गेल्या अनेक वर्षांपासून सातारा जिल्हा हा शरद पवारांचा असलेला बालेकिल्ला 'महायुती'ने भुईसपाट केला असून जिल्ह्यातील 8ही मतदारसंघांत महाविकास आघाडीला व्हाईट वॉश मिळाला आहे.
जिल्ह्यातील सातारा, माण, कराड उत्तर, कराड दक्षिण या 4 मतदारसंघांत भाजपचे 'कमळ' फुलले असून शिवसेना शिंदे गटाने पाटण व कोरेगाव या मतदारसंघांवर पुन्हा कब्जा मिळवला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वाई व फलटणमध्ये बाजी मारली.
या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण या ‘मविआ’च्या आमदारांचा दारूण पराभव झाला आहे. सातार्यातून आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजार 124 एवढे विक्रमी मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
--- आजपासून विभागवार विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करूया. पोस्ट छोट्या छोट्या असतील. हि माहिती मी वेगवेगळ्या सोर्सेस कडून घेतली आहे... हि माहिती देण्यासाठी मला काही मित्रांनी मदत केली आहे. आपल्या टेलीग्राम चॅनल वरील काही मित्रांनी मला निकाला आधी त्या त्या विभागून माहिती दिली होती ती माहिती मी इथे देईन. मराठवाड्यातल्या माझ्या मित्रांनी सुद्धा मला वेळोवेळी माहिती दिली आहे ती माहिती मी इथे देत जाईन.
VK ✍️