नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल (@natemanache)の最新投稿

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल のテレグラム投稿

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
5,898 人の購読者
5,633 枚の写真
412 本の動画
最終更新日 11.03.2025 07:39

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल によってTelegramで共有された最新のコンテンツ

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 17:27

1,498

पांढरपेशा माणसाच्या आयुष्यात काय काय घडत नाही? कधी सामाजिक दबावाने (peer pressure) एकटं पडावं लागतं, तर कधी नेट जातं, कधी प्रवाहाच्या बाहेर निघावं लागतं, तर कधी माणूस हॉटस्पॉटच्या रेंज बाहेर जातो, कधी इतरांच्यात सामिल न होण्याच्या भीतीने अपप्रकार सहावे लागतात, तर कधी नेटपॅकच संपतो, कधी शारीरिक-मानसिक-भावनिक-आर्थिक छळातून जावं लागतं, तर कधी आईच्या (बायकोच्याही समजू शकता) सिरियलवेळी लाइट जाते, कधी अकारण खच्चीकरण अनुभवावं लागतं, तर कधी सरांना वहीच्या मागील पानावर (जीवशास्त्रातील) साद्यंत आकृत्या सापडतात, कधी प्रेमाने मनाचा (किंवा अतिप्रेमाने अस्थिंचा) भंग होतो, तर कधी नेमकं डुलकीच्या वेळी मालक येतो, कधी ती ‘जेवलीस का?’ च्या उत्तरादाखल ब्लॉक करते, तर कधी बायको (न सांगता) अचानक माहेरहून परतते; पण म्हणून दरवेळी यापुढे प्रकाश नाहीच असं मानण्याचं कारण नाही हे त्या रडीच्या डावाने दिलं.

मैदानात लुटूपुटुचे खेळ सुरू राहतात फक्त ते खेळायला आपण राहिलो पाहिजे; हार-जीत असे काही नसते फारसे. आपण या रडण्या-चिडण्यातून खिलाडू झालो की नाही हे महत्वाचे.

मैदानात अपयशाला पचवून शिल्लक राहण्याचे कसब नकळत मिळाले नसते तर आजपर्यंत मीही हॉस्टेलच्या कोणत्यातरी खोलीत, ऑफिसातल्या कोपऱ्यात, जेलच्या बराकीत किंवा नसल्यास घरीच पंख्याला दोरखंड जवळ केला असता. किंवा अट्टल व्यसनी झालो असतो.

शेवटच्या दोन ओळीत जे मांडलं त्या विचारांपर्यंत जाण्यासाठी लागणारं दडपण/नैराश्यही कधी मला शिवलेलं नाही ते या रडीच्या डावामुळे. ज्यांना शिवलेलं आहे त्यांच्या रक्तचाचणीत ‘बालपणी मैदानी खेळांची कमतरता’ सापडेल का?
असो.

तुमच्या बालपणीचा आवडता खेळ कोणता होता? कोणता खेळ आजही आठवतो? आणि माझ्यासाठी जे रडीच्या डावाने सांधलं गेलं ते आयुष्य तुमच्यासाठी कोणत्या खेळाने/सवयीने सांधलं?


-- रंगारी (टाकबोरू)
(लेख आवडला असल्यास प्रतिक्रिया पाठवून प्रोफाइलला जरूर भेट द्या वाचक मायबापहो.)

[२/२]
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 17:27

1,355

बालपणीचा डाव रडीचा

शाळेच्या, माळावरच्या, मंदिराच्या, पीडब्ल्यूडीच्या, सोसायटीच्या किंवा पडीक जागेतल्या कोणत्याही मैदानावर बिनपगारी घाम गाळलेल्यांना काय मिळालं? चांगली शरीरयष्टी, कणखर मन आणि आठवणी यापलीकडे देखील मैदान आयुष्यात साथ देतं? कोणत्याही मैदानावर लहान मुलांवर मोठी मुले अन्याय करत असत तरीही मैदानावर आपण जात राहिलो यातून खरंच काही प्राप्त झालं? लहापणीच्या मैदानी आणि बैठ्या खेळांनी अनपेक्षितपणे कोणतं दान दिलं याचा आठवणींतून घेतलेला धांडोळा म्हणजे हा प्रस्तुत लेख.

बालपणीचा ‘खेळ’ सुखाचा. नंतर मोठ्यापणी नाहीतरी आयुष्याचा खेळ होतोच! माझ्याबाबतीत बालपणीही तितकासा उजेड नव्हता. त्यामुळे ही उक्ती माझ्यासाठी ‘बालपणीचा खेळ रडीचा’ अशी आहे. रडीचा डाव हा खेळ कसा असू शकतो? असा प्रश्न वाचकांस जरूर पडेल मात्र रडीचा डाव हाच माझा आवडता खेळ आहे हे मी (रडून) सिद्ध करून दाखवू शकतो! ते तूर्तास लांबणीवर. लेखाचं शीर्षक ‘रडीचा डाव – माझं श्रद्धास्थान’ असंही जमलं असतं. तेही तूर्तास लांबणीवर.

लहाणपणी आमच्या गल्लीत सगळी एकूणएक लहान मुले होती! आम्ही सगळे मिळून सटरफटर खेळ खेळायचो. मोठ्यांच्या दृष्टीने, मनोरंजन करण्यासाठी आम्ही ‘विदूषकगिरी’ करत असू. कालांतराने गल्लीबदल झाल्यावर मी सगळ्या मोठ्या मुलांत फेकलो गेलो आणि मी (खरोखर) विदूषक कसा आहे हे त्यांनी मला दाखवून दिलं! मोठ्या मुलांचे खेळ हे थोडेसे कठीण आणि आपसूकच चांगलेही होते. त्यांच्या खेळाने दैनंदिन जिंदगीला एक नवी रया आली; पण ते कोणत्याच लहान मुलाला त्यांचे खेळ शिकवत नसत की त्यांच्या खेळात लहान मुलांना सामील करून घेत नसत. त्यामुळे मी कातावलो होतो. जरी त्यांनी मला त्यांच्यात खेळायला घेतलं तरी मी एकटा पडू लागलो, हरू लागलो. हा प्रकार अनुभवून माझा (मनातल्या मनात) तिळपापड होऊ लागला.

पूर्वी लहान मुलांचे खेळ घेणारा म्होरक्या म्हणून मी फार लोकप्रिय होतो (टोपननाव : फाटका बॉस); पण ही मोठी पोरं आल्यापासून माझी लोकप्रियता हळूहळू कमी होत होती. ‘माझ्या प्रसिद्धीला उतरती कळा लागलीये’ ही गोष्ट मला दिवसा झोप येऊ देत नव्हती की रात्री जागं राहू देत नव्हती! या गोष्टीच्या तणावात मला जेवल्यानंतर भूक लागत नसे की पाणी पिल्यानंतर तहान लागत नसे! याचा माझ्या बालमनावर असा काही आघात झाला की नाक दाबताच मला श्वास घेणेही जड जाऊ लागले! उपाय एकच – मोठ्या मुलांमध्ये खेळून, जिंकून लोकप्रिय होणे.

मोठ्या मुलांचे खेळ अवघड, जे मला जमत नसत! वास्तवात मी कधीच ते ‘जमवून’ घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. कारण, मेरे पास माँ थी! मोठी मुले ज्यावेळी मला खेळात घेत नसत त्यावेळी मग मी आईकडे तक्रार करत असे! तेव्हा आई त्या मुलांना मला खेळायला घेण्यास भाग पाडत असे. पुन्हा जेव्हा माझ्यावर राज्य यायचं किंवा माझ्या चुका व्हायच्या तेव्हा मोठी मुले वचपा काढत, मला रडवत, टिंगलटवाळी करत आणि माझ्यावर हसत! तेव्हाही आई नामे शस्त्रच कामी आलं. मी पाणी प्यायच्या निमित्ताने घरात गेलो की दहा मिनिटाच्या आत आई मला बोलावून घ्यायची – काय योगायोग!

योगायोगाने या योगायोगांचं प्रमाण वाढलं आणि मोठी पोरं राज्य आल्यावर मला घरी सोडेनाशी झाली. (आपल्याकडे ‘राज्य’ येणे ही दुख:दायक बाब असल्याची उपरती तेव्हाच होऊन मी अ-सत्तापिपासू झालो!) त्यावेळी मी हात-पाय झाडायचो, कांगावा करायचो, रडायचो, सगळ्या अंगाला (मनातल्या मनात) माती फासून आकाशपाताळ एक करायचो, दहा मोठ्या माणसांना एकत्रित करायचो आणि मोठ्या मुलांविषयी अफवा पसरवायचो की लगेच आई माझ्या मदतीला धावून यायची. ती त्या मोठ्या मुलांना खवळायची, त्यांचे खेळ बंद करायला सांगायची. त्या पोरांच्या आया प्रकट होत त्यांना बोल लाऊन किंवा (चांगल्या) प्रसंगी बडवून थेट घरी नेत – हाच माझा रडीचा डाव!

मी आजही हा रडीचा डाव वापरतो. ‘रडीचा डाव जिंकवून देत नाही; पण निदान हरू तर देत नाही ना!’ हे तत्त्व मला पूर्वीपासून फार प्रिय असल्याने मी रडीचा डाव खेळत राहणार. जेव्हा केव्हा कोठे माझ्या मनाप्रमाणे घडणार नाहीत तेव्हा मी हे रडीचे फासे टाकणार. एकंदरीत रडीचा डाव हाच माझ्या बालपणातील सर्वाधिक आवडता खेळ जो मी तरूणपणातही खेळतो!

मस्करीचा भाग वगळला तर या काळतच मी (मानसिक) सुदृढ झालो. लोखंडपाणी, अप्पारप्पी, लिंगोरच्या(लगोरी), भोवरा, पाच-तीन-दोन, गोट्या, बॉक्स क्रिकेट, कॅरम, बुद्धीबळ, लपाछपी, विशामृत, दहा-वीस-तीस सगळं खेळताना रडलो पण पुनः खेळात जाण्याचं सोडलं नाही आणि पोरांनी मला रडवण्याचं (यामुळे मला बारावी नापास झाल्यावर जगण्याची ताकद मिळाली)! म्हणून रडीचा डाव लक्षात राहिला.
[१/२]
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 06:44

1,598

मित्रांनो नाते मनाचे या चॅनेल वर आपल्या
सगळ्यांचे स्वागत आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक कवी किंवा लेखक लपलेला असतोच फक्त गरज असते ती स्वतःला जाणून घायची. तुमच्याकडे जर स्वलिखित लेख, कविता आणि प्रेरणादायी कथा असतील तर मला 

💫Contact : @Nmcontactbot 💫

वर पाठवू शकता. तुमचे लेख ग्रुप वर तुमच्या नावासहित प्रकाशित केले जातील.
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 06:13

1,613

एवढ्या नात्यांचा काय उपयोग जर तुम्ही
तुमच्या अडचणींमधून एकटेच मार्ग शोधत
आहात, यासाठीच तुम्ही स्वतःला इतकं
Strong बनवा ना यार, म्हणजे तुम्हाला अशा
अनेक अडचणींमधून मार्ग काढता येईल, तसेच
तुम्हाला कुणाची गरज देखील भासणार नाही
यार…
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 06:03

1,478

Problem…

लोकांना जर तुमच्याशी Problem असेल, तर तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही, तुम्ही कशाला एवढा विचार करताय अशा गोष्टींचा, आणि ते Tension का घेता लोकांच्या बोलण्याच?, ते काय मोठे ज्ञानी आहेत का? स्वतः निर्णय घेऊन आपली Life जगा ना यार, वेळ लागेल पण काही Problem कमी नक्कीच होतील…
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

19 Feb, 16:40

1,643

शिवछत्रपतीचे नाव पडता कानी अभिमानाने भरून येते आपली छाती, त्यांनीच निर्माण सगळ्या रयेतेत आपुलकीची नाती, शिवरायांचे गुणगान वाचून हरली माझी मती, किती सांगू मी त्यांची महती, सर्व जगात आपल्या राज्यांची कीर्ती, यांनीची जपली हो सत्याची नीती, म्हणूनच माणसाच्या जन्माला दैवत प्राप्त करणारे आपले राजे शिवछत्रपती!,,✍🏻
🚩👏🏻
एकमत#लेखक
 @Ommshelke
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

19 Feb, 10:04

1,758

'युगे अठ्ठावीस' राहील
तुझ्यासोबत विठ्ठलासारखा
उभा मी सदैव सोबत
सखे मला तु रुक्मिणी सारखी
साथ देशील का

राहील मी
प्रभू श्री रामासारखा
एक वचनी
सखे मला तु सीते सारखी
साथ देशील का

राहील मी श्रीकृष्ण सारखा
सदैव तुझ्याच
सखे मला तु राधे सारखी
माझ्यावर प्रेम करशील का

काल ही आज ही
उद्या ही सखे तुझ्यावर
जीवापाड प्रेम करतोय
आणि शेवटच्या श्वासापर्यंत
तुझ्यावर जीवापाड प्रेम
करतच राहील

सखे मला तु साथ देशील का

विनायक भिसे , बारामती
मो. 7798150143
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

19 Feb, 04:20

1,446

शिवराय हे नाव ऐकायताचं आठवत तो अफझलखानवध शाहिस्तेखानाचे बोटे आणि आग्र्याहून सुटका किंवा आठवतो स्वराजभिषेक किंवा अजून दक्षिणदिग्विजय बस झालं इतकेच ते पण साहजिकच आहे म्हणा कारण आपल्याला फक्त शिवराय राजकीयदृष्ट्या सांगण्यात आले मात्र त्यांच सामाजिक जीवनावर खूप कमी लोकांनी अभ्यास केला शिवछत्रपतीनी सामाजिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे सामाजिक कार्य अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण होते ते समजून घ्यायला आपलं पूर्ण आयुष्य कमी पडेल तरीही त्याचं रयतेच्या हिताचे महत्वपूर्ण कार्य थोडक्यात जाणून घेणाचा आपण छोटासा प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे केली जसं  की  त्यांनी पहिल्यांदा जमिन मोजणीला सुरुवात करून योग्य करप्रणाली लागू केली तेव्हा त्यांनी अईनं झिंनस म्हणजे आताची कर्जमाफी योजना तेव्हा महाराजांनी सुरू केली शेतकऱ्यांना बी-बियाणे, बैल आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देने त्यांना सर्व सुखं सुविधा पुरवणे शिवछत्रपतीचा सर्व मावळ्यांना आदेश होता की शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठाला हात लागता कामा नये व त्यांना कसलही दुःखं होऊ नाही म्हणून त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वपरी मदत केली आपल्या जाणत्या राज्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी नवनवीन उपाययोजना राबविल्या खेळशिवापुरचं धरण त्यातील एक उदाहरण ठरतं कोयना नदीवर पूल असे  छत्रपती, महाराजांनी अनेक लहान-मोठे पूल आणि बंधारे बांधले, जे त्यांच्या सामजिक कार्याची अजून पण साक्ष देत आहेत आणि त्यांची न्यायव्यवस्था: एवढी पारदर्शक होती की त्यांच्या स्वराज्यात सगळ्या रयतेला ताबडतोब न्याय मिळल होता छत्रपती शिवाजी महाराजांनी असे एक मजबूत आणि न्यायपूर्ण न्यायव्यवस्था तयार केली. त्यांनी लोकांना त्वरित आणि योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वतः अनेक खटले हाताळले आणि न्यायनिवाडा केला याचं अधिक एक उदाहरण म्हणजेच राझ्याच्या पाटलाचा केलेला चौरंग लक्षात येतो महाराजांनी महिलांचा नेहमी आदर केला त्यांचं तर घोषवाक्य होत प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवऱ्यातील देवता आहे तिचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे हे फक्त घोषणा न्हवती तर त्याच आचरण पण तसेच होत इतिहासात तसा एक उल्लेख पण आढळतो कल्याणच्या सुबेदारांय्या सुनेला आई म्हणून दिलेला मान आपल्यासाठी आदर्श आहे छत्रपती शिवरायांनी वेळोवेळी घेतलेली महिलांच्या सुरक्षेची काळजी आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या ह्या आताच्या काळात शिकण्यासारख्याचं आहेत,महाराजांनी दूरदृष्टी इतकी जबरदस्त होती की त्यांना तेव्हाच कळतं होत की आपल्या स्वराज्याला भीती जमिनीवरून नाहीच तर ते समुद्रातुन आहे म्हणून राज्यांनी आपलं स्वतःचं सुंदर आरमार उभं केलं याचा फायदा झाला की आपल्या देशी मालाला जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाली तेव्हा ही गोष्ट अशक्य होती या एका युगपुरुषयांने शक्य करून दाखवली
म्हणून तर म्हणतात त्यांना भारतीय नौदलाचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या सामाजिक कार्याला उजाळा देण्याचा छोटेखानी प्रामाणिक प्रयत्न केला मी बाकी काहीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांनी एक आदर्श समाज निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न केला तरी पण काही कमी बुद्धीचे  लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का मी म्हणतोय नाही देवापेक्षा पण आपल्यासाठी अधिक होते कारण त्यांच्यामुळेच दिसत आहे प्रत्येक मंदिरावरचा कळस आणि आपल्या अंगणात तुळस आणि त्याच्यामुळेचं अजूनपर्यंत सुरक्षित आहे आपल्या गोठ्यातली गाय व घरातील माय,,

छत्रपती शिवाजी महाराजांना या महान कार्यासाठी त्रिवार मानाचा मुजरा घालतो🚩👏🏻 आणि सर्वाना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो🌺🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🌼🌼🌼

मी तुमच्या मधलाचं एक शिवविचारांचा पाईक
ओम संध्या मोहन शेळके

    @Omsmshelke
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

18 Feb, 07:37

1,538

🦁स्वराज्याचा छावा..🥺🧡🚩नक्की पूर्ण वाचा आपल्या मातीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी,छ.राजांसाठी🧡

आपल्याला वेळ असो की नसो थोडा वेळ काढून छावा हा चित्रपट पहावाच कारण अनेक चित्रपट येतील जातील परंतु आपली स्वराज्याप्रतीची अस्मिता जागवणारा चित्रपट म्हणजे छावा होय..बघ्याचाच हा चित्रपट आपल्या स्वाभिमांसाठी,आपल्या छ.शिवाजी संभाजी राजासाठी🧡आपल्या इतिहासाठी...
अहो आपल्या राज्याने आपल्यासाठी  स्वराज्यासाठी किती त्रास सहन केला,मग आपल्याला दोन तासांचं फक्त चित्रपट बघायला काय हरकत आहे?अहो साधा चाकू चुकून लागला तर आपल्याला किती दुखत,असे कितीतरी वार छातीवर आपल्या राजाने,मावळ्याने आपल्यासाठी सहन केले😢आणि वीरगती प्राप्त झाले.. त्यांच्या बलिदान साठी निदान हा चित्रपट पाहावा तोही संपूर्ण परिवारासोबत..जमत नसेल तर कॅसेट आणून घरच्या सर्वांनासोबत हा चित्रपट नक्की पहावा..मातीसाठी,स्वराज्यासाठी कस मातीत रक्त सांडाव,कसं मातीसाठी मरावं हे शिकवणारा चित्रपट म्हणजेच "छावा"🧡.. आणि फक्त चित्रपट पाहून,जयंत्या साजरी करून,घोषणा देऊन जास्त बदल होत नाहीत त्यासाठी महाराजांच्या विचारांचेही अवलंबन करायला हवे,गडकिल्ले जपायला हवेत..आपला इतिहास लहान मुलांना जे दाखवा,सांगा त्यातूनच संकटाना तोंड देण्याची प्रेरणा येते,अशी ही आपली स्वराज्याची पवित्र माती त्यात जन्मलो ह्याचा अभिमान बाळगा
#MUST WATCH छावा🧡
..........🦋🌺😇💞...........
लेखन-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

17 Feb, 15:21

1,427

ज्ञान हे असं एक माध्यम आहे की त्यापासून आपण काही पण साध्य करू शकत फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा आणि आपलं ध्येय प्राप्तकरण्यासाठी जरा अधिक जिद्द हवी मग आपली परिस्थिती कितीही बिकट असो मनस्थिती सकारात्मक असली की झालं मग ती अश्यक्य वाटणारी गोष्टपण शक्य होताना दिसू लागले फक्त स्वतःच्या ज्ञानावर विश्वास हवा!,,✍🏻

एकमत#लेखक
 @Ommshelke