ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔 @dnyaneshwariacademydahiwadi Channel on Telegram

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

@dnyaneshwariacademydahiwadi

★संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन
★NTPC रेल्वे मार्गदर्शन
★MPSC चालू घडामोडी
★सराव प्रश्नपत्रिका
★SSC GD Constable
★रेल्वे ग्रुप - D
★CISF

आधिक माहिती :-
राहुल खाडे सर :- 7776910538
निखील गंबरे सर :- 7020302070

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔 (Marathi)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी, सातारा या टेलिग्राम चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर पोलीस भरती संबंधित संपूर्ण मार्गदर्शन, NTPC रेल्वे, MPSC परीक्षा चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, SSC GD कॉन्स्टेबल, रेल्वे ग्रुप - D, आणि CISF संबंधित माहिती देण्यात येईल. या चॅनलवर सर्वांसाठी उपलब्ध आहे अधिक माहिती. अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला राहुल खाडे सरांचं क्रमांक 7776910538 किव्हा निखील सर/नितीन सरांचं क्रमांक 7020302070 वर संपर्क साधावं लागेल.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Feb, 01:59

🐝महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर.
🐝 महाराष्ट्रातील दुसरे मधुबन हनी पार्क - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई

❗️या पार्कच्या माध्यमातून मध उत्पादन व मधमाशी याबाबत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे❗️

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Feb, 01:56

♦️ महत्त्वाच्या चालू घडामोडी ♦️

01) नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे ?
= मणिपूर

02) सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?
= पंजाब

03) नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे ?
= आयकर कायदा १९६१

04) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?
= 54 पदके

05) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत ?
= 201

06) उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले ?
गोवा

07) ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी २०२५ अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?
= Jomel warrican

08) नुकतेच लाँच करण्यात आलेल्या I am? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
= गोपीचंद पी. हिंदुजा

09) कॉन्सन्टेटाइन तसुलास यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे ?
= ग्रीस

10) भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो ?
= १३ फेब्रुवारी

➤ Share & Support Us :- https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

16 Feb, 06:36

15 फेब्रुवारी 2025 पोलीस भरती सराव  उत्तरपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :-  25 (उत्तरपत्रिका)
2025

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :-
                                                  https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi_

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Feb, 16:07

15 फेब्रुवारी 2025 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :- 25 ( प्रश्नपत्रिका ) 2025

➡️ वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :-
https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi_

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Feb, 14:04

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025
» आवृत्ती - 38 वी
» ठिकाण - उत्तराखंड
» घोषवाक्य - संकल्प से शिखर तक
» शुभंकर - मौली (उत्तराखंडचा राज्य पक्षी)
» पदकतालिकेत अव्वल स्थान - १) सेनादल, २) महाराष्ट्र
» आगामी 39 व्या स्पर्धा - मेघालय (2027)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Feb, 14:03

सुनिता विल्यम 19 मार्च पर्यंत पृथ्वीवर परतणार..

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Feb, 14:02

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा.

गृहमंत्री अमित शाहा यांची महाराष्ट्र सरकारला सूचना.

राज्यातील 90% पोलिसांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Feb, 14:01

जगातले सर्वात सुंदर देश कोणते?...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Feb, 14:00

♦️ वनलायनर चालू घडामोडी ♦️

1) इंग्लंड संघाविरूद्ध ४ हजार अंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ?
= विराट कोहली

2) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड करण्यात आली आहे ?
= शिखर धवन

3) मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ठरली आहे ?
त्शेगो गेला

4) आयपीएल 2025 साठी RCP ने कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
= रजत पाटीदार

5) महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
एकनाथ शिंदे

6) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
= 96 व्या

7) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये कोणत्या देशांत सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे ?
= डेन्मार्क

8) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये १८० देशांच्या यादीत कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे ?
= दक्षिण सुदान

9) आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरु झाली आहे ?
= चीन

➤ Share & Support Us :- https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Feb, 04:07

♦️ मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू..

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Feb, 03:34

🔰अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखपदी तुलसी गॅबार्ड यांची नियुक्ती

🔹१८-एजन्सी गुप्तचर समुदायाचे पर्यवेक्षण करणाऱ्या अमेरिकन गुप्तचर प्रमुख म्हणून तुलसी गॅबार्ड यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली.

🔸सिनेटने ५२-४८ मतांनी मतदान केले, बहुतेक पक्षीय मतांवर, रिपब्लिकननी तिच्या नामांकनाला पाठिंबा दिला तर डेमोक्रॅट्सनी विरोध केला.

🔹२०२२ मध्ये गॅबार्डने डेमोक्रॅटिक पक्ष सोडला आणि स्वतंत्र झाली. तिने ट्रम्पला पाठिंबा दिला आणि २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षात सामील झाली.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Feb, 01:49

♦️त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
त्शेगो गेलीने 2025 मध्ये लास वेगासमध्ये मिसेस वर्ल्ड खिताब जिंकून इतिहास रचला.

हे विजेतेपद जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आणि 2016 च्या विजेत्या कँडिस अब्राहम्सनंतर दुसरी दक्षिण आफ्रिकन बनली.

मिसेस वर्ल्डच्या 40 वर्षांच्या इतिहासात त्शेगो गेला ही पहिली कृष्णवर्णीय विजेती ठरली.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Feb, 01:48

♦️एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर 🔥🥇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पुरस्कार समारंभ = ११ फेब्रुवारी

पुरस्काराचे स्वरुप = ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी

श्री. शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Feb, 03:16

भ्रष्टाचारात वाढ; जागतिक क्रमवारीत भारत 96 वा...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Feb, 02:24

महानिर्मिती जाहिरात

या अगोदर पेपर नोटीस आली होती आज सविस्तर जाहिरात येईल....

Chemistry वाल्या विद्यार्थी वर्गासाठी संधी

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Feb, 15:45

♦️ मिशन चंद्रयान - 4 ♦️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चांद्रयान मिशन -४ वर्ष २०२७ मध्ये सुरू होईल.

चांद्रयान-४ हे उच्च क्षमतेच्या LVM-3 रॉकेटद्वारे कक्षेत दोन वेगवेगळ्या प्रक्षेपणांमध्ये पाच वेगवेगळे घटक घेऊन जाईल.

चांद्रयान- ४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे.

माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान
मंत्री - जितेंद्र सिंह

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Feb, 15:44

फोर्ट विल्यम आता विजय दुर्ग म्हणून ओळखले जाईल

▪️स्थान : फोर्ट विल्यम हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे गंगेची प्रमुख उपनदी असलेल्या हुगळी नदीच्या पूर्व तीरावर स्थित आहे.

बांधकाम आणि पुनर्बांधणी :

▪️मूळ फोर्ट विल्यम १६९६ मध्ये बांधले गेले आणि १७०६ मध्ये पूर्ण झाले.
▪️मूळ किल्ला सर जॉन गोल्ड्सबरो यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला होता.
▪️प्लासीच्या लढाईनंतर (१७५७) जेव्हा इंग्रजांनी कोलकात्यावर पुन्हा ताबा मिळवला, तेव्हा सध्याचा किल्ला रॉबर्ट क्लाइव्हच्या देखरेखीखाली पुन्हा बांधण्यात आला.

▪️इतिहास :

▪️बंगालमधील ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात बांधलेले.
▪️इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.
▪️१७५६ मध्ये कलकत्त्याच्या वेढादरम्यान बंगालचा नवाब सिराज-उद-दौला याने ते ताब्यात घेतले आणि नष्ट केले.
-----------------------------------------

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Feb, 15:40

♦️ महत्त्वाचे ब्रँड अम्बेसिडर ♦️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सौरव गांगुली - बंगालचा ब्रँड अम्बेसिडर, त्रिपुराचे पर्यटन ब्रँड अम्बेसिडर

महेंद्रसिंग धोनी लेजचा ब्रँड अम्बेसिडर, SBI चे ब्रँड अम्बेसिडर, स्वराज ट्रॅक्टर्सचा ब्रँड अॅम्बेसिडर

कतरिना कैफ - RADO च्या जागतिक बँड अम्बेसिडर, niqlo India ब्रँड अम्बेसिडर

नीरज चोप्रा- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा ब्रँड अम्बेसिडर

हृतिक रोशन - मोबिलचा ब्रँड अम्बेसिडर

मोहम्मद शमी - PUMA ब्रेड अम्बेसिडर

नयनतारा - स्लाइसचा ब्रँड अम्बेसिडर

अनुष्का शर्मा - महिला फॅशन ब्रँडची ब्रँड अम्बेसिडर

करीना कपूर खान - युनिसेफ भारत राष्ट्रीय राजदूत

पंकज त्रिपाठी - UPI सुरक्षा दूत

वरुण धवन कॅम्पेन स्किल इंडिया

सुनील शेट्टी - नाडा (नॅशनल  अँटी डोपिंग एजन्सी)

सारा अली खान विवो 'एस' मालिका

सायना नेहवाल - रसना, फ्लिपकार्ट

पी.व्ही. सिंधू व्हिसा (पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी)

दिया मिर्झा - भारतासाठी संयक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना राजदूत

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Feb, 04:02

अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांची अमेरिकेने परत भारतात पाठवले
◾️पहिल्या फेरीत - 104 भारतीयांना परत पाठवण्यात आले
◾️5 फेब्रुवारी ला अमृतसर विमानतळावर हे विमान प्रवासी घेऊन उतरले
◾️अमेरिकन लष्कराचे C17 विमानाने 🛬 परत आले

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Feb, 02:28

भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या कोलकाता येथील मुख्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.
◾️फोर्ट विल्यम चे नाव - विजय दुर्ग केले
◾️किचनर हाऊसचे नाव - माणेकशॉ हाऊस केले
◾️सेंट जॉर्ज गेट चे नाव -  शिवाजी गेट असे केले
◾️1963 मध्ये पूर्व कमांडचे मुख्यालय केले गेले
(हा तोच फोर्ट विल्यम आहे त्यासाठी . बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि ईस्ट इंडिया यांच्यात युद्ध झाले होते)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

06 Feb, 10:04

दिल्ली विधानसभा निवडणूक...

8 फेब्रुवारीला होणार 70 जागांसाठी मतमोजणी..

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

06 Feb, 10:03

जगातील 75 टक्के वाघ भारतात...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

06 Feb, 03:43

🟨कृषी रसायनांचा भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

06 Feb, 03:43

🟨कृषी रसायनांचा भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

05 Feb, 16:21

पहिल्या जागतिक पिकलबॉल लीगचे विजेते - बेंगळुरू जवान्स
◾️विजेता - बेंगळुरू जवान्स
◾️उपविजेता - पुणे युनायटेड
◾️3 -1 असा पराभव केला

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

05 Feb, 15:23

🔳 05 फेब्रुवारी 2025 पोलीस भरती सराव उत्तरपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :- 22

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :- https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

05 Feb, 15:01

🔳 05 फेब्रुवारी 2025 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :- 22

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :- https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

29 Jan, 12:33

◾️मुंबई बॅण्ड्समन पेपर

◾️आज झालेला पेपर

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

29 Jan, 06:09

समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पाहिले राज्य - उत्तराखंड बनले आहे.

◾️UCC - Uniform Civil Code
◾️ बहुपत्नीत्व बालविवाह यावर बंदी
◾️विवाह नोंदणी 60 दिवसात बंधनकारक
◾️कलम 44 नुसार राज्यांना समान नागरी कायदा लावण्याची मुभा आहे
◾️UCC म्हणजे सर्वांना सर्व कायदे समान आहेत
◾️7 जानेवारी 2024 उत्तराखंड विधानसभेत हे विधेयक संमत झाले होते

हे व्यवस्थित वाचा.

◾️भारतात स्वातंत्र्याच्या आगोदर सर्वात पहिला UCC - गोवा (पोर्तुगीज नी लागू केलेलं)
◾️भारतात स्वातंत्र्याच्या नंतर सर्वात पहिला UCC - उत्तराखंड

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

29 Jan, 05:45

पोलीस भरती 2025 ...

पावसाळ्या आधी मैदानी चाचणी होणार आहे त्यामुळे मार्च मध्ये जाहिरात येऊन त्याच महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

29 Jan, 02:21

7113 कोटींसह भाजप सर्वात श्रीमंत पक्ष ...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

29 Jan, 02:20

H1B व्हिसा सर्वात जास्त वापरणाऱ्या कंपन्या...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

28 Jan, 13:55

हे लक्षात ठेवा

◾️जागतिक वारसा दिवस : 18 एप्रिल
◾️भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळे
◾️जगात एकूण : 1200 जागतिक वारसा स्थळे
◾️भारतातील पाहिले :1983 मध्ये अजिंठा, वेरूळ दोघांनाही आणि आग्रा लाल किल्ला
◾️इटली मध्ये : 59 स्थळे आहेत (पहिला नंबर)
◾️चीन मध्ये :57 स्थळे (दुसरा नंबर)
◾️फ्रान्स आणि जर्मनी : 52 स्थळे ( तिसरा)
◾️भारत : 43 स्थळे ( सहावा क्रमांक)

महाराष्ट्रात एकूण 5 जगतील वारसा स्थळे आहेत आहेत

🔥1983: अजिंठा ,1983: वेरूळ ( सांस्कृतिक)
🔥1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी ( सांस्कृतिक)
🔥2004 : CST मुंबई ( सांस्कृतिक)
🔥2012 : पश्चिम घाट ( नैसर्गिक)
🔥2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प ( सांस्कृतिक)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी / वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

28 Jan, 13:41

आसामचे 'मोइदाम्स' UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट

◾️दिल्लीत मध्ये असलेल्या जागतिक वारसा समितीच्या 46 वी बैठक सुरू आहे त्यात ही घोषणा करण्यात आली.
◾️युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारी ईशान्येकडील पहिली सांस्कृतिक संपत्ती आहे
◾️मोइडम्स हे एक प्रकारचे अनोखे दफन ढिगारे आहेत, ज्याची रचना पिरॅमिडसारखी आहे.
◾️आसामवर सुमारे 600 वर्षे राज्य करणाऱ्या "ताई-अहोम" राजघराण्याने त्यांचा वापर केला होता.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Jan, 01:37

सोंनमार्ग...
सौजन्य- देवा जाधवर सर

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Jan, 15:01

झेड-मोढ बोगदा :

▪️जम्मू काश्मीरमधील 'Z Morh' बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन
▪️हा जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित एक बोगदा प्रकल्प आहे.
▪️प्रादेशिक संपर्क, पर्यटन आणि धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन हे विकसित केले गेले आहे.
▪️हा बोगदा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर (NH-1) आहे.
▪️हा बोगदा गगनगीरला सोनमर्गशी जोडतो.
▪️बोगद्याची एकूण लांबी 6.5 किमी आहे.
▪️या बोगद्यामुळे वर्षभर सोनमर्ग देशाच्या इतर भागांशी जोडण्यास मदत होईल.
▪️पूर्वी हिवाळ्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे ते तुटलेले असायचे.
------------------------------------------

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Jan, 15:00

मुंबई कारागृह प्रथम उत्तर तालिका

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Jan, 14:58

मुंबई चालक प्रथम उत्तर तालिका

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Jan, 14:57

मुंबई शिपाई प्रथम उत्तर पत्रिका

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Jan, 04:13

BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे.

जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे.

2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली.

इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

13 Jan, 04:12

🔥टाईम मशीन

👉भारतापासून साडेसात हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंटार्क्टिकाच्या बर्फाळ जमिनीखाली एक रहस्य उलगडले आहे.
👉हे पाहून शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा 1.2 मिलियन वर्षे जुना बर्फाचा तुकडा पृथ्वीचा हवामान इतिहास समजून घेण्याची अतिशय उपयुक्त ठरणार आहे. शास्त्रज्ञ याला टाईम मशीन म्हणत आहेत.

👉चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एका आंतरराष्ट्रीय टीमने -35 अंश सेल्सिअस तापमानात 2.8 किमी खोल बर्फातून हा याला बाहेर काढले.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

12 Jan, 07:22

आज झालेल्या मुंबई नायगाव जिल्हा पेपर मध्ये जी.के GK सामान्य अध्ययन या विषयाच्या
37 प्रश्नांपैकी 34 प्रश्न आपल्या नोट्स मधले आहे असे....!!

🔥🔥🔥brand is brand🔥🔥🔥

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

12 Jan, 02:59

नीरज चोप्रा 2024 चा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

12 Jan, 01:14

All the best👍
फक्त गुलालाची प्रतिक्षा बाकी.....!!

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

11 Jan, 11:51

मुंबई जेल पोलीस पेपर

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

11 Jan, 07:36

⭕️ आज झालेला मुंबई चालक पोलीस पेपर.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

11 Jan, 02:10

जागतिक हिंदी दिवस :

▪️10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

▪️हा दिवस 1949 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पहिल्यांदा हिंदी बोलला गेला.

▪️2006 मध्ये जागतिक हिंदी परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

▪️जागतिक स्तरावर इंग्रजी आणि मंदारिन नंतर हिंदी ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

उद्दिष्ट :

▪️एक भाषा म्हणून हिंदीचे महत्त्व चिन्हांकित करण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी आणि जागतिक भाषा म्हणून तिचा जगभरात प्रचार करण्यासाठी भारतीय भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे.

▪️राष्ट्रीय हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

10 Jan, 16:08

उद्यापासून सुरू होणाऱ्या मुंबई जिल्हा पेपर साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!🔥🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

10 Jan, 04:11

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2025 च्या क्रमवारीनुसार, सिंगापूरने 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या शीर्षकावर पुन्हा दावा केला आहे,

ज्याने 227 जागतिक गंतव्यस्थानांपैकी 195 व्हिसा-मुक्त प्रवेशाची ऑफर दिली आहे.

भारत 85

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

10 Jan, 04:11

🇮🇳 १८ व्या ‘प्रवासी भारतीय संमेलना’चे
गुरुवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

10 Jan, 03:50

अभिजात भाषेच्या दर्जा मिळवणाऱ्या 11 भाषा :-

तामिळ (2004)
संस्कृत (2005)

कन्नड (2008)
तेलुगु (2008)

मल्याळम (2013)
ओडिया (2014)

मराठी (2024)
पाली (2024)

बंगाली (2024)
प्राकृत (2024)

आसामी  (2024)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

10 Jan, 02:38

गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे...

भरती लवकर होण्याची शक्यता...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

09 Jan, 06:38

महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ...

मंत्र्यांचे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, खाजगी सहायक, सरकारी सहायक यांचे मोबाईल क्रमांक.

कोणतेही अडलेले काम, प्रशासनाने केलेली अडवणूक याबाबतची कोणतीही समस्या असल्यास संपर्क करून तुम्हाला मदत मिळण्याची आशा!

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Jan, 14:12

Vimp

2024 सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 04 जणांना प्राप्त झाला.

2024 सालचा अर्जुन पुरस्कार 32 जणांना प्राप्त झाला...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Jan, 14:10

🛑 महाराष्ट्रातील काही महत्वाचे प्रशासकीय प्रमुख :-

◆ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश : देवेंद्र कुमार उपाध्याय

◆ महाराष्ट्राचे मुख्य सचिव : सुजाता सैनिक (पहिली महिला मुख्य सचिव)

◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष - रजनीश शेठ

◆ पोलीस महासंचालक (DGP) - रश्मी शुक्ला (पहिली महिला पोलीस महासंचालक)

◆ मुंबई विशेष पोलीस आयुक्त - देवेन भारती

◆ मुंबई पोलीस आयुक्त - विवेक फंसाळकर

◆ लोकायुक्त - व्ही. एम. कानडे

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Jan, 14:09

V imp

🛑 हे नक्की लक्षात ठेवा :-

➡️ भारताचे सरन्यायाधीश
- संजीव खन्ना ( 51 वे )

➡️ भारताचे नियंत्रक व महालेखापाल
- संजय मूर्ती

➡️ आरबीआयचे गव्हर्नर
- संजय मल्होत्रा

➡️ महाराष्ट्र विधानसभेचे सभापती
- राहुल नार्वेकर

➡️ महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती
- राम शिंदे

➡️ आय.सी.सी चे अध्यक्ष
- जय शहा

➡️ महाराष्ट्राचे मुख्य सचिव
- सुजाता सैनिक

➡️ देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव
- श्रीकर परदेशी

➡️ देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव
- अश्विनी भिडे

➡️ राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष
- रूपाली चाकणकर

➡️ राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष
- विजया रहाटकर

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी/वडूज ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Jan, 14:07

V imp

इस्रोचे नवीन अध्यक्ष - डॉ. व्ही नारायणन

14 जानेवारी 2025 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

ISRO :- Indian Space Research Organisatio

👉इस्रोचे सध्याचे अध्यक्ष: एस. सोमनाथ

👉इस्रोचे नवीन अध्यक्ष - डॉ. व्ही नारायणन

◾️स्थापना: 15 ऑगस्ट, 1969

संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई

◾️मुख्यालय :बंगळुरू (कर्नाटक)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

29 Dec, 08:39

ज्ञानेश्वरी अकॅडमीचे फिजिकल टीचर ऋषी बगाडे सर यांची खेलो इंडिया साठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.....!!👍🔥🔥

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

29 Dec, 05:27

आज होणाऱ्या डिपार्टमेंटल PSI पेपर साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा🔥🔥🔥🔥🔥🔥

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

28 Dec, 15:25

28 डिसेंबर 2024 पोलीस भरती सराव  उत्तरपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :-  12 (उत्तरपत्रिका)
2024-2025

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :-
                                                  https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi_

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

28 Dec, 15:23

28 डिसेंबर 2024 पोलीस भरती सराव  प्रश्नपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :-  12 (प्रश्नपत्रिका)
2024-2025

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :-
                                                  https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi_

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

28 Dec, 02:51

कल्याणकारी योजनांना लाचखोरीची कीड...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

28 Dec, 02:50

राष्ट्रीय चिन्ह अवमानावर आता होणार पाच लाख रुपये दंड

राष्ट्रपती, पंतप्रधानांची नावे, छायाचित्रांचा गैरवापरही शिक्षेला पात्र.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

27 Dec, 15:32

RRB L-1 2024 short notification

Group D

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

27 Dec, 02:03

मनमोहन सिंग - निधन
◾️भारताचे 13 वे पंतप्रधान
◾️पंतप्रधान कार्यकाळ - 22 मे 2004 - 26 मे 2014
◾️2 वेळा भारताचे पंतप्रधान - 2004 आणि 2009
◾️मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान
◾️जन्म - 26 सप्टेंबर 1932 (पंजाब - सध्या पाकिस्तान मध्ये)
◾️निधन - 26 डिसेंबर 2024 (वय 92) - नवी दिल्ली
◾️भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15 वे गव्हर्नर (1982 ते 85)
◾️1954 - पंजाब विश्वविद्यालयात मास्टर डिग्री पूर्ण
◾️1957 ते 1959 या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते होते.
◾️1957 - केम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्र पदवी
◾️1962 - ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांच्या डीफिल (डॉक्टरेट) केले
◾️1966-1969 दरम्यान संयुक्त राष्ट्रांसाठी काम केले
◾️1969 ते 1971 पर्यंत, सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते .
◾️1972 ते 1976 - भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार
◾️1980-1982 मध्ये ते नियोजन आयोगात होते
◾️1982 - RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती (82 ते 85)
◾️1985 ते 1987 पर्यंत नियोजन आयोगाचे (भारत) उपाध्यक्ष
◾️1987 ते 1990 दरम्यान जिनिव्हा येथील दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
◾️1987 ते 1990 या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष
◾️1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले
◾️पंजाब विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले
◾️1991 मध्ये ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले
◾️1991 ते 1996 - 22 वे केंद्रीय अर्थमंत्री (पी वी नरसिंहराव पंतप्रधान)
◾️1991 ते 2019 - राजसभा सदस्य (आसाम राज्य)
◾️1991 मध्ये आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि विचारधारा होते.
◾️24 जुलै 1991 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. नरसिंह राव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली
◾️1998 ते 2004 - 10 वे राज्यसभा विरोधी पक्षनेते
◾️ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी
◾️मनमोहन सिंग कधीच लोकसभेचे सदस्य नव्हते
◾️'इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ- ड्रिव्हन ग्रोथ' हे पुस्तकही लिहिले
◾️2019 ते 2024 राज्यसभा सदस्य ( राज्यस्थान राज्य)

मिळालेले पुरस्कार
◾️1987 - पद्मविभूषण पुरस्कार
◾️1995 - भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार
◾️1993 आणि 1994 चा आशिया मनी पुरस्कार
◾️1995 - केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून विशिष्ट कामगिरीसाठी राईट पारितोषिक
◾️1996 केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून ॲडम स्मिथ पारितोषिक
◾️2002 मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला.
◾️2010 - ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाझीझ (सौदी अरेबिया चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)
◾️फोर्ब्स मॅगझिनच्या मते, डॉ सिंग
⭐️2011 - जगातील 19 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️2012 - जगातील 22 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️2013 - जगातील 28 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
◾️2014 - ऑर्डर ऑफ द पाउलोनिया फ्लॉवर्स' याला ग्रँड कॉर्डन म्हणतात ( जपान चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)

मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी
◾️2005 - नरेगा योजना
◾️2005 - माहितीचा अधिकार
◾️आधार कार्ड योजना
◾️डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
◾️भारत-अमेरिका अण्वस्त्र करार
◾️2013 - भूमी अधिग्रहण कायदा
◾️2013 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

26 Dec, 09:23

महाराष्ट्र राज्य उच्चपदस्थ...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

26 Dec, 07:08

देशातील पहिले डिजिटल संग्रहालय

▪️भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

▪️त्याचे नाव "अभय प्रभावना" आहे.

▪️हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई-पुणे महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या काठावर आहे.

▪️हे फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी कल्चरल अँड हिस्ट्री यांनी तयार केले आहे.

▪️हे जैसलमेरच्या खास पिवळ्या दगडापासून बनवलेले आहे.

▪️जैन विचार, श्रद्धा आणि इतिहास यांची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

25 Dec, 16:50

▪️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळ, बिहार,ओडिशा,मिझोराम,मणिपूरसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली.

▪️केरळ : राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
▪️मणिपूर : अजय कुमार भल्ला
▪️मिझोरम : वि.के सिंह
▪️ओडिशा : डॉ.हरी बाबू कंभमपती
▪️बिहार : आरिफ मोहम्मद खान

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

24 Dec, 02:59

Ministers Bungalows कुठल्या मंत्र्याला मिळाला कुठला सरकारी बंगला?...

राहुल नार्वेकर – शिवगिरी
राम शिंदे – ज्ञानेश्वरी
चंद्रशेखर बावनकुळे- रामटेक
राधाकृष्ण विखे पाटील- रॉयलस्टोन
पंकजा मुंडे- पर्णकुटी
शंभूराज देसाई-मेघदूत
गणेश नाईक-पवनगड
धनंजय मुंडे-सातपुडा
चंद्रकांत पाटील-सिंहगड
गिरीश महाजन-सेवासदन
मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग
अशोक उईके- लोहगड
आशिष शेलार-रत्नशिषु
दत्तात्रय भरणे- सिद्धगड
आदिती तटकरे-प्रतापगड
शिवेंद्रराजे भोसले- पन्हाळगड
मणिकराव कोकाटे-अंबार
जयकुमार गोरे-प्रचितीगड
नरहरी झिरवाळ-सुरुची
संजय सावकारे-अंबर ३२
संजय शिरसाठ-अंबर ३८
प्रताप सरनाईक-अर्वतो ५
भरत गोगावले-सुरुची २
मकरंद पाटील-सुरुची ३
गुलाबराव पाटील-जेतवन

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

23 Dec, 03:10

India State of Forest Report 2023.

भारतीय वन अहवाल 2023

⭐️एकूण वनक्षेत्र 7,15,343 चौ. किमी.
⭐️देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21.76%
⭐️एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र 8,27,357 चौ.किमी.
⭐️देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 25.15%.
⭐️सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य - मध्य प्रदेश.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

23 Dec, 01:42

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देण्यात आला.

▪️आतापर्यंत मोदींना विविध देशांकडून 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

18 Nov, 02:34

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Nov, 03:30

डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'जीवनगौरव'...

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Nov, 03:29

आचारसंहितेत कोणती कामे करता येत नाहीत?...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

16 Nov, 16:03

16 नोव्हेंबर 2024 पोलीस भरती सराव  उत्तरपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :-  02 (उत्तरपत्रिका) 2024-2025

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :-
                                                  https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi_

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

16 Nov, 16:02

16 नोव्हेंबर 2024 पोलीस भरती सराव  प्रश्नपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :-  02 (प्रश्नपत्रिका) 2024-2025

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :-
                                                  https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi_

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

16 Nov, 05:05

असे असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Nov, 10:37

ज्ञानेश्वरी अकॅडमी दहिवडी  चा विद्यार्थी
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

गंगाधर बालाजी आंधळे याची
* पुणे गट क्रमांक 2 * पोलीस पदी निवड

🔥🔥🔥🔥🔥
झाल्याबद्दल ज्ञानेश्वरी परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.....💐💐
🔥🚨🔥

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Nov, 03:10

ज्ञानेश्वरी अकॅडमी चा आज वर्धापन दिन.......!!
तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार यापुढेही आपल्या सेवेसाठी असेच तत्पर राहू.......!!

संस्थापक : श्री दशरथ गणपत गंबरे
संचालक : राहुल खाडे सर
संचालक : निखिल गंबरे सर

वर्धापन दिनाचे निमित्त साधून ज्ञानेश्वरी परिवाराने पुन्हा एकदा आपल्यासाठी टेस्ट सिरीजचा धमाका सुरू केलेला आहे तरी त्या टेस्ट सिरीज सर्वांनी सोडून आपले ध्येय प्राप्त करावे......!!

2024 यावर्षी 76 विद्यार्थी यशस्वी.....!!
(मुंबई नायगाव चा निकाल बाकी)

2023 यावर्षी 59 विद्यार्थी यशस्वी......!!

धन्यवाद
ज्ञानेश्वरी अकॅडमी दहिवडी

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Nov, 02:35

द बुकर पुरस्कार 2024

समंथा हार्वे यांना ऑर्बिटल (पुस्तक)...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Nov, 10:28

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित...

भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमिनिकाचा "अवार्ड ऑफ द ऑनर" या पुरस्काराची डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी घोषणा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार
◾️2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016
◾️2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)
◾️2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)
◾️2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE)
◾️2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया)
◾️2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)
◾️2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन)
◾️2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका)
◾️2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान)
◾️2023 - रिपब्लिक अॅवॉर्ड (पलाऊ)
◾️2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)
◾️2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया)
◾️जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)
◾️जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Nov, 04:35

महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयाने म्हटलं, "मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे."

'हे' आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे

1. आधार कार्ड

2. मनरेगा रोजगार ओळखपत्र

3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक

4. पारपत्र (पासपोर्ट)

5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

6. पॅनकार्ड

7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड

8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

9. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज

10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र

11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र

12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

(अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक)
🙏🙏🙏

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Nov, 04:00

औद्योगिक सुरक्षा दलात पहिली महिला बटालियन...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Nov, 02:30

ब्रिटनच्या समांथा हाव्हें यांनी 'आर्बीटल' या आपल्या लघुकादंबरीसाठी 2024 चा प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

14 Nov, 02:30

"कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी"
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कडून मार्गदर्शक तत्वे जारी...

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2073013

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Nov, 02:58

भारतातील पारंपारिक नृत्यप्रकार

◾️रौफ : काश्मीर
◾️भांगडा/गिट्टा : पंजाब
◾️भरतनाट्यम : तामिळनाडू
◾️घुमर : राज्यस्थान
◾️गरबा : गुजरात
◾️लावणी : महाराष्ट्र
◾️कथ्थक उत्तर प्रदेश
◾️कुचीपुडी : आंध्र प्रदेश
◾️ओडिसी : ओडिशा
◾️सातरिया नृत्य - आसाम
◾️बिहू : आसाम
◾️कथकली : केरळ
◾️मोहिनी अट्टम : केरळ
◾️सत्तरीया : आसाम
◾️मणिपुरी : मणिपूर

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Nov, 02:55

QS रँकिंग : IIT, मुंबई 48 वी ...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Nov, 02:55

"मेलुरी" अधिकृतपणे नागालँडचा 17 वा जिल्हा बनला आहे.

◾️पोचुरी नागा जमातीची वस्ती असलेल्या मेलुरी 17 वा जिल्हा
◾️मेलुरी हा गेल्या तीन वर्षांत नागालँड सरकारने निर्माण केलेला पाचवा जिल्हा ठरला आहे.
◾️सीमा म्यानमार ला लागून आहे

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

08 Nov, 02:37

2024-2025 पोलीस भरती सराव पेपर वेळापत्रक...

सालाबादाप्रमाणे ह्यावर्षी देखील "ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमी" परिवारामार्फत मोफत पोलीस भरती सराव पेपर आयोजित करण्यात येत आहे.

त्याबाबत वेळापत्रक नमूद PDF फाईल मध्ये जाहीर केले आहे.

हे सर्व सराव पेपर मोफत आयोजित करण्यात येत आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

टीप :- वरील सराव पेपर वेळापत्रकामध्ये आगामी भरतीच्या तारखेनुसार आवश्यक बदल करण्यात येईल.
🙏🙏🙏

https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Nov, 23:36

नावात बदल झालेली राज्ये ...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Nov, 04:04

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Nov, 04:03

उषा चीलूकुरी...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

07 Nov, 03:11

सौरऊर्जा निर्मितीत

1st चीन
2nd अमेरिका
3rd भारत

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

06 Nov, 12:31

2024-2025 पोलीस भरती सराव पेपर वेळापत्रक...

सालाबादाप्रमाणे ह्यावर्षी देखील "ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमी" परिवारामार्फत मोफत पोलीस भरती सराव पेपर आयोजित करण्यात येत आहे.

त्याबाबत वेळापत्रक नमूद PDF फाईल मध्ये जाहीर केले आहे.

हे सर्व सराव पेपर मोफत आयोजित करण्यात येत आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

टीप :- वरील सराव पेपर वेळापत्रकामध्ये आगामी भरतीच्या तारखेनुसार आवश्यक बदल करण्यात येईल.
🙏🙏🙏

https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

06 Nov, 08:40

Climate change अफवा आहे, यात काही तथ्य नाही म्हणणारे ट्रम्प तात्या विजयी 😅😅...

USA चे नवीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा विजयी.

USA United States of America
राजधानी वॉशिंग्टन D.C.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

05 Nov, 10:36

महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

05 Nov, 10:05

उद्या दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता गणित विषयाचे लेक्चर होणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.......

उठा उठा दिवाळी झाली... लेक्चरला जाण्याची वेळ आली😄

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

05 Nov, 02:23

राज्यात कोणत्या साली किती टक्के मतदान याची आकडेवारी ...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

26 Oct, 11:14

निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

26 Oct, 02:46

दाना चक्रीवादळानंतर ओरिसामध्ये जोरदार पाऊस...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

25 Oct, 20:34

संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश...

राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 (2) नुसार केली नेमणूक

नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

24 Oct, 06:32

♦️झिम्बाब्वेची विश्वक्रमी T-20 मधील धावसंख्या.. 🏏...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

24 Oct, 01:31

🔥 92 वी घटनादुरुस्ती कायदा, 2003 :
◾️आठव्या परिशिष्टामध्ये चार भाषांचा समावेश करण्यात आला
◾️ अधिकृत भाषा संख्या 18 वरून 22 करण्यात आली
◾️बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली यांना आठव्या शेड्यूलमध्ये जोडण्यात आले

🔥 95 वी घटनादुरुस्ती कायदा, 2009
◾️ अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आले (लोकसभा + राज्यांच्या विधानपरिषद मध्ये)-2020 पर्यंत
◾️ अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व 10 वर्षांनी वाढवली

🔥 97 वी घटनादुरुस्ती 2011
◾️ सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण
◾️सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार (अनुच्छेद 19)
◾️सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य धोरणाचे नवीन मार्गदर्शक तत्व (अनुच्छेद 43-B)
◾️सहकारी संस्थांसाठी राज्यघटनेत नवीन भाग IX-B समाविष्ट केला

🔥 99 वी घटनादुरुस्ती 2014
◾️ सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणुकीसाठी राष्ट्रीय न्यायालय नेमणूक आयोग स्थापना (2015 ला हा SC ने रद्द केली घटनादुरुस्ती)

🔥 100 वी घटनादुरुस्ती 2015
◾️भारत आणि बांगलादेश यांच्यातील 1974 च्या भू-सीमा करारानुसार काही भाग बांगलादेश ला दिला तर काही भाग भारताने घेतला
◾️यानुसार राज्यघटनेच्या पहिल्या शेड्यूलमधील चार राज्यांच्या ●आसाम ●पश्चिम बंगाल ●मेघालय ●त्रिपुरा  प्रदेशांशी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्ती केली गेली

🔥 101 वी घटना दुरुस्ती कायदा, 2016
◾️वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला.

🔥 102 वी सुधारणा कायदा, 2018
◾️ 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देण्यात आला.
◾️ सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला

🔥 103 वी घटनादुरुस्ती 2019
◾️EWS 10% आरक्षण

🔥 104 वी घटना दुरुस्ती कायदा, 2020
◾️ अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण दहा वर्षांनी वाढवण्यात आले (लोकसभा + राज्यांच्या विधानपरिषद मध्ये)
◾️ अँग्लो इंडियन समाजाचे राखीव प्रतिनिधित्व बंद केले

🔥105 वी घटनादुरुस्ती कायदा, 2021
⭐️सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) यादी तयार करण्यासाठी राज्य सरकारांचे अधिकार दिला आणि ती यादी केंद्रीय यादीपेक्षा भिन्न असू शकते

🔥 106 वी घटनादुरुस्ती 2023
⭐️लोकसभा , राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभा मधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी येत्या 15 वर्षांच्या कालावधीसाठी राखीव ठेवण्यासाठी

⚠️ यांच्यावर नेहमी प्रश्न येतो त्यामुळं अलीकडे झालेल्या घटनादुरुस्ती वाचून घ्या

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

24 Oct, 01:26

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

▪️2023 : भरडधन्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

23 Oct, 02:27

◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्र ची पहिली महिला मुख्य सचिव
◾️लिंडी कैमरून : भारतातील इंग्लंड ची पहिली महिला उच्चायुक्त  
◾️फातिमा वसीम : सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर
◾️जूडिथ सुमिनवा तुलुका  : कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान
◾️भावना भलावे : पहिली महिला ड्रोन पायलट (भंडारा जिल्हा)
◾️रुमी अल-कहतानी : मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी
◾️अनामिका बी राजीव : भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलीकॉप्टर पायलट
◾️'क्लॉडिया शेनबॉम : मक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष 
◾️इदाशिशा नोंगरांग : मेघालयची पहिली महिला पुलिस महासंचालक
◾️नीना सिंह :  CISF ची पहिली महिला DGP
◾️पैतोंगटार्न शिनावात्रा : थायलंड ची नवीन प्रधानमंत्री
◾️नईमा खातून : अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात पहिली महिला कुलपति
◾️साधना सक्सेना नायर  : महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला
◾️सलीमा इम्तियाज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला
◾️आलिया नीलम : लाहौर उच्च न्यायालयाची  पहिली महिला मुख्य न्यायधीश
◾️मरियम नवाज : पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री (पंजाब)
◾️रेचल रीव्स :  ब्रिटेन ची पहिली महिला वित्त मंत्री
◾️प्रीति रजक : इंडियन आर्मीतील पहिली महिला 'सुभेदार'
◾️साल्वा मार्जन :भारतातली पहिली एफ-1 रेसर
◾️अपराजिता राय : सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS
◾️मनू भाकर : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
◾️सिमरन ब्रम्हदेव थोरात : देशातील पहिली जहाजावरील महिला डेक (जहाज) ऑफिसर
◾️नव्या सिंग : मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन
◾️मोहना सिंग : भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाडूनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट
◾️पूजा तोमर : भारताची पहिली महिला MMA फायटर

2024 ची संपूर्ण यादी दिली आहे 💯% प्रश्न येईल...✌️ जे कुणीही देत नाही तेच आपण देतो 👑

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

22 Oct, 10:09

ब्रिक्स परिषद ...

BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

22 Oct, 02:37

गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला

पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार

याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.

मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.

निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.

मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.

तिला गोवा राज्य युवा पुरस्कार

राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

22 Oct, 02:36

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

2023 : भरडधान्य वर्ष

2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

22 Oct, 01:13

गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

22 Oct, 01:13

न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली

◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय

ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला नाही

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

21 Oct, 12:17

काय आहे एबी फॉर्म? ...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

21 Oct, 07:03

आज दुपारी ठीक 3 pm वाजता गणित विषयाचा टॉपिक टेस्ट होणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी मानदेश या मैदानावरती हजर राहावे.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

21 Oct, 03:34

♦️राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पुणे महापालिकेला तृतीय क्रमांक

👉दिल्लीत विज्ञान भवन येथे २२ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

21 Oct, 02:07

न्यूझीलंड च्या महिला जगज्जेत्या...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

20 Oct, 01:05

राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा

▪️भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
▪️राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
▪️त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
▪️त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले आहेत.
▪️जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.

राष्ट्रीय महिला आयोग :

▪️भारत सरकारची वैधानिक संस्था
▪️1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार
▪️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

19 Oct, 17:10

19 ऑक्टोबर 2024 पोलीस भरती सराव   उत्तरपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :- 139   उत्तरपत्रिका

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Share & Support Us :- https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi
                                                  https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi  Click here

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

19 Oct, 15:32

🔳 19 ऑक्टोबर 2024 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका

➡️ पेपर क्रमांक :- 139 प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावुन सोडवा ऑफलाइन ची सवय ठेवा.....

➡️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा....➤ Share & Support Us :- https://t.me/dnyaneshwariacademydahiwadi
                                                  https://www.instagram.com/dnyaneshwari_academy_dahiwadi  Click here

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

19 Oct, 09:27

9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये...

🇮🇳 आतापर्यंत पाकिस्तान ला भेट देणारे पंतप्रधान एकूण 4 पंतप्रधान आहेत

1】जवाहरलाल नेहरू - 1935 ,1960 (2 वेळा)
2】राजीव गांधी - 1988 ,1989 (2 वेळा)
3】अटल बिहारी वाजपेयी - 1999 ,2004 ( 2 वेळा)
4】नरेंद्र मोदी - 2015
---------------------------------------
✈️ परराष्ट्रमंत्री कशासाठी गेले आहेत
◾️ 23 वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये त्यासाठी परराष्ट्रमंत्री गेले आहेत
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️उद्देश : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे
----------------------------------------------------

🚂 समझोता एक्सप्रेस : भारत - पाकिस्तान
🚂मैत्री एक्सप्रेस : भारत - बांग्लादेश
🚂थार लिंक एक्सप्रेस : भारत - पाकिस्तान
🚂बंधन एक्सप्रेस : भारत - बांग्लादेश

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

19 Oct, 01:48

टाटा ग्रुप अध्यक्ष...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

18 Oct, 02:24

◾️भारत सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न कंपनी दर्जा दिला आहे
◾️ही 14 वी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE) बनले आहेत.

🏆 भारत सरकार केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) तीन श्रेणींमध्ये विभागते:

महारत्न - 14
नवरत्न - 24
मिनीरत्न 1 - 51
मिनीरत्न 2 - 11

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Oct, 13:57

मिस इंडिया
2024 =निकिता पोरवाल  (मध्य प्रदेश)
2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Oct, 11:25

संजीव खन्ना असतील नवीन CJI

सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी नावाची शिफारस केली आहे.

सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

ते जर सरन्यायाधीश झाले तर ते देशातील दुसरे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश असतील. यापूर्वी न्यायमूर्ती केजी बालकृष्ण हे देशातील पहिले एससी सरन्यायाधीश होते.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Oct, 02:08

जागतिक भूक निर्देशांक 2024 ...

भारत 105 व्यां स्थानावर...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Oct, 02:06

हरियाणा चे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी...

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

17 Oct, 02:04

सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय ! ...

लेडी ऑफ जस्टिसचा नवीन पुतळा

पोशाख : भारतीय शास्त्रीय नृत्य पोशाख.

उजवा हात : समाजात समानतेचे प्रतीक म्हणून तराजू जपून ठेवण्यात आले.

रंग : ही मूर्ती पांढऱ्या रंगाची असून ती पांढऱ्या चौकोनी व्यासपीठावर ठेवली आहे.

डोळे : डोळ्याची पट्टी काढली.

डावा हात : तलवारीच्या जागी संविधानाचे पुस्तक ठेवले.

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

16 Oct, 01:57

निवडणूक आयोग
▪️स्थापना : 25 जानेवारी 1950
▪️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे

▪️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
▪️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
▪️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी

▪️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
▪️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे
◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका

हे लक्षात ठेवा

◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️डॉ सुखबीर सिंग संधू : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

16 Oct, 01:54

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक

◾️महाराष्ट्रात 1 टप्प्यात निवडणूक : 20 नोव्हेंबर
◾️झारखंड 2 टप्प्यात निवडणूक : 13 , 20 नोव्हेंबर
◾️दोन्ही निकाल - 23 नोव्हेंबर
---------------------------------
या निवडणुकी सोबतच - वेगवेगळ्या राज्यातील एकूण
☑️ 48 विधानसभा जागा
☑️ 2 लोकसभा जागा
यांच्या पोटनिवडणुक होणार आहेत
-------------------------------------
◾️नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : 20 नोव्हेंबर
◾️वायनाड लोकसभा पोटनिवडणुक : 13 नोव्हेंबर
◾️दोन्ही निकाल - 23 नोव्हेंबर
☑️ नांदेड मध्ये - खासदार वसंतराव चव्हाण मृत्य
☑️ वायनाड मध्ये - राहुल गांधींनी राजीनामा दिला होता)

◾️महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ : 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे
◾️झारखंड विधानसभेचा कार्यकाळ : 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे

☑️ ही 15 वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आहे

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Oct, 12:21

आचारसंहिता चा परीक्षा वरील परिणाम..

परीक्षा होतात..
( जर त्या दिवशी मतदान नसेल तर)

रिझल्ट लावता येतो..

answerkey पण देता येते..

जाहिरात आधीच वेळापत्रक मध्ये असेल तर येतात

सरळसेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून त्या येत नाहीत.

नियुक्ती पत्र देता येत नाहीत.
🙏🙏🙏

ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी, दहिवडी ,सातारा🚔पोलीस भरती🚔

15 Oct, 10:47

महाराष्ट्र राज्य निवडणूक कार्यक्रम जाहीर...

14,950

subscribers

3,317

photos

145

videos