यशाचा राजमार्ग @yashacharajmarg Channel on Telegram

यशाचा राजमार्ग

@yashacharajmarg


स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
@MPSC
@UPSC
@police
#MPSC
#UPSC
#पोलीस_भरती

यशाचा राजमार्ग (Marathi)

यशाचा राजमार्ग ही एक Telegram चॅनेल आहे ज्यात तुम्हाला स्पर्धेच्या सागरात आपल्या उडी घेतल्याची साथ दिली जाते. जर तुम्ही MPSC, UPSC किंवा पोलीस भरती च्या परीक्षा दिलेल्या असाल तर ह्या चॅनेलवर तुम्हाला सहाय्य मिळेल.
यशाचा राजमार्ग चॅनेलवर नवीन परिक्षा सोडताना मदतीच्या सुचना, विशेषकरून MPSC, UPSC, आणि पोलीस भरती संबंधित माहिती वाचू शकता. या चॅनेलवर तुम्ही आपल्या ध्येयाला पुर्ण करण्यात मदत करणारे लोकांचं समूह समाविष्ट करता येईल. त्यांना अध्ययन मदतीच्या साधने, सुचना आणि पेपर पॅटर्नची माहिती मिळेल.
यशाचा राजमार्ग चॅनेलवर तुम्हाला रोजच्या जीवनात चालवण्यास कसे मदत करावे हे सांगितले आहे. असा एक साथी समुदाय जिंकण्यात तुम्हाला मदत करेल. त्यांना अध्ययन कसे करावे, कसे पॅटर्न वाचावा आणि चालवावा हे सर्व माहिती या चॅनेलवर तुम्हाला मिळेल. यशाचा राजमार्ग त्यांचं ध्येय साध्य पडण्यात तुम्ही मदत करेल.

यशाचा राजमार्ग

10 Dec, 04:10


Photo

यशाचा राजमार्ग

10 Dec, 04:09


Photo

यशाचा राजमार्ग

10 Dec, 04:08


उद्या पेपर सोडवत असताना खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे

अचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true, right)

बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

अयोग्य : म्हणजे चूक ( incorrect)

योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

असत्य : चूक (incorrect)

सत्य नाही : म्हणजे चूक

कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

काय खरे नाही : (not true)

पेपर सोडवताना वरील शब्द 👆काळजीपूर्वक वाचल्यास तुमच्या चूका नक्कीच कमी होतील.

English मधून वाचल्यास थोडे सोपे जाईल

सर्वांना उद्याच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी

All The Best 👍 👍

यशाचा राजमार्ग

10 Dec, 04:08


❇️ आरक्षणासंबंधीचे महत्वाचे खटले :

श्रीमती चंपकम दोराईजन वि. मद्रास राज्य (1951)

👉 जाती आधारित आरक्षण घटनेच्या कलम 15 (1) चे उल्लंघन करते.

एम. आर. बालाजी वि. म्हैसूर राज्य (1962)

▪️शासनाच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी 68% इतक्या आरक्षणास अत्याधिक व वास्तव मानन्यात आले.

इंद्र सहानी वि. भारतीय संघ (1992)

👉 घटनेने सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाला मान्यता दिली परंतु आर्थिक मागासलेपणाला नाही.

👉 सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा नोकऱ्यांमध्ये OBC साठी आरक्षण कायम ठेवले परंतु क्रिमीलेअरला वगळण्यास सांगितले.

अखिल भारतीय शोसित कर्मचारी संघ (रेल्वे) वि. भारतीय संघ.

▪️50% आरक्षणापेक्षा जास्त पदांच्या निवडीमध्ये रेल्वे बोर्डाचा "कॅरी फॉरवर्ड नियम" कायम ठेवला जाईल, (परंतु तो काही विशिष्ट स्थितीमध्ये) बढतींमध्ये आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही.

एम. नागराज आणि इतर वि. भारत संघ (2006)

▪️77 व्या दुरुस्तीची घटनात्मकता कायम ठेवली. परंतु सुप्रीम कोर्टने भरतीतील आरक्षण मान्य केले आणि प्रतिनिधित्व कमी असल्याने संख्यात्मक माहिती देणे गरजेचे आहे असे सांगितले तसेच मागासलेपणा सिद्ध करावा लागेल आणि कामाची कार्यक्षमता कमी होता कामा नये.

बी. के. पवित्रा वि. कर्नाटक राज्य (2019).

कर्नाटक शासनाचा बढतीतील आरक्षणाचा नियम योग्य ठरवला आणि कलम 335 मधील कामातील गुणवत्तेचा मुद्दा जो नागराज खटल्यात महत्त्वाचा मानला गेला होता, त्यात सुप्रीम कोर्टने बदल करून म्हटले की गुणवत्तेसोबतच संविधानातील मूल्ये व ध्येये पूर्ण करणेही आवश्यक आहे. (कर्नाटक शासनाने कमी प्रतिनिधित्वाची संख्यात्मक माहिती दिली होती.)

यशाचा राजमार्ग

10 Dec, 04:08


❇️ खटल्यांचे वर्गीकरण

💥 प्रस्तावनेसंदर्भातील खटले

1. बेरुबारी यूनियन वि. भारतीय संघ (1960)

2. गोलखनाथ वि. पंजाब राज्य (1967)

3. केशवानंद भारती वि. केरळ राज्य (1973)

4. इंदिरा नेहरू गांधी वि. राजनारायण (1975)

5. मिनर्वा मिल वि. भारतीय संघ (1978)

💥घटनादुरुस्ती संदर्भातील खटले

▪️कलम 368

1. शंकरी प्रसाद वि. भारतीय संघ (1951)

2. सज्जन सिंग वि. राजस्थान (1954)

3. गोलकनाथ वि. पंजाब राज्य (1967)

4. केशवानंद भारती वि. केरळ (1973)

💥मूलभूत हक्कांसंदर्भातील खटले

1. ए. के. गोपालन वि. मद्रास राज्य (कलम 13) (1950)

2. चंपकम दोराइराजन वि. मद्रास राज्य (कलम 15) (1951)

3. इंद्रा सहानी वि. भारतीय संघ (कलम 15) (1993)

4. मनेका गांधी वि. भारतीय संघ (कलम 21) (1978)

5. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (कलम 25 ते 28) (1994)

💥आणीबाणी संदर्भातील खटले

▪️कलम 352 ते 360

1. मिनव्हा मिल वि. भारतीय संघ (1980)

2. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (1994)

👉 यापूर्वी आपण basic structure संदर्भात सर्व खटले दिलेले आहेत ते सुद्धा परीक्षेपूर्वी वाचून घ्या.

यशाचा राजमार्ग

10 Dec, 04:07


♦️ विमा सखी योजना..

यशाचा राजमार्ग

10 Dec, 03:12


आज होणाऱ्या BMC करनिरीक्षक परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.💐💐💐

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:55


♦️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

👉 सुरुवात - 28 जुन 2024.

👉 मंत्रालय - महिला व बालविकास मंत्रालय

👉 वैशिष्ट्य - या योजनेत अल्प, उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रु. आर्थिक मदत शासनाकडून दिले जाणार आहे.

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:52


संयुक्त पूर्व परीक्षा 2024

रयत प्रबोधिनी
स्टेप उप अकॅडमी
विदर्भ IAS
स्वराज्य अकॅडमी

एकूण 36 पेपर

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:49


लिपिक टंकलेखक केस सुनावणी पुढील तारीख 18 डिसेंबर रोजी होईल.

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:44


जास्त कट Off का सांगितले जातात ?

मुलांनी राज्यसेवा सोडून आमच्या #Combined_Batches कडे वळले पाहिजेत म्हणून...😜

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:42


अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षा दिनांक जाहीर

हॉलतिकीट लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:36


After 2nd key Cut off हा 2nd key सांगणे संयुक्तीक असत 😄😄😄

2nd key ला मार्क्स वाढतील की कमी होतील हे कोणालाही ठाऊक नाही.

त्यामुळे अभ्यास करताना आताच्या मार्क्स वरून निर्णय घ्या..

ज्यांच्याकडे कोणतीही पोस्ट नाही Combine चा अभ्यास केल्यास फायदा होईल..

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:36


UPSC मुख्य परीक्षा 2024 निकाल जाहीर.

➡️NAMEWISE list

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:36


UPSC मुख्य परीक्षा 2024 निकाल.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:33


Combine Prelims च्या दृष्टिकोनातून..‌‌

अभ्यास केलेले सर्वच घटक/उपघटक एकदमच आठवण्याचा प्रयत्न करणे किंवा आठवत नसल्यास टेंशन घेणे...हा असा Problem काही लोकांचा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ...आपल्या exam मध्ये तुम्हाला चार Option आहेत त्याच्यामुळे....खूप अभ्यास केला आहे पण मित्र/मैत्रिणीने प्रश्न विचारला की सांगता येत नाही..पण त्याच प्रश्नाचे Option/Sub Option दिले की लगेच उत्तर आठवत/उत्तरापर्यंत पोहोचता येतं .... आणखीन काय पाहिजे आपला हेतू फक्त पेपर मध्ये जास्त मार्क घेणे हा आहे.

जोरदार लढा आम्ही कायम आभ्यासाच्या बाबतीत सोबत आहोत‌.❤️

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

यशाचा राजमार्ग

10 Dec, 02:32


Cut off संदर्भात महत्वाचे..

कोणत्याही परीक्षेचा Cut off काढतांना Open male, OBC male etc etc यांना किती जागा आहेत यावरून आयोग Cut  off काढत नाही तर आयोग खालील पद्धतीने Cut off काढतो..

समजा या वर्षी राज्यसेवेमध्ये आतापर्यंत 457 जागा आहेत तर आयोगाला मुख्य परीक्षेसाठी 457*16= 7312 एव्हडे विद्यार्थी पास करावे लागतील..

परंतु आयोग असं डायरेक्ट 457*16 करत नाही तर आधी सर्व कॅटेगरी चे 457*12= 5484 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होतात.( यात सर्व कॅटेगरी च्या मुली आणि बाकी सर्व कॅटेगरी विद्यार्थी येतात )

नंतर सर्व कॅटेगरी साठी त्यांच्या त्यांच्या जागेसाठी Cut Off रेषा खाली आणली जाते. यात आयोगाला साधारण एकूण जागेच्या 4 पट मुलं मिळतात..

अशा प्रकारे 12 पट मुलं open General मधून पास होतात आणि उरलेले 4 पट कॅटेगरी मधून.

त्यामुळे Open General ला किती जागा आहेत यावरून Cut off काढणे चूक आहे.

वेगळ्या शब्दात सांगायचं झाल्यास तुम्हाला 2024 पूर्व पास व्हायचं असल्यास राज्यात पहिल्या 5500 मध्ये यावं लागेल आणि कॅटेगरी किंवा Female असेल तर 7312 पर्यंत rank आली तरी तुम्ही पास व्हाल.

शुभेच्छा..

यशाचा राजमार्ग

08 Dec, 09:02


संघर्ष करत रहा...

स्वतःसाठी आज जे करायला लागेल करा
पण येणारी वेळ बदला,

आज तुमच्याकडे काहीच
नसेल तर ते मिळवण्यासाठी पूर्ण ताकतिने प्रयत्न करत रहा...!!📚📖

नक्कीच वेळ बदलेल... ❤️✌️

यशाचा राजमार्ग

08 Dec, 06:43


आमदारांचा पगार किती?

मूळ पगार 67,000
दूरध्वनी 8000
स्टेशनरी 8000
संगणक चालक 10,000
खाजगी सहायक 25,000
ड्रायव्हर 15,000
अधिवेशन काळात प्रतिदिन 2000

महागाई भत्ता धरुन 3 लाखाच्या आसपास पगार एका आमदाराला मिळतोय.

शिवाय सध्या मुंबईत सरकारी घरे आमदारांना उपलब्ध नसल्यामुळे लाखो रूपये घरभाडे दिलं जातंय.

निवृत्तीवेतन 50,000
मृत आमदाराच्या पती / पत्नीला 40,000

विमान, रेल्वे प्रवास मोफत उपलब्ध.

संपुर्ण कुटुंबाच्या दवाखान्याचा 100% खर्च सरकार करतंय.

दोन शस्त्रधारी पोलीस सुरक्षारक्षक.

गाडी-घरासाठी बिनव्याजी कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

#विधानसभा

यशाचा राजमार्ग

08 Dec, 04:05


दुसऱ्या उत्तरतालिका नुसार आयोग काही प्रश्न याची उत्तरे बदलून देऊ शकतो..

10 डिसेंबर पर्यंत doubtful असलेल्या प्रश्न बाबतीत विद्यार्थ्यांनी MPSC ला आक्षेप पाठवावे.. 🙏🙏

यशाचा राजमार्ग

04 Dec, 14:55


#Combined

यशाचा राजमार्ग

04 Dec, 14:55


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा💎

💎विज्ञान विषयामधील Most IMP Topics

1) वनस्पती व प्राणी वर्गीकरण - detail मध्ये वाचावं लागेल. 2-3 प्रश्न विचारले जातात

2) मानवी आरोग्य व रोग (यात पोषणद्रव्ये - कर्बोदके, प्रथीने, जीवनसत्वे) + वनस्पती रोग

3) मानवी शरीरातील संस्था - पचन, श्वसन, प्रजनन इ.

4) पेशी - उती - विभाजन

5) वनस्पती - श्वसन, वहन, प्रकाशसंश्लेषण

6) मुलद्रव्य वर्गीकरण, धातू - अधातू, संमिश्रे

7) आम्ल-आम्लारी

8) भौतिक राशी - एकके

9) प्रकाश

10) ध्वनी

11) उष्णता

12) कार्य, ऊर्जा, शक्ती

यशाचा राजमार्ग

04 Dec, 14:45


परीक्षेला शेवटचे 30 दिवस राहिले आहेत... तुम्हाला जाणीव करून देतोय फक्त.. राहिलेल्या दिवसात काय करायचं आणि काय नाही हे वारंवार सांगितलंय मी.. आत्ता नाही तर मग कधी करणार आहात??... अभ्यासाची काळजी घ्या बाळांनो बस्स इतकंच 🌿

यशाचा राजमार्ग

04 Dec, 14:45


2020 राज्यसेवा पूर्व
पेपर :- 21 मार्च 2021
पहिली उत्तर तालिका :- 24 मार्च 2021 (बुधवार)

2021 राज्यसेवा पूर्व
पेपर :- 23 जानेवारी 2022
पहिली उत्तर तालिका :- 27 जानेवारी 2022 (गुरुवार)

2022 राज्यसेवा पूर्व
पेपर :- 21 ऑगस्ट 2022
पहिली उत्तर तालिका :- 25 ऑगस्ट 2022 (गुरुवार)

2023 राज्यसेवा पूर्व
पेपर :- 4 जून 2023
पहिली उत्तर तालिका :- 7 जून 2023 (बुधवार)

2024 राज्यसेवा पूर्व
पेपर :- 1 डिसेंबर 2024
पहिली उत्तर तालिका :- ?

2 बुधवार = 2 गुरुवार

👍🏼👍🏼

यशाचा राजमार्ग

04 Dec, 10:38


Loading....................

यशाचा राजमार्ग

04 Dec, 10:38


राज्यसेवा पूर्व परीक्षा ...प्रथम उत्तर तालिका आज

यशाचा राजमार्ग

04 Dec, 09:34


♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे
remaining निकाल...

1. FSO मुख्य परीक्षा 2023
2. स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023
3. लिपीक 2023
4. कर सहायक 2023
5. PSI 2022 अंतिम निकाल आणि शिफारशी

यशाचा राजमार्ग

04 Dec, 07:43


♦️👉भारताचा प्रजनन दर गेल्या 64 वर्षांपासून घसरत आहे

यशाचा राजमार्ग

04 Dec, 06:46


समाजकल्याण विभाग भरती update

यशाचा राजमार्ग

04 Dec, 06:46


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन निमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात सर्व शासकीय निम शासकीय कार्यालय ला स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

यशाचा राजमार्ग

04 Dec, 06:09


⭐️⭐️1 डिसेंबर रोजी पार पडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024. 1 डिसेंबर रोजीचा पेपर ज्या लोकांनी दिला नाही अशा सर्व लोकांनी पेपर व्यवस्थित Solve करा . विशेषतः Combine prelims विद्यार्थींनी हा पेपर Solve करा. प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण करा. 😌

यशाचा राजमार्ग

03 Dec, 13:04


महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 280652 अर्ज प्राप्त

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 212457 अर्ज प्राप्त झाले

गट ब परीक्षेला - 68,195 अर्ज जास्त आहेत गट क पेक्षा

👍🏼👍🏼💐

यशाचा राजमार्ग

03 Dec, 12:42


राज्यसेवा पूर्व परीक्षा होऊन 2 दिवस झाले आहेत आत्ता.. किमान उद्यापासून तरी अभ्यासाला लागा...5 जानेवारी हा आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे... जास्त काही सांगणार नाही पण वेळ घालवू नका इतकंच.. 🌿❤️

यशाचा राजमार्ग

03 Dec, 12:41


राज्यसेवा 2024 पूर्वचा पेपर सोपा होता ही classes वाल्यांनी उठवलेली अफवा आहे. स्वतः पास न झालेला शिक्षक पेपर easy होता म्हणून सांगतो.. 2018-19 पासून सुरू असलेला all of the above trend पूर्णपणे संपलेला आहे. जागावाढबाबत प्रयत्न केल्यास CutOff गेल्यावेळी पेक्षा कमी लागेल 💐👍

यशाचा राजमार्ग

03 Dec, 12:00


आयोगाची official answer key येईपर्यंत थोडा संयम ठेवा.

Classes च्या key मध्ये आणि आयोगाच्या key मध्ये बरीच तफावत असते.

Cutoff किती लागेल हे key आल्यावर देखील कोणीही accurate सांगू शकत नाही. Key आल्यावर जे अंदाजित cutoff असतील त्यातले 1-2 जणांचे अंदाजच actual cutoff च्या जवळ जाणारे असतात. बाकी एकदमच जास्त किंवा एकदमच कमी cutoff याकडे दुर्लक्ष केलेलं बरं!

दरवर्षी cutoff पेक्षा 10-15-20 मार्क्स जास्त घेणारे बरेच जण असतात, पण ते cutoff decide करत नसतात.

जास्तीत जास्त crowd किती मार्क्स च्या range मध्ये आहे, त्या range च्या आसपास cutoff लागत असतो.

परीक्षेत किती जण absent होते, जागा किती आहेत या गोष्टींचा cutoff decide करण्यासाठीचा वाटा खूप नगण्य असतो.
Cutoff साठीचा सर्वात मोठा factor म्हणजे पेपर ची difficulty level !

2022 मध्ये 600+ जागा असून cutoff 105 च्या खाली लागला नाही आणि 2023 मध्ये 2022 पेक्षा दुपटीने कमी जागा असून cutoff 110 च्या वर गेला नाही.

2024 च्या पेपर ची difficulty level कशी होती हे त्यांना विचारून बघा ज्यांनी 2022-23 च्या exams दिल्या होत्या.

यावेळेस प्रश्न ओळखीचे, सोपे वाटत होते मात्र फसवे / tricky options मुळे बऱ्याच जणांची "गोची" झालेली आहे.

त्यामुळे key आल्यावर मुलांना कसे marks मिळतात त्यावरून पुढील गोष्टी स्पष्ट होतील. तोपर्यंत थोडा संयम ठेवा.

यशाचा राजमार्ग

03 Dec, 10:00


🔴 जागतिक हवामान बदल परिषद (COP)

🪷 COP28 सन 2023 - युएई
🪷 COP29 सन 2024 - अझरबैजान
🪷 COP30 सन 2025 - ब्राझील

🇮🇳 COP33 सन 2028 - भारत

यशाचा राजमार्ग

03 Dec, 10:00


नवीन नियुक्ती झालेली पंतप्रधान / राष्ट्राध्यक्ष ✅️


अमेरिका राष्ट्रपती : डोनाल्ड ट्रम्प (47 वे)
अमेरिका उपराष्ट्रपती : जेम्स डेव्हिड व्हॅन्स
मोल्दोवा राष्ट्रपति : मैया सैंडू
बोत्सवाना अध्यक्ष : डुमा बोको
व्हिएतनाम अध्यक्ष : लुओंग कुओंग
ट्युनिशिया अध्यक्ष : कैस सैद
मेक्सिको : क्लॉडिया शेनबॉम 
श्रीलंकेचे पंतप्रधान :  हरिणी अमरसूर्या
श्रीलंका राष्ट्रपती : अनुरा कुमारा दिसानायके


हे करूनच ठेवा, exam साठी IMP आहे 👍

यशाचा राजमार्ग

03 Dec, 06:13


♦️ #BMC परीक्षा क्लार्क स्वरूप थोडक्यात

👉 ENGLISH
Preposition
Spelling correction
Antonyms synonym
Parajunble
Passage
Pharses
Grammer- tense

👉 मराठी..
समास प्रयोग
संमनार्थी विरुद्धार्थी
म्हणी
लेखक टोपण नावे
Passage
समुहबदल शब्द
वक्यप्रचार अर्थ
मराठी व्याकरण
काळ
समास
विभक्ती
प्रयोग

👉 GS ( सामान्यज्ञान )
पुरस्कार
स्त्री releated current
मुंबई महानगर पालिका माहिती...
Rule
हेल्पलाइन नंबर
अधिकारी कोठे ...कोणते
कररचना
2023च current
Antarastriy summit
Hunger index
खेळ
पुस्तके लेखक
अधिनियम चे Q


यशाचा राजमार्ग

03 Dec, 06:12


#BMC क्लार्क..
♦️आज BMC FIRST SHIFT QUESTION

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 =
First shift
1) Passage -1
2) Idioms -2
3) phrases-1
4) Tense -3
(Spot the error)
5) Article -2
6) Para jumbled -2
7) One word substitution -1

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न

यशाचा राजमार्ग

03 Dec, 05:29


Photo

यशाचा राजमार्ग

25 Nov, 02:17


#🔥 Current Vimp

2023 चा उद्योग मित्र पुरस्कार कोणाला मिळाला?

-
आदर पूनावाला

2023 चा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला?
-रतन टाटा

2023 चा उद्योगिनी पुरस्कार कोणाला मिळाला?
-गौरी किर्लोस्कर

महाराष्ट्र शासनाने उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०२३ पासून प्रथमच पुरस्कार जाहीर केले आहेत.
त्यात
उद्योग रत्न,
उद्योगमित्र ,
उद्योगिनी आणि
उत्कृष्ट मराठी उद्योजक(विलास शिंदे, सह्याद्री फार्मर्स कंपन, नाशिक यांना)
अशा आशयाचे पुरस्कार आहेत.

यशाचा राजमार्ग

24 Nov, 06:34


⭐️⭐️राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका,
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
• महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ( सर्व संवर्ग )
•कनिष्ठ अभियंता (जलसंपदा)

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

यशाचा राजमार्ग

24 Nov, 06:34


🔔आचारसंहितेमुळे थांबलेल्या काही जाहिराती पुढील महिन्यापासून येतील..

नवीन जाहिराती ज्या तयार नाहीत त्यांना वेळ लागेल..

📢 तयार आहेत फक्त थांबल्या होत्या त्या येऊन जातील.. 💙

#️⃣ अभ्यास करत रहा....

यशाचा राजमार्ग

24 Nov, 06:34


IMP

यशाचा राजमार्ग

24 Nov, 01:58


पश्चिम बंगाल मध्ये झालेले 6 जागेसाठी च्या विधानसभा पोटनिवडणूक सर्व जागा ममता बॅनर्जी पक्ष तृणमूल काँग्रेस ने जिंकल्या

यशाचा राजमार्ग

24 Nov, 01:58


वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

यशाचा राजमार्ग

24 Nov, 01:39


💥💥राजकारण आणि स्पर्धा परीक्षा गोल्डन रुल

♦️ॲप्रोच हा बॉटम अप असायला पाहिजे 🔥🔥

💥💥स्पर्धा परीक्षेत स्टेट बोर्ड/NCERT आणि राजकारनात स्थानिक राजकारण यावर पकड असल्याशिवाय पोस्ट मिळत नसते 🔥🔥🔥🔥

यशाचा राजमार्ग

23 Nov, 17:57


#RRB_Recruitment_2024
#RRB_ALP
#Admit_Card_Released

Link :
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

📚 Check your admit card daily as per the exam schedule from today onwards...

यशाचा राजमार्ग

23 Nov, 16:01


डेक्कन एज्युकेशन सोसायटी

स्थापना :- 24 ऑक्टोबर 1884, पुणे येथे
महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पन्नास हजार रुपये देणगी या संस्थेत दिली होती.

याच संस्थेने 1885 मध्ये जेम्स फर्ग्युसन यांच्या नावे फर्ग्युसन कॉलेज सुरू केले.

संबंधित सदस्य :- लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ, नारायण मल्हार जोशी, वामन आपटे, माधव आपटे, परशुराम पाटणकर, गोपाळ कृष्ण गोखले, चिंतामण भानू.

#Revise #VIMP

यशाचा राजमार्ग

23 Nov, 15:20


Photo

यशाचा राजमार्ग

23 Nov, 13:21


🙏🙏🙏

यशाचा राजमार्ग

23 Nov, 13:06


छत्तीगड लोकसेवा आयोगाच्या मा. अध्यक्ष यांना CBI ने भरती घोटाळ्या प्रकरणी अटक केली. ⚡️
मुलगा उपजिल्हाधिकारी, सुन उपजिल्हाधिकारी, पुतण्या DYSP

#CBI🔥

यशाचा राजमार्ग

23 Nov, 12:33


🏫 NIRF Overall Education Institution रँकिंग

1. आयआयटी मद्रास
2. आयआयएससी बेंगळुरू
3. आयआयटी मुंबई
4 आयआयटी दिल्ली
5. आयआयटी कानपूर

#education #gs3 #social

यशाचा राजमार्ग

23 Nov, 09:38


राज्यसेवा 8 दिवसांनी पिछाडीवर

अराजपत्रित गट-ब 45 दिवसांनी पिछाडीवर

गट-क 71 दिवसांनी पिछाडीवर

🔥🔥🔥🔥🔥

यशाचा राजमार्ग

23 Nov, 07:48


शेवटचा attempt, अभ्यास कराव लागतंय 😄❤️

यशाचा राजमार्ग

23 Nov, 06:12


🪷 मी पुन्हा येईन 😅

यशाचा राजमार्ग

23 Nov, 06:08


Leader of Opposition मिळणार का नाही याचे सुद्धा वांदे झाले महाराष्ट्र मध्ये😂😂😂😂

यशाचा राजमार्ग

23 Nov, 05:35


200+ 🤡
11 am

यशाचा राजमार्ग

23 Nov, 05:32


मित्रांनो सरकार हेच असेल हे आता सिद्ध झालंय, त्यामुळे आता सर्व निर्णय हे जुनेच असणार सर्व exam आहे तश्याच होणार, सरळसेवा डिसेंबर 2025 पर्यंत TCS/IBPS कडेच राहणार पुढे 2026 ला MPSC कडे हस्तांतरित होईल आणि राज्यसेवा मुख्य 2025 पासून लेखी होईल त्यामुळे आता अभ्यास करा बाकी सरकार बनल्यावर नंतर वेळ मिळणार नाही 🙏

यशाचा राजमार्ग

23 Nov, 05:31


सगळे म्हणतात

' विजय आपलाच '

पण विजय जाम घाबराय मी कोणाचाय?


😂😂

यशाचा राजमार्ग

21 Nov, 14:38


❤️20 मार्च 1927 चवदार तळे सत्याग्रह

❤️25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहन

❤️13 ऑक्टोबर 1929 पर्वती मंदिर सत्याग्रह

❤️2 मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह



Trick sequence wise

चव मनु पर्वत काळात

यशाचा राजमार्ग

21 Nov, 14:38


Photo

यशाचा राजमार्ग

21 Nov, 14:38


चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा लंबवर्तुळाकार मार्ग

उपभू स्थिती - पृथ्वीपासुन जवळ
अपभू स्थिती - पृथ्वीपासुन दूर

पृथ्वीचा सुर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा लंबवर्तुळाकार मार्ग

उपसूर्य स्थिती - सुर्यापासुन जवळ
अपसूर्य स्थिती - सुर्यापासुन दूर

अप आणि उप मधील confusion
Trick to remember 👇
➡️उप = जवळ
( उप- कँप्टन नेहमी कँप्टनच्या जवळ)

#geography


अक्षवृत
्ते - दोन अक्षववृत्तांमधील अंतर समान परंतु ती समान लांबीची नसतात.(181)

रेखावृत्ते - दोन रेखावृत्तांमधील अंतर समान नसते परंतु ती समान लांबीची असतात. (380)

यशाचा राजमार्ग

21 Nov, 14:34


भारताची लोकसंख्या
Accurate Info.

यशाचा राजमार्ग

21 Nov, 14:33


♦️भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार शपथ दिली !

यशाचा राजमार्ग

21 Nov, 04:10


♦️ #Exam #countdown

यशाचा राजमार्ग

21 Nov, 03:36


1 डिसेंबर ला आपली राज्यसेवा परीक्षा आहे लक्षात असुद्या.. 😀

यशाचा राजमार्ग

21 Nov, 03:35


1)परीक्षेचा दिवस सोडला तर आजपासून आपल्याकडे 45 दिवस आहेत..

2) इथून पुढे आपल्या किमान 3 Revision होणं अपेक्षित आहे.

3) Previous Year Question वारंवार वाचून झाले पाहिजेत.

4) किमान 10 ते 15 टेस्ट पेपर सोडवून झाले पाहिजेत.

5) Time Management, Temperament Management आत्तापासूनचं चांगलं करून घ्यायचं आहे.

6) आपली पेपर सोडवण्याची पद्धत कशी असणार आहे हे ठरवणं महत्वाचं आहे.( कोणत्या विषयापासून सुरवात करायची वगैरे.)

7)पेपर सोडवताना Gs किती वेळात संपवायचं आहे आणि Math-Reasoning ला किती वेळ द्यायचा आहे याचा plan तयार असायला हवा.

8) मागच्या परीक्षेत झालेल्या चुका आपण सुधारल्या का?? याकडे लक्ष दया.

9) दिवसभराचं नियोजन एकदम Busy हवंय तुमचं.. प्रत्येक तासाचं नियोजन ठरलेलं असावं.

10) सगळ्यात महत्वाचं की 1 मिनिटही वेळ विनाकारण इकडं-तिकडं जाऊ देऊ नका.

11) केल्यावर सगळं-सगळं होतं हे मी अगदी विश्वासाने सांगेन फक्त काहीही झालं तरी राहिलेले दिवस कुठंचं कमी पडू नका.. एकदम महत्वाचे दिवस सुरु आहेत.

12) आणि हो सगळीकडे आत्ता निवडणुकांचं वातावरण आहे.. अभ्यास सोडून या चर्चा करत बसू नका.. याचं सरकार येईल.. तोच निवडून यायला पाहिजे.. त्यानं ही-ही कामं केली.. असले प्रकार खूप होतात मुलांच्यामध्ये हे मला माहिती आहे त्यामुळे अशा चर्चापासून लांब रहा.विनाकारण वेळ जातो त्यामध्ये. 🌿

खूप खूप शुभेच्छा..!!❤️

यशाचा राजमार्ग

21 Nov, 03:34


MPSC वाले रोहित पवार गोपीचंद पडोळकर कैलास पाटील आणि अभिमन्यू पवार विजयी होतील...

यशाचा राजमार्ग

21 Nov, 03:33


Photo

यशाचा राजमार्ग

21 Nov, 03:33


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट

दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात ४५.५३% मतदान!

➡️ गडचिरोली: ६२.९९% (सर्वाधिक)
➡️ ठाणे: ३८.९४% (सर्वात कमी)

यशाचा राजमार्ग

20 Nov, 16:30


९१) प्रधानमंत्री उज्वला योजना: (मार्च २०१६ पेट्रोलियम मंत्रालय) बी.पी.एल महिलेस गॅसचे मोफत कनेक्शन पुरविणे

९२) वृक्षयुक्त महाराष्ट्र अभियान: (१ जुलै २०१६ वन मंत्रालय) लोक सहभागातून १ कोटी वृक्ष लागवड.

९३) शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना: (५ जुले २०१६ केंद्र शासन) शेतकऱ्यांना अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देणे.

९४) वाश योजना: (२०१५-२०१६ महाराष्ट्र शासन) आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे आरोग्य अबाधित ठेवणे या कार्यक्रमासाठी राज्यसरकारला युनिसेफचे सहकार्य.

९५) डिजिटल ग्राम योजना: (मे २०१६ राज्यशासन) येत्या ३ वर्षात राज्यातील सर्व ग्राम पंचायतींना 'डिजीटल' करणे.

९६) मुख्यमंत्री फेलोशिप योजना: (२० मे २०१६ राज्यसरकार पदावीधर तरूणांना) (२१ ते २५ वय) राज्याच्या प्रशासनाचा अनुभव यावा यासाठी त्यांना १९ महिने राज्याच्या प्रशासनात काम करण्याची संधी देणे.

९७) अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनाची शिष्यवृत्ती योजना: (२०१६-१७ महाराष्ट्र शासन) पालकाचे उत्पन्न १ लाख पेक्षा जास्त नसावे एका कुटुंबातील २ विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.

९८) सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना: (२०१६-१७ गोल्डन जुबली फाऊंडेशन) याचा लाभ मागास गटातील विद्यार्थी घेऊ शकतात. अर्जदार विद्यार्थ्याचे पालकांचे उत्पन्न १ लाख पेक्षा जास्त नसावे. (१०-१२ वी मध्ये) ६०% गुण आणावे. मागास गटातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

९९) प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान: (४ नोव्हेंबर २०१६ केंद्र सरकार पुरस्कृत) माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे म्हणून मोफत प्रसवपूर्व देखरेख सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण ब शहरी गर्भवती स्त्रियांना हा लाभ दिला जातो.

१००) प्रधानमंत्री युवा योजना: (९ नोव्हेंबर २०१६ केंद्र सरकार) येणाऱ्या ५ वर्षात ७ लाख विद्यार्थ्यांना उद्योजकता शिक्षण व प्रशिक्षण देणे, ग्रामीण व शहरी विद्यार्थी.

१०१) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान: ग्रामीण विभागातील मुख्यत्वे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान NRDWP - National Rural Drinking Water Programme हे राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीतून देशभरात राबविले जाते. ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत वाढवून नळ पाणी पुरवठा योजना, पावसाच्या पाण्याचे नियोजन, भूजल संवर्धन, नवीन विहीर, विहीर पुनर्भरण इत्यादी सारखे कार्यक्रम या अभियाना अंतर्गत राबविले जातात.

ग्रामीण भागाचे सक्षमीकरण व्हावे या दृष्टिने केंद्र आणि राज्य सरकारने वरील प्रमाणे अनेक योजना अमलात आणल्या आहेत. (ग्रामपंचायत सरकारी योजना 2022). या पैकी काही महत्वाच्या उपयुक्त आहेत केवळ अश्या योजनांचा इथे समावेश करण्यात आला आहे. बाकी अनेक योजना आहेत पण त्या सर्वांचे वर्णन करने इथे अशक्य आहे. या सर्व योजनांचा लाभ गावातील, शहरातील लोकांनी, तर प्रत्येक गाव पूर्ण सक्षम झाल्या शिवाय राहणार नाही. आणि मग खऱ्या अर्थाने म्हणता येईल की 'गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास.

यशाचा राजमार्ग

20 Nov, 16:30


६६) मनोधैर्य योजना: (२ ऑक्टोबर २०१३ राज्यशासन कॅबिनेट नुसार) लैंगिक अत्याचार पीडित महिलाच्या पुनर्वसना साठी मदत.

६७) सांसद/खासदार आदर्श ग्राम योजना: (१९ ऑक्टोंबर २०१४ केंद्र सरकार पुरस्कृत) मतदार संघातील ३ खेड्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणे. ३ ते ५ हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायती निवड करणे.

६८) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना: (२१ नोव्हें. २०१३, महाराष्ट्र शासन नॅशनल इन्शुरन्स कंपनी) BPL, APL यांना वैद्यकीय सेवा पुरविणे. नवीन स्वरूपात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना म्हणून सुरू.

६९) राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम: (६ फेब्रुवारी २०१३ ७70) मंत्रालय) शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी (० ते १८ वयोगट) १ एप्रिल २०१३ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात स्वच्छता क्षेत्राचा सहभाग.

७०) जीवन अमृत योजना: (२०१४ महाराष्ट्र शासन) दुर्गम भागात सर्जरी व वैद्यकीय क्रिया असणारे रूग्ण याचा लाभ घेऊ शकतात.

७१) सुकन्या योजना: (१ जाने. २०१४ महाराष्ट्र शासन) स्त्रीभ्रूण हत्या रोकणे. भाग्यश्री सुकन्या योजनेत रूपांतरित.

७२) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम: (७ ऑक्टोंबर २०११ केंद्र सरकार पुरस्कृत) राज्यातील ग्रामीण व नागरी भाग येथील गरोदर मातेस आरोग्य सुविधा पुरविणे. मोफत प्रसूती, सिझेरियन, शस्त्रक्रिया.

७३) राजीव गांधी खेल अभियान: (खेलो इंडिया) (२१ फेब्रुवारी २०१४ युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय) ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, खेळ साहित्यांसाठी १५ लाख रुपये.

७४) दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना: (२५ सप्टेंबर २०१४ केंद्र सरकार पुरस्कृत) १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण युवकांना प्रशिक्षण कमीत-कमी १६० तासांचे प्रशिक्षण.

७५) प्रगती व सक्षम योजना: (११ नोव्हेंबर २०१४ मनुष्यबळ विकास मंत्रालय) तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मुलींना मदत, ६ लाख पेक्षा कमी उत्पन्न.

७६) ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले 'लेक शिकवा' अभियान: (२०१४) शाळा बाह्य मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे. दत्तक पालकत्व स्वीकारण्यावर भर देण्यात येतो.

७७) बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना: (२२ जानेवारी २०१५ ३ मंत्रालय आरोग्य, महिला बालविकास) देशातील १०० जिल्हे व महाराष्ट्रातील ठराविक जिल्हे.

७८) भाग्यश्री सुकन्या योजना: (८ मार्च २०१५ महाराष्ट्र महिला ब बालविकास खाते)लाभ राज्यातील मुलींना ज्यादा जन्मदर असणाऱ्या गावाला ५ लाख बक्षिस.

७९) इंद्रधनुष्य अभियान: (७ एप्रिल २०१६ केंद्र शासन पुरस्कृत) दोन वर्षाचे बालक, गरोदर माता लसीकरण राज्यातील ७ जिल्हे २०२० पर्यंत हे सार्वजनिक लसीकरण.

८०) जन औषधी योजना: (१९ जुलै २०१५ भारतीय औषध विभाग ) रूग्णांसाठी ही योजना आहे. औषधाच्या वाढत्या किंमतीचा पेशंटला दिलासा देणे, सरकारी हॉस्पिटलमध्ये हा ब्रँड वापरणे सक्तीचे.

८१) मुख्यमंत्री ग्राम सडक योजना: (ऑक्टो. २०१५ ग्राम विकास मंत्रालय) या योजनेचा उद्देश्य गांवे पक्‍क्‍या रस्त्याने जोडणे, ग्रामीण भागातील रस्ते बांधणे.

८२) आमदार आदर्श गाव योजना: (ऑगस्ट २०१५ ग्राम विकास विभाग) गावाचा सर्वसमावेशक विकास करणे, महाराष्ट्रातील गावे ग्रामपंचायती समाविष्ट.

८३) दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना: (२०१५ केंद्रीय ऊर्जा मंत्रालय) याचा उद्देश्य ग्रामीण भागात सतत बीज पुरवठा करणे, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वीजपुरवठा करणे.

८४) प्रधानमंत्री कोशल्य विकास: (२१ मार्च २०१५ राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ) प्रामाणीकरणास चालना देऊ. कौशल्य नोंदणी निर्माण करणे. १० बी ब १२ मधून शाळा सोडलेले, प्रत्येक उमेद्राराला ८०००/- प्रमाणे पुरस्कार.

८५) मृदा आरोग्य कार्ड: (१९ फेब्रुवारी २०१५ कृषि मंत्रालय) देशातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. मृदा सुपीकता मोजण्याची समान मानके तयार करणे.

८६) परंपरागत कृषी विकास योजना: (२०१५-२०१६ कृषी मंत्रालय) सेन्द्रीय शेती करण्यास प्रोत्साहन ३ वर्षात १०,०० गट तयार करून ५ लाख एकर शेती सेन्द्रीय करणे.

८७) प्रधानमंत्री कृषी सिंचन: (२०१५-२०१६ केंद्र सरकार कृषी मंत्रालय) देशातील शेतकऱ्या साठी शाश्‍वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.

८८) शाळा दर्पण योजना: (७ जानेवारी २०१५ केंद्र सरकार) ग्रामपंचायती, नगरपालिका क्षेत्रातील शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षिणक दर्जा सुधारणे. महाराष्ट्रात ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू महाराष्ट्रात यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे.

८९) स्मार्ट दलित गाव: (२२ डिसेंबर २०१५ केंद्र सरकार) गावांत सुवर्ण दलित यांच्या सलोख्याचे वातावरण निर्माण करणे. याचा लाभ ज्या गावात सर्वाधिक लोकसंख्या आहे ते घेऊ शकतात. गावाला पाणी, बीज, अभ्यासिका, समाज मंदिर, तंत्रज्ञान या सेवा उपलब्ध करून देणे.

९०) ग्राम उदय ते भारत उदय अभियान: (१४ एप्रिल २०१६ केंद्रीय पंचायतराज मंत्रालय) सर्व ग्रामपंचायतां मध्ये सामाजिक एकोपा, वृद्धिंगत करणे, सर्व ग्रामपंचायती लाभ घेणे.

यशाचा राजमार्ग

20 Nov, 16:29


४३) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन: (एप्रिल २००५ केंद्र सरकार) ही योजना ग्रामीण भागासाठी आहे. ग्रामपंचायत हद्दीत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करणे.

४४) सुधारित माहेर योजना: (२६ ऑक्टोंबर २००५ राज्यशासन) निराधार महिला पुनर्वसन करने हे उद्दिष्ट, १६ ते ६० वय असलेला निराधार महिला याचा लाभ घेऊ शकतात. व्यावसायिक प्रशिक्षण, एक वर्षासाठी लाभाथींना दरमहा २५० रु. देण्यात येतात.

४५) शुभमंगल सामुहिक विवाह योजना: (२००६ आयुक्‍त महिला ब बालविकास आयुक्तालय) सामुहिक विवाहास निधी दिला जातो. वय वधू १८, वर २१ असावे. विवाह आयोजन वर्षातून २ वेळा केले जाते.

४६) जननी सुरक्षा योजना: (डिसेंबर २००६ केंद्र सरकार) अनुसूचित जाती व जमाती माता लाभ घेऊ शकतात. सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी १५०० रु. बँकेयेतात थेट जमा करण्यात.

४७) प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना: (२००६ केंद्र सरकार ची योजना) वैद्यकीय सेवेतील तफावत दूर करणे. शहरी, ग्रामीण जनता याचा लाभ घेऊ शकतात.

४८) मनरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी): (२ फेब्रुवारी २००६ केंद्र सरकार पुरस्कृत) ग्रामीण भागा कडून शहराकडे होणारे स्थलांतरण रोखणे. ग्रामीण भागातील लोकांनी कोणती कामे कराययाची याचा अधिकार ग्रामसभेस आहे.

४९) राजीव गांधी राष्ट्रीय बालसंगोपन (शिशुगृह) योजना: (१ जानेवारी २००६ उच्च शिक्षण विभाग ) १२ हजार पेक्षा कमी उत्पन्न (मासिक) असणाऱ्या कुटुंबातील मुलांना डे केअर सेवा पुरविणे बालसंगोपन केंद्राला वार्षिक ४२३८४ इ. अर्थसहाय्य दिला जातो.

५०) शिष्यवृत्ती योजना: (२००७-२००८ उच्च शिक्षण विभाग) उच्च शिक्षणासाठी १८ ते २५ वयोगटातील कमी उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थी यांना मदत प्रतिवर्ष ८२,००० नवीन शिष्यवृत्या.

५१) सावित्रीबाई फुले कल्याण पारितोषिक योजना: (१ एप्रिल २००७ राज्य शासन योजना) दारिद्र रेषेखालील जोडपे यांना कुटुंब नियंत्रण शस्त्रक्रिया योजनेसाठी जे कुटुंब नियोजन करून घेण्यास तयार असतात त्यांना विशिष्ट्य आर्थिक निधी दिला जातो.

५२) राष्ट्रीय आरोग्य विमा योजना: (१ ऑक्टोंबर २००७ केंद्र सरकारचे श्रम व रोजगार मंत्रालय द्वारा) असंघटित क्षेत्रातील BPL कुटुंबातील कामगार लाभ घेऊ शकतात. स्मार्ट कार्ड वर आधारित कॅशलेस आरोग्य विमा योजना.

५३) संजय गांधी निराधार अनुदान योजना: (१ ऑगस्ट २००८ जिल्हाधिकारी कार्यालय) निराधार व्यक्‍ती अनाथ मुले अपंग इत्यादी लाभ घेऊ शकतात. कुटुंबातील ९ लाभार्थी असल्यास ६०० रु. आर्थिक सहाय्य.

५४) प्रधानमंत्री रोजगार निर्मिती: (३१ मार्च २००८ केंद्र स्तरावरील खादी ग्रामोद्योग) ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देणे २०१०-११ मध्ये एकूण ३८९८ प्रकल्पांना ५५.३३ कोटी निधी उपलब्ध.

५५) रमाई आवास योजना: (१५ नोव्हें २००८ ग्रामीण ब शहरी भागातील घरकुल योजना) अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावणे घर बांधणीसाठी लाभ ग्रामीण क्षेत्र ७० हजार, नफा -१.५० लाख, महानगरपालिका - २ लाख आर्थिक सहाय्य.

५६) राष्ट्रीय कृषी विकास योजना: (२००७ पासून १००% केंद्र सरकार पुरस्कृत) कृषी व संलग्न क्षेत्रातील विकास दर वाढवणे. या योजनेअंतर्गत ९ विशेष उपाययोजना राबविल्या जात आहे.

५७) राष्ट्रीय शाश्‍वत कृषी अभियान: (२००८ कृषी ब पणन विभाग) कृषी उत्पनाच्या वाढीवर भर, नवनवीन कृषी तंत्रज्ञाने अवलंबणे, शेती स्तरावर पाण्याचे नियोजन करणे.

५८) धनलक्ष्मी योजना: (३ मार्च २००८ केंद्र सरकार) मुख्य उद्देश्य बालिका जिवंत ठेवणे, ०७ राज्यांमध्ये कार्यान्वित आहे. बालिकेचे १८ वर्षापर्यंत विवाह न करणे.

५९) तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम: (जुलै २००७ महिला आर्थिक विकास महामंडळ पुरस्कृत) SC, ST, NT, OBC महिला बचत गट बळकटीकरण उपजीविका विकास महिला सक्षमीकरण व सामाजिक समानता वित्तीय पुरवणाऱ्या घटकावर भर देणे.

६०) प्रारूप शाळा योजना: (नोव्हें २००८ केंद्र राज्य सरकार संचालित) ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणे.

६१) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान: (२००९ HRD मंत्रालय) शैक्षिणक मागास ग्रामीण मुले-मुली यांना रहिवासापासून योग्य अंतरावर माध्यमिक शिक्षण पुरविणे.

६२) महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा योजना: (२६ जून २०१० सामाजिक विकास मंत्रालय) SC/ नवबौद्ध यांना घरगुती नळ व शौचालयासाठी अनुदान. ९०% अनुदान राज्यशासन द्वारे.६३) पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना: (२०१०-११ केंद्र शासन पुरस्कृत) ग्रामपंचायतीसाठी आहे. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्‍वत विकास करणे.

६४) यशवंतराव मुक्‍त वसाहत योजना: (२०१२ कृषी मंत्रालय) विमुक्‍त जाती व भटक्या जमाती या लाभार्थी कुटुंबाचे राहणीमान उंचावणे.

६५) पाळणाघर योजना: (२ जाने. २०१२ जिल्हाधिकारी नियंत्रणात ग्रामपंचायत मार्फत) प्रतिबालक (० ते ३ वयोगट) प्रतिदिन ८ रु. तरतुद.

यशाचा राजमार्ग

20 Nov, 16:29


३०) एकलव्य इंग्रजी माध्यम शिवाजी शाळा: (२०००-२००१ केंद्र सरकार पुरस्कृत) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी CBSC पॅटर्न नुसार ६ ते १२ चे वर्ग सुरू करणे. याचे लाभ ५वी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थी घेऊ शकतात. महाराष्ट्रात पालघर, नाशिक, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात या शाळा सुरू आहेत.

३१) संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी: (२५ सप्टेंबर २००१ स्थानिक स्वराज्य संस्था) ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे. ही योजना १ एप्रिल, २००८ मध्ये मनरेगा योजनेत विलीन करण्यात आली.

३२) संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान: (२००१-२००२ ग्रामविकास मंत्रालय द्वारे) ग्रामीण स्वच्छतेच्या कार्यास अधिक चालना देणे हे उद्दीष्ट असून हे अभियान २ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर असे ३ महिने राबविले जाते.

३३) संपूर्ण स्वच्छता अभियान: (मार्च २००२ केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय) ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छता, शिक्षणावर भर, व्यक्‍तिगत परिसर स्वच्छ ठेवणे, घराघरात शौचालय बांधण्यास प्रयत्न करणे.

३४) निर्मल ग्राम पुरस्कार: (२ ऑक्टोंबर २००३ केंद्रीय ग्राम बिकास मंत्रालय) संपूर्ण स्वच्छता अभियानाला चालना देणे, याचा लाभ तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर घेता येतो. १ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीस ५००० रु. पुरस्कार दिला जातो.

३५) वंदे मातरम आरोग्य योजना: आरोग्य योजना (९ फेब्रुवारी २००४, खाजगी व सरकारी दवाखाने) नवजात बालके, गरोदर स्त्री, मृत्युदर नियंत्रीत करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला मोफत तपासणी.

३६) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना: (२००४ महाराष्ट्राशासन) ६५ पेक्षा जास्त वयाच्या वृद्ध, निराधार लोकांना निवृत्ती वेतन दर महा ६०० रु. देण्यात येते.

३७) कृषी संजीवनी योजना: (२००३-०४ राज्याचा उर्जा विभाग) शेतकऱ्यांकडील थकीत बीज बीलाची वसुली सुधारणे हे मुख्य उद्दिष्ट.

३८) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन अभियान: (२००५-०६ राज्यांचा कृषी विभाग) विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रश्‍न हाताळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ग्रस्त जिल्हे (अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा).

३९) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान: (२००५-०६ केंद्रीय कृषी मंत्रालय) फलोत्पादन संस्थेला अनुदान राज्यातील २५ जिल्हे समाविष्ट.

४०) राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना:
(४ एप्रिल २००५ राज्य सरकार) सर्व गावे रस्त्याचे विद्युतीकरण घटकाला अल्पदरात वीज कनेक्शन दिले जाते.

४१) राजमाता जिजाऊ - बाल आरोग्य पोषण मोहिम: (१९ मार्च २००५ राज्य सरकार) ६ वर्षा खालील बालकांचे कुपोषण कमी करणे. गर्भवती स्त्रिया आणि ० ते २ वर्ष वयोगटातील बालके याचा लाभ घेऊ शकतात. मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली.

४२) राजीव गांधी ग्रामीण निवास योजना: (नोव्हेंबर २००५) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. SC/ST अपंग याचा लाभ घेऊ शकतात लाभार्थीचे आर्थिक उत्पन्न २०,००० (वार्षिक) असावे.

यशाचा राजमार्ग

20 Nov, 16:29


१४) ग्रामीण कामगारांना सुधारित औजारांचा पुरवठा: ३ जुलै, १९९२ साली या योजनेची सुरुवात झाली. ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे. ग्रामीण कारागीर, विणकर, विडी कामगार यांची तांत्रिक कुशलता वाढविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यात SC/ST ला ५०% आरक्षण देण्यात आले आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत विलीन ग्रामीण कारागीरांना TRYSEM अतंर्गत प्रशिक्षण दिले जाते.

१५) राष्ट्रीय महिला आयोग: (१९९२) भारत सरकार द्वारा निर्माण करण्यात आले. या आयोगाद्वारे भारतीय महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व केले जाते. सर्व महिला संबंधी उपायांच्या चौकशीसाठी आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहे.

१६) पशुधन विमा योजना: (१९९३-९४) ही केंद्राची योजना राज्य महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळची यंत्रणा द्वारे चालविली जाते. पशुधारक व्यक्‍ती याचा लाभ घेऊ शकतात. प्रती पशुपालन दोन दुधारू जनावरांचा विमा या द्वारे उतरविला जातो.

१७) प्रधानमंत्री रोजगार योजना: (२ ऑक्टोंबर १९९३) केंद्र शासना द्वारे संचालित ही योजना ग्रामीण शहरी युवकांना रोजगार (१८ ते ३५ वयोगटातील गरजू बेरोजगार युवकांसाठी) उपलब्ध करून देते. २२.५% SC, २७% ST यांच्यासाठी आरक्षणची व्यवस्था करण्यात आली.

१८) राज्याचे महिला धोरण: (१९९९, २००१, २०१३-१४) राज्य शासनाची ही योजना आहे. महिलांचे सशक्तीकरण व विकास व्हावे हे उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना अमलात आणली गेली. महाराष्ट्रातील महिला जे की असंघटित क्षेत्रावरील महिला आहे त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबींकडे लक्ष दिले जाते.

१९) इंदिरा महिला योजना: (१५ ऑगस्ट १९९५) महिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संस्थात्मक पाया निर्माण करणे हे या योजनेचेउद्दिष्ट आहे. आदिवासी भागातील १५ जिल्ह्या करिता ही योजना आहे. तसेच या करिता नव संजीवनी योजना (२३ जून १९९५-९६) कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत आदिवासी भागातील १५ जिल्ह्यांसाठी मातृत्व अनुदान आयोग, दाई बैठक योजना, भरारी पथक योजना इत्यादी आहेत.

२०) मध्यान्ह भोजन योजना: (१५ ऑगस्ट १९९५) केंद्र सरकार पुरस्कृत ही योजना आहे. प्राथमिक शाळेतील बालकांना दुपारी शिजविलेले अन्न (प्रत्येकी १०० ग्रॅम) देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे. काही शाळामंध्ये शिजविलेले अन्न न देता प्रत्येकाला प्रतिमाह तीन किलो धान्य (१० महिने) दिले जाते. या अन्नधान्याचा व वाहतुक खर्चाचा भार केंद्र सरकार ने स्वीकारलेला आहे. अश्या शिक्षणासाठी विविध योजना करण्यात आल्या आहेत.

२१) अहिल्याबाई होळकर योजना: (१९९६-९७) विद्यार्थीनींना महामंडळ बस मधून मोफत पास (५ ते १० वी पर्यंत विद्यार्थीनी प्रवास सवलत) देणे यासाठी राज्य शासनाने ही योजना कार्यान्वित केली.

२२) बालिका समृद्धी योजना: (१९९७ ४7९) मंत्रालय) मुलींच्या जन्माविषयी, दृष्टीकोण बदलविणे हा उद्देश्य समोर ठेवून ही योजना अमलात आणली. याचा लाभ 3, कुटुंबातील मुली (१५ ऑगस्ट १९९७ नंतरच्या) जन्मा नंतर अनुदान ५०० रु. दिले जाते.

२३) गंगा कल्याण योजना: (१ फेब्रुवारी १९९७) केंद्र सरकार ची योजना आहे. भूगर्भातील पाण्याचा शोध लावणे हा उद्देश्य लाभ लहान सीमांत शेतकरी घेऊ शकतात. ही योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत विलीन केली गेली.

२४) राजराजेश्वरी महिला कल्याण विमा योजना: (१२ मार्च १९९९) १० ते ७५ वर्षाच्या सर्व महिला १५ रू. वार्षिक प्रिमियम २५००० हजार रूपयाने विमा कव्हर. महिलांना आर्थिक सुरक्षा पुरविण्यासाठी ही योजना आहे.

२५) भाग्यश्री बाल कल्याण योजना: (१९ मार्च १९९९) पालकांचे किंवा पालकांपैकी एकाचे अपघाती निधन झाल्यास १२०० ते २४०० वार्षिक मुलींच्या शिक्षणासाठी १८ वर्षा पर्यत मिळणार. पालकांचे वय ६० पेक्षा जास्त नसलेल्या १८ वर्षाखालील मुलींना हा लाभ देण्यात येतो.

२६) सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना: (१ एप्रिल १९९९) केंद्र सरकारची ही योजना पायाभूत सुविधा निर्माण करणे, दारिद्र्य निर्मूलन, याचा लाभ ग्रामीण भागातील गरीब कुटुंब घेऊ शकतात. यात सूक्ष्म लघुउद्योगावर भर, लाभार्थी मध्ये महिला SC/ST अपंग यांना निश्‍चित वाटा.

२७) राष्ट्रीय कृषी विमा योजना: (१९९९-२००० केंद्रशासन) नैसर्गिक आपत्तीने पिकांची हानी झाल्यास अधिक मदत, सर्व शेतकरी साठी ही योजना राज्यासाठी ऐच्छिक.

२८) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना: (२००० केंद्रसरकार) अपंगाना मासिक निवृत्ती वेतन देणे. १८ ते ६५ वयावरील दारिद्र रेषेखालील ८० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्‍तींना ५०० रु. दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते.

२९) अंत्योदय अन्न योजना: (२५ डिसेंबर २०००) भूक मुक्‍त भारत निर्माण करणे. याचा लाभ ग्रामीण व नागरी कुटुंब घेऊ शकतात. योजनेअंतर्गत ३५ किलो ग्रॅम धान्य मोफत देण्यात येते.

यशाचा राजमार्ग

20 Nov, 16:29


१०१ योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असल्याचे दिसून येत नाही तोपर्यंत शासकीय योजना काय कामाचे..
सर्व सामान्य जनतेला माहिती पाहिजे म्हणून...१ ते १०१ योजना
👇
१) समुदाय विकास कार्यक्रम: कार्यक्रमाची सुरवात २ ऑक्टोबर, १९५७ साली झाली. याचा उद्देश्य ग्रामीण भागाचा विकास करणे - ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणलेली राष्ट्रीय पातळीवरील पहिली योजना आहे.

२) सहाय्यक अनुदान योजना: १९६० साली सुरुवात झाली. लोकसंख्या वाढ नियंत्रण व स्थिरतेस सहाय्य करणे, याचा लाभ - स्वच्छेने कुटुंब नियोजन पद्धती स्वीकारलेल्या व्यक्ती घेऊ शकतात. ही योजना १००% केंद्र पुरस्कृत आहे.

३) ग्रामीण भागातील पाणी पुरवठा कार्यक्रम: याची १९७२-७३ साली सुरुवात झाली. या योजनेचा उद्देश्य पेयजलाची अधिक भागात उपलब्धता वाढविणे याचा लाभ ग्रामीण भागातील लोक व वाळवंट क्षेत्रातील जनावरे यांच्यासाठी आहे. प्रत्येक २५० व्यक्तींसाठी हातपंप उभारणे, प्रत्येक व्यक्तीस किमान ४० लिटर पाणी प्रतिदिन पुरविणे.

४) महाराष्ट्राची कापूस एकाधिकार योजना: ऑगस्ट १९७२ पासून सुरु करण्यात आली. कापसाला रास्त भाव देणे, याचा लाभ कापूस उत्पादक शेतकरी घेऊ शकतात. या योजनेचे वैशिष्ट्य असे की राज्यशासनाने खासगी संस्थाना सुद्धा शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.

५) दलित वस्ती सुधार योजना: १९७४-७५ साली अमलात आणल्या गेली ही महाराष्ट्र शासनाची योजना असून याचा उद्देश्य दलित वस्तीचा सर्वांगीण विकास करणे. याचा लाभ अनुसूचित जाती ब नवबौद्ध घेऊ शकतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे दलित वस्तीत स्वच्छता विषयक सोई करणे.

६) किमान गरजा कार्यक्रम: १९७४-७५ साली ही योजना सुरु करण्यात आली ही महाराष्ट्र शासनाची योजना असून, मागास ब अपेक्षित वर्गाचा सामाजिक ब आर्थिक विकास साधणे. या योजनेचा लाभ ग्रामीण भाग, शहरी झोपडपट्ट्या, भूमिहीन मजूर घेऊ शकतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा प्रथम दुर्लक्षित भागात पुरविणे. यात ग्रामीण आरोग्य, पाणी पुरवठा, विद्युतीकरण कडे लक्ष देण्यात येते.

७) बालसंगोपण योजना: ही योजना १९७५ साली अमलात आणली गेली. ही यंत्रणा महिला व बालविकास विभागाकडे आहे. याचा उद्देश्य अनाथ, निराधार, बेघर इत्यादी 1 मुला, मुलींचे संगोपन करने. (०-१८ वयोगटातील मुले-मुली) या योजने अंतर्गत पालनकर्त्या 'पालकास अनुदान दिले जाते.

८) एकात्मिक बाल विकास योजना: २ ऑक्टोबर, १९७५ साली ही योजना अमलात आली. या योजनेचा उद्देश्य ०-६ वयोगट बालकांचा विकास करणे, बालमृत्यू दर, कुपोषण प्रमाण कमी करणे, याचा लाभ BPL कुटुंबातील ICDS सेवा लाभाथी १५०- ४०० लोकांमागे १ मिनी अंगणवाडी, तसेच ४००-८०० लोकांमागे १ अंगणवाडी केंद्र असावे. ही राज्य सरकारची पुरस्कृत योजना आहे.

९) एकात्मिक ग्रामीण विकास योजना: २ ऑक्टोबर, १९८० ला ही योजना अमलात आली. केंद्र सरकारची ही योजना असून हिचा उद्देश्य ग्रामीण विकास करणे याचा लाभ SC/ST स्त्रिया, अपंग घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.

१०) ग्रामीण क्षेत्रातील महिला व मुलांचा विकास: १९८२-८३ ला केंद्र सरकार द्वारे ही योजना अमलात आणली गेली. ग्रामीण भागातील गरीब स्त्रियांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावणे या उद्देश्यानी ही योजना अमलात आणल्या गेली. याचा लाभ ग्रामीण भागातील गरीब स्त्रिया घेऊ शकतात. ही योजना १९९९ ला स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार मध्ये विलिन करण्यात आली..

११) इंदिरा आवास योजना: (प्रधानमंत्री आवास योजना) १९८५-८६ साली ही योजना अमलात आणली गेली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे ही योजना कार्यरत आहे. या योजनेचा उद्देश्य असा की, घरे बांधून देण्यास वित्तीय सहाय्यता करणे याचा लाभ अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) घेऊ शकतात. २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना म्हणून पुर्नरचना करण्यात आली.

१२) राष्ट्रीय साक्षरता मिशन: ५ मे, १९८८ ला ही योजना प्रौढ शिक्षण संचालनालयाद्वारे अमलात आणली गेली. याचा उद्देश्य प्रौढ शिक्षणाची तीव्रता वाढविणे, १५ ते ३५ वयोगटातील निरक्षर व त्या पेक्षा वरील वयाचे निरक्षर लोकांमध्ये व्यावहारिक साक्षरता वाढविणे हा होय.

१२) जवाहर रोजगार योजना: १ एप्रिल, १९८९ साली ही योजना पंचायत राज संस्था अतंर्गत अमलात आणल्या गेली दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मितीला प्राधान्य तळागाळातील जनतेचा प्रशासानात सहभाग हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. ग्रामीण भागातील सर्व नागरिक याचा लाभ घेऊ शकतात. ही ७ वी पंचवार्षीक योजना सुरु करण्यात आली. १९९९ पासून JGSY मध्ये विलीन करण्यात आली.

१३) दशलक्ष विहीर योजना: सन १९८८-८९ साली ही योजना अमलात आली. SC/ST लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत विलीन करण्यात आली.

यशाचा राजमार्ग

20 Nov, 06:06


परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशन

◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)
◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)
◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी.
▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.

यशाचा राजमार्ग

20 Nov, 01:21


उठा उठा, सकाळ झाली.
मतदानाची वेळ आली. 🤠

मतदान दिनांक : २० नोव्हेंबर २०२४.

सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

यशाचा राजमार्ग

20 Nov, 01:21


🙏🏼या महाराष्ट्राचा मार्ग आणि इतिहास हा पुरोगामी होता आहे आणि असेल..🙏🏼❤️

यशाचा राजमार्ग

06 Nov, 01:57


#RTI
♦️राज्यसेवा 2024 मागणीपत्र..

👉 431 + 26 CO = 457 जागा..

👉 लवकरच Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा साठी एकूण किती अर्ज आले त्याबाबत RTI टाकून माहिती देऊ. 🙏

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:43


Photo

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:43


Photo

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:42


Photo

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:42


Photo

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:42


Photo

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:42


Photo

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:41


महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024

अर्ज करण्यास संकेतस्थळावर उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या.

🙏🏼माननीय आयोगाला विनंती आहे अर्ज करण्यासाठी किमान एक आठवडा मुदत वाढवून द्यावी... आयोग यावर लवकरच तोडगा काढेल अशी अपेक्षा ठेऊ 🙏🏼

यशाचा राजमार्ग

05 Nov, 11:22


कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यास पोलीस भरती करण्याची ग्वाही दिली

महिला पोलीस चौकी निर्माण करण्यात येईल 🙏🙏🙏

यशाचा राजमार्ग

05 Nov, 07:58


🔥 Hwasong-19 ICBM

❇️ उत्तर कोरियाने त्याच्या नवीन Hwasong-19 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (ICBM) यशस्वी चाचणी केली आहे.

❇️ क्षेपणास्त्राने 1,001.2 किलोमीटर अंतरापर्यंत उड्डाण केले, यादरम्यान 7,687.5 KM ची कमाल उंची गाठली.

यशाचा राजमार्ग

05 Nov, 07:56


💐 गरुड शक्ती युद्ध अभ्यास 2024

◾️भारत × इंडोनेशिया
◾️9 वी आवृत्ती
◾️कालावधी : 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर
◾️ठिकाण : सिजांटुंग ( जकर्ता)

यशाचा राजमार्ग

05 Nov, 07:55


2023 मधील चर्चेतील चक्रीवादळे

अरबी समुद्र

बिपरजोय चक्रीवादळ 6 जुन 2023
नाव देणारा देश - बांगलादेश

तेज चक्रीवादळ 20 ऑक्टोबर 2023
नाव देणारा देश - भारत

बंगालचा उपसागर

मोखा चक्रीवादळ 9 मे 2023
नाव देणारा देश - येमेन

हामुन चक्रीवादळ 21 ऑक्टोबर 2023
नाव देणारा देश - इराण

मिधीली चक्रीवादळ 14 नोव्हेंबर 2023
नाव देणारा देश - मालदीव

मीचोंग चक्रीवादळ 1 डिसेंबर 2023
नाव देणारा देश - म्यानमार

यशाचा राजमार्ग

05 Nov, 07:25


निवडणूक आयोग
(Election Commission Of India) :
▪️ कायमस्वरुपी व स्वतंत्र आयोग आहे.

संविधानातील तरतूदी :
▪️भाग : 15
▪️कलम : 324 ते 329
▪️मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
▪️स्थापना : 25 जानेवारी 1950
▪️राष्ट्रीय मतदार दिन : 25 जानेवारी
▪️कार्यालय : दिल्ली
▪️रचना : एक मुख्य निवडणूक आयुक्त व
सहाय्यक निवडणूक आयुक्त.
▪️नियुक्ती : भारताचे राष्ट्रपती
▪️कार्यकाल : 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
▪️दर्जा : सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीश
प्रमाणे
▪️राजीनामा : राष्ट्रपती
▪️पदच्यूती : महाभियोग पद्धतीद्वारे
पदावरून दूर केले जाऊ शकते.
निवडणूक आयोगाने नुकताच तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढला आहे.
1) तृणमूल काँग्रेस : 1998
2) राष्ट्रवादी काँग्रेस : 1999
3) भारतीय कम्युनिस्ट पार्टी : 1925

देशातील 6 राष्ट्रीय पक्ष आणि स्थापना वर्ष :
1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : 1885
2) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष : 1964
3) भारतीय जनता पक्ष    : 1980
4) बहुजन समाज पक्ष     : 1984
5) आम आदमी पार्टी      : 2012
6) नॅशनल पीपल्स पार्टी  : 2013


यशाचा राजमार्ग

05 Nov, 03:21


IMP

साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असून या परिस्थितीस उपसूर्य स्थिती (Perihelion) असे म्हणतात. या स्थितीमध्ये पृथ्वी व सूर्यादरम्यानचे अंतर सुमारे 147 दशलक्ष किमी इतके असते.

4 जुलै ला पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर अंतरावर असते. या स्थितीला अपसूर्य (Aphelion) स्थिती असे म्हटले जात असून या स्थितीमध्ये पृथ्वी व सूर्यादरम्यानचे अंतर सुमारे 152 दशलक्ष किमी इतके असते.

यशाचा राजमार्ग

04 Nov, 17:59


विवेक फनसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

यशाचा राजमार्ग

04 Nov, 17:58


BMC SE JE Advertisement - 2024

♦️SE (Civil) : 233
♦️JE (Civil) : 250
♦️SE(Mech/Elec) : 77
♦️JE(Mech/Elec) : 130

♦️अर्ज 11 नोव्हेंबर पासून चालू होती

यशाचा राजमार्ग

04 Nov, 17:53


#NewsBooster

💘 राजेश कुमार सिंह यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती
◾️1989 IAS ( केरळ केडर)
◾️नियुक्तीपूर्वी, ते वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव होते
◾️ते पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव होते
◾️माजी शहरी विकास सचिव आणि वित्त सचिव
◾️श्री गिरीधर अरमाने यांच्याकडून संरक्षण सचिवपदाची सूत्रे हाती घेतील.

💘 AI तयारी निर्देशांक 2023-24
◾️AI Preparedness Index 2023-24
◾️आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 2023 साठी AI तयारी निर्देशांक जारी केला
◾️यामध्ये प्रमुख 4 आयाम आहेत
◾️174 देशांच्या यादीमध्ये भारताचा 72 वा क्रमांक आहे
▶️पाहिले 5 देश
1️⃣सिंगापूर
2️⃣युनायटेड स्टेट्स
3️⃣युनायटेड किंगडम
4️⃣जर्मनी
5️⃣फ्रान्स

💘 आजच्या काही Oneliner
◾️ब्राझील देशाने चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नाकारला
◾️लडाखमध्ये भारताचा राष्ट्रीय मोठा सौर दुर्बिणी प्रकल्प
◾️दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान, हिमाचल प्रदेश हे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले प्राणीसंग्रहालय आहे
◾️काँग-रे या चक्रीवादळाचा नुकताच तैवान देशाला तडाखा बसला
◾️थाडौ जमाती ही सध्या चर्चेत आहे ती मणिपूर येते रहातात

💘 दीपम 2.0 योजना : आंध्रप्रदेश ने सुरू केली
◾️महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठी
◾️दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर
◾️आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

💘 वज्र प्रहार युद्ध अभ्यास 2024
◾️भारत × अमेरिका
◾️कालावधी : 2 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2024
◾️ठिकाण : आयडाहो (अमेरिका)
◾️15 वी आवृत्ती

💘 गरुड शक्ती युद्ध अभ्यास 2024
◾️भारत × इंडोनेशिया
◾️9 वी आवृत्ती
◾️कालावधी : 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर
◾️ठिकाण : सिजांटुंग ( जकर्ता)
आजच्या महत्वाच्या News वाचून घ्या 🔔

यशाचा राजमार्ग

04 Nov, 17:51


⭐️⭐️पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

यशाचा राजमार्ग

04 Nov, 09:43


⭐️⭐️आयोगाचा कोणताही पेपर असू द्या. प्रश्न सोडवताना जर का प्रश्न व्यवस्थित वाचला गेला तर 50 टक्के उत्तरापर्यंत आपण प्रश्नांमध्येच पोहोचत असतो बाकी 50% साठी📚.चालू द्या जोरदार💯✌️

यशाचा राजमार्ग

04 Nov, 02:27


Important

यशाचा राजमार्ग

02 Nov, 12:29


♻️ 2 मार्क्सचा प्रश्न नक्की पडेल खालील माहिती मधून - भारतीय संविधान आणि सर्व काही

आज भारतीय संविधान दिवस. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आपल्या संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. आज संविधान दिनानिमित्त जाणून घेऊ आपल्या राज्यघटनेविषयी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन (1947) झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.

⭐️ भारतीय संविधान आणि वैशिष्ट्ये :

● भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

● भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

● मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

● सध्या राज्यघटनेत 448 कलमे (39A, 51A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

● भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे.

● भारताने अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय शासनपद्धती न स्वीकारता ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारली आहे.

● घटनेने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांसाठी सार्वत्रिक प्राैढ मतदानाची तरतूद केलेली आहे. 18 वर्षे पूर्ण असणारा प्रत्येक नागरिक या निवडणूकांमध्ये मतदान करू शकतो.

● भारत हे संघराज्य असूनही भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे.

● भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी स्वतंत्र सरकार आहे.

भारतीय संविधान तयार करताना विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला आहे. इतर देशांच्या संविधानातील चांगल्या तरतूदी भारतीय संविधानात समाविष्ठ करण्यात आल्या. त्यातील गोष्टी खालीलप्रमाणे :

1) संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
2) मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
3) मूलभूत हक्क : अमेरिका
4) न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
5) न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय
6) कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
7) सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
8) कायदा निर्मिती : इंग्लंड
9) लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
10) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
11) संघराज्य पद्धत : कॅनडा
12) शेष अधिकार : कॅनडा

यशाचा राजमार्ग

02 Nov, 12:25


⭐️⭐️समाजकल्याण विभाग भरती 2024

अर्ज करताना हा मुद्दा लक्ष पूर्वक वाचा.

Post - गृहपाल/अधीक्षक (Warden/ Superintendent)

या पदावर निवड होणाऱ्या ची नियुक्ती ठिकाण समाजकल्याण विभागाच्या अधिनिस्त शासकीय वसतिगृह/शासकीय निवासी शाळा असणार असून त्याच ठिकाणी निवासी राहावे लागणार आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

यशाचा राजमार्ग

02 Nov, 11:38


हे बघ भाऊ,

M.Laxmikant सरांनी पण येऊन तुला शिकवल ना तरी
#Competition घंटा वाढत नसते...

कुणाच्या शिकवण्याने कधीच कॉम्पिटिशन वाढत नाही भाऊ तर ती तेव्हाच वाढते जेव्हा Maximum विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात.

Keep In Mind❤️

डरो मत🤘

यशाचा राजमार्ग

02 Nov, 11:20


विधानसभा 2024

🛑उमेदवार-

भोकर मध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत.

सर्वात कमी महाडला उमेदवार आहेत.

🛑मतदार -
पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदार.

सिंधुदुर्गात सर्वात कमी मतदार

यशाचा राजमार्ग

02 Nov, 11:18


#Exam countdown

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 29 दिवस.

👉गट_ब पूर्व परीक्षा :- 64 दिवस.

👉गट_क पूर्व परीक्षा :- 92 दिवस
.

यशाचा राजमार्ग

02 Nov, 09:41


✍🏻️मसुदा समिती

▪️स्थापना - 29 ऑगस्ट 1947
▪️अध्यक्ष - डॉ.बाबासाहेब आंबेडकर

📌सदस्य-

(1) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर

(2) के.एम.मुन्शी

(3) गोपाल अय्यंगार

(4) एन.माधवराम

(5) मोहम्मद सादूल्ला

(6) डी.पी.खैतान

यशाचा राजमार्ग

02 Nov, 09:40


सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 2062 तक्रारी प्राप्त; 2059 निकाली

234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

यशाचा राजमार्ग

02 Nov, 06:57


🟢 राज्यसेवा Mains Exam
परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम

(Save करून ठेवा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा)

यशाचा राजमार्ग

02 Nov, 06:56


मिळालेल्या माहिती नुसार गट ब साठी पुणे centre संपले आहे.
ज्यांना पुणे पाहिजे असते त्यांनी लवकर फॉर्म भरणे आवश्यक असते.
पुण्याची exam centre ची Capacity 40,000 हजार असते.
त्यामुळे पुणे सोडून जवळचे Centre निवडा

✔️✔️

यशाचा राजमार्ग

02 Nov, 04:30


⭐️⭐️दिपावली निमित्ताने अभ्यासिकेत काही मोजकेच हिरे आहेत. पुढे जाऊन ह्याच हिऱ्यांना चकाकी मिळणार आहे. 🔥

लगे रहो...❤️

यशाचा राजमार्ग

02 Nov, 01:51


1857 च्या उठाव व नेते

नेता स्थळ

1. बेगम हजरत महल - लखनौ
2. राणी लक्ष्मीबाई - झाशी
3. अजीमुल्ला - कानपूर
4. लियाकत अली - अलहाबाद
5. तात्या टोपी - कानपूर
6. कुवरसिंग - बिहार
7. बहादुरशहा जफर - दिल्ली
8. मौलवी अहमदुउल्ला - फैजाबाद
9. बख्त खान - दिल्ली

यशाचा राजमार्ग

01 Nov, 16:28


🟣💠 विविध क्षेत्रांचे जनक 💠🟣

➡️◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी

➡️◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय

➡️◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु

➡️◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर

➡️◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे

➡️◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग

➡️◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा

➡️◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई

➡️◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम

➡️◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै

➡️◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल

➡️◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके

➡️◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा

➡️◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी

➡️◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी

➡️◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन

➡️◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन

➡️◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र

➡️◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा

➡️◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी

➡️◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

➡️◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत

➡️◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक

➡️◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस

➡️◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड

➡️◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग

➡️◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस

➡️◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन

➡️◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन

➡️◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस

➡️◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल

➡️◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ

➡️◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता

➡️◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन

➡️◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे

➡️◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ

➡️◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन

➡️◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव

➡️◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड

➡️◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी

➡️◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स

➡️◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज

➡️◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस

➡️◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ

➡️◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल

➡️◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस

➡️◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन

➡️◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता

➡️◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर

➡️◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे

➡️◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर

यशाचा राजमार्ग

01 Nov, 16:25


जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे -


जगातील सर्वाधिक आनंदी देश
1.फिनलँड
2.डेन्मार्क
3.आईसलँड
4.स्वीडन
5.इजराइल

जगातील सर्वात कमी आनंदी देश 143.अफगाणिस्तान
142.लेबनन
141.लिसोथो
140.सीएरा लिऑन

143 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक - 126

सातत्याने सातव्यांदा फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

यशाचा राजमार्ग

01 Nov, 15:39


महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे 🌿

• प्राणी क्रूरता अधिनियम, 1960 🐾
• वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 🦁
• जल प्रदूषण नियंत्रण कायदा, 1974 💧
• वन संरक्षण अधिनियम, 1980 🌲
• हवा प्रदूषण नियंत्रण कायदा, 1981 🌬️
• पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 🌳
• राष्ट्रीय वन धोरण, 1988 🌲
• जैवविविधता कायदा, 2002 🌍
• राष्ट्रीय जल धोरण, २००२ 💦
• राष्ट्रीय पर्यावरण धोरण, २००६ 🌏
• राष्ट्रीय लवाद कायदा, २०१० ⚖️

यशाचा राजमार्ग

01 Nov, 14:58


🌸 Combine Group B 2024 तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी One Exam One Cutoff 49-51 लागेल या दृष्टीने तयारी ठेवावी...

Combine Group C 2024 तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी One Exam One Cutoff 36-38 लागेल या दृष्टीने तयारी ठेवावी...

यशाचा राजमार्ग

01 Nov, 14:48


Photo

यशाचा राजमार्ग

01 Nov, 14:48


💥💥Today special💥💥

७ वी घटनादुरुस्ती (१ नोव्हेंबर १९५६)

भाषावार राज्य पुनर्रचना = द्विभाषिक मुंबई राज्याचीनिर्मिती (१९५६)

पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण

यशाचा राजमार्ग

01 Nov, 13:24


Combine वाल्यांनी घाबरुन जायचं काहीच कारण नाही.

जाहिरातीसाठी एवढा उशीर झाला तरी तुम्ही संयम सोडला नाहीत

बाकी गोष्टी तर दुय्यम आहेत🔥🔥🔥

होईल सर्व सुरळीत
🥰

यशाचा राजमार्ग

01 Nov, 13:23


ब्रिटिश कालीन घटनात्मक सुधारणा

1. रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा नियमन कायदा -1773

➤भारताच्या बाबतीत ब्रिटिश पार्लमेंटचा हा पहिला हस्तक्षेप.

➤ कारण - कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालणे, तसेच कंपनीच्या व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवणे.

➤कंपनीचे इंग्लंडमधील संचालक मंडळाचे 24 सदस्य हे 4 वर्षांसाठी निवडले जातील.

➤बंगालच्या गव्हर्नरला कंपनीचा गव्हर्नर नेमण्यात यावे. त्याच्या मदतीसाठी 4 सदस्यांचे कौन्सिल. कामकाज बहुमताने चालनार होते.
निर्णायक मताचा अधिकार गव्हर्नर जनरलला होता.

➤ त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा, पण संचालक मंडळाच्या विनंतीवरून सम्राट त्यांना पदमुक्त करु शकेल.

➤कौन्सिलसह गव्हर्नर जनरलला बंगाल, बिहार व ओरिसा या प्रदेशांच्या महसूल, नागरी व लष्करी शासनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला.

➤ मुंबई व मद्रास इलाख्यांबाबत युद्ध व शांतता यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार कौन्सिलसह गव्हर्नर जनरलला असावा. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय याबाबतीत निर्णय घेऊ नये.

➤बंगाल पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज
सदस्य - रिचर्ड बारवेल, जनरल क्लॅव्हरिंग, फिलिप फ्रान्सिस, कर्नल मॉन्सन.

➤ सर्वोच्च न्यायालयाची कलकत्ता येथे स्थापना, एक मुख्य व तीन इतर न्यायाधीश. पहिला मुख्य न्यायाधीश इलिजा इंफे. इतर न्यायाधीश चेम्बर्स, लिमेस्टर, हाइड.

➤ ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षांकरिता भारतात व्यापाऱ्याच्या एकाधिकाराची सनद दिली.

यशाचा राजमार्ग

01 Nov, 12:59


राज्यसभा,लोकसभा,विधानपरिषद आणि विधानसभेचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील चार नेते👆

4,409

subscribers

5,403

photos

186

videos