#BMCMPS @mcgmedu Channel on Telegram

#BMCMPS

@mcgmedu


#BMCMPS (English)

Are you a medical student looking to enhance your knowledge and skills in the field of medicine? Look no further than #BMCMPS! This Telegram channel, managed by the username @mcgmedu, is dedicated to providing valuable insights, resources, and updates to medical students around the world. #BMCMPS stands for Biochemistry and Molecular Cell Medical Physiology Society, a community of passionate medical students who are committed to advancing their understanding of the intricate workings of the human body. From in-depth discussions on the latest research to practical tips for acing exams, this channel offers a wealth of information that can benefit both aspiring doctors and seasoned professionals. Whether you are studying for an upcoming exam or simply want to stay informed about the latest developments in the field of medicine, #BMCMPS has got you covered. With regular updates and interactive sessions, you can engage with fellow students, ask questions, and participate in discussions that will broaden your horizons. Join #BMCMPS today and take your medical education to the next level! Stay connected, stay informed, and stay inspired with @mcgmedu.

#BMCMPS

10 Jan, 12:10


*जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त*

"माझी मुंबई" या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा


रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत मुंबईतील विविध मैदाने / उद्याने येथे आयोजित केली आहे.

ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असून स्पर्धेच्या दिवशी सुद्धा प्रवेश दिला जाईल.

https://www.balchitrakala.com/

*Subject & Ground location*
https://bit.ly/4j1ctAo

*हा मेसेज प्रत्येकाने दहा ग्रुप मध्ये शेअर करा आणि स्क्रीन शॉट शेअर करा.*

#बालचित्रकला #balchitrakala

#BMCMPS

10 Jan, 12:07


10

#BMCMPS

02 Jan, 09:18


बालचित्रकला स्पर्धा 2025

#BMCMPS

31 Dec, 08:48


Like 👍 Comment 🎯 Share 👌 Reply

#BMCMPS

31 Dec, 07:28


जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त

"माझी मुंबई" या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा


रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेल मुंबईतील विविध मैदाने / उक्याने येथे आयोजित केली आहे.

ही स्पर्धा सर्व विक्यार्थ्यांसाठी खुली असून स्पर्धेच्या दिवशी सुद्धा प्रवेश दिला जाईल.

https://www.balchitrakala.com/

#BMCMPS

05 Oct, 14:52


Today BMC School students travelled with Hon'ble PM Narendra Modi ji and interacted with him during inauguration and travelling in Metro 3
Students and teacher were as below.

#BMCMPS

03 Oct, 16:11


ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंताय विघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।

।। गणपतिबाप्पा मोरया ।
।। मंगलमूर्ती मोरया ।
.......................................



*🚩सर्व गणेश भक्ताना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩*

*श्री स्वामी समर्थ*

#BMCMPS

03 Oct, 16:11


आषाढी कार्तिकी भक्तजन येती |
चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती |
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती |
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ||
जय देव जय देव जय
...................................................

*07. येई हो विठ्ठले आरती*

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ।।धृ||

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। १ ।।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि...
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। २ ।।

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ३ ।।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें...
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ४ ।।
...................................................

*08. दशावतारांची आरती*

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥

रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥

मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥
......................................

*09. ज्ञानेश्वरांची आरती*
आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत ||
मनु वेधला माझा ||
आरती धृ

लोपलें ज्ञान जगी |
हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |
नाम ठेविले ज्ञानी आरती धृ

कनकाचे ताट करी |
उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||
साम गायन करी आरती धृ

प्रकट गुह्य बोले |
विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |
पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा सेविती ३ ||
......................................



*10. श्री तुकारामाची आरती*

आरती तुकारामा |
स्वामी सदगुरूधामा | सच्चिदानंदमूर्ती |
पाय दाखवी आम्हा आरती धृ ||

राघवे सागरांत |
पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे |
अभंग उदकी रक्षिले आरती १ ||

तुकिता तुलनेसी |
ब्रम्ह तुकासि आलें |
म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा २ ||
...................................................

*11. श्री एकनाथाची आरती*

आरती एकनाथा |
महाराजा समर्था |
त्रिभुवनी तूंचि थोर |
जगदगुरू जगन्नाथा धृ

एकनाथ नाम सार |
वेदशास्त्रांचे गूज |
संसारदु:ख नाम |
महामंत्राचे बीज | आरती

एकनाथ नाम घेतां |
सुख वाटले चित्ता |
अनंत गोपाळदासा |
धणी न पुरे गातां |
आरती एकनाथा |
महाराजा समर्था
...................................................


*12. श्री रामदासाची आरती*

आरती रामदासा |
भक्त विरक्त ईशा |
उगवला ज्ञानसूर्य ||
उजळोनी प्रकाशा धृ

साक्षात शंकराचा |
अवतार मारुती |
कलिमाजी तेचि झाली |
रामदासाची मूर्ती

#BMCMPS

03 Oct, 16:11


करवीरपूर वासिनी
सुरवर मुनिमाता
पुरहर वरदायिनी
मुरहर प्रियकांता
कमलाकारे जठरी
जन्मविला धाता
सहस्त्र वदनी
भूधर नपुरे गुणगाता जय

मातुल्लिंग गदा
खेटक रविकिरणी
झळके हाटकवाटी
पीयुष रसपाणि
माणिक रसना
सुरंग वसना मृगनयनी
शशीकर वदना
राजस मदनाची जननी जय

तारा शक्ती
अगम्या शीवभजका
गौरी सांख्य म्हणती
प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीजा निगमागमसारी
प्रगटे पद्मावती
निज धर्माचारी. जय.

अमृत भरिते सरिते
अघदुरिते वारी
मारी दुर्घट असुरा
भवदुस्तर तारी
वारी माया पटल
प्रणमत परिवारी
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.

चतुराननाने कुश्चित
कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते
माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी
पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय

..................................

*18. आरती भुवनसुंदराची*

आरती भुवनसुंदराची ।
इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

पद्मसमपादयुग्मरंगा ।
ओंवाळणी होती भृंगा ।
नखमणि स्त्रवताहें गंगा
जे कां त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥

वर्तुळ गुल्फ भ्राजमानें ।
किंकिणीक्वणित नाद घणघणित, वांकिवर झुणित, नुपुरें झनन मंजिराची ॥

झनन ध्वनि मंजिराची ॥ आरती. ॥ १ ॥

पीतपट हाटकतप्त वर्णी ।
कांची नितंब सुस्थानी ॥
नाभिची अगाध हो करणी ।
विश्वजनकाची जे जननी ॥ चाल ॥

त्रिवली ललित उदरशोभा ।
कंबुगळां माळ, विलंबित झळाळ कौस्तुभ सरळ,
बाहु श्रीवत्सतरळमणिमरळ कंकणाची ॥
प्रीति बहु जडित कंकणाची ॥ आरती ।। 2

इंदुसम आस्य कुंदरदना ।
अधरारुणार्क बिंबवदना ॥
पाहतां भ्रांति पडे मदना ।
सजल मेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥

झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली,
मयूर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी
केशरी झळाळित कृष्णा कस्तुरींची ।
अक्षता काळि कस्तुरीची ॥ आरती. ॥ ३ ॥

कल्पद्रूमातळीं मूर्ती सौदामिनी कोटिदीप्ती ।
गोपीगोपवलय भवती ॥
त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥

मंजुळ मधुर मुरलीनादें ।
चकित गंधर्व चकित अप्सरा, सुरगिरिवरा, कर्पूराधर रतीनें प्रेमयुक्त साची ॥
आरती ओवाळित साची ॥ आरती. ॥ ४ ॥

वृंदावनीचिये हरणी ।
सखे गे कृष्ण माय बहिणी ॥
श्रमलों भवब्धिचें फिरणीं ।
आतां मज ठाव देई चरणीं ॥ चाल ॥

अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ॥
नमितों चरण शरण, मी करुणा येऊं दे विषाणपाणी कृष्ण नेणतें,
बाळ आपुलें राखि लाज याची ॥
दयानिधे राखि लाज याची ॥ आरती ॥ ५ ॥

..........................................

*19. घालीन लोटांगण*

घालीन लोटांगण वंदीन चरण।।
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें।।
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन।।
भावें ओवाळीन म्हणे नामा।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।।
त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव।।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा।।
बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्‌।।
करोमि यद्‌त्सकलं परस्मै।।
नारायणायेति समर्पयामि।
अच्युतं केशवं रामनारायणं।।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्‌।। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं।।
जानकीनायकं रामचंद्रं भजे।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।

...................................................

मोरया मोरया अष्टविनायक मोरया
मोरया मोरया मयूरेश्वर मोरया
मोरया मोरया चिंतामणि मोरया
मोरया मोरया बल्लालेश्वर मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया
मोरया मोरया विग्नेश्वरा मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
..................

सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आतां ।।१||

कैलास राणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ।।२।।

मोरया मोरया मी बाळ तान्हें
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा ब तू घाल पोटी ।।३।।

ज्या ज्या ठिकाणी
मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी
निजरुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ।।४।।

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र
तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ।।५।।
...................................................

*अष्टविनायक नमन*

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम,
मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।

...................................................

*20. मंत्रपुष्पांजली*

#BMCMPS

03 Oct, 16:11


वीसही दशकांचा |
दासबोध ग्रंथ केला |
जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले

ब्रम्हचर्य व्रत ज्याचे |
रामरूप सृष्टी पाहे |
कल्याण तिही लोकी |
समर्थ सद्गुरुपाय
आरती रामदासा ||
...................................................

*13. श्री विष्णूची आरती*

आवडी गंगाजळे देवा न्हाणीले |
भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले |
अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे |
जंव जंव धूप जळे |
तंव तंव देवा आवडे |
रमावल्लमदासे अहं धूप जाळिला |
एकारतीचा मग प्रारंभ केला |
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा |
समाधी लागली पाहतां मुखारविंदा |
हरीख हरीख हातो मुख पाहतां |
चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था |
सदभवालागी बहु हा देव भुकेला |
रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला |
फल तांबूल दक्षिणा अर्पीली |
तयाउपरी नीरांजने मांडिली ||
आरती आरती करू गोपाळा |
मी तू पण सांडोनी वेळोवेळा धृ

पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली |
दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी |
आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें |
सुरवर सकळीक तटस्थ ठेले |
देवभक्तपण न दिसे कांही |
ऐशापरी दास रमावल्लभ पायीं आरती
...................................................

*14. नवरात्राची आरती*

आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो |
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो |
मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो |
ब्रम्हा विष्णू आईचे पूजन करिती हो

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो |
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो धृ

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो |
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो |
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो |
उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | उदो

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो |
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो |
कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो |
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो | उदो

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो |
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो |
पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो |
भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो | उदो

पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो |
अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो |
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो |
आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो | उदो

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो |
घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो |
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो |
जोगवा मांगता प्रसन्न झाली भक्तकुळा हो | उदो

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो |
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो |
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो |
भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो | उदो

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो |
सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो |
मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो |
स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो | उदो

नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे हो |
सप्तशतीजप होमहवने सदभक्तीकरुनी हो |
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो |
आचार्य ब्राम्हणा तृप्त केलें कृपेकरुनी हो | उदो

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लघनी हो |
सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो |
शुंभनिशुभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो |
विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो |
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो १०
...................................................

*15. मारुतीची आरती*

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी |
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ||
कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी |
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी

जय देव जय देव जय श्रीहनुमंता |
तुमचेनी प्रसादे न भी कृतांता धृ

दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द |
थरथरला धरणीधर मानिला खेद |
कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद |
रामी रामदासा शक्तीचा शोध जय २ ||
...................................................

*16. श्री कृष्णाची आरती*

ओवाळू आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा धृ

चरणकमल ज्याचे अति सुकुमार |
ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू

नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान |
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी |
वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू

जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान |
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू

एका जनार्दनी देखियले रूप |
रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू
...............................................

*17. श्री महालक्ष्मीची आरती*

जय देवी जय देवी
जय महालक्ष्मी
वससी व्यापकरूपे राहे
निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय ध्रू

#BMCMPS

03 Oct, 16:11


*सव॔ मोबाईल धारकांसाठी*

*......आरती पुस्तक......*
.................................

*01. श्री गणपतीची आरती*

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची |
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची |
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मन:कामना पुरती
जय देव जय देव धृ

रत्नखचित फार तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरेजडीत मुगुट शोभती बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय २ ||

लंबोदर पितांबर फणीवर बंधना |
सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना |
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती |
दर्शनमात्रे मन:कामना पुरती
...................................................

*02. श्री गणपतीची आरती*

शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको |
दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको |
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको |
महिमा काहे न जाय लागत हुं पदको

जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता धृ

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी |
विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी |
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी जय २ ||

भावभगतसे कोई शरणागत आवे |
संतत संपत सबही भरपूर पावे |
ऐसे तुम महाराज मोको अति भावे |
गोसावीवंदन निशिदिन गुण गावे |
जय जय जी गणराज विद्यासुखदाता धन्य ३ ||
...................................................

*03. श्री शंकराची आरती*

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा |
वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा |
लावण्यसुंदर मस्तकी बाळा |
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा

जय देव जय देव जय श्रीशंकरा |
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा धृ

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा |
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा |
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव

देवी दैत्यी सागर मंथन पै केले |
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें |
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी |
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी |
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी |
रघुकुळटिळक रामदासाअंतरी जय देव ४ ||
...................................................

*04. श्री देवीची आरती*

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी |
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |
वारी वारी जन्ममरणाते वारी |
हरी पडलो आता संकट निवारी

जय देवी जय देवी महिषसूरमथिनी |
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी धृ

त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही |
चारी श्रमले परंतु न बोलवे काही |
साही विवाद करिता पडिले प्रवाही |
तें तू भक्तालागी पावसी लवलाही जय २ ||

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा |
क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा |
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा |
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा |
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी |
सुरवरईश्वरवरदे तारक
...................................................

*05. श्री दत्ताची आरती*

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |
त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा |
नेति नेति शब्द नये अनुमाना |
सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |
आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव धृ

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त |
अभाग्यासी कैची कळेल हे मात |
पराही परतली तेथे कैचा हा हेत |
जन्ममरणाचा पुरलासे अंत जय २ ||

दत्त येउनिया उभा ठाकला |
भावे सांष्टागेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला |
जन्ममरणाचा फेरा चुकविला जय ३ ||

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान |
हारपले मन झाले उन्मन |
मी तू झाली बोळवण |
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान जय देव ४ ||
...................................................

*06. श्री विठोबाची आरती*

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा |
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जय देव जय देव जय पांडुरंगा ||
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव धृ

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी |
कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय २ ||

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा |
राई रखुमाई राणीया सकळा |
ओवाळिती राजा विठोबा सावळा जय ३||

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती |
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |
दिंड्या पताका वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा वर्णावा किती जय ४ ||

#BMCMPS

03 Oct, 03:46


नवरात्री हा भारतात साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र उत्सव आहे. नवरात्री म्हणजे नऊ रात्री, ज्या दरम्यान देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव शक्ती आणि भक्तीचा प्रतीक आहे, आणि देवी दुर्गेच्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

नवरात्रीच्या काळात, देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना केली जाते:

1. शैलपुत्री - देवी पार्वतीचे पहिलं रूप.


2. ब्रह्मचारिणी - तपस्विनी आणि ज्ञानदायिनी.


3. चंद्रघंटा - शांती आणि सौंदर्याची देवी.


4. कूष्मांडा - सृष्टी निर्माती.


5. स्कंदमाता - युद्ध देवता कार्तिकेयची माता.


6. कात्यायनी - युद्धातील विजयाची देवी.


7. कालरात्रि - अंधारातील प्रकाश.


8. महागौरी - शुद्धता आणि सौंदर्य.


9. सिद्धिदात्री - सर्व सिद्धी प्राप्त करणारी देवी.



नवरात्रीच्या काळात उपवास, पूजा, जागरण आणि गरबा-डांडियाचे आयोजन केले जाते. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात गरबा आणि डांडियाचा रंगतदार उत्सव असतो. उत्तर भारतात रामलीला आणि दक्षिण भारतात देवीच्या विविध रूपांच्या मूर्तींची स्थापना करून उत्सव साजरा केला जातो.

नवरात्रीचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्यातील शक्ती, सकारात्मकता, आणि भक्ती यांचे जागरण करून जीवनात नवचेतना निर्माण करणे.

#BMCMPS

08 Sep, 09:45


ChatGPT Mega Bundle.pdf

#BMCMPS

27 Aug, 15:26


https://youtu.be/TPc_jYMUNwY?si=jpZJYPdr-elUKoFV

आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील खाजगी अनुदानित शाळांचे शिक्षणअधिकारी श्री.राजू तडवी सर यांची सुशिल शेजुळे यांनी "झेंडा मराठीचा" या यूट्युब चॅनेलसाठी घेतलेली विशेष मुलाखत.

नक्की पहा व इतरांनाही पाठवा.

चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...
आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत आहे.
धन्यवाद..

#BMCMPS

23 Aug, 15:15


अडीच-तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याची राक्षसी मनोवृत्ती अंतःकरण विकल करणारी आहे, ही घाणेरडी मानसिकता समाजातून मुळासकट उखडून फेकली पाहिजे..

आत्म संरक्षणाच्या धड्यांबरोबर मुलींना लहानपणापासूनच अनोळखी स्पर्श आणि त्यांचे अर्थ लक्षात आणून देणे आज काळाची गरज आहे.. त्यातूनच अशा घटनांना कुठेतरी आळा घालायला मदत होईल!

Share everywhere.....

#BMCMPS

20 Aug, 15:28


https://youtube.com/shorts/Ch3jG1ZPGV8?si=TD7tmZ_Vm62VjzVm

7,697

subscribers

256

photos

102

videos