🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏 @vithu_raya Channel on Telegram

🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏

@vithu_raya


श्री विठ्ठल - रुक्मिणी माता व श्री संत ज्ञानेश्वर माऊली नित्य दर्शन 🙏

🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏 (Hindi)

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर चैनल आपका हार्दिक स्वागत करता है! यहाँ आपको श्री विठ्ठल और रुक्मिणी माता के दर्शन के लिए संग्रहित अनमोल ज्ञान और माहात्म्यिक कथाएं प्राप्त होंगी। इस चैनल में श्री संत ज्ञानेश्वर माऊली के नित्य दर्शन भी उपलब्ध हैं। इस चैनल में आप भक्ति और आध्यात्मिकता की ऊंचाइयों तक उड़ान भर सकते हैं। यहाँ जुड़ें और अपने मन को शांति और सुकून की अनुभूति कराएं।

🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏

22 Nov, 16:12


उगेची म्हणजे काहीही न करिता... एकांतात जाऊन निवांत बसावे, आणि तिथे आपल्या श्वासाचा अभ्यास करावा...श्वास आत घेताना व सोडताना कसा अनाहत ध्वनी निर्माण होतो तो ऐकावा...अखंड श्वास घेत व सोडत बसावे...

येकांतीं उगेंच बैसावें | तेथें हें समजोन पाहावें |
अखंड घ्यावें सांडावें | प्रभंजनासी ||

-समर्थ रामदास

🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏

22 Nov, 13:07


श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर

शुक्रवार, दि.२२ नोव्हेंबर २०२४

🌸 दुपारचा पोशाख 🌸

🙏🏻 जय हरी विठ्ठल 🙏🏻

🌺🌷🪷🌻🌻🌼🌼🌼🌻🌻🪷🌷🌺

कार्तिक कृष्णपक्ष सप्तमी

उद्या निवडणूक निकाल व उद्या कळेल आपण आपल्या मुलांनाच्या व देव देश आणि धर्म यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान केलं आहे की या सर्वांनासाठी नरकाचे दरवाजा उघडलेत..

🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏

22 Nov, 05:22


श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्रीक्षेत्र_आळंदी-देवाची

श्रींची पवमान पूजा आणि दुधारती आजचे श्रींचे दर्शन

   शुक्रवार, दि.२२-११-२०२४

🛕📿कैवल्य चक्रवती माऊली📿🛕

🪻🪴🪻🪴🪻🪴🪻🪴🪻

🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏

22 Nov, 05:18


श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न,

कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार २४ तास दर्शन असते. त्यानुसार दि.०४ नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून २४ तास दर्शन सुरू करण्यात आले होते. या २४ तास दर्शन कालावधीत देव २४ तास उभा असल्याने, मुहुर्त पाहून देवाची विधिवत प्रक्षाळपुजा करून श्रींचे पूर्वीप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आले आहेत.

दि.२० नोव्हेंबर रोजीच्या मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न झाली. सदर पूजेच्या पूर्वी संपूर्ण मंदिर स्वच्छ धुवून घेण्यात आले. पहाटे नित्यपुजा झाल्यावर देवाच्या मूर्तीस चांदीचे पाऊल लावण्यात आले. त्यावर भाविक लिंबू साखर लावतात. श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला. दुपारी १२:२० ते १२:३० या वेळेत श्री.पांडूरंगास व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान घालण्यात आले. तसेच दुपारी ०२:२० ते ०५:३० पर्यंत श्री. पांडूरंगास रूद्राचा महाअभिषेक अकरा ब्रम्हवृंदामार्फत करण्यात आला. त्यावेळी देवास तेल लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर मुर्ती स्वच्छ करून दुधाचा अभिषेक करण्यात आला व देवाचा पोषाख, अलंकार व महानैवेद्य दाखवून आरती करण्यात आली असून, यात्रेसाठी बंद केलेले काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आले. तसेच रात्रौ शेजारतीच्या वेळी देवाचा शिणवटा घालवण्यासाठी आयुर्वेदिक (विविध वनस्पती, सुकामेवा, सुंठ, काळे मिरे इ.) काढा देवाला दाखविण्यात आला. तसेच दि.२१ नोव्हेंबर पासून भाविकांच्या हस्ते होणा-या तुळशी अर्चनपूजा, पाद्यपुजा व नित्यपुजा देखील सुरू करण्यात येत आहेत.

श्री_विठ्ठल_रुक्मिणी_मंदिरे_समिती

🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏

22 Nov, 03:08


श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन

शुक्रवार, दि.२२ नोव्हेंबर २०२४

🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकड आरती 🪔

🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर

🌅🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌅

🌺 कार्तिक कृष्णपक्ष सप्तमी 🌺

वाढत्या थंडीमुळे भगवान श्री विठ्ठल व आईसाहेब रुक्मिणी यांना हिवाळा संपेपर्यंत उबदार कपडे परिधान करण्यात येणार आहे..

🙏हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🙏

5,140

subscribers

17,489

photos

716

videos