HiSTORY by Hardikar @hardikarsir Channel on Telegram

HiSTORY by Hardikar

@hardikarsir


HiSTORY by Hardikar (English)

Welcome to HiSTORY by Hardikar, where history comes alive through captivating stories and detailed analysis! This Telegram channel, managed by the knowledgeable and passionate history enthusiast, Hardikar, is a haven for all history buffs and enthusiasts. From ancient civilizations to modern-day events, this channel covers a wide range of historical topics, making learning about the past both educational and entertaining. Hardikar's dedication to providing accurate and interesting historical insights sets this channel apart from others, ensuring that subscribers receive top-quality content with every post. Whether you're a student looking to expand your knowledge or simply someone who appreciates the richness of our past, HiSTORY by Hardikar is the perfect channel for you. Join today and embark on a journey through time like never before!

HiSTORY by Hardikar

10 Feb, 16:34


https://youtu.be/XPz3xtz___U?si=7uHV-6uzHFn18hpi

HiSTORY by Hardikar

10 Feb, 04:54


https://www.youtube.com/live/8k3ewKq4t4M?si=c9ddZpYY6jnaTFRy

HiSTORY by Hardikar

07 Feb, 18:58


Combine मुख्य चा syllabus अभ्यासक्रम

HiSTORY by Hardikar

02 Feb, 07:37


प्रश्न B☝️

HiSTORY by Hardikar

02 Feb, 06:01


#न्यारानडे

HiSTORY by Hardikar

02 Feb, 05:58


आजचा लोकसत्ता

HiSTORY by Hardikar

13 Jan, 02:49


https://www.youtube.com/live/PozZBwhqLeA?si=BmKdsgKqgYptGksW

HiSTORY by Hardikar

11 Jan, 14:42


उद्या भेटूयात YouTube वर

HiSTORY by Hardikar

11 Jan, 14:42


Photo from संदीप हर्डीकर

HiSTORY by Hardikar

10 Jan, 10:57


१० जानेवारी १९६६
भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
.
ताश्कंद करार, ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी केला गेला. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव दिसत असताना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.
लालबहादूर शास्त्री
सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या. १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणीनंतर या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले. ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन जिब्राल्टर या नावाने मोहीम काढून जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९६५ मध्ये सतरा दिवस चाललेले हे युद्ध संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या प्रयत्नांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी करार होऊन थंडावले. दोन्ही बाजूंचे हजारो सनिक या युद्धात मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हटले जाते. सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णित अवस्थेतच थांबले. या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि चीनमध्ये अधिक जवळीक झाली. ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी शामिल होते. करारात ठरल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्कसोडून १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली. भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या. ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अकस्मात निधन झाले.
या करारातील ठळक कलमे
संपादन करा
(१) संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली. *
(२) २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले. यांशिवाय करारातील इतर कलमे पुढीलप्रमाणे आहेत.
(३) एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.
(४) एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.
(५) एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे. *
(६) एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे. *
(७) युद्धकैद्यांची अदलाबदल करणे. *
(८) उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.
(९) अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे.
(संदर्भ इंटरनेट)

HiSTORY by Hardikar

08 Jan, 14:46


#रयतवारी
त्यानंतर १८२४-२८ दरम्यान प्रिंगलने भूमीचे नियमित सर्वेक्षण केले आणि निव्वळ उत्पन्नाच्या ५५% भाग सरकारचा हिस्सा म्हणून निश्चित केला. पण बहुतांश सर्वेक्षण दोषपूर्ण होते व उत्पन्नाचा केलेला अंदाज बरोबर नव्हता. परिणामी भूमीकर जास्त निश्चित करण्यात आला व त्यामुळे शेतकरी अधिकच त्रस्त झाले. अनेक शेतकऱ्यांनी पिके घेणे बंद केले व जमिनीचे फार मोठे क्षेत्र उजाड बनले

HiSTORY by Hardikar

02 Jan, 07:55


अभिनव भारत ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर १८९९ मध्ये नाशिक येथे म्हसकर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. पुढे काहीच दिवसांनी १ जानेवारी १९०० या दिवशी 'मित्रमेळा' ही त्या समूहाची प्रकट शाखा स्थापन करण्यात आली.
१९०४ मध्ये या संघटनेचे 'अभिनव भारत' असे नामकरण झाले. या संघटनेची व्याप्ती युरोपपर्यंत होती. या संघटनेत महाराष्ट्रातील शेकडो तरुण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर, कनिष्ठ बंधू नारायण दामोदर सावरकर, स्वातंत्र्यकवी गोविंद, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा अश्याअनेक सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या.
या संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध आणि मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला. अभिनव भारतने त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये पुणे येथे भव्य समारंभ करून अभिनव भारत ही संस्था विसर्जित केली.

HiSTORY by Hardikar

02 Jan, 07:53


दिनांक ३१ डिसेंबर १६०० रोजी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
.
द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सोळाव्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला.संजीव मेहता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.
.
२००३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या शेअर होल्डर्सनी कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये विकण्याची घोषणा केली होती. २००५ मध्ये सर्वाधिक शेअर्स खरेदी करण्याची प्रक्रिया संजीव मेहता यांनी पूर्ण केली.
.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी: डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमविले. ३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली. १६०८ च्या सुमारास त्यांनी मलाया द्वीपसमूहात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न केला. पण डचांनी त्यांचा पराभव केला. त्याच वेळी ब्रिटिशांनी भारताच्या भूमीवर सुरत येथे तळ दिला. विल्यम हॉकिंझच्या प्रयत्‍नाने १६१२ मध्ये मोगल बादशाहा जहांगीर याच्याकडून कंपनीला सुरत येथे वखार काढण्याची परवानगी मिळाली. सुरत येथील वखारीच्या स्थापनेनंतर कंपनीने, पेटापोली, अहमदाबाद, बर्‍हाणपूर, अजमीर, मच्छलीपटनम्, मद्रास इ. ठिकाणी व्यापारास सुरुवात केली. १६६८ मध्ये मुंबई बेट कंपनीला मिळताच, त्यास पूर्वेकडील व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यात आले.

कंपनीचा इंग्‍लंडमधील कारभार कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ह्या दोन मंडळांतर्फे चालत असे. कंपनीला दर १५ वर्षांनी आपल्या सनदेचे नूतनीकरण करावे लागे. १६६१ नंतर कंपनीच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्यात आले. पूर्वीचे तिचे नियंत्रित स्वरूप जाऊन संयुक्त भांडवल कंपनीत (जॉइंट स्टॉक कंपनी) तिचे रूपांतर करण्यात आले. अधिकारी वर्ग नेमणे, सैन्य ठेवणे, प्रदेश जिंकणे, किल्ले बांधणे, दिवाणी व फौजदारी न्यायनिवाडा करणे इ. महत्त्वाचे अधिकार कंपनीला मिळाले. बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळवून क्लाइव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यपद्धती (१७६५) ही कंपनीने भारतीय राजकारणात भाग घेण्यास केलेली प्रत्यक्ष सुरुवातच होय. १६८८ च्या इंग्‍लंडमधील राज्यक्रांतीनंतर १६९८ मध्ये दुसरी एक प्रतिस्पर्धी कंपनी स्थापन झाली. १७०३ मध्ये ह्या दोनही कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. १७४० मध्ये यूरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचे पडसाद हिंदुस्थानातही उमटू लागले. भारतात फ्रेंचांचा पराभव होऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला राज्यविस्ताराची संधी मिळाली. कंपनीच्या या विस्तृत सत्तेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाल्याने ब्रिटिश संसदेने १७७३ मध्ये ‘रेग्युलेटिंग ॲक्ट’ पास करून कंपनीच्या कारभारात बदल घडवून आणला. भारतीय राजकारणात ब्रिटिश संसदेच्या हस्तक्षेपास सुरुवात झाली. कंपनीचे क्षेत्र व्यापारापुरतेच मर्यादित करण्यात आले व ब्रिटिश सरकारने राजकीय कारभार आपणाकडे घेतला. १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपविण्यात आली. भारतातील आपल्या राजकीय सत्तेचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जपान चीन, ब्रह्मदेश, नेपाळ, इराण ह्या देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करून भारताचा राज्यकारभार स्वतःकडे घेतला. भारतीय स्वातंत्र्यानंतर (१९४७) ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली.
.

HiSTORY by Hardikar

02 Jan, 07:48


‘भागवत धर्माचा विकास’ ह्या लेखमालेमध्ये भक्ती या तत्त्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमानकाळापर्यंत कसकसा होत गेला, याचे विवेचन केले आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश (१९१२) या पुस्तकात प्राधान्याने धर्मपर लेख, तर पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक, शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख शिंदे लेखसंग्रह (१९६३) या पुस्तकात संग्रहीत करण्यात आले आहेत. त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासवर्णनपर, व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान (१९७९) ह्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे. शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजात (१८९८), इंग्लंडमध्ये (१९०१–०३) व येरवड्याच्या तुरुंगात (१९३०) असताना लिहीलेली रोजनिशी (प्रकाशन १७७९) व माझ्या आठवणी व अनुभव (प्रकाशन १९४३ १९५८) हे पुस्तक त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे. या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष प्रत्ययाला येतात.
अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा ‘कर्मवीर’ तसेच ‘महर्षी’ या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांचे पुणे येथे निधन झाले.
संदर्भ : १. कदम, शंकरराव मुलाटे, उषा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, औरंगाबाद, २०००.
२. चव्हाण, रा. ना. महर्षी शिंदे यांच्या आठवणी, वाई, १९७५.
३. दिघे, पी. डी. दोन कर्मवीर, कोल्हापूर, १९९२.
४. पवार, गो. मा. विठठ्ल रामजी शिंदे, नवी दिल्ली, १९९०,
५. बाबर, कृ. भा. कर्मवीर विद्यार्थी, भिलवडी १९३०.
पवार, गो. मा.
(संदर्भ , मराठी विश्वकोश)

HiSTORY by Hardikar

02 Jan, 07:48


मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा अशांसारख्या भागांत त्यांच्यासाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवासदन सुरू केले. शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई-वडिल हे ह्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या. मिशनच्या स्थपनेनंतर सहा वर्षांतच एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, १,१०० मुले, ५ वसतिगृहे, अन्य १२ संस्था व ७ आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांत वाढविला. १९१२ मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले. महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून, श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी ‘अहल्याश्रम’ ही सोयीस्कर इमारत बांधली. अस्पृश्यता निवारणकार्याचे १९२० पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले, तर विठठ्ल रामजी शिंदे हे ह्या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. १९२३ साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनीधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इ. बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती.
शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठयांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजनपक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली. १९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. पुणे येथे १९२८ साली भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. १९२६ ते १९३२ या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.
शिंदे यांना संशोधन-लेखनाची ओढ असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर, वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्त्वपूर्ण लेखन केले. अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख आस्थाविषय होता. अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. ‘बहिष्कृत भारत’ (१९०८), ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२), ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय. त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्वकाळापासून वर्तमानकाळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इ. विषयांचे विवेचन केले असून अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले आहे. कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर ऊहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे, हे त्यांनी दखविले आहे.

HiSTORY by Hardikar

02 Jan, 07:48


सामाजिक समरसता , हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (जन्म: २३ एप्रिल १८७३) यांचा आज स्मृतीदिन. (जन्म ०२ जानेवारी १९४४)
.
शिंदे, विठ्ठल रामजी : (२३ एप्रिल १८७३ – २ जानेवारी १९४४). महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते.
जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. विठ्ठल रामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले. १८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी ⇨ प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ⇨ ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश ॲण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये ॲमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.
धर्मप्रचारकार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल्अ मिशन, उदारधर्मग्रंथ वाचनवर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबईबाहेरील प्रार्थनासमाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली. प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले. शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थनासमाजचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध १९१० मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले. १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. १९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.
भारतातील विविध प्रांतांत केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, अशी प्रेरणा शिंदे यांना झाली. त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते. १९०१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन, भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९०६ मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे ह्या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे, हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला तर उच्चवर्णियांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे, हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला.

HiSTORY by Hardikar

30 Dec, 13:57


Great opportunity for all Punekars 👍 kindly forward to needy ones if you feel this can help someone.

HiSTORY by Hardikar

23 Dec, 09:57


नवीन तारखा :-

1) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :-

*2 फेब्रुवारी 2025*

2) महाराष्ट्र गट क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४:-

*4 मे 2025*

HiSTORY by Hardikar

19 Dec, 05:32


१९ डिसेंबर १९६१
गोवा मुक्ती दिन.
पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
.
गोवा मुक्ती संग्राम : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा मुक्त व्हायला 14 वर्षं का लागली?
मनस्विनी प्रभुणे - नायक
(बीबीसी मराठी)
.
भारताला स्वातंत्र्य मिळालं १५ ऑगस्ट १९४७ रोजी. पण त्यानंतर १४ वर्षं गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरू होता.
१४९८ ला पोर्तुगीज खलाशी 'वास्को द गामा' याने गोव्यात पाऊल टाकले. त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी १९ डिसेंबर १९६१ हा दिवस उजाडावा लागला. ४७ ते ६१ दरम्यान काय काय झालं हे पाहण्यासाठी गोव्याच्या मुक्तीसंग्रामाविषयी जाणून घ्यायला हवं.
भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण याच देशाचं महत्त्वाचं अंग असलेला भाग मात्र पारतंत्र्यात राहिला. गोवा मुक्त होण्यासाठी जवळ जवळ चौदा वर्षं झगडावं लागलं. हे अगदीच वेगळं उदाहरण आहे.
पूर्ण देश गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झाला पण पोर्तुगीजांच्या गुलामगिरीचे चटके सहन करणारा गोवा काही मुक्त होऊ शकला नाही . 1947 साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला पण गोव्यातील जनता मोकळा श्वास घेऊ शकली नाही.
उलट पोर्तुगीजांच्या गुलामगिरीच्या बेड्या आणखीनच घट्ट आवळल्या गेल्या. आपल्याच स्वतंत्र्य देशात गुलामांचं आयुष्य जगताना कसं वाटलं असेल इथल्या लोकांना? किती यातना झाल्या असतील? गोव्यात मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आजचा गोवा बघून या चिमुकल्या राज्याच्या मुक्ती संग्रामाची कल्पनाच येणार नाही.
गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने भाग घेतलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आता वयाची ऐंशी-नव्वदी पार केली आहे. या स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपाने इतिहास आजही जिवंत आहे.
निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या गोव्याकडे कायमच सगळे आकर्षित होतात. पोर्तुगीज देखील असेच आकर्षित झाले. इ.स. १४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात प्रवेश केला हे माहीतच आहे.
त्यानंतर व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इ.स. १५१० रोजी गोव्यात प्रवेश केला. तेव्हा विजापूरच्या आदिलशहाचा गोव्यावर अंमल होता. आदिलशहाची सत्ता उलटवून टाकून पोर्तुगीजांनी गोव्यावर आपली सत्ता स्थापन केली.
भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्षं राज्य केलं पण पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षांहून अधिक काळ राज्य केलं.
गोव्याला स्वातंत्र्य उशीरा का मिळाले?
भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली.
कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हेदेखील गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.
गोमंतकीयांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस स्वतः पारतंत्र्यात राहून अनुभवला. भारताला स्वातंत्र्य मिळून लोकांना मोकळा श्वास घेता येऊ लागला मात्र गोमंतकीय जनता अत्यंत्य हाल अपेष्टांमध्ये जगत होती. जनमानसात रोष होता.
मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी
पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त व्हावा यासाठी असंख्य कार्यकर्ते भूमिगत पद्धतीने आपलं काम करत होते. पण गोवा मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी पडली ती डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे.
डॉ. ज्युलिओ मिनेझिस या आपल्या मित्राच्या निमंत्रणामुळे डॉ. लोहिया काही दिवस विश्रांतीसाठी गोव्यात आले असता त्यांना पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवर घातलेले निर्बंध प्रत्यक्ष बघायला मिळाले.
इथल्या नागरिकांचं शोषण बघून ते खूप अस्वस्थ झाले. खुद्द लोहिया यांच्यावर पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी भाषण बंदी घातली होती.
पोर्तुगीज शासनाकडून गोव्यातील जनतेच्या मूलभूत अधिकारांची होत असलेली पायमल्ली लोहिया यांनी अनुभवली. पण असे कोणतेही निर्बंध न मानणाऱ्या लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी मडगाव येथे जाहीर सभा घेऊन पोर्तुगीजांविरुद्ध आवाज उठवला. या सभेला अनपेक्षित असा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
लोहिया यांचं भाषण ऐकायला लोकांनी प्रचंड गर्दी केली. तोवर गोव्यात सार्वजनिक सभांचं आयोजन एकदम थांबलं होतं. गोमंतकीय जनतेचा हुंकार ऐकणारं कोणीतरी आहे, असं याप्रसंगी इथल्या नागरिकांना वाटून गेलं.
गोवा मुक्ती संग्रामाची ही पहिली ठिणगी होती, ज्यामुळे भारत स्वतंत्र झाला तसा गोवा देखील मुक्त झाला पाहिजे ही भावना सर्वत्र पसरत गेली.
पंडित नेहरू यांची संभ्रमाची भूमिका

HiSTORY by Hardikar

19 Dec, 05:32


नियोजनबद्धरितीने आंदोलन सुरु राहिले. गोव्याच्या सर्व सीमा या स्वातंत्र्य सैनिकांनी व्यापून टाकल्या होत्या.
महिलांचा मोठा सहभाग आणि बलिदान देखील
गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. शेकडोंनी महिला कार्यकर्त्या या संग्रामात सहभागी झाल्या आणि नुसत्याच सहभागी झाल्या नाहीत तर त्यांनी तुकड्यांचं नेतृत्व केलं, प्रसंगी हातात शस्त्र घेऊन लढल्या देखील.
यात सुधा जोशी, सिंधुताई देशपांडे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, शांत राव या महिला लढ्यात अग्रभागी होत्या.
कॉ. कमला भागवत यांनी आपल्या 'न संपलेली वाट' या आत्मचरित्रात गोवा मुक्ती संग्रामातील अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात महिलांच्या सहभागाबद्दलही त्यांनी बरंच लिहिलं आहे.
यात त्यांनी म्हणलंय की, गोवा मुक्ती संग्रामात महिलांनी सत्याग्रहींची व्यवस्था करणं, स्वयंपाक करणं ही तर केलंच, पण न घाबरता सत्याग्रहींच्या तुकडीचं नेतृत्वही केलं. या संग्रामात महिला सर्व स्तरांवर कार्यरत होत्या.
कर्नल सिंग या स्वातंत्र्य सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून निडरपणे महिला पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढल्या. केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव या पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात धारातीर्थी पडल्या. अनेक जणी जखमी झाल्या.
स्वातंत्र्याचा दिवस उजाडला
अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेरीस गोव्याला स्वातंत्र्य मिळायला हवं, याविषयी मत बनू लागलं . १९५८ च्या आसपास पोर्तुगीज वसाहतवाद शक्य तितक्या लवकर नामशेष व्हायला पाहिजे, असा मतप्रवाह वाढत हेला आणि देशांतर्गत जनतेकडून आणि आफ्रिकी राष्ट्रवादी नेत्यांकडून दबाव वाढत गेला.
त्याच काळात दिल्ली येथे झालेल्या गोमंतकीय सर्वपक्षीय बैठकीत देखील पोर्तुगीजांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करण्यात यावी याची जोरदार मागणी झाली.
तरीही यात एकमत होण्यास दोन वर्षं गेली. पोर्तुगीजांनादेखील परिस्थितीचा थोडाफार अंदाज आला होता. कोणत्याही क्षणी भारतीय लष्कर गोव्यात शिरू शकतं याची कुणकुण त्यांनाही लागली होती. पणजी, वास्को, मडगाव, म्हापसा सारख्या शहरांत संचारबंदी घोषित केली होती.
स्वातंत्र्यसैनिकांनी भारत सरकारच्या आदेशाची वाट न बघता आपला लढा सुरू ठेवला होता. अखेरीस १८ डिसेंबर १९६१ रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या.
पोर्तुगालने ब्रिटन, अमेरिका यासारख्या मित्र देशांकडे मदतीचा हात मागितला होता. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कम आणि योग्य असल्यामुळे या मित्र देशांनी पोर्तुगीजांना मदत करणं नाकारलं.
तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे लष्करी कारवाईसाठी आग्रही होते. पोर्तुगीज सरकारची कोंडी करण्यात भारतीय लष्कर आणि स्वातंत्र्यसैनिक यशस्वी झाले. पत्रादेवी येथे स्वतंत्र सैनिकांवर पोर्तुगीज सैन्याने मोठा गोळीबार केला. त्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले.
अखेरीस १९ डिसेंबर १९६१ च्या रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले. पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा अखेरीस मुक्त झाला.
(संदर्भ बी बी सी मराठी)

HiSTORY by Hardikar

19 Dec, 05:32


१९२८ साली अखिल भारतीय काँग्रेस स्थापना झाली. त्यानंतर एका वर्षाने डॉ. टी. बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर आदींनी गोव्यात काँग्रेसची स्थापना करण्यात आली. पोर्तुगीजांनी लादलेल्या निर्बंधांमुळे गोव्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भूमिगतपणे काम करावं लागत होतं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकार गोव्यालाही पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करेल अशी एक भाबडी अशा गोमंतकीय जनतेच्या मनात जागी होऊ लागली.
परंतु नुकतेच पंतप्रधान झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मात्र शांतता मार्गाने समेट घडवून आणला पाहिजे अशी भूमिका घेतल्यामुळे गोव्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नाईलाज झाला. त्यांनाही कोणतीच ठाम भूमिका घेता येईना.
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त आय.पी.एस अधिकारी प्रभाकर सिनारी यांनी आपल्या 'अंधारातून प्रकाशाकडे' या आत्मचरित्रात या सगळ्या परिस्थितीचं सविस्तर वर्णन केलं आहे.
ते म्हणतात, 'पोर्तुगीज आणि गोवा यांच्यामधील तेढीवर शांततापूर्वक तोडगा काढण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध होतं. त्यामुळे सार्वभौम पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.'
'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही', असंही सिनारी लिहितात. नेहरूंच्या या भूमिकेबद्दल आपल्या पुस्तकात त्यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
प्रभाकर सिनारी म्हणतात, 'जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.'
'आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा टिकून ठेवण्याच्या नादात त्यांनी गोमंतकीय जनतेचा विचार केला नाही. नेहरूंच्या धोरणाबद्दल सत्याग्रहींच्या मनात शंका निर्माण झाली. शांततापूर्ण समेट घडवून आणण्याचा पुरस्कार करून ते एका अर्थी पोर्तुगीजांनाच मदत तर करत नाहीत ना असा त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता', असं त्यांनी म्हटलं आहे.
गोमंतकीय राष्ट्रवादी पिढीचा उदय
याच काळात गोमंतकीय मातीतून एका नव्या पिढीचा उदय झाला, जी पोर्तुगीजांची सत्ता आणि सालाझारच्या हुकूमशाहीला टक्कर देण्यासाठी सज्ज होत होती.
यात प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे यांसारख्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्याबरोबर गावागावातून अनेक तरुण पुढे आले. 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली.
अनेक युवक आपणहून यात सहभागी झाले. या दलाचं नेतृत्व प्रभाकर सिनारी यांनी केले. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक छोटे-मोठे हल्ले या सशस्त्र दलाने यशस्वीपणे केले.
तर अनेक स्वातंत्र्य सैनिक सत्याग्रही पद्धतीने या लढ्यात सहभागी होते यात पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस आदींचा सहभाग होता.
डॉ. टी. बी. कुन्हा यांना गोव्यातील राष्ट्रवादी चळवळीचे जनक मानलं जातं. डॉ. कुन्हा यांना आठ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यात त्यांना पोर्तुगालच्या तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते.
१९५३ साली त्यांची तिथून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी 'आझाद गोवा' आणि स्वतंत्र गोवा नावाची दोन वृत्तपत्र सुरु केली होती. पण यांचं दुर्दैव असं कि गोवा मुक्त झालेला बघण्याआधीच त्यांचं निधन झालं.
महाराष्ट्राने गोवा मुक्ती संग्रामात दिलेली साथ
गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने मोलाची साथ दिली हे त्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांवरूनच दिसून येतं. शिवाय यात विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या.
उजव्या-डाव्या, समाजवादी अशा विविध विचारधारांमधील अनेक कार्यकर्ते गोव्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या एकमताने एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने स्वतःला वाहून घेत होते.
महाराष्ट्रातून असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकड्या वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. पुण्यात 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना झाली. यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, पं. महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळतुळे, हिरवे गुरुजी आदींचा सहभाग होता.
विशेष म्हणजे संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने सहभागी झाले होते. 1955 साली सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी गोव्याला रवाना झाली आणि त्यानं गोव्याच्या हद्दीवरच पोर्तुगीजांनी अटक केली. त्यानंतर एकामागे एक स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकड्या येतच राहिल्या.

HiSTORY by Hardikar

18 Dec, 10:31


Video from संदीप हर्डीकर

HiSTORY by Hardikar

16 Dec, 17:36


https://youtu.be/_OrCE0OlZJo?si=Q-JHBKDMg2Q-TO9Z

HiSTORY by Hardikar

16 Dec, 17:36


https://youtu.be/_OrCE0OlZJo?si=a6PNi4wXgwLiUicL

HiSTORY by Hardikar

09 Dec, 18:47


100, 125, 150, 175, 200 वर्ष

HiSTORY by Hardikar

09 Dec, 15:16


https://youtu.be/DT-hNZGPIxQ?si=CWaC2T1GkNwMrY0Z

HiSTORY by Hardikar

05 Dec, 18:18


https://youtu.be/USou8vOWeKg?si=6mYC0IvuqRl0f440

HiSTORY by Hardikar

04 Dec, 16:46


ज.स. करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या 'स्वदेशी असोसिएशन'ची स्थापना झाली.

HiSTORY by Hardikar

04 Dec, 16:45


१९०६ मध्येच मुंबईत खादी विकण्यासाठी मुनमोहनदास रामजी यांनी सहकारी तत्वावरील 'बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स'ची स्थापना केली होती.

HiSTORY by Hardikar

04 Dec, 16:44


१९०७ मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या स्वदेशी संमेलनात टिळकांनी एक प्रस्ताव पुढे ठेवला. त्यात असे म्हटले होते की, ''स्वदेशी दुकाने सुरू करण्यास मदत करण्यासाठी; तसेच स्वदेशी वस्तू विकणाऱ्या दुकानांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.''

HiSTORY by Hardikar

02 Dec, 16:07


कामगार व उद्योग परीक्षा विशेष

HiSTORY by Hardikar

02 Dec, 16:06


https://youtu.be/8UMVp6x0ZRc?si=IjoOhdhvvs7qhORF

HiSTORY by Hardikar

02 Dec, 06:05


https://www.youtube.com/live/5My07cPHYRg?si=D70bn3jx7Qfh1oX7

HiSTORY by Hardikar

01 Dec, 07:05


11वी चे पुस्तकीतील प्रश्न ☝️

HiSTORY by Hardikar

01 Dec, 06:55


मी MCQ series मध्ये टाकलेले explaination

HiSTORY by Hardikar

01 Dec, 06:51


लाहोर येते ☝️

HiSTORY by Hardikar

18 Nov, 15:00


Live चालू आहे ☝️

HiSTORY by Hardikar

18 Nov, 15:00


https://youtu.be/--hQ2A8YH_A?si=KsjIzX1-G77AuVYQ

HiSTORY by Hardikar

17 Nov, 10:50


कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा आज जन्मदिन (जन्म १३ नोव्हेंबर १८७३).
(मृत्यू: १० मार्च १९५९)
.
मुकुंद रामराव जयकर
मुकुंद रामराव जयकर : (१३ नोव्हेंबर १८७३–१० मार्च १९५९). भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ, वक्ते व राजकीय पुढारी. मुंबईस मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. एल्फिन्स्टन विद्यालय व सेंट झेवियर महाविद्यालय यांतून शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून लवकरच त्यांनी नाव कमावले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नाही; तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले. या दृष्टीनेगांधी–आयर्विन करार (१९३१) आणि पुणे करार (१९३२) या बाबतींत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. याशिवाय त्यांनी टिळक स्वराज्य फंडाला मोठी देणगी दिली.
मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी १९२३–२६ च्या दरम्यान स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. पुढे ते मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते (१९२६–३०). प्रथम ते स्वराज्य पक्षात होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले; पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतील पुणे विद्यापीठाची स्थापना, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. वकिलीच्या धंद्यात त्यांना अतोनात पैसा मिळाला. त्यांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगी रूपाने दिले.
त्यांनीस्टडीज इन वेदान्त हे पुस्तक संपादित केले आणिमराठा मंदिर या नियतकालिकातून आपले हिंदू धर्मासंबंधीचे विचार लोकांसमोर मांडले. त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. लहानपणापासून त्यांना कलासाहित्याची आवड होती. शास्त्रीय संगीताचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचे इंग्रजी वक्तृत्व अत्यंत प्रभावी असे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Jayakar, M. R.The story of My life, 2 Vols., Bombay,1958–59.
लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
(माहिती इंटरनेट वरून साभार)

HiSTORY by Hardikar

17 Nov, 10:34


(१६ नोव्हेंबर १९१५)
गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले. सर्व क्रांतिकारक हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
.
विष्णू गणेश पिंगळे
विष्णू गणेश पिंगळे (२ जानेवारी, १८८९:तळेगांव ढमढेरे, - १६ नोव्हेंबर, १९१५:लाहोर) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.

विष्णू पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगांव ढमढेरे या गावचे राहणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णू पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णू पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.
.
दि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ८ क्रांतिकारक
.
विष्णू गणेश पिंगळे
कर्तारसिंह सराबा
सरदार बक्षीससिंह
सरदार जगनसिंह
सरदार सुरायणसिंह
सरदार बुटासिंह
सरदार ईश्वरसिंह
सरदार हरनामसिंह
.
(विकिपीडिया या संकेतस्थळा वरून साभार)
कॉपी पेस्ट
#क्रांतिकारक

HiSTORY by Hardikar

17 Nov, 10:32


स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय (जन्म: २८ जानेवारी १८६५) यांचा आज स्मृतीदिन. (मृत्यू १७ नोव्हेंबर १९२८)
.
राय, लाला लजपत : (२८ जानेवारी १८६५ – १८ नोव्हेंबर १९२८). भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर क्रांतिकारक नेते. त्यांचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके (जागराँ तहसील) या गावी जैन घराण्यात झाला. त्यांची आई (गुलाबदेवी) मूळची शीख होती. वडील लाला राधाकिशन हे फार्सी व उर्दू विषयांचे शिक्षक आणि मनाने इस्लामचे अनुयायी होते. धार्मिक सहिष्णुतेच्या वातावरणात वाढत असलेल्या लजपतरायांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे एल्एल्‌. बी. ही पदवी मिळविली (१८८६) आणि अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाली. पुढे १८९२ साली लाहोरला स्थायिक होऊन त्यांनी तेथे वकिली सुरू केली. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचे राधादेवी या हिस्सार येथील अगरवाल कुटुंबातील मुलीशी लग्न झाले (१८७७). त्यांना दोन मुलगे व पार्वती नावाची मुलगी होती. त्याकाळी जातीच्या भिंती तोडून समर्थ होऊन परकी इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आर्य समाजाची पंजाबी हिंदूंवर मोहिनी पडू लागली होती. लालाजींनाही त्याचे आकर्षण वाटले आणि ते सक्रिय आर्य समाजवादी झाले. अर्जविनंत्यांचे नेमस्त राजकारण चालविणाऱ्या काँग्रेसबद्दल त्यांना सहानुभूती वाटेना. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी हिरिरीने प्रचार केला तथापि १९०४ मध्ये पंजाबी नावाचे पुढे विख्यात झालेले पत्र सुरू करून पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते काँग्रेस अधिवेशनास गेले. तेथे त्यांचा एवढा प्रभाव पडला, की ब्रिटिश जनतेसमोर हिंदी जनतेची कर्झनशाहीतील दुःखे व किमान राजकीय मागण्या मांडण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मुहंमद अली जिना आणि गो. कृ. गोखले यांच्याबरोबर लालाजींचीही निवड झाली. मे १९०५ मध्ये ते इंग्लंडला गेले परंतु तेथील लोक स्थानिक प्रश्नांत एवढे मग्न होते की लालाजींच्या दौऱ्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट परतल्यावर बंगालची फाळणी जाहीर झाली.

अनेक वर्षे सत्तारूढ असलेला कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष निवडणुकीत १९०५ मध्ये हरला. नव्या उदारमतवादी पक्षाबद्दल काँग्रेसच्या नेमस्त नेत्यांना फार आशा होत्या. त्यामुळेच डिसेंबरच्या बनारस काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात गोखल्यांनी फाळणीला विरोध करूनही एकूण सौम्य भाषा वापरली. त्या वर्षी देशात दुष्काळ पडला होता व कर्झनशाहीमुळे लोक त्रस्त झाले होते, या कारणांसाठी ब्रिटिश युवराजांचे स्वागत करणाऱ्या पहिल्याच ठरावाला लालाजींनी तीव्र विरोध केला. त्यांना लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल यांसारख्या जहाल नेत्यांचाही पाठिंबा मिळाला. खुल्या अधिवेशनात या ठरावावरील चर्चेचे वेळी जहाल नेते अनुपस्थित राहिले. बंगाल फाळणी आणि कर्झनशाहीच्या निषेधार्थ लाखो लोकांचे भव्य निदर्शन करावे, ही मागणीही लालाजींनी केली. इंग्लंडमधील सत्तारूढ उदारमतवादी पक्षावर आणि विशेषकरून भारतमंत्री मोर्ले यांच्यावर श्रद्धा ठेवून नेमस्त नेते फाळणीविरोधी आंदोलन बंगालपुरते सीमित राखण्याची शिकस्त करीत होते. १९०६ मध्ये जहालांनी या धोरणाला सक्त विरोध केला आणि ब्रिटिश मालावर साऱ्या देशभर बहिष्कार टाकण्यासाठी प्रचाराची मोहीम उघडली. पुढील वर्षी लालाजींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न धसाला लावला. १८५७ च्या संग्रामाच्या सुवर्णजयंतीसाठीही त्यांनी लोकजागृती सुरू केली. कालवे आखल्यावर मोठ्या प्रमाणावर मोकळी पडलेली जमीन बाहेरच्या शेतकऱ्यांना काही अटींवर देण्यात आली होती. वीस-पंचवीस वर्षांनंतर त्यांच्यावर नवे निर्बंध लादणारे कॉलनायझेशन बिल पंजाब सरकारने संमत केले. त्याच वेळी तीन जिल्ह्यांतील पाणीपट्टी दिडीने वाढविण्यात आली. लालाजी आणि त्यांचे सहकारी अजितसिंग (हुतात्मा भगतसिंगांचे चुलते) यांच्या प्रचाराला जनतेने, शेतकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे पीडित निवृत्त सैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. १० मे १९०७ रोजी हजारो पंजाब्यांना घेऊन लाहोरचा किल्ला सर करून १८५७ ची सुवर्णजंयती साजरी करण्याची योजना लालाजींनी आखली आहे, अशी ओरड सरकारधार्जिण्या यूरोपीय पत्रांनी सुरू केली. पंजाब सरकारनेही बंडाची आवई उठविली. शेवटी आदल्या दिवशी म्हणजे ९ मे रोजी लालाजी आणि अजितसिंग यांना अटक करून मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. देशात आणि देशाबाहेर निषेधाची लाट उसळली. व्हॉइसरायने पंजाब कॉलनायझेशन बिलाला मंजुरी नाकारली. वाढीव पाणीपट्टी रद्द झाली. पंजाब शांत झाला. मात्र सरकारने वृत्तपत्रांची गळचिपी करणारे काळे बिल व (तथाकथित) राजद्रोही सभांना बंदी घालण्याचे बिल आणले. मोर्लेने वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यास संमती दिली नाही पण राजद्रोही सभांवर बंदी घालण्यास हरकत घेतली नाही. सभाबंदीचा कायदा झाल्यावर तीनच दिवसांनी लजपतराय आणि अजितसिंग यांची सुटका झाली.

HiSTORY by Hardikar

17 Nov, 10:32


लालाजींना पंजाबचा सिंह म्हणून गौरविण्यात येऊ लागले. त्यांच्या कारावासाच्या काळात त्यांच्या अनेक अनुयायांनी सौम्य धोरण अवलंबून लोटांगणवादी भूमिका घेतली. त्याची दुःखद जाणीव त्यांना सुटकेनंतर झाली. काही शिखांनी तर अजितसिंग हे शीख नव्हतेच, असे पत्रक काढले. आर्यसमाजी नेत्यांनी आपले राजकारणाशी काहीही कर्तव्य नाही असे वारंवार घोषित केले. त्यामुळे महिन्याभराने भरलेल्या सुरत काँग्रेसचे अध्यक्ष व्हा, असा प्रस्ताव पंजाबबाहेरील जहाल नेत्यांनी मांडला. त्याला लालाजींनी संमती दिली नाही. हद्दपारीच्या कालात गोखल्यांनी सतत त्यांची बाजू मांडली असल्यामुळे आपले जहाल समर्थक आणि मवाळ गट यांच्यात तडजोड करण्याची त्यांनी शिकस्त केली. त्यामुळे मनाने व वृत्तीने जहाल पण शरीराने मवाळ गटात अशी सुरतला काँग्रेस दुभंगल्यावर लालाजींची अवस्था झाली. पुढील वर्षी गदरचे संस्थापक हरदयाळ आणि जहाल नेते खापर्डे व पाल यांच्यासह ते इंग्लंडला गेले. गदर क्रांतीचे प्रत्यक्ष संचालन करणारे लालाजींचे आप्त रामचंद्र पेशत्वरी त्यावेळी कारावासात होते. नवीन सुधारणा कायदा झाल्यावर लालाजी परत आले. गोखल्यांच्या भारत सेवक समाजाच्या धर्तीवर त्यांनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटी काढली. आर्य समाजाच्या दयानंद कॉलेजातील जहाल देशभक्तीचा भर ओसरलेला पाहून राष्ट्रीय कॉलेज काढले. महायुद्ध सुरू झाल्यावर ते आपले चिटणीस डॉ. हर्डीकर यांना घेऊन अमेरिकेस गेले. तेथे त्यांचे पैशाअभावी फार हाल झाले. शेवटी लोकमान्य टिळकांनी त्यांना १५,००० रुपये धाडले.

जालियनवाला बाग हत्याकांडाने व्यथित होऊन १९२० मध्ये लजपतराय परत आले. खिलाफत आंदोलनाला तात्त्विक विरोध असूनही त्यांनी जुळते घेतले. त्या सालाच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद सर्वानुमते त्यांना देण्यात आले. सैनिकांत बहिष्काराचा प्रचार करण्यासाठीच्या उच्च समितीवर लालाजींची नियुक्ती झाली. नोव्हेंबर १९२१ मध्ये त्यांना अटक होऊन शिक्षा झाली. प्रकृती खालावल्याने लवकर सुटका झाली. मोतीलाल, चित्तरंजन दास यांबरोबर ‘फेर’ गटात राहून त्यांनी स्वराज्य पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. खिलाफत आंदोलनात मलबारमध्ये माथेफिरू मोपल्यांनी भीषण दंगली केल्या व आक्रमक मुस्लिम जातीयवाद उफाळून आला. त्याची प्रतिक्रिया होऊन बऱ्याच राष्ट्रीय नेत्यांनी हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन केले. १९२५ च्या पहिल्या अधिवेशनाचे लालाजी अध्यक्ष होते. १९२६ नंतर स्वराज्य पक्षाने असेंब्लीवर बहिष्कार घातला. त्यात लालाजी सामील झाले नाहीत. मात्र पुढे जयकर, केळकर प्रभृती राष्ट्रीय पक्षातर्फे पुन्हा निवडून आले. १९२८ च्या फेब्रुवारीमध्ये केंद्रीय असेंब्लीत सायमन कमिशनवर सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता. तो बहुमताने संमत झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनीच निदर्शनाचे नेतृत्व केले. त्यातील जबर मारहाणीने ते आजारी पडले आणि त्यातच १८ तारखेला त्यांचा अंत झाला. महिन्याभरात भगतसिंग आदी क्रांतिकारकांनी साँडर्सची हत्या करून लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला.

सामाजिक सुधारणा व हरिजनोद्धार या बाबतींत लालाजींची तळमळ कधीच कमी नव्हती. त्यांच्या अन्हॅपी इंडिया या विशेष गाजलेल्या ग्रंथावर आणि इतर लेखनावर मिळालेले दोन लाख रुपये त्यांनी या कार्यासाठी दान केले.

देशाची व पंजाबची फाळणी १९४७ मध्ये झाली पण १९२० च्या सुधारणांनंतर पंजाबमध्ये फाझली हुसेन सरकारने उघड उघड मुस्लिम-धार्जीणे व हिंदु-शीख विरोधी धोरण आचरले. त्याचा निषेध म्हणून १९२५ च्या हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना लालाजींनी प्रथमच जाहीरपणे पंजाबच्या फाळणीची मागणी केली होती.

संदर्भ : 1. y3wuohi, V. C. Ed. Lajpat Rai: Writings and Speeches, New Delhi, 1965.

2. Nagarkar, Vasant, Genesis of Pakistan, Bombay, 1975.

3. Nanda, B. R. Gokhale: Indian Moderates and British Raj, Oxford, 1977.

४. नगरकर, वसंत, भारतीय स्वातंत्र्य संग्राम, पुणे, १९८१.

नगरकर, व. वि.

HiSTORY by Hardikar

17 Nov, 10:32


लाला लजपात राय

HiSTORY by Hardikar

17 Nov, 10:30


#सावरकरी
क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

स्वा. सावरकरांच्या 'अभिनव भारत' या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे !
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावच्या गरीब घरात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींनंतरचं हे शेंडेफळ. चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या स्वभावामुळे ते कोल्हापूरच्या ‘समर्थ विद्यालयात’ दाखल झाले. नंतर ते विद्यालय तळेगाव दाभाडे इथं सुरु झालं, तिथं ते आले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारं हे विद्यालय ब्रिटीशांच्या रोषाला बळी पडून १९१० मध्ये बंद झालं. मग त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली, नंतर स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग टाकले. मग मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता ते १९११ मध्ये थेट अमेरिकेत पोहोचले. शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिथे त्यांनी अपार कष्ट केले. ते अमेरिकेत असल्याची वार्ता कित्येक महिन्यांनी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचली. सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, हिंदुस्तानात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला आणि विष्णु गणेश पिंगळे आपल्या कष्टसाध्य सुंदर भविष्यावर अक्षरश: लाथ मारून गदर मध्ये सामिल झाले आणि हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.
सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शिख क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्थानात पोहोचलं. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परतत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळे गुप्तपणे हिंदुस्तानात परतले ते ही शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषणं करतच. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी भाषेवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगाल मध्ये वेश, नावं बदलून क्रांतिकारकांच्या भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. हिंदू, शीख, मुसलमान एकत्र आले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ यांच्या सहाय्यानं पिंगळे यांनी उठावाची योजना आखली होती. सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजं पेरली गेली होती. शस्त्र, बॉंबगोळे जमवले गेले होते. गनिमी काव्यानं ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्याची ती योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखी पण एक यशस्वी उठावणी झाली असती. पण याही वेळी फितुरी झाली आणि बाजी पलटली. मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीनं विष्णु गणेश पिंगळे पकडले गेले, कट उधळला गेला. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सापडले. या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांची फाशीची शिक्षा कायम झाली. ते होते विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, बक्षिससिंग, जगनसिंग, सुरायणसिंग, ईश्वरसिंग आणि हरनामसिंग. त्यांना १७ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आलं. ( Who's who of Indian Martyrs या शासकीय ग्रंथानुसार हा दिनांक दिला आहे) हे सर्वजण खरोखरच हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले. फाशीची शिक्षा ऐकल्यावरचे विष्णु गणेश पिंगळे यांचे शब्द होते ‘so that’s’ all’. त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते, "हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देत आहोत ते कार्य तू पूर्ण कर". विष्णू गणेश पिंगळे यांचं धैर्य, मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती याचं क्लिव्हलंड या अधिकाऱ्यालाही कौतुक वाटलं होतं. या सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबियाचं आयुष्यही त्यांच्याबरोबरच पणाला लागत असे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या नातेवाईकांचे भोगही चुकले नाहीत. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विष्णू गणेश पिंगळे, त्यांचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबिय या साऱ्यांचं हे स्मरण !!
..मंजिरी मराठे

HiSTORY by Hardikar

17 Nov, 10:30


विष्णू गणेश पिंगळे

HiSTORY by Hardikar

17 Nov, 03:29


भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर (जन्म-२१ ऑगस्ट १८७१)
यांचा आज स्मृतीदिन (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५).
.
गोपाळ कृष्ण देवधर : (२१ ऑगस्ट १८७१–१७ नोव्हेंबर १९३५). थोर भारत सेवक व पुण्याच्या प्रसिद्ध ‘सेवासदन’ संस्थेचे एक शिल्पकार. जन्म पुणे येथे. वडील कृष्णाजी नारायण देवधर एका कंत्राटदाराकडे कारकून होते. प्रतिकूल परिस्थितीत असूनही आपल्या स्वावलंबनाने व चिकाटीने पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’, ‘फर्ग्युसन कॉलेज’ या संस्थातून शिक्षण घेऊन ते १८९७ मध्ये बी. ए. व पुढे १९०३ साली एम्. ए. झाले. मुंबई विद्यापीठातून मराठी हा वैकल्पिक विषय घेऊन एम्. ए. होणारे ते पहिले विद्यार्थी होत. त्यांच्या शैक्षणिक जीवनात सुरुवातीला ‘न्यू इंग्लिश स्कूल’ चे प्राचार्य वामन शिवराम आपटे व पुढे गोपाळ गणेश आगरकर यांचे प्रोत्साहन त्यांना सतत लाभले. उच्च शिक्षणकाळातच ख्रिस्ती मिशनऱ्यांना मराठी शिकविण्याचे कामही त्यांनी केले. मिशनऱ्याच्या सहवासामुळे त्यांची मूळची सेवावृत्ती अधिकच बळावली. बी. ए. झाल्यानंतर मोठ्या मानाच्या नोकऱ्यांचा मोह टाळून त्यांनी मुंबईच्या ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले (१८९७) व पुढे १९०० मध्ये ते त्या शाळेचे मुख्याध्यापक झाले. त्यांचा विवाह १८८६ सालीच पुण्याच्या सोहनी कुटुंबातील अन्नपूर्णाबाई यांच्याशी झाला.

इ. स. १९०४ च्या सुमारास गोपाळ कृष्ण गोखल्यांशी त्यांचा संबंध आला व त्यांच्याबरोबर १९०५ साली ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना करण्यात त्यांनी भाग घेतला. या समाजाचे ते पहिले सभासद झाले. १९०६ मध्ये पुण्यातील प्लेगच्या साथीत त्यांनी रोग्यांच्या शुश्रुषेचे व आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनाचे फार मोठे समाजकार्य केले. त्यातूनच प्रशिक्षित परिचारिकांची गरज समाजाला किती मोठी आहे, याची जाणीव त्यांना झाली. रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या ‘सेवासदन’या संस्थेचे ते अनेक वर्षे कार्यवाह होते. या संस्थेच्या उभारणीत व भरभराटीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीचे ध्येयधोरण ठेवून ही संस्था त्यांनी नावारूपास आणली. या संस्थेने पुण्याच्या ‘ससून हॉस्पिटल’ च्या परिचारिकांसाठी जी इमारत बांधली, तिला देवधरांच्या मृत्यूनंतर ‘देवधर नर्सेस हॉस्टेल’असे नाव देण्यात आले. १९२१ मध्ये मलबारमधील मोपला बंडाच्या वेळी आपद्ग्रस्तांचे पुनर्वसनकार्य त्यांनी केले. पुण्याजवळच खेड–शिवापूर या खेड्यात एक ग्रामीण सेवा केंद्र त्यांनी सुरू केले. भारतीय समाजाच्या दृष्टीने सहकारी चळवळीची गरज त्यांनी त्या वेळीच ओळखली होती व एक सहकारी पतपेढी त्यांनी १९०९ मध्ये हडपसर येथे स्थापनही केली होती. त्यासाठी प्रशिक्षित सेवकवर्ग तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘बाँबे को–ऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट’सुरू केली. १९२७ ते १९३५ या काळात ते ‘भारत सेवक समाजा’ चे अध्यक्ष होते. लखनौ (१९२९) आणि मद्रास (१९३३) येथील ‘ऑल इंडिया सोशल कॉन्फरन्स’चेही ते अध्यक्ष होते. १९१८ ते १९१९ या कालावधीत त्यांनी यूरोप खंडाचा प्रवास केला.

‘भारत सेवक समाजा’च्या ज्ञानप्रकाश या दैनिकाचे व शेती आणि शेतकरी या नियतकालिकांचे संपादनकार्य त्यांनी केले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यताविरोधी संघटनेचे ते प्रांतिक अध्यक्ष होते. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

विशुद्ध सेवाभावाने व राष्ट्रीय उद्धाराचे भान राखून आमरण लोकसेवा करणारा एक थोर भारत सेवक म्हणून देवधरांचे नाव कायम राहील. ‘सेवासदन’ संस्था ही तर त्यांच्या समाजसेवेचे मूर्तिमंत प्रतीक हो

HiSTORY by Hardikar

14 Nov, 17:35


@downloadlyio_bot

HiSTORY by Hardikar

14 Nov, 06:05


साळवे, लहुजी राघोजी : (१४ नोव्हेंबर १७९४–१७ फेब्रुवारी १८८१). एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन, दाट झाडीमध्ये जागा निवडली. महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती. त्याचेही मन वळवून त्याला क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले. अठराशे सत्तावनच्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या. लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली.
लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्घ झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत. वृद्घापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले.

HiSTORY by Hardikar

14 Nov, 06:05


https://www.esakal.com/saptarang/dr-chandrakant-shahasane-writes-lahuji-raghoji-salve-history-pjp78

HiSTORY by Hardikar

11 Nov, 14:52


https://youtu.be/1XCh-e8wBig?si=Tf0FkfkWesVUEViv

HiSTORY by Hardikar

06 Nov, 15:22


Join this exclusive trading channel for free BANKNIFTY tips! Accepting first 199 members only, so don't miss out. Join now! https://t.me/+9-ICsMFBGqo1ODhl

HiSTORY by Hardikar

06 Nov, 15:22


Trump तात्यांचा तुमाला संदेश

HiSTORY by Hardikar

05 Nov, 11:09


https://www.loksatta.com/maharashtra/interesting-facts-about-vasudev-balwant-phadke-father-of-indian-revolutionary-movement-scsg-91-2007613/

HiSTORY by Hardikar

05 Nov, 11:09


https://www.mymahanagar.com/featured/birthday-of-the-revolutionary-vasudev-balwant-phadke/140795/

HiSTORY by Hardikar

04 Nov, 15:10


तिसरी टेस्ट ☝️

HiSTORY by Hardikar

04 Nov, 15:10


https://youtu.be/WSCgWa-TFjo?si=ubiP2fGOACfakS0z

HiSTORY by Hardikar

30 Oct, 07:45


भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती (जन्म १२ फेब्रुवारी १८२४) यांचा आज स्मृतिदिन (मृत्यू ३० ऑक्टोबर १८८३) विनम्र अभिवादन.
.
दयानंद सरस्वती : (? १८२४–३० ऑक्टोबर १८८३). आधुनिक वेदमहर्षी, निर्भय धर्मसुधारक, महापंडित, कुशल संघटक व आर्यसमाजाचे संस्थापक. काठेवाडमधील मोरवी राज्यातील टंकारा या गावी दयानंदांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करसनजी तिवारी असे होते. हे पिढिजात सावकार व जमीनदार होते. तसेच ते महसूल खात्यात मोठे सरकारी अधिकारीही होते. करसनजी हे सामवेदी औदिच्य ब्राह्मण होते. ते शैवपंथी होते. समाजात त्यांना बराच मान होता. अशा कुलीन कुळात दयानंद जन्मले. त्याचे नाव मूलशंकर असे ठेवण्यात आले. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी संस्कृत ग्रंथांच्या अभ्यासास सुरुवात केली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदाध्ययनास प्रारंभ केला. सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्‍ल यजुर्वेदाचे अध्ययन केले चौदाव्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण केले. मुंजीनंतर त्यांनी शैल पंथाची दीक्षा घेऊन पार्थिवपूजा स्वीकारली. अतर वेदांतील काही भाग आणि संस्कृत व्याकरणाचे ग्रंथ यांचेही अध्ययन केले.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत असता, शिवाच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी पाहिला व देव म्हणजे मूर्ती नाही, हे त्यांना उमगले. वडिलांना त्यांनी हा प्रश्न विचारला पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. देव आणि धर्म यांच्यासंबंधी विचारांना मात्र चालना मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची धाकटी बहीण व प्रेमळ चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला. मृत्यूच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा मिळेल याचाच मूलशंकर सतत विचार करू लागले. अनेकांना त्यांनी या संबंधी प्रश्न विचारले. योगाभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही, हे त्यांना समजले. मुलाच्या मनात वेगेळेच विचार चालले आहेत हे लक्षात येताच वडिलांनी त्यांच्या विवाहाचा घाट घातला परंतु हे समजताच मूलशंकरांनी १८४५ मध्ये गृहत्याग केला, तो कायमचाच.

मूलशंकर संन्याशांच्या समूहात दाखल झाले. तेथे ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन त्यांनी ‘शुद्ध चैतन्य’ हे नाव धारण केले. यानंतर त्यांनी सु.पंधरा वर्षे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटन केले. अनेक संन्याशांची, ज्ञानी पुरुषांची त्यांनी भेट घेतली तसेच अनेक शास्त्रांचे सखोल ज्ञान संपादन केले आणि ते त्यांनी तपासूनही पाहिले. तांत्रिक आचार, कर्मकांड, मूर्तिपूजा, अज्ञानमूलक धर्माचरण, अंधश्रद्धा इ. अनेक गोष्टींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले. पूर्णानंद नावाच्या स्वामींपासून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली व दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. १८६० साली मथुरेस अत्यंत चिकित्सक व ज्ञानी असलेल्या स्वामीविरजानंद या अंध गुरूकडे ते आले. विरदानंदांजवळ ते तीन वर्षे राहिले. याच काळात त्यांच्या धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या विचारांचा पाया विरजानंदांशी विचारविनिमय होऊन घातला गेला व पुढील अनेकविध सुधारकिय कार्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

यानंतर दयानंदांनी पुन्हा भारतभर परिभ्रमण केले. यावेळी त्यांनी मूर्तिपूजा, रूढिप्रियता, जन्मतः जातिभेद, हिंसात्मक यज्ञ इ. गोष्टींवर टीका करणारी अनेक व्याख्याने दिली. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथांनाच वेद मानत. कारण त्यांत जन्मसिद्ध जातिभेदास आधार नाही. वेदांचा आधार घेऊन त्यांनी नवे विचार मांडण्यास सुरुवात केली. अस्खलित संस्कृतात शास्त्रीपंडितांबरोबर त्यांनी वादविवाद केले. १८६९ साली काशीला पंडितांबरोबर शास्त्रार्थ केला. दयानंदांचा उदात्त हेतू लक्षात न घेता पंडितांनी केवळ शब्दप्रामाण्याच्या आधारावर त्यांना उत्तरे दिली. यानंतर दयानंदांनी प्रयाग, कलकत्ता, मुंबई, पुणे इ. ठिकाणी व्याख्याने देऊन आपले नवे धर्मसुधारणेचे विचार प्रभावीपणे मांडले. त्यामुळे केशवचंद्र सेन, लोकहितवादी, न्या. रानडे यांसारख्यांनी त्यांची स्तुती केली. आपल्या विचारांना मूर्तस्वरूप देण्यासाठी १८७५ साली मुंबई येथे त्यांनी ⇨आर्यसमाजाची स्थापना केली. आपल्या वैदिक धर्मविचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश इ. प्रांतात दौरे केले व हिंदीभाषेत व्याख्याने देऊन धर्मजागृती केली.

आर्यसमाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथलेखनास प्रारंभ केला. दयानंद हे कट्टर वेदनिष्ठ होते. त्यांनी यजुर्वेद व ऋग्वेद यांवर संस्कृतात भाष्ये लिहिली. ऋग्वेदाच्या काही भागावर भाष्यही केले. पण त्यांचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सत्यार्थप्रकाश हाच होय. यात त्यांनी वेदांतील ज्ञानभांडार हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले. सत्यार्थप्रकाश हा आर्यसमाजाचा प्रमाणग्रंथ समजला जाऊ लागला. दयानंदांनी याशीवाय संस्कारविधि, पंचमहायज्ञविधि, गोकरुणानिधि इ. ग्रंथ लिहून आपले विचार जनतेसमोर मांडले.

HiSTORY by Hardikar

30 Oct, 07:45


त्यांत त्यांनी शुद्ध वैदिक धर्माचे स्वरूप स्पष्ट केले, पाखंडी मतांचे खंडन केले, रूढीव भ्रममूलक कल्पनांचा निषेध केला, मूर्तीपूजेचा धिक्कार केला, स्त्रियांना व शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार आहे हे सिद्ध केले, स्त्रीशिक्षणास प्रोत्साहन दिले, जातिभेदावर टीका केली व ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी इ. धर्मांतील दोष उघड करून दाखविले.
दयानंदांच्या धर्मविचारांनी प्रभावित झालेले ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ चे संस्थापक ऑलकट यांनी १८७९ मध्ये दयानंदांची सहारनपूर येथे भेट घेतली व एकत्र कार्य करण्याची योजना ठरली. थिऑसॉफिकल सोसायटीच्या श्रीमती ब्‍लाव्हॅट्‌स्की यांनीही दयानंदांसंबंधी प्रशंसोद्‍गार काढले. तथापि या दोन संस्थांचे एकीकरण होऊ शकले नाही. ब्राह्मोसमाज, प्रार्थना समाज यांतीलही कार्यकर्ते दयानंदांकडे आकृष्ट झाले पण तेही समाज आर्यसमाजात मिसळू शकले नाहीत. दयानंदांनी आपल्या आर्यसमाजाचे संघटन अत्यंत चिकाटीने व प्रभावीपणे केले. आर्यसमाजातर्फे त्यांनी वैदिक पाठशाळा काढल्या. फिरोजपूर येथे अनाथाश्रम उघडला. ठिकठिकाणी आर्यसमाजाच्या शाखा त्यांनी उघडल्या. जाति–पंथ–भाषा इ. कोणतेही भेद लक्षात न घेता कोणालाही आर्यसमाजाचे सदस्य होता येत असे. आर्यसमाजाच्या सदस्यांसाठी नियम तयार केले गेले. दर रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन केले पाहिजे. प्रत्येकाने रोज संध्या, होम, गायत्री जप व वेदपाठ या गोष्ठी अवश्य केल्या पाहिजेत. या गोष्टी करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते. ब्रह्मचर्य, सत्य, भक्ती, तप इ. प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. सर्व सत्यांचे मूळ परमेश्वर आहे, वेद हा सत्यमूलक ग्रंथ आहे, सत्याचा विचार करूनच धर्माचरण केले पाहिजे, सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे इ. विचार लक्षात घेऊन प्रत्येक आर्यसमाजी सदस्याने वागले पाहिजे असे दयानंदांनी म्हटले आहे.

दयानंद हे स्वतः शरीराने, मनाने व वाणीने दणकट होते. अत्यंत विरूद्ध वातावरणात आपली मते मांडण्यात ते कधीही माघार घेत नसत. काशीत जाऊन ‘मूर्तिपूजा सिद्ध करा, नाहीतर विश्वेश्वरांची मूर्ती फोडून टाका’ असे म्हणून ते वादास उभे राहिले. अनेक संकटे आली तरी त्यांनी ती तेजस्वीपणे स्वीकारली व त्यांवर मात केली. ख्रिस्ती, इस्लाम धर्मांच्या पंडितांशी वाद घालून त्यांनी त्यांना नामोहरम केले. परधर्मात जाऊ पाहणाऱ्या हिंदूना वैदिक धर्म पटवून दिला. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. वैदिक धर्माला त्यांनी पुन्हा तेजस्वी बनविले. शाहपूरचे महाराज नहरसिंग, जोधपूरचे महाराज जसवंतसिंग यांसारख्या अनेक राजेरजवाड्यांना त्यांनी आर्यसमाजाची दीक्षा दिली. सहस्रावधी लोकांना समाजाच्या कार्याकडे प्रवृत्त केले. आर्यसमाजाचा परदेशातही प्रचार व्हावा, भारतातील अनाथ व गरीब लोकांस विद्या आणि आश्रय मिळावा या हेतूने दयानंदांनी उदेपूर येथे ‘परोपकारिणी सभा’ या नावाची आणखी एक संघटना उभारली.
दयानंद १८८३ साली जोधपूरास आले. तेथील महाराजांची त्यांच्यावर श्रद्धा बसली व ते त्यांचे अनुयायी बनले. तेथे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगतात. विषप्रयोगामुळे दयानंदांची प्रकृती बिघडली व अजमेर येथे ते निधन पावले.

आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. निष्प्रभ वैदिक धर्माला त्यांनी तेजस्वी बनविले. समाजाला समर्थपणे संघटित केले. परधर्मीयांचे आक्रमण परतवून लावले व हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान दिले. आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनात त्यांचा वाटा फार मोठा आहे.

संदर्भ : 1. Rai, Lala Lajpat, The Arya Samaj, London, 1915.

2. Singh, Bawa Chhajju, The Life and Teachings of Swami Dayanand Saraswati, 2. Vols, Lahore, 1903

३. फडके, स. कृ. नवा वैदिक धर्म अथवा आर्यसमाजाचा विवेचक इतिहास, पनवेल, १९२८.

भिडे, वि. वि.

HiSTORY by Hardikar

28 Oct, 14:52


https://youtu.be/N_Eu-hZLckE?si=skdE85IBxbCNmXMF

HiSTORY by Hardikar

28 Oct, 08:07


स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचा आज जन्मदिन (जन्म-२८ ऑक्टोबर १८६७)
(मृत्यू १३ ऑक्टोबर १९११).
विनम्र अभिवादन
.
निवे​दिता, भ​गिनी: (२८ ऑक्टोबर १८६७–१३ ऑक्टोबर १९११). ​विवेकानंदांच्या ​शिष्या आ​णि भारतीय स्वातंत्र्याच्या व संस्कृतीच्या एक ​निष्ठावंत पुरस्कर्त्या. मूळ नाव मार्गारेट नोबल. वडील सॅम्युअल व आई इझॅबेला या आयरिश दांपत्यापोटी आयर्लंडमधील उनगॅनन गावी जन्म. वडील ​ख्रिस्ती धर्मोपदेशक ‌‌‌होते. चर्चतर्फे चालविण्यात येणाऱ्या हॅ​लिफॅकस महाविद्यालयात त्यांचे ​शिक्षण झाले. व​डिल ​निवर्तल्यानंतर लंडनमध्ये त्यांनी ​शिक्षिकेचा व्यवसाय पतकरला. पेस्टालोत्सी व फ्रबेल यांच्या नवीन ​शिक्षणपद्धतीच्या प्रभावामुळे १८९२ साली ​विंबल्डन येथे शाळा काढली. ‌‌‌१८९५ मध्ये त्यांची विवेकानंदांशी भेट झाली विवेकानंदांच्या या भेटीने त्यांची संपूर्ण ‌‌‌जीवनदृष्टीच बदलली. प​रिणामतः ​विवेकानंदांच्या आवाहनानुसार त्यांच्या कार्यास वाहून घेण्याकरिता त्या १८९८ साली २८ जानेवारी रोजी भारतात आल्या. परकीय म्हणून त्यांच्या कार्यात प्रथम पुष्कळ अडथळे आले ‌‌‌परंतु ​विवेकानंदांनी ​विरोधकांची समजूत पटवून ते दूर केले. प्रथम शारदामाता (रामकृष्ण परंमहसांची पत्नी) यांसारख्या म​हिलांकडून ​हिंदू धर्माचे अनेक संस्कार त्यांनी आत्मसात करून घेतले. कलकत्त्याच्या ‘बोस पारा लेन’ मध्ये कर्मठ लोकांच्या वस्तीत राहून आपल्या ​विनयशील, सालस व प्रेमळ ‌‌‌वागणुकीने तेथील कर्मठ लोकांनाही आपलेसे करून घेतले. ११ मार्च १८९८ रोजी कलकत्त्याच्या स्टार रंगमंदिरात आयोजित केलेल्या सभेत धर्मशिक्षण व ​हिंदभूमीची सेवा करण्याचे आपले उ​द्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. २५ मार्च १८९८ रोजी त्यांना ​विधिपूर्वक ब्रहाचा​रिणीव्रताची दीक्षा स्वामी ​विवेकानंदानी दिली व त्यांचे नाव ​निवे​दिता ठेवले. स्वामीजींबरोबर प्रवास केल्यामुळे ​हिंदू लोक व त्यांच्या चालीरीती, धर्मकल्पना आ​णि इतिहास यांची त्यांना जवळून कल्पना आली. १२ नोव्हेंबर १८९८ रोजी ​दिवाळीच्या ​दिवशी त्यांनी कलकत्त्यातील बागबाजार येथे एका बा​लिका ​विद्यालयाची स्थापना करून राष्ट्रीय​ शिक्षणकार्यास आरंभ केला. फेब्रुवारी १८९९ साली कलकत्त्यात उद्‌भवलेल्या प्लेगच्या साथीत त्यांनी सेवाकार्य केले. त्याच साली अमेरिकेत गेल्या व तेथे त्यांनी रामकृष्णसाहाय्य संस्था स्थापन केली.पॅ​रिस व लंडन येथील प्रवासानंतर १९०२ साली त्या ‌‌‌भारतात परतआल्या. त्याच वर्षी ​विवेकानंदांचे ​निधन झाले व निवेदितांनी रामकृष्ण मंडळाबाहेर पडून राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनास वाहूनघेतले. १९०२ ते १९०४ या काळात सर्व भारतात प्रचारदौराकरून लोकांत जागृती ​निर्माण केली. जुन्या व नव्या उपयुक्त आचारविचारांचा समन्वय करून स्वतंत्र, संघ​टित व‌‌‌ समर्थ भारत बन​विण्याचे ​विवेकानंदांचे ध्येय साकार करण्याक​रिता त्यांनी ​जिद्दीने प्रयत्न केला. त्याक​रिता त्यांनी देशप्रेमी व स्वार्थत्यागी तरूणांची संघटना उभारली. त्या काळातील प्रमुख राजकीय पुढाऱ्यांशी व सशस्त्र क्रां​तिवादी संघटनांशीही त्यांचा संबंध होता. १९०२ साली पुण्याला जाऊन ‌‌‌हुतात्मे झालेल्या चाफेकर बंधूच्या मातेची पायधूळ डोक्यासलावली. १९०५ साली बनारसला भरलेल्या काँग्रेस अ​धिवेशनात भाग घेतला व स्वदेशी चळवळीला पाठिंबा देऊन स्वदेशीचे व्रत अंगीकारले. त्याच साली लॉर्ड कर्झनच्या ‌‌‌बंगाल-फाळणीच्या योजनेला त्यांनी कडवा ​विरोध केला. जामिनाक​रिता हवी असलेली रक्कम काही तासात जमा करून भूपेंद्रदत्त यास त्यांनी जा​मिनावर सोड​विले. १९०६ साली पूर्व बंगालमध्ये दुष्काळाने व पुराने थैमान घातले असताना, त्यांनी अ​विश्रांत प​रिश्रम घेऊन लोकांना मदत केली., यूरोपात व अमे​रिकेत असलेल्या ‌‌‌भारतीयांना इंग्रज राजवटीविरूद्ध संघ​टित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
निवे​दिता भारतात येण्यापूर्वीही लेखन करीत होत्याच भारतात आल्यानंतर त्यांचे अनेक लेख ​रिव्हू ऑफ​रिव्हूज, द प्रबुद्ध भारत, मॉडर्न रिव्हू इ. ​नियतका​लिकांतून प्रसिद्ध झाले. काली द मदर (१९००), द वेब ऑफ इं​डियन लाइफ (१९०४ ), क्रेडल टेल्सऑफ ​हिंदूइझम (१९०७), इं​डियन स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ (१९०९) आ​णि द मास्टर ॲज आय सॉ ​हिम (१९१०) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके होत. त्यांचे समग्र लेखन चार खंडांत प्र​सिद्ध झाले आहे (१९६७). ​निवे​दितांचे हे सर्वच लेखन भारतीय संस्कृतीची, ​विशेषतः पा​श्चिमात्यांना, यथार्थपणे ओळख करून देणारे ‌‌‌आहे. जगदीशचंद्र बोस, अवनींद्रनाथ टागोर यांसारख्यांना प्रोत्साहन व मदत देण्याचे कार्यही त्यांनी पार पाडले.
त्यांची बु​द्धिमत्ता, ​हिंदू धर्मावरील व भारतावरील ​निष्ठा, ध्येयवा​दित्त्व व त्याग इ. गुणविशेषांमुळे त्या भारतीयांच्या कायमच्या आदरास पात्र ठरल्या.
.
संदर्भ : Pravrajika, Muktiprana, Bhagini Nivedita, Calcutta, 1968.
खोडवे, अच्युत

HiSTORY by Hardikar

28 Oct, 08:07


भगिनी निवेदिता

HiSTORY by Hardikar

28 Oct, 07:20


https://youtu.be/N_Eu-hZLckE?si=SsB_WpSpMiSvYbiE

HiSTORY by Hardikar

28 Oct, 07:20


आज रात्री 8वाजता दुसरी टेस्ट

HiSTORY by Hardikar

25 Oct, 11:24


https://www.esakal.com/desh/rrb-recruitment-2024for-3000-posts-in-railways-12th-pass-holders-last-27-october-2024-snk89?fbclid=IwY2xjawGIXvNleHRuA2FlbQIxMQABHTl7WEdGAiNPfXQjUwIyTTqmdTbia94UHAXQaeAWig6DywZerY1sYOlyKQ_aem_OiIZ6PeUNJjXq2vfT4JTig

HiSTORY by Hardikar

24 Oct, 10:43


.
“काही मतभिन्नता असली, तरी मला देशभक्त सावरकरांसन्निध बसण्याची संधी मिळाली याब्ब्द्ल अभिमान वाटत आहे. त्यांच्या स्वार्थत्यागाची व देशभक्तीची मधुर फळे आपल्या देशाला चिरकाल लाभोत.”
.
सावरकरांनी गांधीजींचे धन्यवाद मानत आपले विचार मांडले,
.
“श्रीरामाचा विसर पडला की हिंदुस्तानातला राम नाहीसा झाला. हिंदू हिंदुस्तानचे हृद्य आहे तथापि इंद्रधनुष्यात जसे खरे सौंदर्य रंगांच्या अनेक्तेने न बिघडता ते अधिकच खुलते, तसेच मुसलमान, पारशी, यहुदी वगैरे जगातील सर्व सुधारणेचे उत्त्मांश मिसळून घेऊन हिंदुस्थानही कालाच्या आकाशात अधिक खुलेल. “
.
त्यांनी केलेल्या पाऊणतासाच्या भाषणानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधीजी म्हणाले,

“सावरकरांचे भाषण सर्वानी अक्षरशः लक्षात घ्यावे व त्यातील शेवटच्या उद्दयपिक भागातील स्वार्थत्यागाच्या विनंतीची सर्वानी पूर्तता करावी. ”

यानंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा सांगता समारंभ पार पडला. इंग्लंडमध्ये शिकणारे भारतीय विद्यार्थी, तिथे राहणारी कुटुंबे यांच्या दृष्टीने हा दसऱ्याचा छोटासा कार्यक्रम म्हणजे एक मोठी घटना होती. महात्मा गांधी आणि सावरकर हे या कार्यक्रमाचे हिरो होते.

खरे तर महात्मा गांधी आणि सावरकर हे दोघेही त्या काळी अजून राष्ट्रीय नेते बनले नव्हते. सावरकर तर अवघ्या २६ वर्षांचे होते मात्र लंडनमधल्या या कार्यक्रमामुळे त्यांची नेतृत्वाची क्षमता दिसून आली.

पुढे जाऊन या दोन्ही नेत्यांचे मार्ग वेगवेगळे झाले. सावरकरांनी जहाल क्रांतिकार्याचा मार्ग स्वीकारला तर गांधीजींनी अहिंसक सत्याग्रहाच्या वाटेने ब्रिटिशांशी स्वातंत्र्य लढा लढला. त्यांच्यात वैचारिक वाद जरूर होते मात्र एकमेकांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी शंका कधीच नव्हती.
.
(बोल भिडू , २५ ऑक्टोबर २०

HiSTORY by Hardikar

24 Oct, 10:43


२४ ऑक्टोबर १९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
.
लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता .

.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी. भारतीय राजकारणाची दोन टोकं. या दोघांच्याही मृत्यूला अनेक वर्षे झाली मात्र आजही यांच्यातील वैचारिक वाद चालूच आहे. अजूनही यांचे समर्थक एकमेकांच्या उरावर बसून भांडताना दिसतात.

मात्र गंमतीची गोष्ट म्हणजे एकदा स्वा.सावरकर आणि म.गांधी यांनी लंडन मध्ये एकत्र दसरा साजरा केला होता.
गोष्ट आहे एकोणीसशे दहाच्या दशकातली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरु केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून सावरकर वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते. तिथे वर्मा यांच्याच इंडिया हाऊस या वसतिगृहात ते राहत होते. एक फक्त एक वसतिगृह नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक गुप्त क्रांतिकेंद्र होते.
लंडन व इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय विद्यार्थी येथे जमत व भारताच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा करीत तसेच चळवळी आखीत. मादाम कामा, लाला हरदयाळ, मदनलाल धिंग्रा अशा अनेक क्रांतिकारक नेत्यांचा इंडिया हाऊसशी संबन्ध होता.
याचा फायदा सावरकरांनी उठवला. भारतात स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्थेला लंडन मधून मदत पाठवण्यास सुरवात केली.
त्यांनी तिथे बाँब तयार करण्याची विद्या शिकून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती.

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध जागतिक पातळीवर मोठा लढा उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.
इंडिया हाऊस मध्ये असताना विद्यार्थी दशेत असतानाही सावरकरांचा जगभरातल्या राजकीय चळवळीशी संपर्क आला होता. भारताप्रमाणेच स्वातंत्र्यलढा चालवत असलेले काही आयरिश क्रांतिकारक न्यूयॉर्क येथून गेलिक अमेरिकन हे वृत्तपत्र चालवत. त्यात सावरकरांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. हे सगळं कार्य गुप्तपणे चालू होतं.
लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची त्यांनी स्थापना केली होती. त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले. ख्रिसमस सारख्या विदेशी सणांचा इंग्लंडमधल्या भारतीयांवरील प्रभाव कमी व्हावा म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होते.

लंडनमध्ये असताना विहारी आणि काळ या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. याच वार्तापत्रांमध्ये सावरकरांनी एका दसरा सोहळ्याचे वर्णन केले आहे, या वार्तापत्रात ते सांगतात की
"आम्ही विजयादशमीच्या कार्यक्रमाला देशभक्त मोहनदास गांधी यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रण दिलं होतं."
४ नोव्हेम्बर १९०९ रोजी विजयादशमीच्या दिवशी लंडनच्या क्वीन्सरोड हॉल येथे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीरामो विजयते नावाने निमंत्रणपत्रिका संपूर्ण लंडनमधील भारतीयांना वाटण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या मेजवानीची वर्गणी तीन रुपये होती.

शंभरच्या वर हिंदी महिला व पुरुष या कार्यक्रमाला जमले. यात मोठमोठे व्यापारी, प्रोफेसर,डॉक्टर, विद्यार्थी होते. या कार्यक्रमासाठी फक्त भारतीयांना प्रवेश होता. गोऱ्या इंग्रज युरोपियांना सक्तीने प्रवेश नाकारला होता.
हॉलमध्ये भारतीय पद्धतीने जेवणाच्या पंक्ती बसवण्यात आल्या होत्या. धुपाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. मध्यभागी ध्वज उभारण्यात आला होता. त्यावर ठळक अक्षरात वंदे मातरम असे लिहिण्यात आले होते. राष्ट्रगीताच्या स्वराने कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणली होती.

दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी खास या कार्यक्रमासाठी लंडनला आले होते. अली अझीझ हे आफ्रिकेतील त्यांचे सहकारी सोबत होते. पंक्तीत स्वयंपाक, जेवणाची पाने वाढणे, पाणी देणे वगैरे कामे डॉक्टर,प्रोफेसर अशा पदावर असलेले स्वयंसेवक करत होते. गांधीजींनी आपल्या अध्यक्षीय भाषणात याचे प्रचंड कौतुक केले. ते म्हणाले,
.
“या कार्यक्रमामुळे मला आमच्या लोकांमध्ये वाढत चाललेल्या लोकसेवातत्परतेची प्रचिती मला आली. लंडनमध्ये असा कार्यक्रम होतो हे मला आतापर्यन्त खरं वाटलं नसतं. हा समारंभ हिंदू असूनही यात मुसलमान, पारशी वगैरे देशबंधू येतात हे लक्षात घेतले पाहिजे. श्रीरामाचे सद्गुण जर पुन्हा आपल्या राष्ट्रात उतरले तर आपल्या उन्नतीला वेळ लागणार नाही.”
.
यानंतर वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, अली अझीझ यांची भाषणे झाली. स्वा. सावरकर जेव्हा श्रीरामाच्या चरणावर पुष्प चढवण्यास उठले तेव्हा सलग पाच मिनटापर्यंत टाळ्यांचा गजर झाला. गांधीजी या प्रसंगी म्हणाले,

HiSTORY by Hardikar

24 Oct, 10:42


वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी (जन्म २४ ऑक्टोबर १९०४) यांचा आज स्मृतीदिन (मृत्यू १४ ऑक्टोबर १९९३), विनम्र अभिवादन .
विख्यात उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे ते धाकटे बंधु.
.
लालचंद हिराचंद यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९०४ रोजी सोलापुरात झाला ते एक उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते व लेखक होते हे वालचंद गटाचे प्रख्यात उद्योजक, समाजसेवी आणि जैन सामाजिक नेते होते. त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून कला पदवी पूर्ण केली व त्यांनी दि सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, रावळगाव शुगर, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, प्रीमियर ऑटोमोबाइल्स इत्यादी विविध कंपन्यांची सेवा बजावली नंतर त्यांनी भारतीय व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आणि इतर व्यापारी संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले तसेच त्यांनी अखिल भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आणि ते अनेक सेवाभावी संस्थांशी जोडले गेले 'रामायण' या भारतीय महाकाव्याच्या नावावरुन रामायणावरील ते एक प्रशंसित पुस्तक लेखक आहेत ते मुंबई विधानपरिषदेचे सदस्य म्हणून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडले गेले स्वातंत्र्यानंतर ते राज्यसभेचे सदस्यही बनले व मेकॅनिकल इंजिनिअर्स असोसिएशन (इंडिया), मुंबई चे अध्यक्ष म्हणून निवडले गेले व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना १९९२ मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
ब्रिटिश सरकारच्या साखरविषयक धोरणाचा लाभ उठवून वालचंदांनी रावळगाव येथे ‘रावळगाव शुगर फार्म लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली (१९३३). त्यांनी बांधकामविषयक व्यवस्थापन सुत्रे रतनचंद ह्या आपल्या कर्तबगार भावाच्या हाती सोपविली. १९२३ मध्ये वालचंदांनी नासिक जिल्ह्यातील गिरणा कालव्याजवळील रावळगाव येथील सु. ६०७ हे. पडीक जमीन काही विकत व काही भाडेपट्ट्याने घेऊन तिचे कृषियोग्य जमिनीत रूपांतर केले व तेथे आंब्याची कलमे, ऊस, कपाशी, भुईमूग इ. विविध पिके घेण्याचे प्रयोग केले. १९३३ मध्ये मात्र त्यांनी केवळ ऊसाच्या पिकावरच आपले सर्व लक्ष केंद्रित केले व साखर कारखाना उभारला. वालचंदांचे धाकटे बंधू लालचंद हिराचंद व पुतण्या गोविंद यांच्या योजनाबद्ध परिश्रमांमुळे रावळगाव कंपनीची व कारखान्याची उत्तोरत्तर भरभराट होत गेली.
रावळगाव वसाहतीचे आधुनिक आदर्श व डौलदार लालचंद हिराचंद स्वरूप आणि तेथील कारखान्याची वाखाणण्याजोगी शिस्त ह्यांचे सारे श्रेय मुख्यतः लालचंद यांच्याकडे जाते. आर्थिक व्यवहारांचे पायाशुद्ध ज्ञान,हाती घेतलेल्या उद्योगांशी निगडित अशा सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्याची प्रवृत्ती, सततची उद्योगमग्नता, काटेकोर शिस्त आणि संघटनाकौशल्य या लालचंदांच्या अलौकिक गुणांमुळे वालचंदांना त्यांचा फार आधार वाटे. १९२८ ते ३६ ह्या काळात रावळगाव फार्मचा कारभार लालचंदांच्या संचालकत्वाखाली उत्तम प्रकारे चालला. रावळगाव फार्म हे केवळ व्यापारी तत्त्वावर ऊस व साखर यांचे उत्पादनक्षेत्र न बनता, कृषिशास्त्रविषयक संशोधनाचे प्रयोगक्षेत्रही बनावे, अशी वालचंदांप्रमाणेच लालचंद यांचीही तळमळ व इच्छा होती.
वालचंदांच्या पश्चात सबंध उद्योगसमूहाचा कार्यभार त्यांचे बंधू लालचंद ह्यांनी कौशल्याने व समर्थपणे सांभाळला व पुढे उद्योगसमूहाचा विस्तार-विकासही घडवून आणला.
#Walchand
#walchandindustries
#ravalgaon

HiSTORY by Hardikar

24 Oct, 10:41


आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांची आज जयंती (२४ ऑक्टोबर १९१४), विनम्र अभिवादन.
(मृत्यू-२३ जुलै, इ.स. २०१२)
.
कॅप्टन लक्ष्मी
लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल (२४ ऑक्टोबर, इ.स. १९१४- २३ जुलै, इ.स. २०१२) या पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात..
मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.

कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. १९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजारवर पोचला. पिस्तूल, बंदूक, मशीनगन्स यासारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाषबाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच त्या ब्रिटिशांना स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले.[१]

त्यानंतर बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. १९४७ च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले. विवाह झाल्यानंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले.तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅॅक्टिस चालू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने आलेल्या शरणार्थींना मदत केली.

सुभाषिनी अली आणि अनिसा पुरी या कॅप्टन लक्ष्मी यांच्या दोन मुली.

सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या.

आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कॅप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली.

हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कॅप्टन लक्ष्मी यांना दि. १९ जुलै २०१२ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. सोमवार दिनांक २३ जुलै २०१२ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

पुरस्कार
भारत सरकारने शासनाने सन १९९८ मधे पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
(विकिपीडिया या संकेतस्थळावरून साभार)
कॉपी पेस्ट

HiSTORY by Hardikar

22 Oct, 09:03


लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा आज जन्मदिन
(जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
(मृत्यू-२९ ऑगस्ट १९६९).
.
शाहीर अमर शेख
(२० ऑक्टोबर १९१६— २९ ऑगस्ट १९६९). ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले.
आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला.
उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती.
रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले.
प्रपंच आणिमहात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.
लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे (२००७).
इंदापूर येथे त्यांचे अपघाती निधन झाले.
लेखक : विजया वाड

HiSTORY by Hardikar

22 Oct, 09:02


२१ ऑक्टोबर १९५१
डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या उजव्या राष्ट्रीय विचारसरणीच्या राजकिय पक्षाची स्थापना केली.
.
अखिल भारतीय जनसंघ हा भारतातील एक जुना राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना २१ ऑक्टोबर १९५१ रोजी दिल्लीत झाली. श्यामा प्रसाद मुखर्जी, प्रोफेसर बलराज मधोक आणि दीनदयाल उपाध्याय हे तिचे तीन संस्थापक सदस्य होते. तेवणारा दिवा किंवा पणती हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह होते. १९५२ च्या संसदीय निवडणुकीत त्यांनी ३ जागा जिंकल्या होत्या, ज्यामध्ये स्वतः डॉ. मुखर्जी यांचाही समावेश होता.
.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर (१९७५-१९७६) जनसंघासह भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे विलीनीकरण करून जनता पक्ष या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली. आणीबाणीपूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात बिहार विधानसभेतील भारतीय जनसंघाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते लालमुनी चौबे यांनी बिहार विधानसभेचा राजीनामा दिला होता.
.
१९८० मध्ये जनता पक्ष फुटला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाचा एक गट जनसंघापासून वेगळा झाला आणि समाजवादी आणि गांधीवादी विचारसरणीच्या नेत्यांसह भारतीय जनता पक्षाची" स्थापना केली. त्यानंतर भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य प्रोफेसर बलराज मधोक यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करून भारतीय जनसंघ कायम ठेवला.
.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनसंघाला हळुहळु मिळालेले यश
.
• १९५२ मध्ये ३.१ टक्के मते, ३ जागा,
• १९५७ मध्ये ५.९ टक्के मते, ४ जागा,
• १९६२ मध्ये ६.४ टक्के मते आणि १४ जागा, आणि
• १९६७ मध्ये ९.४ टक्के मतांसह ३५ जागा जिंकल्या.
• १९७१ मध्ये ७.३७ टक्के मतांसह २२ जागा जिंकल्या.
जनसंघाचे अध्यक्ष
• डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी (१९५१–५२)
• मौलि चन्द्र शर्मा (१९५४)
• प्रेम नाथ डोगरा (१९५५)
• आचार्य देवप्रसाद घोष (१९५६–५९)
• पीताम्बर दास (१९६०)
• अवसरला राम राव (१९६१)
• आचार्य देवप्रसाद घोष (१९६२)
• रघु वीर (१९६३)
• आचार्य देवप्रसाद घोष (१९६४)
• बच्छराज व्यास (१९६५)
• बलराज मधोक (१९६६)
• दीनदयाल उपाध्याय (१९८७–६८)
• अटल बिहारी वाजपेयी (१९६९–७२)
• लालकृष्ण आडवाणी (१९७३–७७)
(संदर्भ-इंटरनेट)
कॉपी पेस्ट

HiSTORY by Hardikar

22 Oct, 09:00


१९२० सालच्या गांधीजींच्या असहकार आंदोलनास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सत्याग्रहामुळे ब्रिटिशांना खरोखरच भारत सोडून जावे लागते कि काय असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र चौरीचौरा येथे घडलेल्या पोलीस स्टेशनवरील हल्ल्यामुळे गांधीजींनी तडकापडकी हे आंदोलन थांबवलं.

ही गोष्ट विठ्ठलभाईंना आवडली नाही. त्यांनी गांधीजींचा विरोध केला.
मतभेद वाढत असलेलं बघून त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारणीमधून बाजूला व्हायचं ठरवलं आणि मोतीलाल नेहरू,चित्तरंजन दास यांच्यासोबत स्वतःचा स्वराज्य पक्ष स्थापन केला. या स्वराज्य पक्षाने केंद्रीय सभेच्या निवडणुका लढवल्या. विठ्ठलभाई पटेल यांची खासदार पदी निवड झाली. एवढंच नाही तर त्यांनी १९२५ साली संसदेचे सभापती बनण्याचा मान पटकवला.
.
भाऊ काँग्रेसच्या विरोधातील राजकारण करत असताना देखील वल्लभभाई पटेल यांनी म.गांधींची साथ सोडली नाही.
.
त्यांची गांधीजी व पक्षावरील निष्ठा अभंग होती. त्यांची निवड योग्य ठरली. देशातील जनतेने काँग्रेसबरोबरच राहायचं ठरलं. स्वराज्य पक्षातील अनेक नेते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहामध्ये परत आले.

विठ्ठलभाई पटेलांनी देखील गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात भाग घेतला. त्यांना जेल देखील झाली. पुढे त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे लवकरच सुटका झाली. विठ्ठलभाई पटेल यांचं आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठं वजन होतं. युरोप व अमेरिकेतील विविध ठिकाणी त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रण देण्यात आलं.

या दौऱ्यावर असताना ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना येथे त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं तेव्हा त्यांच्यासोबत सुभाषचंद्र बोस हे होते. मृत्यू शय्येवर असताना त्यांनी आपले अंतिम इच्छा पत्र लिहिले. यावेळी तिथे हजर असणारे गोवर्धन पटेल व डॉक्टर डीटी पटेल यांना हे इच्छापत्राची पूर्तता होते का हे पाहण्याची जबाबदारी सोपवली.
२२ ऑकटोबर १९३३ रोजी विठ्ठलभाई पटेल यांचा स्विझर्लंडच्या जिनिव्हामध्ये मृत्यू झाला.
वल्लभभाई पटेल तेव्हा नाशिक जेलमध्ये बंदी होते. तेव्हा तिथेच त्यांना ही दुःखद बातमी कळवण्यात आली आणि विठ्ठलभाईंचे मृत्युपत्र वाचण्यास देण्यात आले. हे मृत्युपत्र वाचून वल्लभभाई पटेलांना प्रचंड धक्का बसला कारण विठ्ठलभाईंनी संपत्तीचे वारसदार म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड केली होती.

वल्लभभाईंनी या मृत्युपत्राच्या वैधते वरच शंका उपस्थित केली. त्यांचं म्हणणं होतं की विठ्ठलभाई यांची कोणीतरी खोटी सही केलेली आहे.
या मृत्युपत्रावरून प्रचंड वाद झाले. वल्लभभाई पटेलांनी सुभाषचंद्र बोस यांच्या विरुद्ध कोर्टात केस घातली. त्यांचा दावा होता कि लहान भाऊ म्हणून विठ्ठलभाईंच्या संपत्तीवर माझा अधिकार आहे.

पुढे सुभाषचंद्र बोस जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले तेव्हा हा वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा ठरलं. वल्लभभाईंनी सगळी संपत्ती काँग्रेस पक्षातील काही मान्यवरांची समिती बनवून त्यांच्याकडे सुपूर्द करायचा प्रस्ताव मांडला. सुभाष बाबुंचा देखील याला होकार होता पण या समितीत कोण असावं यावरून पुन्हा भांडणे झाली आणि हा प्रस्ताव बारगळला.
मुंबई हायकोर्टात खटला भरपूर दिवस चालला. सुभाषचंद्र बोस यांच्या वतीने शरतचंद्र बोस यांनी केस लढवली मात्र यात त्यांचा पराभाव झाला. जस्टीस बी.जे.वाडीया यांनी वल्लभभाई पटेल यांनाच विठ्ठल भाई पटेल यांचे खरे वारसदार मानले.

वल्लभभाई पटेलांनी सगळी संपत्ती विट्ठलभाई मेमोरियल ट्रस्टला दान देऊन टाकली. याविरुद्ध सुभाषबाबूंनी वरच्या कोर्टात अपील केली मात्र तिथेही निर्णय त्यांच्याविरोधात लागला.

वल्लभभाई पटेल आणि सुभाषचन्द्र बोस हे भारतीय राजकारणात स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्व करणारे नेते मात्र एका मृत्युपत्रावरून झालेला वाद त्यांच्यात कायमचा दुरावा आणणारा ठरला.

HiSTORY by Hardikar

22 Oct, 09:00


थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)यांचा आज स्मृतिदिन, (मृत्यू २२ ऑक्टोबर १९३३).
.

विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म गुजरातच्या नाडियाद गावी एका धार्मिक कुटुंबात झाला. सर्व भावंडांमध्ये ते तिसरे. सरदार वल्लभभाई यांच्या पेक्षा दोन वर्षांनी थोरले. नाडियाद हे गाव सुशिक्षितांची भूमी म्हणून ओळखले जाते. त्याकाळी देखील या गावात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा होती.

विठ्ठलभाई यांनी मुंबईला जाऊन आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना लंडनला जाऊन बॅरिस्टर बनायचं होतं पण घरची परिस्थिती यथातथाच होती त्यामुळे विठ्ठलभाई ज्युनियर वकील म्हणून काम पाहात. वल्लभभाई त्यांच्या मानाने शाळेत खूप हुशार नव्हते. ते मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांचं वय २२ वर्षे इतकं होतं. पण वल्लभभाई जिद्दी होते. त्यांनी देखील आपल्या भावाप्रमाणे लंडनला जाऊन बॅरिस्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.

ते विठ्ठलभाईंना वकिलीमध्ये मदत करत आणि यातून मिळालेला पैसा इंग्लंडला जाण्याचे तिकीट काढण्यासाठी सेव्हिंग करत.
पुरेसे पैसे साठल्यावर वल्लभभाईंनी लंडनला जाणाऱ्या जहाजाचं तिकीट आणि पासपोर्ट काढलं. हे तिकीट पोस्टाने त्यांच्या घरी आलं. योगायोगाने ते विठ्ठलभाई पटेलांच्या हाती पडलं. या तिकिटावर व्ही.जे.पटेल असं लिहिलं होतं. घरच्यांचं म्हणणं पडलं कि थोरल्या भावाचे शिक्षण आधी पूर्ण झाले पाहिजे. म्हणून वल्लभभाईंच्या तिकिटावर विठ्ठलभाईंनी इंग्लंडला जावे.

धाकटा भाऊ या नात्याने वल्लभभाईंनी पडती बाजू घेतली आणि आपलं तिकीट विठ्ठलभाईंना दिलं. विठ्ठल पटेलांचे चरित्र लिहिणारे गोवर्धनभाई पटेल आपल्या पुस्तकात लिहितात.
.
"आपण पै अन् पै जोडून काढलेलं तिकीट विठ्ठलभाईंनी परस्पर वापरलं ही गोष्ट वल्लभभाईंना पसन्त पडली नव्हती. या घटनेनंतर दोघांच्यातील संबंध बिघडण्यास सुरवात झाली."
.
विठ्ठलभाई लंडनला गेले काही दिवसांनी वल्लभभाई देखील तिथे आले. दोघांनी आपली बॅरिस्टरकी चांगल्या मार्काने पास केली. विठ्ठलभाई पटेल तर आपल्या क्लास मध्ये टॉपर होते. दोघांनी भारतात आल्यावर वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. यात बराच पैसा कमवला. घरचे दारिद्य हटवले.

या दोन्ही भावात करार झाला होता की विठ्ठलभाई मुंबई हाय कोर्टात प्रॅक्टिस करतील आणि वल्लभभाई अहमदाबादला जेणेकरून दोघांच्यात वाद होणार नाहीत.
पुढे विठ्ठलभाई पटेल राजकारणात आले तेव्हा त्यांनी वल्लभभाईंना वकिलीच्या केसेस सांभाळायला दिल्या. वल्लभभाईंचा राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नव्हता मात्र मित्रांच्या आग्रहाखातर ते अहमदाबाद म्युनिसिपालटीची निवडणूक लढवून राजकारणात आले.

विठ्ठलभाई पटेल यांनी मुंबईत राहून राष्ट्रीय राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. वकील म्हणून ते प्रसिद्ध होतेच पण काँग्रेसच्या सभांमध्ये जोरदार भाषण करून बरीच लोकाप्रियता देखील त्यांनी मिळवली होती. त्यांनी मुंबई प्रांतीय सभेत ब्रिटिश सरकारला अनेकदा धारेवर धरलं आणि भारतीय जनतेला उपयोगी पडतील असे अनेक कायदे मंजूर करून आणले.

१९१७ साली गोध्रा येथे वल्लभभाई पटेल यांची आफ्रिकेतून भारतात परतलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी पहिली भेट झाली. पूर्वी ज्यांची चेष्टा उडवली होती ते महात्मा गांधी यांच्यात लोकांना प्रभावित करण्याची शक्ती आहे हे वल्लभभाईंनी अनुभवलं आणि आयुष्यभर म.गांधींचा अनुयायी बनण्याची शपथ घेतली.
विठ्ठलभाई लंडनला गेले काही दिवसांनी वल्लभभाई देखील तिथे आले. दोघांनी आपली बॅरिस्टरकी चांगल्या मार्काने पास केली. विठ्ठलभाई पटेल तर आपल्या क्लास मध्ये टॉपर होते. दोघांनी भारतात आल्यावर वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. यात बराच पैसा कमवला. घरचे दारिद्य हटवले.

या दोन्ही भावात करार झाला होता की विठ्ठलभाई मुंबई हाय कोर्टात प्रॅक्टिस करतील आणि वल्लभभाई अहमदाबादला जेणेकरून दोघांच्यात वाद होणार नाहीत.
पुढे विठ्ठलभाई पटेल राजकारणात आले तेव्हा त्यांनी वल्लभभाईंना वकिलीच्या केसेस सांभाळायला दिल्या. वल्लभभाईंचा राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नव्हता मात्र मित्रांच्या आग्रहाखातर ते अहमदाबाद म्युनिसिपालटीची निवडणूक लढवून राजकारणात आले.

विठ्ठलभाई पटेल यांनी मुंबईत राहून राष्ट्रीय राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. वकील म्हणून ते प्रसिद्ध होतेच पण काँग्रेसच्या सभांमध्ये जोरदार भाषण करून बरीच लोकाप्रियता देखील त्यांनी मिळवली होती. त्यांनी मुंबई प्रांतीय सभेत ब्रिटिश सरकारला अनेकदा धारेवर धरलं आणि भारतीय जनतेला उपयोगी पडतील असे अनेक कायदे मंजूर करून आणले.

१९१७ साली गोध्रा येथे वल्लभभाई पटेल यांची आफ्रिकेतून भारतात परतलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी पहिली भेट झाली. पूर्वी ज्यांची चेष्टा उडवली होती ते महात्मा गांधी यांच्यात लोकांना प्रभावित करण्याची शक्ती आहे हे वल्लभभाईंनी अनुभवलं आणि आयुष्यभर म.गांधींचा अनुयायी बनण्याची शपथ घेतली.

HiSTORY by Hardikar

22 Oct, 09:00


विठ्ठलभाई पटेल

HiSTORY by Hardikar

21 Oct, 07:55


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

HiSTORY by Hardikar

21 Oct, 05:46


https://youtu.be/f5MSLee673U?si=RZbepo1glxkVky2F

HiSTORY by Hardikar

20 Oct, 14:21


https://youtu.be/t6xHQ73NWOc?si=TOyI-pTp_jhA9KOB

1,519

subscribers

1,423

photos

52

videos