स्पर्धांकुर @spardhankur Channel on Telegram

स्पर्धांकुर

@spardhankur


MPSC तसेच इतरही स्पर्धा परिक्षेसंबंधी 'प्रश्न मंजुषा, नोट्स, Que पेपर्स, PDF आणी व्हिडियी' ई. स्वरूपात माहिती ह्या चॅनेलवर आपल्याला विनामूल्य उपलब्ध होईल.

स्पर्धांकुर (Marathi)

स्पर्धांकुर नावाचं हा टेलीग्राम चॅनेल MPSC सोबत इतर स्पर्धा परीक्षांच्या संबंधित 'प्रश्नमंजुषा, नोट्स, Que पेपर्स, PDF आणि व्हिडियो' च संग्रह आहे. ज्यामागे तुम्हाला माहिती विनामूल्यपणे मिळवायला हवी तेते देणारं आहे. जर आपल्याला सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला आवडतं तर हा चॅनेल आपल्यासाठी उत्तम ठरेल. त्याशिवाय, ह्या चॅनेलवर सर्वांसाठी सुचना, सुझाव आणि स्वागत आहे. आपल्याला परीक्षेच्या सर्व आवश्यक माहिती औरंड आणि सोबत असणारी सहाय्य एकत्रित करण्यासाठी स्पर्धांकुर जॉईन करा आणि आपल्या सपनांची परवानगी प्राप्त करा!

स्पर्धांकुर

21 Nov, 15:57


💠 भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.

CAG :
(Comptroller & Auditor General of India)

▪️कलम - 148
▪️नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही.
▪️कार्यकाळ -  65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो.
▪️शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.

मागील काही CAG -
▪️पहिले - नरहरी राव
▪️13 वे  - राजीव महर्षी (2017 - 20)
▪️14 वे -  जी.सी. मर्मु (2020 - 24)
▪️15 वे - के. संजय मूर्ती

स्पर्धांकुर

21 Nov, 06:35


💠 मा. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे एकूण 30 वे, तर व्यक्ती म्हणून 20 वे मुख्यमंत्री आहेत.

मा. वसंतराव नाईक, मा. वसंतदादा पाटील,
मा. शरद पवार यांनी प्रत्येकी 3 वेळा, मा. शंकरराव चव्हाण, मा. विलासराव देशमुख, मा. अशोक चव्हाण, मा. देवेंद्र फडणवीस यांनी
प्रत्येकी 2 वेळी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

या प्रत्येकाची स्वतंत्र टर्म गणल्यास एकनाथ शिंदे हे 30 वे मुख्यमंत्री ठरतात, अन्यथा ते 20
वे मुख्यमंत्री ठरतात.

स्पर्धांकुर

21 Nov, 06:34


💠 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

एकूण 65.11% मतदान झाले आहे..

स्पर्धांकुर

21 Nov, 06:31


💠 महान टेनिसपटू राफेल नादाल यांचे टेनिसला अलविदा..
👉 22 वेळा ग्रँडस्लॅम विश्वविजेता
👉 12 वेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम विश्वविजेता
👉 ऑलिंपिक मध्ये दोन वेळा सुवर्णपदक विजेता...

स्पर्धांकुर

21 Nov, 03:07


💠 महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले आहे.

भारतीय संघाने (20 नोव्हेंबर) अंतिम सामन्यात चीनला 1-0 अशा फरकाने पराभवाची धुळ चारली.

यासह भारताने सलग दुसऱ्यांदा, तर एकूण तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे.

स्पर्धांकुर

20 Nov, 10:10


💠 उद्योगधंदे (Industries) : साखर उद्योग.....📚

◼️ भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक व दुसरा मोठा उत्पादक देश आहे.

◻️ देशातील एकूण साखर कारखान्यापैकी 36% साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.

◼️ देशातील कृषी आधारित क्रमांक दोनचा हा उद्योग आहे.

◻️ भारतातील पहिला साखर कारखाना सरना (बिहार)

◼️ महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सन 1920 बेलापूर (अहमदनगर)

◻️ भारतात सहकारी कारखान्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला.

◼️ महाराष्ट्रात केंद्रीकरण : गोदावरी, प्रवरा, कृष्णा, पंचगंगा,

◻️ भिमा, तापी, पूर्णा नदी खोऱ्यात एकवटले आहे

◼️ जगातील 15% (सध्या 20%) साखरेचे उत्पादन एकट्या भारतात आहे.

📚 महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने 📚

◻️ पुणे प्रशासकीय विभाग - 55 साखर कारखाने

◼️ नाशिक प्रशासकीय विभाग - 32 साखर कारखाने

◻️ औरंगाबाद प्रशासकीय विभाग - 34 साखर कारखाने

◼️ अमरावती प्रशासकीय विभाग - 9 साखर कारखाने

◻️ नागपुर प्रशासकीय विभाग - 5 साखर कारखाने

स्पर्धांकुर

20 Nov, 07:00


राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

तर झारखंड मध्ये ३१.३७% मतदान

स्पर्धांकुर

20 Nov, 05:38


💠 MPSC ला राज्यात विदर्भ असल्याचा विसर

वैद्यकीय प्राध्यापक भरती बाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

स्पर्धांकुर

20 Nov, 05:30


मतदानाची शाई विषयी जाणून घ्या वैज्ञानिक माहिती.

मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड कंपनी मतदानाची शाई बनवते.
या साईला इडायबल इंक असेही म्हणतात.

मतदानाची शाई म्हणजेच सिल्वर नाइट्रेट
बोटावर लावण्यात येणारी शाही ही सिल्वर नायट्रेट रसायनाचा वापर करून तयार केली जाते.

शाई लावल्यानंतर तिचा संपर्क आपल्या शरीरातील मिठासोबत होतो आणि त्याचे सिल्वर क्लोराईड मध्ये रूपांतरण होते.
सिल्वर क्लोराईड पाण्यात विरघळल्यानंतर ते त्वचेला चिटकून राहते.

ही शाई 72 तासापर्यंत पुसली जात नाही.
शाई पाण्याच्या संपर्कात येतात तिचा रंग काळा होतो आणि नंतर ती पुसली जात नाही.
साबण किंवा अन्य रसायनांद्वारे ही शाई पुसली जात नाही, जस जसा बोटांच्या पेशी जुन्या होतात तशी ही शाई निघू लागते.

स्पर्धांकुर

19 Nov, 10:54


💠 भारताचे सरन्यायाधीश

स्पर्धांकुर

19 Nov, 04:22


💠 विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

➡️ बहुजन समाज पार्टी - 237 
➡️ वंचित बहुजन आघाडी - 200
➡️ भाजपा - 149
➡️ मनसे - 125 
➡️ काँग्रेस - 101
➡️ राष्ट्रवादी शरद पवार - 86 
➡️ राष्ट्रवादी अजित पवार - 59
➡️ शिवसेना (शिंदे) - 81
➡️ शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95
➡️ अपक्ष - 2086

➡️ एकूण उमेदवार - 4136
➡️ एकूण जागा - 288
➡️ एकूण पक्ष - 158
➡️ बहुमत - 144+1

पुढचे 5 वर्ष चांगले जायचे असतील तर उद्या सर्वांनी आवर्जून मतदान करा.

स्पर्धांकुर

18 Nov, 09:29


💠 सर्व परीक्षांसाठी इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे

● 'ब्राह्मो समाज' ची स्थापना केव्हा झाली
- इ.स. 1828.

● 'ब्राह्मो समाज' कोणी आणि कुठे स्थापन केला
- कलकत्ता येथे, राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारतातील हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी कोणती पहिली चळवळ होती
– ब्राह्मो समाज

● सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मसमाजाची विरोधी संघटना कोणती
– धर्मसभा

● धर्मसभेचे संस्थापक कोण होते
– राधाकांत देव

● सती प्रथा कधी संपली
– सन १८२९.

● सती प्रथा बंद करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले
- राजा राममोहन रॉय

● 'आर्य समाज' ची स्थापना केव्हा झाली
- इ.स. 1875, मुंबई

● 'आर्य समाज' कोणी स्थापन केला
- स्वामी दयानंद सरस्वती

● आर्य समाज कशाच्या विरोधात आहे
– धार्मिक विधी आणि मूर्तीपूजा

● 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते
– राजा राममोहन रॉय

● राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला
– राधानगर, जिल्हा वर्धमान

● स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते
- मूळशंकर

● राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मसमाजाची सूत्रे कोणी हाती घेतली
- रामचंद विधावागीश

● ज्यांच्या प्रयत्नांमुळे ब्राह्मसमाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली
- केशवचंद्र सेन

● 1815 मध्ये कलकत्ता येथे 'आत्मीय सभा' कोणी स्थापन केली
- राजा राममोहन रॉय

● राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेअर या संस्थेशी संबंधित होते.
-हिंदू कॉलेज

● थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली
– 1875 एडी, न्यूयॉर्कमध्ये

● थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना भारतात केव्हा आणि कोठे झाली
– 1882, अड्यार, मद्रास येथे

● 'सत्यार्थ प्रकाश' कोणी रचला
- दयानंद सरस्वती

● 'वेदांकडे परत या' असा नारा कोणी दिला
- दयानंद सरस्वती

● 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केव्हा झाली
- इ.स. 1896-97, बैलूर (कलकत्ता)

● 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना कोणी केली
- स्वामी विवेकानंद

● अलीगढ चळवळ कोणी सुरू केली
- सर सय्यद अहमद खान

● अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली
– सर सय्यद अहमद खान

● 'यंग बंगाल' चळवळीचा नेता कोण होता
- हेन्री व्हिव्हियन डेरोजिओ

● 'सत्यशोधक समाज' ची स्थापना कोणी केली
- ज्योतिबा फुले

● भारताबाहेर कोणत्या धर्म सुधारकाचा मृत्यू झाला
– राजा राममोहन रॉय

● वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते
– पाटणा

● भारतात गुलामगिरी कधी बेकायदेशीर घोषित करण्यात आली
– 1843 इ.स.

● भारतात इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कोणी केली
- विल्यम बेंटिक यांनी

● 'संपूर्ण सत्य वेदांमध्ये सामावलेले आहे' हे विधान कोणाचे
- स्वामी दयानंद सरस्वती

● 'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस' कोणाला म्हणतात
- महादेव गोविंद रानडे

● विवेकानंद जागतिक धर्म परिषदेत कोठे प्रसिद्ध झाले
– शिकागो

● 'संवाद कौमुदी' पेपरचे संपादक कोण होते
- राजा राममोहन रॉय

● 'तत्व रंजिनी सभा', 'तत्व बोधिनी सभा' आणि 'तत्व बोधिनी पत्रिका' संबंधित आहेत
– देवेंद्र नाथ टागोर

● 'प्रार्थना समाज' कोणाच्या प्रेरणेने स्थापन झाला
- केशवचंद्र सेन

● महिलांसाठी 'वामा बोधिनी' मासिक कोणी काढले
- केशवचंद्र सेन

● शारदामणी कोण होती
– रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी

● 'कुका आंदोलन' कोणी सुरू केले
- गुरु राम सिंह

● 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा संमत झाला
– धार्मिक अपात्रता कायदा

● महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला 'लोककल्याणकारी' म्हणतात
- गोपाळ हरी देशमुख

● ब्राह्मसमाज कोणत्या तत्त्वावर आधारित आहे
- एकेश्वरवाद

● 'देव समाज' कोणी स्थापन केला
- शिवनारायण अग्निहोत्री

● 'राधास्वामी सत्संग' चे संस्थापक कोण
- शिवदयाल साहेब

● फॅविअन चळवळीचे समर्थक कोण होते
– ॲनी बेझंट

● 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात सुरू झालेली चळवळ कोणती होती
– असहकार

● 'भारत समाज सेवक' ची स्थापना केव्हा आणि कोणी केली
- गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 इ.स.

● शीख गुरुद्वारा कायदा केव्हा पास झाला
– 1925 AD.

● रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते
– गदाधर चटोपाध्याय

● डॉ. ॲनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा केव्हा बनल्या
– 1917 ई.

● स्वामी विवेकानंदांनी शिकागो जागतिक धर्म परिषदेत कधी भाग घेतला
– 1893 AD.

● 'येशूचे नियम' कोणी रचले
- राजा राममोहन रॉय

● राजा राममोहन रॉय यांचे कोणते पर्शियन पुस्तक होते जे 1809 मध्ये प्रकाशित झाले होते
- तुहफतुह-उल-मुवाहिदीन

● वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली
– राजा राममोहन रॉय

● राजा राममोहन रॉय यांना 'युगाचे दूत' कोणी म्हटले
- सुभाषचंद्र बोस

स्पर्धांकुर

16 Nov, 17:11


💠 शिगेरू इशिबा - जपानचे पंतप्रधान

स्पर्धांकुर

16 Nov, 00:39


💠 काही नुकतेच दिले गेलेले पुरस्कार 2024 :-

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी - डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर 
◾️सामंथा हार्वे - बुकर पुरस्कार (ऑर्बिटल कादंबरी - ब्रिटिश लेखक)
◾️फिलिप नॉयस - सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
◾️अनिल प्रधान - रोहिणी नय्यर पुरस्कार
◾️फ्रान्सिस फोर्ड कोपोला - AFI लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार (ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते)
◾️श्री रविशंकर - ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" फिजी देशाचा पुरस्कार
◾️उर्मिला चौधरी -  ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप पुरस्कार 2024
◾️पुरुष बॅलन डी'ओर पुरस्कार - रॉड्रि (स्पेन, मँचेस्टर सिटी) 
◾️महिला बॅलन डी'ओर पुरस्कार - ऐताना बोनमाटी (स्पेन, बार्सिलोना)
◾️शक्तीकांता दास -  सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ ग्रेड
◾️शास्त्रज्ञ बिभब कुमार तालिदार - हॅरी मेल पुरस्कार (गेंड्याच्या संरक्षणासाठी - इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर (IUCN) कडून)
◾️राजकुमार हिरानी - राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2023
◾️निकिता पोरवाल - फेमिना मिस इंडिया 2024
◾️5 वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 - सर्वोत्कृष्ट राज्य ओडिसा
◾️एस सोमनाथन (ISRO अध्यक्ष) - इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF) जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित
◾️मिथुन चक्रवर्ती -  दादासाहेब फाळके पुरस्कार

स्पर्धांकुर

15 Nov, 12:07


💠 नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग..

रचना सहायक परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे..


निम्नश्रेणी लघुलेखक आणि उच्चश्रेणी लघुलेखक 26 नोव्हेंबर ला होईल

स्पर्धांकुर

15 Nov, 07:54


🔰चर्चित पुस्तक आणि लेखक

कड़वा सच - लालू प्रसाद यादव

वेटिंग ऑफ महात्मा - आर. के. नारायण

रिब्युटिंग इंडिया - नंदन निलेकणी

दिलीप कुमार : इन द शॅडो ऑफ ए लिजेंड- फैसल फारुकी

बियोन्ड द मिस्टी वेइल - सुश्री आराधना जौहरी

द लाईफ अॅण्ड टाईम्स ऑफ जॉर्ज फर्नाडिस - राहुल रामागुंड

गांधी अँड द चंपारण सत्याग्रह - सुरंजन दास

गौतम अडानी : द मॅन् हू चेंज्ड इंडिया - आर.एन. भास्कर

अष्टांग योग - डॉ. सोनू फोगट

भारतीय संविधान : अनकही कहानी - राम बहादूर राय

मोदी @20 : ड्रिम्स मिटिंग डिलीव्हरी - ब्ल्यू क्राफ्ट डिजिटल फाऊंडेशन

Decoding the Yoga Sutra by Patanjali - जय सिंघानिया, आचार्य कौशल

लेट मी से इट नाऊ - राकेश मारिया

प्लेस कॉल्ड होम- प्रीती शेनॉय

जस्टीस फॉर द जज - रंजन गोगोई

पाचोळा - रा. रं. बोराडे

शालिमार द क्लाऊंड - सलमान रश्दी

नरेंद्र मोदी : द गेम चेंजर - सुदेश वर्मा

■ चिनी महासत्तेचा उदय - सतीश बागल

द लास्ट डायरी ऑफ कस्तुरबा - तुषार गांधी

■ इंडिया व्हर्सेस चायना- कांती बाजपेयी

पुअर इकोनॉमिक्स - अभिजीत बॅनर्जी

अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड - दीप्ती नवल

हाऊ चीन सिज इंडिया अॅन्ड वर्ल्ड - श्याम सरण

द रिव्हेंज ऑफ पॉवर मोझेज नेईम चेजिंग पॅरॅडॉईम्स - एन.के. सिंग

■ द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनर्सटन वर्ल्ड -एस. जयशंकर

व्हेन द हार्ट स्पिक्स - भूपेंद्र कौल

तु एक मुसाफिर -डॉ. सुहास पेडनेकर

■ शी इज-वूमन इनस्टीम - सुप्रीत के. सिंग

■ The Struggle for Police Reforms in India- प्रकाश सिंह

स्पर्धांकुर

15 Nov, 07:47


💠 भारतीय वंशाच्या तुलसी गबार्ड यांची Director of National Intelligence पदी नियुक्ती

जन्म -12 एप्रिल 1981

> मूळच्या अमेरिकन सामोआ वंशाच्या असून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला

> 2002 मध्ये राजकीय कारकीर्दला सुरुवात

> एप्रिल 2003 मध्ये, हवाई राज्य विधानमंडळात सेवा देत असताना, हवाई आर्मी नॅशनल गार्डमध्ये भरती

> 2004 ते 2005 दरम्यान ड्राकमधील हवाई नॅशनल गार्डमध्ये मेजर

> 2012 च्या मध्ये हवाई बेटांतील दुसऱ्या काँग्रेशनल प्रभागातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वाची निवडणूक जिंकली.

> 22 जानेवारी 2013 रोजी, गॅबार्ड यांची डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

> 12 ऑक्टोबर 2015 रोजी मेजर पदी पदोन्नती

> 2016 मध्ये डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या उपाध्यक्ष

> 2020 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या शर्यतीत

> ऑक्टोबर 2022 मध्ये डेमोक्रॅटिक पक्ष सोडला

> 2024 मध्ये रिपब्लिकन पक्षात सामील

> नोव्हेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती

स्पर्धांकुर

15 Nov, 06:47


💠 द बुकर पुरस्कार 2024 समंथा हार्वे ऑर्बिटल या पुस्तकासाठी..

स्पर्धांकुर

03 Nov, 04:30


💠 समस्त सरकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, सेतू शासकीय कामकाज, न्यायालयात शपथ पत्रासाठी स्टॅम्प पेपर ची आवश्यकता नसल्याबाबत शासन निर्णय.दि. ३०/१०/२०२४ आता स्टॅम्प पेपर घेण्याची गरज नाही

जनतेनी व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी

स्पर्धांकुर

02 Nov, 06:24


💠 मंत्र्याची संपत्ती..

⭐️ अदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये 771% वाढ
⭐️ सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत  एकून संपत्ती 218.1 कोटी रुपये आहे.
..

स्पर्धांकुर

01 Nov, 19:31


💠 महिला व बालविकास करिता 10
नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

स्पर्धांकुर

01 Nov, 11:24


💠 CDCC Bank Paper Pattern - Topicwise

https://youtube.com/shorts/4V48CnadTUI

स्पर्धांकुर

01 Nov, 07:06


💠 आयपीएल 2025 साठी सर्वाधिक महागडा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेन्रिथ कारासेन हैदराबादने क्लासेन ठरला असून त्याला संघाने 23 कोटी ₹ मोजले आहेत. पाठोपाठ बंगळुरू संघाने किंग विराट कोहली साला, तर लखनौ संघाने वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन याला 21 कोटी रुपये देत कायम ठेवले..

स्पर्धांकुर

31 Oct, 15:55


💠 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

स्पर्धांकुर

31 Oct, 15:54


💠 रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर

स्पर्धांकुर

31 Oct, 11:28


💠 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक Exam Date

स्पर्धांकुर

30 Oct, 13:27


💠 #TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध..


✒️ लिंक :
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

स्पर्धांकुर

30 Oct, 12:37


💠 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या #DCC भरतीत बँकिंग आणि सहकार हा विषय आहे. त्या टॉपिक वरील खालील व्हिडिओ नक्की पाहा 👇

✒️ भारतीय बँकेचा इतिहास
✒️ भारतीय वित्तीय व्यवस्था
✒️ भारतीय बँक व सहकार रचना

https://youtu.be/N3mi9ES0MxI

स्पर्धांकुर

29 Oct, 11:37


💠 देशातील पहिले

स्पर्धांकुर

29 Oct, 11:21


💠 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

महाविकासआघाडी आणि महायुती घोषित उमेदवारांची पक्ष/विभागनिहाय संख्या

28 ऑक्टोबर पर्यंत

स्पर्धांकुर

29 Oct, 11:18


💠 MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर

स्पर्धांकुर

27 Oct, 04:39


💠 अवमान याचिका दाखल केल्यानंतर MPSC ची सावध भूमिका

BMC सात आयुक्तांची शिफारस यादी जाहीर.

स्पर्धांकुर

26 Oct, 07:19


💠 #Science

1)वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन

2) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार

3) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड

4) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान

5) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश

6) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन

7) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- 8 मिनिटे 20 सेकंद

8) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन

9) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य

10) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी

स्पर्धांकुर

26 Oct, 07:15


💠 रेल्वे विषयी थोडक्यात माहिती

स्पर्धांकुर

26 Oct, 04:58


💠 नासाचं “युरोपा क्लिपर” यान अंतराळात झेपावले

गुरु गृहाच्या चंद्रावर जीवसृष्टीचा शोध

स्पर्धांकुर

25 Oct, 16:05


💠 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक भर्ती 2024

पद: Clerk and Peon

परीक्षा दिनांक: 9,10,11 नोव्हेंबर 2024

📌 अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न समजून घ्या 👇

https://youtu.be/xuy8xMq1chU

स्पर्धांकुर

25 Oct, 11:34


💠 लोकशाही

स्पर्धांकुर

25 Oct, 09:06


💠 लवकरच एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. चला पाहूया स्टारलिंक मुळे काय बदल होणार आहेत:

सध्याच्या इंटरनेट सेवांचे आव्हान:

📌 स्पीड कमी, लेटेंसी जास्त, आणि वारंवार डिसकनेक्शनचा त्रास.

📌 कंपन्या वेळोवेळी टॅरिफ वाढवतात आणि बिल वाढवत असतात.

📌 ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही आणि तक्रारींवरही दुर्लक्ष होतं

स्टारलिंकचे फायदे:

1. संपूर्ण भारतात इंटरनेट:

🔸 कोणत्याही टॉवर किंवा केबलची गरज नाही.
🔸 गाव, डोंगर, वाळवंटात , किंवा समुद्रावरही सहज वापरता येईल.

2. मोठा कव्हरेज:

🔸 1200-2000 स्क्वेअर फूट क्षेत्रासाठी एकच कनेक्शन पुरेसं.

🔸 128 डिव्हाइसपर्यंत सहज कनेक्ट करू शकता.

3. हवामान-प्रतिरोधक सेवा:

🔸 -20°C ते +50°C तापमानातही कार्यरत.

🔸 96 किमी/तास वेगाने वारे वाहिले तरी कनेक्शनवर परिणाम नाही.

4. लेटेंसी आणि स्पीड:

🔸 अत्यंत कमी लेटेंसी आणि 50-100 MBPS पर्यंत वेग.

🔸 कारमध्ये 160 किमी/तास वेगाने जातानाही इंटरनेट कनेक्शन चालू राहील.

5. फ्लेक्सिबल प्लॅन:

🔸 सेवांना पॉज किंवा रिझ्युम करता येईल; काम नसल्यास सेवा बंद करता येईल.

🔸 एकाच प्लानमध्ये सहज अपग्रेड किंवा डाऊनग्रेड करण्याचा पर्याय.

6. रोमिंगची गरज नाही:

🔸 भारताबाहेर किंवा प्रवासातही स्वतंत्र रोमिंग प्लान घ्यायची आवश्यकता नाही.

स्टारलिंकचा प्रभाव:

📌 भारतातील टेलिकॉम कंपन्यांसाठी मोठं आव्हान ठरणार.

📌 जिओ आणि एअरटेलला चांगल्या सेवा द्याव्या लागतील किंवा ग्राहकांना गमवावं लागेल.

📌 इंटरनेट सेवा आणि स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार सेवा मिळतील.

स्पर्धांकुर

24 Oct, 09:22


💠 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 

स्पर्धांकुर

24 Oct, 09:19


💠 भारतातील काही प्रमुख राष्ट्रीय उद्यानांवर आधारित महत्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
राजस्थान

सरिस्का राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
राजस्थान

दाट पक्षी राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
राजस्थान

कान्हा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
मध्य प्रदेश

पेंच राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
मध्य प्रदेश

नमदफा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
अरुणाचल प्रदेश

सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
हरियाणा

कालेसर राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
हरियाणा

दुधवा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर प्रदेश

बेतला राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
झारखंड

सिरोही राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
मणिपूर

खांगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः सिक्किम.

क्लाउडेड राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
त्रिपुरा

मन्नारचे आखात राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू

शिमला राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
ओडिशा

स्पर्धांकुर

24 Oct, 07:34


💠 ब्रिक्स शिखर परिषद 2024

✔️ आवृत्ती - 16 वी
✔️ कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
✔️ ठिकाण - कझान (रशिया)
✔️ भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

स्पर्धांकुर

24 Oct, 07:34


💠 अभ्यासिकांचे होणार फायर ऑडिट

नवी पेठ दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाचा निर्णय

स्पर्धांकुर

24 Oct, 07:33


💠 T20 मध्ये Highest score

1. झिम्बाब्वे 344/4 vs गॅम्बिया(23 ऑक्टोबर 2024)

2. नेपाळ 314/4 vs मंगोलिया (27 सप्टेंबर 2023)

3. भारत 297/6 vs बांगलादेश (12 ऑक्टोबर 2024)

स्पर्धांकुर

22 Oct, 14:00


💠 भारतात पाण्यावर धावणार रेल्वेगाडी

स्पर्धांकुर

22 Oct, 13:59


💠 NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED RECRUITMENT OF 500 ASSISTANTS

🗓 Important Dates:

☑️ Online Registration: 24th October 2024 to 11th November 2024
☑️ Payment of Fees: 24th October 2024 to 11th November 2024
☑️ Phase I Examination: 30th November 2024
☑️ Phase II Examination: 28th December 2024

✔️ Vacancy: 500

स्पर्धांकुर

22 Oct, 07:42


➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :     04 नोव्हेंबर 2024

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :      04 नोव्हेंबर 2024

➡️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)2024 जाहिरात
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024

➡️आदिवासी विभाग भरती 2024
सुरूवात: 12 ऑक्टोबर 2024
शेवट :     02 नोव्हेंबर 2024

➡️समाजकल्याण विभाग भरती 2024
सुरूवात : 10 ऑक्टोबर 2024
शेवट :       11 नोव्हेंबर 2024

➡️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
सुरूवात: 23 सप्टेंबर 2024
शेवट:      22 ऑक्टोबर 2024

➡️महिला व बाल विकास आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य पुणे जाहिरात 2024
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024

स्पर्धांकुर

21 Oct, 12:59


💠 MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर

31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे

💠 https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

स्पर्धांकुर

20 Oct, 04:24


💠 आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त..

स्पर्धांकुर

20 Oct, 04:23


💠 जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

ओमर अब्दुल्ला दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मसुदा सुपूर्द करणार

स्पर्धांकुर

20 Oct, 04:20


💠 कुंपणच शेत खात आहे ?

2,621

subscribers

1,652

photos

11

videos