YCMOU MJCollege @mjclg Channel on Telegram

YCMOU MJCollege

@mjclg


BA BCOM Admission, Examination, Study center Enquiry....

YCMOU MJCollege (English)

Welcome to YCMOU MJCollege, a Telegram channel dedicated to all students and alumni of Mahatma Jyotiba Phule Mahavidyalaya (MJ College) affiliated with the Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU). This channel serves as a platform for current students to stay updated on important announcements, events, and academic schedules, as well as for alumni to reconnect and share their experiences. Whether you are a current student looking for study materials, exam notifications, or career guidance, or an alumnus wanting to stay connected with your peers and alma mater, YCMOU MJCollege is the place for you. Join our channel today to be a part of this vibrant community of learners and achievers! We look forward to welcoming you and providing you with valuable information and support throughout your academic journey at MJ College.

YCMOU MJCollege

08 Jan, 13:02


मूळजी जेठा महाविद्यालय अभ्यास केंद्रात बी.ए.,बी.कॉम.,एम.एस्सी केमिस्ट्री, लायब्ररी सायन्स,एम.ए. योगा, एम.ए. लोकप्रशासन, एम.बी.ए. या अभ्यासक्रमांतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे की उद्या दिनांक 9, जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयाच्या ज्ञानरंजन ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन व सामूहिक वाचन या उपक्रमांचे आयोजन होणार आहे. सकाळी ठीक १०:०० वाजता अभ्यास केंद्रात उपरोक्त अभ्यासक्रमास प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यास उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

YCMOU MJCollege

03 Jan, 16:36


दिनांक 4 जानेवारी शनिवार रोजी व 5 जानेवारी रविवार रोजी अभ्यासकेंद्र बंद असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

YCMOU MJCollege

02 Jan, 09:51


एम बी ए प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी


जे विद्यार्थी काही कारणास्तव शैक्षणिक वर्ष जून 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान एमबीए साठी प्रवेश घेऊ इच्छित होते परंतु काही कारणास्तव त्यांना प्रवेश घेता आले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक 06 जानेवारीपासून ते दिनांक 15 जानेवारी दरम्यान एमबीए प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचे असतील त्यांनी एम जे कॉलेज अभ्यासकेंद्रावर श्री प्रवीण बारी सर यांच्याशी यांच्याशी संपर्क साधावा.

YCMOU MJCollege

27 Dec, 04:27


सर्व विद्यार्थ्यांना आज निवेदन आहे की आज दिनांक 27 डिसेंबर शनिवार रोजी अभ्यास केंद्र बंद राहील कोणीही अभ्यास केंद्रामध्ये येऊ नये
केंद्र सहाय्यक
जळगाव

YCMOU MJCollege

23 Dec, 10:47


सदर परीक्षा ही रिपीटर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे .

नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मे 2025 ला होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

YCMOU MJCollege

23 Dec, 10:46


ऑक्टोंबर महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रिपीटर म्हणजेच नापास असलेल्या विषयांचे परीक्षा अर्ज भरलेले होते अशा विद्यार्थ्यांची परीक्षा सात जानेवारीपासून सुरू होत आहे त्याची हॉल तिकीट लिंक व प्रोसेस खालील प्रमाणे आहे.
Hall tickets download process

https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070

Enter PRN No

Exam Event- December 2024 select

Enter Captcha Code

Click Search

YCMOU MJCollege

20 Dec, 14:54


विद्यापीठाकडून आज प्राप्त झालेल्या पत्रानुसार प्रथम वर्ष बीए व बीकॉम चे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गृहपाठ अपलोड करायचे आहे

द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बीए /बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्रावरून पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे गृहपाठ उत्तर पुस्तिका विकत घेऊन जाणे व त्यावर लिहून दिलेल्या वेळेमध्ये जमा करणे अपेक्षित आहे.

प्रश्नपत्रिका लवकरच ग्रुपला टाकण्यात येईल सर्वांनी याची नोंद घ्यावी

YCMOU MJCollege

20 Dec, 14:53


Document from Pravin Bari,Assit, YCMOU

YCMOU MJCollege

20 Dec, 08:53


कोणीही अजून गृहपाठ लिहू नका अजून 2024 25 चे गृहपाठ विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेले नाही आहेत.
चुकीची माहिती ग्रुपला टाकू नका अन्यथा विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल

YCMOU MJCollege

20 Dec, 06:36


सर्व विद्यार्थ्यांना याबाबत या यथावकाश सूचना देण्यात येईल कोणीही घाई करू नये अथवा वारंवार विचारणा करू नये सर्व काही ग्रुपला टाकण्यात येइल

YCMOU MJCollege

19 Dec, 08:54


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे गृहपाठ संदर्भात सूचना पत्र आलेले आहेत सदर सूचना पत्रकानुसार तुम्हाला कायम नोंदणी क्रमांकाच्या आधारे लॉगिन करून त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्याचबरोबर उत्तर पुस्तिका उपलब्ध होतील ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्रावर उत्तर पुस्तिका घेतलेल्या नाही अशांनी लॉगिन करून त्या उत्तर पुस्तिका डाऊनलोड करणे व त्यावर ते लिहून पुन्हा पीडीएफ स्वरूपात लॉगिन करून अपलोड करणे आहे.

त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्रावरून गृहपाठाच्या उत्तर पुस्तिका घेतलेल्या असतील त्यांनी त्यावरच लिखाण करून त्याची विषयनुसार पीडीएफ बनवावी व लॉगिनला ती अपलोड करावी याबाबतचे विद्यापीठाकडून जशा सूचना उपलब्ध देतील तशा आपणा सर्वांना देण्यात येतील प्रश्नपत्रिका तसेच गृहपाठा संदर्भाची जी वेळ आपल्याला दिली होती ती वाढवण्यात येणार आहे कृपया विद्यार्थ्यांनी वारंवार फोन करू नये तसेच याबाबतचे यथावकाश सर्वांना कळविण्यात येईल धन्यवाद.

YCMOU MJCollege

09 Dec, 07:49


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 9 डिसेंबर रोजी अभ्यास केंद्र बंद राहील कृपया कोणीही आज येऊ नये उद्या दिलेल्या वेळेत यावे 12 ते 2

YCMOU MJCollege

07 Dec, 05:03


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 7 डिसेंबर शनिवार रोजी अभ्यास केंद्र बंद राहील कोणीही अभ्यास केंद्रावर आज येऊ नये


दिनांक आठ डिसेंबर रविवार रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये अभ्यास केंद्रात यावे

YCMOU MJCollege

05 Dec, 06:41


विद्यार्थी मित्रहो,

आपल्या कार्यालयाच्या वेळेमध्ये किंचित बदल झालेला असून ज्यांना पुस्तके अथवा गृहपाठ घ्यायला यायचे असतील त्यांनी १२ ते ३ या वेळेमध्ये अभ्यास केंद्रावर यावे.

YCMOU MJCollege

01 Dec, 02:46


सदर टाईम टेबल मुक्त विद्यापीठांमध्ये आधी प्रवेशित असलेल्या व एक दोन विषय नापास असलेल्या रिपीटर / पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी आहे.


फ्रेश व नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मे जून 2025 मध्ये होईल.

YCMOU MJCollege

30 Nov, 07:28


सर्व विद्यार्थ्यांना विनंती वजा सूचना.

अभ्यास केंद्रावर येण्याची वेळ 3 ते 5  नमूद केलेली आहे तरी बरेच विद्यार्थी अज्ञानी व्यक्तीसारखे वारंवार फोन करून विचारतात.

त्याचबरोबर गृहपाठ उत्तर पुस्तिका घ्यायला येताना सुटे पैसे उदाहरणार्थ 60 रुपये व 70 रुपये सुट्टे घेऊन यावे phone pay किंवा ऑनलाईन स्वीकारले जाणार नाही.

YCMOU MJCollege

27 Nov, 12:09


माननीय प्राचार्य महोदय यांच्या सूचनेनुसार पुस्तके व गृहपाठ उत्तरपुस्तिका  ( रविवारी सुट्टी वगळता) दररोज ३ ते ५ या वेळेमध्ये दिले जाईल.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजमध्ये येऊन आपलं साहित्य घेऊन जावे.

YCMOU MJCollege

27 Nov, 12:07


अत्यंत महत्त्वाची सूचना

विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेशित असलेल्या प्रथम वर्ष बीए व बी कॉम चे विद्यार्थी यांचे प्रवेश नियमित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अथवा अन्य विद्यापीठामध्ये असलेले विद्यार्थी जसे की जे विद्यार्थी बीए,बीकॉम, इंजीनियरिंग, बीबीए, बीसीए, करत असतील अशा विद्यार्थ्यांनी एमजे मध्ये मुक्त विद्यापीठाला प्रवेश घेतला असेल त्यांनी त्वरित आपले नाव कार्यालयीन वेळ 11 ते 5 या वेळेत कॉल करून कळवावे अथवा मला व्हाट्सअप करावे.
कृपया हे दोन दिवसात कळवायचे असल्यामुळे आपण त्वरित कळवावे

YCMOU MJCollege

26 Nov, 12:51


सर्व विद्यार्थ्यांना विनंती वजा सूचना

कोणीही कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत मला कॉल करू नये कार्यालयीन वेळ ११ ते ५

रविवार व शासकीय सुटीला बंद

YCMOU MJCollege

26 Nov, 02:17


विद्यार्थी मित्रहो,

विद्यापीठाकडून गृहपाठ प्रश्नपेढी म्हणजेच प्रश्नपत्रिका अद्याप उपलब्ध नाही आहेत त्या लवकरच उपलब्ध होतील तरी आपण उत्तर पुस्तिका घेऊन ठेवाव्यात.

विद्यापीठाकडून गृहपाठ प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यावर लगेचच आपल्या या ग्रुपला टाकण्यात येईल

YCMOU MJCollege

25 Nov, 11:51


गृहपाठ उत्तर पुस्तिका संदर्भातील पत्र

YCMOU MJCollege

24 Nov, 03:41


विद्यार्थी मित्रहो,

महत्त्वाच्या कामानिमित्त आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी मला बाहेरगावी जायच असल्याने आज अभ्यास केंद्र बंद राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
गृहपाठ उत्तर पुस्तिका बाबतचे पत्र लवकरच ग्रुपला टाकले जाईल.

YCMOU MJCollege

22 Nov, 04:48


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 22 नोव्हेंबऱ पासून ते प्राचार्य यांच्या पुढील आदेशापर्यंत  अभ्यासकेंद्र बंद राहील.

सर्वांनी नोंद घ्यावी

YCMOU MJCollege

21 Nov, 11:06


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज  दिनांक २१ नोव्हेबर, रोजी अभ्यासकेंद्र 12  ते 5 वाजेपर्यंत चालू राहील.

प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष बीए व बीकॉमचे विद्यार्थ्याने पुस्तके घेण्यासाठी स्वतःचे प्रवेश अर्ज व प्रथम वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत एक आयकार्ड साठी फोटो आणावा.
तसेच मे 2024 मध्ये झालेल्या परीक्षेचे  गुणपत्रके आलेली असून ती देखील या वेळेत दिली जाईल.
सर्वांनी दिलेल्या वेळेत येऊन सहकार्य  करावे.

YCMOU MJCollege

21 Nov, 09:23


दिनांक 24 नोव्हेंबर रविवार रोजी अभ्यास केंद्र बंद राहणार आहे.

YCMOU MJCollege

16 Nov, 06:12


सर्व प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की दिनांक 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत अभ्यास केंद्र बंद राहील ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके घ्यायला यायचे असतील त्यांनी दिनांक 24 नोव्हेंबर रविवार रोजी यावे.

YCMOU MJCollege

10 Nov, 03:00


गृहपाठासाठी लागणाऱ्या उत्तर पुस्तिका या 24 नोव्हेंबर पासून अभ्यासकेंद्राने ठरवून दिलेल्या शुल्कासह दिल्या जातील.

YCMOU MJCollege

10 Nov, 02:59


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक १० नोव्हेबर, रविवार रोजी अभ्यासकेंद्र १०.३०  ते ११.३० वाजेपर्यंत चालू राहील.

प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष बीए व बीकॉमचे विद्यार्थ्याने पुस्तके घेण्यासाठी स्वतःचे प्रवेश अर्ज व प्रथम वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत एक आयकार्ड साठी फोटो आणावा.
तसेच मे 2024 मध्ये झालेल्या परीक्षेचे  गुणपत्रके आलेली असून ती देखील या वेळेत दिली जाईल.
सर्वांनी दिलेल्या वेळेत येऊन सहकार्य  करावे.

YCMOU MJCollege

31 Oct, 06:09


प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💥💥💥

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

दीपावली निमित्त अभ्यास केंद्र २८ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर पर्यंत बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

YCMOU MJCollege

25 Oct, 06:47


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की दिनांक 27 ऑक्टोंबर, रविवार रोजी अभ्यासकेंद्र ११.३० ते ०१.०० वाजेपर्यंत चालू राहील.

प्रथम वर्ष बीए व बीकॉमचे विद्यार्थ्याने पुस्तके घेण्यासाठी स्वतःचे प्रवेश अर्ज व एक आयकार्ड साठी फोटो आणावा.
तसेच मे 2024 मध्ये झालेल्या परीक्षेचे गुणपत्रके आलेली असून ती देखील या वेळेत दिली जाईल.
सर्वांनी दिलेल्या वेळेत येऊन सहकार्य करावे.

YCMOU MJCollege

12 Oct, 12:06


*श्री प्रवीण पी. बारी,*
केंद्र सहाय्यक,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यास केंद्र : मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव

YCMOU MJCollege

06 Oct, 07:06


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते  की ज्यांना प्रवेश अर्ज,परीक्षा अर्ज तसेच  प्रथम वर्ष बीए व बी कॉम ची पुस्तके घेण्यासाठी त्याचबरोबर मे 2024 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रके आलेले असून ते घेण्यासाठी वरील ४ ते ५.३० या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासकेंद्रावर यावे

YCMOU MJCollege

05 Oct, 06:17


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 22 नोव्हेंबऱ पासून ते प्राचार्य यांच्या पुढील आदेशापर्यंत  अभ्यासकेंद्र सोम ते शनि. बंद राहील.

सर्वांनी नोंद घ्यावी

YCMOU MJCollege

01 Oct, 07:38


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की नाशिक विभागीय केंद्रातर्फे विभागीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला असून सदर स्पर्धा या 6 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत .
तरी ज्या विद्यार्थ्यांना सदर स्पर्धांमध्ये भाग घ्यावयाचा असेल त्यासंबंधीची माहितीपत्र ग्रुप वर टाकलेले असून प्रवेश अर्ज व हमीपत्र अभ्यास केंद्रात दिनांक 05 ऑक्टोंबर शनिवार रोजी मिळेल. सोबत सर्व कागदपत्रे आणावे सदर महोत्सव नाशिकला होणार आहे याची सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

YCMOU MJCollege

01 Oct, 07:36


Krida Mhotsav 2024.pdf

YCMOU MJCollege

01 Oct, 07:35


क्रीडा महोत्सव.pdf

YCMOU MJCollege

30 Sep, 05:34


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 30 सप्टेंबर रोजीअभ्यास 11 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहील.

आदरणीय प्राचार्य यांच्या आदेशानुसार महाविद्यालयीन महत्त्वाचे कामकाज असल्यामुळे दु.1 वाजेनंतर अभ्यास केंद्र बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी

YCMOU MJCollege

28 Sep, 03:59


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 28 सप्टेंबर शनिवार रोजी विद्यापीठ नाशिक येथे महत्त्वाच्या कामानिमित्त दौरा असल्याने आज अभ्यास केंद्र बंद राहील

YCMOU MJCollege

27 Sep, 08:12


दिनांक 27 सप्टेंबर पासून कार्यालयाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. सहकार्याची अपेक्षा....

YCMOU MJCollege

26 Sep, 06:39


ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके आय कार्ड घ्यायचे असेल तसेच प्रवेश घेण्यासाठी अथवा रिपीटर फॉर्म भरायसाठी अभ्यास केंद्रात यायचे असेल त्यांनी आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत यावे

YCMOU MJCollege

25 Sep, 11:56


मुक्त विद्यापीठ रीपितर फॉर्म शेवटची दिनांक ३०/०९/२०२४ आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. नंतर लेट फी सुरु होईल..

YCMOU MJCollege

25 Sep, 11:37


परिपत्रक_ विद्यार्थ्याच्या प्रोफाइल मधील नाव फोटो दुरुस्तीबाबत...pdf

YCMOU MJCollege

18 Sep, 06:29


विद्यार्थी मित्रहो आज दिनांक 18/09/2024 मी महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर आहे अभ्यासकेंद्र बंद राहील

YCMOU MJCollege

17 Sep, 06:26


विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनानिमित्त आपले अभ्यास केंद्र बंद राहील तरी कोणीही अभ्यास केंद्रावर येऊ नये ही विनंती

YCMOU MJCollege

16 Sep, 04:12


प्रवेशाची मुदतवाढ झालेली असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा.

YCMOU MJCollege

14 Sep, 09:25


प्रवेश अर्ज भरण्याची 15 सप्टेंबर अंतिम मुदत आहे अभ्यास केंद्र उद्या बंद राहील यांना प्रवेश अर्ज भरायचा असेल त्यांनी आज तीन ते पाच या वेळेत अभ्यास केंद्रात यावे

YCMOU MJCollege

13 Sep, 14:59


परीक्षा अर्ज भरणे सुरू झालेले आहेत विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्यासाठी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे

YCMOU MJCollege

13 Sep, 14:58


exam Form Ins.Jan.pdf

YCMOU MJCollege

10 Sep, 08:39


प्रथम वर्ष बी कॉम व प्रथम वर्ष बीए प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांची पुस्तके अभ्यास केंद्रावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी पुस्तके घेण्यासाठी कार्यालयीन वेळ ११ ते ३ या वेळेत येऊन आपली पुस्तके घेऊन जावेत.

सोबत येताना आयकार्ड साठी एक फोटो व विद्यापीठाचा प्रवेश अर्ज घेऊन येणे.