देवा,तुला अामची हाक ऐकु येत नाही का...
एवढ साकड तुझ्याकडे घालतानाही,
हा विषाणु जात नाही का...
उघड डोळे अन फिरव नजर
एकदा या पिल्लाकडे रे...
श्रीमंत मुत्यृला घाबरताहेत अन
गरीब ईवलाश्या पोटासाठी मरतो रे....
ईवलाशा विषाणुने सगळ जग थांबवल रे
सुन्र होत रे मन,गरीब अन्नाशिवाय मरताना...
तुला वेदना नाही होत का?
सरणावर सरण पेटताना...
चुकला का माणुस?
शिक्षा देतोस का त्यांना
खुप वेदना होतात रे पश्चाताप होताना....
माणुसकी वाढली रे,
माणुस माणुस बनलाय अाता
अशा संकटकाळात दानधर्म करताना...
या भयंकार काळात,
पाॅझिटीव्ह शब्द ही वाईट झाला रे...
चुकला असेल माणुस तर
माफ कर एकदा अन
अावर पृथ्वीला रे....
शेवटी तुच म्हणे,
कर्ता करविता अन तुच जगाचा दाता ना...
संपव हे नैराश्य,
पाहू दे लोकांना एकदा,पुन्हा अानंदाने जगताना....
- सचिन दि.तोटावाड धानोरकर(नांदेड)
"""""""""""""""
प्रतिक्रिया नक्कीच कळवा...😊
👉 @TotawadSachu