1927 मध्ये सॉडर्स चा खून .. 1929 असेम्ब्ली हॉल मध्ये बॉम्ब स्फोट
त्यांनतर पोलिसांच्या हाती लागल्यास आपला मृत्यु अटळ आहे याची पूर्ण जाणीव असताना तिथून पळून न जाता पोलिसांना स्वतः हून स्वाधीन होणे हा म्हणजे शुद्ध वेडेपणाच असे कुणीही म्हणेल.
पण... स्वतः चा जीव धोक्यात घालून हा वेडेपणा करायला कारणही तितकेच उच्च दर्जाचे होते..
23 वर्षाचा पण प्रचंड बुद्धिमान असणाऱ्या भगतसिंगला स्वतः च्या बलिदानातून जगाला सांगायचे होते..
दहशतवाद आणि क्रांतीच्या तत्वज्ञानातील फरक अहिंसा आणि आवश्यक हिंसा म्हणजे काय लेनिन मार्क्सचा आणि त्याला अभिप्रेत असलेला समाजवाद
देशाला फक्त पारतंत्र्यातूनच मुक्त करणे नव्हे तर त्याला सांगायचा होता भांडवलदारांच्या पिळवणुकीतून शेतकरी कामगाराना मुक्त करण्याचा मार्ग
स्वतः च्या बलीदानातून त्याला पेटवायच्या होत्या क्रांतीच्या मशाली आणि जाळून खाक करायची होती इंग्रजांची राजवट..
716 तुरुंगातील दिवसात 300 च्या वर पुस्तके वाचून क्रांतीचे तत्वज्ञान अजून प्रभावी पणे कोर्टाच्या माध्यमातून मांडून त्याला फोडायचे होते तरुणाच्या डोक्यात वैचारिक बॉम्ब
भारतीय कैद्याच्या न्याय हक्कासाठी जेल मध्ये 116 दिवसाचे रेकॉर्ड ब्रेक उपोषण करून त्याला दाखवून द्यायची होती क्रांतीकारकांकडे असलेली संयमी वृत्ती आणि वैचारिक अधिष्ठान
इंकलाब जिंदाबाद.. क्रांती चिराई हो... म्हणत म्हणत मृत्यूचे चुंबन घेणाऱ्या भगतचे हे होते बलिदानाचे उच्च कारण..
P.S. हा स्पेशल लेख ती/तो नाही म्हनला,आई वडिलांनी कुठली वस्तू दिली नाही,नौकरी लागत नाही अश्या छुटपुट कारणासाठी आत्महत्या करायला जानाऱ्यांसाठी आहे..
𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥
29 Oct, 15:22
7,248
दिवाळी मुळे आपला अभ्यासाचा वेळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही...तरीही आपण त्यासाठी specific वेळ द्या.. अमर्याद वेळ नको जायला याची काळजी घ्या..
𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥
25 Oct, 04:02
10,092
*दीड दिवसाची शाळा शिकलेला साहित्यिक..*
शिक्षणातून माणूस मोठा होतो, तुकाराम(अण्णाभाऊ साठे) चांगला शिकला तर घरातील दारिद्र्य संपेल असे त्यांच्या वडिलांना कायम वाटायचे..म्हणून त्यांनी तुकारामाला शिकविण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत घातले..
दरिद्र्याशी झुंज देत हिंदू समाज व्यवस्थेतील सर्वात खालची जात मानल्या जात असलेल्या मांग समाजातून असल्याने त्यांनाही बाबासाहेबांप्रमाणे प्रमाणे शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असे..याचा तुकारामाला फार राग येत असे..
त्यामुळे एकेदिवशी या प्रथेविरुद्ध आपण बंड करावा म्हणून वर्ग सुरू झाला तेव्हा थेट तुकाराम वर्गात शिरला आणि स्पृश्य मुलांच्या रांगेत जाऊन बसला.. हे बघून गुरुजींचा राग अनावर झाला आणि स्वतः जवळ असलेला रुळ थेट तुकारामावर भिरकावला. मात्र तुकारामाने तो रुळ वरच्या वर पकडुन नेम धरून परत गुरुजींच्या अंगावर भिरकावला. जो गुरुजींच्या कपाळावर जाऊन आपटला.. याची आपल्याला मोठी शिक्षा होणार हे जाणून तो शाळेबाहेर पळाला व पुन्हा शाळेत पाय ठेवायचे नाही असा निश्चय त्याने केला.
मात्र तुकारामाने शिकण्याची इच्छा काही मरू दिली नाही.. पोट भरण्यासाठी मोल मजुरी करणे, डोअर कीपर, बूटपॉलिश करणे , सिनेमाचे पोस्टर चीटकविने अशी अनेक कामे त्यांना करावी लागली..
अश्यातच पोस्टर चिटकवितांना त्यांना जाणवले की आपण जर शिकलो असतो तर आपल्याला सिनेमाचे नावे वाचता आली असती. त्यामुळे त्यांनी अक्षर ओळख करून घ्यायला सुरवात केली.. त्यातच वरळी मध्ये कपडे विकत असताना ज्ञानु नावाच्या गृहस्थाशी ओळख झाली त्यांनी त्याला वाचायला लिहायला शिकविले..
पोस्टर चीटकवितांना त्याचे काही मित्र झाले त्यातून राजकारण, सिनेमा,कामगार चळवळ,धर्म अश्या अनेक विषयावर चर्चा होऊ लागली. त्यातून त्यांना आपले ज्ञान वाढविण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळे त्यांनी वाचन अजून वाढविले.. लेखनाचा सराव सुरू केला.. यातूनच एका मोठ्या सहित्यासूर्याचा जन्म झाला..
अण्णाभाऊ केवळ 50 वर्ष जगले.. त्यातील साहित्यिक कारकीर्द जवळ जवळ 20 वर्ष..त्यातही संयुक्त महाराष्ट्र चळवळ ,गोवा मुक्ती संग्राम, कामगार चळवळ,स्वातंत्र्य चळवळीत सहभाग त्यांनी घेतला.. एवढ्या कमी कालावधीत केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या या माणसाने भांडवलशाही विरुद्ध ,अन्यायाविरुद्ध ,गुलामिविरुद्ध, कामगारांचा व्यथा मांडणारे
चौदा लोकनाट्य, बारा पोवाडे अनेक लावण्या, अडीचशेचा वर कथा पस्तीस कादंबऱ्या लिहल्या..
ज्याचे रशिया जर्मनी बंगाली सिंधी मल्याळी इत्यादी भाषेत भाषांतरही झाले.. आणि अनेक चित्रपटही तयार करण्यात आले..
तात्पर्य - बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे Life should be great rather than long.. म्हणजेच आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे..