Dernières publications de Sanatan Sanstha Marathi (@ssmarathi) sur Telegram

Publications du canal Sanatan Sanstha Marathi

Sanatan Sanstha Marathi
Official Marathi Telegram Channel of Sanatan Sanstha, an NGO engaged in the spread of scientific spirituality.
5,272 abonnés
1,174 photos
58 vidéos
Dernière mise à jour 11.03.2025 07:44

Canaux similaires

VKleaks
1,648 abonnés
moneyxsumaarth
1,359 abonnés

Le dernier contenu partagé par Sanatan Sanstha Marathi sur Telegram

Sanatan Sanstha Marathi

11 Jan, 12:47

2,375

🕉️ महाकुंभपर्वाचे महात्म्य सांगणारा विशेष भक्तीसत्संग Sanatan.org वर उपलब्ध !

१३ जानेवारी २०२५ पासून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला आरंभ होत आहे. यानिमित्त या कुंभपर्वाचा अधिकाधिक आध्यात्मिक स्तरावर लाभ कसा घ्यायचा ? याविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यमय वाणीतून जाणून घेऊया.

या सत्संगातून जाणून घेऊया :

१. कुंभमेळ्याचे आणि प्रयागराजचे महात्म्य !
२. कुंभमेळ्याच्या उत्पत्तीची कथा !
३. कुंभमेळ्यातील ‘कुंभ’ या शब्दाचा भावार्थ आणि त्यासंबंधी संत नामदेवांची कथा !

हा भक्तीसत्संग ऐकण्यासाठी भेट द्या : Sanatan.org/mr/audio-gallery

🎙️ हा भक्ती सत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !
Sanatan Sanstha Marathi

10 Jan, 15:40

2,489

🕉️ आपणास कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व माहित आहे का ?

कुंभपर्वाचा संबंध खगोल आणि भूगोल यांच्याशी आहे. कुंभमेळ्याच्या वेळी असणार्‍या ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे जी वैज्ञानिक ऊर्जा निर्माण होते, ती कुंभमेळ्याच्या ठिकाणी जलप्रवाहात प्रवाहित होते. अशा नदीच्या प्रवाहात स्नान केल्याने त्या जलस्पर्शाने ती ईश्‍वरीय ऊर्जा आपल्या शरिरातून वाहू लागते. कुंभमेळ्यात भारतातील विविध पिठांचे शंकराचार्य, १३ आखाड्यांचे साधू, महामंडलेश्‍वर, शैव आणि वैष्णव सांप्रदायिक, अनेक विद्वान, संन्यासी, संतमहात्मे एकत्र येतात. त्यामुळे कुंभमेळ्याचे स्वरूप अखिल भारतवर्षातील संतांच्या संमेलनासारखे भव्यदिव्य असते. कुंभमेळ्यामुळे भाविकांना संतसत्संगाची सर्वांत मोठी संधी उपलब्ध होते.

महाकुंभपर्वा संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/kumbh-mela

कुंभपर्व तसेच गंगामहात्म्य जाणून घेण्यासाठी आजच ग्रंथ खरेदी करा : http://bit.ly/3DJh3D5
Sanatan Sanstha Marathi

06 Jan, 14:39

2,415

कुंभमेळा १२ वर्षांनीच का येतो ? 🚩

कोणत्या ठिकाणचा कुंभमेळा कधी आयोजित करावा, याला ग्रहगणिताचा आधार आहे. समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृतकुंभप्राप्तीसाठी देव-दानवांच्या लढाईत चंद्र, रवि आणि गुरु यांनी देवांना विशेष साहाय्य केल्याने त्यांच्या विशिष्ट स्थितीवर कुंभपर्वाची कालनिश्चिती होते. त्यात ‘गुरु’ या ग्रहाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो.

महाकुंभपर्वा संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/kumbh-mela

कुंभपर्व तसेच गंगामहात्म्य जाणून घेण्यासाठी आजच ग्रंथ खरेदी करा : http://bit.ly/3DJh3D5
Sanatan Sanstha Marathi

03 Jan, 15:26

2,692

‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ काय ?

‘कुंभ म्हणजे मातीचा घडा (मडके) ! माणसाच्या शरिराला ‘पार्थिव’ (पृथ्वीतत्त्वप्रधान) म्हणतात. शरीर मातीपासून निर्माण झाले आहे आणि मृत्यूनंतर मातीतच विलीन होत असते; म्हणून कुंभाला, अर्थात् घड्याला मानवी देहाचे प्रतीक मानले आहे. पवित्रता आणि मांगल्य यांचे प्रतीक असलेल्या कलशाच्या मुखात भगवान श्रीविष्णु, कंठामध्ये रुद्र (महादेव), मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी मातृकागण, तसेच कुक्षीमध्ये सात समुद्र आणि सात द्वीप यांनी युक्त अशी पृथ्वी सामावलेली आहे. त्याचप्रमाणे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेद त्यांच्या अंगांसह कलशात वास करतात.

महाकुंभपर्वा संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/11707.html

कुंभपर्व तसेच गंगामहात्म्य जाणून घेण्यासाठी आजच ग्रंथ खरेदी करा : http://bit.ly/3DJh3D5
Sanatan Sanstha Marathi

02 Jan, 14:07

2,389

🌸 रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिल्यानंतरचा कु. स्मिहा पाटोळे, मुंबई हीचा अनुभव !

अवश्य पहा हा व्हिडिओ !
Sanatan Sanstha Marathi

02 Jan, 08:51

2,155

🙏🏻🚩 गोवा सरकार देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध !
🎤 मा. डॉ. प्रमोद सावंत,
मुख्यमंत्री, गोवा

📱 अवश्य पहा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/j41-TTv8EuQ

*या व्हिडीओच्या माध्यमातून ऐका :*
1. देव, देश आणि धर्म याबाबत मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडलेले विचार !
2. प.पू स्वामी गाेविंददेव गिरि महाराज आणि सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव !

*सनातन संस्था : आनंदी जीवनाचा मार्ग !*
🌐Sanatan.org
Sanatan Sanstha Marathi

29 Dec, 14:00

2,443

🙏🏻🌸 हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली आहे ! - प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या

🙏🌸 प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे ब्राह्म आणि क्षात्र तेजयुक्त मार्गदर्शन अवश्य ऐका या व्हिडिओच्या माध्यमातून ! 👇

🔗 https://youtu.be/0KWVEJ0_LSc

सनातन संस्था : आनंदी जीवनाचा मार्ग !
🌐Sanatan.org
Sanatan Sanstha Marathi

23 Dec, 15:26

2,629

ही आहे कुंभपर्वाच्या उत्पत्तीची कथा !🕉️

१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ याकाळात प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त..

कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नव्हे, तर संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन आहे. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्‍या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. कुंभमेळ्याचे आध्यात्मिक माहात्म्य आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो. गुरु कन्या राशीत असतांना ‘कन्यागत’, सिंह राशीत असतांना ‘सिंहस्थ’ आणि कुंभ राशीत असतांना ‘कुंभमेळा’ अशा तीन मोठ्या पर्वणी हिंदु धर्मदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात.

अशा कुंभपर्वाच्या उत्पत्ती कथेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/11707.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

22 Dec, 13:36

2,886

🪷 आधुनिक वैज्ञानिक युगात प्रार्थनेचे महत्त्व काय ? 🙏🏻

साधारण ३० वर्षांपूर्वी परमेश्‍वराचे अस्तित्व नाही, असे म्हणण्यासाठी धाडस लागत होते; परंतु आताच्या तंत्रयुगात परमेश्‍वराचे अस्तित्व आहे, असे म्हणण्यासाठी धाडस करावे लागते. वेगवेगळ्या वैज्ञानिक निकषांवर घासून, सिद्धान्त निर्माण करून, परमेश्‍वरी शक्ती आहे, हे पटवून द्यावे लागते. निवळ दृढ श्रद्धेने प्रार्थना करून मृत्यूच्या दारातून परत आलेले रुग्ण आणि त्यांच्या कथा ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. वैद्यकीय प्रोफेसर डॉ. डेल मॅथ्यू म्हणतात, परमेश्‍वरच रोग ठीक करतो, असे आम्ही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवू शकत नाही; पण परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा त्याचा रोग ठीक होण्यासाठी निश्‍चितच उपयोगी पडते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/9159.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
Sanatan Sanstha Marathi

21 Dec, 15:26

1,894

भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधनांच्या दाखल्यानुसार ‘गोवा ही परशुरामभूमी’ कशी ? 🌊

शिलालेखातील पुरावे, तसेच भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधनांचे दाखलेही सांगतात ‘गोवा ही परशुरामभूमीच !’

प्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ (गोव्याचा सांस्कृतिक इतिहास : ख्रिस्तपूर्व १०००० ते ख्रिस्तपूर्व १३५२) या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द लँड ऑफ गोवा’ या पहिल्या प्रकरणात ‘गोवा ही परशुरामभूमी कशी आहे’, हे सिद्ध केले आहे. तसेच शिलालेखातील पुरावे, अनेक संशोधकांचे भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधन यांचे दाखले दिले आहेत. या ग्रंथातील शेवटच्या ३ पृष्ठांत लिहिलेला सारांश येथे दिला आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/86173.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi