तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे...??
मित्रांनो, सर्वात आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या..
देवाने आपल्याला या जगात विनाकारण पाठवले असेल का...???
आपल्याला या जगात पाठवण्यामागे काय उद्देश असेल बरं???🙄
मला वाटते सर्वांचे उत्तर एकच असेल की, देवाने आपल्या सर्वांना या जगात असच विनाकारण तर अजिबात पाठवलेले नाही... आपल्याला या जगात पाठवण्यामागे कोणता तरी उद्देश नक्कीच असेल.
बरोबर ना...
मित्रांनो, या जगात येण्याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला आधीच समजला असता तर या जगात अशी कोणतीही व्यक्ती उरणार नाही. जी बिना उद्देशाशिवाय जीवन जगत असेल...
मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या आजुबाजूला बघितले तर तुम्हाला असे खूप लोकं सापडतील जे कोणतेही ध्येय नसताना जीवन जगत आहेत...दिवसभर टीव्ही पाहतात... रात्री जेवण करतात आणि मस्त झोपतात...😄
👉 मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की...
जे लोकं यशस्वी होतात त्यांना या जगात येण्यामागचा हेतू उद्देश आधीच माहिती असेल का???
माझ्या मते तर अजिबात नाही... त्या लोकांना माहिती नसते देवाने त्यांना कोणत्या हेतूसाठी या जगात पाठवले आहे...
👉 आता सर्वात मोठा प्रश्न असा येतो की, जर यशस्वी लोकांना जगात येण्याचा उद्देश माहिती नसेल तर ते कोणत्या उद्देशाने यशस्वी होतात...???
मित्रांनो, या जगात असा एक पण व्यक्ती नाही, ज्याला माहिती असेल तो या जगात का आणि कशासाठी आला आहे...
आता तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की, सर यशस्वी माणसांना या जगात येण्यामागचा उद्देश कोण सांगतो...??🙄
👉 मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, यशस्वी लोकांना या जगात येण्याचे उद्दिष्ट तर माहिती नसते परंतु या जगात आल्यानंतर ते स्वतःचे ध्येय स्वतः ठरवतात...आणि ते प्राप्त करतात...
ते स्वतःच स्वतःच्या जीवनाचे ध्येय ठरवतात..
या जगात राहून कोणत्या चांगल्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत, आणि लोकांना कोणत्या चांगल्या गोष्टी द्यायच्या आहेत ते आधीच ठरवतात..
मित्रांनो, या जगात जेवढे पण यशस्वी लोकं आहेत त्यांनी जगात आल्यानंतर स्वतःचे ध्येय स्वतःचं ठरवलेले आहे.
फरक एवढाच आहे की यशस्वी लोकांनी स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर केला आहे...
उदाहरणार्थ:-
1) संदीप माहेश्वरी सर
यांनी लोकांना प्रेरणा देण्याचा मार्ग निवडला...त्यांनी खूप सारे मोटिवेशनल व्हिडीओ बनवले जे लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देतात...
उद्या संदीप सर जग सोडुन गेले तरी सुद्धा त्यांचे शब्द या जगात असणाऱ्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील.... लोकं यशस्वी होतील...
2) आचार्य चाणक्य
👉 मित्रांनो, आचार्य चाणक्य हे जग सोडुन जाण्या आधी त्यांनी आपले महान विचार लोकांपर्यत पोहचले... आज त्याच महान विचारांवर लोकं phd करत आहे..
3) महात्मा गांधीजी
👉 महात्मा गांधीजीनी आपल्याला सत्य आणि अहिंसा नावाची शस्त्रे दिली....ज्याच्या सहाय्याने आपण जग जिंकू शकतो आणि ते ही शांततेने
4) मुकेश अंबानी यांनी या जगाला जिओ दिले...
5) बिल गेट्स यांनी या जगाला मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर दिले...
6) अलेक्झाडर ग्राहम बेल यांनी या जगाला टेलिफोन दिला...
7) चार्ल्स बॅबेजने या जगाला कॉम्पुटर दिले..
8) APJ अब्दुल कलाम सर यांनी या जगाला मिसाईल दिली..
9) थॉमस एडीसन यांनी जगाला ब्लब दिला..
10) बेंजामिन फ्रँकलिन यांनी जगाला वीज दिली..
11) विंटन सर्फ आणि बॉब कान यांनी जगाला इंटरनेट दिले..
12) राइट ब्रदर्स यांनी जगाला विमान दिले...
या जगातील सर्व महान व्यक्ती, महापुरुष, राजे महाराजे, नेते ज्यांना तुम्ही ओळखता त्यांना यासाठीच ओळखता कारण त्यांनी या जगाला तुम्हाला काही तरी चांगल्या गोष्टी दिल्या आहेत..
मित्रांनो, जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने या जगाला नक्कीच काही तरी चांगले दिले आहे..
किंवा
आपण असं म्हणू शकतो की, ज्या लोकांनी या जगाला काहीतरी दिले आहे त्यालाच यशस्वी व्यक्ती म्हणतात..
मित्रांनो, प्रत्येक यशस्वी माणुस हे जग सोडुन जाण्याआधी काहीतरी चांगल सोडुन गेला आहे..
मित्रांनो, आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत..
📌 तुम्ही हे जग सोडुन जाण्याआधी या जगाला कोणत्या चांगल्या गोष्टी देणार आहात..???
📌 तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय काय ठरवणार आहात..???
📌 जगाने तुम्हाला ओळखावे यासाठी तुम्ही काय कराल..???
या प्रश्नाचे उत्तर मला नक्की सांगा..
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा..
👉 या जगातील कोणताच यशस्वी व्यक्ती देवाच्या घरून शिकुन आलेला नाही... तो जो काही शिकला आहे ते सर्व याच दुनियेत शिकला आहे... त्यामुळे तो व्यक्ती नशीबवान असेल असं तर अजिबात म्हणू नका.🙏🏻
यशस्वी होण्यासाठी नशीब नाही तर स्वतःची जिद्द, सयंम आणि मेहनत पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा.
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】
👇👇Join 👇👇
http://:t.me/ghebhararitu
Canais Semelhantes



अधिकार्यांची यशोगाथा: प्रेरणा आणि जलद यश
अधिकार्यांची यशोगाथा केवळ त्यांच्या कामगिरीची नाही, तर त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या जिद्दीची आणि त्यांच्या कल्पकतेची एक उल्लेखनीय कहाणी आहे. जेव्हा आपण यश मिळवण्यास मार्गक्रमण करतो, तेव्हा आपल्या समोर अनेक अडथळे येतात, परंतु या अडथळ्यांना पार करून यश प्राप्त करणाऱ्यांची कथा नेहमीच प्रेरणादायक ठरते. त्यांना ज्या मार्गाने कारकीर्दीत यश मिळवले आहे, त्यामध्ये सकारात्मक विचार, सिद्धता आणि आत्मविश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो. यशाला साधण्याची ही यशस्वी वाटचाल आपल्या समोर ठेवताना, आपण या लेखात त्यांचा प्रवास, त्यांच्या विचारशक्ती आणि त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची चर्चा करूया.
अधिकार्यांची यशोगाथा म्हणजे काय?
अधिकार्यांची यशोगाथा म्हणजे त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, गरजा, आणि यशाच्या पातळीवर त्यांचे काही विशेष क्षण. या कहाण्या त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या प्रवासात आलेले अनेक अडथळे आणि त्यांच्यावर मात करण्याची तळमळ दर्शवतात.
या कहाण्या व्यक्तीगत प्रेरणांचे उदाहरण देतात, जे इतरांना सुद्धा त्यांच्या चांगल्या कार्यांसाठी प्रोत्साहित करतात. यशाच्या प्रत्येक टप्प्यावर, ते नकारात्मकतेकडे सकारात्मकतेकडे वळण्यासाठी आवश्यक असलेले विचार, दृष्टीकोन आणि कृती यांचा समावेश असतो.
अधिकार्यांची यशोगाथा कशी प्रेरणादायक असते?
अधिकार्यांची यशोगाथा प्रेरणादायक असते कारण ती संघर्ष, जिद्द आणि दृढतेवर आधारित आहे. त्यांच्या कार्याचा मागोवा घेत असताना, आपण पाहतो की त्यांच्या प्रेरणाचा स्रोत कसा होता, ज्यामुळे ते आपले आव्हान स्वीकारून त्यांना यश मिळवले.
यशाची ही कहाणी इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षांवर मात करण्याची प्रेरणा देते. त्यामुळे, अशा कहाण्या केवळ एकट्या व्यक्तीच्या जीवनातील यशाची कथा नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा स्त्रोत ठरतात.
पूर्ण यश प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे?
पूर्ण यश प्राप्त करण्यासाठी, व्यक्तीला दृढ संकल्प, आत्मविश्वास, आणि योग्य विचारांची मागणी असते. कोणत्याही क्षेत्रात असलेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी महत्त्वाची म्हणजे धैर्य आणि समर्पण आहे.
त्याचबरोबर, यशाच्या या प्रवासात सकारात्मकता आणि सहकार्याचा महत्त्व देखील उपयुक्त ठरतो. इतर व्यक्त्यांचे समर्थन असणे किंवा एक चांगला मार्गदर्शक असणे यामुळे व्यक्तीला त्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक दिशा मिळते.
सकारात्मक विचार कसे विकसित करावे?
सकारात्मक विचार विकसित करणारे काही सामान्य उपाय आहेत जसे की ध्यान, सकारात्मक संवाद, आणि स्वतःची प्रेरणा यावर लक्ष केंद्रित करणे. रोजच्या दिनचर्येत छोटे छोटे सकारात्मक क्षण देखील महत्त्वाचे असतात.
त्याचबरोबर, नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी, आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते.
यश मिळवण्यासाठीचे काही टिप्स काय आहेत?
यश मिळवण्यासाठी, स्पष्ट उद्दिष्टे ठरवणे आणि त्या दिशेने कार्यरत रहाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण आपले लक्ष्य साधतेवेळी त्याबाबत सुसंगत राहणे आवश्यक आहे.
तुमच्या कार्यावर विश्वास ठेवणे आणि आव्हानांचा सामना करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व लक्षात ठेवून मेहनत करण्याची तयारी ठेवताना, तुम्ही यशाच्या पथावर अधिक जवळ जाल.
Canal ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ no Telegram
घे भरारी तू नावाचं टेलीग्राम चॅनल मराठी भाषेत आहे. हे चॅनल आपल्याला प्रेरणादायक विचार आणि यशोगाथा मिळवण्यासाठी डेझीग्न केलं आहे. चॅनलवर आपण कमी शब्दांत अनेक गोष्टी शोधू शकता आणि त्यांच्या संग्रहामध्ये त्यांचे सूंदर विचार पाहू शकता. हे चॅनल २०२० साली १२ जूनला सुरू झालं होतं. अशाच आणि अधिक माहितीसाठी आपल्याला http://t.me/ghebhararitu या लिंकवर जॉईन होऊन जीवनात नवीन उत्साह आणि प्रेरणा घेऊन जाऊ शकता.