Gavhane Police Academy Pune @punepolicebharti Channel on Telegram

Gavhane Police Academy Pune

@punepolicebharti


निवासी पोलीस/आर्मी भरती स्पेशल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र
भरतीची 💯 लेखी हमी देणारी एकमेव अकॅडमी
क्रिडा संकुल समोर, राजगुरुनगर.ता - खेड, जि - पुणे 7620336914
https://www.youtube.com/channel/UCmxZZ-Yh27z9s_bLA1Q8ypQ

Gavhane Police Academy Pune (Marathi)

गाव्हाणे पोलिस अकॅडमी पुणे - निवासी पोलीस/आर्मी भरती स्पेशल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रnnआपल्याला स्वागत आहे! हे 'punepolicebharti' टेलीग्राम चॅनेल मराठीत एकमेव पोलीस अकॅडमी आहे. या अकॅडमीमध्ये आपल्याला पोलीस भरतीची सर्व माहिती मिळेल, जसे की भरतीच्या वेळेची अपेक्षित नोकरी, प्रवेश प्रक्रिया, आणि तत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर. ह्या अकॅडमीमध्ये आपल्याला लक्ष द्यायला हवा या भरतीच्या परीक्षेकरिता सज्ज व्हा. या अकॅडमीमध्ये एक अत्यंत मूळची प्रशिक्षणे मिळणार आहेत.

एक क्लिकवर, आपण भरतीच्या सर्व महत्वाच्या माहितीची सोडप्या करू शकता. तरीही, तुमच्याकडे विविध प्रकारच्या संदेश येईल जे तुमच्या भविष्यात लक्षात ठेवतील. त्यावरूनही, आपल्याला सोप्पे प्रश्नांची सोड मिळेल, जेणेकरून आपल्याला तयारी करण्याची संधी मिळेल.

अशा मोठ्या क्षणांच्या सोबत आणि अत्यंत प्रोफेशनल चालणारी शिक्षणाने, गाव्हाणे पोलिस अकॅडमी पुणे आपल्याला एक अद्वितीय अनुभव पुरवणार आहे. या अकॅडमीच्या सर्व सदस्यांना तयारीसाठी समर्पित काम करण्याची संधी मिळेल. त्यातही, तुम्हाला योग्य सल्लाह देणारे उदाहरणे, ताज्या घडामोडी, आणि अद्यात घडलेल्या घटनांचे मार्गदर्शन दिलेले जातील.

ज्यात उच्च प्रमाणी अभ्यास विसचार केले जाते आणि प्रथमस्थानावर असलेल्या भर्त्या तयारीस पूर्ण असतात, त्यापेक्षा जास्त पुढावा नेणार आहे. येथे आपल्याला तयारी मिळणार आहे, ते त्याचे साक्षात्कार देणारे प्रत्येक व्यक्ती आहे.

तुमच्या भविष्यासाठी खास तयारीस करण्या साठी आतुर असल्यास, तुम्हाला हे चॅनेल जोडल्यावर त्यांनी विशेष कसोटीत तयारी करून घेणार आहे. असा तुमच्या भविष्यातल्या पूर्वतयारीला वेगवेगळे मार्गदर्शन मिळणार आहे जे तुम्हाला सर्व अग्रगण्य करणारे असतील. तयार असलेल्या मार्गदर्शनांमुळे, तुमच्याकडे सगळयांनी प्रिय व उपयोगी मोजणारे संदेश येतील.

ताण न देऊन, आता हीं अद्वितीय संधी वापरा आणि तुमच्या भविष्याला तयार करा! तुमच्याकडे विशेष अनुभव, उपयुक्त सल्ला, आणि भरतीसंबंधित सर्व महत्वाचे अपडेट येईल. आता टेलीग्राममध्ये 'punepolicebharti' चॅनेल जॉईन करा आणि तुमच्या सपनांचे मार्गदर्शन करा!

Gavhane Police Academy Pune

05 Dec, 16:05


महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

◾️विधानसभा 2024 = 15 वी
◾️राज्यपाल=सीपी राधाकृष्णन 24 वे
◾️महाराष्ट्र विधानसभा जागा=288 जागा
◾️महाराष्ट्र विधानपरिषद जागा=78जागा
◾️महाराष्ट्र लोकसभा जागा= 48 जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ?
🟰शरद पवार (38 वर्षे)
🔸महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री?
🟰वसंतराव नाईक ( 11 वर्षे 78 दिवस)
🔸महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री?
🟰देवेंद्र फडणवीस (5 दिवस)
🔸महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री ?
🟰शरद पवार ( 4 वेळा)
🔸महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री?
🟰 अजित पवार ( 6वेळ )

Gavhane Police Academy Pune

05 Dec, 07:01


❇️ द्वारका डोके माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिला महिला पोलीस अधिकारी ठरल्या...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर असून हिमालय पर्वतरांगेमध्ये. आहे

हिमालय वलीचा पर्वत आहे

माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर नेपाळ देशांमध्ये स्थित आहे..

Gavhane Police Academy Pune

04 Dec, 14:20


मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील 57 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित.

▪️मध्यप्रदेश राज्यातील आठवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे.

📍राज्य=मध्यप्रदेश
📍जिल्हा=रायसेन

Gavhane Police Academy Pune

03 Dec, 11:26


जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

👉भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
👉जय शाह हे ICC चे 16 वे अध्यक्ष असतील.

👉न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची जागा घेत 36 वर्षीय जय शहा आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत.
👉आयसीसी प्रमुखपद भूषवणारे जय शहा हे पाचवे भारतीय आहेत.
👉आतापर्यंत 4 भारतीय आयसीसी प्रमुख बनले आहेत.
1.जगमोहन दालमिया : 1997-2000
2.शरद पवार : 2010-2012
3.एन श्रीनिवासन : 2014-2015
4.शशांक मनोहर : 2015-2020

Gavhane Police Academy Pune

03 Dec, 01:41


राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार विलेपार्ले, मुंबई येथे प्रदान करण्यात आला....👍

Gavhane Police Academy Pune

03 Dec, 01:40


ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना गदिमा पुरस्कार जाहीर...एकवीस हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरूप आहे....👍

➡️कवी ग.दि.माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतो.

Gavhane Police Academy Pune

30 Nov, 04:50


Gavhane Academy Demo Paper

Gavhane Police Academy Pune

29 Nov, 15:20


♦️विद्यमान कायद्यानुसार, 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेनंतर पुढील परिसीमन प्रक्रिया केली  जाऊ शकते

👉2026 नंतर परिसीमन आयोग नेमण्यात येईल.

👉त्यानुसार लोकसभेतील राज्यनिहाय संभावित जागा

👉लोकसभेच्या एकूण जागा 846 होतील.

👉लोकसभा बहुमत - 423+1

👉महाराष्ट्र लोकसभा संभाव्य जागा - 76

Gavhane Police Academy Pune

29 Nov, 00:31


👉इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना देण्यात येतो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

🟰कर्पूरी ठाकूर
🟰लालकृष्ण आडवाणी
🟰पी व्ही नारसिंहराव
🟰चौधरी चरणसिंह
🟰एम एस स्वामींनाथन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑1999 ला 4 जणांना देन्यात आला होता.यामध्ये....

🔶समाजवादी नेता जयप्रकाश नारायण,
🔶सितारवादक पंडित रविशंकर,
🔶अर्थशास्त्री डॉ. अमर्त्य सेन व
🔶स्वतंत्रता सेनानी गोपीनाथ बोरदोलोई.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
धोंडो केशव कर्वे (1958)
• पांडुरंग वामन काणे (1963)
• आचार्य विनोबा भावे (1983)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
• जे.आर.डी. टाटा (1992)
• लता मंगेशकर (2001)
• भीमसेन जोशी(2008)
• सचिन तेंडुलकर (2014)
• नानाजी देशमुख (2019)
━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━
महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला

Gavhane Police Academy Pune

28 Nov, 03:41


🛑 महाराष्ट्रात 444 तर देशात 3682 वाघ.

वाघांच्या संख्येत राज्य चौथ्या स्थानी.
मध्य प्रदेश :- 785
कर्नाटक :- 563
उत्तराखंड :- 560
महाराष्ट्र :- 444

Gavhane Police Academy Pune

26 Nov, 05:10


75 वा (अमृत महोत्सव) "संविधान दिन"
संविधान दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Gavhane Police Academy Pune

26 Nov, 05:08


💐

Gavhane Police Academy Pune

25 Nov, 16:25


आयपीएल लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडला, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.

सर्वात कमी वयाचा IPL खेळाडू

Gavhane Police Academy Pune

25 Nov, 04:23


आयपीएल 2025 मधील सर्वात महागडे पाच खेळाडू...

👉 ऋषभ पंत - लखनऊ - 27 कोटी

👉 श्रेयस अय्यर - पंजाब - 26.65 कोटी

👉 व्यंकटेश अय्यर - कोलकाता - 23.75 कोटी

👉 हर्षदीप सिंग - पंजाब - 23 कोटी

👉 युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी

Gavhane Police Academy Pune

25 Nov, 04:06


▪️ऋषभ पंत - 27 करोड
▪️टीम - लखनौ
▪️श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला.
▪️IPL आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू..

Gavhane Police Academy Pune

24 Nov, 07:10


भारतातील पहिले नाईट सफारी पार्क
▪️ठिकाण : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे 
▪️जगातील अशा प्रकारची ही पाचवी सफारी ठरणार आहे.
▪️कुकरेल नाईट सफारी पार्क आणि वन्यजीव केंद्र 900 एकरवर तयार करण्यात येत आहे.
▪️मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जून 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Gavhane Police Academy Pune

24 Nov, 07:08


पंतप्रधान मोदींना अमेरिकेत 'जागतिक शांतता पुरस्कार' प्रदान
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळाला.
▪️वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज (एआयएएम) या संघटनेने संयुक्तपणे त्यांना 'डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
▪️समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Gavhane Police Academy Pune

24 Nov, 06:20


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 10 वर्षात 19 देशांनी सन्मानित केले आहे.

Gavhane Police Academy Pune

24 Nov, 06:18


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 

भारतीय जनता पक्ष - 132
शिवसेना/ शिंदे - 57
राष्ट्रवादी/अजित पवार - 41
शिवसेना/ठाकरे गट - 20
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
इतर - 10
अपक्ष - 02

एकूण जागा - 288
बहुमत - 144+1

झारखंड विधानसभा निवडणूक 2024

झारखंड मुक्ती मोर्चा - 34
भारतीय जनता पक्ष - 21
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
इतर - 10

एकूण जागा - 81
बहुमत - 41+1

Gavhane Police Academy Pune

24 Nov, 06:16


🔰भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती.

🔹20 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणारे विद्यमान गिरीश चंद्र मुर्मू यांचे उत्तराधिकारी होतील.

🔸श्री. मूर्ती हे सध्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त आहेत.

🔹 के संजय मूर्ती हे 1989 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत.

🔸भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 च्या खंड (1) अंतर्गत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

Gavhane Police Academy Pune

23 Nov, 14:44


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*23 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर –* के संजय मूर्ती

🔖 *प्रश्न.2) जस्टीस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* मणिपूर

🔖 *प्रश्न.3) कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 56 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केले ?*

*उत्तर –* गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प

🔖 *प्रश्न.4) ISRO च्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे ?*

*उत्तर -* ऑस्ट्रेलिया

🔖 *प्रश्न.5) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे ?*

*उत्तर -* 130 वर्षे

🔖 *प्रश्न.6) २०२५ वर्षाचे जी २० परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील ने कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?*

*उत्तर -* दक्षिण आफ्रिका

🔖 *प्रश्न.7) लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* कोल इंडिया लिमिटेड

🔖 *प्रश्न.8) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* 10

🔖 *प्रश्न.9) समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.10) IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग सातवे ऐतिहासिक, 28 वे जागतिक विजेतेपद पटकावले आहे ?*

*उत्तर -* पंकज अडवाणी

Gavhane Police Academy Pune

23 Nov, 13:33


🛑 स्पर्धा परीक्षेला नेहमी प्रश्न येणारे 🛑
#GK

🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲

▪️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे

▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर

Gavhane Police Academy Pune

20 Nov, 04:27


🛑 डेन्मार्कच्या विक्टोरिया केजर हिने मिस युनिव्हर्स 2024 चा किताब पटकावला आहे.

21 वर्षीय विक्टोरियाने ही स्पर्धा जिंकली आहे.

मेक्सिको सिटी मध्ये हि स्पर्धा आयोजित केली होती.

Gavhane Police Academy Pune

20 Nov, 02:09


🔰स्वच्छ गंगा मिशनने विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका प्रकल्प सुरू केला.

🔹नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा रिव्हर डॉल्फिन यांना वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ₹ 1 कोटीच्या बजेटसह एक विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका सादर करत आहे.

🔸'अडव्हान्सिंग रेस्क्यू सिस्टम फॉर द प्रोटेक्शन ऑफ स्ट्रँडेड गंगा नदी डॉल्फिन' या उपक्रमाचा उद्देश डॉल्फिन संवर्धनासाठी जागरूकता आणि सामुदायिक प्रशिक्षणाला चालना देणे हा आहे.

Gavhane Police Academy Pune

20 Nov, 01:59


विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
👉 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
👉 288 जागेसाठी एकूण 4136 उमेदवार

सर्वांनी आवर्जून मतदान करा. आजचा निर्णय येणाऱ्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे.

Gavhane Police Academy Pune

19 Nov, 14:51


के संजय मूर्ती यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

📌 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत.

📌  कार्यकाळ 2029 पर्यंत आहेत.

📌 कार्यकाळ 6 वर्ष / वयाच्या 65 वर्षापर्यंत

📌 कलम 148 - नियंत्रक आणि महालेखापरीक्षक

📌 पगार - अडीच लाख रुपये

📌 पहिले कॅग - व्ही नरहरी राव

Gavhane Police Academy Pune

19 Nov, 01:53


भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे

बंदरे. राज्य

1) कांडला - गुजरात

2) मुंबई - महाराष्ट्र

3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्र

४) मार्मागोवा – गोवा

5) कोचीन - केरळ

6) तुतीकोरीन - तमिळनाडू

7) चेन्नई - तामीळनाडू

8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

9) पारादीप - ओडिशा

10) न्यू मंगलोर - कर्नाटक

11) एन्नोर - आंध्र प्रदेश

12) कोलकाता - पश्चिम बंगाल

13) हल्दिया - पश्चिम बंगाल

Gavhane Police Academy Pune

18 Nov, 15:07


Miss Universe 2024 : डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ.

🏆👉Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’,

▪️विजेती=व्हिक्टोरिया कजेर(डेनमार्क)🏆
▪️पहिली रनरअप= चिडिन्मा अदेत्शिना,(नायजेरिया) 🥇
▪️दुसरी रनरअप =मारिया फर्नांडा बेल्ट्रान,(मेक्सिको)🥈
▪️तिसरी रनरअप = ओपल सुचता चुआंगश्री (थायलंड)🥇

🛑टिपः 73 वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यंदा मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Gavhane Police Academy Pune

18 Nov, 15:06


अनुभवी मुत्सद्दी अनुराग श्रीवास्तव यांची मॉरिशसमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे श्रीवास्तव, 1999 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) मुत्सद्दी, सध्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) मुख्यालयात नेपाळ-भूतान विभागाचे नेतृत्व करणारे संयुक्त सचिव म्हणून काम करत आहेत...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Gavhane Police Academy Pune

18 Nov, 15:05


🏆 IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पंकज अडवाणीने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा 4-2 असा पराभव करत सलग सातवे ऐतिहासिक 28 वे जागतिक विजेतेपद पटकावले ....🏆

▪️विजेता =पंकज अडवाणी🥇
▪️उपविजेता=रॉबर्ट हॉल🥈
▪️ठिकाण=दोहा (कतार)

Gavhane Police Academy Pune

18 Nov, 10:04


📌महत्वाचे पर्यावरणीय कायदे  व धोरणे

जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981
पर्यावरण संरक्षण कायदा 1986
वन्यजीव संरक्षण कायदा 1972
वन संरक्षण अधिनियम 1980
जैवविविधता कायदा 2002
राष्ट्रीय लवाद कायदा, 2010
प्राणी क्रूरता अधिनियम 1960
राष्ट्रीय वन धोरण, 1988
राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006
राष्ट्रीय जल धोरण, 2002

Gavhane Police Academy Pune

17 Nov, 18:06


➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्काराने सन्मान

↪️ पंतप्रधान मोदींना देशाकडून प्रदान करण्यात येणारा हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल.

⭕️ राणी एलिझाबेथ या एकमेव परदेशी मान्यवर आहेत, ज्यांना 1969 मध्ये हा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा पुरस्कार मिळाला आहे.

⭕️ यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे विदेशी असणार आहेत ज्यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे.

Gavhane Police Academy Pune

16 Nov, 11:45


📌वन लाइनर

जर्मनीचे चांन्सलर सध्या कोण आहेत ज्यांनी अलीकडे भारतांचा दौरा केला- ओलाफ शोल्ज

गोव्याच्या मलायका वाझ यांना कोणत्या माहितीपटासाठी 'ग्रीन ऑस्कर' - पुरस्कार 2024 मिळाला - द सॅक्रिफाइस झोन

कोणत्या देशाने 14 वर्षांखालील मुलांसाठी मोफत कर्करोग उपचार देण्याची घोषणा केली- नेपाळ

■ ऑक्टोबर 2024 मध्ये AQI पातळी 708 सह जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून कोणत्या शहराची नोंद झाली आहे - लाहोर

संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे - हिमनद्या संरक्षण वर्ष

■ आशियाई डेव्हलपमेंट बँकेची सदस्य संख्या किती- 69

■ यूएनएचसीआर शरणार्थी पुरस्कार 2024 विजेत्या दीप्ती गुरुंग कोणत्या देशाच्य महिला आहेत - नेपाळ

भारतात नियुक्त करण्यात आलेल्या लिंडी कॅमरुन ह्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला उच्चायुक्त आहेत- ब्रिटन

■ अलीकडेच जेपी मॉर्गन चेस इंडियाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे- प्रणव चावडा

■ रेमन मॅगसेसे पुरस्कार 2024 विजेते 'द रूरल्स डॉक्टर्स मुव्हमेंट' कोणत्या देशातील आहे- थायलंड

सिमबेक्स 2024 व्यायाम भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला आहे- सिंगापूर

■ भारत कोणत्या देशाकडून 31 प्रीडेटर ड्रोन-MQ-9B खरेदी करणार आहे -अमेरिका

Gavhane Police Academy Pune

16 Nov, 07:44


♦️पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा

👉180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर

Gavhane Police Academy Pune

15 Nov, 23:09


👉 भारताचा परदेशातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या - 283

👉 टिलक वर्माचे एका इनिंग मध्ये दोन शतक

👉 बांगलादेश विरुद्ध 22 षटकार मारले होते आज हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिके विरुद्ध 23 षटकार मारून मोडला आहे.

👉 टी - 20 मधील सर्वात मोठी पार्टनरशिप संजू सॅमसंग आणि तिलक वर्मा 210 धावांची बनली आहे.

Gavhane Police Academy Pune

15 Nov, 22:55


🔖 ऑस्कर पुरस्कार 2024 - लक्षात ठेवा

◾️96 वा ऑस्कर पुरस्कार
◾️सर्वोत्कृष्ट फिल्म : ओपनहायमर
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा : सिलियन मर्फी
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एम्मा स्टोन
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दा'वाइन जॉय रँडॉल्फ
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : रॉबर्ट डाउनी जूनियर
◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलन
◾️Best Film Editing : ओपनहायमर
◾️Best Score : ओपनहायमर (13 मानांकने)
◾️सर्वोत्कृष्ट गाणे : What Was I Made For?” from “Barbie”

Gavhane Police Academy Pune

15 Nov, 14:38


🔰 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

❇️ पहिली आणीबाणी 🎲
◾️ 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968
◾️परकीय आक्रमण मुळे लावली होती
◾️चीनचे आक्रमक
◾️पंतप्रधान : पंडित नेहरू होते
⭐️आणीबाणी लागू 26 ऑक्टोबर 1962 ला
⭐️21नोव्हेंबर 1962 ला युद्ध संपले
⭐️पण तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती
⭐️तेवढ्यात एप्रिल 1965 ला पाकिस्तान ने आक्रमक केलं( ऑपरेशन - जिब्राल्टर पाकिस्तान)
⭐️10 जानेवारी 1966 - ताश्कंद करार झाला आणि युद्ध समाप्त झाले ( पंतप्रधान : लाल बहादूर शात्री)
◾️पहिल्या आणीबाणी मध्ये भारत - चीन आणि भारत- पाकिस्तान ही दोन्ही युद्धे झाली
◾️जानेवारी 1968 मध्ये पाहिली आणीबाणी संपली

❇️ दुसरी आणीबाणी 🎲
◾️1971: भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान.
◾️3 डिसेंबर 1971 - 21 मार्च 1977 (बाह्य आक्रमक).
◾️हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी काढली नाही
◾️अशातच दुसरी आणीबाणी सुरू असतानाच तिसरी आणीबाणी लागू केली

❇️ तिसरी आणीबाणी 🎲
◾️25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली
◾️21 महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती.
◾️पंतप्रधान : इंदिरा गांधी

दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकदाच 1977 साली संपविण्यात आली 🫣

🔖 आणीबाणी विषयक कलमे

◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◾️कलम 356  - राज्य आणीबाणी
◾️कलम 360 - आर्थिक आणीबाणी

25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे

Gavhane Police Academy Pune

14 Nov, 02:47


प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. बऱ्याच मुलांनी प्रश्न व्यवस्थित वाचला नाही. आणि या कारणामुळे च पेपर मध्ये सुद्धा silly mistake होते. व हातातला एक मार्क्स जाऊन आपण 500-600 मुलांच्या मागे पडतो.
त्यामुळे प्रश्न सोडवताना व्यवस्थित वाचून च सोडवत चला .

Gavhane Police Academy Pune

14 Nov, 02:35


नोव्हेंबर मधील महत्त्वाचे दिवस

5 नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागरुकता दिवस

7 नोव्हेंबर - राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस

8 नोव्हेंबर - जागतिक रेडिओग्राफी दिवस

9 नोव्हेंबर - राष्ट्रीय विधी सेवा दिन

10 नोव्हेंबर - शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन, जागतिक लसीकरण दिवस

11 नोव्हेंबर - राष्ट्रीय शिक्षण दिन

12 नोव्हेंबर - जागतिक निमोनिया दिन

13 नोव्हेंबर - जागतिक दया दिवस

14 नोव्हेंबर - बालदिन, जागतिक उपयोगिता दिवस, जागतिक मधुमेह दिन

16 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, राष्ट्रीय पत्रकार दिन

17 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

19 नोव्हेंबर - जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

20 नोव्हेंबर - जा. बालदिन

21 नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिन

25 नोव्हेंबर - महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

26 नोव्हेंबर - भारताचा संविधान दिन

Gavhane Police Academy Pune

13 Nov, 15:31


➡️ अभिनेते सोनू सूद यांची थायलंड पर्यटनासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Gavhane Police Academy Pune

13 Nov, 15:31


➡️बुकर पारितोषिक 2024 : ब्रिटिश लेखिका समंथा हार्वे यांनी 'ऑर्बिटल'साठी बुकर पारितोषिक

Gavhane Police Academy Pune

13 Nov, 06:34


🔰भारतातील बँकिंग व्यवसाय

भारतातील पहिली बँक- बैंक ऑफ हिंदुस्तान

भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक - अवध कमर्शिअल

■ पहिली पूर्ण भारतीय बँक - पंजाब नॅशनल बँक

■ भारतातील सर्वात मोठी बँक - स्टेट बँक ऑफ इंडिया

■ जगातील सर्वात मोठी बँक - बँक ऑफ चायना

■ भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक - स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक(यूके)

■ परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक - स्टेट बँक ऑफ इंडिया

■ भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी पहिली बँक - बेंगाल बँक

■ भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी - प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल

■ इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक - ICICI Bank

■ क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक - Central Bank

■ ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक - एच एस बी सी

■ म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक - *स्टेट बँक ऑफ इंडिया**

■ सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक - अलाहाबाद बँक

Gavhane Police Academy Pune

01 Nov, 12:38


🛑समान नागरी कायदा लवकरच एक देश एक निवडणूक ल देखील लवकरच मंजुरी..


कलम 44 नुसार समान नागरी कायदा

1867 गोवा प्रथम राज्य समान नागरी कायदा असलेले

2024 मध्ये उत्तराखंड या राज्याने सुद्धा समान नागरी कायदा लागू केला (स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य)

Gavhane Police Academy Pune

01 Nov, 03:48


गव्हाणे पोलिस अकॅडमी परिवाराकडून सर्व विद्यार्थी मित्र - मैत्रिणींना दिवाळी च्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤️
तुम्हा सर्वांची पुढील दिवाळी नक्कीच वर्दीत🚨 साजरी होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

Gavhane Police Academy Pune

01 Nov, 02:22


बीपीएल ग्रुपचे संस्थापक टीपी गोपालन नांबियार यांचे गुरुवारी (ता. 31 ऑक्टोबर) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नांबियार हे 94 वर्षांचे होते. गुरुवारी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास त्यांची बंगळुरू येथील राहत्या घरी प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून नांबियार यांची प्रकृती ठीक नव्हती. ज्यानंतर आज अखेरीस त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याकडून सांगण्यात आले.

Gavhane Police Academy Pune

31 Oct, 08:09


♦️लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐

👉 31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन 

👉त्यांच्या मेहनतीमुळंच देशातील विविध संस्थानं भारतात विलीन झाली. म्हणूनच त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 

👉स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची - 182 मीटर

Gavhane Police Academy Pune

31 Oct, 04:40


महाराष्ट्रातील पहिले गाव :- 👇👇


1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)


6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)


11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती - पुणे)
13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर)
14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव)
15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)


16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता - अहमदनगर)
17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड - सातारा)
18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती - पुणे)
19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर)
20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा)


21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ)
22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे)
23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर)
24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा)
25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)


26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर - पुणे)
27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर)
28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक)
29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर)
30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर)


31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली)
32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे)
33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी)
35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर)


36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली)
37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे)
38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक)
39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे)
40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली)


41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड)
42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा)
43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक)
44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली)


46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक)
47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर)
48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड)
49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग)
50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर)


51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे)
52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे)
53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)
54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे)
55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा)

JOIN TELEGRAM CHANNEL
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/punepolicebharti

Gavhane Police Academy Pune

31 Oct, 04:30


🏆100% येणारा प्रश्न (IMP)

🛑 2026 हे वर्ष ' जागतिक महिला शेतकरी वर्ष ' म्हणून घोषित.

Gavhane Police Academy Pune

31 Oct, 03:24


पॅरिसमध्ये 28 ऑक्टोबर रोजी 68 वा बॅलन डी’ओर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पॅरिसमध्ये अनेक आजी-माजी दिग्गज फुटबॉलपटूंनी हजेरी लावली होती. या दिमाखदार सोहळ्यात मानाचा डी’ओर पुरस्कार देण्यात आला. यंदा पहिल्यांदाच दिग्गज लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. दरम्यान, यंदा डी’ओर पुरस्काराचा मानकरी स्पेन आणि मँचेस्टर सिटी एफसी क्लबचा रोद्री हा ठरला आहे...👍


Join channel :- t.me/punepolicebharti

Gavhane Police Academy Pune

31 Oct, 03:22


भारतातील पहिले लेखकाचे गाव डेहराडूनमध्ये उघडले.

➡️भारतातील पहिल्या 'लेखकाचे गाव' डेहराडूनमध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते, उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले...👍

Gavhane Police Academy Pune

31 Oct, 03:15


🛑 फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी'ओर.

👉 यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले.

👉 यंदा बॅलोन डी'ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार युवा खेळाडू स्पेनचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ कॅसकांटने शॅटलेट थिएटरमध्ये बॅलोन डी'ओर जिंकला.

👉 त्याला त्याचे चाहते रोड्री या नावाने ओळखतात. तो मँचेस्टर सिटीसाठी क्लब फुटबॉल खेळतो.

Gavhane Police Academy Pune

31 Oct, 02:38


🛑 इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे.

१)  १७७३   -   रेग्युलेटिंग ॲक्ट
२)  १८२२   -   कुळ कायदा
३)  १८२९   -   सतीबंदी कायदा
४)  १८३५   -   वृत्तपत्र कायदा
५)  १८५४   -   वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)  १८५६   -   विधवा पुनर्विवाह कायदा
७)  १८५८   -   राणीचा जाहीरनामा
८)  १८५९   -   बंगाल रेंट ॲक्ट
९)  १८६०   -   इंडियन पिनल कोड
१०) १८६१  -   इंडियन हायकोर्ट ॲक्ट
११) १८७०  -   आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८  -   व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२  -   देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३  -   इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७  -   कुळ कायदा
१६) १८९२  -   कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९  -   भारतीय चलन कायदा
१८) १९०१  -  पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४  -  भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४  -  प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४  -  सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९  -  मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९  -  मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)  १९१९ -  रौलेक्ट कायदा
२५)  १९३५ -  भारत सरकार कायदा
२६)  १९४४ -  राजाजी योजना
२७)  १९४५ -  वेव्हेल योजना



Join:- Gavhane Police Academy https://t.me/punepolicebharti

Gavhane Police Academy Pune

20 Oct, 06:35


✡️ राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा

👉भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
👉राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
👉त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
👉त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले आहेत.
👉जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.

✡️ राष्ट्रीय महिला आयोग :

✔️भारत सरकारची वैधानिक संस्था
✔️1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार
✔️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

Gavhane Police Academy Pune

20 Oct, 06:31


🛑 लिओनेल मेस्सीला पहिला मार्का अमेरिका पुरस्कार मिळाला.

👉 अर्जेंटिनाचा फुटबॉल लिओनेल मेस्सीला पहिल्या मार्का अमेरिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Gavhane Police Academy Pune

18 Oct, 05:40


📌मिस इंडिया.

2024 =निकिता पोरवाल (मध्य प्रदेश)

2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)

Gavhane Police Academy Pune

18 Oct, 02:46


🚓 गव्हाणे पोलिस अकॅडमी 🚓

निवडणूक आयोगाबद्दल महत्वाची माहिती

👉स्थापना - 25 जानेवारी 1950

👉 सदस्य कार्यकाळ - 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
👉सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
👉पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन
👉पहिली महिला निवडणूक आयुक्त - रमा देवी
👉25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
👉भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे.
👉भारतीय निवडणूक आयोग -  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
👉राज्य निवडणूक आयोग - राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका


⭕️ हे लक्षात ठेवा👇👇

👉श्री राजीव कुमार - भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
👉श्री ज्ञानेश कुमार - भारताचे निवडणूक आयुक्त
👉डॉ सुखबीर सिंग संधू - भारताचे निवडणूक आयुक्त
👉एस. चोकलिंघम - महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी

Gavhane Police Academy Pune

18 Oct, 02:42


⭕️ महाराष्ट्र विधानसभा एकाच टप्प्यात

महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा👇👇👇👇

👉एकूण जिल्हे : 36
👉एकूण मतदारसंघ : 288
👉सर्वसाधारण मतदारसंघ : 234
👉SC मतदारसंघ :29
👉ST मतदारसंघ : 25
👉मतदान केंद्र : 1 लाख 183
👉एकूण मतदार : 9 कोटी 63 लाख
👉पुरुष मतदार : 4 कोटी 97 लाख
👉महिला मतदार : 4 कोटी 66 लाख
👉तृतीयपंथीय मतदार :5997
👉नवीन मतदार : 20 लाख 93 हजार
👉तरुण मतदार : ️1.85 कोटी
👉एकूण मतदान केंद्रे - 1,00186
👉शहरी केंद्रे - 42602
👉ग्रामीण केंद्र - 57558
👉Pwd Managed बूथ - 299
👉महिला Managed बूथ - 388

👉20 नोव्हेंबर ला मतदान

👉 23 नोव्हेंबर ला निकाल

Gavhane Police Academy Pune

18 Oct, 02:33


🛑 महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर...

👉 महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे.

👉 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असतो.

👉 महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1993 रोजी झालेली आहे.

Gavhane Police Academy Pune

18 Oct, 02:31


🏆 पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार.

Gavhane Police Academy Pune

18 Oct, 02:29


⚜️संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश⚜️

❇️भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना उत्तराधिकारी म्हणून औपचारिकपणे प्रस्तावित केले आहे.

❇️ केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, मी 11 नोव्हेंबर रोजी पद सोडत असल्याने न्यायमूर्ती खन्ना त्यांचे उत्तराधिकारी असतील.

❇️सरकारने मान्यता दिल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश होतील.

❇️त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल.

Gavhane Police Academy Pune

18 Oct, 02:28


नायबसिंह सैनि  हरियाणाचे मुख्यमंत्री

Gavhane Police Academy Pune

17 Oct, 03:00


*निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी किती वय असावे*

● *लोकसभा निवडणूक : 25 वर्षे*
● *राज्यसभा निवडणूक : 30 वर्षे*

● *विधानसभा निवडणुक : 25 वर्षे*
● *विधानपरिषद निवडणूक : 30 वर्षे*

● *राष्ट्रपती निवडणूक : 35 वर्षे*
● *राज्यपाल निवडणूक : 35 वर्षे*
● *उपराष्ट्रपती निवडणूक - 35 वर्षे*

● *पंतप्रधान होण्यासाठी : 25 वर्षे*
● *मुख्यमंत्री होण्यासाठी : 25 वर्षे*
● *सरपंच होण्यासाठी : 21 वर्षे*

Gavhane Police Academy Pune

16 Oct, 05:52


🛑 2024 चे सर्व नोबेल पुरस्कार :-

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग ( दक्षिण कोरिया )

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉 निहोन हिडांक्यो संस्था ( जपान )

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड

👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर

👉 डेमिस हसाबिस

👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस

👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेरॉन ऐसमोग्लू

👉 साइमन जॉनसन

👉 जेम्स रॉबिन्सन

Gavhane Police Academy Pune

15 Oct, 10:58


◾️15 ऑक्टोबर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो
राज्यात 15 ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’ माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस
◾️महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस ◾️
⭐️महाराष्ट्र दिन - 1 मे (1960)
⭐️महाराष्ट्र पंचायतराज स्थापना - 1 मे (1962)
⭐️हुतात्मा स्मृती दिवस - 21 नोव्हेंबर
⭐️बालिका दिवस -  3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
⭐️पत्रकार दिन - 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर जयंती)
⭐️राज्य क्रीडा दिन - 15 जानेवारी (खाशाबा जाधव जन्मदिवस)
⭐️सिंचन दिवस - 26 फेब्रुवारी ( शंकराव चव्हाण स्मृती)
⭐️महाराष्ट्र राजभाषा दिन - 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज जयंती)
⭐️उद्योग दिन महाराष्ट्र - 10 मार्च (लक्ष्मण किर्लोस्कर स्मृतीदिन)
⭐️समता दिवस - 12 मार्च (यशवंतराव चव्हाण जन्मदिन)
⭐️शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल (जोतिबा फुले जयंती)
⭐️ज्ञान दिवस -14 एप्रिल (डॉ बाबासाहेब जन्मदिवस)
⭐️महाराष्ट्र दिन : 1 मे
⭐️शिवस्वराज्य दिन - 6 जून
⭐️सामाजिक न्याय दिन - 26 जून (शाहू महाराज जयंती)
⭐️कृषि दिन - 1 जुलै (वसंतराव नाईक जयंती)
⭐️शेतकरी दिन - 29 ऑगस्ट 
⭐️रेशीम दिवस - 1 सप्टेंबर
⭐️श्रमप्रतिष्ठा दिन - 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव जयंती)
⭐️राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर
⭐️ ज्येष्ठ नागरिक दिवस - 1 ऑक्टोबर
⭐️रंगभूमी दिवस - 5  नोव्हेंबर (विष्णुदास भावे जयंती)
⭐️विद्यार्थी दिन - 7 नोव्हेंबर (डॉ बाबासाहेबांच्या स्मरणार्थ)
⭐️जैवतंत्रज्ञान दिवस  - 14 नोव्हेंबर
⭐️हुंडाबंदी दिवस - 26 नोव्हेंबर
जयंती आणि दिवस व्यवस्थित लक्षात ठेवा यावरती आले आहेत प्रश्न

Gavhane Police Academy Pune

15 Oct, 10:58


🎓 चर्चेतील मुद्दा - निवडणूक आयोग 🎓
⭐️स्थापना : 25 जानेवारी 1950
⭐️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
⭐️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
⭐️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
⭐️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी
⭐️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
⭐️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे
◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका
🫥
☕️ हे लक्षात ठेवा
◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️डॉ सुखबीर सिंग संधू: भारताचे निवडणूक आयुक्त
◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी

Gavhane Police Academy Pune

15 Oct, 10:54


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024

👉महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा
◾️एकूण जिल्हे : 36
◾️एकूण मतदारसंघ : 288
◾️सर्वसाधारण मतदारसंघ : 234
◾️SC मतदारसंघ :29
◾️ST मतदारसंघ : 25
◾️मतदान केंद्र : 1 लाख 183
◾️एकूण मतदार : 9 कोटी 63 लाख
◾️पुरुष मतदार : 4 कोटी 97 लाख
◾️महिला मतदार : 4 कोटी 66 लाख
◾️तृतीयपंथीय मतदार :5997
◾️नवीन मतदार : 20 लाख 93 हजार
तरुण मतदार : ️1.85 कोटी
◾️एकूण मतदान केंद्रे - 1,00186
◾️शहरी केंद्रे - 42602
◾️ग्रामीण केंद्र - 57558
◾️Pwd Managed बूथ - 299
◾️महिला Managed बूथ - 388

20 नोव्हेंबर ला मतदान

23 नोव्हेंबर ला निकाल 🚨

Gavhane Police Academy Pune

15 Oct, 10:54


रतन टाटा बाबत Exam दृष्टीने IMP माहिती

❇️ महाराष्ट्र उद्योग रत्न - 2023

❇️ पद्म भूषण - 2000

❇️ महाराष्ट्र भूषण - 2006

❇️ पद्म विभूषण - 2008

❇️ आसाम वैभव - 2021

❇️ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया - 2023

❇️ Tata संस चे मानद अध्यक्ष - 2012

❇️ Tata industry चे अध्यक्ष - 1981

❇️ books - फ्रॉम स्टील टू सेल्युलर

Gavhane Police Academy Pune

12 Oct, 10:00


🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस

👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड

👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर

👉 डेमिस हसाबिस

👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉 "निहोन हिडांक्यो"