Pune Stampede : पुण्यात महिला पोलीस भरतीदरम्यान गोंधळ, चेंगराचेंगरीत मुली जखमी
नेमकं काय घडलं?
पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडले आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाली.
Pune police recruitment : ५१३ जागेसाठी ही रखडलेली भरती प्रक्रिया आता कुठे पार पडते आहे. असं असताना नियोजन नसल्याने या भरती प्रक्रियेला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे.
Source:- sakal media