Últimas publicaciones de पुस्तक परिचय (@pustakparichay) en Telegram

Publicaciones de Telegram de पुस्तक परिचय

पुस्तक परिचय
पुस्तक परिचय - तुमची वाचनाची आवड वाढविण्यासाठी येथे चांगल्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्यात येतो.
4,666 Suscriptores
1,811 Fotos
43 Videos
Última Actualización 28.02.2025 22:30

El contenido más reciente compartido por पुस्तक परिचय en Telegram


BHUTACHA JANMA by D.M.MIRASDAR

एक अप्रतिम विनोदी लेखकाचा , खळखळून हसवणारा कथासंग्रह म्हणजे भुताचा जन्म."दिवसा ती काहीही करत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते.त्यांचे पाय उलटे असतात म्हणे" अशी भुतांच्या बाबतीत आपल्या मनाची समज आहे आणि नेमका त्याचा ठाव घेत द. मा.मिरासदार यांनी भुताचा जन्म हे पुस्तक लिहिलं आहे. विनोदी धाटणीतील मेहता प्रकाशनाचे े १२६ पानांचे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवत आहोत असे वाटते. भुताचा जन्म हा कथासंग्रह आपल्याला गावात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देतो.त्यांनी वापरलेली गावरान भाषा वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून एक वेगळं व्यक्तिचित्रण अभ्यासायला मिळतं. संवादातून काढलेले विनोदी चिमटे एकटेपणातही खो- खो हसायला लावतात. गंमत म्हणजे आपण इतके हसतो की समोरची व्यक्ती आपल्याला नक्कीच विचारते की " इतकं हसण्यासारखे काय आहे?" आणि आपण पूर्ण कथा सांगत सुटतो. हा लेखकाच्या लेखनशैलीचा विजय आहे. गावातील चालीरीती, परंपरा, पोशाख आणि भाकडकथा यांचे संमिश्र स्वरूप म्हणजे भुताचा जन्म. नाव जरी असे असले तरी प्रत्यक्ष भुताची एकच कथा आहे आणि बाकीच्या कथा ह्या त्या कथेतील ठराविक पात्राच्या वागणुकीला भूत म्हणून नोंदवतात असे मला वाटते. भुताचा जन्म कसा झाला यावरचा शोध, भवानीचा पक्षकार मधील मेहनती वकील नाना, भीमु बुरुडचा कोंबड्या विकण्याचा पराक्रम, नदीकाठी बाईच्या प्रेतावर झालेला काथ्याकूट, मारुतीचा कंटाळा,तात्याने विंचवाच्या मदतीने शिकलेली पंचाक्षरी,मैनाबाई स्वयंपाकीणीला नवऱ्याने हाल करूनही गेलेले दिवस, बाबू न्हाव्याचे " जावू दे कोर्टात" सांगून पैसे कमावणे, सोळा आण्याचे वतनदार चतुर अण्णासाहेब, बंड्याच्या तपकिरीचा शाळेतला उपद्व्याप आणि महाद्याने तालुक्यावर पाठवलेला निरोप अशा अकरा कथांचा हा संग्रह वाचताना वाचकाला खिळवून ठेवतो. एका खेपेतच पूर्ण संग्रह वाचला जातो. प्रत्येक कथेत शेवटच्या परिच्छेदात धक्का तंत्र वापरले आहे.त्यामुळे एखादी कथा सोडली तर बाकी कथांचा शेवट पटकन लक्षात येत नाही. अंदाज लावला तरीही तसा शेवट होत नाही यात लेखकाचा वाचनाचा दांडगा अनुभव जाणवतो. संवादात वापरलेल्या गावाकडील भाषेमुळे कथा आपलीशी वाटते. दिर्घकाळ धाटणीतल्या लघुकथांचा बाज राखुनही विनोदाची फोडणी जबरदस्त आहे. विनोदी संस्कृतीची जपणूक करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही नक्कीच असायला हवा.

या आठवड्यातील दुसरे पुस्तक आहे रत्नाकर मतकरी यांच मराठी नाटक " अश्वमेध " 🙏

BHUMIKANYA by ANAND YADAV

लेखकाने ‘भूमिकन्या’ हा कथासंग्रह वाचकांसमोर आणून गावात लपलेल्या वेदना सांगितल्या आहेत. किंबहुना ही त्यांनी शोषित स्त्रियांची त्यांच्या वतीने मांडलेली कैफियतही म्हणता येईल. कैफियत मांडताना सहसा तक्रारीचा सूर जास्त असतो; परंतु यादव यांनी या कथांमधून तक्रारी केलेल्या नाहीत. केवळ एक ग्रामीण सत्य परखडपणे मांडलं आहे. तेही ग्रामीण बोलीभाषेचा आधार घेत.वेदनांच्या शोधात... आजची स्त्री स्वतंत्र आहे. ती स्वावलंबी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन तिच्या कर्तृत्वाचं आभाळ ती कितीतरी मोठ्ठं करु शकते. ती पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर त्याच्याही पुढं चार पावलं गेली आहे. केवळ शहरातच नव्हे गावाकडेही अलीकडे हे ित्र दिसतं. ती आता फक्त गृहिणी राहिलेली नाही. कर्तृत्वशालिनी झालेली आहे. तिचं व्यक्तिमत्व उत्तुंग होत चाललं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर चमकणाऱ्या स्त्रियांना पाहिलं की आपली खात्रीच होते की, स्त्री आता सोशिकतेपासून खूप दूर गेली आहे. तिचा ‘सासुरवास’ संपलाच आहे. मात्र हा आपला केवळ भ्रम आहे हे आनंद यादव यांचं ‘भूमिकन्या’ वाचल्यावर कळून येतं. खरं तर यादव यांचा ‘भूमिकन्या’ हा इथल्या भूमीवर स्वत:चं आयुष्य खडतरपणे जगणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांच्या भावनांचा हृदयस्पर्शी आलेख मांडणारा कथासंग्रह आहे. त्यांनी उभ्या केलेल्या स्त्रिया, त्यांचं जगणं, त्यांचा प्रत्येक श्वास वाचताना वाचकाला अस्वस्थ करून जातो. दारिद्र्यात पिचलेली स्त्री, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जगू पाहणारी स्त्री, नवरा अकाली गेल्यावर कष्ट उपसणारी स्त्री, घराच्या बाहेर पतीच्या मनासारखं काही घडत नाही म्हणून घरात फुकटचा मार सहन करणारी स्त्री, मुलीचं लग्न नीट व्हावं म्हणून कष्ट करत राहणारी स्त्री, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणारी स्त्री आणि पोटाची भूक शमविण्यासाठी पती देईल ते खाणारी स्त्री अशा कित्येक स्त्रियांनी यादवांना प्रचंड अस्वस्थ केले आहे. त्यांच्या जगण्याचा इतिहास समाजापुढे यावा हाच ध्यास जणू त्यांनी घेतलेला दिसतो. या कथासंग्रहात आदिजन्मातली माणसं, टक्के उडालेला मोर, लेक लग्नाची, जल्माचं सोनं झालं, पोटुसंपण, वाकळ, बायकांचा जल्म, पांद, भूक, नरमेध या कथा स्त्रीच्या सोशिकतेची परिसीमा अधोरेखित करतात. केवळ सोशिकपणाच नाही तर वर्षातून एकदा एक तसाचा का होईना पण मिळणारा नात्याचा सहवास त्यांना किती सुखावून जातो याचाही प्रत्यय वाचताना येतो. म्हणूनच ‘आदिजन्मातली माणसं’ मधली शांता भाऊबीजेच्या तासाभरानं मोहोरुन गेलेली दिसते, परंतु कित्येक वर्ष त्याच चाकोरीतनं जाणाऱ्या तिचं ते सुखही मनाला बोचत राहतं. माळरानावरच्या शिळेनं कित्येक वर्ष जशाचं तसं राहावं तसं. ‘टक्के’ उडालेला मोर मधली मुमताज मात्र वेगळ्या कारणानं आपल्याशी संवाद साधते. एक अनामिक नातं जोडल्यावर ते जेव्हा अपघाती तुटतं तेव्हा तिचं मन टाहो फोडतं. फक्त ते कुणालाच कळत नाही. कळतं तिच्या मनाला कारण तिच्या डोळ्यातले अश्रू मनाला बजावून सांगतात - ‘कुणावर जास्त माया लावू नये.’ लेखक मुमताजचं मुकेपणच बोलकं करतो. दुसऱ्या एका ‘कळी फुलतानाचे दिवस’ मध्ये तर लेखक लग्नाची झालेल्या मुलीच्या मनाचा विचार न करता केवळ वयात लग्न झालं पाहिजे म्हणून कुणाही बरोबर (मुलीला न शोभणाऱ्या) लग्न लावून देतात अशा पालकांवर प्रहार करतात. त्यांच्याबद्दलचा रागही प्रकट करतात. ‘बायकांचा जल्म’ या कथेत आक्काच्या भावना चित्रित करताना लेखक आक्काच्या जीवनाची परवड जिवंत करतो. आनंद यादव यांच्या साऱ्या कथा ग्रामीण वातावरणातल्या तिथली परिस्थिती, तिथल्या व्यक्तिरेखा घेऊन लिहिल्या गेलेल्या. आज एकविसाव्या शतकात प्रवेश करताना ग्रामीण स्त्रियांची होणारी परवड विचार करायला लावणारीच नव्हे तर क्लेशकारक आहे. 

BHULBHULAIYA by V.P.KALE

भुलभुलैय्या हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचा फॅण्टसीजचा संग्रह. गेल्या वीस वर्षांत वपुंनी लिहिलेल्या फॅण्टसीज पैकी निवडक अशा फॅण्टसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्य:कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळे यांच्या चमत्कृतिपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत याची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही, याचे श्रेय या कथांना दिलेल्या फॅण्टसी`च्या अवगुंठनात आहे. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्र आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या साया व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकाची जीवनावरची श्रद्धा काळातनकळत दृढ होते. जीवनावर त्याचे प्रेम बसते, त्याला जगावेसे वाटते. लेखक कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते? भुलभुलैय्या मधील काही निवडक शाश्वत सत्य जी मला भावली ती खालीलप्रमाणे.....१) विजयी होण्यापेक्षा यशस्वी रीतीने झुजण्यालाही महत्व आहे. २)पराभव कबूल करायचा नसला की मनुष्य चिडतो. ३) सगळ्यांना सन्मार्ग दाखविणारा माणूस पण अंतर्यामी दुःखी असू शकतो, हे कुणाला समजत नाही. ४)विचार तरी स्वतःच्या मालकीचे असावेत. ५)दुःख, बंधने, नैराश्य, अपघात यामुळे माणसाचे पाय जमिनीवर राहतात, त्याचे माणूसपण त्यामुळे सिद्ध होते.अशी अनेक शाश्वत सत्ये वपु. नी भुलभुलैय्या ह्या त्यांच्या कथासंग्रहात सांगितली आहेत.

BHOKARWADITIL RASVANTIGRUHA by D.M.MIRASDAR

दुकानदारीची सदोबांची काय कल्पना होती, कोण जाणे! गिऱ्हाईक वाढवण्यासाठी नित्य काही नवे करावे लागते, निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात, दुकानाची आकर्षक सजावट करावी लागते, या गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. अर्थात हा त्यांचा दोष नव्हता. गावचे वातावरणच तसे होते. सगळेच दुकानदार एकाच छापातले गणपती होते. दुकान मांडून बसायचे, गिऱ्हाईक आले तर सौदा करायचा, नाही आले तर निवांत बसायचे. मुद्दाम कसलीही हालचाल करायची नाही, अशीच एकूण पद्धत होती. आधुनिक विक्रीकलेचा गंधही त्या काळात गावाला नव्हता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भरभराटीची आणि सुबत्तेची काही वर्षे संपली. गिऱ्हाईक कमीकमी होत गेले. फार हाल झाले त्याचे... शेवटी सदोबा नेवासकर अन्नान्न करीत मेला! द.मा.मिरासदार यांच्या तुफान विनोदी कथा.

आजचं पुस्तक आहे प्रसिद्ध विनोदी लेखक रमेश मंत्री यांचं " सुखाचे दिवस " 🙏

BHOKARWADICHYA GOSHTI by D.M.MIRASDAR

"विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’सारखी ‘भोकरवाडी हाय’ कंपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी... गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट... साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान... खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणा-या बापूची झालेली त-हा... चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणा-या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं... बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणा-या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.... भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणा-या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात!"

मित्राची जामिनकी अंगावर येऊन प्रेसचा व्यवहार संकटाचा ठरला. गांधी हत्येनंतरच्या कोल्हापुरातल्या दंगलीत सायकलीचं दुकानही लुटलं गेलं. आशाची आई पन्हाळ्याची. तिचे वडील तलाठी. घरात आबादी. सोनं-नाणं भरपूर. सर्व्हिस मोटारीच्या धंद्यातल्या भागीदारीसाठी अम्माचे सगळे दागिने सादोबा मुलावरच्या चुलत भावाकडं दिले जातात आणि शिकारीच्या दौऱ्यावर आईच्या वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू होतो. नातलग हुसकावून लावतात आणि पहिल्यांदाच ती घरकामासाठी म्हणून घराबाहेर पडते. पुढली तीस वर्षे वडलांच्या श्रीमंतीचा विषय निघाला की, ‘क्या जलाने की उनकी शिरमंती, बडेजावी? बडा घर, पैसा, दागिना हामना क्या मिला?’ अशी ती उपेक्षा करीत राहिली. नवऱ्यावरचा राग मुलीवर काढीत राहिली. आशाचे वडील भई मेहता कंपनीत नोकरीला लागले असले तरी पैसा पुरायचा नाही. भई कविमनाचे तर आई ‘की गे कुत्ते’ असं म्हणून बोलणारी, ‘आगे ए छिनाल इधर आ’ असा ओरडा तर दिवसातून हजारवेळा होई. कोणाकडून आणा घेतला म्हणून तापलेलं उलथनं तळहातावर चर्रकन ओढण्याचीही तिनं तमा बाळगली नव्हती. आठव्या वर्षीच सकाळी लवकर उठून असंख्य कामं मागं लागलेली. थोडा कंटाळा केला की, ‘क्या गे चिपलककी मूँ की’ अशी शेरेबाजी. कामानं थकायला व्हायचं. कधी ताप यायचा, गालगुंडही होत असे, पण आईनं हात लावून कधी विचारपूसही केली नाही. एकदा तर चुलीच्या कोपऱ्यातले जळणाचं लाकूड तिने दोनही पायांवर इतक्या जोरात मारलं की, ती कुत्र्यासारखी केकाटत घराबाहेर पळाली. कधी घरात मटणरस्सा असला तरी भईच्या ताटात मात्र डाळ-आमटीच. अचानक भई आजारी पडून मरण पावतात आणि त्याबाबत आशा म्हणते, ‘आईकडून होणारी उपेक्षा, छळ ते बघत, सोसत आले होते. ते मुकाट राहत. भर्इंनी प्रेम निर्माण केलं, तर आईनं निर्माण केली दहशत. भीती.’ पंधरा दिवसांनी आशा शाळेत निघाली तर आईनं दप्तर ओढलं आणि फेकून देताना ती म्हणाली, ‘चुल्हे में चाल तेरी साळा.’ भर्इंची इच्छा होती. आशानं बॅरिस्टर व्हावं, पण आता शज्ञळा सुटली, शाळेत निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचा चषक मिळाला तर आईने तो रस्त्यावर फेकून दिला. चेपलेला तो चषक नंतर पेटते कोळसे घालून धूप म्हणून वापरला. आईनं आशाचं लग्न लावून दिलं तो दिवस अमावस्येचा. लग्नानंतर नवऱ्याबरोबर ही सिनेमा पाहायला गेली तर आल्यावर नवऱ्यासकट तिची कबख्तीच निघाली. पाच बहिणींना स्वातंत्र्य होतं, नव्हतं फक्त आशालाच. कारण तिच्यादृष्टीनं आशा म्हणजे अपशकुनी. पहिले गरोदरपण, कावीळ, अशक्तपणा आणि दिवसभर कानांवर पडणारे ‘ए टांगे के टप के मूँह की’ असले शब्द. बाळंतपणात तर बघालाही कोणीच नाही आणि अशी चार बाळंतपणं. दवाखान्यात कोणी न्यायचं नाही वा बाळंतपणानंतर कोणी भेटायला गेलेलं आईलाही आवडायचं नाही. एकटीनं खुरडत खुरडत घरी यायचं, चारही बाळंतपणाच्या काळातल्या ज्या आपत्तीचं वर्णन आशा आपराद यांनी पुस्तकात केलं आहेत ते पुढं पुढं वाचवत नाही. कधी विजेचा शॉक बसतो. कधी नाहक चोरीचा आळ घेतला जाऊनही नवरा तिची चौकशीही करीत नाही. बहिणींच्या लग्नात भांडी घासायची पाळी आशावर आली. थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आशा ठरविते तेव्हा माने केलेला घरातला दंगा अभूतपूर्वच; पण सारा जाच आणि त्रास सोसून आशा शिक्षणाला उभी राहते हा तिच्या आयुष्यातला पहिला निर्धार असतो आणि हेच वेगळे वळण ठरते. या पुस्तकात हादरवून सोडणारे अनेक प्रसंग आहेत. करुणा वाटते तसे प्रेमाचे उमाळेही येतात. आत्मकथेत असंख्य व्यक्तिरेखा आहेत. त्या इतक्या ठसठशीत आहेत की, त्यांच्या वर्तनातूनही आशाचं व्यक्तिमत्व काही अंशी उलगडत जातं. यातली हिंदी भाषाही वेगळीच आहे. याआधी मराठी मुस्लिमांची आत्मकथनं मराठीत आली असली तरी हे आत्मकथन त्यातल्या अनुभवानं वेगळं ठरतं.

BHOGALE JE DUKHA TYALA... by ASHA APARAD

मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या आशा अपराद यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला’ या आत्मचरित्राला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी पुरस्कार, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार असे सात पुरस्कार मिळाले आहेत. मूर्तिमंत जिद्द उभी!... कुरूप, अपशकुनी, पांढऱ्या पायांची, पालीच्या तोंडाची, दळभद्री, रडकी, तुटक्या चपलेच्या तोंडाची. टांग्याच्या टपासारखी मरतुकडी, बिसरी, बेअकली अशी काही विशेषणे घेऊन मुस्लीम समाजातल्या एका मुलीनं आपलं आयुष्य गळ्यातल्या ओढण्यासारखं अेक वर्षे वाहून नेलं. तिच्या ठेचकाळलेल्या जीवनाच्या पूर्वार्धात ना आनंदाचे क्षण आले. ना शरीर वा मनाला विश्रांती लाभली. शिक्षणाला बंदी. त्यातच मन वा शरीराची कोणतीही तयारी नसताना लग्न करून दिलेलं आणि वयाच्या वीस वर्षांच्या आतच पदरात चार मुली. या मुलीनं उभारी तरी धरायची कोणाच्या आधारानं. कारण त्या मुलीवर हा अन्याय कोणी शत्रू, शेजारी, सावत्र आई वा परके नातेवाईक करीत नव्हते, तर खुद्द तिच्या सख्ख्या आईनंच तिचं आयुष्याच आपल्याकडं ‘गहाण’ ठेवलं होतं. तिच्या ‘व्यक्तिमत्त्वा’चा जणू ‘बोन्साय’च करून टाकला होता. त्या मुलीनं वडिलांकडे मदतीसाठी बघावं तर आईनं त्यांचाही पालापाचोळा केलेला. सतत कानांवर पडणाऱ्या तू कुरूप, अपशकुनी आणि पांढऱ्या पायांची अशा शब्दांनी ती घायाळ होत होती. असले टोमणे आई अन्य मुलींना न मारता आपला व वडिलांचाच पाणउतारा का करते या प्रश्नाचा भुंगा पुढे आयुष्यभर काही सोडवता आला नाही. पण एक टप्पा असा येतो की, गुलामीची तिला जाणीव होते, ती शिकते, नोकरी करते. अपमानाचे असंख्य प्रसंग येतात. पण सर्व जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडते... तिच्या मुलींनाही शिक्षाणात गोडी असते आणि तिची सारी स्वप्ने त्या पूर्ण करतात... ज्या आईनं तिचं आयुष्य नकोसं मानलं. त्या आईला तिनं स्वत:च्या घरातून ‘हद्दपार’ केलं असलं तरी देखभाल करण्यात ती कुचराई करीत नाही. तीच आई नंतर लोकांना सांगू लागली, ‘मेरी बडी बेटी पोपेसर हाय. उन्हेच सब मेरा देखतिया.’ खरंच कोण होती ही मुलगी? स्वत्त्वाची जाणीव होताच आपली ‘स्पेस’ तयार करणारी ही मुलगी होती तरी कोण? आशा आपराद हीच ती मुलगी. आता आयुष्याचं अर्धशतक पार केलेल्या आशानं जीवनाचे अनेक रंग अनुभवलेत. त्या अनुभवानं कधी ती थरारली. उद्ध्वस्त झाली संघर्षमय कालखंडाचा हा पट तिनं गहिरेपणानं मांडलाय. संवेदनशील वडील आणि असंवेदनशील आईच्या पोटी जन्मलेली ही आशा वडिलांची आवडती; पण आईची तितकीच नावडती. आशा म्हणते, ‘आईला वस्तू गहाण ठेवून गरज भागविण्याची सवय. तिनं कधी भांडी, दागिने, वडिलांचा लग्नातला जरीचा पटका, कधी मंगळसूत्रही गहाण ठेवलं. तिनं गहाण ठेवलेल्या वस्तू मी सोडवत आले. मला आईपाशी ‘गहाण’ ठेवलेलं आयुष्यही सोडवून घ्यावं लागलं. वडील असेतो आशा शिकत गेली आणि ती नववीत असताना तिचे प्राणप्रिय ‘भई’ मरण पावले. त्याच क्षणी आई पाटी-दप्तर फेकून देऊन तिचं शिक्षणच संपूवन संसाराला जुंपते. ऐन लग्नात सासरच्या मंडळींशी भांडते आणि आशा नवऱ्यासह आईकडेच राहायला लागते. वस्ताद आई त्यांचंही पोतेरं करते. आशाची सारी स्वप्ने आईच्या काळजाच्या दगडावर चक्काचूर होत जातात. धर्म, रूढी, परंपरा दहशत आणि दरारा अशा अनेक दगडांच्या तुरुंगात ती चिणून जाते; पण सभोवतालची चार चांगली माणसं मदतीला धावतात आणि आशाची जडणघडण होते... तिची प्रेरणा घेऊन तिच्या चारही मुली स्वत:च्या पायांवर उभ्या राहतात. नवरेही समजूतदार मिळतात आणि आयुष्याच्या उताराच्या वळणावर तीच आशा त्याच अबोल आणि समजून घेतलेल्या नवऱ्याच्या साथीनं स्वत:च्या गाडी-बंगल्यासह राहते आहे... अलौकिक नात्यानं भोवतालच्या समाजानं जे प्रेम आणि साथ दिली त्या स्नेहसंबंधाचं प्रतीकही पुस्तकातून उमटत राहतं... ही लोकं तरी कोण होती? तिचे शिक्षक, गल्लीतले लोक, कॉलेजातले गुरुवर्य, आधारवड बनलेल्या प्राचार्या लीला पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील, रवींद्र सबनीस, अनेक संस्था, महिला दक्षता समिती आणि असंख्य मायेची माणसं. ती ज्या हिंदू गल्लीत जन्मली आणि वाढली तेथल्या संस्काराने ती कवेळ मुस्लीम न राहता भारतीय मुस्लीम बनली. जाती आणि धर्मभेदाच्या पलीकडच्या समाजाच्या प्रेमातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत गेली... पण त्यासाठी जन्म ते नंतरची पंचवीस वर्षे अक्षरश: नकारात्मक शब्दांचे आसूड आणि अभद्र लेबलं सोसावी लागली. त्या लेबलातून वाट काढण्यासाठी जी धडपड झाली त्या धडपडीची कहाणी म्हणजे ‘भोगले जे दु:ख त्याला... हे पुस्तक. १४ एप्रिल १९५२ रोजी मुस्लीम कुटुंबात कोल्हापुरात आशाचा जन्म झाला. वडील इस्माईल देसाई त्याकाळच्या इंग्रजी विषयातले एम. ए. व इतर भाषांचे जाणकार. इंग्रजांकडे ते दुभाषा आणि खजिनदार म्हणून काम पाहत. स्वातंत्र्यानंतर इंग्रज परतले आणि इकडे नोकरी-जमीन सारेच गेले.

BHINTINNA JIBHAHI ASTAT by DR.BAL PHONDKE

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस अमृतराव मोहिते यांना गुन्ह्यांच्या तपासामध्ये डॉ. कौशिक यांनी केलेली मदत, या सूत्रातून साकारलेल्या कथा... ‘वाचेवीण संवादु?’ या कथेमध्ये बलात्काराच्या धक्क्याने ‘कोमा’सदृश स्थितीत गेलेली महिला... तिच्याशी ‘फंकक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ तंत्राद्वारे शब्दांविना संवाद साधून डॉ. कौशिक गुन्हेगाराला समोर आणतात... धाकट्या भावाने मोठ्या भावाचा गोळी घालून खून करून आत्महत्येचा रचलेला बनाव; पण ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’चा आधार घेऊन डॉ. कौशिक यांनी केलेला पर्दाफाश म्हणजे ‘हातचलाखी’ ही कथा... चीफ ऑफ आर्मी स्टाफने पंतप्रधानांना पाठवलेले गोपनीय पत्र लीक होते, त्याचा आणि त्या पत्राचे डिक्टेशन घेणाऱ्या महिला सेक्रेटरीने नेसलेल्या ऑप्टीकल फायबरयुक्त धाग्याचा संबंध डॉ. कौशिक सिद्ध करतात, याची हकिकत येते ‘ए फॅब्रिकेटेड स्टोरी’ या कथेत...विविध गुन्ह्यांचा विज्ञानाच्या आधारे केलेला पर्दाफाश... विज्ञानाधारित रहस्यकथांचा उत्कंठावर्धक संग्रह.