विषय :- UG NEP नियमित सत्र 1 तसेच B.Pharm व M.Pharm नियमित सत्र 1 च्या विद्यार्थ्यांचे नामांकन आवेदन पत्र व परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याबाबत
महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, UG NEP नियमित सत्र 1 तसेच B.Pharm व M.Pharm नियमित सत्र 1 च्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे नामांकन आवेदन पत्र व परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याकरीता दिनांक 06/01/2025 पर्यंत वेळ दिलेली होती परंतु अद्याप काही विद्यार्थ्यांचे नामांकन व परीक्षा आवेदन पत्र भरायचे राहून गेले असल्याची माहिती महाविद्यालयांकडून प्राप्त झाली त्यामुळे अश्या विद्यार्थ्यांचे नामांकन आवेदन पत्र व परीक्षा आवेदन पत्र भरण्याकरीता अंतिम संधी म्हणून पोर्टल दिनांक 07/01/2025 ला फक्त सायंकाळी 6 वाजे पर्यंत सुरु राहील याची महाविद्यालयांनी नोंद घ्यावी तसेच याबाबत संबधित कर्मचारी व विद्यार्थ्यांना अवगत करावे ही विनंती.