तीर्थराज प्रयागराज येथे महाकुंभ सुरू झाला आहे. महाकुंभ हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा भव्य उत्सव आहे. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भक्त आणि संत या भक्तीमेळ्यात सहभागी होणार आहेत. हा महाकुंभ, भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे जागतिक व्यासपीठावर प्रदर्शन करतो. आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) यांनी या महाकुंभाचा इतिहास आणि त्याला असलेला सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा यावर आपले विचार मांडले आहेत.
https://youtu.be/751Q-teYhqs?si=EQq_BbcCQM3BbZKH