Últimas publicaciones de General knowledge in Marathi 💡 (@generalknowledgeinmarathi) en Telegram

Publicaciones de Telegram de General knowledge in Marathi 💡

General knowledge in Marathi 💡
Please subscribe to our official youtube channel:-https://www.youtube.com/channel/UCfG_bedD0HBbrFo1JpgUEqA Important important knowledge questions and answers in marathi,official website: gkinmarathi.com
2,043 Suscriptores
175 Fotos
14 Videos
Última Actualización 09.03.2025 00:21

El contenido más reciente compartido por General knowledge in Marathi 💡 en Telegram

General knowledge in Marathi 💡

26 Feb, 05:25

725

📰 26 फेब्रुवारी 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

🎯 तब्बल 35 वर्षानंतर उतरले हे विमान: https://youtu.be/-9qqoY704OU


👩 शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी नमो शेतकरी योजना व pm किसान योजनेअंतर्गत मोदींच्या हस्ते एका क्लिकवर सायंकाळी ४ वाजता, एकच दिवशी सर्व हफ्ते मिळून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये बँक खात्यात मिळणार


🎊 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५ नव्या एम्स आणि ४८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्धाटन आणि पायाभरणी


🚩 मनोज जरांगे आंतरवाली सराटी इथलं उपोषण स्थळ सोडून मुंबईकडे रवाना


🏫 शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठीचं किमान वय ६ वर्षं राहील याची दक्षता घ्यावी - केंद्रीय शिक्षण विभाग


👨 धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


🎓 धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


👨 राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


👨 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या 7 हजार 66 क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला


♿️ राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार दिव्यांग जिल्हा समन्वयक, विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


👨 अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फी मधून कायम सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला


🚺 राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


📰 आता रडायचे नाही, तर लढायचे; गिरणी कामगारांचे घरांसाठी २९ फेब्रुवारीला लालबागमध्ये तीव्र आंदोलन


🚩 मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणारच नाही, रामदास आठवले स्पष्टच बोलले


🚩 जरांगेंची भाषा राजकीय, त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मर्यादेत राहा; मुख्यमंत्री शिंदेंचा स्पष्ट भाषेत इशारा!


🎬 सिद्धार्थच्या 'योद्धा' चित्रपटाचा ट्रेलर हा सिनेमा 15 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार


🥺 गावातील गरीब जगतोय 45 रुपयात तर शहरातील गरीब 67 रुपयात, NSSO अहवाल प्रसिद्ध


🎭 नाट्यसंस्कृतीला बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करणार; CM शिंदेंची घोषणा


📰 पाच राज्यात काँग्रेस आणि आपची समझोता एक्स्प्रेस सुसाट; यूपीमध्ये अखिलेश म्हणाले, भाजपा हटाओ, संकट मिटाओ!


🛣 मुंबई-गोवा महामार्गावर 10 वर्षात 6000 कोटी खर्च, तरिही रस्त्यांची स्थिती खराब, आरटीआय मधून माहिती समोर


👮 पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई, 391 आरोपींना अटक


👨 केंद्रात सरकार आल्यास एका मिनिटात एमएसपी लागू करू, राहुल गांधींची घोषणा


👮 पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई, 391 आरोपींना अटक


🚩 मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


🚩 महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून मनोज जरांगेंचा वापर - आशिष देशमूख


🚩 काहीही बोललं म्हणजे खपतं असे समजू नये; कोणाला बोलतो हे बघण्याची गरज; अजित पवारांची नाव न घेता जरांगेंवर टीका


🛣 झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉरचे यश! मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सात वर्षात अपघाती मृत्यूत 58.3 टक्के घट


🌊 आर्थिक संकटाशी झुंजणारा पाकिस्तान पाण्यासाठी आसुसणार, रावी नदी पाणी प्रवाह पूर्णपणे बंद


💉 मालेगावात 3 मार्चपासून पोलिओ लसीकरण; तालुक्यासह 1 लाख 62 हजार डोसचे उद्दिष्ट


🛣 40 मिनिटांचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार पडणार; कोकणातील कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू


🪙 Today's Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणुन घ्या - 22K = 57,860/- ||| 24 = 62,500/- (source:CS Jwellers)




🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🎯 तब्बल 35 वर्षानंतर उतरले हे विमान: https://youtu.be/-9qqoY704OU
General knowledge in Marathi 💡

23 Feb, 04:55

676

📰 23 फेब्रुवारी 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

🎯 Police Bharti 2024 GK in Marathi: https://youtu.be/Jw9DhpYeWrs



🚌 'बेस्ट'मधून ४० हजार फुकट्या प्रवाशांचा प्रवास, दररोज ८००जण प्रशासनाच्या जाळ्यात, २४ लाखांचा दंड वसूल


💰 Byjus Crisis: बायजूचे हेडमास्टर रवींद्रन यांना दिसता क्षणी अटक होणार; EDकडून लुक आउट नोटीस


💐 लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन


♿️ प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


🔝 फोर्ब्स मासिकाने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत.


👩 राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कच्या शिफारसीनुसार CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ एक नवा प्रयोग करुन पाहण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी CBSE नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ओपन बुक टेस्ट' राबवणार आहे.


🏏 क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून नुकतेच आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाच्या हंगामाची सुरूवात ही चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्याने होणार असून हा सामना 22 मार्चला होणार आहे.


📰 राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ऐतिहासिक निर्णय घेत व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे.


🏦 देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने बाजारमूल्याच्या बाबतीत आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसला मागे टाकले आहे. SBI बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील 5वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.


🎉 शरद पवार गटाचं नवं चिन्ह 'तुतारी', निवडणूक आयोगाची घोषणा


📰 महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती


📰 अजय बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगेंचा मोठा दावा


💦 नाशिकमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी कमी


😳 पुण्यानंतर सांगलीत ड्रग्जचा महापूर; मीठाच्या पोत्यात लपवलेलं 300 कोटींचे ड्रग्ज जप्त!


👶 राज्यात बालमृत्यू दरात घट, सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केली आकडेवारी


📰 मुस्लिम असल्यानेच माझ्यावर काँग्रेसमध्ये अन्याय, झीशान सिद्दीकी यांचा थेट आरोप


👨 शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांवर आता ईडीकडून छापेमारी


👨 निवासी डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार; निवासी डॉक्टर संपावर कायम


💹 मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५३५ अंकांची वाढ


⚽️ तुर्कीतल्या महिला फुटबॉल चषक २०२४ स्पर्धेत भारत सर्वोच्च स्थानावर


🪙 Today's Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणुन घ्या - 22K = 57,860/- || 24 = 62,500 /-



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🎯 Police Bharti 2024 GK in Marathi: https://youtu.be/Jw9DhpYeWrs
General knowledge in Marathi 💡

22 Feb, 05:30

985

📰 22 फेब्रुवारी 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

🎯 १० वर्षांपूर्वी हरवलेले विमान सापडले: https://youtu.be/tWhrorDKgGw



👨 रबी हंगामात ज्वारी क्षेत्रात गतवर्षापेक्षा ३ लाख २० हजार हेक्टरनं वाढ

👨 PM किसान योजनेतंर्गत पुढील १६ वा हफ्ता शेतकऱ्यांना २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी बँक खात्यात जमा होणार

🤯 बुलढाणा जिल्ह्यात विषबाधा झालेल्यांना उपचार करून घरी सोडले; आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले शेकडो लोकांचे प्राण

👨 नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १७९२ कोटी निधी वितरणास मान्यता शासन निर्णय जारी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

🤑 पुणे पोलिसांच्या कारवाईत साडे ३ हजार कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

🪙 गोल्डमॅन हरपला, प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीनाथ फडके यांचं निधन

📰 मोदीजी एक दिवस घरी बसले नाहीत, दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

🚇 दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडणार, रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील; खासदार सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

🎓 नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरींची हकालपट्टी, तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर राज्यपालांकडून बडतर्फीची कारवाई

🌊 मुळशी परिसरासह पुण्याला मिळणार अतिरिक्त पाणी; धरणाची उंची वाढवण्याचे अजित पवारांचे निर्देश

📰 बारामती MIDC च्या विविध मागण्या अजित पवारांकडून मार्गी, 200 खाटांच्या रुग्णालयासाठी वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश

👨 शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना न्यायालयाचा दिलासा; जामीन राहणार कायम

🚩 मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरली! 24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करा, वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं

🏫 ‘स्मार्ट स्कूल’ मुळे महापालिका शाळांना नवसंजीवनी; विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

🏏 आयपीएल 2024 हा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार; अरुण धुमाळ यांनी दिली माहिती

🏏 चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यातून जसप्रित बुमराह के एल राहुल बाहेर

🏏 इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मुकेश कुमारचा समावेश

🪙 Today's Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणुन घ्या - 22K = 57,820/- || 24K = 62,450/-



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🎯 १० वर्षांपूर्वी हरवलेले विमान सापडले: https://youtu.be/tWhrorDKgGw
General knowledge in Marathi 💡

21 Feb, 05:16

1,057

📰 21 फेब्रुवारी 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍


🎯 स्पर्धा परीक्षा Youtube चॅनेल: https://bit.ly/42PsMZ2



👨 कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार –कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा


📰 कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरच्या विकासाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा दूर झाला - प्रधानमंत्री


📮 आता इंडियन पोस्ट पेमेंट बँकदेखील फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे एमडी आणि सीईओ व्ही. ईश्वरन यांनी दिली.


👨 ऊसतोड कामगारांसाठी, ऊस तोडणीचे काम करत असताना अपघाती मृत्यू झालेल्या ऊस तोडणी कामगार, तसेच वाहतूक कामगार आणि मुकादम यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे.


👨 विद्यार्थ्यांना 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये दोनदा बसण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले


🚩 मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले


🌟 स्टार प्रवाहवर सुरु होतोय धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'; अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत


📰 नांदेडमधून काँग्रेस उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून येणार, शिवाजीराव मोघेंनी अशोक चव्हाणांविरोधात शड्डू ठोकला


🧅 कांदा निर्यातबंदी हटवली नाहीच, 31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या स्पष्टीकरणामुळे शेतकरी आक्रमक


🚩 'मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल


🏏 महेंद्रसिंग धोनी ठरला IPL च्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार, माजी क्रिकेटपटूंच्या पॅनेलने तयार केला आजवरचा सर्वांत मजबूत संघ


☀️ जगातील सर्वात मोठ्या कृष्णविवराचा शोध; सूर्याच्या वस्तुमानाच्या १७ अब्जपट वस्तुमान


👦 टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याघरी बाळाचं आगमन


📰 राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मोठी अपडेट; राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत होणार


🚩 मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के स्वतंत्र आरक्षण, राज्याच्या दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर


👨 आजपासून बारावी बोर्ड परीक्षा; राज्यातील 15 लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा


🏏 आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार; अध्यक्ष अरुण धुमल यांनी केला खुलासा


📰 मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत, शाहू महाराज कोल्हापुरातून उमेदवार असल्यास मला आनंद : शरद पवार


🚩 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न दिल्याने मनोज जरांगे आक्रमक; सलाईन काढून फेकलं, उपचारही बंद


👨 शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्सचा बाजार, पुण्यात दीड दिवसात दोन कारवाया; 1100 कोटींचं ड्रग्स जप्त


🏏 इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदारचा पत्ता होणार कट, केएल राहुलची एन्ट्री जवळपास निश्चित


📰 सर्वात मोठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीला केला सादर


🎬 जय शिवराय! 'शिवजयंती'चा 'शिवरायांचा छावा'ला मोठा फायदा; रिलीजच्या चार दिवसांत केली 5.12 कोटींची कमाई


🪙 Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठा बदल, खरेदीआधी जाणून घ्या आजचे दर - 22K = 57,770/- || 24K = 62,400/-




🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🎯 स्पर्धा परीक्षा Youtube चॅनेल: https://bit.ly/42PsMZ2
General knowledge in Marathi 💡

17 Feb, 04:54

812

📰 17 फेब्रुवारी 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

🎯 Saralseva Exam 2024 Gk in Marathi: https://www.youtube.com/watch?v=uOOaePu1Idw


🚚 शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण शासन निर्णय प्रसिद्ध


👴 राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला जयंत पाटील यांचा विरोध


🚨 देशातील पहिली हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उत्तराखंडमधून सुरू होणार. या सेवेअंतर्गत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे हेलिकॉप्टर तैनात केले जाईल


🚺 पती त्याच्या आईसोबत वेळ घालवतो, तसेच पैसे देत असतो असे म्हणत एका महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र पती आपल्या आईला वेळ आणि पैसे देतो ही कौटुंबिक हिंसा असू शकत नाही अशी महत्त्वाची टिप्पणी करत मुंबई सत्र न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे.


💹 तुम्हाला माहिती असेल, शेअर बाजारांमध्ये सहसा शनिवार आणि रविवारी किंवा सुट्टयांच्या दिवशी व्यवहार केला जात नाही. म्हणजेच या दिवशी शेअर्सची खरेदी-विक्री होत नाही. मात्र आता, नॅशनल स्टॉक एक्सचेंजने २ मार्च रोजी शेअर बाजार उघडणार असून ट्रेडिंग होणार असल्याची माहिती दिली


💹 OTT प्लॅटफॉर्म ULLU Digital IPO लॉन्च करणार. यासाठी कंपनीने मसुदा कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सादर केली आहेत. उल्लू डिजिटलला त्याच्या IPO साठी SEBI कडून मंजुरी मिळाल्यास, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा SME IPO असेल.


📰 निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा, राणेंच्या गुहागरमधील सभेपूर्वी प्रचंड तणाव


📰 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या कौतुकासह सहा ठराव मंजूर


🚩 सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीच, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा


😱 धनगर समाजाला हायकोर्टाचा मोठा धक्का, आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली


📰 दुबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘भारत मार्ट’चे उद्घाटन; भारत मार्टमध्ये शोरूम, गोदामे, कार्यालये आणि इतर सहायक सुविधा


😱 छ. संभाजीनगरमधून MIM चा कोणताही उमेदवार निवडून येईल मी उत्तर मुंबईतून लोकसभा लढवण्याच्या विचारात, खासदार इम्तियाज जलील


📰 भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मोठं पद, राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, राज्यसभा तिकीट नाकारल्यानंतर भाजपकडून पुनर्वसन


🏦 रिझर्व्ह बँकेने पेटीएमला दिला मोठा दिलासा; आरबीआयने पेटीएमला 15 मार्च 2024 पर्यंत मुदत वाढवून दिली


🚆 देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता गॅस वापराला बंदी


🚩 मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला, जे कुणबी त्यांना आधीपासूनचे आरक्षण, नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट स्वतंत्र आरक्षण, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही


😅 सेल्फी काढून, संसदेत भाषण करुन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी वात पेटवली, बारामतीत सुप्रियांविरोधात उमेदवार देणार


😓 शाळेत खेळताना तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना


🙄 निलेश राणेंनी मर्यादा सोडली! भास्कर जाधवांना जाहीर सभेतून शिवीगाळ


👨 तांदूळ, गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या घटली; बिहारचा आर्थिक पाहणी अहवाल


🚩 'मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता, त्यांनी ज्यूस पिताना....', प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा


🎬 उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरी यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन


🏸 बंगळूरू खुली टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश


🏸 महिला सांघिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल


🏏 भारत-इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रविचंद्रन आश्विनचं बळींचं पाचवं शतक पूर्ण


🪙 Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत आजही वाढ, लगेच पाहा काय आहे आजाचा भाव - 22K = 57,390/- 24K = 61,990/- | silver - 71,800/- per kg




🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🎯 Saralseva Exam 2024 Gk in Marathi: https://www.youtube.com/watch?v=uOOaePu1Idw
General knowledge in Marathi 💡

13 Feb, 04:33

790

📰 13 फेब्रुवारी 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

🎯 जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर - 3 : https://bit.ly/3HRZwr2



🏥 धाराशिव इथं ५०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयसाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना


📰 माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकी तसंच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा


📰 बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन


👨‍👨‍👧‍👧 १७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या सावकारांच्या जाचातून सोडवलेल्या हक्काच्या जमीनी


💰 किरकोळ महागाई जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर आली, डिसेंबर 2023 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 3.8% वाढ


🛣 लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील. देशातील रस्ते आणि महामार्ग सुधारण्यासाठी भारत सरकार दिवसेंदिवस काम करत आहे. त्याच बरोबर तो दिवस दूर नाही जेव्हा भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.


🌍 जगात प्लॅस्टिक कचरा निर्माण करण्‍यात भारताचा पाचवा, तर ई-वेस्‍ट तयार करण्‍यात तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदलाच्या माजी सल्लागार संचिता जिंदल यांनी दिली.


😱 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.


🚗 येत्या 20 फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा बंद राहणार


📰 विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला


📰 पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी जाणार दोहाला; कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय बैठकी घेणार


🚩 मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; जरांगेंची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास दिला नकार


📰 भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला, तर शहरातही विजांसह वादळी पावसाने लावली हजेरी


🤔 नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका


📰 कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश


👨‍🏫 भारतीय मूल्याधारित शिक्षण ही काळाची गरज; स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती कार्यक्रमात मोदींचे प्रतिपादन


🚩 बहुचर्चित रामायण या चित्रपटामध्ये रणबीर कपूर साकारणार रामाची भूमिका तर अभिनेत्री साई पल्लवी ही सितेच्या भूमिकेत दिसणार


🏑 महिलांच्या एफआयएच हॉकी प्रो लिगमध्ये चीनने भारताचा २-१ असा पराभव


🏦 पेटीएमवर आरबीआय गव्हर्नरांचे मोठे वक्तव्य, पेटीएम पेमेंट बँकेला दिलासा मिळण्याची आशा संपली


📰 ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ जिल्हाधिकारी राजेंद्र  क्षीरसागर


🪙 Gold Silver Rate: सोनेखरेदीची सुवर्णसंधी! दरात झालीये घसरण, आजचे सोन्याचे भाव 22K = 57,860/- ||| 24 = 62,500/- || Silver - 71,400/- per kg



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🎯 जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर - 3 : https://bit.ly/3HRZwr2
General knowledge in Marathi 💡

08 Feb, 05:37

903

📰 08 फेब्रुवारी 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

🎯जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर - 3 : https://bit.ly/3HRZwr2



🚹 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील महिलांना आता प्रोत्साहन, प्रसूती रजेसह पुरुष समकक्षांच्या बरोबरीने, भरती नियमांनुसार पदोन्नती आणि ज्येष्ठता यासारख्या समान संधी दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.


😯 समान नागरी संहिता लागू झाल्यानंतर, उत्तराखंड राज्यातील वेब पोर्टलवर लिव्ह-इन संबंधांची नोंदणी करणे बंधनकारक असेल. नोंदणी न केल्यास, जोडप्याला 6 महिने कारावास किंवा 25 हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा होऊ शकते.


🚌 दिल्लीमध्ये ट्रान्सजेंडर समुदायाशी संबंधित व्यक्तींना डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये विनामूल्य प्रवास करता येईल, असा निर्णय दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.


📛 ‘फास्टॅग’ ची केवायसी करण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होती, अशी घोषणा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे.


📰 शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव! 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' या नावावर शिक्कामोर्तब


👨 राज्यातील निवासी डॉक्टरांकडून संप माघार, राज्यातील आरोग्य क्षेत्रावरील संकट टळले


😯 काँग्रेसने 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होईल, ते आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत; राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार टीका


🤗 पंतप्रधान देशाचा असतो पक्षाचा नसतो; शरद पवारांकडून पीएम मोदींच्या भाषणाची चिरफाड


👮 अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; दारू घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयासमोर 17 फेब्रुवारीला व्हावं लागणार हजर


😯 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानात दोन बॉम्बस्फोट; 28 ठार, अनेक जण जखमी


👨 मी कोणाहीसोबत जाणार नाही, मला त्यांच्यात रस नाही, मी स्वतंत्र लढणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची माहिती


📰 संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार? 11 फेब्रुवारीला घोषणा करण्याची शक्यता


🏠 देशातील प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडेदरांमध्ये वाढ; 25 ते 30 टक्क्यांनी वाढ


😯 सासवड मध्ये EVM मशीन चोरी प्रकरण; DYSP आणि तहसीलदाराचं जागेवर निलंबन; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई


🏷 शरद पवार यांच्या नव्या पक्षाला नाव मिळाले;'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार'


🥶 काश्मीरमध्ये पर्यटक लुटत आहेत बर्फवृष्टीचा आनंद; फेब्रुवारीमध्ये टूर पॅकेजेस ४० टक्क्यांनी स्वस्त, पर्यटकांच्या संख्येत ७० टक्क्यांनी वाढ


🎬 अखेर 'द केरला स्टोरी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; 16 फेब्रुवारी 2024 ला ZEE5 वर होणार प्रदर्शित


🏏 भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. वनडे, टी-२० आणि कसोटी रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.


🪙 Gold Silver Price Today: आनंदवार्ता! सोन्याला उतरती कळा - 22K = 58,230/- ||| 24K = 62,900/-



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🎯 जिल्हा न्यायालय भरती सराव पेपर - 3 : https://bit.ly/3HRZwr2