समर्थ म्हणतात, महंत कसा असावा (Leader) तर
जो येकांतास तत्पर | आधीं करी पाठांतर |
अथवा शोधी अर्थांतर | ग्रंथगर्भींचें ||
त्याला लोकसंग्रह करण्यासोबतच एकांतवासाचीही आवड असावी.
(पाठांतर म्हणजे पाठ करणे या सोबतच पाठ+अंतर,अन्य: पाठ:, अन्य पाठ वाचणे किंवा अजुन वेगवेगळे ग्रंथ वाचणॆ, असाही अर्थ होतो, जो समर्थांना अभिप्रेत आहे)
त्याने वेगवेगळी पुस्तके वाचावीत, आणि त्या ग्रंथाच्या आतले, गर्भातले, हृदयातले विविध अर्थ ताडून पहावेत (नुसते वाचू नये, you should read between the lines). (थोडक्यात वाचन, मनन, चिंतनाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवाव्यात)
-समर्थ रामदास