👉 तिळाची पेरणी ही १५ फेब्रुवारी पर्यंत भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी पर्यंत आणि मुगाची पेरणी १५ फेब्रुवारी ते १५ मार्चच्या दरम्यान केलेल योग्य कालावधी आहे.
👉 तिळामध्ये AKT १०१, पी के व्ही एन टी ११ -९१, वेस्टर्न ११, दप्तरी गुजरात २२ असे वाण असून भुईमुगामध्ये टीएजी २४, टीजी ३७ टीजी ५१, वेस्टर्न ४४ व ५५, बॉम्बे सीड्स कस्तुरी १०८, बॉम्बे ५५, अमृत सीड्स सागर ७७ असे वाण आहेत आणि त्याच प्रमाणे मुगामध्ये वैभव, निर्मल ८२५, हळदी घाटी चेतन, ग्रीन गोल्ड ५० या पद्धतीचे असे वाण आहेत
👉 भुईमुगाचे एकरी ४० ते ५० किलो बियाणे तिळाचे एकरी दीड किलो आणि मुगाचे एकरी ६ ते ७ किलो बियाणे पेरणीसाठी वापराव. सर्वांना बीज प्रक्रिया उन्हाळी तीळ असतील मुंग असेल किंवा भुईमूग असेल त्याला एक किलो बियाण्याला रिहांश ५ मिली आणि ३ मिली जोरमेट लावून बीज प्रक्रिया करावी.
👉 पेरणी सोबत भुईमुगाला चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट + एक बॅग डीएपी + एक बॅग पोटॅश असं द्यावं. तिळाला मात्र १०:२६:२६ किंवा डीएपी + पोटॅश पेरणी सोबत देऊन पेरणीनंतर २० दिवसा दरम्यान युरिया द्यावा मुगाला २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ या हे खत आपण देऊ शकतो.
👉 तणनाशकांमध्ये भुईमूग व मुगावर शाकेद एकरी ६०० मिली किंवा परशूट एकरी सव्वा दोनशे मिली २० दिवसानंतर पेरणीनंतर जमिनीत चांगला ओलावा असताना आपण वापरू शकतो.