ThePawanUpdates

@thepawanupdates


ThePawanUpdates

13 May, 15:14


"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पोलिसांच्या मदतीने पैसे वाटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला नुसतं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी कायद्याचा आदर राखायला हवा आणि या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहायला हवं. राधाकृष्ण विखे पाटलांचा चिरंजीवांना म्हणजेच सुजय विखे पाटलांना अहमदनगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना पकडलं आहे. त्यांनी मतदारसंघात लाखो रुपये वाटले ते आता समोर आलं आहे, हीच स्थिती नाशिक आणि रायगडची देखील आहे."

-खासदार संजय राऊत

ThePawanUpdates

13 May, 15:10


"विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल. महायुतीची लाट आहे असे विरोधक म्हणणार नाहीत, ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले जात आहे. पण यापेक्षा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे."

-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

ThePawanUpdates

13 May, 15:10


"राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे."

-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

ThePawanUpdates

13 May, 15:07


"नेहरूंनी केलेल्या चुकांसाठी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदार धरतेय."

-मंत्री एस. जयशंकर

ThePawanUpdates

13 May, 14:50


"रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी आहे, त्यामुळे मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे."

-कॉंग्रेस नेते राहुल गांधी

ThePawanUpdates

13 May, 14:50


"2024 ची लोकसभा निवडणूक ही विचार विरुद्ध अहंकाराची लढाई आहे. महाराष्ट्रात मी प्रचारासाठी फिरलो तेव्हा सर्वत्र नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र संताप लोकांमध्ये दिसला. महायुतीला अहंकार आहे, त्यांच्या राज्यात 45 प्लस जागा येतील अशी त्यांची मस्ती होती. इस बार 400 पार अशी घोषणा देणाऱ्या भाजपाला इस बार भाजप तडीपार असा नारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आणि तो आवाज देशात घुमला. महाराष्ट्रात 36 सभा मोदी आणि शाह घेतील, पण महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील."

-शिवसेना UBT आमदार भास्कर जाधव

ThePawanUpdates

13 May, 14:47


मुंबई!

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले नाहीत. या अत्याचारी नराधमाला परदेशातून भारतात आणावे व कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे.

ThePawanUpdates

13 May, 14:47


घाटकोपर!

“घटना अतिशय दुर्दैवी आहे. अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. जवळपास 57 लोकांना बाहेर काढलं आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व रेस्क्यू टीम काम करत आहे. नागरिकांना आधी बाहेर काढलं जाईल. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. होर्डिंगविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेत मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांच्या मदत केली जाईल. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ThePawanUpdates

13 May, 14:37


ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान, धिम्या मार्गिकेवर सोमवारी सायंकाळी ओव्हरहेड तारेचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे धिम्या मार्गिकेची वाहतूक जलद मार्गिकेवर वळविण्यात आली. त्याचा परिणाम मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर झाला.

सुमारे पाऊण तास रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या. सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. सकाळी सिग्नल यंत्रणेचा बिघाड आणि सायंकाळी पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने काही प्रवाशांनी रस्ते मार्गे वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. परंतु रस्त्यावरही मोठ्याप्रमाणात कोंडी झाली होती.

ThePawanUpdates

13 May, 14:36


दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी एका जैन मंदिरात छोटेखानी सभा घेण्यात आली. या सभेत नयपद्मसागरजी यांनी मुंबईतल्या जैन बांधवांना भाजपाला मतदान करण्याचं आणि महायुतीच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र आहे तर भारत आहे. महाराष्ट्रात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. धूप मे तपना मंजूर है पर नरेंद्र मोदीजी को एक वोट कम गिरना मंजूर नहीं असंही वक्तव्य त्यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट घेतला आहे. फडणवीस महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत कोणी महाराष्ट्राच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. फडणवीस यांनी ज्यांना साथ दिली, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असे आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी म्हटले.

दक्षिण मुंबईमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना जिंकून आणण्यासाठी कामाला लागलेली आहे. या मोहीमेतंर्गत सोमवारी विशेष संपर्क अभियान जैन मंदिरात पार पडले. या अभियानाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित आहेत. दक्षिण मुंबईतील जैन मतदार महायुतीकडे वळवण्यासाठी विशेष संपर्क अभियान आज राबवले जात आहे.

ThePawanUpdates

13 May, 14:35


पुणे!

शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. तत्पूर्वी झालेल्या मतदान यंत्र प्रात्यक्षिकामध्ये (माॅक पोल) ६० मतदान यंत्रे बदलण्यात आली. यामध्ये २४ बॅलेट युनीट, १० कंट्रोल युनीट आणि २६ व्हीव्हीपॅट यांचा समावेश आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी देखील विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदान यंत्रणा बंद पडल्याच्या घटना घडल्या.

सोमवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्र प्रात्यक्षिक प्रत्येक मतदान केंद्रांवर घेण्यात आले. यावेळी २४ बॅलेट युनीट (०.३२ टक्के) १० कंट्रोल युनीट (०.४०चक्के) आणि २६ व्हीव्हीपॅट (१.०४ टक्के) असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही मतदान यंत्रे तातडीने बदलण्यात आली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिरूर विधानसभा मतदारसंघातील काळभोर, राजगुरूनगर यांसह विविध मतदान केंद्रांवर मतदान सुरू असताना बीयू, १८ (०.२४ टक्के) कंट्रोल युनीट ६ (०.२४ टक्के) आणि १८ (०.७२) व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडली होती. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. उन्हाचा तडाखा दुपारनंतर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी होती. मात्र मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने अर्धा तास, एक तास मतदारांना खोळंबून थांबावे लागले. त्यानंतर संबंधित सदोष मतदान यंत्रे बदलून नवीन यंत्रे बसवून मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.

ThePawanUpdates

13 May, 14:34


"महाराष्ट्रात भाजपाप्रणीत एनडीएला तब्बल २० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. सध्या राज्यातल्या ४८ जागांपैकी ४२ जागा एनडीएकडे असून त्यातल्या त्यांच्या २० जागा कमी होणार आहेत, असे ते म्हणाले.

ThePawanUpdates

13 May, 14:31


"मतदारांमधील उत्साह पाहता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय होईल. पार्थ पवार यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला. याबद्दल अद्यापही मनात दुःख आहे. तेव्हा मी राष्ट्रवादी पक्षाचा शहराध्यक्ष होतो."

-महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे

ThePawanUpdates

13 May, 14:24


मुंबईतील घाटकोपर इथं लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती असून आतापर्यंत जवळपास ५० जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच होर्डिंगखाली अडकलेल्या इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ThePawanUpdates

13 May, 14:23


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपरमध्ये दुर्घटनास्थळावर पोहोचले

ThePawanUpdates

13 May, 14:22


घाटकोपर दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द.

ThePawanUpdates

13 May, 12:15


महाराष्ट्र!

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.

नंदुरबार - ६०.६०%
जळगाव - ५१.९८ %
रावेर - ५५.३६%
जालना - ५८.८५%
औरंगाबाद -५४.०२%
मावळ - ४६.०३%
पुणे - ४४.९०%
शिरूर - ४३.८९%
अहमदनगर- ५३.२७%
शिर्डी - ५२.२७%
बीड - ५८.२१%

ThePawanUpdates

13 May, 12:09


पुणे!

सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात 44.90% मतदान झाले.👇

कसबा पेठ - 51.07
कोथरूड - 48.91
पर्वती -46.80
पुणे कँटोन्मेंट -44.01
शिवाजीनगर - 38.73
वडगाव शेरी -40.50

ThePawanUpdates

13 May, 11:00


जालना लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मतदान केंद्र क्र.२४७ इथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर अनु क्रमांक १वर असलेल्या उमेदावाराला मत देण्यासाठी बटण दाबले असता अनु क्रमांक १७ वर असलेल्या उमेदवाराला मत दिल्याची नोंद होत असल्याचा आक्षेप घेतला गेल्याचे वृत्त खाजगी वृत्तवाहिनीने दिले होते.

निवडणूक अधिकार्‍याकडून आलेला खुलासा -👇

संबंधित घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही केली आहे. सध्या मतदान शांततेत आणि सुरळीत सुरू आहे. (२/२)

ThePawanUpdates

13 May, 10:55


दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा

"दिव्यांगांच्या सांगण्यावरून मी पाठिंबा दिला."

-आमदार बच्चू कडू

2,221

subscribers

5,382

photos

1,104

videos