🕉️ प्रभु श्रीरामांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थराज प्रयागचे महात्म्य सांगणारा महाकुंभ विशेष भक्तीसत्संग (भाग ३) Sanatan.org वर उपलब्ध ! 🌸
प्रभु श्रीराम, लक्ष्मण अन् सीता वनवासाला निघाले असतांना तीर्थराज प्रयाग येथे आले होते. त्या वेळी प्रभु श्रीरामांनी तीर्थराज प्रयागचे दर्शन घेऊन त्याचे महात्म्य त्या वेळी लक्ष्मण आणि सीता यांना कथन केले. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या साक्षात् प्रभु श्रीरामांच्या चरणस्पर्शाने गंगा-यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आणि त्या संगमावर वसलेले प्रयागक्षेत्र अधिकच पावन झाले आहे. या दिव्य प्रसंगाचे श्रवण करूया.
या सत्संगातून जाणून घेऊया -
१. शेषनागाने सांगितलेले ‘प्रयाग आणि त्रिवेणी संगम' यांचे महात्म्य !
२. प्रयागराज येथील त्रिवेणी संगम आणि तेथील पवित्र मंदिरांचे मानसदर्शन !
हा भक्तीसत्संग ऐकण्यासाठी भेट द्या : Sanatan.org/mr/audio-gallery
हा भक्ती सत्संग नेहमीसाठी वरील मार्गिकेवर उपलब्ध असेल !