Rahul Gujar Sir @rahulgujarsir123official Channel on Telegram

Rahul Gujar Sir

@rahulgujarsir123official


MPSC/UPSC/सरळसेवा/सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी तसेच GS

Rahul Gujar Sir (English)

Are you looking to enhance your knowledge and skills in a fun and interactive way? Look no further than 'Rahul Gujar Sir' Telegram channel! This channel is dedicated to providing valuable educational content, motivational messages, and insightful tips from the renowned teacher, Rahul Gujar Sir. Known for his expertise in various subjects, including mathematics, science, and English, Rahul Gujar Sir is committed to helping students succeed in their academic journey. Whether you are preparing for exams or simply want to expand your knowledge, this channel offers a wide range of resources to support your learning. From live sessions to study materials, you will find everything you need to excel in your studies. Join 'Rahul Gujar Sir' channel today and take your education to the next level!

Rahul Gujar Sir

11 Jan, 16:48


Document from Rahul Gujar

Rahul Gujar Sir

11 Jan, 09:15


मुंबई चालक पेपर

Rahul Gujar Sir

10 Jan, 03:49


Document from Rahul Gujar

Rahul Gujar Sir

10 Jan, 02:42


मुंबई बाबत माहिती 10 मिनिटात बघून घ्या

Rahul Gujar Sir

10 Jan, 02:33


नवी दिल्ली येथे १३ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी शुक्रवारी ट्रॉफी आणि शुभंकराचे अनावरण करण्यात आले.

▪️भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळवली जाईल.
▪️शुभंकर : तेजस आणि तारा
▪️विश्वचषक जिंकणाऱ्या महिला आणि पुरुष संघांना दोन स्वतंत्र ट्रॉफी देण्यात येतील. 
▪️पुरुषांच्या चॅम्पियनसाठी निळी ट्रॉफी आणि महिला स्पर्धेसाठी हिरवी ट्रॉफी दिली जाईल.
-----------------------------------------

Rahul Gujar Sir

07 Jan, 06:40


Police Bharti Paper - 39.pdf

Rahul Gujar Sir

05 Jan, 03:05


लष्करी सराव 'सूर्य किरण'

▪️हा भारत आणि नेपाळ दरम्यान आयोजित संयुक्त लष्करी सराव आहे.

▪️18 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्य नेपाळला रवाना झाले.

▪️हा सराव 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत नेपाळमध्ये केला जाईल.

▪️भारतीय सैन्याचे नेतृत्व 11 व्या गोरखा रायफल्सकडे असेल.

▪️नेपाळी सैन्याचे नेतृत्व श्रीजंग बटालियन करेल.

▪️भारत-नेपाळ लष्करी सराव सूर्यकिरण 2011 मध्ये सुरू झाला.https://t.me/rahulgujarsir123official

Rahul Gujar Sir

05 Jan, 03:02


https://t.me/rahulgujarsir123official

Rahul Gujar Sir

05 Jan, 03:02


जगात सर्व प्रथम  गोष्टी :

▪️स्वेच्छेने मरण्याचा अधिकार देणारा देश : नेदरलँड
▪️वनतोडीवर बंदी घालणारा पहिला देश : नॉर्वे
▪️जगातील पहिले विद्यापीठ : तक्षशिला विद्यापीठ,भारत
▪️ऑलिम्पिक खेळ आयोजित करणारा पहिला देश : ग्रीस
▪️नागरी सेवा स्पर्धा सुरू करणारा पहिला देश : चीन
▪️जगभर समुद्री प्रवास करणारी पहिली व्यक्ती : फर्डिनांड मॅगेलन
▪️संविधान बनवणारा पहिला देश : युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
▪️पुस्तके छापणारा पहिला देश : चीन
---------------------------------------

Rahul Gujar Sir

29 Dec, 04:05


♦️ #GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार..

Rahul Gujar Sir

29 Dec, 04:03


♦️सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम.

Rahul Gujar Sir

29 Dec, 04:01


♦️98 वे आखील भारतीय मराठी साहित्य संमेलन - नवी दिल्ली..

👉 उद्घाटन - पंतप्रधानांच्या हस्ते..

👉 अध्यक्ष - प्रा. डॉ. तारा भवाळकर..

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:45


Police Bharti Solu Paper - 37.pdf

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:44


Police Bharti Paper - 37.pdf

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:41


Police Bharti Solu Paper - 38.pdf

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:41


Police Bharti Paper - 38.pdf

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:17


देशातील पहिले डिजिटल संग्रहालय

▪️भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

▪️त्याचे नाव "अभय प्रभावना" आहे.

▪️हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई-पुणे महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या काठावर आहे.

▪️हे फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी कल्चरल अँड हिस्ट्री यांनी तयार केले आहे.

▪️हे जैसलमेरच्या खास पिवळ्या दगडापासून बनवलेले आहे.

▪️जैन विचार, श्रद्धा आणि इतिहास यांची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
-------------------------------------------

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:15


5 महत्वाचे निर्णय/कायदे ज्यासाठी डॉ.मनमोहन सिंह सदैव स्मरणात राहतील...

▪️शिक्षण हक्क कायदा (2009)
▪️माहितीचा अधिकार (2005)
▪️मनरेगा (2005)
▪️राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (2013)
▪️भूसंपादन कायदा (2013)
-----------------------------------------

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:12


युनायटेड स्टेट्सचा राष्ट्रीय पक्षी :

बाल्ड ईगल अधिकृतपणे युनायटेड स्टेट्सचा राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आला.

संबंधित तथ्ये :
▪️बाल्ड गरुड :
▪️वैज्ञानिक नाव : Haliaeetus leucocephalus
▪️Accipitidae कुटुंबातील
▪️जंगलात सरासरी आयुर्मान : 20 ते 30 वर्षे
▪️उत्तर अमेरिकेतील एकमेव स्थानिक समुद्री गरुड आहे.
▪️संवर्धन स्थिती : IUCN स्थिती-कमी चिंताजनक
▪️1782 पासून युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय चिन्ह आहे.
---------------------------------------------------
युनायटेड स्टेट्स बद्दल :

▪️राजधानी : वॉशिंग्टन, डी.सी.
▪️सर्वात मोठे शहर : न्यूयॉर्क
▪️लॉस एंजेलिस : हॉलीवूडचे घर
▪️चलन : यूएस डॉलर (USD)
▪️राष्ट्रीय दिवस : 4 जुलै (स्वातंत्र्य दिन)
▪️रॉकी पर्वत : उत्तर अमेरिकेतील प्रमुख पर्वतश्रेणी
-------------------------------------------

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:09


केन-बेटवा नदी जोडणारा राष्ट्रीय प्रकल्प

▪️अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्त मध्य प्रदेशातील केन-बेटवा नदी जोडो राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली.

▪️या प्रकल्पांतर्गत केन नदीचे पाणी बेटवा नदीत स्थानांतरित केले जाणार आहे.

▪️या दोन्ही नद्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत.

▪️या प्रकल्पाचे व्यवस्थापन जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय जल विकास संस्था (NWDA) करत आहे.
----------------------------------------

Rahul Gujar Sir

29 Dec, 03:08


ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

▪️उद्घाटन सोहळा : 15 जानेवारी 2025
▪️ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
▪️वितरण : दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार वितरण
▪️पुरस्काराचे स्वरूप  : पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे आहे.

▪️2006 : पद्मभूषण पुरस्काराने गौरव
▪️चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण संस्थेवर सलग दोनदा अध्यक्ष म्हणून कार्य.
▪️फिल्मफेअर पुरस्कार,
▪️महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
-------------------------------------------

Rahul Gujar Sir

21 Dec, 23:56


महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प :

▪️ताडोबा अंधारी, मेळघाट,नवेगाव नागझिरा,पेंच, सह्याद्री,बोर

Rahul Gujar Sir

21 Dec, 23:54


भारतातील पहिले सीमेवरील सौर गाव

▪️बनासकांठामधील मासळी हे सीमावर्ती भागातील देशातील पहिले 'सोलर व्हिलेज' ठरले आहे.
▪️हे गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात पाकिस्तान सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
▪️पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत मासळी गावातील एकूण 119 घरांवर सौरऊर्जेची छत बसवण्यात आली आहे.
▪️या गावात 800 लोकसंख्या आहे. या गावातील घरे 225 किलोवॅटपेक्षा जास्त वीज निर्माण करतात.
-----------------------------------------

1,176

subscribers

893

photos

14

videos