Marathi Quotes ◆ मराठी @marathiquote Channel on Telegram

Marathi Quotes ◆ मराठी

@marathiquote


Feedback/Problem Just Contect Admin :-
https://telegrambot.pro/?post=1156d1

1th. Open This Link And Go Your Browser.

2nd. Add Your Name/TG Id Link And Massage.

3rd. Clicking On Send To Telegram..!👍


Team @MarathiQuote

Marathi Quotes ◆ मराठी (English)

Are you a fan of Marathi quotes and looking for some daily inspiration in the Marathi language? Look no further than the Telegram channel "Marathi Quotes ◆ मराठी"! This channel, with the username @marathiquote, is dedicated to sharing beautiful and thought-provoking quotes in Marathi

Whether you're looking for motivational quotes to kickstart your day or emotional quotes to express your feelings, this channel has it all. The team behind @MarathiQuote curates a collection of the best quotes that will resonate with Marathi speakers and lovers of the language

If you ever have any feedback or encounter any problems with the channel, you can easily reach out to the admin by clicking on the provided link. Simply add your name/TG Id and message, then click send to Telegram! The admin is always ready to assist and improve the experience for all members

Join the @MarathiQuote channel today to receive daily doses of wisdom, inspiration, and emotion in the beautiful Marathi language. Let the power of words uplift your spirits and enrich your soul. Don't miss out on this opportunity to connect with like-minded individuals and immerse yourself in the beauty of Marathi quotes!

Marathi Quotes ◆ मराठी

19 Nov, 16:09


नियतीने दिलेल्या जबरदस्त धक्क्यानंतर सावरलेली व्यक्ती अबोल होते.. ❤️

Marathi Quotes ◆ मराठी

09 Nov, 01:25


आतून तुटलेली माणसं

आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, त्यांच इमोशनल होण कालांतराने बंद होत जातं.

आतून तुटलेली माणसं फारशी व्यक्त होत नाहीत.त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही,ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.

२+२=५ कुणी म्हणालं तरी ते "it's okay" म्हणून निघून जातात.
ती माणसं वाद टाळतात,माणसांशी बोलणं टाळतात.*एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो.* समोरचा माणूस किती खरं बोलतोय,किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येतं.

काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात,आणि यातच खरा शहाणपणा असतो.*
थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interfare नको असतो कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते म्हणून सेल्फ dependent होतात.

आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते,
संकटांची काळजी नसते कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीपासून इमोशनल होण्यापासून mindset प्रॅक्टिकल होण्यापर्यंतची प्रवासाची सुरवात आतून तुटण्यापासून होते.
म्हणून.

"कभी कभी दर्द भी अच्छा होता है"

🙏🙏

Marathi Quotes ◆ मराठी

05 Sep, 04:56


काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका, प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते, काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नका, कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत रहायचं..! 🤞

Marathi Quotes ◆ मराठी

21 Dec, 03:15


वास्तुशास्त्र

" हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे ."

नवीन सुनबाई
ऑफिसला जाताजाता
अगदी सहज म्हणाली .
आणि सासुबाईंचे
डोळे भरून आले .

" मला कशाला ग एवढे लागतात ? "

" अहो , दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी
एक महिन्यापासून .
दारावर भाजी ,
फळवाले येतात .
कधी कामवाली
जास्तीचे पैसे मागते .
शिवाय तुमची भिशी असते ,
राहुद्या तुमच्याजवळ ."

" अग , पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची .
ते असतांना त्यांच्याकडे मागत असे ,
आता न मागता महिन्याच्या महिन्याला
सरकार देते ."
सासु हसून म्हणाली .

" तुम्ही भिशीच्या ग्रुप बरोबर सिनेमा , भेळ पार्टी , एखादं नाटक असे कार्यक्रम ठरवत जा .
जरा मोकळं व्हा आई .
ह्यांनी सांगितलंय मला तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते .
मोठे दादा तर वेगळे झालेत ,
ताई सासरी खूष आहेत .
मग तुम्ही पण आता
आपलं जग निर्माण करा .

मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात .
आता जगा स्वतःसाठी . "

" इतक्या लहान
वयात हे शहाणपण
कुठून आलं ग तुझ्यात ?"

" मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती.
आईने पटकन सहाशे रुपये काढून
हातावर ठेवले .
म्हणाली , तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा , 'आजी कडून'
म्हणून काही खाऊ पिऊ घाला ,
खेळणी घेऊन द्या .
आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती .

'एव्हढे पैसे कधी मोकळेपणाने
खर्चच केले नाहीत ग 'असे म्हणाली होती .
तेव्हापासून आजी आणि आई
जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या . ......
आई ,
मला माहितेय ,
घरचे खटले सांभाळायला तुम्हाला
तुमची नोकरी सोडावी लागली न ?
किती वाईट वाटलं असेल . किती मन मारावं लागलं असेल ....
शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवरयापुढे हात पसरावे लागले असतील .तेव्हा नवरे देखील
उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत ..........
तुमची पेन्शन राहुद्या आई .
मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन . "

" अग , सगळं आजच बोलणार आहेस का ?
जा आता तुला उशीर होईल. "
"मला बोलू द्या आई .
हे मी माझ्या
समाधाना साठी करतेय .
आई म्हणते ,
की अठरा तास घरात राबणारी बाई
कुणाला कधी समजतच नाही.
तू मात्र
तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव .
प्रेम पेर , प्रेमच उगवेल . "

सासुने
भरल्या मनाने
सुनेच्या गालावर थोपटले .
ती दिसेनाशी होई पर्यंत
दारात उभी असतांना
तिच्या मनात आले ,
सून आल्यावर
मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते.
तू उलट कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस.

ज्या घरात लेकी
सुना
सासुचा
खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतो
जेथे असेल आपुलकी , प्रेम आणि जिव्हाळ्याचे अस्र
तेथे फिके पडते वास्तुशास्त्र

Marathi Quotes ◆ मराठी

14 Dec, 21:14


रेतीतल्या पाऊलखुणा मिटून जातात कधी ना कधी.

Marathi Quotes ◆ मराठी

14 Dec, 05:00


जिथे ईच्छा असते तिथे कारणांना थारा नसतो.

#प्राजक्तगंध

Marathi Quotes ◆ मराठी

28 Nov, 19:00


१.भावाच लग्न साधे पणाने करू म्हटलं तर आमचेच लोकं म्हणतात तुम्हाला काय कमी आहे, कशासाठी कंजुषी करता...!
२. लग्नात हुंडा घ्यायचं नाही ठरवलं तर म्हणे मुलात दोष असणार...🙄
पण आमचे पप्पा म्हणतात बदल घडवायचा असेल तर टीका टिप्पणी, विरोध होणार च... दुर्लक्ष करायचं.
#hats_off_to_father

Marathi Quotes ◆ मराठी

28 Nov, 18:58


जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, विविध रंगांनी नटलेली ही दुनिया बघत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला खूप छोटं वाटतं आणि विचार पण तितकेच छोटे राहतात. यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्यात तणाव निर्माण करतात.

Marathi Quotes ◆ मराठी

28 Nov, 18:57


माझी एक मैत्रीण आहे ती नेहमी टेंशन मध्ये असायची, नैराश्यात असायची, सारखं वाटायचं तिला खूप दुःख आहे. मन मोकळं करताना कधी कधी रडायची.
तिला बी एफ होता जो तिच्यापेक्षा मोठा होता आणि डॉक्टर होता.
तरी मला विचार यायचा की ही एवढी दुःखात का ?
मी एकदा तिला म्हंटलं "तुला कसलं दुःख तुला तर बी एफ आहे. तो तुझी काळजी घेत असेल, प्रेम करत असेल, सुखात ठेवत असेल मग तुला का एवढं टेंशन येतं? त्यात तो डॉक्टर आहे (डॉक्टरांना मन समजतं, कारण त्यांना मानसशास्त्र शिकवलेलं असतं आपले हावभाव, शरीर भाषेवरून त्यांना बरंच उलगडत असतं)
एवढं असताना त्यानी हीला ह्या दुःखातून बाहेर का नसेल काढलं? असं मला नेहमी वाटायचं. आता ह्या गोष्टीला २-३ वर्ष झाले.

पण आता मला समजलं की आपलं दुःख हे सर्वस्वी आपलं असतं,आपली जबाबदारी असते. ते कमी करण्याचं, त्यातून बाहेर येण्याचं काम ही आपल्यालाच करावं लागतं.
आपल्या जवळच्या व्यक्तींकडून ती अपेक्षा करणं चुकीचं असतं.
आणि बर्‍याचदा दुःखात असताना त्या अपेक्षेने ही आणखी दुःख होतं.
प्रत्येक व्यक्ती निराश आहे कोण दाखवत नाही आणि खूप लपवत असतात पण त्यानी ते दुःख आतल्या आत साचून राहतं आणि कधीतरी त्याचा उद्रेक होतो, जो खूप घातक असतो!
कितीही कोणाजवळ मन मोकळं केलं, मन वळवलं, गावभर फिरलं, गाणी ऐकली, काही केलं तरी कुठेतरी ते दुःख मनात सलत असतं. इतरांना उगाच आपण किती खूश आहोत, मजेत आहोत हे दाखवून ते आणखी वाढत असतं आणी ह्याची जाणीव एकांतात जास्त होते पण आपण हुशारपणा करून त्या कडेही दुर्लक्ष करतो.
दुःखापासून पळवाट काढतो, त्यानी ते फक्त तात्पुरतं कमी होतं.
त्या पेक्षा दुःख कायमचंच संपवणं हा एक खूप कठीण मार्ग असतो पण ते करावं लागतं.
कोणत्या गोष्टीचं किती दुःख करावं, किती प्राधान्य द्यावं हे आपल्या हातात असतं, अख्खं आयुष्य समोर असताना दुःखासोबत जगायची गरज नसते.
तरी आपण का जगतो त्या दुःखासोबत?
का नको तो ताण मनावर घेतो ? का नैराश्ययाला जवळ करतो ?
एक सवय म्हणून.
ते असंच चालत आलं म्हणून कारण आपल्याला विश्वास नसतो की आपण यातून बाहेर येऊ कारण आपल्यालाच यायचं नसतं एवढं आपण त्या सगळ्याला कवटाळून बसतो गरज नसताना.
आपलं आयुष्य काय लहानपणी ऐकलेल्या गोष्टी सारखं नाहीये की कोण तरी राजकुमार येईल मग सगळं मस्त होईल आणि क्षणात सगळं दुःख संपेल आणि सुख येईल.
कोण येणार नसतं आपल्यालाच त्यातून बाहेर यावं लागतं आणि ते आपल्यावरच असतं आपण ठरवलं तर कारण खरंच कितीही कोणी जवळचं असलं तरी,
आपले अश्रू, दुःख पाहण्या पलिकडे, आपल्याला समजावण्या पलिकडे ते नाही काय करु शकत.
हे आपलंच आपण समजून घ्यायला हवं.
चेहर्‍यावर सतत खोटं हसणं मिरवण्यापेक्षा एकदा पापण्यांच्या कडा ओलावून स्वतःच जवळ स्वतःचं दुख नष्ट केलेलं बरं असतं.
कितीही अवघड वाटलं तरी कारण आपणच या दुःखात राहून राहून स्वतःला त्रास देतो आणि मनावर आत्याचार करत असतो.
किती काही झालं तरी जोपर्यंत आपण एखाद्यातून बाहेर येणाचं ठरवत नाही तोपर्यंत आपण तिथंच अडकून राहतो.

- मध

Marathi Quotes ◆ मराठी

28 Nov, 18:55


जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते जळवणं राहतं बाजूला, खरंतर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न करत असता...

- मध

Marathi Quotes ◆ मराठी

21 Nov, 06:48


कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा, आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा...

स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही...

#म #मराठी #SaturdayMotivation

Marathi Quotes ◆ मराठी

29 Sep, 05:34


वेदना......माणसांना बदलते,

काही उद्धट होतात तर काही शांत होतात....!!!

Marathi Quotes ◆ मराठी

10 Jun, 09:49


आपलं आरोग्य आपल्या हातात.

१. आपण 20 रुपये किलो टोमॅटो घेऊन त्याची चटणी खाऊ शकतो ,
पण ते न करता आपण 150 रुपये किलो टोमॅटो souce खातो ते ही 1/2 महिने आधी बनवलेले शिळं.

२. घरी आपण आज सकाळी भरलेलं पाणी दुसऱ्यादिवशी पीत नाही,
पण 3 महिने जुनी बॉटल मधील पाणी 20 रुपये देऊन पितो.

३.50 रु लिटर दुध आपल्याला महाग वाटत,

पण 70रु लिटर च कोल्ड ड्रिंक तेही 2ते 3 महिने जुन आपण पितो.

४. आपल्या शरीराला ताकद देणारे 200 रु पाव कीलो मिळणारे ड्राय फ्रुट्स आपल्याला महाग वाटतात,

पण 400 रु ला मिळणार मैद्यापासून बनलेला पिझ्झा आवडीने खातो.

५. बहुतेक जण सकाळी घरात शिजवलेलं अन्न संध्याकाळी खात नाहीत,

पण काही कंपनी चे सहा सहा महिने जून असलेलं खाद्यपदार्थ आपण खातो, जेव्हा की आपल्याला माहीत असते हे खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी प्रिजर्वेटिव मिक्स करतात जे आपल्या आरोग्यास घातक असतात.

६.ह्या 2 महिन्यांच्या lockdown च्या काळात आपल्याला चांगल समझलेलं आहे की बाहेरच्या जंक फूड, किंवा हॉटेलमधील खाण्याशिवाय आपण छान जगू शकतो , घरातील शुद्ध , सकस अन्न खाऊ शकतो

ज्याने आपले आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.

आठवून बघा ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा आजारी पडलात. नाही ना ,

साधी सर्दी, खोकला तरी झाला का ते पहा.

Marathi Quotes ◆ मराठी

09 Jun, 03:02


वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा, भविष्य फार धुर्त आहे ते फक्त आश्वासन देते खात्री नाही..!

@MarathiQuotes

Marathi Quotes ◆ मराठी

30 May, 04:29


समाजाने आता बदललेच पाहिजे..

आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांचे ना पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत ,पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत, म्हणजे संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा काही गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे..

Point to be noted

१. पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.

२. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.

३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा.
शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील.

६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा.

७. मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम)

8 आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल.

१०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवू ठेवा.

११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू).

१२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.

१३. वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी घालत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा.

१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायमच ऋणी रहा.

१५. घरातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा.

१६. मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या.

१७. निंदा टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका.

१८. घराघरात जो मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा, सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने.

१९. आपलं आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा.

२०. चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा,

२१. आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा,
हा संदेश आपल्या संपूर्ण समाजाच्या हिताचा आहे... तेव्हा स्वतःही स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा..


वाचन करा
व्यायाम करा
अर्थ साक्षर व्हा
सुरुवात स्वतः पासून करा बदल नक्कीच घडेल.. 🙏🏻

Marathi Quotes ◆ मराठी

25 May, 21:14


मनातल्या भावना, शंका - कुशंका मनातच गोठून राहिल्या कि नात्यामध्ये दरी निर्माण होते..!

Marathi Quotes ◆ मराठी

25 May, 21:13


स्वप्नं चिक्कार पहावीत.. पहात राहावी.. एक स्वप्नं तुटलं म्हणून काय झालं..!

Marathi Quotes ◆ मराठी

24 May, 22:39


कुणी हि असो कुणाच्याहि आयुष्यात एक पर्याय म्हणून आपलं स्थान कधी असू नये..!

Marathi Quotes ◆ मराठी

24 May, 22:02


कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये गेले एक महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र डॉ. आदित्य शिंदे यांनी दिलेला सल्ला तुम्हा सगळ्यांसाठी लिहून पाठवत आहे तुम्ही पण नक्की वाचा तुमची पण भीती नक्की कमी होईल
😊😊😊

जर कोरोना व्हायरस वर अजुन औषध निघाले नाही , तर मग जगातील 1 लाख 21 हजार 197 लोक बरे कशे झाले ?
त्यांनी बरे होण्यासाठी काय केले?
जर भविष्यात तुम्हाला किंवा शहरातील नातेवाईक व मित्र यांना हा आजार झाल्यास , डॉक्टर त्यांना कसे उपचार करतील ?
सर्वांच्या मनातील अनुत्तरीत प्रश्न !

म्हणूनच या विषयी थोडीसी माहिती ....

कोरोना हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तुमच्या फुफ्फुसां(Lungs) मध्ये जाऊन बसतो. त्यानंतर तो आपल्यावर आक्रमण करतो. आपली फुफ्फुसे त्याला प्रतिकार करण्यासाठी एका द्रव पदार्थाचे स्रवण करतात . ( ज्याला सर्वजण शेंबूड/Mucus म्हणतात). या Mucus मुळे आपल्या शरीराची ऑक्सिजन शोषण करण्याची क्षमता कमी होते. या आजारात मृत्युचे प्रमाण 3% आहे . म्हणजेच , जर १०० व्यक्तींना हा आजार झाला तर त्यापैकी ३ व्यक्ती मरण पावतात आणि ९७ व्यक्ती बरे होतात.
मग प्रश्न हा आहे , या ३ व्यक्ती का मरण पावल्या आणि ९७ जण कशे बरे झाले?

ज्यांचे वय वर्ष १० ते ५० यामध्ये आहे व ज्यांना कोणताही इतर आजार नाही , तसेच ज्यांचे आरोग्य ठीक आहे, त्यांच्या शरीरात हा विषाणू गेल्यानंतर , त्या विषाणू बरोबर आपले शरीर ७ ते ८ दिवस युध्द करते आणि ७ ते ८ दिवसात कोरोना व्हायरसला मारून टाकते.
चीन मधील भारतीय डॉक्टर Dr. Sanjiv Chube ज्यांनी स्वतः 30 हजार ते 40 हजार कोरोना व्हायरस बाधीत व्यक्तिवर उपचार केले . ते सांगतात , यावर काही औषध जरी नाही घेतले , तरी तुमचे शरीर ७ ते ८ दिवसामधे या कोरोना व्हायरसला मारून टाकते . ते असे पण सांगतात, 85% रूग्ण हे घरी राहून बरे झाले आहेत . आम्ही त्यांना Antiviral medicine दिली.
Antiviral medicine म्हणजे विशेष़ काही नाही......
आपल्या भारतात मिळणारी VICKS ACTION 500 ही सुद्धा एक Antiviral Medicine आहे . ती तुम्ही वापरू शकता. (तत्पूर्वी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.) तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल... असे डॉ Sanjiv Chaube सांगतात.

मग ज्या व्यक्ती मरण पावल्या त्या का मरण पावल्या ?

जेव्हा व्हायरस फुफ्फुसांमध्ये जातो , तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी फुफ्फुसे mucus/ शेंबडाचे स्रवण करतात व त्यामुळे आपली ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते... जे तरूण आहेत ते ही स्थिती सहन करतात आणि त्या विषाणूला पूर्णपणे मारुन ७ ते ८ दिवसात बरे होतात . पण जे म्हातारे आहेत, ज्यांचे वय ६० च्या वर आहे, ज्यांना कँसर, ब्लड प्रेशर, हृदय विकार इत्यादीं सारखे आजार आहे, ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे , त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कारण त्यांची फुफ्फुसे कमजोर आहेत व ते फक्त ऑक्सिजन त्यांच्या पूर्ण शरीराला न पोहचू शकल्यामूळे मरत आहेत.


आता हॉस्पीटलमध्ये काय उपचार होतात ते बघा.......

कोरोना बाधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये Admit केल्यानंतर डॉक्टर त्याला शक्यतो ग्लूकोजचे सलाईन देतात. त्याचबरोबर साधे Antiviral medicine देतात.
जर त्यांना वाटले की या व्यक्तीची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होत आहे , तरच ते Extra ऑक्सिजन देतात किंवा Ventilator वर ठेवतात, अन्यथा नाही. बऱ्याच व्यक्तींना याची आवश्यकता पडत नाही. तसेच ते तुम्हाला दोन वेळचे जेवण आणि एक वेळ नाश्ताही देतात. ९ ते १० दिवसात परत तुमची टेस्ट घेतली जाते व ती जर Negative आली , तर तुम्हाला घरी सोडले जाते.

कोरोना झाल्यावर खाण्यापिण्याची काहीही पत्थ्ये नाहीत .
पोटभर जेवा,
आराम करा,
व्यायाम करा.
फक्त...
सर्दी व कफ होईल असे पदार्थ खाऊ नका किंवा कटाक्षाने टाळा.
( थंड पाणी, Cold drink, Ice cream etc.)
पुण्यामधे काही MNC कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना Vitamin C /टॅब्लेटचे वाटप केले आहे , ज्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
इटली मध्ये ७ ते ८ हजार व्यक्ती मरण पावल्या , कारण त्या देशात २१% लोक वृद्ध आहेत. युरोप खंडात सर्वाधिक वृध्द व्यक्ती इटलीमध्ये आहेत.

त्यामुळे या आजाराला घाबरू नका. घरी रहा, सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि तुमचे आई वडील, भाऊ बहिण , मित्र व नातेवाईक यांना व्यवस्थित समजून सांगा . कारण त्यांची भिती व गैरसजूत घालवणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
कारण.....

!!! भित्यापाठी ब्रम्हराक्षस !!!

चला तर मग.....
आपल्या मनातील भिती थोडी का होईना , नक्कीच कमी झाली असेल , याचा विश्वास वाटतो .

धन्यवाद .

आपणा सर्वांचा दिवस आनंदात जावो , हीच शुभेच्छा .
🙏 डॉ.अरविंद आडे , प्राध्यापक व विभाग प्रमुख,शल्य चिकित्साशास्त्र शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अकोला,🙏