स्त्री ही तिच्यातील सद्गुणांनीच भारतीय संस्कृतीचे रक्षण करू शकते. अहल्या, द्रौपदी, तारा, मंदोदरी, सीता, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियांनी नम्रतेसह कर्तव्यनिष्ठेची भावना जोपासून भारतीय संस्कृतीचे जतन केले आहे. जिजामाता, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या वीरांगनाही मातृभूमीसाठी लढल्या. आजच्या काळातील स्त्रियांनी पूर्वीच्या या महान स्त्रियांचे अनुकरण करायला हवे. तसे केल्यासच त्यांच्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. स्त्रीने खर्या अर्थाने स्वतःतील आत्मशक्ती जागृत करणे आणि देशोद्धारासाठी सिद्ध होणे, हीच काळाची आवश्यकता आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/women-and-society
Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi