Advance Polity™ @advance_polity Channel on Telegram

Advance Polity

@advance_polity


राज्यशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advancempsc1

Contact Admin :- @amsquare

Advance Polity™ (Marathi)

आगामी परीक्षांसाठी राज्यशास्त्राच्या विषयावर तयारी करण्याची आवश्यकता आहे? तो तुमच्याकडे एक अद्वितीय संधी देते - 'Advance Polity™' चॅनल! या चॅनलवर तुम्ही मिळवू शकता राज्यशास्त्राच्या सर्व महत्वाच्या टॉपिक्सवर अद्वितीय नोट्स, प्रश्न, MindMaps, फ्लो चार्ट्स इत्यादी. तुम्हाला काहीतरी आवडलं की तो शेअर करण्याची संधी दिल्याची जाहिरात! तुमच्या प्रश्नांसाठी उत्तरं खोजत असताना किंवा आपल्या स्टडीसाठी तुम्हाला आवडणारे माहिती मिळत असताना, 'Advance Polity™' चॅनल तुमच्या मदतीसाठी आहे! आता जोडल्यावर तुम्हाला तसेच मदत करण्याची संधी आहे ज्यामागुळे तुम्ही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने पूर्ण तयारी करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांसाठी संपर्क साधा @amsquare यांच्याशी!

Advance Polity

21 Nov, 14:08


🔖भोकरमध्ये सर्वाधिक, महाडला सर्वांत कमी उमेदवार

📌राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक १४० उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात तर त्या खालोखाल ९८ उमेदवार हे बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.

📌 सर्वात कमी ५ उमेदवार रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.

🔖३८४ उमेदवारांपर्यंत वापरता येतात ईव्हीएम

🔴 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एका मतदारसंघात नोटासह ३८४ पर्यंत उमेदवारांना मतदानाचा पर्याय एका ईव्हीएमवर दिला जाऊ शकतो.
🔴ईव्हीएमच्या एका बॅलेट युनिट (बीयू) वर १६ उमेदवार राहू शकतात. असे २४ बीयू एकाच वेळेस जोडले जाऊन एक ईव्हीएम युनिट तयार होऊ शकते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

21 Nov, 06:01


Update करून घ्या.... सध्या मुद्दा Current मध्ये आहे...के. संजय मूर्ती भारतचे 15 वे CAG ठरले आहेत...👆

🔖नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)

📌CAG बद्दल Exam च्या दृष्टीने खालील महिती महिती पाहिजे...👇
➡️https://t.me/advancempsc/30542?single

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

19 Nov, 17:36


https://youtu.be/F0VwTlTeEzk

Advance Polity

19 Nov, 17:00


➡️या माहितीवर वारंवार प्रश्न विचारले जातात....Most IMP आहे.... चांगली करुन ठेवा..

🔖संविधान सभेबाबत महत्वाची माहिती

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

19 Nov, 07:29


🔖 राज्याचा आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार

➡️1. अजित पवार - २०१९ - १,६५,२६५ (मताधिक्य)
➡️2. विश्वजित कदम - २०१९ - १,५०,८६६ (मताधिक्य)
➡️3. किसन कथोरे - २०१९ - १३६०४० (मताधिक्य)

🔖राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते.

🔴१) शंकरराव चव्हाण
🔴२) ए. आर. अंतुले
🔴३) मनोहर जोशी
🔴४) शरदचंद्र पवार
🔴५) नारायण राणे
🔴६) पृथ्वीराज चव्हाण
🔴७) अशोक चव्हाण

➡️योगायोग असाही आहे, की हे सातही नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

19 Nov, 07:29


🔤🔤🔤

🔖पहिल्या तृतीयपंथी उमेदवार

📌जळगाव येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.

📌राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

19 Nov, 07:19


🔖आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष

➡️बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय रामचरण प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांनी नवीन पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा गुरुवारी केली.

➡️'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव असेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

18 Nov, 14:16


📌कोणत्याही पूर्व परीक्षेमध्ये महान्यायवादी/महाधिवक्ता यावर प्रश्न विचारण्याचे जास्त chances असतात....PYQ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल... एवढी info लक्षात ठेवल्यास जवळजवळ सर्व प्रश्न सुटतात..

🔖भारताचा महान्यायवादी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

18 Nov, 10:05


➡️या Information च्या बाहेर आयोगाचा प्रश्नच गेलेला नाही.... फिरून फिरून याच माहितीवर प्रश्न असतात.... चांगली करून ठेवा..

🔖राज्याचा महाधिवक्ता

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

16 Nov, 06:02


🔖आधीपासूनच नव्हते २८८ मतदारसंघ !

१९५७ साली मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या. त्यात महाराष्ट्रासह गुजरातचाही मोठा भाग मुंबई प्रांतात होता. २६४ जागांसाठी मतदान झाले.

■ स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात १९६२ साली पहिल्या निवडणुका पार पडल्या. त्याही २६४ मतदारसंघांतच झाल्या. १९६२ मध्ये २६४ मतदारसंघ मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांमध्ये विभागलेले होते.

१९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांची संख्या २६४ वरून २७० वर गेली.

■ १९७३ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली. यानुसार महाराष्ट्रातील मतदारसंघांची संख्या २८८ वर गेली.

१९७८ साली झालेल्या निवडणुकांमध्ये २८८ मतदारसंघांमधून जवळपास १८००हून जास्त उमेदवार रिंगणात होते.

🔖असं आहे आरक्षण

📌२९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी, तर उरलेले २३४ मतदारसंघ खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत.

🔖२०२६ मध्ये पुनर्रचना होणार

📌देशभरात २०२६ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे. २०२९ च्या निवडणुका नव्या मतदारसंघांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबरोबरच महिलांसाठीचेही आरक्षण लागू असेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

12 Nov, 15:18


📌 आयोगाचा आवडता Topic.....राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..

🔖लोकपाल आणि लोकायुक्त

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

06 Nov, 05:16


📌पूर्व परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.... त्यामुळे चांगले करुन ठेवा... हातचे Marks आहेत...

🔖राज्य विधिमंडळ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

05 Nov, 10:33


📌पूर्व परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.... त्यामुळे चांगले करुन ठेवा... हातचे Marks आहेत...

🔖विधानपरिषदेची रचना

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

03 Nov, 06:51


🔖राष्ट्रीय महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे

➡️अध्यक्षपदी प्रथमच मराठी व्यक्ती

📌भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तसेच राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

📌या आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय दर्जा असेल. राज्यमंत्रिपदाचाभाजपच्या

📌 त्यांनी वर्ष २०१६ ते २०२१ यादरम्यान महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता.

📌राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

29 Oct, 18:18


📌यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.... येणाऱ्या Exam साठी महत्वाची माहिती आहे....

🔖पंचायतराज आणि घटनात्मक दर्जा

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Polity

29 Oct, 12:42


☄️अनुसूची आणि संबंधित विषय

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Polity

29 Oct, 06:06


🔖न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान !

📌कायदा कधीही अंध नसतो, तो शिक्षेचा प्रतीक नाही, कायदा सर्वांना समानतेच्या नजरेतून पाहत असतो ही मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न.

🔖काय आहे नवीन मूर्तीमध्ये खास?

■ न्याय देवतेची नवीन मूर्ती पूर्ण पाढऱ्या रंगाची आहे.
■ प्रतिमेत न्याय देवतेला भारतीय वेशभूषेत दाखवण्यात आले आहे, त्यात प्रामुख्याने साडी दिसते.
■ डोक्यावर सुंदर मुकूट आहे, कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक आभूषणे आहेत.
न्याय देवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान प्रक्कडल्याचे दाखवण्यात आले आहे.
जुन्या मूर्तीमध्ये एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार होती. इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा सुरू होती, ती आता बदलायला हवी, कायदा कधीही अंध नसतो. तो सर्वांना समान पाहतो, असे दाखवणे गरजेचे होते.

🔖जुनी प्रतिमा आली कुठून?

🔴न्याय देवतेची ही प्रतिमा युनानमधून आली, न्यायाचे प्रतीक म्हणून तिथे प्राचीन देवी आहे. तिचे नाव जस्टिया होते, त्याच नावाने जस्टीस शब्द तयार झाला.
🔴डोळ्यावर पट्टी बांधणे म्हणजे न्याय देवी नेहमी निष्पक्षपणे न्याय करेल. कुणालाही पाहून न्याय करताना एकाची बाजू घेतली जाईल, त्यामुळे तिच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचे सांगितले जाते. युनानमधून ही प्रतिमा ब्रिटनमध्ये पोहचली.
🔴१७व्या शतकात एक इंग्रजी अधिकारी ते भारतात घेऊन आले. ब्रिटिशांच्या काळात १८व्या शतकात न्याय देवतेची ही मूर्ती सार्वजनिक वापरात आली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW