सध्याची परिस्थिती बघता नोकरी मग ती सरकारी असो किंवा खासगी असो, मिळवणे कठीण झालेले आहे अश्या मध्ये हाच सल्ला देतो की सध्या जे मिळतंय ते घ्या, दिवस वाईट आहेत. छोटी पोस्ट, मोठी पोस्ट ह्याचा विचार त्यांनी करा ज्यांच्याकडे खूप पर्याय उपलब्ध आहेत उगाच प्रत्येकाने असा विचार करू नका. घरची परिस्थिती पाहा आणि निर्णय घ्या कारण जरी आपले पालक बोलत नसले तरी 23-24 नंतर तुम्ही ओझच असता. त्यांचा चांगुलपणा म्हणून काही बोलत नाहीत.
चॅनल बंद करत आहोत कारण आता शंभर चॅनल झाले आहेत आणि सगळीकडून माहिती मिळते आहे. नावीन्यपूर्ण आता काही राहिलं नाही आणि त्याच बरोबर आमच्याकडे फारसा वेळपण नसतो.
परीक्षांसाठी एकजूट होऊन लढा. काहीजण बसतात घरी अभ्यास करत, शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात म्हणत. तुम्हाला नोकरी पाहिजे म्हणून तुम्हीच मैदानात उतरलं पाहिजे.
बाकी एखादी पोस्ट मिळाली नाही म्हणून टोकाची पावलं उचलू नका इतर पर्याय आहेत पण तुम्ही डोळ्यावरची झापडे उतरवली तर बाकीचं जग दिसेल. सगळ्यांची सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात आणि स्वप्न हेच सगळं नसतं हे लक्षात ठेवा.
नवीन लोक जे चॅनल काढू इच्छितात त्यांना हेच सांगेन की नवीन कल्पणे बरोबर या कारण general माहिती सांगणारे ढिगाने चॅनल झाले आहेत.
आम्हाला इतके दिवस support केल्या बद्दल व आमच्या बरोबर इतके दिवस जोडून राहिल्या बद्दल धन्यवाद!!
Civil Cafe 100% सहमत!!