来自 वपु काळे साहित्य ™ (@vpkalesahitya) 的最新 Telegram 贴文

वपु काळे साहित्य Telegram 帖子

वपु काळे साहित्य ™
व पु काळे यांची पुस्तके, विचार आणि बरच काही...
2,607 订阅者
419 张照片
1 个视频
最后更新于 01.03.2025 19:09

वपु काळे साहित्य 在 Telegram 上分享的最新内容


📕मराठी सुविचार संग्रह 📖
Total Pages - 89
Price - R̶s̶.̶9̶9̶.̶0̶̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)

(Limited time offer)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह.
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1

व.पुं.नी एक विचार मांडला आहे, " कोणत्याही वस्तूची किंमत ठरवता येते पण श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही.." तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा तिथे आपली माणसं असतात म्हणजेच आपण त्यांच्या सहवासात असतो. पण एखादी जीवाभावाची व्यक्ती आपल्या पासून दूर असेल तर तिच्या सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण, जसं व.पुं.नी म्हटलं आहे, श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही. बघा, सहवास हा अनेक नात्यांमध्ये असतो. जसं की पती पत्नी मधील सहवास, मित्र मैत्रिणींमधील सहवास, नातवंडांना लाभलेला आजी आजोबांचा सहवास आणि प्राण्यांचा सहवास. किती उदाहरणे आहेत नाही!! आता, पती पत्नी मधील सहवास म्हणजे " तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना.." हे नातं इतकं वेगळं आहे की दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. आपण जर विचार केला तर, समजा, पती पत्नी मध्ये छोटंसं भांडण झालं तर तो राग जास्त वेळ टिकतो? तर नाही. याचे कारण म्हणजे, दोघांपैकी एक जण जरी गप्प असला तरी कुठेतरी चुकचुकल्या सारखं वाटतं. का तर सहवास.. म्हणून व.पु. लिहितात, " कित्येकदा एकमेकांशी कडाडून भांडलो,पण एकमेकांशिवाय नाही कुठेच रमलो.."
दुसरं नातं म्हणजे आजी आजोबा आणि नातवंडे. अनुभवांची भरगच्च शिदोरी ज्यांच्या जवळ असते ते म्हणजे आजी आजोबा. शाळेत जाताना हळूच थरथरत्या हाताने नातवाच्या किंवा नातीच्या हातावर १० रु. २० रु. ठेवून खाऊ खा हं असं प्रेमाने सांगणारे. त्यांचा सहवास हा कितीही लाभला तरी कमीच असतो हो. मला आठवतंय, मी शाळेतून घरी आल्यावर गरम गरम वरणभात देणारी व शाळेच्या पहिल्या दिवशी बटाट्याची भजी तळणारी माझी आजी. या सुखाला तोडच नाही. या प्रेमाची, सहवासाची मोजणी होऊच शकत नाही. फक्त ते सुख अनुभवणं म्हणजे पर्वणीच असते. व.पु. म्हणतात तसं, " नभांगणातल्या चांदण्या मोजत बसायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे ह्या आनंदात विहार करायचा असतो.."
पार्टनर मधील एक ओळ आहे, " लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.." हे नातं म्हणजे मैत्रीचं. जिथे सुख दुःख अगदी हक्काने व्यक्त करता येतं. मैत्रीची अनेक उदाहरणे देता येतील. जसं की, ही दोस्ती तुटायची नाय म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री. मैत्रीमध्ये जेव्हा सहवास वाढतो तेव्हा ती अधिक घट्ट होते. तिथे व्यवहार नसतो. असते ते फक्त प्रेम.. तुम्हाला माहित आहे, प्राण्यांना बोलता येत नाही पण तरीही त्यांना स्पर्शाची भाषा चांगली समजते. घरातली एखादी व्यक्ती लवकर आली नसेल तर तो मुका जीव दाराशी वाट पाहत बसलेला असतो. कारण, त्यांना देखील त्या सहवासाची, प्रेमाची सवय झालेली असते. हा सहवास खरंच लाखमोलाचा असतो.
अशी नाती मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. कारण ती जीव ओवाळून टाकावी अशी असतात. सहवासाचं कोंदण असते ना त्यामध्ये.. शेवटी काय तर, सहवासाने नाती बहरतात तर प्रेमाचं शिंपण पडलं की ते टवटवीत होते. जसं, आपण नवीन रोप आणतो, त्यात जसं खत लागतं, सुर्यप्रकाश लागतो तसंच पाणी देखील लागते. कारण, वेळच्या वेळी पाणी घातले नाही तर झाड सुकते,कोमेजते. तसंच, नात्यात संवाद, सहवास आणि ओढ नसेल तर ते नाते देखील सुकून जाते. म्हणून ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवली पाहिजे पाहिजे..
.. मानसी देशपांडे

‘नाना, काही स्वप्नं लवकर संपतात नाही का?’
‘हो; पण झोप कायमची उडवतात.’
‘त्याला काय करणार? स्वप्नं कुठं आपल्या मालकीची असतात?’
‘खरं आहे; पण स्वप्नाच्या धास्तीनं माणूस झोप थोडीच सोडतो? ...काही वेळ अंधाराकडे पहातो आणि कूस बदलून परत निद्रेची आराधना करतोच ना?’
- अर्ध्यावर विरले गीत, वलय १९६६ #वपु #vapukale #vapu

“शुभा तुम्हाला सांभाळेल.”
“मला सांभाळण्याची गरज नाही. तिनं स्वतःला सांभाळावं. स्वतः रमायला शिकावं. मनोरंजनाच्या बाबतीतही माणसानं स्वतंत्र असावं.”
“आमच्या लक्षात नाही आलं.” आई धीर करून म्हणाली.
“दुसरा कुणी आपली करमणूक करील, अशी माणसानं अपेक्षा करू नये.”
- “बॉन्साय”, वपु ८५. १९८९.
नाही हो, वपु! इथे आम्ही आपल्याकडून, आणि रसिक वाचकांनी “पोष्ट्यां”कडून अपेक्षा करावी!! 😊

*उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी स्वतःची जागा सोडून ती सावलीचा वर्षाव करीत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत.*

*झाडांच्या औदार्याला ममत्वाला एकाच जागेचा शाप असतो.*

*छत्र आणि छत्री ह्यात फरक असतो .....*
*तेच छान आहे, नाहीतर ह्या कृतघ्न माणसांनी झाडाची अवस्था छत्र्यांसारखीच करून टाकली असती.*

✒️ *वपु काळे*

शरीराला मनाची साथ लागते का? आधी स्पर्श, की स्पर्श करावा, ही भावना? कोण कुणाला मोहात पाडतं? मीलनाची उत्कट इच्छा असो-नसो, एका ठरावीक, अनाकलनीय वळणावर शरीर पराभव करतं, एवढं नक्की! - “बॉन्साय”, वपु ८५. १९८९. #वपु #vapukale #vapu

समाजाला घाबरायचं ठरवलं
तर कोणतीही समस्या
सोडवता येत नाही.

स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय जगता येत नाही.

स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे, असं मानलं की जगणं हीच समस्या होते.

त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही.

✒️ *वपु काळे*

नायिकेला भूतकाळ असतो... सुरेशला फुलवण्याची कला अवगत होती. प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं. अर्पणभावाचा कोंब त्याशिवाय फुटत नाही. देतं कोण, घेतं कोण, हा उखाणा न सुटण्यातच समागमाची लज्जत असते. - “बॉन्साय”, वपु ८५. १९८९ #वपु #vapukale #vapu

काही घटना ...
कितीही खऱ्या असोत,
प्रामाणिक असोत,
निःपक्षपातीपणांन सांगायच्या असोत,

पण त्या सांगता येत नाहीत.

सत्य जेवढं कटू असतं, त्याच्या कितीतरी पट अधिक ते मुकं असतं. किंबहुना आपणच ते मुक बनवतो.

कारण सत्याला जेव्हा वाचा फुटते, तेव्हा माणसाची वाचा बसते.

एव्हढ्या साठीच सत्यानं मुकं असणं च सर्वांना परवडत.

✒️ वपु काळे

आपण पहिल्यांदा मन कधी मारलं, हे कुणालाच सांगता येत नाही. आणि रोहित, मनासारखी मुर्दाड गोष्ट जगात कुठलीच नाही. प्रत्येक हौस पुरवून घ्यायची त्याला सवय लागली, की ते जन्मभर हौस भागेल कशी, हा एकच छंद घेणार. मन मारायची तुम्ही सवय जडवून घ्या. तसं केलंत, तर तृप्तीच्या क्षणीही मन कासावीस होणार. त्यातही ते मन हुरहूर शोधायचा यत्न करणार. - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu कळलं नाही... कुणी वाचलंय? काय म्हणायचंय वपुंना?