स्वतः झुकून द्यावा लागेल संघटनेत काम करण्यासाठी आणि विषय पुढे घेऊन जावे लागेल घरी बसून हे होणार नाही दुसऱ्याच्या घरी शिवराय निर्माण झाले पाहिजे यापेक्षा मीच शिवरायांचा मावळा म्हणून पुढे येऊन काम करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे
आम्ही कधी स्वतःकडे पाहिले का आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील संघटन किती मजबूत आहे संघटनात्मक काम करताना आम्ही संघटनेचे सभासद झालोत का सभासद झाल्यानंतर संघटनेसाठी वर्गणी दिली का संघटनेच्या किती बैठकांना हजर राहिलो
हजर राहिल्यानंतर आपली भूमिका व आपली मागणी कधी मांडली का
या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर नाही असेल तर अपेक्षा करणे सुद्धा योग्य आहे का याचं स्वतः प्रति आत्माचिंतन करावे लागेल
यासाठी पुढे यावं लागेल संघटनेत मनापासून काम करावे लागेल घरातल्या कितीही अडचणी आल्या आणि संघटनेची बैठक आंदोलन असेल तर तिथे जावे लागेल ही भूमिका जर प्रत्येक लिपिकाची राहिली तर लिपिकांचे प्रश्न सुटतील आम्ही ते करत नाही म्हणून आमचे प्रश्न सुटत नाहीत करण्याची तयारी ठेवा आपले प्रश्न निश्चित सुटतील
आपले संघटन
आपले प्रश्न
आपला अजेंडा
आपला झेंडा
आपलाच दांडा
कोण आपल्या अजेंड्याच्या विरोधात आला तर त्याच्या विरोधात आपला दांडा विरोधात उभारण्याची धमक व तयारी ठेवून
आपल्याच अस्मितेची
आपल्याच अस्तित्वाची लढाई आपणाला लढावी लागेल
दुसरं कोण येणार नाही
स्वतःपासून सुरुवात करा
निश्चित न्याय मिळेल
कितीही संघटना निर्माण झाल्या कितीही लिपिकांची दिशाभूल झाली कोण केली तरी आमची एकतेची एकात्मतेची ताकत हे फुटता कामा नये परंतु आपल्या एकतेला आपल्याच लोकांनी कीड लावलेली आहे त्या किडीला आम्ही विरोध केला नाही म्हणून आपल्याच संवर्गाच्या चार संघटनात्मक शकल निर्माण झाली ते कधी स्वार्थापुटे झाली ते कधी पदांसाठी निर्माण झाली कधी स्वाभिमान दुखावला म्हणून झाली या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवून फक्त लिपिकांना न्याय मिळेल या भूमिकेसाठी काम करणाऱ्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही राहिलो पाहिजे अन्यथा आपणाला कधीच न्याय मिळणार नाही
आपला सहकारी
उमाकांत सूर्यवंशी पुणे