आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 @life_lessons_learning Channel on Telegram

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

@life_lessons_learning


Channel cum Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही..
पुनवेच्या शब्दशलाका💫🌟

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 (Marathi)

जीवनातील गोडी आणि दु:खाच्या अनुभवांच्या साक्षात्कारांची माहिती मिळवा आपल्या आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 या टेलीग्राम चॅनलद्वारे. या चॅनलवर पुनम अहिरे (प्रार्थी उपनिरीक्षक 2021 आणि माजी विभाग अधिकारी 2020) यांचे चर्चा, अनुभव आणि सल्लेर्दी एकत्रित केले जातात. पुनम हे एक अधिकारी बनण्यासाठी आसापासाची संघर्षात नेहमीच आहे. यातले माहिती, सल्लेर्दी आणि अनुभव अनेक उमेदवारांच्या मार्गदर्शनास सापडेल. अभ्यास, अधिकार आणि ध्येयाच्या विषयात त्यांच्या डायरीच्या पानांवर सजीव आणि जीवंत अनुभवावरील अभ्यासांचा समावेश केला आहे. असे प्रेरणादायी साहित्य तुमच्या आयुष्यात नव्याने प्रेरित करू शकतो. त्यामुळे आपण आपल्या जीवनातील परिस्थितींचा सामना कसा करावा, कसे सामोरे द्यावे ह्या सर्व प्रश्नांची समाधान करण्यात मदत करू शकता. आपल्या आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 या टेलीग्राम चॅनलवर जॉईन करा आणि नवीन विचारांच्या संपुष्टात रहा.

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

19 Nov, 15:58


मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून आज संध्याकाळी एका केंद्रावर भेट दिली,मतदानाची तयारी करण्यात सर्व व्यस्त होते,आवश्यक पाहणी करुन मतदान केंद्रावरील स्टाफला तुमच्या जेवणाचं काय.? असं विचारले तेव्हा त्या केंद्रावरील शिपाई तेथीलच रहिवासी असल्याने सोय केली आहे असे सांगितले..शेजारी त्यांनी जेवणात आणलेली जिलेबी ठेवलेली..त्या शिपाई मामांनी सात-आठ लोक जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आपल्या भागात इलेक्शन ड्युटीसाठी आलीये याची out of box जाऊन घेतलेली जबाबदारी मनाला भावून गेली ..कोणाची अंगणवाडी ताईंच्या घरी राहायची सोय,कुणाला पोलीसपाटलांच्या घरुन चहा..इलेक्शन ड्युटी आहे म्हणून स्टाफची सोय लागली की नाही हे बघणारे गावकरी…जेमतेम स्वतःच कामही काचकुच करुन करणाऱ्या ढीगभर माणसांपुढे कोणतंही (आपल्या वाटेचं असो वा नसो) काम मनापासून करणारे मुठभर माणसं नेहमीच भारी पडतात..त्याचप्रमाणे प्रचंड व्यवहारिक जगात सुद्धा घासातला घास काढून माणुसकी जपणारी माणसं माझ्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं खरं काम करताय..ग्रामीण महाराष्ट्र फार सुंदर आहे ,तो टिकला पाहिजे💯
गाव सुटलाच नाही पाहिजे गड्यांनो
#इलेक्शन_विलेक्शन

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

16 Nov, 11:33


नक्की वाचा असा लेख
आनंदी जगणं सगळ्यांनाच जमेल इतकं सोप्पं नाही💯
Heaven or Hell.?

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

15 Nov, 15:12


💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

12 Nov, 18:03


Gentle reminder for next 18days
Active Engagement with Negative thoughts
Active engagement with study subjects and constructive things.
Stay away from negative energy people ,jealous friends (?)
stay connected with healthy ecosystem which will help you to do better and better .
अशा “स्व”सोबत राहू नका जो नेहमीच स्वतःच्या दुबळ्या, negative बाजूवर फोकस करतो.
अशा “स्व” सोबत राहूया जो नेहमीच सकारात्मक स्वसंवाद करतो,आशावाद निर्माण करतो .. healthy mind ठेवण्यास मदत करतो.
_Content_Confidence_Calm_and_Composed💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

06 Nov, 16:12


Live stream finished (1 hour)

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

06 Nov, 14:55


Live stream started

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

06 Nov, 08:28


या सेशनसाठी तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता कमेंट बॅाक्समधे.

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

05 Nov, 16:25


नमस्ते फ्रेंडस…
दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ हा *National Stress Awareness Day* म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने मी प्रियांका पाटील, Counseling Psychologist (३-४ वर्षांचा Neuro psychiatric hospital, International School व 'मनोवाच' - psychological counseling center मधे अनुभव) आपल्या सर्वांसोबत चर्चा करू ईच्छिते.
ज्यामध्ये आपण खालील बाबींवर चर्चा करुयात.
1.stress ची कारणे,
2 Stress चे स्वरूप
3 Stress handle कशा प्रकारे करणे गरजेचे आहे यावर चर्चा करू शकतो.
4.यासोबतच aspirants च्या शंकांचे निरसन ही करण्यात येईल.

वेळ - उद्या रात्री ८.३० - ९.३० pm
आपल्या “आयुष्याच्या डायरीतून” या टेलिग्राम चॅनेलवर व्हॅाईसचॅटवर..

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

05 Nov, 09:23


कालचक्रापुढे रंगाचे मुखवटे
मनाच्या गाभार्र्यात मात्र सप्तरंग उधळणे
तारुण्य वार्धक्य नुसते वयाचे सांगणे
निखळ निरागस मन जणू शिशूचे रांगणे
जगण्याने या घ्यावी उंच भरारी
त्यासाठी आधी पाहिजे मनाची उभारी
#त्या त्या फेजमधे सौंदर्य पाहणारी दृष्टी महत्वाची

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

30 Oct, 18:30


विश्वास ठेवणारी माणसं आणि विश्वास सार्थ ठरवणारी माणसं सगळ्यांना मिळतीलच असं नाही ..दोघंही तितकीच महत्वाची आणि आवश्यक💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

29 Oct, 18:26


लहान असतांना मोठेपणीच्या दिवाळीची ओढ असते आणि मोठेपणी लहानपणाची दिवाळी आठवते..काळ असा झपाट्याने पुढे जात राहतो कालच्या पेक्षा आजचा दिवस अधिकाधिक जबाबदारीचा वाटू लागतो.आयुष्यात जबाबदार असणं जितकं empowering असतं तितकंच थकवणारंही असतं..लहानपणासारखं बिनधास्त अन् मनसोक्त जगता येईल अशा जागा मात्र शोधून जपता आल्या पाहिजे मग त्या सणवारातून असो की छंदातून असो की नात्यातून..🪔💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

28 Oct, 10:24


डोळे फक्त प्रतिमा पाहतात,दृष्टी मनाची असते.- लोकसत्ता लेख

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

24 Oct, 06:40


“आयुष्याच्या डायरीतून” ची दोन वर्षे..
Feedback and suggestions on [email protected].

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

23 Oct, 18:18


बर्‍याचदा आपण आपल्या विचारांपलीकडे blessed ,so called नशीबवान असतो पण आपलं लक्ष मात्र जिथे आपण मार खात असतो तिकडेच जात असतं ..मानवी वृत्तीच तशी असावी बहुतेक..god's plan कसा better आहे हे सगळ्यांनाच लक्षात येईल असं नाही 😇

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

20 Oct, 06:24


क्षेत्र कुठलंही असो,स्वकर्तृत्वाच्या झळाळीवर मोठं होणार्या माणसांचा स्वतःचा एक रुतबा असतो,ज्याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

19 Oct, 17:00


Live stream finished (59 minutes)

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

19 Oct, 16:00


Live stream started

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

19 Oct, 16:00


Live stream scheduled for

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

19 Oct, 15:34


आज रात्री 9.30 वाजता थोडा वेळ बोलूया.
Questions if any

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

17 Oct, 09:49


Momentum
काल परवा इलेक्शन जाहीर झालं,महसुली यंत्रणा पटापट त्या त्या रोलमध्ये काम करु लागली..बैठका काय,प्रशिक्षण काय,सगळं एकदम मिशनमोडवर..तयारी आधीपासून सुरु असलीतरी इलेक्शन जाहीर झाल्यावरचा Momentum खुप वेगळा असतो हे अनुभवतेय.आयुष्यात त्या त्या वेळचा momentum पकडता येणं फार अत्यावश्यक आणि जीवनावश्यक कौशल्य आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांनाही study momentum catch करता आलं पाहिजेच.
परीक्षा ४५ दिवसांवर आलेली असतांना आपण ती ग्रीप पकडू शकत नसू तर आपलं कुठेतरी चुकतयं हे आपल्या लक्षात यायला हवं..आपण तयारीत कमी पडलो तरी दुसरं कुणीतरी ती तयारी करुन त्या जागेवर निवडून येणार आहे..मग आपलं Momentum न पकडणं आपल्याला किती महागात पडू शकतं याचा अंदाज आपला आपण लावला पाहिजे आणि हो इतकं सोप्पं असतं तर सगळ्यांनाच जमलं असतं आणि पास होणार्यांची संख्या नापास होणार्यांपेक्षा खूप कमी राहिलीच नसती..Utmost commitment towards our aim, consistency, discipline हे सहजसाध्य नक्कीच नाही ,त्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागतात,Comfort zone ला तडाखे द्यावे लागतात,अपयशाची भिती वाटली पाहिजे आणि यशाची ओढही..
एकदा तुम्ही याच्यापुढे गेलात की अभ्यास एन्जॅाय करता येतो.स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला जमतो आणि दरदिवशी स्वप्नाच्या जवळ जातोय असं वाटू शकतं..ध्येयाप्रती ओढ अशी असावी की बाकी सगळी आव्हाने गौण वाटावी अन् आव्हानांवर उत्तर शोधून झपाटलेल्यासारखं त्या स्वप्नांमागे स्वतःला लावून घेता आलं पाहिजे.स्वप्नपूर्ती विलक्षण असते यात शंकाच नाही पण त्यासाठी झिजणं सुद्धा Memorable करता आलं पाहिजे कारण त्याशिवाय पर्याय नाही 💯
#खरमरीत पण आवश्यक

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

15 Oct, 16:52


प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी स्पार्क असतो फक्त तो स्पार्क दाखवून देणारी माणसं सगळ्यांना मिळतीलच नाही आणि मिळाली तरी योग्यवेळी मिळतीलच अस नाही ..हे सगळं जुळून येत असेल तर ते उगाच नाही ,नियतीने ठरवून केलेला प्लॅन असतो फक्त आपण त्याला तसं recognise करत नाही.
आणि एवढे नशीबवान आपण नसू तर ठरवून “योग्य पुस्तक” हाती घेता आली पाहिजे💯
#वाचनप्रेरणा

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

11 Oct, 08:48


आपल्या अडचणींमधुन आपल्यालाच मार्ग काढावा लागतो.
जगाकडून फार अपेक्षा ठेवून अडचणी कमी होत नाहीत तर वाढतातच..
“आपला निर्णय आपली जबाबदारी”या तत्वावर काम करणारी माणसं जगाच्या भरोश्यावर जगत नाही आणि खरं शहाणपण हे समजून घेण्यातच असतं.जगाच्या सहानूभुतीची अपेक्षा भ्रमनिरास करणारी असते एवढं मात्र नक्की 💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

10 Oct, 10:13


प्रत्येक हसर्या दिसणार्या चेहर्यामागे एक कुठे न सांगितलेली व्यथा असते..
जजमेंटची भिती वाटून माणुस आतल्या आत कुढत असतो..कडी कुलुप लावून बंद करुन ठेवतो काही इव्हेंटस,भावना …या सगळ्यात आपल्या मनावर फार अन्याय करत असतो..मनाच्या कंटेनर कुठेच मोकळं करत नाही आपण आणि मग कधीतरी त्याचा वेगवेगळ्या मार्गाने विस्फोट होतो..
आयुष्याच्या डायरीच्या माध्यमातून परीक्षा , अभ्यास यावर बोलत असलो तरी healthy mindeset ,Happy being यावर पण आपण बोलतो..गेल्या दोन वर्षात अनेकांच कान होता आलं आहे..
रात्रीची झोप उडवेल असा एकतरी मेल महिन्यातून एकदा येत असतो..समाजमनातील वेदना पाहून मन द्रवते पण शेअर करणार्याला हलकं वाटतं..
आज मानसिक आरोग्यदिनी पुन्हा एकदा तुम्हाला व्यक्त व्हायची आणि मला कान व्हायची संधी द्यावी वाटते ..करियर आणि आयुष्याच्या एका कठीण फेजमधे कुणीतरी आपलं फक्त ऐकून घ्यावं ही अपेक्षा अगदी साहजिक आहे ..
व्यक्त होणं महत्वाचं आहे ..नेहमी प्रकर्षांने जाणवतं हे ..Sharing is Caring
Feel free to talk - [email protected]
#World_Mental_Health_Day

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

10 Oct, 04:07


एक आदर्श जगणं कसं असावं हे सांगून गेले टाटा…
श्रीमंताच्या उच्चभ्रू जगण्यामधे सर्वसामान्यांच जगणं सुकर करण्याचा ध्यास असणारा visionary माणूस म्हणजे टाटा..
कामावरची निष्ठा अशी ज्या ज्या क्षेत्रात हात घातला तिथे मोलाचे योगदानच देऊन गेले..
देश अडचणीत असतांना मदतीचा हात द्यायला सदैव पुढे राहिले ..
आपलं जगणं फक्त एकट्यापुरतं न ठेवता समाजासाठी ,देशासाठी जगणं स्वीकारलं कदाचित म्हणूनच त्यांच जाणं प्रत्येकाला आपला Personal loss झाल्यासारखं भासतं ..
औद्योगिक क्षेत्राच्या अनेक चढ उतारांपुढे न डळमळता टीकेला बळी न पडता स्वतःच्या तत्वांशी तडजोड न करणं औद्योगिक क्षेत्रातील माणुसकी जिवंत ठेवणार होतं …
आजच्या काळात SelfCentric जगणं कॅामन होतं असतांना एवढ्या मोठ्या समुहाचा मालक असून समाजाच्या जीवनशैलीत आणि जगणं सुकर करण्यात सिंहाचा वाटा असणं नक्कीच प्रशंसनीय आहे ...
कामावरची निष्ठा देशाला जागतिक पातळीवर मोठ्ठं करते तेव्हाच योगदान अतुलनीय ठरतं ..
फार कमी माणसं असा आदर्श ठेवून जातात ,कितीही लिहिलं तरी मनातला कृतज्ञतेचा भार काही शब्दात बसवता येत नाही पण एवढ्या मोठ्या वारशाचा कणभर भाग तरी आपण नक्की व्हावं एवढी तरी जबाबदारी आजच्या तरुणाई घेतली पाहिजे हीच भावना उरी दाटते..
“असेन मी नसेन मी
माझ्या कार्यातून दिसेन मी “
#Lost_the_Legend_TATA_Real_Ratan
#Forever_Grateful 🙏😇

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

08 Oct, 10:25


Headline is very important💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

03 Oct, 18:40


Intangible contribution in lives of people is always unmatchable💯
Sudha_Murthy_आयुष्याचे धडे गिरवताना पुस्तकातून.

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

01 Oct, 10:42


तुम्ही स्वभावाने ,मनाने,विचारांने किती चांगले आहात याला जगाशी काही एक घेणं देणं नसतं …जगाला तुमची किंमत करायची असते ती तुमच्या गुणवत्तेवर ,मालमत्तेवर, सत्तेवर , यशावर , उपद्रव किंवा उपयुक्तता मुल्यांवर..
त्यामुळे जगाला आपला काही फरक पडावा असं वाटतं असेल तर केवळ चांगल असणं पुरेसं नाही ..एक काहीतरी हुकमी ऐक्का तुमच्याकडे असावा लागतो..नाहीतर जग तुम्हाला डिवचण्यात माहीर आहेच…तो हुकमी ऐक्का मिळवण्यासाठी मात्र बरंच झिजावं लागतं .
अन् ज्याला आपण जग म्हणतो आपणही त्याच जगाचा भाग असतो हे विशेष 😅
#Obseration_based..!
#Views may differ

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

27 Sep, 05:40


अंतिम निकालाने हुलकावणी दिलेल्या सगळ्यांनी नक्की ऐकावे हे सेशन…
झोकून आशा चालत रहा तू⚡️

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

26 Sep, 18:20


आजची राज्यसेवा निकालाची पीडीएफ अनेकांच्या आयुष्यात आनंदाची लाट घेऊन आली असेल..अभ्यास ते अधिकारीचं वर्तुळ पूर्ण करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐🎉🥳
मनापासून पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती जगणं आयुष्यभराची सुवर्ण आठवण असते ,मनमुराद जगा..
यशाने हुलकावणी दिलेल्यांना आजची रात्र झोप लागणार नाही , चिंता वाटेल ,रडू येईल ,वाईट वाटेल ..सगळं सगळं होऊ देत ,अपयशाचा वचपा काढण्यासाठी नव्याने सज्ज व्हावं लागेल,तयारी वाढवावी लागेल,सुधारणा करायचे एरियाज शोधून कामाला लागावं असेल…" जबरदस्त इच्छाशक्तीने आणि तितक्याच तयारीनिशी पुन्हा एकदा मैदानात उतरून लढाईला सज्ज होणे कारण त्या pdf मधे स्वतःच नाव बघायचं आहे ना..?”🤞

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

26 Sep, 06:37


Opportunities are only for those who are prepared for it💯
You have to take responsibility of all support you are getting from your family , friends and mentors .
You have to make them proud.
Just imagine that day when you make it,how happy they will be😍

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

25 Sep, 07:53


Something relatable to our aspirant phase.
टिकून राहणं महत्वाचं असतं ते यासाठीच💯

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

24 Sep, 16:50


1 डिंसेबरच्या परीक्षेच्या दृष्टीने या video मधील नियोजन आणि मुद्दे अत्यंत उपयुक्त ठरू शकतील
व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की बघा आणि जोरदार तयारी करा
#90K views already
#Must watch _very relevant content

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

23 Sep, 07:00


काळाच्या पुढं असणं
जिना चढलं की माझच केबिन आहे पहिलं त्यामुळे बर्याचदा स्वागतकक्षावर करावं तसं काम करावं लागतं..कोणत्या कामासाठी कोणाकडे जायचं हे सांगता येतं शिवाय आपल्याही ज्ञानात भर पडते सोबत लोकांना observe करायचा छंदही जोपासता येतो..
निकालावर बंद केलेल्या एका प्रकरणाचा अभ्यास करत असतांना एक आजी आली ,माझ्या समोर असणार्या एका खुर्चीत तिची बॅग ठेवत ,दुसर्या खुर्चीत आजी बसली. बॅगमधून एक कागद काढला ,माझ्या हाती दिला.मी वाचला पण मला काहीच लिंक लागेना ,नक्की विषय काय आहे ते..मी म्हटलं ,”आजी तुम्ही मला सांगा काय विषय आहे ,मला या कागदातून काही विशेष कळतं नाही आहे असं ,आजी म्हणे ,” मी वाचून दाखवू का..” आजी मला वाचता येतं हो ,पण हे अक्षर आणि काहीच नीट कळेल अस नाही “ ..म्हणे मी लिहून आणलं आहे हे .आज्जीचा विषय तिने सांगितला ..शेवटी आजी म्हणते,” मला दोन मुलं होती,दोघंही वारली ,मालकही वारलं,माझं वयं आता ऐंशी आणि दोन (म्हणजे ८२) आहे ,लहान मुलाचे आज पित्र असतात पण मी काही पित्र बित्र करत बसली नाही ,मी म्हटलं पित्रापेक्षा पोराच्या वारसांना त्यांचा हक्क तेवढा मिळवून दिला पाहिजे .,म्हणुन मग मी लिहिलं..हा कागद द्यायला आली .मी म्हटलं पुढच्यावेळी सुनेला पाठवा , हे हे कागद घेऊन या वगैरे वगैरे …आजीच्या काळाच्या पुढे जाऊन नातवंडासाठी लढणं आणि ते करत असतांना समाजाने लावून दिलेल्या रुढी परंपरांना अगदी सहज नाकारणं आणि गरजेचं काय त्याचा विचार करुन आत्मविश्वासाने स्वःत अर्ज लिहून कार्यालयात येणं याचं विशेष वाटलं..
कित्येकदा आपण रुढीपरंपरात अडकून राहतो ,शिकले सवरलेले असून अर्जासाठी दुसर्ऱ्यांची मदत घेतो..आजीला हा confidence कुठून आला असेल ..?
उपजतच असेल की आयुष्याने दिलेल्या ढीगभर दुःखानी ..?
शेखर गायकवाड सर म्हणता तसे महसुली रंग अनुभवावे तेवढे कमी ..📝

20,794

subscribers

584

photos

2

videos