२. राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून: ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:
येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती www.rimc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिटयूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:
या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी यंदा १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे २०१६ मध्ये घेण्यात येईल.
अनेक पालकांची आपल्या पाल्याला एन.डी.ए मध्ये पाठविण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्ग माहीत नसल्यामुळे त्यांचे पाल्य एन.डी.ए प्रवेशास मुकतात. बर्याच पालकांचा असा गैरसमज असतो की एन.डी.ए ला जाण्यासाठी घोड्सवारी, रायफल शुटींग जमणे किंवा जिमला जाणे आवशक आहे. परंतु वरील माहिती वरून आपल्या लक्षात येईल की एन.डी.एच्या लेखी परीक्षेसाठी ११वी व १२वी च्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच मुलाखत उत्तीर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा सांघिक खेळ खेळून आपले नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज थोडावेळ मैदानात जाऊन व्यायाम केला किंवा नियमितपणे मैदानात एखादा सांघिक खेळ खेळला तरीही असे विद्यार्थी एन.डी.ए निवडी मधील सर्व शारीरिक चाचण्या पूर्ण करू शकतात. एक गेष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की एन.डी.ए ला निवड झालेले बरेचशे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील तसेच कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नसलेली असतात. एन.डी.ए मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचेच मुले सिलेक्ट होतात हा देखील एक गैरसमज अथवा न्यूनगंड आहे. गुगल वर थोडा शोध घेतला की लक्षात येईल की एका सर्वसाधारण रिक्षा चालकाचा मुलगा, शेतकर्याचा मुलगा, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, पोलिस हवालदाराचा मुलगा असे बिगर लष्करी पार्श्वभूमी असलेले असंख्य मुले एन.डी.ए मध्ये दाखल होऊन आज लष्करात अधिकारी पदाच्या मोठ्या हुद्यावर आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्या, एन.डी.एला जाण्याचे आपले ध्येय्य निश्चित करा आणि लागा तयारीला.