Последние посты शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण (@shivswarodaya_manifestation) в Telegram

Посты канала शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण
1,123 подписчиков
42 фото
1 видео
Последнее обновление 13.03.2025 02:42

Похожие каналы

Последний контент, опубликованный в शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण на Telegram

शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

02 Jan, 08:44

581

Free Akashic records workshop

https://meet.google.com/dqp-hoac-sfo

1 January 2025 to 10 January 2025

Time - 10.30PM IST
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

19 Sep, 10:43

1,691

दिनांक १९-०९-२०२४
तिथी - भाद्रपद कृष्ण द्वितीया
🌹🌷
धनप्राप्ति: स्वरबले स्वरतोराजदर्शनम् ||
स्वरेण देवता सिद्धी: स्वरेण क्षितिपोवश:२३
🌹🌷
अर्थ -स्वरबलाने धनाची प्राप्ती होते, तसेच स्वरज्ञानामुळे राजाचे दर्शन होते, स्वरज्ञानाने देवतांची कृपा प्राप्त होते, तसेच स्वरज्ञानाने राजा देखील वश होतो.
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

19 Sep, 10:43

1,616

दिनांक - १२-०९-२०२४
तिथी - भाद्रपद शुक्ल नवमी

🌹🌷
शत्रुम् हन्यात् स्वरबले तथा मित्रसमागमः ॥
लक्ष्मीप्राप्तिः स्वरबलेकीर्तिः स्वरबलेसुखं ॥ २२ ॥
🌹🌷
अर्थ - शिवस्वरोदय शास्त्र अभ्यासल्याने शत्रूनाश, मित्रप्राप्ती,लक्ष्मी प्राप्ती(धन प्राप्ती) विविध सुख तसेच कीर्ती प्राप्त होते.

*स्पष्टीकरण* - *इथे आपल्याला शत्रूनाश या शब्दाचा अर्थ शरीरातील षडरिपूंचा नाश ह्या अर्थाने घ्यायचा आहे.*
*वास्तविक जी व्यक्ती या शास्त्राचा अभ्यास करते त्या व्यक्तीला सर्वांप्रती मित्रत्वाची भावना बाळगावी लागते कोणाशीही वैरभाव पत्करणे एखाद्या स्वर ज्ञानी मनुष्याला शोभत नाही.वैरभाव बाळगल्यास,असूया बाळगल्यास,एखाद्याची त्याच्या अपरोक्ष निंदा नालस्ती केल्यास,त्याच्यावर टीका केल्यास *ती ह्या शास्त्राची अवहेलना ठरेल.*
*म्हणूनच इथे शत्रूनाश म्हणजे षडरिपूंचा नाश असा अर्थ घ्यावा.*
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

19 Sep, 10:43

1,496

दिनांक - ११-०९-२०२४
तिथी - भाद्रपद शुक्ल अष्टमी

🌹🌷
स्वरज्ञानात् परम् गुह्यम् स्वरज्ञानात् परम् धनम् ।।
स्वरज्ञानात् परम् ज्ञानम् न वा दृष्टम् न वा श्रुतम् ॥ २१ ॥
🌹🌷
अर्थ - स्वरज्ञानासारखे गुप्त ज्ञान नाही. स्वरज्ञान हे धनासमान आहे.
स्वरज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान कोणी पाहिले किंवा ऐकले आहे का?
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

19 Sep, 10:42

1,238

दिनांक - १०-०९-२०२४
तिथी - भाद्रपद शुक्ल सप्तमी
🌹🌷
ब्रह्मांड खंड पिंडाद्या: स्वरेणैव हि निर्मिता:॥
सृष्टि संहारकर्ता च स्वरः साक्षान्महेश्वरः ॥ २० ॥
🌹🌷
अर्थ - ब्रह्मांड आणि पिंड स्वरापासूनच निर्माण झाले. सृष्टीचा अंत करणारे भगवान शंकर देखील स्वर रूपच आहेत.
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

19 Sep, 10:42

1,283

दिनांक - ०९-०९-२०२४
तिथी - भाद्रपद शुक्ल षष्ठी
🌹🌷
साकारे वा निराकारे शुभंवायुबले कृते ॥
कथयंति शुभं केचित् स्वरज्ञानं वरानने ॥ १९ ॥
🌹🌷
अर्थ - व्यवहारीक आणि पारमार्थिक दोन्ही कार्यांत यशप्राप्तीसाठी शुभवायूचे बळ आवश्यक असते.
विचार केल्यास पारमार्थिक कार्यसिद्धीसाठी शुभ वायुबलाची काय आवश्यकता? असा प्रश्न पडतो.
कारण खरे परमार्थ हे निर्गुण निराकार असते.जे नाडी आणि तत्वांच्या पलीकडे आहे.परंतु त्या क्षेत्रात प्रवेश करायचा झाल्यास आपण सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून आकाश तत्वाच्या साहाय्याने करू शकतो.

तळटीप - ह्या श्लोकाचे जितके विवेचन करायला जाऊ तितके वाढतच जाईल म्हणून इथे आवरते घेतो.
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

19 Sep, 10:42

1,011

दिनांक - ०६-०९-२०२४
तिथी - भाद्रपद शुक्ल तृतीया
🌹🌷
नाडीभेदम् तथा प्राणम् तत्वभेदम् तथैव च ॥
सुषुम्ना मिश्रभेदम् च यो जानाति स मुक्तिगः ॥ १८ ॥
🌹🌷
अर्थ - नाड्यांमधील भेद,तत्वांमधील भेद, सुषुम्ना नाडीमधील सूक्ष्म हालचाल जो जाणतो त्याला मुक्ती प्राप्त होते.
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

05 Sep, 13:36

1,370

दिनांक - ०५-०९-२०२४
तिथी - भाद्रपद शुक्ल द्वितीया
🌹🌷
स्वरहीनश्च दैवज्ञो नाथहीनम् यथा गृहम् ॥
शास्त्रहीनम् यथावक्त्रम् शिरोहीनम् चयद्वपु: ॥ १७ ॥
🌹🌷
अर्थ - कर्त्या वाचून जसे घर संस्कारा वाचून जसे शास्त्र डोक्याशिवाय जसे धड तसेच स्वरज्ञानाशिवाय ज्योतिषी.
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

03 Sep, 05:17

1,282

दिनांक - ०३-०९-२०२४
तिथी - श्रावण अमावास्या
🌹🌷
शृणु त्वं कथितम् देवि देहस्थम् ज्ञानमुत्तमम् ।l
येन विज्ञान मात्रेण सर्वज्ञत्वम् प्रणीयते ॥ १५ ॥
🌹🌷
अर्थ - हे देवी आपल्या शरीरात असलेल्या स्वरांशी संबंधित हे स्वरज्ञान प्राप्त केल्याने व्यक्ती सर्वज्ञ होते.
शिव स्वरोदय, मुद्रा शास्त्र, सूक्ष्म देह प्रक्षेपण

02 Sep, 06:42

1,163

दिनांक - ०२-०९-२०२४
तिथी - श्रावण अमावास्या
🌹🌷
दृष्टेच दुर्जने क्रुद्धे नास्तिके गुरुतल्पगे ॥
हीनसत्वे दुराचारे स्वरज्ञानम् नदीयते ॥ १४ ॥
🌹🌷
अर्थ - दुष्ट, दुर्जन, क्रोधी, अविश्वासी, तसेच गुरुचा विश्वासघात करणारा, दुराचारी, हिन प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीस हे ज्ञान देऊ नये.