MSRTC Official @msrtcofficial Channel on Telegram

MSRTC Official

@msrtcofficial


Official Telegram Channel Of MSRTC
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल

MSRTC Official (Marathi)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल 'MSRTC Official' ची बडबड तात्पुरतीची खोज आणि लोकशाही अद्यतनित झाली आहे. या चॅनेलवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या नवीन व अपडेटेड सुविधा, वेळापत्रक, नियोजने, शॉट नोट्स, सविस्तर माहिती व इतर संबंधित सुचना उपलब्ध करून देते.

या चॅनेलवर दररोज नवीन अपडेट आणि सुविधा मिळवायला व्हॉयस असू शकतो. एसटीआरसी च्या पडताळणी व अधिकारातील विविध संदेशांसह, चॅनेलवरील सदस्यांना अगादी घेण्याची सुयोग्यता आहे. तसेच, या चॅनेलवर टिप्पणी करण्याची आणि प्रश्नांचे उत्तर घेण्याची संधी आहे.

'MSRTC Official' चा सदस्यपद घेण्याच्या सुयोग्यता तुमच्याला नवीन व सार्थक माहितीची खोज आणि जाणून घेण्यास साहाय्य करेल. त्यातील संदेशांचा संग्रह व्हॉयस आणि किव्हॉर्ड गॅलरीच्या आवडीनुसार प्रक्रिया करण्यात येईल.

चॅनेलवरील पाहा, वाचा व सामायिक करा आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवरती नवीन सुविधा व अपडेटेड माहितीची भेट घ्या.

MSRTC Official

27 Jan, 14:47


येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता..!

MSRTC Official

25 Jan, 17:54


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳

MSRTC Official

25 Jan, 15:52


मा.परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांची धाराशिव आगाराला भेट..!

MSRTC Official

23 Jan, 10:30


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात प्रभावीपणे राबवणार
- परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक-
- मुंबई : (२३ जानेवारी) शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके " हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक " अभिनयाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु! अर्थात , हे अभियान केवळ एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक " लोकचळवळ " करावी! असे आवाहन परिवहन मंत्री श्री . प्रताप सरनाईक यांनी केली. ते कुर्ला बसस्थानक येथे स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
- आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर " हिंदुरहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणेच आपण जिथे काम करतो, तेथे देखील आपले घर समजून त्या कार्यालयाची, त्या बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात स्वच्छ ,सुंदर , सुशोभित बसस्थानके नक्कीच प्रवाशांना आकर्षित करतील! अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बस प्रवास करण्याचा आनंद त्यांना लुटता येईल. अर्थात, स्वच्छता हा एक " संस्कार " आहे, तो जसा एसटी कर्मचाऱ्यांनी अंगिकारणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी देखील तो आपल्या आचरणात आणला पाहिजे! बसस्थानक हि सार्वजनिक जागा आहे. तिथे स्वच्छता ठेवणे ही एसटी कर्मचारी आणि प्रवासी या दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.
- स्वच्छतेबाबत परदेशात जेवढी सजगता आणि जागरूकता आहे, तेवढी आपल्या देशात नाही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण स्वच्छतेच्या बाबतीत लोकांच्यात जनजागृती करून आपली बस स्थानके स्वच्छ आणि सुंदर कशी राहतील यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचा आहे .या स्पर्धात्मक अभियानातून एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मध्ये आपले बसस्थानक स्वच्छ, सुंदर व टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत . या माध्यमातून भविष्यात चांगली सुंदर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली. यावेळी एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी श्री गिरीश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी अभियानाची रुपरेषा मांडली, तर उपमहाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला एसटीचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
- (अभिजीत भोसले)
- जनसंपर्क अधिकारी
- मा.मंत्री परिवहन

MSRTC Official

23 Jan, 10:30


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात प्रभावीपणे राबवणार
- परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक-

MSRTC Official

21 Jan, 08:47


एसटी जागांचा पुनर्विकास दृष्टीपथात....

MSRTC Official

20 Jan, 12:12


एसटी जनतेच्या सेवेसाठी...

MSRTC Official

16 Jan, 19:09


मुंबई सेंट्रल: सन्माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाला भेट!

MSRTC Official

16 Dec, 14:27


एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतकी विक्रमी उत्पन्न...

MSRTC Official

13 Oct, 08:10


मुंबई सेंट्रल येथील नुतनीकरण केलेल्या वातानुकुलीत चालक - वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

MSRTC Official

12 Oct, 06:37


नव्या रंगात...ई-शिवाई, लवकरच येत आहे.

MSRTC Official

11 Oct, 19:30


विजयादशमी दसऱ्या निमित्त सर्व प्रवासी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा

MSRTC Official

09 Oct, 10:06


सन २०१९ च्या भरतीतील अतिरिक्त यादीवरील, १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार...
- अध्यक्ष भरत गोगावले.

MSRTC Official

02 Oct, 05:57


एसटी संगे तीर्थाटन..!

MSRTC Official

02 Oct, 01:01


आमच्या सर्व प्रवासी बंधू-भगिनींना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

MSRTC Official

27 Sep, 07:08


लवकरच दुरदर्शनच्या सहृयाद्री वाहिनीवर : एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांची मुलाखत....

MSRTC Official

26 Sep, 06:26


स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता...!

MSRTC Official

26 Sep, 06:04


महिलांचा सन्मान.. हाच एसटीचा बहुमान...

MSRTC Official

26 Sep, 04:18


एसटी आणि विद्यार्थ्यांचे नातं जगावेगळ असतं...!

MSRTC Official

25 Sep, 07:37


अपघातग्रस्तांच्या मदतीला धावली लालपरी...

MSRTC Official

25 Sep, 06:03


उत्पन्न वाढीसाठी चालक वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता...

MSRTC Official

23 Sep, 12:02


एसटीच्या जमिनीचा विकास करण्यासाठी भाडेकरार ३० वर्षावरून ६० वर्षापर्यंत... राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत...!
श्री भरत गोगावले...

MSRTC Official

23 Sep, 11:34


एस टी महामंडळाचे नवे अध्यक्ष श्री भरत गोगावले यांचे एस टी महामंडळाच्या मुख्यालयात जल्लोषात स्वागत...

MSRTC Official

23 Sep, 11:04


एसटी महामंडळाचे २४ वे अध्यक्ष म्हणून आमदार श्री. भरत गोगावले यांनी आज पदभार स्वीकारला. एसटी महामंडळाच्या वतीने मा. उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

MSRTC Official

20 Sep, 11:11


एसटीची अमृत ज्येष्ठनागरिक योजना