Sanatan Sanstha Marathi @ssmarathi Channel on Telegram

Sanatan Sanstha Marathi

@ssmarathi


Official Marathi Telegram Channel of Sanatan Sanstha, an NGO engaged in the spread of scientific spirituality.

Sanatan Sanstha Marathi (Marathi)

सनातन संस्था मराठी नावाचं अधिकृत टेलीग्राम चॅनल आहे, ज्ञानविज्ञानाच्या विस्तारात घुसळलेल्या एनजीओ सनातन संस्थेच्या. हे चॅनल समग्र भारतातील लोकांना आत्मिक विकासात सुचारू असण्यासाठी सक्रियतेत आहे. सनातन संस्थेची स्थापना १९९० साली झालेली होती आणि त्याने त्यांच्या सूत्रांनुसार उत्तम सुधारणा कार्यात आणल्या आहेत. या संस्थेच्या उद्देशानुसार, ह्या चॅनलवर विभिन्न विषयांवर मराठीत साप्ताहिक माहिती आणि विचारांचा साझा केला जातो. सनातन संस्थेच्या मराठी टेलीग्राम चॅनलवर तुम्हाला वैज्ञानिक स्पिरिचुअलिटीच्या प्रसारात मदतीची आणि मार्गदर्शन केले जाते. तुमच्याला आपल्या आत्मिक अभिवृद्धीसाठी अद्भुत साहाय्य मिळेल आणि विचारातील अंधकार सुलझायला मदत करेल.

Sanatan Sanstha Marathi

20 Nov, 16:11


आयुर्वेदाची अनमोल देणगी, अनेक रोगांवर उपलब्ध अनेक औषधी ! 🌿

भगवंताने वेदांची निर्मिती सर्वप्रथम केली. नंतर सृष्टीची निर्मिती केली. त्याच भगवंताने मानवाची निर्मिती केली. काळानुसार वेदांचे ज्ञानही ऋषिमुनींच्या माध्यमातून मानवाला दिले. वेदांचाच एक भाग आयुर्वेद आहे. भारतातील बहुतांश वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म आहेत. काही वनस्पतींमध्ये इतकी सात्त्विकता आहे की, त्यांना देवत्वच प्राप्त झाले आहे. तुळशीसारख्या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म अधिक आहेत. वनस्पतींची मुळे, खोड, साली, फांद्यांच्या काटक्या, पाने, फुले, फळे आणि बिया असे प्रत्येक अंगच मानवासाठी उपयुक्त ठरले आहे ! अनेक रोगांवर उपयुक्त असणार्‍या काही वनस्पती किंवा फळे यांचे उपयोग येथे पाहूया.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/80790.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

20 Nov, 11:58


।। सस्नेह निमंत्रण ।।

🪷 प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांच्या निमित्त

🕉️ प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्मान सोहळा !

🗓️ शनिवार, 30 नोव्हेंबर 2024, सायंकाळी 5 वाजता

स्थळ : सुकुर पंचायत हॉल, पर्वरी, बार्देश, गोवा.

▫️ शुभहस्ते :
मा. डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

▫️ प्रमुख उपस्थिती :
मा. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री
मा. श्री. रोहन खंवटे, पर्यटनमंत्री, गोवा.

▫️ वंदनीय उपस्थिती :
श्री‍सत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था.

या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहा !

🌸 सनातन संस्था : आनंदी जीवनाचा मार्ग !
📞 9370958132
Sanatan.org

Sanatan Sanstha Marathi

18 Nov, 16:33


हिंदु धर्माचा सर्वांत मोठा शोध ‘शिखा’ (शेंडी) ! आपणांस माहित आहेत का त्याचे लाभ ?

शेंडी ठेवल्याने नेत्रदृष्टी सुरक्षित रहाते. तसेच शेंडीच्या नियमांचे यथोचित पालन केल्याने सद्बुद्धी आणि सद्विचार यांची प्राप्ती होते. मनुष्य धार्मिक, सात्त्विक आणि संयमी बनून त्याची आत्मशक्ती प्रबळ बनून रहाते आणि त्याला लौकिक आणि पारलौकिक कार्यात यश मिळते. शेंडी ठेवल्याने सुषुम्ना नाडीचे रक्षण होत असल्याने मनुष्य निरोगी, बलवान, तेजस्वी आणि दीर्घायु होतो. शेंडी ठेवणे हिंदूंचा धर्मच नव्हे, तर सुषुम्नेच्या केंद्रांच्या रक्षणासाठी ऋषी-मुनींच्या शोधाचा विलक्षण चमत्कार आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/36001.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

14 Nov, 11:59


🪔 त्रिपुरारि पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा-१५.११.२०२४) 🪔

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शिवाने स्वत:च्या प्रचंड सामर्थ्याने त्रिपुरासुराचा नाश केला. शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्या दैत्याचा वध करून देवांचे गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांस आनंदीआनंद झाला आणि त्यांनी शंकराची स्तुती करून दीपोत्सव केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेस हा उत्सव साजरा केला जातो.’ या विजयाची स्मृती भारतियांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे. या दिवशी सर्व शिवालयांतून दीपोत्सव करण्यात येत असतो. हा देवांचा उत्सव असून असुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्‍याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला सभोवती दिवे लावण्याची व्यवस्था करून तिथे दिवे लावले जातात. या खांबांना त्रिपुरी म्हणतात.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/758.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

13 Nov, 14:27


🪷 वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व (१४.११.२०२४) 🪷

वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. वैकुंठचतुर्दशीच्या दिवशी जो थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्‍चित असते. जगत्पालक भगवान विष्णु वैकुंठात वास करतो. वैकुंठलोक म्हणजे आनंद आणि शांती प्रदान करणारा लोक आहे. भगवान विष्णूचे धाम असलेले वैकुंठ अत्यंत दिव्य आहे. वैकुंठधाम चेतन आणि स्वयंप्रकाशी आहे. पृथ्वीतलावर साधना करतांना आपल्याला अत्यंत आनंदमय स्थिती अनुभवायला मिळते. तो आनंद म्हणजे वैकुंठातील परमानंदाचा अंशही नसेल. भगवंताचा हा लोक स्वतः भगवंतापासून निघणार्‍या ब्रह्मज्योतीने प्रकाशित होतो. अशी ही दिव्य ब्रह्मज्योत असते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/76067.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

13 Nov, 09:26


🪷 वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने श्रीविष्णुभक्तीचे माहात्म्य सांगणारा विशेष भक्तीसत्संग Sanatan.org वर उपलब्ध ! 🪷

वैकुंठचतुर्दशीचे माहात्म्य, म्हणजे या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार उघडे असते. जो जीव या दिवशी भक्तीपूर्वक श्रीविष्णूचे पूजन आणि नामस्मरण करतो, त्या जिवाला श्रीविष्णूच्या दिव्य वैकुंठधामात सुनिश्चितपणे स्थान प्राप्त होते; म्हणूनच या सत्संगातून श्रीविष्णूच्या भक्तीचे माहात्म्य जाणून घेऊन महाविष्णूचे परम भक्त देवर्षि नारद आणि स्वयं महाविष्णु यांच्यातील दिव्य संवाद अन् त्याद्वारे श्रीविष्णूने उलगडलेले विष्णुभक्ताचे माहात्म्य श्रवण करूया !

हा भक्तीसत्संग ऐकण्यासाठी भेट द्या : Sanatan.org/mr/audio-gallery

हा भक्ती सत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

12 Nov, 13:55


卐 तुळशी विवाह 卐 (१३ ते १५ नोव्हेंबर २०२४) 🌿

जाणून घेऊया, तुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत तसेच या सणाची वैशिष्ट्ये !

श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो. या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी-विवाह असे म्हणतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी-विवाह साजरा केला जातो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळावा, यासाठी तुळशी-विवाह हा मुहूर्त कालातच करावा.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/806.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

11 Nov, 15:44


कार्तिकी एकादशी (पंढरपूर यात्रा) (१२.११.२०२४)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आणि निरनिराळ्या ठिकाणांहून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते ! त्यांना ही प्रेरणा त्यांच्या पांडुरंगावर असलेल्या श्रद्धेमुळेच मिळत असते. समाजाच्या सर्व स्तरांतून बायाबापड्या, मुले, तरुण, वृद्ध आपल्या दुर्दम्य इच्छेने या भक्तीप्रवाहात सामील होतात. यात भाविकता आहे. जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे. वारकऱ्यांना पुढील वर्षभर पुरेल, इतका आनंद देण्याचे सामर्थ्य या वारीत आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल आणि एकादशीचे महात्म्य जाणून घेण्यावाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/ekadashi

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

10 Nov, 09:46


कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्रीविष्णूमाहात्म्य अनुभवायला देणारा विशेष भक्तीसत्संग Sanatan.org वर उपलब्ध ! 🌷

कार्तिकी एकादशीला ‘हरि प्रबोधिनी एकादशी’ अथवा ‘देवोत्थानी एकादशी’, असेही म्हटले जाते. या एकादशीला भगवान विष्णुसह सर्व देवतांची आराधना करतात. चातुर्मासातील चार मासांच्या योगनिद्रेनंतर कार्तिकी एकादशीपासून कार्यरत होणार्‍या भगवान श्रीविष्णूच्या तत्त्वाची अनुभूती देणारा भक्तीसत्संग श्रवण करूया !

सत्संगातील विषय

🪷 कार्तिकी एकादशीचे माहात्म्य !
🪷 कथा : थोर संत नरहरी सोनार यांनी अनुभवलेले हरि आणि हर यांचे अद्वैत !

हा भक्तीसत्संग ऐकण्यासाठी भेट द्या : Sanatan.org/mr/audio-gallery

हा भक्ती सत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

08 Nov, 09:48


श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवाचे महत्त्व ! (९, १० आणि ११ नोव्हेंबर २०२४)🌞

प्रतिवर्षी कार्तिक मासात साधारणपणे ९, १० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस, तसेच माघ मासात ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असे तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो. पहिल्या दिवशी सूर्यदेवाचे किरण देवीच्या चरणांना स्पर्श करतात. दुसर्‍या दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मध्यभागावर येतात आणि तिसर्‍या दिवशी ते देवीच्या मुखमंडलासह संपूर्ण मूर्तीला प्रकाशात न्हाऊन काढतात. किरणोत्सवाच्या प्रसंगी देवीची सालंकृत पूजा केलेली असते. सूर्यकिरणांनी मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी सर्व विद्युत दीप मालवून गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. काही मिनिटांनंतर सूर्यकिरण गेल्यावर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/568.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

02 Nov, 15:20


🌸 भाऊबीज (३.११.२०२४) 🌸

भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील जिव्हाळा वृद्धिंगत करणारा सण !

या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. या दिवशी स्त्री जिवात असलेले देवीतत्त्व जागृत होते आणि त्याचा भावाला लाभ होतो. जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/801.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

30 Oct, 15:34


जाणून घेऊया नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा इतिहास ! 🪔

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

श्री लक्ष्मीकुबेर यांच्या संपूर्ण पूजाविधीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/785.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

28 Oct, 15:52


धनत्रयोदशीचे आध्यात्मिक महत्त्व काय ? (29.10.2024)

दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी, अशी प्रार्थनाही करतात. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/802.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

27 Oct, 17:12


🪔 दिवाळी म्हणजे स्वतःमध्ये अध्यात्माची ज्योत प्रज्वलित करण्याची पर्वणी ! 🪔

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दिवाळी उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते. दिवाळीला दारात आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिल लावल्यामुळे घराची शुद्धी होते. लहान मुले धर्माभिमान जागृत व्हावा म्हणून किल्ले बांधतात. दिवाळीच्या आधी आपण घराची स्वच्छता करतो, तोरणे लावतो, रांगोळ्या काढतो आणि पणत्या लावतो. या दिवाळीत आपण स्वतःमध्ये अध्यात्माची ज्योत प्रज्वलित करून अंतर्मनात भगवंताप्रतीचे कृतज्ञतेचे दीप लावूया.

दिवाळी सबंधित शास्त्रिय माहती जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/diwali

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

27 Oct, 15:59


दीपावलीच्या अंतर्गत येणार्‍या प्रत्येक दिवसाचा आध्यात्मिक भावार्थ शिकवणारा विशेष भक्तीसत्संग Sanatan.org वर उपलब्ध ! 🪔

दीपावलीच्या अंतर्गत येणार्‍या प्रत्येक दिवसाचा आध्यात्मिक भावार्थ जाणून घेऊया आणि दीपावलीला बाह्य दिव्यांच्या दीपोत्सवासह आंतरिक गुणदीपांनीही आपले मनमंदिर उजळून आध्यात्मिक दीपोत्सव साजरा करूया ! तसेच अलक्ष्मी हरणार्‍या देवी महालक्ष्मीच्या आरतीचा भावार्थ जाणून घेऊन दीपोत्सवाच्या चैतन्याने मनमंदिराचा गाभारा उजळून पंचप्राणांच्या ज्योतीने देवी आईला ओवाळूया !

हा भक्तीसत्संग ऐकण्यासाठी भेट द्या : Sanatan.org/mr/audio-gallery

हा भक्ती सत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

26 Oct, 15:17


📚 सनातन ई-बुक विश्व 📚

🪔 दिवाळी का आणि कशी साजरी करावी ?

जाणून घेण्यासाठी वाचा...
📖 सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र : https://amzn.in/d/bKUXsgi

🕉️ सणांमागील शास्त्र समजून घेऊन सण योग्य पद्धतीने साजरे करा आणि आनंद मिळवा !

🪷 प्रत्येक सण आणि उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र आणि महत्त्व सांगणारे ई-बुक आजच डाऊनलोड करा !

Available On Amazon Kindle

Sanatan Sanstha Marathi

21 Oct, 17:05


बिंदूदाबन पद्धतीत पाऊल, तळहात आणि त्यामागील भाग तसेच कान यांना विशेष महत्त्व का असते ?

मानवाच्या शरिरातील अवयवांशी संबंधित बिंदू दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांवर असतात. या बिंदूंवर उपाय केल्याने शरिरातील संबंधित चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे मार्ग नियमित होऊन अवयवांच्या ठिकाणी किंवा त्यांच्याशी संबंधित बिंदूंच्या ठिकाणी साठलेल्या त्रासदायक शक्तीचे विघटन होऊन ती नष्ट होण्यास, तसेच देहाभोवती निर्माण झालेल्या त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते. या कारणाने बिंदूदाबन उपायपद्धतीत दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांना पुष्कळ महत्त्व आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/10768.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

19 Oct, 14:34


शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार पध्दती लाभदायक कशी ?

सुश्रुत संहितेत उल्लेखलेली बिंदूदाबन उपायपद्धत भारतात ५,००० वर्षांपूर्वीपासून आहे. मानवी देहातील विशिष्ट सात ठिकाणी या चैतन्यशक्तीचा संचय होतो. त्यामुळे ही स्थाने म्हणजे शक्तीकेंद्रेच आहेत. या शक्तीकेंद्रांना योगभाषेत ‘कुंडलिनीचक्रे’ असे म्हटले जाते. खरे तर चक्रे, मन आणि बुद्धी एकमेकांवर अवलंबून आहेत. कुंडलिनीतील चक्रांत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मानवातील गुण-दोषांचे प्रमाण पालटते. बिंदूदाबन पद्धतीने मानवी देहातील चैतन्यशक्तीचे कार्य सुरळीत चालू रहाण्यात येणारे अडथळे दूर करता येतात; म्हणजेच कुंडलिनीशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्याची ही एक पद्धत आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/10439.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

18 Oct, 16:01


आपणांस माहित आहे का ? श्रीविष्णुसहस्रनाम सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचले ?

‘‘जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर श्रीविष्णुसहस्रनाम म्हणत होते, तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पहातच राहिले. सर्वांत पहिले युधिष्ठिर भानावर येऊन यावर संमिश्र अभिप्राय देत म्हणाले, ‘‘पितामह यांनी वासुदेवाची उत्कृष्ट अशी रमणीय १ सहस्र नावे पठण केली, आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो; पण कुणी ती टिपून घेतली नाहीत, आता त्याचा क्रमही आपण गमावला.’’ तेव्हा वासुदेव उद्गारले, ‘‘आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूतस्फटिक धारण केले आहे. जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केले, तर तो स्फटिकाला ध्वनीलहरींमध्ये रुपांतरित करू शकेल आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील.’’

आपण आज संगणकामध्ये ‘हार्ड डिस्क’ आणि भ्रमणभाषमध्ये ‘मेमरी कार्ड’ वापरतो, त्यामध्ये स्फटिकाचाच वापर होत आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/89306.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

16 Oct, 13:36


🌕 कोजागरी पौर्णिमेचे महत्त्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत (१६.१०.२०२४) 🌕

आश्‍विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे ?’, असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ असे म्हणतात. आणि जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.
‘या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) भोजन करतात. रात्री श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/906.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi

Sanatan Sanstha Marathi

15 Oct, 10:35


प्रत्येक मनुष्याला ज्ञानामृत देण्यासाठी...येत आहे...

🪷 ज्ञानशक्ती प्रसार अभियान 🪷
आनंदी जीवनासाठी सनातनची ग्रंथसंपदा !

(१५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर)

👉 हा Dp तुम्ही तुमच्या 'प्रोफाईल'ला ठेवा तसेच इतरांनाही पाठवा !

▫️ सनातन संस्था : आनंदी जीवनाचा मार्ग !
Sanatan.org

Sanatan Sanstha Marathi

11 Oct, 17:28


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा विजयादशमीचा विशेष भक्तीसत्संग ! 🏹

सत्संगातील विषय :
१. महिषासुराचा वध करणार्‍या महिषासुरमर्दिनीची कथा !
२. विजयादशमीला श्रीरामाने केलेल्या रावणवधाचा प्रसंग !
३. नवरात्र आणि सीमोल्लंघन यांचा भावार्थ !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

11 Oct, 17:28


विजयादशमी निमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश !

🐚 हिंदूंनो, शत्रू सीमा ओलांडत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा ! 🐚

आतंकवादी शक्ती देहलीपासून गल्लीपर्यंत दंगलींच्या माध्यमातून एकप्रकारे सीमा ओलांडून हिंदूंचा पराभव करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदूंनो, शत्रू सीमा ओलांडत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा !

हिंदूंनो, विजयादशमी का साजरी करायची असते ? किंवा अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन का केले जाते ? याचा धर्मबोध घ्या. खरे सीमोल्लंघन म्हणजे ‘विजयासाठी शत्रूची सीमा उल्लंघून युद्ध पुकारणे’, अपराजितादेवीचे पूजन म्हणजे ‘विजयासाठी देवीकडे शक्ती मागणे’ आणि थोरामोठ्यांना आपट्याची पाने देणे म्हणजे ‘विजयश्री प्राप्त करण्यासाठी थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणे’ होय.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/90208.html

Sanatan Sanstha Marathi

10 Oct, 17:08


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा नववा विशेष भक्तीसत्संग -‘सिद्धीदात्री’देवीचे माहात्म्य !

सत्संगातील विषय :
🪷 नवदुर्गेचे नववे रूप ‘सिद्धीदात्री’देवी हिचे माहात्म्य !
🪷 मुकांबिकादेवीचे माहात्म्य !
🪷 ‘गोंधळा’द्वारे देवीआईची आराधना !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

09 Oct, 15:09


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा आठवा विशेष भक्तीसत्संग -‘महागौरी’देवीचे माहात्म्य !

सत्संगातील विषय :
🪷 नवदुर्गेचे आठवे रूप ‘महागौरी’देवी हिचे माहात्म्य !
🪷 महासरस्वतीदेवी - सरस्वतीच्या कृपेने बुद्धी प्राप्त झालेल्या उतथ्याची कथा !
🪷 जोगव्याद्वारे देवीआईची आराधना !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

08 Oct, 13:07


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा सातवा विशेष भक्तीसत्संग -‘कालरात्री’देवीचे माहात्म्य !

सत्संगातील विषय :
१. नवदुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’देवी हिचे माहात्म्य !
२. भगवान श्रीविष्णूला मधु आणि कैटभ या दैत्यांशी युद्ध करण्यासाठी आदिशक्तीने केलेले साहाय्य !
३. आद्य शंकराचार्य रचित ‘राजराजेश्वरी स्तोत्रा’चा भावार्थ !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

07 Oct, 16:05


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा सहावा विशेष भक्तीसत्संग -‘कात्यायनी’देवीचे माहात्म्य !

सत्संगातील विषय :
🔅 नवदुर्गेचे सहावे रूप ‘कात्यायनी’देवी हिचे माहात्म्य !
🔅 देवीचे मानवजातीप्रती असलेले प्रीतीरूप : शाकंभरीदेवी, शताक्षीदेवी आणि अन्नपूर्णादेवी!
🔅 आद्य शंकराचार्य रचित ‘अन्नपूर्णा स्तोत्रा’चा भावार्थ !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

06 Oct, 13:12


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा पाचवा विशेष भक्तीसत्संग -‘स्कंदमाता’देवीचे माहात्म्य !

सत्संगातील विषय :
१. नवदुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’देवी हिचे माहात्म्य !
२. ललिता त्रिपुरसुंदरी देवीचे माहात्म्य !
३. आद्य शंकराचार्य रचित ‘कनकधारा स्तोत्रा’मागील कथा !
४. अष्टलक्ष्मींचा महिमा आणि अष्टलक्ष्मी स्तोत्राचा भावार्थ !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

05 Oct, 15:59


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा चौथा विशेष भक्तीसत्संग -‘कूष्मांडा’देवीचे माहात्म्य !

सत्संगातील विषय :
🔅 नवदुर्गेचे चौथे रूप ‘कूष्मांडा’देवी हिचे माहात्म्य !
🔅 श्रीविष्णूने केलेला ‘अंबा यज्ञ’ !
🔅 इंद्राने ‘महालक्ष्मी अष्टका’द्वारे केलेल्या लक्ष्मीस्तुतीचा भावार्थ !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

04 Oct, 15:26


🌷 नवरात्रीनिमित्त आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा तिसरा विशेष भक्तीसत्संग -‘चंद्रघण्टा’देवीचे माहात्म्य ! 🌙

सत्संगातील विषय :
🔅 नवदुर्गेचे तिसरे रूप ‘चंद्रघण्टा’देवी हिचे माहात्म्य !
🔅 रामकृष्ण परमहंस यांनी केलेली कालीमातेची भक्ती !
🔅 आदिशक्तीच्या चरणकमलांच्या नखामध्ये त्रिदेवांना घडलेले ब्रह्मांडाचे दर्शन !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !

Sanatan Sanstha Marathi

03 Oct, 16:44


आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारा नवरात्रीनिमित्तचा दुसरा विशेष भक्तीसत्संग - ‘ब्रह्मचारिणी’देवीचे माहात्म्य ! 🌸

सत्संगातील विषय :
१. नवदुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’देवी हिचे माहात्म्य !
२. श्रीरामाने केलेले नवरात्रीचे व्रत
३. आद्य शंकराचार्यांनी केलेली देवीची उपासना आणि त्यांनी रचलेल्या
४. आद्य शंकराचार्य रचित भवानी अष्टकाचा भावार्थ !

नवरात्रीच्या काळात प्रतिदिन पुढील मार्गिकेवर भक्तीसत्संग अपलोड करण्यात येतील : Sanatan.org/mr/audio-gallery

हे भक्तीसत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !