Krushiganga Pariwar @krushiganga Channel on Telegram

Krushiganga Pariwar

@krushiganga


Krushiganga Pariwar (Hindi)

कृषिगंगा परिवार चैनल कानपूर के एक प्रमुख किसान संगठन के लिए एक लोकप्रिय Telegram चैनल है। यहाँ किसानों के लिए उपयोगी और महत्वपूर्ण जानकारी साझा की जाती है, जैसे कृषि विशेषज्ञों के सलाह, खेती से संबंधित नए तकनीकी उपाय और उत्पादों की बिक्री के लिए टिप्स।nnइस चैनल के माध्यम से किसान समुदाय को एक साथ लाने और उनकी समस्याओं का समाधान करने का उद्देश्य है। कृषिगंगा परिवार एक साथ होकर मिलकर ज्यादा उत्पादन और आर्थिक सुधार के लिए कदम उठाने का माध्यम बनाने की कोशिश करता है।nnयदि आप भी कृषि क्षेत्र में काम कर रहे हैं और इसमें आगे बढ़ने की इच्छा रखते हैं, तो 'कृषिगंगा परिवार' चैनल को जॉइन करें और हमारे साथ अपने खेती के क्षेत्र में नए उदाहरण और नए उत्पादन विधियों को एकत्र करें।

Krushiganga Pariwar

04 Jun, 03:12


💐💐🔰संदीप आज तुझे 6 वे पुण्यस्मरण😞😞😞😞💐💐💐💐💐💐 लोक असे म्हणतात कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही कोणाच्या वाचून काही अडत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏पण मित्रा तुझ्या जाण्याने आम्हाला खूप फरक पडला आमच्या सर्वांचे आयुष्य निरस करून गेलास😞😞😞😞 तू आमच्या सर्वांसाठी काय होतास हे तुलाही माहीत नसावं कदाचित 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️पण खूप लवकर गेलास आज तुला जाऊन सहा वर्षे झाली पण आजचा दिवस आमच्या आयुष्यातील खूप वेदनादायी आहे😞😞😞😞😞😞😞😞😞 मिस यु संदीप💐💐💐💐💐💐💐

Krushiganga Pariwar

09 May, 02:48


🔰भारतरत्न पुरस्कार🔰

भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार म्हणजे भारतरत्न होय.

या पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954 रोजी झाली.

या पुरस्काराचे वितरण प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला होत असते.

या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे राष्ट्रपती स्वाक्षरीत सनद, पिंपळाच्या पानाचे पदक असे आहे.

भारतरत्न प्राप्त करणारे पहिले पुरस्कार विजेते सी. राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन व सी. व्ही. रमन हे आहेत .

यंदा म्हणजेच 2024 साली पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .

कर्पुरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री, लालकृष्ण अडवाणी भाजपचे ज्येष्ठ नेते, पी व्ही नरसिंगराव माजी पंतप्रधान, चौधरी चरणसिंह माजी पंतप्रधान, डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन कृषीवैज्ञानिक.

🖋️✏️ लेखन व संकलन अनिल कोळी सर

जॉईन करा 👉https://t.me/krushiganga

Krushiganga Pariwar

08 May, 05:11


🔰🍁अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024🍁🔰

2024 चे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी पार पडले.

हे साहित्य संमेलन 97 व्या क्रमांकाचे होते.

या साहित्य संमेलनासाठी उभारण्यात आलेल्या नगरीचे नाव साने गुरुजी साहित्य नगरी असे होते .

2024 च्या या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे होते .

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन या होत्या.

✏️🖋️ लेखन व संकलन अनिल कोळी सर🙏

Krushiganga Pariwar

08 May, 05:02


🔰 महाराष्ट्र भूषण पुरस्कार🔰

या पुरस्काराची स्थापना 1995 ला करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार हा सर्वात मोठा पुरस्कार आहे.

या पुरस्काराचे सध्याचे स्वरूप 25 लाख रुपये रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे आहे.

हा पुरस्कार आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन ,विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येतो.

1996 साली पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल देण्यात आला होता.

2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आला.

2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध डॉक्टर प्रदीप महाजन यांना जाहीर करण्यात आला आहे.

✒️ लेखन व संकलन अनिल कोळी सर🙏