राजापूरकर, पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोहर डाके, शकील कुरेशी, युवक अध्यक्ष मनोज फारके, मुंजपा घायटिळक, रोहित नायबळ, विधी विभागाचे ऍड. गोंडे व तन्मय होके पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3,796

subscribers

4,524

photos

2,604

videos