*साहित्य:-*
१) घरातील एक खिडकी
२ एक छोटेसे फुलझाड अथवा ३) ऑक्सिजन प्लांट्स
४) अरेबिक मंद वासाची ऊदबत्ती (अथवा करडा पांढरा रंग असलेली अगरबत्ती)
*सर्वसाधारण माहिती*
अगरबत्ती सुगंधी असते व ती दरवळतांना तसेच विझल्यानंतरही सुगंध देते.
*कृती:-*
१) आपल्या खिडकी जवळील झाडाजवळ एक नियमित वेळ ठरवून न चुकता एक अगरबत्ती लावा. ज्यांना शक्य आहे ते तिथे एक मिनी मूर्ती सुध्दा ठेऊ शकतात.
२) रोज एक एक अगरबत्ती वाढवत जा.
३) असे करत ही संख्या १० पर्यंत वाढवत जा. म्हणजेच १०व्या दिवशी १० अगरबती दरवळत असेल.
४) ११व्या दिवसापासून एक एक अगरबत्ती कमी करत जा.
५) शेवटच्या दिवशी एकही अगरबत्ती लावू नका. फक्त आपल्या नियमित वेळी त्या खिडकी जवळ आपल्या झाडाजवळ थोडा वेळ बसा.
*ज्ञान*
जर तुम्ही न चुकता ही क्रिया २० दिवस केली असेल तर एक अनुभव येईल. जो जवळपास प्रत्येकालाच येईल.
अगरबत्ती दरवळतांना आणि नंतर विझल्यानंतरही सुगंध देते ही सर्वसाधारण माहिती आपल्यात आता ज्ञात झाली आहे.
*अनुभव*
आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे, मन आणि बुद्धीद्वारे आपण हा सुगंध साठवून ठेवत आहे. जो इतर अज्ञात ठिकाणी जरी आला तरी आपल्या ओळखीचा असल्यामुळे आपण पटकण तो ओळखू शकतो.
*अनुभूती*
१) २० व्या दिवसानंतर (काहींच्या बाबतीत जास्त काळ लागू शकतो) आपल्या खिडकीजवळ, त्या झाडाजवळ, त्या मूर्तीजवळ अगरबत्ती न लावताही आपल्या नेहमीच्या वेळी तोच नेहमीचा चिरपरिचित सुगंध दरवळत आहे असा भास होईल. आपल्याला असलेल्या सर्वसाधारण माहिती, ज्ञान आणि अनुभवावर त्या सुगंधाची अनुभूती होईल. कारण तो सुगंध आपल्या मेंदूत पक्का रुजला आहे.
२) काहींच्या बाबतीत तोच सुगंध आपल्या ओळखीच्या ठिकाणी आपल्या समोर दरवळत असतांनाही तो आपल्याला जाणवणार नाही. तो सुगंध येणारच नाही.
( ही अगदी विरुद्ध टोकाची परिस्थिती असेल)
*पुढे काय करायचे आहे?*
१) या प्रयोगातील अगरबत्तीला जर तुम्ही पुस्तके अथवा माणसांबरोबर रिप्लेस केले तर? एक दिवस असा येईल की पुस्तक न वाचताही तुम्ही फक्त आपल्या आसपास घडत असलेल्या घटनांचे विश्लेषण सर्वसाधारण माहिती, ज्ञान, अनुभव आणि अनुभूतीद्वारे करु शकाल. एखादी घटना का घडत आहे याचे स्पष्टीकरण देऊ शकतात.
२) हेच माणसांबाबत होईल. रोज भेटत असलेल्या माणसांचे तुम्ही विश्लेषण करु शकतात. अथवा न भेटताही फक्त त्याच्या सहवासातील क्षणांमुळे त्याच्याविषयी अंदाज बांधू शकतात. न भेटताही त्याला भेटण्याचा आनंद मिळविता येतो याची अनुभूती घेऊ शकतात.
कारण आपण सर्व जाणतो शेवटी अगरबत्तीचा सुगंध मन्न प्रसन्न करतो. मनाला एक आनंद देतो. हेच काम पुस्तके आणि माणसेही करतात.