स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

@swarajyaprabodhini

This Channel is for MPSC Pre/Mains Study Material and approach based discussion

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:23

📌विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

🔸भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
🔹 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
🔸 त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून २०१६ ते २०२१ पर्यंत काम पाहिले.
🔹२००७ ते २०१० या कालावधीत त्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर होत्या.

🔷राष्ट्रीय महिला आयोग

स्थापना-१९९२(वैधानिक संस्था)१९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे.

कार्य-1)महिलांसाठी संवैधानिक आणि कायदेशीर सुरक्षा उपायांचे पुनरावलोकन करणे.

2)उपचारात्मक कायदेशीर उपायांची शिफारस करणे.

3)तक्रारींचे निवारण सुलभ करणे आणि
महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.

रचना- अध्यक्ष(1) , सदस्य(5)

पहिल्या अध्यक्षा-जयंती पटनायक(31 जानेवारी 1992)

Join - t.me/swarajyaprabodhini 📖

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:19

📌मध्य प्रदेशच्या 18 वर्षीय निकिता पोरवाल हिने फेमिना मिस इंडिया 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. 👸

तिच्या पाठोपाठ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारी रेखा पांडे दुसऱ्या क्रमांकावर  आणि गुजरातची आयुषी ढोलकिया ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

फेमिना मिस इंडिया 2024 ही  स्पर्धेची 60 वी आवृत्ती होती , ज्याचा हीरक महोत्सव 16 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रतिनिधीसह दिल्लीसह सर्व 29 राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे 30 स्पर्धक होते . 

Join- t.me/swarajyaprabodhini 📖

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:19

न्यायदेवतेच्या जुन्या आणि नव्या मूर्तीतील फरक

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:19

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:16

आज वाचन प्रेरणा दिन
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजेच 15 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:10

11 ऑक्टोबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:07

स्वराज्य प्रबोधिनीच्या GS 2 उत्तरलेखन मॉड्यूल मध्ये फीडबॅक कसे दिले जातात आणि उत्तराची तपासणी कशी केली जाते याचा एक नमुना....

ADMISSIONS OPEN
WELCOME ALL

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:07

Current Affairs Assignment 2

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:04

📌९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

९८ वर्षांच्या इतिहासात सहाव्या महिला अध्यक्ष

🔸दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

🔹अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आतापर्यंत ९८ वर्षांच्या इतिहासात ८३ वर्षीय तारा भवाळकर यांच्या रूपाने सहाव्या महिलेला हा मान मिळाला आहे.
हे संमेलन २१, २२, २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहे.

🔸डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ रोजी झाला. त्या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.
प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

🔹निवृत्तीनंतरही त्यांनी पुण्यातील ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा व लोककला या विषयांच्या लेखनामध्ये गाढा अभ्यास आहे.

🔸लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्रीजाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केले आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी आपले योगदान दिले आहे.

🔹यापूर्वीच्या महिला अध्यक्ष

1)कुसुमावती देशपांडे (१९६१, ग्वाल्हेर)
2) दुर्गा भागवत (१९७५, कराड)
3)शांता शेळके (१९९६, आळंदी)
4)डॉ. विजया राजाध्यक्ष (२००१, इंदूर)
5)अरुणा ढेरे २०१८, यवतमाळ)

📖join:- t.me/swarajyaprabodhini

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

21 Jan, 00:03

"उलगुलान "

आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा  'गट ब आणि क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.
संयुक्त गट ब आणि क मध्ये रयत प्रबोधिनी च्या निकालाविषयी आणि कामाच्या पद्धतीविषयी आपण सर्वजण परिचित आहातच. तयारीच्या काळात  सर्व टप्प्यावर रयत प्रबोधिनी आपल्या पाठीशी उभी राहील याची आम्ही ग्वाही देत आहोत..

आपल्या TRTI द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे नावाचा पर्याय निवडाल याची खात्री आहे.

या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म  भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल..

👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8

अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा..
9762131361 / 9216950101

संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी
https://www.youtube.com/@रयतप्रबोधिनी

तुमचाच,
उमेश कुदळे
रयत सेवक 🙏🙏

(रयत च्या कामावर विश्वास असणाऱ्या मंडळींनी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी ही विनंती 🙏)

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

20 Jan, 23:59

Copy Paste करून स्वतःच्या telegram channel ला टाकणाऱ्यांनी कृपया नावासह पोस्ट कॉपी कराव्यात... ही नम्र विनंती...

स्वराज्य प्रबोधिनी By Indrajeet Yadav

20 Jan, 23:59

📌मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके॥🍂

🔷अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष असतात?

* भाषेचे प्राचीन साहित्य: भाषेचे साहित्य किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
* साहित्याचे महत्त्व: भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान आणि समृद्ध असावे.
* स्वतंत्र अस्तित्व: भाषेला स्वतंत्र अस्तित्व असावे. म्हणजेच ती इतर भाषेतून उधार घेतलेली नसावी.
* भाषेचे स्वरूप: भाषेचे स्वरूप इतर भाषांपेक्षा वेगळे असावे.

🔹मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय फायदे होतील?

* मराठी भाषेचे संरक्षण: यामुळे मराठी भाषेचे अधिक चांगले संरक्षण होईल.
* शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन: शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेला अधिक प्रोत्साहन मिळेल.
* सांस्कृतिक ओळख: मराठी भाषेची सांस्कृतिक ओळख जगभर पसरेल.
* केंद्रीय स्तरावर मान्यता: मराठी भाषेला केंद्रीय स्तरावर अधिक मान्यता मिळेल.

समिती- मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती.
2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला.
- महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं होतं.

🔸महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत.

-मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं.
-भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं.
-प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं.
-महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं.
-मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं.

: देशातल्या अभिजात भाषांचा  प्रवास 

सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.
तामिळनंतर
2005 मध्ये संस्कृत,
2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू,
2013 मध्ये मल्याळम,
2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. 
2024- मराठी,आसामी,पाली,प्राकृत,बंगाली

📖 Join- t.me/swarajyaprabodhini

6,573

subscribers

3,036

photos

53

videos