Life With Positive Vibes @lifewithpositivevibes Channel on Telegram

Life With Positive Vibes

@lifewithpositivevibes


"If you can't find the right path, you have to make it your own," while making it there will be ups and downs, in such a situation the only option is to focus your goal and keep walking to achieve it and in this journey I am always with you...

Life With Positive Vibes (English)

Welcome to 'Life With Positive Vibes' - a Telegram channel dedicated to spreading positivity, motivation, and inspiration. In a world full of challenges and uncertainties, it's important to surround ourselves with positivity and uplift our spirits. This channel aims to do just that by sharing daily doses of motivation, encouragement, and positive vibes to help you navigate through life's ups and downs. The username '@lifewithpositivevibes' perfectly captures the essence of what this channel is all about. It serves as a reminder that no matter what obstacles come your way, maintaining a positive mindset and outlook can make all the difference. The famous quote 'If you can't find the right path, you have to make it your own' resonates deeply with the channel's mission of empowering its members to carve their own paths towards success and happiness. Who is it for? Anyone who is in need of a boost of motivation, a ray of positivity, or simply a reminder that better days are ahead. Whether you're going through a rough patch, facing challenges in your personal or professional life, or just looking for some daily inspiration, 'Life With Positive Vibes' is the perfect place for you. What is it? It's more than just a Telegram channel - it's a community of like-minded individuals who believe in the power of positivity and the importance of supporting each other on our journeys. Through uplifting quotes, success stories, personal development tips, and more, this channel aims to create a space where you can recharge your spirit, refocus your goals, and keep moving forward with confidence. So, if you're ready to fill your days with positive energy, motivation, and encouragement, join us at 'Life With Positive Vibes' and let's walk this journey together. Remember, no matter what challenges you face, you're never alone - we're here to remind you that the best is yet to come. Stay positive, stay motivated, and keep spreading those good vibes!

Life With Positive Vibes

07 Jan, 15:15


QUANT Foundation - Maths Master 1.0
-----------------------------------------------------------------
❤️एकाच SESSION मध्ये 4-5 Marks Fix.

    📹 Must Watch-Live Format📹

                  📹 YouTube Live  📹

-----------------------------------------------------------------
https://youtube.com/live/c3WadC9EUh4
https://youtube.com/live/c3WadC9EUh4
https://youtube.com/live/c3WadC9EUh4

📚 Topic - Number Series [ Mains Level ]
Time - 9 pm [ 7 Jan 2025 ]
👨‍🏫 Faculty - Rahul Misal

Life With Positive Vibes

04 Jan, 02:13


जरुरी नहीं जिंदगी का हर एक दीन हमारा ही हों... उसे खुद अपना बनानें में जिंदगी का असली मजा हैं !!

Good Morning Officers....😊👍✌️

Life With Positive Vibes

01 Jan, 11:40


या 5 सवयी तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवतील !! New Year Resolution !!


Happy New year to you and your family..💐💐


https://youtu.be/2h58LosW5Ik?si=sEpbCYh5nwJQcQwI
https://youtu.be/2h58LosW5Ik?si=sEpbCYh5nwJQcQwI

Life With Positive Vibes

30 Dec, 10:11


🌟 Rahul: The Untold Story 🌟
🎥 संपूर्ण जीवन प्रवास...

घरातील लाडका मुलगा ते वडिलांची बिकट आर्थिक परिस्थिती तून बाहेर पडून ते हजारो Bankers घडविणारा शिक्षक..

https://www.youtube.com/watch?v=xxF3-THWLYo
https://www.youtube.com/watch?v=xxF3-THWLYo

Life With Positive Vibes

30 Dec, 02:04


🎂 HAPPY BIRTHDAY RAHUL SIR 🎂

Life With Positive Vibes

24 Dec, 02:06


🍁🌼☘️🌺🎯🤩💞

खचेल तो Aspirant कसला?? हाडाचा Aspirant कधीच खचत नसतो..✌️
त्याला माहिती असतं की आज पास झालो नाही म्हणजे कधीच होणार नाही असं नसतं...
अपयशानंतर अपयशाच्या छाताडावर उभं राहून यशाला कवेत घेणारा खरा Aspirant असतो...😍🌿❤️

🌺 Good morning 🌼

🎯💎💞🎯🍁🥳👍

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

20 Dec, 08:54


✍️रेश्मा शितोळे..👍✌️

Life With Positive Vibes

16 Dec, 16:04


SBI Clerk Notification Details 2025

https://youtu.be/37-jfhKKf7E?si=walRYdoadmTlwfbB
https://youtu.be/37-jfhKKf7E?si=walRYdoadmTlwfbB

Life With Positive Vibes

01 Dec, 02:18


जिद्द पण त्यांनाच निवडते, ज्यांच्या मध्ये लढण्याची ताकद असते.

जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.

माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो.

थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव. जो दिसत नाही आणि भेटतही नाही, पण मनापासून श्रध्देने आणि ताकदीने हाक मारा, धाऊन आल्याशिवाय राहत नाही.

आयुष्यातील काही गोष्टी या कब्बडी सारख्या असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोकं तुमचे पाय पकडायला लागतात. अहंकाराची उडी जास्त काळ टिकत नसते, कारण काही काळ गेला कि टप्पा येतो आणि टप्प्यात आला कि कार्यक्रम होतो.
•┈┈••✦✿✦•Good Morning•✦✿✦••┈┈•

Life With Positive Vibes

30 Nov, 15:47


आई आणि बाबा कविता..🥰🥰🌏🌏

एका नदीप्रमाणे वाहणारी म्हणजे आई असते..👩‍👩‍👦
आणि समुद्रसारखा सगळं सामावून घेणारा म्हणजे बाप असते..
आपण लहानाचे मोठे तर झालो....
पण माय बापाने केलेले उपकार नाही जानलो....
आईने तुला सावली लागावी म्हणून
तिचा पदर तुझ्यावर टाकला...
स्वतः उन पावसाळ वारा सोसून तुझा सांभाळ केला..
तू जेव्हा जन्माला आलास बापानं पुर्ण गावात सांगितल कि मला मुलगा झाला..
तुला खांद्यावर बसवून तुझ्यासाठी लहान झाला..
पण तू भावा आई वडिलांसिच परका झाला..
नऊ महिने आईने तुझा पोटात सांभाळ केला..
शेवटी तू त्या आईला एक ग्लास पाणी पण नाही दिला..
आई म्हणजे घराची भिंत तर बाप हा पाया आहे.
आपण भाऊ बहिण त्या घराची विट रेती
आणि माय बाप हेच आपले कुल दैवत आहे...

🙏🙏✍️✍️ लेखक.. अनिकेत चव्हाण

Life With Positive Vibes

14 Nov, 09:17


लिखा है....तुम्हारी किस्मत में है, उसे कोई नहीं छीन सकता, अगर उसका आशीर्वाद मिले, तो तुम्हें वह भी मिल सकता है जो तुम्हारा हो नही सकता"....😊💯
...Trust the process🔥🔥...
😊Good Afternoon Bankers😊
🖋️@A.S

Life With Positive Vibes

14 Nov, 03:22


#एक दिवस papa मनले पाहिजेत जे माझ्या मुलांनी नाही करून दाखवलं ते तू केलंसं🥹❤️...
इतके मोठ बनायचं स्वतः papa येऊन मनाव कि तुजावर गर्व आहे कि तू माझी मुलगी आहेस हेच हवं मला जीवनात...🤗
ना कुणाची राणी बनायची शोक आहे पण papa ची princeess जरूर बनायचं...❤️ त्याच्या विस्वास बनायचं मला...
त्यांनी मला तितके नाही बोलत माझ्या स्वप्नाविषयीं एक दिवस असा जरूर येईल कि त्यांना त्याच्या मुलीवर गर्व होईल कि तू माझीच मुलगी आहेस..!!
🥹🥹🥹❤️❤️❤️

__✍️𝐯𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤🌺

Good Morning Officers.....🔥🔥

Life With Positive Vibes

11 Nov, 14:42


एकदा मनाला अद्दल घडली पाहिजे
असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे


पुन्हा एकदा मनाला त्रास झाला पाहिजे
त्या मनाला कोणीतरी तोडले पाहिजे
असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे...

डोळ्यांत आसवांचा पूर आला पाहिजे
हृदयाचे तुकडे तुकडे झाले पाहिजे
असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे

चेहर्यावरच हे हसू मिटलं पाहिजे
गरीबांसाठी प्रेम नाही हे कळालं पाहिजे
असं एकदा कोणीतरी भेटलं पाहिजे

प्रेमाचं भूत मनातून उतरलं पाहिजे
जबाबदारीचे चटके सोसले पाहिजे
असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे

आईलडिलांच्या कष्टाची तुला जाण पाहिजे
प्रेमाचं नाही तर स्वप्नांचं वेड तुला लागलं पाहिजे..
असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे

तुझ्या कष्टाला मित्रा यश आलं पाहिजे
तुझ्या झोपडीला रंगरंगोटी झाली पाहिजे.
असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे

आईवडीच्या कष्टाचं ऋण तु फेडलं पाहिजे
येताना तु त्याच्या भेटीला लाल दिवाच्या गाडीतचं आला पाहिजे
आईवडिलांच स्वप्न तू सत्यात उतरवले पाहिजे...

✍️ अभिषेक जाधव

Life With Positive Vibes

31 Oct, 01:54


बरेचसे विद्यार्थी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी दिवाळीलाही घरी गेलेले नसणार...

खरंतर अशा विद्यार्थ्यांना वाईट वाटण्यापेक्षा स्वतःचा अभिमान वाटायला हवा, की आपण एवढे mature झालो आहोत की काही गोष्टींचा त्याग करू शकतो आणि याचा अर्थ असा अजिबात नाही की जे गेले आहेत, ते mature नाहीत...
ते एवढे कर्तव्यदक्ष तर नक्कीच आहेत, की त्यांनी सगळं व्यवस्थित manage केलं असेल....

ह्या अभ्यास करणार्‍यांमध्ये काही असतील पहिल्यांदाच परीक्षा देणारे, तर काही असतील शेवटची संधी असणारे!!!

सर्वांसाठी फक्त एवढंच -
होतील तेवढे कष्ट करा, मिळालेल्या संधीचं सोनं करा,
आपले माय बाप खूप मेहनत करतात आपल्यासाठी,
त्यांच्या डोळ्यातली आशा विझून देऊ नका...
आपण जे आयुष्य जगतोय, ते कोणाचंतरी dream life आहे, हे पण लक्षात असू द्या...

हळद तर प्रत्येकाच्याच अंगाला लागते,
पण गुलाल अंगावर पडायला नशिब लागतं..
आणि आपल्याला तेच नशिब बनवायचं आहे!!!

कर्म करत रहा, फळाची काळजी करू नका, ते नक्की येणार तुमच्याकडेच!!!

✍️P. Patil

Good morning Bankers

💎💫💌🌸💞🍁

Life With Positive Vibes

28 Oct, 02:23


आयुष्य हे फक्त एकदाच मिळत
ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा

मानल की संकटे खूप येतात पण
पण तूम्ही सामोरे जाऊ शकता म्हणून येतात

काही तरी मिळवण्यासाठी काही तरी सोडावं नाही तर त्या साठी काही तरी करावं लागत

काही गोष्टी कठीण तर असतातच पण
अशक्य तर काहीच नसत ना

सुख दुःख तर येणारच
सुखाचा आनंद आणि दुःखात धीर धरा

माणसांचा विचार करत बसू नका
जे तुमचे आहे, ते तुमच्या साठी थांबतील

आत्मविश्वास जर तुमच्यात असेल
तर कुणाच्या आधाराची गरज नसते

                       Nikita pathade ❣️

Life With Positive Vibes

26 Oct, 12:41


🪔Dipawali Coming Soon 🪔

              🥹""नि:शब्द""🥹

        !!...सगळ्यांनी नक्की ऐका...!!

आपण दिपावली ला आॅनलाईन खरेदी करतो जेवढे पैसे आहेत तेवढे आॅनलाईन पे करतो..
पण कधी विचार केला का हो?
आपण जे आॅफलाईन सामान घेतो आणि खरेदी करतो ना..,
त्या पैशावर गरीबांचे पोट आणि त्यांच सगळ घर चालते..!!

आॅनलाईन च्या ह्या दुनियेमध्ये आपण हे सगळ‌ं विसरून जात आहोत....
एक वेळ विचार करा ना ह्यांना पण आपल्यासारखी दिपावली आनंदामध्ये , फटाक्यामध्ये🎇 साजरी करू वाटत नसेल का बर...?

तर हो,
त्यांना पण आपल्या सारखीच दिवाळी🪔 साजरी करू वाटते पण मग त्यांच घर कसं चालणार ?
लेकरांना कपडे ,फटाके कसे मिळणार?
असे असंख्य प्रश्न त्यांच्या समोर आणि मनामध्ये उभे असतात,
ते घरासाठी, आपल्या लेकरांच्या सुखांसाठी स्वतःचा कधीच विचार करत नाहीत..!
लेकराला खुष पाहून ते पण खुष राहतात आणि आनंदामध्ये असतात☺️
हिच त्यांची दिपावली असते🪔🎇

आणि शेवटी एक राहिल आॅनलाईन खरेदीमध्ये आपण जेवढे पैसे आहेत तेवढे  पे करतो तिथं कमी- जास्त असा कोणताच विचार करत नाही मग अशा गरजूंन जवळ माञ आपण खुप बारकाई करतो त्यांना ज्या किंमतीमध्ये ती वस्तू मिळत नाही त्या किंमती मध्ये आपण त्यांना मागतो
ह्या गोष्टींचा आपण कुठ तरी एक वेळस नक्की विचार केला पाहिजे..👍

त्यामुळे आॅनलाईन दिवे खरेदी करते वेळी
अशा गरजूंचा आपण नक्की  विचार करायला हवा 💯👍
‌‌
                             _✍️@vw.

Life With Positive Vibes

25 Oct, 00:46


[ ""Dream😍 + Struggle🥹 =
[$uccess""✌️🏆...]
🪷🌿🌺🌼🌹🥀

!!___यशस्वी होई पर्यंत
     स्वतःची तुलना..,
     फक्त कष्टासोबत..,
     आपल्या  मेहनतीवर..,
    आणि स्वतः सोबत करा👍✌️
     🔥इतरांच्या सोबत नाही...✓

   
!! __👩‍🏫लायब्ररी मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सध्याची परिस्थिती💯👍...

Good Morning Officers....👍✌️💐

Life With Positive Vibes

23 Oct, 09:04


इतरांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या, निष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाने लोकांच्या दूषणांची पर्वा केली नाही. ‘मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा, भोगी म्हणूनी उपहासा, मी योगी कर्माचा, माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा” असे म्हणत श्रीकृष्णाने सोळा सहस्त्र कन्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला. “पराधीन ना समर्थ मी घेण्या वार कलांकाचा” असे धोरण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या अवतारकार्यात अन्याय करणाऱ्यांना शासन करत गांजलेल्या दुःखी जीवांना दुःखातून मुक्ती दिली. त्यामुळे इतर काय म्हणतील याचा विचार न करता जे घडून गेले ते चांगलेच घडले, जे घडतेय ते चांगल्यासाठीच घडतेय आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहणे हा जीवनाचा उद्देश असायला हवा.....🚩

Good Afternoon Officers

Life With Positive Vibes

22 Oct, 01:57


"🎯एकाग्रता आणि अभ्यास📚"

Good Morning Officers....👍✌️

Life With Positive Vibes

21 Oct, 02:22


पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाली आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला  बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿

Good Morning Officers......🔥🔥

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

20 Oct, 13:17


फक्त वाचू नका,विचार करा घडलं त्याचा.

गरीबी खूप वाईट असते हो😔जे लोक तसे दिवस काढून अभ्यास करतात त्यांना विचारा साहेब😢पोट मारून,बेचव जेवण खाऊन😭 कितीतरी वर्ष हडाचं पाणी करून😭तोंडावर परीक्षा आली असताना त्यांच्या अभ्यासाची जळून अशी राख होते?ह्याला कोण जबाबदार काय पाप असेल ह्या निस्वार्थी मुलांचं ज्यांच भविष्य ह्या आगीत जळाले😭
ही वणव्यासारखी आग जंगलात लागते हे एकूण आहे परंतु पुण्यासारख्या शहरात लागते हे आश्चर्यजनक😔आग लागली का?लावली गेली ह्याचा तपास करणे गरजेचे.गरीब विद्यार्थ्यांचे पुस्तके,महत्त्वाची परीक्षेस लागणारी कागदपत्रे ह्यांची जळून राख झाली.ह्यात हाल होतात गरिबांच्या लेकरांचे,श्रीमंत नवीन पुस्तके घेवू शकतात पण गरिबांचे काय?😔सढळ हाताने मदत करणाऱ्या संस्था,व्यक्ती,प्रशासान अश्या विद्यार्थ्यांना लवकर मदत करेल का?खरचं येईल का कुणाला ह्या विद्यार्थ्यांची दया आणि कोण देईल ह्यांना आधार?
ठिकाण-ध्रुवतारा अभ्यासिका.नवी पेठ,पुणे.
...........🦋🌺🙏............
शब्दांकन-B.S.Kendre

Life With Positive Vibes

19 Oct, 11:42


#भरोसा... #

Jay Shree Krishna.....🙏🙏
Good Evening Friendes....😊😊

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

19 Oct, 00:29


ज्यांनी स्वतः ला घडवण्यासाठी वेळ गमवलेला असतो त्यांना घमंड नाही तर आत्मविश्वास असतो की ते काम तर करू शकतील...अभ्यास आणि मेहनत कधीच वाया जात नाही .काही चुका होतात त्या शोधाव्या लागतात चुका का  झाल्यात याच चिंतन करावं लागत...आणि तीच चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते... नशिबाच माहिती नाही पण मेहनत वाया जात नाही.... Pradip Patil Malekari

Good Morning Officers.....🔥🔥

Life With Positive Vibes

18 Oct, 16:13


बाबा 🥰

आईवडील या आपल्या आयुष्यातील अशा दोन व्यक्ती आहेत, ज्यांचा आधार मुलांना ती लहान असो वा मोठी कायमच लागतो. आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार असेल तर मुलं जगातील कोणत्याही कठीण आव्हानाला तोंड देऊ शकतात. मुलांना जन्म देण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आईवडील आयुष्यभर काबाडकष्ट करतात.💯😇 पण त्या कष्टाची झळ कधीच मुलांपर्यंत पोहचू देत नाहीत. मुलांना मात्र नेहमीच आईवडील गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते. नंतर त्यांची आठवण काढून काहीच उपयोग नसतो. म्हणूनच आईवडील जिवंत असताना त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर भरभरून प्रेम करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही.जितकं आईवरचं प्रेम शब्दांतून , कृतीतून व्यक्त केलं जातं तितकंच बाबांविषयीचं प्रेम आपण करायला हवं तितकं व्यक्त करत नाही.😔
भलेही आपल्या मनात त्यांच्याविषयी कितीही आदर आणि प्रेम असो, आपण ते शब्दांतून ,स्पर्शातून व्यक्त करत नाही. त्यांच्या धाकापोटी आपण त्यांच्यात आणि आपल्यात उगाच एक अदृश्य भिंत बांधून ठेवलेली असते. ती भिंत तोडून टाका आणि बाबांवरचं प्रेम बिनधास्त व्यक्त करा. बाबांचा वाढदिवस, फादर्स डे या खास दिवशी बाबांवरचं प्रेम तर व्यक्त करायलाच पाहिजे पण खरं तर आपल्या माणसांवरचे प्रेम व्यक्त करायला कुठल्या खास दिवसाची गरज नसते.💯
ते आपण कधीही व्यक्त करू शकतो. तुम्हालाही तुमच्या वडिलांविषयीचा प्रेम, आदर आणि काळजी व्यक्त करायची असेल पण त्यासाठी शब्द सापडत नसतील तर आम्ही तुमच्या मनातल्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. बाबा, तुम्ही मला केवळ कसं जगायचं हेच शिकवलं नाही, तर तुमच्याकडे बघून आयुष्य कसं असावं याची शिकवण मिळते. बाबा तुम्ही माझा आदर्श आहात...!
तुमचा प्रेमळ हात डोक्यावर आहे म्हणून हे आयुष्य सुंदर आहे. ते लोक भाग्यवान असतात ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. बाबा तुमची साथ असेल तर तुम्ही माझ्यासाठी बघितलेली स्वप्ने मी पूर्ण करू शकेन.🤩💯💫

बाबा, तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्या गेल्याचा मला अभिमान आहे. इतर कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार. 🤗

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे , कितीही मोठे झालो तरी पाठीशी ठामपणे बाबांनी उभं असणं होय. तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. बाबा, तुम्ही मला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी भेट आहात. तुमच्याशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नसेल.

माझे बाबा हे माझे हिरो, माझा आधार, माझा हक्काचा श्रोता, माझे मार्गदर्शक, मित्र, संरक्षक आणि प्रत्येक वेळी मला गरज असताना माझा सपोर्ट आहेत. बाबा, तुम्ही ग्रेट आहात...!

या जगात कोणीही मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही.💯

या नात्यात काहीतरी खास आहे, ज्यामुळे जगातील प्रत्येक वडील आणि प्रत्येक मुलगी याबद्दल भरभरून बोलते. हा अनुभव घेण्यासाठी एकतर तुम्हाला मुलगी व्हावे लागेल किंवा मुलीचा बाबा! या नात्याचे शब्दांत वर्णन केले जाऊ शकत नाही...

I miss you papa😔

जर तुम्हाला हे Success thoughts in Motivation आवडले तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.👍🏻...

आपलीच सोबती:-
✍🏻Mannu(A.S.J)

Life With Positive Vibes

18 Oct, 03:54


💯गरीबीच्या आयुष्यात खेळणी महाग असतात, स्वप्न नाही......🤩✌️

G●●d M۝řNΐNg

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

17 Oct, 13:58


जीवन एक सुखकर प्रवास आहे त्यात कधी दुःखाचे घाट तर कधी सुखांची वाट थोड्या थोड्या अंतराने येत राहतं फक्त या रस्त्यात आपल्या संयम सुटुद्यायचा नसते लोकं काय नावं ठेवणारच आपण आपलं ध्येय उत्तम प्रकारे साध्य करायचं असतं!,,,✍🏻

एकमन#लेखक
 
@Ommshelke

Good Evening Friendes......👍🔥

Life With Positive Vibes

17 Oct, 01:39


🍀🍁गेलेल्या क्षणासाठी झुरत
       बसण्यापेक्षा समोर असलेले
         आयुष्य भरभरून जगा..🍂🌿

#Good_Morning  ☺️😍😊

Life With Positive Vibes

16 Oct, 07:50


🔥 राहुलच्या संघर्षाची कहाणी 🔥

https://youtu.be/aVnINa7Zj_8
https://youtu.be/aVnINa7Zj_8
https://youtu.be/aVnINa7Zj_8

👉 अडीच वर्षांचे कष्ट व IDBI JAM म्हणुन 2 वेळा Final Selection

नक्की पहा व जास्तीत जास्त Share करा ..

Life With Positive Vibes

16 Oct, 01:02


सोन आणि आयुष्य...
घासल्याशिवाय चमकत नाही....🏆

Good Morning Officers....😊👍💐

Life With Positive Vibes

15 Oct, 02:45


दुसऱ्या पेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका.

कारण...

घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला नेहमी वेळच लागतो... !!

आयुष्यात नेहमी सकारात्मक रहा मित्रांनो होईल होईल नक्की होईल आणि जे होईल ते एकदम बेस्ट होइल...💯

Good Morning Officers.....👍✌️🔥💐

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

14 Oct, 16:03


🏆👑 """Focus On Your Goals"""🎯📚📚✌️

Good Night Friendes....😊😊

Life With Positive Vibes

14 Oct, 04:11


"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते. त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.

तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो. आणी म्हणतो अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील. तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला."

⭐️ तात्पर्य :-

कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
एका दिवसात यश प्राप्त होत नाही. ✌️✌️

Life With Positive Vibes

13 Oct, 03:53


काही गोष्टी,व्हिडिओ एवढ्या काळजाला लागून जातात😔की त्यांच्यापासून नवीन जीवन जगण्याची उमेद निर्माण होते.आपले जीवन जसे आहे ते सुद्धा जगणे इतरांचे स्वप्न असू शकते😥कधीतरी गरजूंना मदत करा,दुखितांना आधार द्या,माणसाला त्याची खरी परिस्तिथी पाहून माणूस म्हणून स्वीकारा नक्की सुखाची झोप लागेल.आपण फक्त आपल्या कुटुंबाचा,स्वतःचा भल होण्याचा विचार करतो😔आणि त्या स्वार्थापोटी इतरांच्या दुःखाचा विचार करत नाही.समोरच्या व्यक्तीचे दुःख,यातना तोपर्यंत कळत नाहीत जोपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहत नाही.कपड्यावर दहा ठिकाणी ठिगळे असणाऱ्या गरीब शेतकऱ्याचा भाजीपाल्याचा आपण भाव करतो हे किती योग्य?कधीतरी रस्ताने जात असताना कोणी मदत मागितली तर नक्की करा,शिल्लक असलेले अन्न गरिबांना दान करा,अर्धजुने कपडे,पुस्तके,चपल्ले गरिबांच्या मुलांना,गरजूंना🙏🏻नक्की द्या.त्यांना शिक्षणात मदत करा. त्यांचा चेहऱ्यावर जो आनंद येईल त्याचाएवढा तुमच्या आयुष्यात सुखाचा क्षण नसेल.तुमचा वाढदिवसाला होणारा खर्च टाळून तो वृध्दाश्रम,अनाथगृहामध्ये जाऊन त्याच पैशाचे त्यांना सामान घेवून द्या,नक्कीच तुमचे जीवन सार्थ होईल🙏🏻चांगले कर्म करताना तुमच्या चारित्र्यावर पण शंका घेतली जाईल,तुम्ही करत असलेल्या कामावर लोकं हसतील,चेष्टा करतील,तुमच्यावर जळतीलही पण त्याचा विचार न करता इतरांचे आयुष्य नक्की फुलवावे.आपण स्वतः काही चांगला काम करत नसलो तर निदान जे करत आहेत त्यांचा मार्ग तर आडवू नका🙏🏻
समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेवून त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागणे हे सुद्धा काही देवपुजेपेक्षा कमी नाही.
ईश्वर कुणालाही भुके,दुःखी न ठेवो हीच सदिच्छा🙏🏻माझे दोन शब्द वाचल्याबद्दल धन्यवाद🙏🏻
............🦋🌺🙏............


https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

12 Oct, 01:46


""पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
    तुमच्या कर्तुत्वाला,
  पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत नव्या शुभेच्छा."

  विजयादशमी/ दसऱ्याच्या                    
हार्दिक शुभेच्छा....🍃😊🙏

 Good Morning Officers......👍✌️💐❤️

Life With Positive Vibes

11 Oct, 13:09


सर्वांनाच आग्रहाचे निमंत्रण


📌स्थळ:- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

📌वेळ:- सकाळी 7.30 वा.

📌टीप:-
प्रवेश सर्वांसाठी खुला (Saarthi + Non Saarthi)

Life With Positive Vibes

10 Oct, 08:34


....कीर्ती रुपे उरावे🙏....(नक्की पूर्ण वाचा)
माणूस कितीही मोठा झाला तरीही जमिनीशी नाळ कशी घट्ट बांधून ठेवायची ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा सर.त्यांच्या वागण्यात,राहण्यात इतका साधेपणा होता की,आपल्यालाच वाटायचे एवढा मोठा माणूस एवढा साधा कसकाय?? खरं पहाता साधेपणाच हाच सुज्ञ,जाणकार लोकांचा अलंकार(दागिना) असतो आणि जो तो परिधान करतो तो "रत्न" सारखा शोभून दिसतो.हाच अलंकार रतन टाटांनी परिधान केला म्हणून आज भेलेही ते ह्या जगात नसतील पण त्यांची शिकवण,देशाबद्दल असणारी आस्था,सतत पुढे चालतं जाण्याची प्रेरणा ही नेहमीच प्रत्येक भारतीयांना प्रगतीमार्गावर उपयोगी पडेल हे नक्कीच.रतन टाटा ह्यांनी प्रत्येकी कार्यात केलेले समाजाहित कौतुकास्पद आहे.स्वतःवर विश्वास ठेवून साधेपणात जग कसं जिंकायचं ह्याचे उदाहरण म्हणजे रतन टाटा.अश्या "रत्नाची" किंमत अमूल्य होती आणि राहणार 💚
............🦋🌺🙏............

Life With Positive Vibes

10 Oct, 00:38


✍️✍️✍️,,,,,,,,,,,
*आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात आपल्या भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.*

*🌹 Good Morning Officers 🌹*

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

09 Oct, 14:22


https://youtu.be/VSI-OzgbNcc?si=Y6KPGt4b81egj6p3

Life With Positive Vibes

09 Oct, 02:00


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जितके मोठे मन, तितके सोपे जीवन !

वादाने अधोगती, तर संवादाने प्रगती !

जग काय म्हणेल हा विचार करु नका,
कारण लोक फार विचित्र आहेत !

अपयशी लोकांची थट्टा करतात आणि
यशस्वी लोकांना विरोध करतात !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹