Chhatrapati_Shasan.96k @chhatrapati_shasan_96k Channel on Telegram

Chhatrapati_Shasan.96k

@chhatrapati_shasan_96k


● छत्रपती शासन ●
🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏
😎 सह्याद्रीचा दुर्गसेवक
मावळा स्वराजाचा🚩
🙏1st Respect Girls
इतिहास प्रेमी

Chhatrapati Shasan 96k Telegram Channel (Marathi)

छत्रपती शासन 96k टेलीग्राम चॅनेल हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्यात जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे ह्या वीर मराठा सर्वांचे उदात्त आदर्शांना सलाम करण्यात येते. ह्या चॅनेलवर आपल्याला सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या कथा, मावळा स्वराजाच्या मुख्यात्वाची वाचन पुस्तके आणि भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा येतील. ह्या चॅनेलवर आपल्याला इतिहास प्रेमी मुलांसाठी इतिहासाच्या छोट्या आणि मोठ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. चला जॉईन करा 'छत्रपती शासन 96k' चॅनेल आणि आपल्याला मराठा इतिहासातील व्यास्त विश्वात घेऊन जा.

Chhatrapati_Shasan.96k

13 Nov, 04:11


स्वराज् रक्षिण्या राजा शंभू र धावला,
हिंदुत्वाच्या नवसाला मल्हारी पावला...!!!

महाराष्ट्राचा_महासिनेमा
#TrailerOutNow

धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज
#Dharmarakshak_Mahaveer_Chhatrapati_Sambhaji_Maharaj
#22_November_2024

https://www.instagram.com/reel/DCTBrgZylDx/?igsh=MXFhYzd0OGczdHRo

Chhatrapati_Shasan.96k

10 Nov, 04:10


"साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड अफजलखान मारायला ६ फुटाच्या तलवारीचा नाही तर ४ इंचाच्या वाघनखाचा उपयोग केला."

नियोजन अन युक्ती.....🚩🙏
🔥🔥 सर्व हिंदूंना श्री शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 🚩

https://www.instagram.com/p/DCLTZ3gSkjv/?igsh=MWZvamVhb3g1OW95cw==

Chhatrapati_Shasan.96k

26 Aug, 11:43


छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे "शक्तीस्थळ" असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे.

सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे.

घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे.

https://www.instagram.com/reel/C_IZl20Khfs/?igsh=MTc3bm56eTB4ODloNQ==

Chhatrapati_Shasan.96k

26 Jul, 03:18


तब्बल 60 दिवस चालणारे घनघोर युद्ध, जवळपास 527 जवानांना वीरमरण " आणि दि. 26 जुलै 1999 रोजी विजयश्री भारताच्या नावावर सुवर्णाक्षरांनी कोरली गेली...

*कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व जवानांना विनम्र अभिवादन......🙇🏻🙏🏻🇮🇳💐*
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लढणाऱ्या आमच्या तिरंग्यासाठी प्राणाची बाजी लावून दगाबाज पाकला अद्दल घडवून..
भारत देश सदैव 'अजिंक्य' आहे हे सिद्ध करणाऱ्या भारतीय शूरवीर सैनिकांना शतशः नमन.
कारगिल विजय दिवस..
26 जुलै 1999
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳

.

https://www.instagram.com/reel/C93q5NKvwpx/?igsh=bmVyem9ma

Chhatrapati_Shasan.96k

21 Jul, 03:36


गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🧡
विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज 🧡🚩

https://www.instagram.com/reel/C9q11R3PpRF/?igsh=MTQ5aW16N2VxbmpieA==

Chhatrapati_Shasan.96k

20 Jul, 13:43


छत्रपती शिवराय हेच आमचे गुरु तेथूनच आमच अस्तित्व सुरु..!

Chhatrapati_Shasan.96k

20 Jul, 13:42


https://www.instagram.com/reel/C9pXKSevpXs/?igsh=MWs4ajNncHVkdnI5dw==

छत्रपती शिवराय हेच आमचे गुरु तेथूनच आमच अस्तित्व सुरु..!

Chhatrapati_Shasan.96k

07 Jun, 12:56


सर्वांनी ही पोस्ट share करून ही मागणी लावून धरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संस्कृतिक मंत्री यांना टॅग करा..
सर्व मंत्र्यांना राजकारणामधे यासर्वांकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण आपण लक्ष द्यायला भाग पाडू..

Chhatrapati_Shasan.96k

07 Jun, 12:56


https://www.instagram.com/p/C76fyJLS469/?igsh=am41ODZvaXRvdTFj

काल दुर्गराज श्रीमान किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला.. अगदी डोळ्याचे पारणें फेडण्यासारखा सोहळा किल्ले रायगडावर साजरा झाला.. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांसमोर त्यांची एक इच्छा सांगितली जी की मागणी आहे संभाजीराजेंची सत्ताधारी व विरोधकाकडे की..
" सरकारने गड किल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गसंवर्धन करणाऱ्यांना सोबत घेऊन एक मंडळ स्थापन कराव व त्यासाठी किमान 2000 हजार कोटी पुढील 5 वर्षासाठी मंजूर करावे. सरकार अस एकडे तिकडे मोठ्या प्रमाणात निधी देत तर गड किल्ल्यासाठी देखील द्यावा.. यासाठी एक निश्चित तारीख सांगावी त्यापेक्षा उशीर झाल्यास संभाजीराजे छत्रपती व शिवभक्त रायगड उतार होणार नाही..
- संभाजीराजे छत्रपती"
या आधीही सरकारने अनेक वेळा गड किल्यासाठी निधी देण्याच आश्वासन दुर्गप्रेमिना अनेक वेळा दिल आहे पण प्रत्येक वेळेस केवळ शिवभक्ताच्या तोंडाला पान पुसण्याचं काम सरकार करतंय.. आणि निधी दिला तरी तो फक्त केंद्राच्या अधिक्याखाली किंवा राज्याच्या अधिक्याखाली असलेल्या किल्ल्याला भेटतो आहे पण उर्वरित किल्ल्याच काय त्यांना जमीनदोस्त होऊन द्यायचं का ? या साठी संभाजीराजे छत्रपती यांची ही मागणी अगदी योग्य आहे. सरकारे लवकरात लवकर यावर आपला निर्णय द्यावा.. व एक तारीख द्यावी की या तारखेपर्यंत आम्ही आमचा निर्णय सांगू त्यानंतर सर्व शिवभक्त संभाजीराजे छत्रपती जो निर्णय घेतली त्यांच्या सोबत उभे राहतील..
- दर्शन जाधव (Insta | @chhatrapati_shasan.96k)

Chhatrapati_Shasan.96k

06 Jun, 07:11


शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ चे काही क्षण 😍

https://www.instagram.com/p/C73XzVFKsTo/?igsh=anp0ZWZueDgxZWlp

Chhatrapati_Shasan.96k

27 Mar, 16:42


इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर..
राज्य करणारा रयतेचा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा (तिथीप्रमाणे) 🧡

Chhatrapati_Shasan.96k

27 Mar, 04:27


(तुका म्हणे धर्म रकक्षावयासाठी देवास ही अटी जन्म घेणे.)
संत तुकाराम यांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकांच्या हाती संत तुकाराम यांच्यासाठी मशाल, छत्र, घोडे आणि रत्ने पाठवले. संत तुकारामांना बघून सेवक म्हणाले- आपण परमेश्वाराचे परम भक्त आहात म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सेवक, घोडे आणि पालकी पाठवली आहे. आपण आमच्यासोबत राजदरबारात यावे.
यावर संत तुकारामांनी विनंतीपूर्वक म्हटले की आपल्या महाराजांना सांगावे की आपल्यावर सदा कृपा राहील परंतू मला माझ्या विठ्ठलापासून विमुख करु नका. मी जिथे आहे, ज्या अवस्थेत आहे, खुश आहे. माझी कुटियाच माझं राजमहाल आहे. आणि माझ्या विठ्ठलाचं मंदिरच माझं राज दरबार आहे.
संत तुकारामांचे हे निर्लोभ रुप बघून राजा देखील हैराण झाले. ते स्वतं अलंकार, वस्त्र, धन-दागिने घेऊन सेवकांसह तुकारामांना भेट द्यायला देहू गावी आले. हे सर्व वैभव बघून तुकाराम म्हणाले- दिवटया छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥
आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया॥
मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव॥
गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा॥
सोने आणि माती। आम्हा समान हे चित्ती॥तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे॥’
मुंगी आणि राव, सोने आणि मृत्तिका समान असून आम्हाला तुम्ही प्रभुचिंतन करण्याचे खरे सुख आहे ही भूमिका त्यांनी मांडली. बहुमोल रत्नांचा नजराणा आमच्यासाठी कामाचा नव्हे. यात आमचं संतोष होणार नाही केवळ प्रभू भक्ती हेच श्रेष्ठ आहे.
आता पंढरिराया। येथे मज गोविसी कासया॥
आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥
तुमचे येर ते धन। ते मज मृत्तिकेसमान॥
संत तुकारामांच्या उपदेशाला प्रभावित होऊन शिवाजी महाराज भजन, कीयेता गोळया बाण साहिले भडिमार। वर्षता अपार वृष्टी वरी॥
स्वामीपुढे व्हावे पडता भांडण। मग त्या मंडण शोभा दावी॥
पाईकांनी सुख भोगिले अपार। शूर आणि धीर अंतर्बाही॥
पाईक तो जाण पाइकाचा भाव। लगबग ठाव चोरवाट॥
आपण राखोनी ठकावे आणिक। घ्यावे सकळीक हिरोनिया॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक। बळिया तो नाईक त्रैलोकीचा॥

जे शूर पुढे होऊन गोळया आणि बाणांच्या वर्षावाला छाती पुढे करतात, असे शिपाई एखाद्या राज्याचा नव्हे तर त्रैलोक्याचाही धनी-बळिया म्हणून शोभेल. अर्थात असे शिपाई शिवरायाचे होते तसंच असावे ही आकांक्षा या साधुश्रेष्ठाची होती.संत तुकाराम यांना वंदन करुन शिवाजी महाराजांनी निरोप घेतला.

Chhatrapati_Shasan.96k

27 Mar, 04:24


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी कर्मकांड, अंधश्रद्धेविरूद्ध आपल्या अभंगांमधून समाजप्रबोधन केले. आपल्या रसाळ अभंगवाणीतून त्यांनी जनसामन्यांना जगण्याचा खरा मार्ग दाखवला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीज दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

संततुकाराममहाराजबीजदिन ❣️