Latest Posts from मराठी व्याकरण (@marathi) on Telegram

मराठी व्याकरण Telegram Posts

मराठी व्याकरण
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
202,090 Subscribers
8,186 Photos
33 Videos
Last Updated 01.03.2025 05:39

Similar Channels

MPSC Geography
151,049 Subscribers
Bhagirath Academy Pune
41,152 Subscribers

The latest content shared by मराठी व्याकरण on Telegram


मराठी व्याकरणातील अंतिम शब्द
मो रा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन
अभिजात मराठी विशेष आवृत्ती फेब्रुवारी २०२५
सवलतीच्या दरात संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित घरपोच सेवा
खालील लिंकला क्लिक करून सुविधेचा लाभ घ्या.

https://www.amazon.in/dp/B0DMSPZ6S6

मराठी व्याकरणातील अंतिम शब्द
मो रा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन
अभिजात मराठी विशेष आवृत्ती फेब्रुवारी २०२५
सवलतीच्या दरात संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित घरपोच सेवा
खालील लिंकला क्लिक करून सुविधेचा लाभ घ्या.

https://www.amazon.in/dp/B0DMSPZ6S6

. 🌷विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा. 

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.

या गावात बरेच नारद आहेत.

माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.

विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

🌿6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.

उदा.  

आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.

त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.

नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.

वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

🌷7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.

उदा.

ज्याला कर नाही त्याला डर कसली.

गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.

ते ध्यान पाहून मला हसू आले.

देणार्‍याने देत जावे.

वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.

🌷5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.

उदा. 

शहाण्याला शब्दांचा मार.

श्रीमंतांना गर्व असतो.

जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.

जगात गरीबांना मान मिळत नाही.

वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

🌷अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-🌷

🌸नियम –

1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

आत्ताच मी नगरहून आलो.

शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.

वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही  मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

. 🌷केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.

आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.

आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.

वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi