1935 च्या भारत सरकार कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली.
घटनात्मक तरतुदीः राज्यघटनेच्या भाग 5 मधील अनुच्छेद 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची संघटना, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र, अधिकार, कार्यपद्धती आणि इतर गोष्टींची तरतूद आहे.
रचनाः सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताच्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायाधीशांचा समावेश आहे.
भारताचे राष्ट्रपती त्यांची नियुक्त करतात.
1950 च्या मूळ राज्यघटनेत सरन्यायाधीश आणि 7 न्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाची रचना करण्यात आली होती आणि ही संख्या वाढवण्याचे अधिकार संसदेकडे आहेत.