मायमराठी वर्ल्ड © @maaymarathiworld Channel on Telegram

मायमराठी वर्ल्ड ©

@maaymarathiworld


सरकारी योजना तसेच सरकारी जॉब्स विषयीची माहिती 🎯

https://www.facebook.com/maaymarathiworldmedia

instagram: @maaymarathiworld

आपल्या शंका व सुचना कळवण्यासाठी येथे मेसेज करा : @maaymarathiworldbot 📣

मायमराठी वर्ल्ड © (Marathi)

मायमराठी वर्ल्ड चे अधिक मराठी पाठकांसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे. या चॅनेलवर सरकारी योजना, सरकारी जॉब्स, विविध माहिती, इतर समाचार आणि मराठी भाषेतील विविध विषयांची माहिती सामायिक केली जाते. या चॅनेलवर तुमच्याला प्रत्येकाला एक नवीन प्रेमियांसाठी सर्वोत्तम संधी आहे. चॅनेलवर सर्व वर्षातील आणि वर्तमान समयातील महत्वाचे घडामोडी समाविष्ट होतात. मायमराठी वर्ल्ड च्या सोशल मिडिया संपर्कात राहा, फेसबुकवर 'maaymarathiworldmedia' आणि इंस्टाग्रामवर '@maaymarathiworld' याच्यामार्गे त्यांच्याशी जुळून रहा. आपल्याला कोणत्याही शंका आहेत किव्हा सुचना लागली तर कृपया '@maaymarathiworldbot' याला मेसेज करा आणि त्यांच्यातून त्वरित उत्तर प्राप्त करा. मायमराठी वर्ल्ड चा स्वागत आहे आणि आपल्याला त्यांचं सामर्थ्य वाढवण्यात मदत करण्यात आम्ही आनंद घेऊन आहोत! 🎯✨📣

मायमराठी वर्ल्ड ©

23 Sep, 12:36


🥳लाडक्या बहिणींना 'या' तारखेला मिळणार तिसरा हप्ता!

💁‍♀️ राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबरला होणार आहे.

🤗 याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिली आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

मायमराठी वर्ल्ड ©

15 Aug, 05:07


🔎 तुमच्या पॅन कार्ड नंबरचा गैरवापर करून कुणी कर्ज घेतलंय का? पाहा!

📍 पॅन कार्ड नंबरचा गैरफायदा घेत कुणीतरी कर्ज घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

💁‍♂️ तुमच्या पॅनकार्डसोबतही अशीच छेडछाड होऊ शकते हा धोका ओळखून तुम्ही देखील अशाच फ्रॉडचे बळी ठरलेले तर नाही ना? हे नक्कीच तपासू शकता.

🤓 सध्या पॅनकार्ड नंबरचा दुरूपयोग केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत त्यामुळे पॅन कार्ड शेअर करताना काळजी घ्या.

💫 पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तुम्ही बँकेचे कर्जदार बनता सोबतच तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. म्हणून जाणून घ्या कसे रहाल सुरक्षित?

● पॅन नंबरचा गैरवापर झालाय का? हे तुम्ही क्रेडिट स्कोअर जनरेट करून तपासू शकता.
● CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark यांच्या माध्यमातूनही तुमच्या नावावर कुणी कर्ज घेतलय का? हे तपासू शकता.
● Paytm किंवा Bank Bazaar या fintech platforms वरून देखील कर्जाची माहिती मिळू शकते.
● तुमचं नाव, जन्मतारीख, तुमच्‍या पॅन कार्ड तपशीलांसह तुम्ही पडताळणी करू शकता.

👍 फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी... :

● तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार क्रमांक कोणाशीही शेअर करू नये. कारण ही कागदपत्रे अत्यंत गोपनीय असतात.
● जर पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या फोटोकॉपी शेअर करणे अनिवार्य असेल तर त्या फोटोकॉपीवर शेअर करण्याचा उद्देश लिहावा. चित्रावर ओळीचा काही भाग दिसेल अशा प्रकारे लिहा.

🎯 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


@maaymarathiworld ♥️

मायमराठी वर्ल्ड ©

13 Aug, 07:23


खूप जणांचे मेसेज येत आहेत की लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म वेबसाईट वर कसा भरायचा ?

मायमराठी वर्ल्ड ©

12 Aug, 14:51


लाडकी बहीण योजने संदर्भातील काही अपडेट्स -

1) 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांनाच येणारा 17 ऑगस्ट रोजी हप्ता मिळेल, ज्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये असतील किंवा review मध्ये असतील, त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये हप्ता मिळेल.

2) नारीशक्ती दूत ॲप मध्ये फॉर्म भरू शकत नाही त्यांनी नवीन अर्ज बंद केले आहेत.
लाडकी बहीण वेबसाईट वर फॉर्म भरू शकता.

3) आधार ला बँक सीडिंग नसेल तर लगेच पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन डिजिटल अकाउंट IPPB उघडून घ्या आधार seeding दोन ते तीन दिवसात होऊन जाते. फॉर्म भरताना कोणतेही अकाउंट दिले असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आधारला जे बँक सीडिंग म्हणजेच लिंक आहे त्याच बँकेत पैसे जमा होतील. 👍

मायमराठी वर्ल्ड ©

23 Jul, 15:34


केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 - मराठीतून

मायमराठी वर्ल्ड ©

08 Jul, 08:18


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

◆ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन Narishakti Doot नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे. ते केलं की पुढे या application विषयी माहिती दिलेली दिसेल.

● त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या terms and conditions accept करायच्या आहेत. मग लॉग-इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

● त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो टाकून Verify OTP वर क्लिक करायचं आहे. मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे.

● यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी टाकायचा आहे. पुढे जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक) निवडायचा आहे. मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे.

● मग नवीन पेज ओपन होईल. इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल.

● narishakti dootसुरुवातीला अर्जदार महिलेची वैयक्तिक माहिती भरायची आहे.

● यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक टाकायचं आहे.

● पुढे अर्जदाराचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण- जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे.

● शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करायची आह
पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडायचा आ
अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे.

● यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे.

● आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे.

●  narishakti doot लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत. आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र - 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक.

● उत्पन्न प्रमाणपत्र -अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.

● अर्जदाराचे हमीपत्र - अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, त्याचा नमुना खालील Accept हमीपत्र इथं दिलेला आहे. एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून इथं डाऊनलोड करू करू शकता.

●अर्जदाराचा फोटो - कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे.

● narishakti doot हमीपत्राचा नमुना
Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

● त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

● त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल. मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल. तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल. जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल.
अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

मायमराठी वर्ल्ड ©

24 Aug, 07:56


🏫 (PMC Panvel) पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी भरती

🟰 Total: 377 जागा


✔️ पदाचे नाव & तपशील:
1 माता व बाल संगोपन अधिकारी अ-01
2 क्षयरोग अधिकारी अ- 01
3 हिवताप अधिकारी अ - 01
4 वैद्यकीय अधिकारी अ - 05
5 पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) अ- 01
6 महापालिका उप सचिव ब- 01
7 महिला व बाल कल्याण अधिकारी ब- 01
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी ब- 01
9 सहायक नगररचनाकार ब- 02
10 सांख्यिकी अधिकारी ब-01
11 उप मुख्य अग्निशमन अधिकारी ब -01
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी क -04
13 प्रमुख अग्निशमन विमोचक क -08
14 अग्निशामक क- 72
15 चालक यंत्र चालक क -31
16 औषध निर्माता क -01
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) क -02
18 अधि. परिचारिका (GNM) क -07
19 परिचारिका (ANM) क -25
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) क -07
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत) क -06
22 कनिष्ठ अभियंता (संगणक) क -01
23 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) क -16
24 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) क -01
25 सर्व्हेअर/भूमापक क -04
26 आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) क -03
27 सहायक विधी अधिकारी क -01
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क -01
29 सहायक क्रीडा अधिकारी क -01
30 सहाय क ग्रंथपाल क -01
31 स्वच्छता निरीक्षक क -08
32 लघु लिपिक टंकलेखक क 02
33 लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) क-01
34 कनिष्ठ लिपिक (लेखा) क -05
35 कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) क -03
36 लिपिक टंकलेखक क -118
37 वाहनचालक (जड) क -10
38 वाहनचालक (हलके) क -09
39 व्हॉलमन / कि-किपर क -01
40 उद्यान पर्यवेक्षक क -04
41 माळी ड -08


🧑‍🎓👩‍💼 शैक्षणिक पात्रता:

गट-अ (पद क्र.1 ते 5): MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
गट-ब (पद क्र.6 ते 11): (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
गट-क (पद क्र.12 ते 40): पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
गट-ड (पद क्र.41): 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

🔞 वयाची अट: 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व
अनाथ: 05 वर्षे सूट]

▪️नोकरी ठिकाण: पनवेल

💰Exam Fee:

खुला प्रवर्गमा - मा गासवर्गीय व अनाथ
गट-अ & ब (पद क्र.1 ते 11) ₹1000/- ₹900/-
गट-क (पद क्र.12 ते 40) ₹800/- ₹700/-
गट-ड (पद क्र. 41) ₹600/- ₹500/-

👩‍💻🧑‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2023 31 ऑगस्ट 2023 (11:55 PM)


📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1G3jWhQkSK2Kt84btQPnF1Hu-0gOmuebV/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

24 Aug, 01:53


🚨 (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022

📝 परीक्षेचे नाव: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022

🟰 Total: 823 जागा


✔️ पदाचे नाव & तपशील:

दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 78जागा

राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 93जागा

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 49जागा

पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) -603जागा

👩‍🎓🧑‍🎓 शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक):

👨🏻‍💼 पुरुष

उंची- 165 से.मी उंची- 157 से.मी
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

👩🏻‍💼 महिला

उंची- 157 से.मी

🔞 वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे

💰💸 EXAM Fee: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

📚 परीक्षा
1 मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 01 ऑक्टोबर 2023
2 पेपर क्र.2 – दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 07 ऑक्टोबर 2023
3 पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक (गट-ब) 14 ऑक्टोबर 2023
4 पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 22 ऑक्टोबर 2023
5 पेपर क्र.2 –पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 29 ऑक्टोबर 2023

परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1-xBeYpKBK0wyYc98nbCWZzn2t3pW7IKc/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

22 Aug, 17:14


इस्रो.. बेस्ट लक 🙂❤️

उद्या संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.

1.
*रफ ब्रेकिंग फेज* :*

25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .

2.
*Atitude Holding फेज*

"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.

3.
*Fine ब्रेकिंग फेज*

175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.

4.
*टर्मिनल डीसेंट फेज*

हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल 🙂.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. 🙂🙂

5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.

ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. 🙂🙏🏽

🇮🇳 चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.

ISRO Website https://isro.gov.in

YouTube https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

Facebook https://facebook.com/ISRO

DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.

मायमराठी वर्ल्ड ©

19 Aug, 13:29


🚨🏫 (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती


🟰 Total: 226 जागा

✔️ पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)

👨🏻‍💼👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण (ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. (v) MS-CIT


🔞 वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]



▪️नोकरी ठिकाण: मुंबई



💰💸 exam Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]


👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023


📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1zns8stIVT5U55vO-lgslW7VfYTcLQPBm/view


ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

19 Aug, 08:00


🚨 (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1191 जागांसाठी भरती


🟰 Total: 875 जागा



✔️ पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस


ITI ट्रेड अप्रेंटिस
1 COPA -224जागा
2 फिट -222जागा
3 इलेक्ट्रिशियन - 225जागा
4 वेल्डर (G&E)- 52जागा
5 सर्व्हेअर-09जागा
6 मेकॅनिक (डिझेल)-42जागा
7 वायरमन-19जागा
8 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)-08जागा
9 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-06जागा
10 टर्नर 03जागा
11 मशीनिस्ट-05जागा
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01 सिक्योरिटी गार्ड-60जागा

🧑‍💼 शैक्षणिक पात्रता:

ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.

🔞 वयाची अट: 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌍 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश

💰Exam Fee: फी नाही.

🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1ISoxAhiE_nKNosI8_MOj2fIQIaMPVkvT/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

19 Aug, 04:37


👨🏻‍💼👩🏻‍💼 (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाची भरती


📝 परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)


🟰 Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. Not Specified.

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर


🧑‍🎓 शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.


🔞 वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


💰💸 EXAM Fee: General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]


🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (05:00 PM)


CBT परीक्षा:
Stage I: 17 सप्टेंबर 2023
Stage II: 07 ऑक्टोबर 2023


📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1N41eLoapCMQzbtdxko-05Wiz2cQYDbmL/view


ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

18 Aug, 12:09


✈️🚁 (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांसाठी भरती



🟰 Total: 342 जागा

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव

1 ज्युनियर असिस्टंट (ऑफिस)-09जागा
2 सिनियर असिस्टंट (अकाउंट्स)-09जागा
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर)-237जागा
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स)-66जागा
5 ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस)-03जागा
6 ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ)-18जागा


👩‍🎓🧑‍🎓 शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: (i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4: (i) B.Com (ii) ICWA/CA/MBA (फायनान्स)
पद क्र.5: B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
पद क्र.6: विधी पदवी (LLB)


🔞 वयाची अट:
04 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत

पद क्र.3 ते 6: 27 वर्षांपर्यंत


🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


💰💸 EXAM Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]



👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
04 सप्टेंबर 2023

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1yNQ9eaGWKL-afG83n-5Q_YVeESaOeQZO/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

10 Aug, 11:02


MOIL Bharti 2023 : मॉयल लिमिटेड (MOIL) अंतर्गत विविध पदांची भरती

एकूण पदे : २१
पदांचे नाव : 

१)पदवीधर ट्रेनी (मायनिंग) - १५
२)पदवीधर ट्रेनी (मेकॅनिकल) - ०४
३)मॅनेजर (सर्व्हे) - ०२

शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ – ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
पद क्र. २ – ६०% गुणांसह पदवीधर + खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा + सर्वेअर प्रमाणपत्र + ०२ वर्ष अनुभव किंवा खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०४ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 
पद क्र. १ – १८ ते ३० वर्ष
पद क्र. २ – २१ ते ३५ वर्ष
अर्ज फी :
खुला/ ओबीसी/ EWS – ५९०/- रुपये
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही
नोकरी स्थान : महाराष्ट्र व मध्यप्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३

आवेदन लिंक -
https://ibpsonline.ibps.in/moilgtjun23/

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

10 Aug, 08:02


HDFC Life Work From Home Job 2023 | HDFC बँकेत घरबसल्या काम करण्याची सुवर्णसंधी । त्वरित करा अर्ज

कंपनीचे नाव : HDFC LIFE
पदाचे नाव – Financial Consultant
पदसंख्या : mentioned केल्या नाहीत
अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम
अर्जपद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 18 वर्ष
अर्ज शुल्क – फ्री आहे
निवडप्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिलेली नाही
अधिकृत वेबसाईट – www.hdfclife.com

आवेदन लिंक -
https://www.hdfclife.com/digifc/become-a-financial-consultant#registration

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

10 Aug, 04:49


मनमंदिर सहकारी बँक लि विटा (सांगली) भरती २०२३

एकूण पदे : ०७
पदांचे नाव : 
१. शाखाधिकारी ०५
२. आय. टी ऑफिसर ०२

शैक्षणिक पात्रता :

शाखाधिकारी - किमान पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक तसेच MBA/ HDC/ DCBM/ DCB/ DCM/ GDC&A
आय. टी ऑफिसर - BCA/ MCA/ BCS/ B.E/ B.E (IT)

अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सांगली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मनमंदिर सहकारी बँक लि., एसटी स्टँड जवळ, विटा, ता. खानापूर, जि. सांगली – ४१५३११
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२३

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1aifK4tHxMSLFrtMfEVf7JAM9PtgSxP8M/view?usp=drivesdk

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

08 Aug, 10:30


भारतीय नौदल भरती २०२३
एकूण पदे : ३५
पदांचे नाव : शोर्ट सर्विस कमिशन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ IT/ सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन आणि नेटवर्किंग/ कॉम्पुटर सिस्टम्स आणि नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स विषयात किंवा MCA + BCA/ B.Sc (कॉम्पुटर सायन्स + IT)
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जुलै २००४ दरम्यान
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1F58UGHhD2EzZGdzHUTH6SI67bP2CFjP9/view?usp=drivesdk

आवेदन लिंक -

https://www.joinindiannavy.gov.in/en

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

08 Aug, 03:37


SSC Stenographer Bharti 2023 | SSC मार्फत “स्टेनोग्राफर” पदाची १२०७ रिक्त पदांसाठी भरती

Total post(एकूण पदे) : १२०७

Post Name (पदाचे नाव) :
stenographer(स्टेनोग्राफर) ग्रेड C व D

Education Qualification ( शैक्षणिक पात्रता) : १२ वी उत्तीर्ण

Age Limit( वयोमर्यादा) :
ग्रेड ‘C’ – १८ ते ३० वर्ष
ग्रेड ‘D’ – १८ ते २७ वर्ष
SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट

Pay Scale(पगार) :
अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Application Mode(आवेदन अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन

Job Location(नोकरीचे ठिकाण) :संपूर्ण भारत

Exam Fees( परीक्षा शुल्क) :
जनरल/ओबीसी/₹100/-
मागासवर्गीय/ महिला – फी नाही

Last Date Of Application is (शेवटची तारीख) : २३ ऑगस्ट २०२३

पेपर 1 दिनांक :
12th & 13th October 2023

जाहिरात -

https://drive.google.com/file/d/1hfRRmpnhnVqFxuPan1E_zA3qgJl6mS4O/view?usp=drivesdk

आवेदन लिंक -

https://ssc.nic.in/

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️

मायमराठी वर्ल्ड ©

07 Aug, 12:31


Airports Authority of India Bharti 2023  भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 342 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु 

Eligibility Criteria for Airports Authority of India Bharti 2023 -

Total post(एकूण पदे) : 342

Post Name (पदाचे नाव) :
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस)
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स)
ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर)
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स)
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस)
ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ)

Education Qualification ( शैक्षणिक पात्रता) :
1) पदवीधर
2) i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
3) कोणत्याही शाखेतील पदवी
4) (i) B.Com (ii) ICWA/CA/MBA (फायनान्स)
5) B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
6) विधी पदवी (LLB)

Age Limit( वयोमर्यादा) :
27 ते 30 वर्षांपर्यंत 

SC/ST/PWD/महिला: फी नाही

Pay Scale(पगार) :
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) – Rs.31000-92000
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) – Rs.36000-110000
ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) – Rs.40000-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) – Rs.40000-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) – Rs.40000-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) – Rs.40000-140000

Application Mode(आवेदन अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन
Job Location(नोकरीचे ठिकाण) :
संपूर्ण भारत
Exam Fees( परीक्षा शुल्क) :
जनरल/ओबीसी/₹100/-
Last Date Of Application is( शेवटची तारीख) :
04 सप्टेंबर 2023
अर्ज सुरु होण्याची तारीख:
5 ऑगस्ट 2023

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1yNQ9eaGWKL-afG83n-5Q_YVeESaOeQZO/view?usp=drivesdk

आवेदन लिंक -
https://www.aai.aero/en/careers/recruitment

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️