Police bharti 2024 @polishbharati Channel on Telegram

Police bharti 2024

@polishbharati


श्रीयश करिअर अकॅडमी
पोलीस भरती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
राज्यसेवा परीक्षा
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
विक्रीकर निरीक्षक परीक्षा
कर सहायक गट-क परीक्षा
रेल्वे परीक्षा ग्रुप D, NTPC
लिपिक-टंकलेखक परीक्षा
जिल्हा परिषद परीक्षा
सर्व स्पर्धा परिक्षासाठी उपयुक्त

Police Bharti 2024 (Marathi)

श्रीयश करिअर अकॅडमी या Telegram चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत आहे! या चॅनेलवर 'Police Bharti 2024' ह्या विषयावर संबंधित माहिती, तयारी टिप्स, परीक्षा सुचना, व्यायाम योजना, आणि इतर सामान्य माहिती सामायिक केली जाते. या चॅनेलवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्यसेवा परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, कर सहायक गट-क परीक्षा, रेल्वे परीक्षा ग्रुप D, NTPC, लिपिक-टंकलेखक परीक्षा, जिल्हा परिषद परीक्षा, आणि सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. आपलं Telegram चॅनेल 'Police Bharti 2024' जोडण्यासाठी आत्ताच लॉग इन करा आणि आपल्या पोलिस भरतीच्या उद्दीष्टानुसार तयारीची तयारी सुरुवात करा!

Police bharti 2024

28 Oct, 16:29


📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील  पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी

Police bharti 2024

28 Oct, 16:29


*संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष*

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
▪️2023 : भरडधन्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Police bharti 2024

05 Sep, 06:53


🖋 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर)
◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे)
◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा)
◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे जिल्हा)
◾️तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर जिल्हा)
◾️भाटघर : येसाजी कंक (पुणे जिल्हा)
◾️मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर जिल्हा)
◾️मांजरा : निजाम सागर (लातूर जिल्हा)
◾️कोयना : शिवाजी सागर ( सातारा जिल्हा)
◾️राधानगरी: लक्ष्मी सागर (कोल्हापूर )
◾️तानसा : जगन्नाथ शंकरशेठ (ठाणे)
◾️तापी प्रकल्प : मुक्ताई सागर (जळगाव)
◾️माणिक डोह : शहाजी सागर (पुणे )
◾️चांदोली : वसंत सागर ( सांगली, कोल्हापूर)
◾️उजनी : यशवंत सागर (सोलापूर)
◾️दूधगंगा : राजर्षी शाहू सागर ( कोल्हापूर)
◾️विष्णुपुरी : शंकर सागर (नांदेड)
◾️वैतरणा : मोडक सागर (ठाणे)

भंडारदरा जलाशयाला अगोदर आर्थर जलाशय नावाने ओळखला जात होता

Police bharti 2024

28 Aug, 16:27


Follow the Police Bharti 2024 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaiFfbe8F2pKzt5lq513

Police bharti 2024

28 Aug, 16:21


▪️लडाखमध्ये नवीन पाच जिल्ह्यांची निर्मिती :-
१) झान्स्कर
२) द्रास
३) शाम
४) नुब्रा
५) चांगथांग

▪️झांस्कार आणि द्रास हे नवे जिल्हे कारगिल विभागात असतील.

▪️तर शाम, नुब्रा आणि चांगथांग हे जिल्हे लेह विभागात आहेत.

▪️आधीचे जिल्हे :-
१) लेह
२) कारगिल

▪️एकूण जिल्ह्यांची संख्या आता सात झाली आहे.

Police bharti 2024

27 Aug, 04:44


❇️ खालील गोष्टी नक्की वाचा 🇮🇳

◾️15 ऑगस्ट 2024 : 78 वा स्वातंत्र्य दिवस (77 वर्षे पूर्ण झाली हे 78 वे सुरू)
◾️15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र (शुक्रवार) झाला

🇮🇳15 ऑगस्ट 1947 : स्वातंत्र्यता दिवस
🇮🇳26 नोव्हेंबर 1949 : संविधान दिवस
🇮🇳26 जानेवारी 1950 : प्रजासत्ताक दिवस

◾️2024 स्वतंत्रता दिवस थीम : विकसित भारत

💡लाल किल्ल्यावर सर्वात जास्त वेळा ध्वज फडकावणारे पंतप्रधान
1】जवाहरलाल नेहरू : 17 वेळा
2】इंधिरा गांधी : 16 वेळा
3】नरेंद्र मोदी : 11 वेळा(2024 धरून)
4】मनमोहन सिंग : 10 वेळा

◾️भारताचे अंतिम व्हॉईसरॉय : लॉर्ड माउंटबॅटन
◾️स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड माउंटबॅटन
◾️स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे "भारतीय" गव्हर्नर जनरल : सी राजगोपालाचारी

➡️ 15 ऑगस्ट ला ध्वज  : पंतप्रधानांच्या हस्ते  ध्वजारोहण न(लाल किल्ल्यावर )
➡️ 15 ऑगस्ट राज्यात : मुख्यमंत्री हस्ते झेंडा ध्वजारोहण केलं
➡️ 26 जानेवारीला ध्वज : राष्ट्रपती यांच्या हस्ते फडकविला जातो (कर्तव्य पथावर )
➡️ 26 जानेवारी राज्यात : राज्यपालां च्या हस्ते फडकविला जातो 

◾️22 जुलै 1947 ला भारतीय ध्वज स्वीकारला गेला
◾️राष्ट्रगीत : जण गण मन ( रवींद्रनाथ टागोर)
◾️राष्ट्रगीत गायचा वेळ : 52 सेकंद
◾️राष्ट्रीय गीत : वंदे मातरम (बँकिंम चंद्र चॅटर्जी -आनंद मठ)
◾️राष्ट्रीय गीताच्या गायनाची वेळ : 65 सेकंद
◾️राष्ट्रीय ध्वज डिझाईन : पिंगली व्यंकय्या यांनी
◾️सत्यमेव जयते : मुंडक उपनिषद मधून घेण्यात आला आहे
◾️राष्ट्रीय चिन्हा वर 3 प्राणी आहेत :बैल , घोडा , सिंह
◾️राष्ट्रीय ध्वज : लांबी × रुंदी गुणोत्तर : 3:2

🧐 व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट का निवडली
◾️15 ऑगस्ट लाच जपान ने दुसऱ्या महायुद्धात आत्मसपर्पण केलं होतं त्याचे दुसरे वर्ष होते
◾️पाकिस्तान ला 14 ऑगस्ट आणि भारताला 15 ऑगस्ट दिल कारण माउंटबॅटन यांना दोन्ही स्वतंत्र सोहळ्यात उपस्थित रहायचं होत म्हणून
◾️भारताच्या स्वातंत्र्या वेळी क्लेमेंट ऍटली हे ब्रिटन चे पंतप्रधान होते
🇮🇳 भारताबरोबर हे देश पण 15 ऑगस्ट ला स्वतंत्र दिवस साजरा करतात
◾️रिपब्लिक ऑफ काँगो
◾️उत्तर कोरिया
◾️दक्षिण कोरिया
◾️बहरीन
◾️लिकटेंस्टीन

Police bharti 2024

26 Aug, 16:54


भारतामध्ये एकूण 18 रेल्वे विभाग आहेत.

◾️मध्य रेल्वे :मुंबई (CSMT) -3905 किमी
◾️उत्तर रेल्वे :दिल्ली 6968 किमी
◾️पूर्व रेल्वे :कोलकत्ता 3667 किमी
◾️पश्चिम रेल्वे : मुंबई चर्चगेट 6182 किमी
◾️दक्षिण रेल्वे:चेन्नई-5079 किमी
◾️दक्षिण मध्य रेल्वे: सिकंदराबाद 3127 किमी
◾️उत्तर पूर्व फ्रँटीएररेल्वे:गुवाहाटी 3948 किमी
◾️उत्तर पूर्व रेल्वे: गोरखपूर 3667किमी
◾️दक्षिण पश्चिम रेल्वे:हुबळी 3177 किमी
◾️दक्षिण पूर्व रेल्वे :कोलकाता 2631 किमी
◾️पश्चिम मध्य रेल्वे :जबलपूर 2965 किमी
◾️उत्तर पश्चिम रेल्वे :जयपूर 5459 किमी
◾️उत्तर मध्य रेल्वे :अलाहाबाद 2151 किमी
◾️दक्षिण पूर्व रेल्वे :विलासपूर 2447 किमी
◾️पूर्व किनारा रेल्वे :भुवनेश्वर 2654 किमी
◾️पूर्व मध्य रेल्वे :हाजीपुर 3628 किमी
◾️मेट्रो रेल्वे :कोलकाता 24 किमी
◾️दक्षिण किनारा रेल्वे :विशाखापट्टणम

या शिवाय कोकण बोर्ड हे वेगळे महामंडळ आहे.

🚂 महाराष्ट्रात भारतीय रेल्वेचे दोन प्रमुख विभाग आहे :-

1】 मध्य रेल्वे - ( CSMT ) मुंबई
2】 पश्चिम रेल्वे - ( चर्चगेट ) मुंबई

Police bharti 2024

26 Aug, 16:46


गणित व बुद्धीमत्ता या विषयाचे पोलिस भरती क्लास बारामती मध्ये घेतले जातात आमचा पत्ता श्रीयश करिअर अकॅडमी बारामती संपर्क 8668406572 / 992 579805 online तसेच ऑफलाइन बॅचची सोय

Police bharti 2024

26 Aug, 16:43


वेव्हेल योजना विषयी माहिती :




मे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले.


इंग्लंड विजयी झाले.


लवकरच पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या.


चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता.


त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती.


आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते.


युद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती.


अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते.


कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती.


मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती.


विलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते.


ते जून 1945 मध्ये परत आले.


14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली.


नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.


जपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे.


त्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल.


गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील.


त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील.


भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील.


पक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील.


ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील.


केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल.


विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल.


त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.


25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली.


युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते.


तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले. बॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली.


व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता.


तो हक्कच जिना अमान्य करीत होते.




याशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला.


हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत.


त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले.


याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या.


भारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता.


भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती.


मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या.


त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही.


म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला

Police bharti 2024

15 Jul, 04:12


भारतीय महिला क्रिकेट टीम कोच - अमोल मजूमदार
भारतीय पुरुष क्रिकेट टीम कोच - गौतम गंभीर
भारतीय महिला हॉकी टीम कोच - हरिंदर सिंह
भारतीय पुरुष हॉकी टीम कोच : क्रैग फुल्टन (दक्षिण आफ्रिका)
भारतीय पुरुष बास्केटबॉल टीम कोच: स्कॉट फ्लेमिंग (USA)
भारतीय रग्बी टीम (पुरुष+महिला) कोच - वैसाले सेरेवी (Fiji)
-------------------------------------------
संकलन : श्री फाळके सर श्रीयश करिअर अकॅडमी बारामती 866840 6572

Police bharti 2024

15 Jun, 07:13


कॅबिनेट मंत्री खातेवाटप

◾️अमित शाह - गृहमंत्री
◾️राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
◾️एस. जयशंकर - परराष्ट्र मंत्री
◾️नितीन गडकरी - रस्ते आणि परिवहन मंत्री
◾️हर्ष मल्होत्रा - रस्ते आणि परिवहन मंत्री राज्यमंत्री
◾️अजय तम्ता - रस्ते आणि परिवहन मंत्री राज्यमंत्री
◾️अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्रालय + माहिती आणि प्रसारण मंत्री
◾️मनोहर लाल खट्टर - ऊर्जा मंत्री , गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारांसह
◾️श्रीपाद येसो नाईक : ऊर्जा राज्यमंत्री,
◾️ टोखान साहू : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री
◾️निर्मला सीतारामन : अर्थमंत्रालय
◾️एस जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय
◾️जीतन राम मांझी : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
◾️शिवराज सिंह चौहान : कृषी मंत्रालय + पंचायती राज आणि विकास मंत्री 
◾️राम मोहन नायडू : नागरी विमान वाहतूक मंत्री
◾️सीआर पाटील : जलशक्ती मंत्री
◾️धर्मेंद्र प्रधान : शिक्षण मंत्रालय
◾️भूपेंद्र यादव : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
◾️जेपी नड्डा : आरोग्य मंत्रालय
◾️एचडी कुमारस्वामी:अवजड उद्योग मंत्रालय
◾️किरेन रिजिजू : संसदीय कामकाज मंत्रालय
◾️ श्री प्रहलदा जोशी यांना अन्न, ग्राहक व्यवहार + नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
◾️गिरीराज सिंह : वस्त्रोद्योग मंत्रालय
◾️गजेंद्र शेखावत : पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय
◾️सुरेश गोपी : पर्यटन आणि संस्कृती राज्यमंत्री
◾️अन्नपूर्णा देवी : महिला आणि बाल विकास
◾️रवनीत सिंह बिट्टू : अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री
◾️पीयूष गोयल : वाणिज्य मंत्रालय
◾️हरदीप सिंग पुरी : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
◾️चिराग पासवान : युवा आणि क्रीडा मंत्रालय
संकलन : श्री फाळके सर श्रीयश करिअर अकॅडमी बारामती 866840 6572

Police bharti 2024

15 Jun, 07:11


पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली

• अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री : चौना मीन

• अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.  60 सदस्यीय विधानसभेत भाजपने 46 जागा जिंकल्या

• अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.

● नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री

• ओडिशाचे मुख्यमंत्री - मोहन मांझी

उपमुख्यमंत्री - केव्ही सिंग देव आणि प्रवती परिदा.  अद्यतन • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री: चंद्राबाबू नायडू

उपमुख्यमंत्री : पवन कल्याण • सिक्कीमचे मुख्यमंत्री - प्रेमसिंग तमांग
संकलन:- श्री फाळके सर श्रीयश करिअर अकॅडमी बारामती 8668 40 65 72

Police bharti 2024

25 Mar, 16:12


भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन  :





यूरोपियन – कोलंबस :


राष्ट्र – स्पेन.


वर्ष – 1493.


वखारी – त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.


2. यूरोपियन – वास्को-डी-गामा :


राष्ट्र – पोर्तुगल.


वर्ष – 1498.


वखारी – कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन).


यूरोपियन – कॅप्टन हॉकीन्स :


राष्ट्र – ब्रिटिश.


वर्ष – 1607.


कंपनी – ईस्ट इंडिया कंपनी.


वखारी – पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.

यूरोपियन –


राष्ट्र – डच.


वर्ष – 1602.


कंपनी – युनायटेड ईस्ट इंडिया.


वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, नागपट्टणम, वेगूर्ला.


यूरोपियन –


राष्ट्र – फ्रेंच.


वर्ष – 1664.


कंपनी – फ्रेंच ईस्ट इंडिया.


वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, पोंडेचेरी, चंद्रनगर, कोरोमंडल इत्यादि ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या.
संकलन:- श्री फाळके सर श्रीयश करिअर अकॅडमी बारामती 866840 65 72

Police bharti 2024

05 Mar, 16:10


VOCABULARY

Conducted – आयोजन केलं
Examines – परीक्षण करणे
Preliminary – पूर्व
Heartfelt – हार्दिक
Embrace – आलिंगन
Efficient – कुशल
Coefficients – गुणांक
Whim – भावना
Arbitrary – मनमानी
Heuristic – अनुमानी
Comply – पालन करणे
Domineering – हुकूमशाही
Gullible – साधाभोला
Chatty – बडबड्या
Nosy – सुगंधित
Cynical – सनकी
Conservative – रूढ़िवादी
Oblivious – बेखबर
Ignorant – अनजान
Obsessed – ग्रस्त
Bossy – शासक
IMMATURE – अपरिपक्व
Mature – परिपक्व
Authoritative – आधिकारिक
Naive – अनुभवहीन
Naivete – साधेपणा
Narrative – वर्णनात्मक
Orphan – अनाथ
isolate – वेगवेगळे
Realm – क्षेत्र
Preoccupation – अति व्यस्तता
Affluent – धनी
Redundancy – अनावश्यक
In lieu, lieu त्याऐवजी
Initiative – नवीन सुरवात
Nimble – तीक्ष्ण
Impedance – विरोध
Phrase – वाक्यांश
Phrasebook – शब्दकोश
persuade – मन वळविणे
Cause – कारण
Extended – विस्तृत
Exhaustive – संपूर्ण
Thorough – संपूर्ण
Rigorous – कठीण
Unto – पर्यंत
Global – वैश्विक
Suicidal – आत्मघात
Despondent – हताश
Reservoir – जलाशय
Convey – सूचित करणे
Demise – मृत्यु
Insanity – वेडेपणा
Irony – व्यंग्य
Prejudice – पक्षपात
Etiquette – शिष्टाचार
Aggression – आक्रमण
Unceasing – अविरत
Heartless – निर्दयी
Heartlessness – निर्दयता
Truculence – निर्दयता
Provocation – उत्तेजना
Violent – हिंसा करणारा
Confront – सामना करणे
Readiness – तत्परता
Hostile – शत्रुतापूर्ण
Antipathy – घृणा
Interpretation – व्याख्या
Contented – संतुष्ट
Nevertheless – तरीदेखील
Gem – रत्न
Profound – गहन
Alchemy – रसायनशास्त्र
Chaotic – अराजक
Reverence – श्रद्धा
Stupor – अचेतनता
Enrollment – नामांकन
Rave – बड़बड़ कारणे
Raving – पागल
Intent – विचार
Wit – बुद्धि
Oblivion – विस्मृति
Lad, laddie – बालक
Barley – जव
Muffin – चकती
Ran – भूसा

Police bharti 2024

03 Mar, 16:38


पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

कागदपत्रे

1 इ.१० वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र

2 इ. १२वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र

3| उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे

4 गुणपत्रक/प्रमाणपत्र

5 शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र

6 ड्रायव्हिंग लायसन्स

7 वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

8 जातीचे प्रमाणपत्र

9 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

10 आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)

11 खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र

12 प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र

13 विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र

14 होमगार्ड प्रमाणपत्र (१०९५ दिवसांचे)

15 अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र

16 पोलीस पाल्य प्रमाणपत्र

17 माजी सैनिक उमेदवारांकरीता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र

18 अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र

19 संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र

20 जात वैधता झालेली असल्यास, त्याचे प्रमाणपत्र

21 आधार कार्ड

22 पॅन कार्ड मतदार ओळखपत्र

23 नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे ०५ फोटो

24 नावात बदल झाला असल्यास, त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची

Police bharti 2024

28 Feb, 08:32


महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये :


थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.


1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.


1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.


1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.


2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.


ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.


उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.


सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘
सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.


संकलन : श्री फाळके सर श्रीयश करिअर अकॅडमी बारामती ९९२१५७९८०५ / ८६६८४०६ ५७२

Police bharti 2024

27 Feb, 16:12


मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना असते.

१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो
२९. टेप आणा आपटे.
३०. शिवाजी लढेल जीवाशी.
३१. सर जाताना प्या ना ताजा रस.
३२. हाच तो चहा

(मराठी भाषा मित्रमंडळ)

Police bharti 2024

27 Feb, 15:57


वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल.


सर्वप्रथम व्यापाराच्यानिमित्ताने पोर्तृगीज आले.


त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ.


 व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले.


या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली.


त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली.


त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.


ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले याचा उहापोह या प्रकरणात केला आहे.


प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला.


र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.


युरोपियनांचे भारतात आगमन :-


पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे.


परंतु 1453 मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्‍यांचा मार्गच अडवून धरला.


आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता.


तो म्हणजे भारताकडे जाणार्‍या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्‍या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते.


या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्‍या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.


त्याच्या या प्रयत्नामुळे तो 1492 मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.


वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला.


या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्‍यावरील पहिले पाऊल होते.


1615 मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. 


अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता.


काही मालाच्या बाबतीत या व्यापार्‍यांना 100 टक्के फायदा मिळत होता.


पुढे 1717 साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्‍यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.


संकलन श्री फाळके सर श्रीयश करियर अकॅडमी बारामती ९९२१५७९८०५/८६६८४०७५७२

Police bharti 2024

27 Feb, 09:08


विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मीटिअरॉलॉजी   हवामानाचा अभ्यास
ॲकॉस्टिक्स ध्वनीचे शास्त्र
ॲस्ट्रोनॉमी ग्रहतार्‍यांचा अभ्यास
जिऑलॉजी  भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
मिनरॉलॉजी भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
पेडॉगाजी शिक्षणविषयक अभ्यास
क्रिस्टलोग्राफी स्फटिकांचा अभ्यास
मेटॅलर्जी धातूंचा अभ्यास
न्यूरॉलॉजी मज्जसंस्थेचा अभ्यास
जेनेटिक्स अनुवंशिकतेचा अभ्यास
सायकॉलॉजी  मानवी मनाचा अभ्यास
  बॅक्टेरिऑलॉजी जिवाणूंचा अभ्यास
व्हायरॉलॉजी विषाणूंचा अभ्यास
सायटोलॉजी पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
हिस्टोलॉजी उतींचा अभ्यास
फायकोलॉजी शैवालांचा अभ्यास
मायकोलॉजी  कवकांचा अभ्यास
डर्मटोलॉजी त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवांचा अभ्यास
इकॉलॉजी   सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
हॉर्टीकल्चर उद्यानविद्या
अर्निथॉलॉजी  पक्षिजीवनाचा अभ्यास
अँन्थ्रोपोलॉजी   मानववंश शास्त्र
एअरनॉटिक्स हवाई उड्डाण शास्त्र
एण्टॉमॉलॉजी  कीटक जीवनाचा अभ्यास
संकलन श्री फाळके सर श्रीयश करिअर अकॅडमी बारामती
:- ९९२१५७९८०५/८६६८४०६५७२

Police bharti 2024

27 Feb, 09:03


मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.

आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो...!!

संकलन,:-श्री फाळके सर८६६८४०६५७२/९९२१५७९८०५

4,759

subscribers

186

photos

56

videos